वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
15 Jan 2015 - 3:24 am
गाभा: 

मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.

माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.

भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.

शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?

एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.

मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.

ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.

माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.

शिक्षण : जेमतेम डिप्लोमा

पगार : २२००/-

नौकरी : खाजगी.

जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.

इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)

वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल.

आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.

लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.

शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.

अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.

दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.

थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?

संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.

डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 12:45 pm | टवाळ कार्टा

बरेच लिहिले असते (अगदी स्वानुभवातुन) पण मग धाग्याचे काश्मिर होईल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 5:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लिही रे तु....तुम लढो हम पाठिंबा देताय :)

अरे अनुभव लिहायसाठी काढलाय ना धागा? मग लिही की...आमच्या सारख्या ज्युनिअरांना मार्गदर्शन दिल्याचं पुण्य मिळेलं ...त्या पुण्याने एखादी पुणेकरीण मिळेल .. =))

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 9:35 pm | टवाळ कार्टा

त्या पुण्याने एखादी पुणेकरीण मिळेल

पुणेकरीण मिळवलीस तर कर्माने मरशील ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 10:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गैरेसमज झाला मालकं तुमचा. त्या पुण्याद्वारे तुला एखादी पुणेकरीण मिळेलं :D

स्ने, मी हा प्रयत्न केला होता आणि तो घरच्या मंडळींकडून हाणून पाडण्यात आला.

आता कुठे जमले आहे, तेव्हा अपेक्षा जाणून घेतोय..

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 8:25 pm | आजानुकर्ण

या वयात मुलींची मानसिकता खूप लवचिक असते. विशेषत: अलीकडच्या पिढीच्या मुली खूपच प्रगल्भ विचाराच्या आणि कोणत्याही तडजोडीस तयार असतात, असे आढळले आहे. नवऱ्याच्या पगाराबद्दल त्या फारशा आग्रही दिसत नाहीत.

*lol*

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 10:35 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =))

ज्योक ऑफ द सेंच्युरी =))

सायटींवरती लिहायला ठीके, वेळ आली म्हणजे असलीयत कळते.

सस्नेह's picture

17 Jan 2015 - 8:25 pm | सस्नेह

'पुणेकरणी' याला अपवाद असू शकतील याची बेशर्त स्वीकृती !
पण मग पुणेकरांना पुणेकरणीच का हव्यात ? *wink*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 9:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मॅचींग अ‍ॅट्यीट्युड पाहिजे म्हणुन.

पैसा's picture

17 Jan 2015 - 9:27 pm | पैसा

अ‍ॅटिट्यूड म्हटलं की छान वाट्टं. तेच माज म्हणा बघू!

धर्मराजमुटके's picture

15 Jan 2015 - 12:32 pm | धर्मराजमुटके

जमाना बदल गया है ! हेच खरे. माझ्या लग्नाच्या वयात मी पहिल्या धंद्यात कर्जबाजारी झालो होतो. नोकरी भेटली ती पण रु. २५००.०० ची गावखात्यातली. ( ही २००३-०४ ची गोष्ट आहे). शिक्षणात काहीही स्पेशालिटी नाही. पैसा, शिक्षण, सुंदर रुपडे या सर्वांचीच कमतरता. पोरगी पटवायची धमक नाही. माझ्या लग्नाच्या चिंतेने आईवडील बेजार आणी त्यामुळे मी पण उदास. त्यावेळी माझा एक मित्र मला नेहमी धीर द्यायचा. मला म्हणायचा अरे तु पुरुष आहेस हेच आपल्या समाजात लग्नासाठी लागणारे मोठे क्वालीफिकेशन आहे. चिंता करु नकोस.
लवकरच लग्न जमले, दिस जातील दिस येतील या म्हणीप्रमाणे चांगले दिवस देखील पहायला मिळाले.
पण ते दिवस आठवले की वाटते आज जमाना किती बदलला आहे. आज पुरुष असणे क्वालीफिकेशन नाही तर प्रॉब्लेम वाटायला लागायचे दिवस आलेत.
चालायचेच. चार दिवस पुरुषांचे, चार दिवस स्त्रियांचे. नो रिग्रेटस.
पण मागे वळून पाहिले तर एक गोष्ट नक्की आठवते की "चला बुवा, स्वस्तात सुटलो".

खटपट्या's picture

15 Jan 2015 - 1:04 pm | खटपट्या

सुंदर रुपडे या सर्वांचीच कमतरता.

असं नाय हा बोलायचं ! आमी बगीतलंय तुमास्नी !!

धर्मराजमुटके's picture

15 Jan 2015 - 10:46 pm | धर्मराजमुटके

पण ठि़क आहे. आपणच आपली लाल नाहि केली तर दुसरे कोण करणार :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 1:59 pm | निनाद मुक्काम प...

एकदा कॉलेजात असतांना कमी मार्क मिळाले म्हणजे आई बाबांच्या दृष्टीने कमी
तर आई उद्वेगाने म्हणाली होती
अरे मुलीच्या जातीत जन्माला असता तर तुला उजवून आम्ही सुटलो असतो.
मुलगा आहे असे मार्क मिळाल्यावर काय नोकरी मिळणार
माझ्या पालकांच्या काळात हम दो हमारे दो पद्धत रुळली होती.
तेव्हा सधन पालकांना दोन्ही मुली असतील तर मग त्यांचा जावई
विकत घेण्याचा प्रयत्न सुरु होतो.
कितीतरी वेळा मुलींच्या नावे रग्गड पैसा , दाग दागिने व चक्क प्रशस्त व मोक्याच्या ठिकाणी ब्लॉक सुद्धा असतो , तेव्हा तिच्या ब्लॉक मध्ये समंजस सुसंस्कृत हुशार व उच्च शिक्षित पण घरच्या हलाखीची परिस्थिती असलेला मुलगा शोधून मुलींच्या नावे असलेल्या जागेत संसार सुरु करण्यापेक्षा तिच्या पालकांचा ओढ आपल्याहून श्रीमंत तोलामोलाचे ठिकाण मुलीसाठी शोधण्याचा प्रयत्न केला जातो , लग्नाचा बाजार व तेथे घडणारे सौदे बदलणारे ट्रेंड ह्यावर एक लेख होऊ शकतो.

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतं|
बांधवा: कुलमिच्छन्ति, मिष्टान्नमितरे जना:.

या श्लोकाच्या गाभ्यालाच धक्का लागायची वेळ आली की काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजकालच्या SMS जमान्यात तो श्लोकही लघुरुपी झाला आहे...

सर्वे वित्तं इच्छन्ति ।

आनन्दा's picture

15 Jan 2015 - 12:51 pm | आनन्दा

he baghaa

दोघांनाही हा फोटो दाखवला तरी चालेल.

प्रमोद देर्देकर's picture

15 Jan 2015 - 1:20 pm | प्रमोद देर्देकर

जास्त ताणल्यास दोन्ही बाजुंनी तडजोड करावीच लागते मग ती आधी का नाही करायची?
1

एस's picture

15 Jan 2015 - 1:30 pm | एस

दाद दिली गेली आहे!

सर्वसाक्षी's picture

15 Jan 2015 - 2:58 pm | सर्वसाक्षी

योग्य त्या वेळी जन्मास आलो, सुटलो. आजच्या काळात मला अ‍ॅडमिशन, नोकरी, लग्न, फ्लॅट, गाडी यापैकी काहीही शक्य झालं नसतं.

आता अपेक्षा मुलींच्या वाढल्यात की पालकांच्या पडताळणं फार कठीण!! आमच्या ग्रुपातल्या मुलींना स्थळे सांगून येऊ लागली त्यावेळचा एक संवाद आठवला. मुलगा का नाकारलास, तर त्या बैने उत्तर दिलं होतं, "त्याला महिना जेमतेम पन्नास हजार रुपये पगार आहे, कसं चालणार घर?". ग्रूपातली मंडळी एकमेकांच्या तोंडाकडे बघत, आता यावर काय रिअ‍ॅक्शन द्यायची त्याचा विचार करत होतीत.

जातवेद's picture

15 Jan 2015 - 9:31 pm | जातवेद

संन्यास घ्यावा म्हणतो :)

अगदीच संन्यास घ्यायची गरज नाही, but prepare yourself in case you have to stay alone!! Arranged Marriage करुन पदरी पडलेलं पवित्र मानण्यापेक्षा wait till you get someone where you both are comfortable with each other. नाही झालं म्हणून काही आभाळ कोसळणार नाही आणि झालं म्हणून अगदी काही स्वर्गात पाऊल पडणार नाही. लोकांचं म्हणाल तर ते बोलत असतात आणि बोलत राहणार. आधीच इथे म्हणून झालंय हे लोक फक्त मिष्टान्नापुरते असतात, तेव्हा अशा लोकांचं बोलणं किती मनावर घ्यायचं हा आपापला प्रश्न आहे. No one can stop them, if you know you are true to yourself...just do not care at all!!

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 9:50 pm | आजानुकर्ण

सहमत. पटलं नाही तर करु नये. उगीच पावशेर दुधासाठी म्हैस पाळायची गरज नाही. मात्र एखादी आवडली आणि तिलाही तुम्ही आवडलात तर अवश्य लग्न करा.

लोक कायमच बोलत राहतात. लग्न झालं की मुलंबाळं व्हायची वाट बघतील. (ती नाही झाली की बोलतील). नवराबायकोचं पटलं नाही तरी बोलतील. मुलंबाळं मोठी झाल्यावर त्यांना कमी मार्क वगैरे पडले की बोलतील. ते चालूच लाहतं.

जातवेद's picture

17 Jan 2015 - 5:48 pm | जातवेद

काशीचे तिकीट कॅन्सल करण्यात आले आहे :)

इरसाल's picture

17 Jan 2015 - 4:19 pm | इरसाल

टाका चटई,
चटई स्वतःची स्वतःच विकत आणायचीय काय प्रत्येकाने ?

लग्नाच्या पंगतीत वापरलेली बस्तरं चालतील काय? :D

संदीप डांगे's picture

15 Jan 2015 - 3:29 pm | संदीप डांगे

माझा अनुभव (अर्थात माझ्या बहिणीच्या लग्नाचा) फारच चमत्कारिक असेल आजच्या मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या अपेक्षेच्या संदर्भात:

२००९ मध्ये माझ्यापेक्षा लहान बहिणीचे लग्न झाले. बहिण माझ्यापेक्षा ५ वर्षाने लहान २३ वर्षाची होती. आमचे बाबा वरसंशोधन करत होते. तिचे शिक्षण ठीकठाक म्हणजे १२+ATD केले आणि पदवी सुरु होती. रंगरुपाच्या आजच्या परिभाषेत अव्वल. पण लग्न जमत नव्हते. उच्चशिक्षित आणि चांगल्या नोकरीवाल्या मुलांना तिचे शिक्षण कमी वाटत होते, म्हणजे इंजिनिअर वैगेरे मुलांच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या. त्यात आम्ही हुंडाविरोधी. बरे त्याहून आमची वडील म्हणजे महा महा महा शंकेखोर. जमत आलेली १०-१२ स्थळे त्यांनी उगाच नाकारली. कदाचित तिच्यावरच्या अतिप्रेमाने त्यांना निर्णय घ्यायला भीती वाटत होती. शेवटी मी रणांगणात उतरलो. माझी बहिण जिथे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होती तिथल्या एका मुलाने तिला मागणी घातली. तिने ते मला सांगितले. तो आमच्याच जातीतला होता. वय(२८), रूप आणि शिक्षण तंतोतंत जुळत होते. दोघेही अनुरूप होते. पण त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती कारण तो दु----र कुठल्या खेड्यातून आलेला होता. मी त्याला भेटलो त्याच्याशी बोललो. तर पठ्या म्हणाला घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही. मी म्हटले का बुआ? तर म्हणे त्यांना शंका येईल कि हा प्रेमविवाह आहे आणि मग घरात तो मान-सन्मान कदाचित सुनेला मिळणार नाही कारण घरची बहुतेक मंडळी जुनाट वळणाची आहेत. किंवा त्याला अफ़ेअर चा शिक्का लागू द्यायचा नव्हता.

मी त्याचे मूल्यमापन केले. घरच्यांना सांगितले. त्याच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी झाली. सगळे व्यवस्थित होते पण फक्त एकाच समस्या होती.

मुलाला कुठलीही नौकरी नव्हती.

अकोल्याच्या संस्थेत तो मिळेल तसे काम करत होता, पार दूर खेड्यात संगणक शिक्षणाचे वर्ग घेत होता. १०-१२ माणसे असलेल्या घरात भावांसोबत राहत होता. कमाई फारच तुटपुंजी होती.

घर सुशिक्षित आहे, भाऊ वहिनी शिक्षक आहेत, परिसरात त्यांच्या कुटुंबाचे चांगले नाव आहे. पण मुलगा कमवत नाही, मुलीला खेड्यात कसे पाठवायचे हा गंभीर प्रश्न उभा राहिला. कुणीच मान्यता देत नव्हते आमच्या घरातून. कशी देणार? मुलीला खड्ड्यात कोण ढकलणार?

शेवटी मी मुलाशी बोललो, त्याला म्हटले, हे बघा तुमच्या भविष्याच्या योजना काय आहेत ते सांगाल तर बरे होईल. त्याने मला तो करत असलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल सांगितले. त्याचे आयटीआय (इलेक्ट्रिकल्स मध्ये) झाले होते व त्याच भांडवलावर त्याचे एमएसईबी मध्ये नोकरीचे प्रयत्न चालू होते. त्याचा दृढ विश्वास आणि थेट विचार करण्याची पद्धत आवडली. त्यापेक्षा त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि निवडलेल्या क्षेत्रातच सरकारी नोकरी मिळवायची, त्यातच पुढे जायचे हे अगदी ठाम मत, त्याचा त्या विषयातला सखोल अभ्यास आणि दूरदृष्टी हे सर्व जास्त आवडले. शेवटी मीच विचार केला कि हा माणूस आज काहीच नाही पण उद्या नक्कीच यशस्वी होणार. फार धाडस करून मीच हे लग्न ठरवले. घरचे सगळे साशंक होते. वडिलांनी तर ठरलेले लग्न मोडण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला अगदी एंगेजमेंट होऊनही. पण मी ओळखले कि दोघेही वर-वधू एकमेकांस पसंत आहेत आणि त्यांची संसार करण्याची इच्छा प्रामाणिक आहे. मी वडिलांना म्हटले कि तुम्ही ह्यापेक्षा चांगला पर्याय आणून दाखवा आपण लग्न आताच्या आता मोडू. शेवटी आमच्या इतर नातेवाइक जसे मामा वैगेरे ह्यांनी सखोल चौकशी करून कुठल्याही शंका-कुशंका निपटून काढल्या. लग्न लागले.

सुरुवातीचे १ वर्ष आमच्या ताईने खेड्यात निमूट काढले कारण तिचा आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या दादाच्या निर्णयावर प्रचंड विश्वास होता. याबाबतीत ती खरच महान आहे असे म्हणावे लागेल कारण खरा जुगार तिनेच खेळला होता.

लग्नाच्या पहिल्याच वर्षात साहेबाना सरकारी नोकरीची ऑर्डर आली. मग दोन-तीन ठिकाणी पोस्टिंग साठी महाराष्ट्रभ्रमण करून अकोल्यास सेटल झालेत. पुढच्याच वर्षात सरकारी निवास्थान आणि बढती दोन्ही मिळाले. आता आमचे जावईबुवांनी इंजिनिअरची पदवी मिळवली असून पुढची बढती मिळवण्याच्या तयारीत आहेत. अकोल्यात घर घेणार आहेत. गावातच माहेर असल्याने त्यांच्या संसाराकडे आई-बाबांचे लक्ष आहे. सासरी सगळ्यांशी उत्तम संबंध आहेत.

एका होतकरू मुलावर विश्वास टाकला. तो त्याने सिद्ध करून दाखवला. लोक फक्त म्हणतात "पैसा आज आहे उद्या नाही" पण तसे वागत नाहीत. आम्ही रिस्क घेतली कारण माझा माणसावर, त्याच्या असण्यावर, त्याच्या स्वप्नांवर विश्वास आहे. पैसा खरच आज नाही तर उद्या असेल. पण आयुष्य उभारणारी स्वप्नेच नसतील तर असलेल्या पैश्याला पाय फुटायला वेळ लागत नाही.

तेंव्हा मला सगळ्यांनी वेड्यात काढले होते. पण मी म्हणत होतो कि जर एखाद्याची लग्नानंतर नोकरी गेली आणि त्या धक्क्यात तो काम करेनासा झाला तर काय? अनिश्चितता पावलोपावली आहे. म्हणून तमाम होतकरू लग्नकरू लोकांना विशेषत:आई वडिलांना सल्ला कि माणसे ओळखा, धनदौलत, नोकरी, बंगले, गाड्या येतात आणि जातात. राहतो तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास, विश्वास, सोबत आणि तेच महत्वाचे आहे. आणि हे तत्वज्ञान अनुभवावर आधारित आहे.

मृत्युन्जय's picture

15 Jan 2015 - 4:05 pm | मृत्युन्जय

मी वडिलांना म्हटले कि तुम्ही ह्यापेक्षा चांगला पर्याय आणून दाखवा आपण लग्न आताच्या आता मोडू

भयाणा तयारी होती तुमची.

पैसा's picture

15 Jan 2015 - 4:36 pm | पैसा

प्रतिसाद आवडला

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा

म्हणून तमाम होतकरू लग्नकरू लोकांना विशेषत:आई वडिलांना सल्ला कि माणसे ओळखा, धनदौलत, नोकरी, बंगले, गाड्या येतात आणि जातात. राहतो तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास, विश्वास, सोबत आणि तेच महत्वाचे आहे. आणि हे तत्वज्ञान अनुभवावर आधारित आहे.

__/\__ आणि टाळ्यांचा कडकडाट!

भावना कल्लोळ's picture

15 Jan 2015 - 3:58 pm | भावना कल्लोळ

आमचं कुटुंब हि तसे मध्यमवर्गीयच. सध्या मी सुद्धा याच मानसिक विचारातून जात आहे. लग्नायोग्य छोटा दीर आणि नणंद याच्यासाठी स्थळ पाहता पाहता नाके नऊ येत आहेत. वधु मुलींसाठी आमच्या काही जास्त अपेक्षा नाही आहेत कारण आमचे दीरच शिक्षण १० वि, साधीशी नौकरी, गिरगाव मध्ये छोटे घर. त्यामुळे आजकालच्या मुलींच्या खरेच अपेक्षा खूपच जास्त झाल्या आहेत याची जाणीव मला हि येत आहे. भरपूर पगार, स्वतःचे मुंबई मध्ये घर तसेच एकत्र कुटुंब पद्धत नकोय. वर पक्षासाठी सुद्धा आमच्या अपेक्षा जास्त नसताना सुद्धा मुलगी पदवीधर असावी, चांगली नौकरी करणारी असावी या अपेक्षा आहेत. कधी कधी वाटू लागते कि सर्वसाधारण , सामान्य मध्यमवर्गीय मुला - मुलीनी लग्नाची अपेक्षा करणेच चूक आहे. मुलीनी जर मुला मध्ये त्याचे कर्तुत्व आणि स्वभाव पाहून लग्न केले तर त्या जास्त सुखी होतील. कष्ट आणि साथ देण्याची तयारी असावी. आणि मुलांनी मुलगी सालस आणि मनमिळावू असावी हा गुण हेरून जर तिच्याशी लग्न केले तो जास्त सुखी होणार नाही का? जोडीला जर शिक्षण आणि कर्तुत्व असेल मुलीत तर त्याच्या संसारला सोन्याची झळाळी लागण्यापासून त्यांना कोणी हि अडवू शकत नाही.

गोष्ट लग्नाची ह्या धाग्यात दिलेला प्रतिसाद जसाचातसा खाली देत आहे:

२०११ ची गोष्ट असेल.

माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन:

१) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं.
२) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती.
३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम).
४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर).
५) अश्या बर्‍याच विचित्र मागण्या असण्यार्‍या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या.

बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा.

त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.

आता मागच्या महीन्यातच त्याच्याबरोबर बोलणं झालं तेव्हा कळलं कि राहत्या घरच्या जवळच नविन प्लॅट घेतला आहे व २ आणि ४ व्हीलर सुद्धा. :)

सिरुसेरि's picture

15 Jan 2015 - 4:42 pm | सिरुसेरि

लेख व प्रतिसाद हे जरी "वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?" या विषयावर असले तरी एकूण सूर हा "हल्लीच्या मूलींच्या / वधू पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत" असाच वाटत आहे . अविवाहीत मुलींचे कमी संख्या प्रमाण हे एक त्यामागचे मुख्य कारण असेल तर हि एकंदर परिस्थिती मुलांनी / वर पक्षाच्या लोकांनीही वेळीच ओळखली पाहिजे . व त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा जर कालबाह्य , अवास्तव असतील तर त्यांत आधीच बदल केले पाहिजेत ( उदाहरणार्थ- पत्रिका ,ठराविक जात , पोटजात यांचा आग्रह ). तसेच आपल्या समाजात चूकीच्या लग्नाच्या बळी ठरलेल्या व फसवणूक झालेल्या घट्स्फोटीत मुलींचेह प्रमाण जास्त आहे . तसेच दुर्दैवाने अकालीच वैधव्य आलेल्या मुलींचेही बरेच प्रमाण आहे .या मुलींचाही लग्नासाठी मुलांनी व वर पक्षाच्या लोकांनीही मनापासून व गंभिरपणे सविस्तर विचार केला पाहिजे . या गोष्टी मनापासून व खरया प्रेमानेच घडाव्यात. त्यामागे कोणताही उपकाराचा किंवा समाज सुधारणेचा हेतू नसावा .

प्रसाद१९७१'s picture

15 Jan 2015 - 6:29 pm | प्रसाद१९७१

मुलीनी जर मुला मध्ये त्याचे कर्तुत्व आणि स्वभाव पाहून लग्न केले तर त्या जास्त सुखी होतील. >>>>

@ भाक - हे कसे काय ओळखता येते? दोन भेटीत स्वभाव कसा कळतो? कर्तृत्व कशावरुन ओळखायचे?

प्रसाद१९७१'s picture

15 Jan 2015 - 6:32 pm | प्रसाद१९७१

त्याप्रमाणे नोकरी असलेली मुलगी एखाद्या नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न का करत नाही.

खटपट्या - ह्याचे सरळ उत्तर आहे की, त्या मुलीला नोकरी करणारा मुलगा मिळतो आहे. असे असताना कोण स्वताहुन नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न करेल? तिला लग्न करायचे आहे, समाजसेवा नाही.
नसेलच मिळत नोकरी असलेला मुलगा तर करेलच नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न.

मित्रहो's picture

15 Jan 2015 - 7:15 pm | मित्रहो

"तुमचा मुलगा लग्नाचा आहे"
"हो" मुलगी किती शिकली, नाव गाव झाले.
"मुलगी सुंदर आहे का? गोरी आहे का?"
"साधारण"
"लांब केस आहेत का?"
"साधारण"
"कंबरेखाली केस नसतील तर आमच्या घरी पायसुद्धा ठेवू नका." च्यायला आता कंबरेखाली केस असतील तर तुमच्या घरी पाय ठेवनार नाही. ही माणसे भागवताचे सप्ताह करायचे.

माझ्या एका मित्राच्या मित्राने लग्न जमत नाही म्हणून सेकंड हँड कार घेतली.गाडी व्यतिरीक्त त्या मुलात बरेच चांगले गुण होते. लग्न झाल्यावर महीन्याभरात खर्च परवडत नाही म्हणून त्याने गाडी विकून टाकली.

माझा एक मित्र मारवाडी होता. त्याच्यासोबत एका मुलीच्या आजोबांना भेटायला गेलो. २००२ मधली गोष्ट
"क्या काम करते हो?"
"सॉफ्टवेअर"
"तुम्हारी कंपनी क्या बनाती है?"
"सॉफ्टवेअर सर्विस"
"वो सब तो ठीक है पर तुम्हारी कंपनी बनती क्या है?" त्या बिचाऱ्याला शेवटपर्यंत कळले नाही.
"छोड जानेदो कितना मिलता है?"
"तीस हजार." माझ्या मनात मित्राचा तिरस्कार, खोटारडा फक्त बावीस मिळत असतानाही तीस सांगतो.
"बस. मै एक लाख देतो हूँ आजाओ मेरे पास." आता मी अवाक

"मुंबइत तुमच्याकडे राहायला घर आहे?"
"भाड्याचे"
"किती मोठे?"
"वन रुम किचन"
"घरात हवा उजेड येतो?"
"हो"
"खिडक्या वगेरे आहेत ना?"
"अर्थातच."
"एकटेच राहता?"
"नाही दोन पार्टनर आहेत."
"लग्न झाल्यानंतरही ते तिथेच राहणार आहेत का?" आता मी काही उत्तर द्यायच्या आतच आमच्या वडीलांचे डोके भणकले.

लग्न ही पहीली अशी घटना असते की तुम्ही तुमच्या सर्कल बाहेरच्या माणसांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करता. खोटे बोलनारेही असतात. लव्ह मॅरेज मधे समोरच्या माणसावर विश्वास असतो इथे तो नसतो त्यामुळे अवास्तव वाटाव्या अशा मागण्या दोन्हीकडून होत जातात, पासबुक पडताळली जातात. इतरही बरीच कारणे आहेत. माझा एक चायनीज मित्र सांगत होता चायना मधे एक मुलगा किंवा मुलीमागे सहा लोकांच्या आशा अपेक्षा असतात. विचार करा तिथली परिस्थिती काय असेल ते? माझा भाउ व्यवसायात होता त्यामळे त्याला मुलीच येत नव्हत्या. शेवटी कोणीतरी भेटलेच तेंव्हा जगात सर्वसाधारण विचार करनारी माणसेही आहेतच तेंव्हा काळजी नसावी.

मृत्युन्जय's picture

16 Jan 2015 - 10:19 am | मृत्युन्जय

"कंबरेखाली केस नसतील तर आमच्या घरी पायसुद्धा ठेवू नका."

आपण काय बोलतो आहोत ते या माणसाला कळलेच नसावे. :)

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा

=)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा

@आपण काय बोलतो आहोत ते या माणसाला कळलेच नसावे. >> =)))))) +++१११

रेवती's picture

15 Jan 2015 - 8:02 pm | रेवती

मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्यात याच्याशी सहमत होतानाच अशाच विचित्र अपेक्षा पूर्वी वरपक्षाकडून असत हे विसरता कामा नये. लग्नाचा खर्च, मानपान, ज्या वाहनाने वरपक्ष येणार त्याचा खर्च, सणवार, बाळंतपण एक ना दोन, पैसे पुरवताना (मानसिक दृष्ट्याही) मेटाकुटीस आलेले मायबाप मुलींनी जवळून पाहिलेत. याशिवाय मुलीचा सासरी राबून बुकणा पडतो. तिच्या तब्येतीकडे कोणाचेच लक्ष नसते. ही परिस्थिती आता बदलू पाहतिये. आयुष्यातील बेभरवश्याच्या गोष्टी वाढल्यात. त्यातून नवर्‍याचा अकाली मृत्यू तर मुलींना पुरते पिंजून काढणारा ठरल्याची उदाहरणे आहेत. पैशासाठी मुलींचे जीव घेतले जातात. याअर्थी पैशाला अतोनात महत्व आधीच्या निदान २ पिढ्यांनी तरी दिलेले मुलांनी व मुलींनी पाहिले आहे. पूर्वी मुलगी कितीही गरीब गाय असली तरी हुंड्यासाठी तिच्या बापास रडवल्याशिवाय मुलगे (किम्वा वरपक्ष) जेवण पचवत नसत. म्हणजे काय तर पैसा भय़्ंकर महत्वाचा असतो हे समाजानेच दाखवून दिले आहे. मनातून पैशाची किंमत मर्यादेपलिकडे नसते हेही जरा विचार केला तर कळू शकत असते. पैशापाठोपाठ येणारा मान हा तर आपण अजूनही बघतोय.
नगरीनिरंजन साहेबांनी सिंगल व डबल इन्कमचा मुद्दा मांडलाय तो बरोबर असला तरी त्यात घरी थांबणारे पती असण्यापेक्षा पत्नीच असण्याची शक्यता जास्त असते. जर एका आमदनीवर घर चालू शकत असेल तर आधी घरकामास पुरेसा मान मिळाला पाहिजे म्हणजे 'घरी बसणे' यातील कमीपणा निघून जाईल व जास्त मुलगे हे करण्यास तयार होतील किंवा मुलींना ते करताना कमीपणा वाटणार नाही. हे चित्र दर पिढी बदलत जाणार आहे.

मधुरा देशपांडे's picture

15 Jan 2015 - 8:54 pm | मधुरा देशपांडे

सहमत.
मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्य आहे. पण अनेक वर्षे मुळात मुलीला अपेक्षा असू शकतात हेच कुणी लक्षात घेत नव्हते. आई वडील, विशेषतः वडील बघतील त्या मुलाशी संसार करायचा असे बिंबवले जायचे. आणि आता जेव्हा त्यांच्या अपेक्षा विचारात घेतल्या जाऊ लागल्या, तेव्हा त्यातल्या अनेक अवास्तव समजल्या जाऊ लागल्या. दर्दैवाने फक्त नोकरी करणे हे स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीक समजले गेले. आणि तरीही पारंपारिक कामे त्या प्रमाणात पुरुषांकडून केली गेली नाहीत. मग निदान पैसा तरी असावा, भविष्य सुरक्षित असावे असा विचार अरेंज मॅरेज मध्ये करणे हा देखील एक विचार होऊच शकतो. जसे मुलाने सांगितले की 'माझ्याकडे आत्ता घर नाही, पण तुझी मदत असेल तर होईल' यावर पटकन मुली तयार होत नाहीत, तसे आजही जर मुलीने लग्नाआधी "मला स्वयंपाक येत नाही. शिकेन हळूहळू पण तुझी मदत तेवढीच हवी" असे सांगितले तर किती मुले तयार होतील. अपवाद आहेतच पण दोन्ही बाजूनी आहेत. हे लहानपणापासून मुले मुली दोघानाही शिकवले गेले पाहिजे की ज्याप्रमाणे मुलीना शिक्षण आणि नोकरीचे स्वातंत्र्य आहे तसेच मुलांनीही घरातली कामे करणे यात काही कमीपणा नाही.

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 9:14 pm | सुबोध खरे

मधुराताई
तुमचा मुद्दा तत्वासाठी बरोबर असला तरी घर आणि स्वयंपाक यात गल्लत होते आहे. स्वयंपाक येत नसेल तरीही दीड दोन हजारात स्वयम्पाकीण मिळेल हो पण ५० लाखाचे घर कसे मिळेल.
नवरा मुलगा जर बायको घरासाठी मदत करायला तयार असेल तर "स्वयंपाकीण ठेवू " म्हणून सहज तयार होईल

मधुरा देशपांडे's picture

15 Jan 2015 - 9:23 pm | मधुरा देशपांडे

माझा मुद्दा फक्त दुसरी बाजु काय असु शकते यावर होता. आणि स्वयंपाक हे केवळ एक उदाहरण, ज्यात सर्वसाधारणपणे बायकोने करावा हे ग्रुहीत धरले जाते. असेच इतरही मुद्दे यात येऊ शकतात जे बायकोने किंवा आईनेच करावे असे गृहीत धरले जाते. आणि मुलगा तयार होईलही कदाचित, पण किती मुलांच्या घरचे यावर तयार होतील? आधी लिहिले तसे अपवाद आहेतच आणि हळुहळु बदल होत आहेत.
आणि मुलींच्या फ्लॅटच्या किंवा पगाराच्या अपे़क्षेवर मी आधीच्या प्रतिसादात पण लिहिलंय की हे मलाही पटत नाही. फक्त इथे प्रतिसादात मुलींचे आईवडील आणि अपेक्षा यावर जी चर्चा झाली, विशेष करुन अरेंज मॅरेज मध्ये, त्यातली ही दुसरी बाजु पण असु शकते एवढेच म्हणायचेय.

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 9:31 pm | आजानुकर्ण

माझ्याकडे आत्ता घर नाही, पण तुझी मदत असेल तर होईल

आमच्या एका वर्गमैत्रिणीच्या लग्नासंबंधीच्या चर्चेमध्ये एका मुलाने असा प्रामाणिक प्रस्ताव मांडला होता. मुलगा चांगला शिकलेला, इंजिनियर म्हणून पुण्यातील नामवंत कंपनीत काम करणारा. मात्र पुण्यात स्वतःचे घर नाही. तिने नकार दिला. एरवी समंजस वगैरे वाटणाऱ्या तिने असा का निर्णय घेतला असावा हे आम्हाला कळले नाही. नंतरच्या काही गप्पांमध्ये 'त्या मुलाचा माझ्या नोकरीच्या पैशावर डोळा होता' असे तिचे मत असल्याचे आम्हाला कळले. (नंतर चांगल्या पैसेवाल्या, बंगला वगैरे असलेल्या मुलाशी तिने विवाह केला.) असो टू इच हिज ओन.

मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्यात याच्याशी सहमत होतानाच अशाच विचित्र अपेक्षा पूर्वी वरपक्षाकडून असत हे विसरता कामा नये. लग्नाचा खर्च, मानपान, ज्या वाहनाने वरपक्ष येणार त्याचा खर्च, सणवार, बाळंतपण एक ना दोन, पैसे पुरवताना (मानसिक दृष्ट्याही) मेटाकुटीस आलेले मायबाप मुलींनी जवळून पाहिलेत. याशिवाय मुलीचा सासरी राबून बुकणा पडतो. तिच्या तब्येतीकडे कोणाचेच लक्ष नसते. ही परिस्थिती आता बदलू पाहतिये. आयुष्यातील बेभरवश्याच्या गोष्टी वाढल्यात. त्यातून नवर्‍याचा अकाली मृत्यू तर मुलींना पुरते पिंजून काढणारा ठरल्याची उदाहरणे आहेत. पैशासाठी मुलींचे जीव घेतले जातात. याअर्थी पैशाला अतोनात महत्व आधीच्या निदान २ पिढ्यांनी तरी दिलेले मुलांनी व मुलींनी पाहिले आहे. पूर्वी मुलगी कितीही गरीब गाय असली तरी हुंड्यासाठी तिच्या बापास रडवल्याशिवाय मुलगे (किम्वा वरपक्ष) जेवण पचवत नसत. म्हणजे काय तर पैसा भय़्ंकर महत्वाचा असतो हे समाजानेच दाखवून दिले आहे.

थोडक्यात काय आधी त्यांनी सोसलं, आता त्यांनी जरा मिजास दाखवली तर कुठे बिघडलं; असंच ना!! :)

असा अर्थाचा अनर्थ करायला बरा जमतो? आँ? ;)
मिजास मुलाने कींवा मुलीने कोणीही केली तरी घातक आहे. पैशाला अपरंपार महत्व देऊन जे काय भजं होऊन बसलय त्याचा गुंता सुटायला वेळ लालेल. शेवटी ज्या मुलीने हुंडा जमवताना मायबापाला जेरीला आलेलं पाह्यलय तिच्या डोळ्यासमोर मस्त चित्र उभं केलं तर एकदम विश्वास बसत नाही. ज्या आईबापांनी पैशापायी जळलेल्या पोरींच्या आठवणीत रक्ताचे अश्रू ढाळलेत त्यांचा या जन्मात माणूसकीवरही विश्वास बसणे कठीण आहे. पैशाचं महत्व अशा घरांमध्ये वेगळं असतं. भावनाआँको समझो सुडकू!

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 10:39 pm | बॅटमॅन

थोडक्यात काय आधी त्यांनी सोसलं, आता त्यांनी जरा मिजास दाखवली तर कुठे बिघडलं; असंच ना!!

अगदी अगदी!!!! हेच आणि एवढेच.

अर्थात ज्यांचे अच्छे दिन आलेत त्यांनी खुशाल तोंड वर करून मिरवावे. किती काही लिहिलं तरी त्यात बदल होणारे थोडाच! फक्त अवास्तव समानतेच्या बाता तेवढ्या मारणे थांबवावे.

मुविंचा धागा आहे त्यामुळे हक्काने अवांतर प्रतिसाद देऊ शकतो. संमं मुविंच्या धाग्यावरचे प्रतिसाद नक्कीच ऊडवणार नाहीत (अशी अपेक्षा करतो).

मुलींच्या … अपेक्षा
(वय २८) पाचपट पगार आणि १ बहक घर
लग्न जमले नाही…
(वय ३०) चौपट पगार आणि १ बहक घर
लग्न जमलेले नाही…
(वय ३५) दुप्पट पगार आणि २ बहक घर (???)
अजुनही लग्न जमलेले नाही.

अग, मग २८ ते ३५ मध्ये तु का नाही गं प्रयत्न केलास घर घ्यायचा? हिंमत असेल तर सांग ना, माझे १/२ बहक घर आहे. माझ्या पगारातुन मी कर्जाची परतफेड करत आहे. लग्न झाल्यावर आपण माझ्या घरात राहायला जाऊ. तुझ्या (दुप्पट) पगारात आपण आपला घरखर्च भागवू.

आणखी काही अपेक्षा, मुलींच्या …
ठाण्यात रहाणारी मुलगी मुलुंडला येणार नाही, कल्याणला रहाणारी मुलगी डोंबिवलीला येणार नाही, विलेपार्ले/जोगेश्वरीची मुलगी ठाणे कल्याणला येणार नाही…
अरे, इथे पण माणसेच रहातात ना?

hitesh's picture

16 Jan 2015 - 1:57 am | hitesh

चर्चगेटची मुलगी घारापुरीला जाणार का ?

कानडाऊ योगेशु's picture

16 Jan 2015 - 12:06 pm | कानडाऊ योगेशु

ठाण्यात रहाणारी मुलगी मुलुंडला येणार नाही, कल्याणला रहाणारी मुलगी डोंबिवलीला येणार नाही, विलेपार्ले/जोगेश्वरीची मुलगी ठाणे कल्याणला येणार नाही…

जोपर्यंत अशी विचारसरणी असलेल्या मंडळींच्या अपेक्षा पूर्ण होताहेत तोपर्यंत तरी ती मंडळी आपली विचारसरणी बदलणे अवघड आहे. असाच प्रकार रेसेशन च्या काळात (जॉबच्या बाबतीत) बेंगलोर मध्येही वाचायला मिळाला.
कोरमंगला मध्ये राहणारा एक आय.टी हमाल ट्राफिक व दूरचे अंतर ह्या क्रायटेरियावर व्हाईटफिल्ड इथला जॉब घेण्यास तयार नव्हता पण रेसेशन्च्या दणक्यात असा काही बदल त्याच्या एकुण अ‍ॅटीट्युड मध्ये झाला कि तो चक्क नायजेरिया वगैरे देशात ही जायला तयार होता. थोडक्यात काय तर वक्त वक्त कि बात है !

टवाळ कार्टा's picture

17 Jan 2015 - 10:10 am | टवाळ कार्टा

ओ भौ....रेसेशन गेले की जॉब बदलता येतो
पोग्गी बदलता येते का?
तुलना चुकीची होती

अमोघ गाडे's picture

15 Jan 2015 - 9:57 pm | अमोघ गाडे

मुवि.. घरात सासु- सासरे नसावेत आणी कोणत्याहि प्रकारे त्यान्चि जवाबदरि आपल्यावर नसावि हि आज कालच्या मुलिन्चि मोठि अपेक्षा असते...
स्वानुभवावरुन

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 10:01 pm | आजानुकर्ण

त्यामुळे भविष्यकाळात आपल्या मुलाचं लग्न व्हावं व टिकावं अशी अपेक्षा करणाऱ्या मिपाकरांनी आपापल्या वृद्धावस्थेची सोय करुन ठेवावी. मुलाकडे राहता आलं तर सोन्याहून पिवळं. नाही जमलं तरी अपेक्षाभंगाचे दुःख नाही.

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 10:40 pm | सुबोध खरे

मुलाचं काय आणि मुलीचं.
लग्न केल्यावर त्यांना वेगळं घर करायला सांगणे हे उत्तम.
दोन बायका एका छताखाली सहज नंदू शकत नाहीत हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे
मग ती आई आणि मुलगी असेल तरीही.
सासू आणि सुनेचे नाते हे पटणारे नसतेच ते पटवून घेण्याचे नाते आहे.
मी एकदा आमच्या सासूबाई आजकालच्या सुनांवर घसरल्या होत्या तेंव्हा त्यांना शांतपणे सांगितले कि अहो आजकालच्या सुना या तुमच्या पिढीच्या बायकांच्याच मुली आहेत ना ? मग त्यांना शिकवले कुणी तुम्हीच ना ? लग्न करतानाच सासू नसेल तर बरं किमान पक्षी मुलाचे वेगळे घर आहे ना हे पाहुन तुम्ही मुलीचं लग्न करता मग तुमच्या मुली सासूशी पटवून कशा घेणार ? तेन्व्हा शहाण्या माणसाने मुलाला किंवा मुलीला वेगळे घर करून देणे हे उत्तम. भले सुरुवातीला भाड्याचे घर असेल कि मुलगी किंवा सून काटकसरीने कसे राहायचे ते शिकेल. आणि आमची आई म्हणते तसे "पादा पण नांदा"

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 10:44 pm | आजानुकर्ण

खरंय. आम्ही भाऊभाऊच घरात असल्याने आईव्यतिरिक्त दुसरी अॅक्टिव मुलगी/स्त्री घरात असणे म्हणजे काय याचा अनुभव नव्हता. आईवडिलांनी पहिली सून घरात आणल्यानंतर आम्हाला या ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार झाला.

काळा पहाड's picture

16 Jan 2015 - 12:15 am | काळा पहाड

ही सगळी भानगड करण्यापेक्षा माझा मित्र म्हणतो तसं काँट्रॅक्ट बेसीस वर लग्न करावं. दर ११ महिन्यांनी काँट्रॅक्ट रिन्यू करावं, नाही तर मग नवीन काँट्रॅक्ट. हा.का.ना.का.

पैसा's picture

16 Jan 2015 - 8:59 am | पैसा

एक बारीक प्रॉब्ळम आहे. मधेच मुलं बिलं झाली तर काय?

नाखु's picture

16 Jan 2015 - 9:27 am | नाखु

कदाचीत त्यांचा संभाळ पण ११-११ महिन्यांच्या कराराने करण्याची तरतूद असावी मूळ करारनाम्यात.
सहवास नव्हे "सहजीवन" अश्या "बुरसटलेल्या" विचारांचा
प्रतिगामी नाखु

अजया's picture

16 Jan 2015 - 10:34 am | अजया

सहवास नव्हे "सहजीवन" अश्या "बुरसटलेल्या" विचारांचा
प्रतिगामी नाखु

सहमत.बुरसटलेल्या विचारांची प्रतिगामी अजया!

अरे बापरे इतके कॉम्प्लिकेटेड असते का हे? असे काही वाचल्यावर माझ्या हिलरीने मला किती मोलाची साथ दिली हे समजून येते.

आमचे लग्न व्हायच्या साडेतीन वर्षे आधीपासून मी आणि हिलरी ऑनलाईन वेबकॅमवर चॅट करत होतो. अनेक वेळी फोनवरही बोललो होतो.त्यावेळी मी होतो अमेरिकेत (इंजिनिअरींगमधला एक बत्थड पी.एच.डी विद्यार्थी म्हणून) आणि हिलरी होती मुंबईत.त्यामुळे आम्ही एकदाही भेटलेलो नव्हतो. इंजिनिअरींगमधील पी.एच.डी माझ्याच्याने झेपणाऱ्यातली नाही आणि मला भारतात परत यावे लागणार हे कळले तेव्हा तो माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक कालखंड होता.त्यातून बाहेर येण्यासाठी काय करायचे याचा मी विचार करून ठेवला होता.पण त्याची अंमलबजावणी एका वर्षानंतरच सुरू करता येणार होती.मधल्या काळात मी नक्की कुठे राहणार, कुठली नोकरी करणार याचा अजिबात पत्ता नव्हता.आमच्या सुदैवाने सर्व काही सुरळीत झाले.आम्ही पहिल्यांदा भेटलो त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता.त्याच इंटरव्ह्यूमध्ये मला पुण्यातील नोकरीची ऑफर दिली गेली.अर्थातच पगार जेमतेमच होता.त्यानंतर आम्ही भेटलो.यथावकाश लग्नही झाले.मुंबईबाहेर कधी यायची तयारी नसलेली हिलरी माझ्याबरोबर पुण्यात राहायला तयार झाली.त्यानंतर २००९ ते २०११ ही दोन वर्षे आम्ही दोघेही विद्यार्थी होतो.मी अहमदाबादला तर हिलरी मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये. लग्न झाल्यानंतर सव्वा वर्ष पूर्ण व्हायच्या आत आणखी दोन वर्षे दुसरीकडे राहणे पण तिने मान्य केले. मला मुंबईला फार येता यायचे नाही.पण शक्य असेल तेव्हा ती अहमदाबादला येत असे. अशावेळी दोन दिवस आम्ही हॉटेलात राहत असू. यासगळ्याविषयीही तिने अगदी एका शब्दाने तक्रार केली नाही.आमच्या दोघांच्याही नोकरीचे नक्की झाले ते पण एकाच दिवशी-- शेवटी १ फेब्रुवारी २०११ रोजी.त्यानंतर एप्रिल २०११ मध्ये आम्ही परत एकत्र राहायला सुरवात केली.त्यानंतर जवळपास दोन वर्षे माझे शिक्षणकर्ज फेडण्यासाठी अधिक उत्पन्न हवे म्हणून आठवडाभर ऑफिसबरोबरच बहुतांश रविवारी मी १० ते ३ असे ५ तास एका क्लासमध्ये शिकवायला जात असे.तरीही त्याविषयी हिलरीने एका शब्दानेही तक्रार केली नाही.पाच-सहा महिन्यापूर्वीच आम्ही आमचे पहिले वन बी.एच.के घर घेतले.आणि अर्थातच ही सुरवात आहे.अजून बरेच पल्ले गाठायचे आहेत.हिलरीने मला या सगळ्यात अगदी १००% साथ दिली.

या धाग्यातील सगळे प्रकार वाचून वाटते की पत्रिका बघून, कांदेपोहे खायचा कार्यक्रम असता तर माझे लग्न अजूनपर्यंत होणे जरा कठिणच होते :)

सामान्य वाचक's picture

16 Jan 2015 - 11:00 am | सामान्य वाचक

हा नियम फक्त मुलीच्या आई ला नसावा . खरे म्हणजे दोन्हीही (२+२) पलक नि मुलांच्या संसारात फार लक्ष् घालू नये. त्यांनी मागितला तर सल्ला द्यावा . मुलीची आई असो व मुलाची, संसारात त्रास दोगींमुळे हि होऊ शकतो. खरे तर % पाहिलेत तर मला वाटते, १०० संसार जिथे शांतता नाही, त्यातले कमीतकमी ८० तर मुलाच्या आई च्या वागण्या मुळे असतील. किती मुलींच्या आया जावयांना टोमणे मारतात, धुसफूस करतात , आमच्या घराची पद्दत इ इ बोलून वात आणतात, जावयाने ऑफिसातून आल्यावर घराची कामे करावीत असे म्हणतात, मी सांगेन तेच आणि तसेच झाले पाहिजे असे म्हणतात?
लक्ष्यात घ्या , हे सग्गळे आणि वरती बरेच काही, मुलांच्या आया करतात. आधी हि मानसिकता बदला , कि मुलगी आमच्या घरी आली आहे, म्हणून तिने आमच्या पध्दतीप्रमाणे वागले पहिजे. मनुष्य स्वभाव आहे कि त्याला प्रेम, appreciation हवे असते ते मुलाच्या आई कडून मिळाले, तर सुना सासरी का रमणार नाहीत?

सुबोध खरे's picture

16 Jan 2015 - 11:19 am | सुबोध खरे

आमची आई बहुधा काळाच्या दोन पिढ्या पुढे असावी.
लग्न झाल्यावर आमची बायको आईला प्रत्येक बाबतीत विचारत असे पण आमची आई तुम्हाला पटेल तसे करा असे सांगत असे. यात मंगळसूत्र घालायचे का कुंकू लावायचे का पासून जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात जीन्स घातलेली चालेल का पर्यंत सर्व आले. ही २२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे.( आमची आई अजूनही साडी व्यतिरिक्त दुसरे वस्त्र नेसत नाही.)आमच्या बायकोला हे जड गेले कारण तिला माहेरी सर्व निर्णय स्वतः घ्यायची अशी सवयच नव्हती शिवाय सासू म्हणेल ते ऐकायचे असे शिकवले गेले होते.
आम्ही वेगळे राहायचे ठरवतो आहे असे माझ्या भावाने २० वर्षापूर्वी सांगितले( आणि मी १० वर्षापूर्वी) तेंव्हाही आमच्या घरात कोणतीही रडारडी झाली नाही. सर्व गोष्टी सामंजस्याने झाल्या. मुलांना कसे वाढवायचे यात मतभेद असले तरीही तुमची मुलं आहेत. तुम्हाला जसे पटेल तसे करा. आम्ही सूचना देतो पाळायच्या असतील तर पाळा. तिने दोन्ही सुनांच्या बाबतीत कोणतीही ढवळा ढवळ केली नाही. यामुळे आमच्या कुटुंबात शांतता आणि जिव्हाळा कायम आहे.

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2015 - 2:02 pm | पिलीयन रायडर

धन्यवाद!

थोडक्यात सासु सुनेला जशी वागवते तशी नक्कीच सासु जावयाला वागवत नाही.. त्यामुळे हा इश्यु असेलही पण जितका दाखवला जातोय तितक्या % मध्ये नाहीये.. सासु-सुनेच्या तुलनेत तर अजिबातच नाही..

कपिलमुनी's picture

16 Jan 2015 - 12:59 pm | कपिलमुनी

मिपा लव्ह स्टोरीज अशी एक जिलेबी पाडावी म्हणतो ..
सारे यशस्वी- अयशस्वी अनुभव वाचता येतील आणि होतकरूंना मार्गदर्शन देखील मिळेल .

सुजल's picture

21 Jan 2015 - 12:13 am | सुजल

बरोबर :)

विटेकर's picture

16 Jan 2015 - 2:04 pm | विटेकर

अपेक्षा वधू - वरांच्या नव्हे तर समाजातल्या प्र्तयेक घटकाच्याच वाढल्या आहेत हे ही यानिमित्तने नमूद करतो.
आणि जितक्या अपेक्षा जास्त तितका अपेक्षाभंग जास्त आणि दु:ख जास्त आणि म्हणून अनिश्चितता आणि भिती जास्त !!
ती भिती कमी व्हावी म्हणून लोक वाट्टेल त्या थराला जातात ... लग्नाच्या बाजारात उभे राहून आपली बोली लावणारे आपल्या भोवती पैशाने विकत घेतलेले कचकड्याचे वलय उभे करून त्या भितीवर तोडगा शोधत राहतात.
आणि लग्नानंतरीही त्याच कचकड्याला ठिगळांची जोड लावून अधिक मजबूत करत राहतात.
बेकेलाईटी ! बेकेलाईटी !!!
प्राथमिक शिक्षक म्ह्णून नोकरी करणार्‍या आमच्या पिताजींनी वयाच्या ५५ वर्षी घर बांधले!! नो ई एम आय !
काय तृप्त आहे त्यांचे वृद्धत्व ! गायीच्या दुधावरच्या सायीसारखे .. जाडसर आणि स्निग्ध !!
इतके धावापळ केल्यावर आता मी एकच ध्येय ठेवले आहे... वयाच्या ६५ व्या वर्षी मागे वळून पाहताना एक ही पश्चातापाचा, कृतघनतेचा क्षण असू नये ! अफाट पैसा आणि कचकड्याची सुरक्षितता शोधताना आयुष्य जगायचे राहून जात आहे !
अपेक्षांचे ओझे झुकारून आला क्षण जगण्याचा विवेक जागृत व्हावा हीच एक अपेक्षा !

आजानुकर्ण's picture

16 Jan 2015 - 7:24 pm | आजानुकर्ण

तुमच्या वडिलांचा काळ वेगळा होता. आता ५५व्या वर्षी घर बांधायचे म्हटले तर तोपर्यंत लग्नही होणार नाही अशी परिस्थिती आहे.

सुजल's picture

21 Jan 2015 - 12:14 am | सुजल

:) :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेटेस्ट उदाहरणः
पात्रे (लग्नेच्छुक मित्र (बी.ई. मेकॅनिकल आणि एम.बी.ए. ऑपरेशन्स) व तो पहायला गेलेली मुलगी (एम.सी.ए. आणि सद्ध्या काहीतरी टेस्टींगचा कोर्स करतीये), हल्लीच्या पद्धतीप्रमाणे दोघ परस्पर बाहेर भेटली.

तो: मी अमुक अमुक कंपनीमधे डिझाइन इंजिनिअर म्हणुन आहे. शिवाय बाहेर डिझाइन सॉफ्टवेअर्स पण शिकवतो एक दिवसाआड जाउन.

ती: माझं नुकतचं एम.सी.ए. पुर्ण झालयं. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग मधे काही कोर्स करतीये. अजुन नोकरीचा विचार केलेला नाही.

तो: तुझ्या भावी जोडीदाराकडुन काय अपेक्षा आहेत?

ती: शक्यतो आय.टी. कंपनीत हवा (अगं बै मग इथे भेटायला तरी कशाला आलीस!! इति: मित्र). पुण्यात स्वतःचं स्वतंत्र घर हवं. आई वडीलांची जबाबदारी असली तरी हरकत नाही (एक मुद्दा खरचं चांगला मांडला ह्या मुलीनी). एखादी सेदान हवी दारासमोर.

तो: मी ऑटोमोबाईल कंपनीमधे नोकरीला आहे हे मी आधीचं सांगीतलयं. भविष्यामधेही आय.टी. मधे जाणार नाहीये (लढं पठ्ठ्या लढं.). पुण्यात आत्ता आई-वडीलांच्या २ बी.एच.के. मधे राहतोय. आणि लवकरचं स्वतःचा एक बी.एच.के. बुक करणार आहे. गाडी सद्ध्या शक्य नाही. जेव्हा मी आणि माझी होणारी बायको नोकरी करु आणि घरं घेतल्यावर घराचे इएमाय जाउन गाडी परवडेल असं वाटेल तेव्हा एखादी गाडी घेणार.

ती: (वरच्या एकाही मुद्द्याला आत्ता प्रत्युत्तर नं देता) तुझ्या माझ्याकडुन काय अपेक्षा आहेत.

तो: मला तु आवडली आहेस (मुर्ख साला!!! खरेदीचा पहिला नियमः आवडलेल्या वस्तुचं विक्रेत्यासमोर कधीचं कौतुक करायचं नाही. वि स र ला. ) माझ्या अपेक्षा एवढ्याचं की आई-वडीलांबरोबर जुळवुन घेणारी हवी. नोकरी केल्यास उत्तम. शिकायचं असेल तर आमची ना नाही. पण शिकुन नुसत घरी बसणारी नको. त्या शिक्षणाचा उपयोग करुन घेणारी हवी. पगाराचा भाग आपल्या घराचा खर्च भागवुन तुझ्या आईवडीलांना आर्थिक मदत करु शकतेस. तुझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायलाही जाउ शकतेस.

ती: (५ मिनिटापुर्वीच्या मुद्द्यावर येत) नाही. मला २ बी.एच.केचं पाहिजे. शिवाय मी नोकरी करीन की नाही अजुन ठरवलेलं नाही. गाडी पण हवीचं. मी टु व्हीलर वर फिरणार नै (इसको क्या पता बाईक पे घुमना कितना रोमँटीक होता है). शिवाय तु मेकॅनिकल वाला मी आयटी वाली आपलं ट्युनिंग कसं जुळणारे? (मग मुर्ख मुली, आधी भेटायलाचं का आलीस? मी काय घरी गाड्या आणणारे का इंजिनं उघडायला किंवा गाडी गाडी खेळायला? का तु घरी ० १ ० १ ० १ खेळतं बसणारेस?) परत तु भविष्यात पण आयटीतं जायचं नाही असं म्हणतोयस.

तो: आय.टी. मधे जाणार नाही. पुढे जाउन मला स्वतःची इंजिनिअरिंग कन्स्लटंसी सुरु करायचीये. आणि मला किमान ३ वर्ष अजुन गाडी घ्यायला जमणार नाहीये. तु विचार करुन सांग.

ती: आपलं जमणार नाही. आपण इथेचं थांबुयात. गुडबाय.

तो: ठिके. धन्यवाद. गुडबाय. (आजच्या कॉफीचे पैसे टी.टी.एम.एम. =)) )

___________

हॉरीबल परिस्थिती आहे बाहेर राव. ह्या मागण्या अवास्तव नाहीत तर काय? बरं नंतर घेउ म्हणतोय ना. दोघांनी नोकरी केल्याशिवाय एवढं सगळं कसं मॅनेज होणार?

थोडतरी कुठे समजुन घेतलं पाहिजे ना.

असो गुरुवर्य प्रगो म्हाराज म्हणतात त्याप्रमाणे आता एखादी ए किंवा बी. टायपाची पोरगी प्रेफेरेबली जोशी प्रेमात पडतीये का पहायला पाहिजे <3

=))

(चिंताग्रस्त) कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा's picture

17 Jan 2015 - 9:01 am | पैसा

शिवाय तु मेकॅनिकल वाला मी आयटी वाली आपलं ट्युनिंग कसं जुळणारे?

ठार मेले! लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात नेमकं काय करतात अशी तिची कल्पना आहे?

तुम्हा सगळ्या लग्नाळू पोरांना एक आत्याबैंचा प्रेमाचा सल्ला. घर गाडी घ्यायच्या भानगडीत न पडता उत्तर प्रदेश, बिहार राजस्तान मधली मुलगी शोधा. साधारण ३ वर्षांपूर्वी माझ्या बँकेतल्या दोन राजस्थानी पोरांची लग्नं झाली. दोघांच्या सासर्‍यांनी फ्लॅट आणि गाड्या घेऊन दिल्या. तिकडे नवर्‍यामुलाच्या नोकरीनुसार काय द्यावं लागतं याची लिस्ट तयार असते म्हणे. डॉक्टर असेल तर हिर्‍याचे दागिने वगैरे बरंच काय काय असतं. बँक ऑफिसरला एक फ्लॅट आणि वॅगन आर किंवा इंडिका व्हिस्टा मिळते म्हणे! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 9:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात नेमकं काय करतात अशी तिची कल्पना आहे?

कै आयड्या नै बा तिच्या गुढग्यात काय कल्पना होत्या त्या!!! बहुतेक तिला ऑफिसचं काम घरी घेऊन येणार्‍या नवर्‍यांविषयी माहिती असावी. =))....
आता हा भौ काय ट्रकचं इंजिन घरी डिझाईन करणारे का? कंपनीत काम नै करत घरी काय करणार =))
____

तुम्हा सगळ्या लग्नाळू पोरांना एक आत्याबैंचा प्रेमाचा सल्ला.

सकाळमधे आपला जॅक है...पैसात्त्याचा सल्ला कॉलम सुरु कर्ताय का? आम्ही मुक्तपीठीय प्रतिक्रिया देणार नै असं वचन देतो हवं तर.

घर गाडी घ्यायच्या भानगडीत न पडता उत्तर प्रदेश, बिहार राजस्तान मधली मुलगी शोधा.

उत्तर परदेश, बिहारमधली मुलगी हमकु पसंद नाही पडत है!! आपली मराठी मुलगीचं लै भारी असते...

राजस्थानी मुलगी लग्नापर्यंत कशी दिसते हे घुंगटमधुन दिसत नै...सबब कटाप...!! =))

सुबोध खरे's picture

17 Jan 2015 - 9:31 am | सुबोध खरे

ओ कॅप्टन साहेब
गाडी घेणे आजकाल कुठल्याही लुंग्या सुन्ग्याला परवडतं. मी माझी ११ वर्षं जुनी मारुती रुपये २८, ०००/- फक्त ला २००७ साली विकली. पोरीला सेदान पाहिजे तर एक १० वर्षं जुनी सेडान ३०,०००/- ला विकत घ्या आणि पोरीला टेचात सांगा माझी सेडान जुनी झाली आहे आणि आता बदलायची आहे(जसं काही १० वर्षापासूनच माझ्याकडे गाडी आहे)
हाकानाका

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 9:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही हो नाही परवडत. गाडी विकत घ्यायला परवडते. मेंटेन करणं अवघड आहे.

आणि तो काय घेतं नाही म्हणाला नव्हता. थोडी कळं काढायची तयारी पाहिजे एवढचं म्हणणं आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Jan 2015 - 9:57 am | लॉरी टांगटूंगकर

(आजच्या कॉफीचे पैसे टी.टी.एम.एम. Lol ) =))

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:27 am | पैसा

पैसात्त्याचा सल्ला कॉलम सुरु कर्ताय का? आम्ही मुक्तपीठीय प्रतिक्रिया देणार नै असं वचन देतो हवं तर.

मग काय उपेग? मुक्तपिठीय प्रतिक्रिया मस्टच!

टवाळ कार्टा's picture

17 Jan 2015 - 10:13 am | टवाळ कार्टा

कोणी असेल ओळखीत तर सांगा की
मला चालेल :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 12:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गोयंकर सांगतील की रे तुला....!!!

बाकी ठाण्यासारख्या (मध्यवर्तसमान) ठिकाणी तुला एक मुलगी मिळु नये...वैट्टं वाटलं बघं दुष्काळ बघुन. सरकारी पॅकेज मिळतं का बघं =))

पैसा's picture

17 Jan 2015 - 12:38 pm | पैसा

सर्कारी प्याकेज?? देवा माझ्या! सर्कारतर्फे म्हशी वाटतात नैतर शेळ्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2015 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2015 - 12:12 am | टवाळ कार्टा

नै हो...मला पोग्गीच हवी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jan 2015 - 7:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

टागालॉग भाषेमधे पोग्गीचा अर्थ "हँडसम ड्युड" असा घेतला जातो हे येथे विनम्रपणे लिहावेसे वाटले. =))

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2015 - 10:28 am | टवाळ कार्टा

ते "पोगी" आहे....पोग्गी नाही

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 1:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठिके

पोगी=हँडसम ड्युड

पोग्गी= हँड्डस्सम्म ड्युड्ड!!

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 1:16 pm | टवाळ कार्टा

ghanta

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) =)) =))

पैसा's picture

19 Jan 2015 - 10:44 am | पैसा

:ROFL:

पिवळा डांबिस's picture

19 Jan 2015 - 11:33 am | पिवळा डांबिस

अर्ध्या ग चा फरक, अनर्थ करी!!!!
:)

जर जावई स्वः जातीस असला तरच या सर्व वस्तु दिल्या जातात

आजानुकर्ण's picture

17 Jan 2015 - 6:32 pm | आजानुकर्ण

लग्नेच्छुक मित्राला बायको म्हणून एमसीए वगैरे झालेली मुलगी नक्की का बरं हवी आहे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jan 2015 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याला इंजिनिअर मुलगीचं हवीये असं काही नाहीये. इंजिनिअर मिळाली तर उत्तम नाही मिळाली तर काही फरक पडत नाही. त्याची एवढीचं इच्छा आहे की मुलगी शिकलेली असेल तर शिक्षणाचा वापर करावा. घरी बसुन रहाण्यात काही अर्थ नाहीये.

मुलींना वेगळा फ्लॅट असणारा मुलगा का हवा याची कारणे काही लग्नेच्छुक भाच्यांकडुन मिळवून मी धन्य झाले त्यांची दूरदृष्टी बघून.(#$$आम्हाला नाही सुचलं.बसले हप्ते फेडत ^_~ )
१ सुरुवातीपासुूनच वेगळे राहाता येते.
२ मूल झाल्यावर आईकडे ठेवता येते.सासरच्यांची मिजास नको.
३ आईचे घर तीस वर्षापूर्वी घेतलेले पौडात असल्याने,जास्तीत जास्त कोथरुडपर्यंतचाच फ्लॅट हवा!
४ सध्या या भागात फ्लॅट घेऊ शकणार्याला तेवढा पगार असायला तो अाय टी हमाल हवा.
५ आय टी सोडुन दुस्रं प्रोफेशन डाऊनमार्केट अस्तंय.(भिंतीवर डोके आपटा हीचे)
६ सणवाराचं सगळं आईच बघेल.मला काहीच येत नाही.ती जवळ बरी!
७ सध्या यातल्या एकीचे वय ३२ फक्त!
८ त्या जे सांगत आहेत यात काहीही गैर आईबापांना वाटत नाहीये हे विशेष.
९ परत जात पोटजात भानगडी आहेतच.
१० तुझ्या वयात माझे लग्न होऊन मी मुंबईतून एका छोट्याश्या गावात आले.माझ्या नवर्याने त्याला आय टी वाल्या आॅफर माझा इथे जम बसणे,मुलाला सांभाळणे यासाठी नाकारुन प्राॅडक्शन बेस्ड कंपनीत नोकरी केली.तिच्या वयाची असताना माझे मूल ८वर्षाचे होते.हे ऐकुन तिला फारच हसू आले आणि असे काय तुम्ही हे मलाच ऐकवले गेले!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 10:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकुण काय नॉन आयटी वाले जगायला नालायक =))

कठीण कठीण कठीण किती!!!! :( :( :(

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:25 am | पैसा

माझ्या १८ वर्षाच्या मुलाची आत्तापासूनच काळजी पडलीय! तो तर बापडा सगळ्यात वैट्ट प्रकार शिकतोय. घिसाडी (मेक्यानिकल इंजिनियर) होणारे. आताच वर्गात ३ की ४ मुली आहेत म्हणे. आणि घरी अस्तो तेव्हा फूटबॉल बघत नाहीतर खेळत असतो. तेव्हा प्रेमात बिमात पडण्याची शक्यता काय दिसत नै!

माझा दहावीत आहे पैसाक्का!मीच त्याच्यासाठी सातवीपासुनच्या मुलींवर नजर ठेवुन बसायचा विचार करतेय ^_~ आमचंही ध्यान प्रेमात पडेल असं वाटत नाही!वेळेवर बुकिंग झाले म्हणजे बरें!!

सुबोध खरे's picture

17 Jan 2015 - 10:39 am | सुबोध खरे

पैसा ताई
मग आमचे चिरंजीव तर बांधकामावरचे हमाल ( सिव्हील) मध्ये आहेत. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या वर्गात ४०% मुली आहेत. त्यातून आमचे चिरंजीव मधून मधून कडक कपडे घालून सेंट वगैरे मारून कुठे कुठे जात असतात.म्हणजे मुलगा चांगल्या मार्गावर आहे असे वाटते. नाहीतर घरात असेल तर चेहऱ्यावर भजी तळता येईल इतके तेल असते. बाकी फुटबॉलचे म्हणाल तर आमच्याही घरी तोच कार्यक्रम आहे.

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:52 am | पैसा

जरा तरी आशा आहे, कोणीतरी मुलगी भेटेल त्याला कॉलेजात!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 12:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

घिसाडी मेकॅनिकल इंजिनिअर =))

चांगलयं की आता कळेल तुम्हाला मेकॅनिकल/ प्रोडक्शन आणि सिव्हील वाल्यांचं दु़ख्खः!!! आत्ताचं स्पष्ट कल्पना द्या, बाबा हो मेकॅनिकल इंजिनिअर, पण बायकोची सोय पण आत्ताचं करुन ठेव. ग्रॅजुएट व्हायच्या आत सोय झाली तर काही खरं नाही बाबा. =))
(सबमिशन च्या ओझ्याबरोबर हे ओझं!!! ;) )
वर्गात तीन-चार मुली असतील तर कटथ्रोट स्पर्धा आहे म्हणायची. =))

घिसाडी (मेक्यानिकल इंजिनियर)

इंजिनिअरिंगच्या मदर ब्रँचला घिसाडी म्हणल्याबद्दल अतीतिव्र णिषेध...!!! =))

भावना कल्लोळ's picture

17 Jan 2015 - 3:03 pm | भावना कल्लोळ

पै ताई, तुझा मुलगा अजून १८ वर्षाचा आहे आणि माझा आताशी १० वर्षाचा. पण दीर तर माझा चांगला २८ वर्षांचा झाला आहे, पण स्वतः कुठे सुत जुळवेल याची जरा सुद्धा शक्यता नाही आहे, हल्ली मलाच कसलासा आजार झाला आहे कि काय असे वाटते, लोकल मध्ये, ग्रुप मध्ये त्याची एवढी समवयस्क मुलगी दिसली कि तिला जावेच्या रुपात पाहायला सुरवात ते तिची इंत्यभूत माहिती काढेपर्यंत. पण अजून कोणतीही मोहीम सर होईना. आमच्याकडे तर जाऊ बाई जोरात हे प्रकरण लयच गाजतय.

क्लिंटन's picture

17 Jan 2015 - 5:31 pm | क्लिंटन

तेव्हा प्रेमात बिमात पडण्याची शक्यता काय दिसत नै!

माझ्याविषयीही माझे सगळे नातेवाईक अगदी असेच म्हणत असत.मी पण मुळातला घिसाडीवालाच आणि आमच्या वर्गात तर चार वर्षे एकही मुलगी नव्हती.तरीही प्रेमविवाह करायचा तो केलाच :)

तेव्हा अनेकदा दिसते तसे नसते. :)

पैसा's picture

17 Jan 2015 - 7:21 pm | पैसा

आशेचा किरण दिसला!!

आनंदी गोपाळ's picture

16 Jun 2016 - 11:26 pm | आनंदी गोपाळ

आशा कोण? किरण कोण?

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2016 - 10:38 am | टवाळ कार्टा

आशा परेराचा बॉयफ्रेंड =))

सूड's picture

17 Jun 2016 - 5:48 pm | सूड

आताचा का एक्ष?

हे असलं वाचून वर कोणीतरी म्हटलय तसं वाटलं,स्वस्तात सुटले एकदाची! अपेक्षा काय असतात हे समजण्याआधीच लग्न झालं. एकच अट होती की हामेरिकेत राहणारा नको, पण त्या अटीचेही बंबाळे वाजले.

हे असे नुसतेच व्यवहार बघणारी लग्न पाहुन मला या मुलींची काळजीच वाटते.जराही वाचन नाही,शाॅपिंग पलिकडे छंद नाही,तडजोडीची तयारी नाही,इतर जगात काय चाललं आहे याची उत्सुकता कणव नाही.मी सगळ्याच मुली अशा असतात नाही म्हणत आहे.पण उथळ विचारांचे प्राबल्य जेवढ्यांशी बोलले त्यात फार जाणवले.
मुलांनी देखील आपली आवड छंद याला अनुरूप मुली शोधाव्या.त्यांनीही मग कमी शिकलेली किंवा गृहिणी व्हायची तयारी असलेली मुलगी मला चालेल असा विचार करायला हवाच.हप्ते फेडण्यासाठी चांगली नोकरीवाली मुलगी शोधताना तीही तिच्या अपेक्षा घेऊन येईल याची तयारी हवी. आपल्या आचारविचारांशी जुळते घेणारे मुलगा मुलगी हवेत.अन्यथा हा कोरडा व्यवहार होणार आहे.

भावना कल्लोळ's picture

17 Jan 2015 - 2:54 pm | भावना कल्लोळ

सहमत

विलासराव's picture

17 Jan 2015 - 10:47 am | विलासराव

माझा मॅनेजर ८ वी पास आहे. नात्यात शोधाशोध केली तर १०-१२ वीच्या पुढचे स्थळ मिळेना. ग्रॅज्युएट मुली कशाला ८ वीच्या मुलाशी लग्न करतील? असा प्रश्न यायचा. अरे पण तो निर्व्यसनी आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, पैसे चांगले कमावतोय, स्वतःच ऑफीस घेतलय आनी स्वतःचा नवी मुंबईत प्लॅट घ्यायची तयारी झालीय हे मुद्दे गौण.
नाहीतर हा ग्रॅज्युएट आहे असे खोटे सांगायचे हा प्रस्ताव होता.

शेवटी एका मित्राला साकडे घातले मित्र मदतीला धावुन आला. मुलगी पाहीली आनी २४ डिसेंबरला साखरपुडाही झाला.
मुलगी बी फार्म करतेय तिसर्‍या वर्षात शिकत आहे. लग्न मे ला कोर्टात करायचय.

थोडक्याय काय घाबरुन जाउ नका.
शोधा म्हन्जे सापडेल.
हा पहा फोटो.
1
2

खटपट्या's picture

17 Jan 2015 - 3:24 pm | खटपट्या

जोडा शोभून दीसतोय. मुलीला मानलं पाहीजे.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2015 - 8:13 am | अत्रुप्त आत्मा

@मुलीला मानलं पाहीजे.>>> ++++++११११११

नाखु's picture

19 Jan 2015 - 11:57 am | नाखु

आयतोबा "बाळ" राजें पेक्षा हा कर्तब्गार बे-रोजगार* निवडला हे बेष्ट !!!

* बे-रोजगार दोन-चार लोकांना रोजगार देणारा. (उगा अनर्थ नको)

रेवती's picture

17 Jan 2015 - 5:20 pm | रेवती

मुलगी खरच छान आहे.

काळा पहाड's picture

21 Jan 2015 - 8:08 pm | काळा पहाड

मालक, फोटोतल्या मुलाची आणि मुलीचीही परमिशन घेतली नसेल तर फोटो उडवून टाका. गैरवापर होण्याची रिक्स असते.

फार वेळ घालवू नका विचारात. जे काय मिळेल ते लवकर पदरात पाडून घ्या. मुलांसाठी हातात थोडा वेळ ठेवा. तिशीच्या आत मुलं झाली तर आपण पन्नास पंचावन्नचे होइपर्यंत ते वीस पंचवीसचे होतील. मुलं एस्टॅब्लिश होण्यासाठी थोडी उमेद असेपर्यंतच आपण (वेळ पडल्यास) झगडा करू शकतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jan 2015 - 12:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझं लग्न २ महीने अगोदर झालं!अगदी अनपेक्षित!!अन हो "अरेंज्ड" ! माझी नोकरी पैरामिलिटरी ची! त्यात पानपता पासुन "शिपायाला पोर द्यायची नाय" हा शिरस्ता! त्यात आमची नोकरी चाइना बॉर्डर ला! आनंद होता एकंदरीत!! माझे अरेंज्ड असले तरी २ स्टेट्स मैरिज आहे! बायको चे पूर्वज बरगीर म्हणून उत्तर हिन्दुस्तानात आलेले सांगायचे कारण हे की अम्हला पण लई सल्ले मिळाले होते!! बायको चे मराठी कमजोर आहे म्हणून !! नकार दे म्हणे! पण बाईल आमची गुणाची!! माळ घातली तर बापूसाहेबांसच! असे म्हणाली अन आम्ही आमच्या बुलेट ची पिलियन सीट पुसायच्या उद्योगाला लागलो!!! ;)

सुबोध खरे's picture

17 Jan 2015 - 1:05 pm | सुबोध खरे

अर्रर्र
पिलियनच्या सीट वर धूळ साठलेली वाचून डोळे पाणावले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jan 2015 - 1:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

बार्डरी वर आपल्या हद्दीतच रहायची सवय लागते! "ऑक्यूपेशनल हैजर्ड" :D :D

स्पा's picture

17 Jan 2015 - 3:12 pm | स्पा

रम्य चर्चा

मधुरा देशपांडे's picture

17 Jan 2015 - 3:22 pm | मधुरा देशपांडे

या धाग्यावरचे मुलींच्या अपेक्षांचे प्रतिसाद प्रिंटआऊट काढुन ठेवावे म्हणते. नवर्‍याशी भांडण झाले की योग्य वेळी हे प्रतिसाद दाखवुन सांगायचे, बाबा रे, बघ तु पण नॉन आयटीवाला आहेस, फ्लॅट नाही, लहान बहीण आहे नि अजुन काय काय. ;) तरिही मी लग्न केलेय तुझ्याशी. किती नशीबवान आहेस याचा विचार कर. बाकी काही बोलु नकोस. गपगुमान राहा. :)))

इरसाल's picture

17 Jan 2015 - 4:34 pm | इरसाल

पतिदेवाच्या दु:खात मी सहभागी आहे.

सेम कंडिशन असलेला इरसाल

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2015 - 11:31 am | टवाळ कार्टा

H4 या व्हिसा प्रकारातील भारतीय स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर कुठे बघायला मिळेल काय? :)

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 8:10 pm | टवाळ कार्टा

या पश्नाकडे समस्त म्हैलांनी सोयीस्कररीत्या काणाडोळा केलेला आहे ते बाकीच्या स्त्री-पुरुष समानतावाद्यांना समजले आहे का?

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 5:27 pm | बॅटमॅन

अगदी अगदी....पण त्यावरही उत्क्रांतीवर आधारित अर्ग्युमेंटे येतीलच. र्‍हावा तयारीत.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 7:53 pm | टवाळ कार्टा

येउदे की...मी कधीचा वाट बघतोय

कवितानागेश's picture

18 Jan 2015 - 2:05 pm | कवितानागेश

लग्नसन्स्था लवकरच मोडकळीला येणार असा अन्दाज व्यक्त करतेय!

पैसा's picture

18 Jan 2015 - 2:18 pm | पैसा

मिपावर काथ्या कुटला म्हणून? :P

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2015 - 2:59 pm | टवाळ कार्टा

मुलींच्या वाढलेल्या (अवास्तव) अपेक्षांमुळे???

आजानुकर्ण's picture

18 Jan 2015 - 5:47 pm | आजानुकर्ण

सध्या आहे तशी व्यवस्था मोडकळीला येत आहे ते चांगलंच आहे. एक तर लग्न म्हणजे आयुष्यभराचा १०० टक्के जुगार आहे. त्यात आजकाल मुलामुलींकडं स्वतःचाच भरपूर पैसा आल्याने हवं ते मिळवण्यासाठी लग्नाचीच आवश्यकता असते असं नाही हेही लख्ख कळतंय. कशाला जुगाराची रिस्क घेतील बॉ? त्यात आजूबाजूला लग्न केलेली सगळी जोडपी एक तर कावलेली दिसतात नाहीतर आंतरजालावर फ्रस्ट्रेशन बाहेर काढत असतात!
माझा अनुभव तर असा आहे की या अवास्तव अपेक्षांमागचं मुळात कारण हे लग्न करण्याची इच्छा नसणं आणि ती इच्छा सांगण्याची सोय आपल्या व्यवस्थेत नसल्यानं उगीच थातुरमातुर कारणं सांगून लग्न लांबवत नेणं हीच आहे.

प्रमोद देर्देकर's picture

19 Jan 2015 - 9:54 am | प्रमोद देर्देकर

+११११ प्रतिसाद आवडला आहे. बरोबर ही एक बाजुही अशु शकते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 10:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार झालाय.
आपल्याकडे एक म्हण आहे. मुलगा आणि नारळं पुढे कसा निघेल सांगता येत नाही. आता त्या जोडीनी अरेंज मॅरेजामधला जोडीदार कसा असेल हे सांगता येतं नाही.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 10:32 am | टवाळ कार्टा

नारळ बदलता येतो...आणि समानतेचा जमाना आहे त्यामुळे "मुलगा आणि नारळं पुढे कसा निघेल सांगता येत नाही" या वाक्यामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत ;)....कुठे दगडफेक करावी?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 10:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक डाव धोबीपछाड मधला एक ड्वायलॉक आठिवला...

"बाब्या, तुझ्या बापानी बनविल्या का रे म्हनी?" =))

ज्यानी म्हण बनवली त्याच्या घरावर मेणबत्ती मोर्चा नेउ रे आपण!!!!

दोनशे आणी हाफशेंच्युरी निमीत्त भावी श्री.वरांचा आणी भावी सौ.वधुंचा सत्कार एक एक अपेक्षा देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते =))

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा

"सौ.वधु" नाही रे..."चि.सौ.कां.वधु" :)

माझा काय पत्रिका छापायचा व्यवसाय नाय.
त्यामुळे गलतीसे मिष्टेक हो गया . :-)

अवांतर-तिनशे करावे का ?
अतिअवांतर-धागा टाकुन मुवि कुठे गायबले?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2015 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक विवाहोत्सुक तरूण आपापल्या फुंकण्या घेऊन जोमाने धागा पेटलेला ठेवत आहेत ! त्यामुळे दर प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद देऊन हवा देण्याच्या (उघड उघड) गनिमी काव्याची गरज या धाग्याला अजून पडलेली नाही. ;)

त्यामुळे मुवि सौदी वाळवंटात खुर्ची टाकून खजूर खाता खाता चाय सुलेमानीचे घुटके घेत मजा पाहत आहेत (अश्या स्मायलीची कल्पना करा). +D

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 1:03 pm | टवाळ कार्टा

मुवि सौदी वाळवंटात खुर्ची टाकून खजूर खाता खाता चाय सुलेमानीचे घुटके घेत मजा पाहत आहेत (अश्या स्मायलीची कल्पना करा)

हातात चाय सुलेमानी...मनात एल.पी. ;)

बॅटमॅन's picture

19 Jan 2015 - 1:05 pm | बॅटमॅन

एलपी काय?

मला के एल पी डी माहितेय.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 1:18 pm | टवाळ कार्टा

lp

पिंपातला उंदीर's picture

21 Jan 2015 - 8:39 pm | पिंपातला उंदीर

त्यात आजकाल मुलामुलींकडं स्वतःचाच भरपूर पैसा आल्याने

लै म्हन्जे लाइच सरसकट विधान. मुम्बै - पुने पुरते लागु. विदर्भ - मराठ्वादा वैगेरे तुम्च्या कक्षेत नसावेत बहुतेक

माझ्या बहिणीला आम्ही स्थळ बघतोय ..
एक स्थळ . मुलगा दहावी आणि बारावी मेरीट मध्ये आलेला . कुठल्याश्या भारी कॉलेजमधून MBA केलं होतं आणि IT हमाल . तो तर काहीच बोलला नाही .त्याचे वडील सगळ्यात जास्त बोलत होते . आम्ही आमच्या मुलाला हिंजवडी लांब पडत म्हणून कंपनी बदलायला सांगितली . हि लोक कोथरूड मध्ये राहणारी . दुसऱ्या मुलाला पण घराजवळ नोकरी बघायला सांगितली आहे .
माझी बहिण इंजिनिअर आहे . IT कंपनी मधेच आहे . आणि तिची नोकरी करायची इच्छा आहे . तर मुलाचे वडील : नोकरी करायची काही गरज नाहीये . कशाला लागते नोकरी . आमचा मुलगा व्यवस्थित कमावतो. माझ्या बायकोनी कुठे केली नोकरी . आमच्या मुलाला हातात पाण्याचा ग्लास लागतो .
त्यावर माझी आई म्हणाली कि अहो आजकाल मुलींचे पण खर्च वाढले आहेत आणि तिची इच्छा आहे नोकरी करायची.

तर मुलाचे वडील : कशाला पाहिजे नको ते खर्च .उगाच आपलं beauty parlour मध्ये जायचं आणि पैसे उडवायचे . मी तर कधी पावडरपण लावत नाही .

दुसरा किस्सा :

पहिल्या अनुभवातून शहाणे होऊन ती पुढच्या स्थळाच्या वेळेस मी आधी त्याला भेटते आणि आवडला तर मग दोघांच्या आई बाबा ना भेटवू असा विचार केला.

मुलाच्या ढीगभर अटी फक्त भेटायचं ठिकाण ठरवायला.
मुलगी : शनिवारी किवा रविवारी भेटू या .
मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं . आपण मंगळवारी भेटू माझं ऑफिस संपलं कि.

मुलाच ऑफिस magarpatta ,मुलीचं ऑफिस कोथरूड.

मुलगी : CCD मध्ये भेटू या .
मुलगा : नको .मला तिथली कॉफ्फी नाही आवडत .
मुलगी : मग dominos ला भेटू
मुलगा: dominos चा पिझ्झा बेस फारच कडक असतो . मला नाही आवडत .
मुलगी : मग अभिषेक ला भेटायचं का ?
मुलगा: तिथे जेवण चांगलं असतं का?

मुलगा भेटायच्या आदल्या दिवशी : जर्मन बेकरी ला भेटायचं का ?तिथे खायला मस्त मिळत असं आइकल आहे .

मुलगी (वैतागून ): माझ्या होस्टेल च्या पार्किंग मधेच भेटू या . मला बोलणं महत्वाच आहे, जेवायला जाणे नाही .

दोघेही अखेर अभिषेक ला भेटली . तिथे ह्या मुलानी त्याच नाव एका वृत्तपत्रात आलं होतं .त्याचं कात्रण घेऊन आला .आणि हिला म्हणाला वाच मोठ्यांनी .बघ माझं नाव आलं आहे पेपर मध्ये . *dash1*

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 2:06 pm | टवाळ कार्टा

जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा सुध्धा लिहा की (इथे त्या २ नमुन्यांच्याची बाजू घेण्याची कोणतीही इच्छा नाहीये)

मीता's picture

19 Jan 2015 - 2:34 pm | मीता

बहिणीच्या अपेक्षा :

१. शक्यतो IT मधला नसावा. (ती स्वतः IT मध्ये असली तरी तिला IT मधला नकोय )
२. मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सुसंस्कृत असावेत.
३. मुलगा व्यवस्थित कमावता हवा (१ लाख पगार वगैरे अपेक्षा नाहीच आहेत ) पण बायको ला व्यवस्थित पोसू शकणारा हवा. उद्या जर तिला काही कारणांनी नोकरी सोडायला लागली तर त्याच्या पगारामध्ये घर नीट चालेल इतका.
४. फक्त बायको म्हणून नाही पण आयुष्याची जोडीदार म्हणून वागवणारा हवा .(यात बरेच मुद्दे आहे - निर्णय दोघे मिळून घेणे , एकत्र फिरणे , sharing ) उगाच नवरेपणा गाजवणारा नको.
५. मित्र ,मैत्रिणी बायकोलाही असतात हे समजून घेण्याची तयारी हवी.
६. त्याला स्वयंपाक यावा अशी अपेक्षा नाही पण कधीतरी मदत करायची तयारी दाखवावी (बायको स्वयंपाक करतेय तर निदान पाण्याचे ग्लास भरावेत ).किवा कधी बायको दमली असेल तर बाहेरून खायला आणायची किवा हॉटेल मध्ये जायची तयारी पाहिजे .
७. फिरायला जायची आवड हवी अर्थात बायकोबरोबर,घरातल्यांबरोबर .
८. भूतकाळातले affairs वर्तमान काळात आणि भविष्यात नकोय.
९.स्वतःच घर आत्ता नसलं तरी ठीक आहे पण भविष्यकाळात असाव .(अर्थात दोघांनी मिळून घ्याव )
१०. बाईक हवी हे must आहे .(तिला बाईक आवडते म्हणून )
११. IT मधला जॉब आहे तर ९ ते ६ असं असेलच असंही नाही .कधी थांबायला लागल तर समजून घेतलं पाहिजे .

१२. मुलगा अगदीच Handsome असावा अशी अपेक्षा नाही पण गबाळा नको .

ही सगळी तिची मत आहेत . सगळ्यांची अशीच असतील असंही नव्हे .

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 2:45 pm | टवाळ कार्टा

thumbsup

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2015 - 4:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिफ्ट हवी असल्यास स्मायल्यांच्या खूणा करणे सोडून सरळ विचारणा करा असा आगाऊ/आगावू सल्ला आहे ;)

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 4:37 pm | टवाळ कार्टा

कोणीतरी असा सल्ला देईल असे वाटलेच होते ;)

प्रसाद१९७१'s picture

19 Jan 2015 - 2:47 pm | प्रसाद१९७१

४. फक्त बायको म्हणून नाही पण आयुष्याची जोडीदार म्हणून वागवणारा हवा .(यात बरेच मुद्दे आहे - निर्णय दोघे मिळून घेणे , एकत्र फिरणे , sharing ) उगाच नवरेपणा गाजवणारा नको.
५. मित्र ,मैत्रिणी बायकोलाही असतात हे समजून घेण्याची तयारी हवी.

@मीता - वरील आणि त्या सारख्या गोष्टी बोलायला छान छान असतात. पण कुठलाही पॅरॅमिटर ठरवलात तर तो मोजायची सोय पण असायला हवी ना. वरील गोष्टी मुलात आहेत की नाही कसे कळणार अगदी ५ वेळा भेटुन सुद्धा.
मुलाला सुद्धा स्वताला आपण लिबरल आहोत वगैरे गैरसमज असतात, पण एकदा नवरा बायको च्या नात्यात शिरल्यावर कोण कसा वागू शकेल ते सांगता येत नाही.

त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 2:54 pm | टवाळ कार्टा

ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात.

असे करण्यापेक्षा

वरील गोष्टी मुलात आहेत की नाही कसे कळणार अगदी ५ वेळा भेटुन सुद्धा.

यात बदल नाही का करता येणार??? ५ च्या ऐवजी १०-१५ वेळा भेटूदे की

प्रसाद१९७१'s picture

19 Jan 2015 - 3:01 pm | प्रसाद१९७१

अहो अश्या भेटण्यात मुखवटेच असतात.