मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
प्रतिक्रिया
लिही रे तु....तुम लढो हम पाठिंबा देताय :)
अरे अनुभव लिहायसाठी काढलाय ना धागा? मग लिही की...आमच्या सारख्या ज्युनिअरांना मार्गदर्शन दिल्याचं पुण्य मिळेलं ...त्या पुण्याने एखादी पुणेकरीण मिळेल .. =))
त्या पुण्याने एखादी पुणेकरीण मिळेलपुणेकरीण मिळवलीस तर कर्माने मरशील ;)
गैरेसमज झाला मालकं तुमचा. त्या पुण्याद्वारे तुला एखादी पुणेकरीण मिळेलं :D
स्ने, मी हा प्रयत्न केला होता आणि तो घरच्या मंडळींकडून हाणून पाडण्यात आला.
आता कुठे जमले आहे, तेव्हा अपेक्षा जाणून घेतोय..
या वयात मुलींची मानसिकता खूप लवचिक असते. विशेषत: अलीकडच्या पिढीच्या मुली खूपच प्रगल्भ विचाराच्या आणि कोणत्याही तडजोडीस तयार असतात, असे आढळले आहे. नवऱ्याच्या पगाराबद्दल त्या फारशा आग्रही दिसत नाहीत.*lol*
अगदी अगदी =))
ज्योक ऑफ द सेंच्युरी =))
सायटींवरती लिहायला ठीके, वेळ आली म्हणजे असलीयत कळते.
'पुणेकरणी' याला अपवाद असू शकतील याची बेशर्त स्वीकृती !
पण मग पुणेकरांना पुणेकरणीच का हव्यात ? *wink*
मॅचींग अॅट्यीट्युड पाहिजे म्हणुन.
अॅटिट्यूड म्हटलं की छान वाट्टं. तेच माज म्हणा बघू!
जमाना बदल गया है ! हेच खरे. माझ्या लग्नाच्या वयात मी पहिल्या धंद्यात कर्जबाजारी झालो होतो. नोकरी भेटली ती पण रु. २५००.०० ची गावखात्यातली. ( ही २००३-०४ ची गोष्ट आहे). शिक्षणात काहीही स्पेशालिटी नाही. पैसा, शिक्षण, सुंदर रुपडे या सर्वांचीच कमतरता. पोरगी पटवायची धमक नाही. माझ्या लग्नाच्या चिंतेने आईवडील बेजार आणी त्यामुळे मी पण उदास. त्यावेळी माझा एक मित्र मला नेहमी धीर द्यायचा. मला म्हणायचा अरे तु पुरुष आहेस हेच आपल्या समाजात लग्नासाठी लागणारे मोठे क्वालीफिकेशन आहे. चिंता करु नकोस.
लवकरच लग्न जमले, दिस जातील दिस येतील या म्हणीप्रमाणे चांगले दिवस देखील पहायला मिळाले.
पण ते दिवस आठवले की वाटते आज जमाना किती बदलला आहे. आज पुरुष असणे क्वालीफिकेशन नाही तर प्रॉब्लेम वाटायला लागायचे दिवस आलेत.
चालायचेच. चार दिवस पुरुषांचे, चार दिवस स्त्रियांचे. नो रिग्रेटस.
पण मागे वळून पाहिले तर एक गोष्ट नक्की आठवते की "चला बुवा, स्वस्तात सुटलो".
सुंदर रुपडे या सर्वांचीच कमतरता.असं नाय हा बोलायचं ! आमी बगीतलंय तुमास्नी !!
पण ठि़क आहे. आपणच आपली लाल नाहि केली तर दुसरे कोण करणार :)
एकदा कॉलेजात असतांना कमी मार्क मिळाले म्हणजे आई बाबांच्या दृष्टीने कमी
तर आई उद्वेगाने म्हणाली होती
अरे मुलीच्या जातीत जन्माला असता तर तुला उजवून आम्ही सुटलो असतो.
मुलगा आहे असे मार्क मिळाल्यावर काय नोकरी मिळणार
माझ्या पालकांच्या काळात हम दो हमारे दो पद्धत रुळली होती.
तेव्हा सधन पालकांना दोन्ही मुली असतील तर मग त्यांचा जावई
विकत घेण्याचा प्रयत्न सुरु होतो.
कितीतरी वेळा मुलींच्या नावे रग्गड पैसा , दाग दागिने व चक्क प्रशस्त व मोक्याच्या ठिकाणी ब्लॉक सुद्धा असतो , तेव्हा तिच्या ब्लॉक मध्ये समंजस सुसंस्कृत हुशार व उच्च शिक्षित पण घरच्या हलाखीची परिस्थिती असलेला मुलगा शोधून मुलींच्या नावे असलेल्या जागेत संसार सुरु करण्यापेक्षा तिच्या पालकांचा ओढ आपल्याहून श्रीमंत तोलामोलाचे ठिकाण मुलीसाठी शोधण्याचा प्रयत्न केला जातो , लग्नाचा बाजार व तेथे घडणारे सौदे बदलणारे ट्रेंड ह्यावर एक लेख होऊ शकतो.
कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतं|
बांधवा: कुलमिच्छन्ति, मिष्टान्नमितरे जना:.
या श्लोकाच्या गाभ्यालाच धक्का लागायची वेळ आली की काय?
आजकालच्या SMS जमान्यात तो श्लोकही लघुरुपी झाला आहे...
सर्वे वित्तं इच्छन्ति ।
दोघांनाही हा फोटो दाखवला तरी चालेल.
जास्त ताणल्यास दोन्ही बाजुंनी तडजोड करावीच लागते मग ती आधी का नाही करायची?

दाद दिली गेली आहे!
योग्य त्या वेळी जन्मास आलो, सुटलो. आजच्या काळात मला अॅडमिशन, नोकरी, लग्न, फ्लॅट, गाडी यापैकी काहीही शक्य झालं नसतं.
आता अपेक्षा मुलींच्या वाढल्यात की पालकांच्या पडताळणं फार कठीण!! आमच्या ग्रुपातल्या मुलींना स्थळे सांगून येऊ लागली त्यावेळचा एक संवाद आठवला. मुलगा का नाकारलास, तर त्या बैने उत्तर दिलं होतं, "त्याला महिना जेमतेम पन्नास हजार रुपये पगार आहे, कसं चालणार घर?". ग्रूपातली मंडळी एकमेकांच्या तोंडाकडे बघत, आता यावर काय रिअॅक्शन द्यायची त्याचा विचार करत होतीत.
संन्यास घ्यावा म्हणतो :)
अगदीच संन्यास घ्यायची गरज नाही, but prepare yourself in case you have to stay alone!! Arranged Marriage करुन पदरी पडलेलं पवित्र मानण्यापेक्षा wait till you get someone where you both are comfortable with each other. नाही झालं म्हणून काही आभाळ कोसळणार नाही आणि झालं म्हणून अगदी काही स्वर्गात पाऊल पडणार नाही. लोकांचं म्हणाल तर ते बोलत असतात आणि बोलत राहणार. आधीच इथे म्हणून झालंय हे लोक फक्त मिष्टान्नापुरते असतात, तेव्हा अशा लोकांचं बोलणं किती मनावर घ्यायचं हा आपापला प्रश्न आहे. No one can stop them, if you know you are true to yourself...just do not care at all!!
सहमत. पटलं नाही तर करु नये. उगीच पावशेर दुधासाठी म्हैस पाळायची गरज नाही. मात्र एखादी आवडली आणि तिलाही तुम्ही आवडलात तर अवश्य लग्न करा.
लोक कायमच बोलत राहतात. लग्न झालं की मुलंबाळं व्हायची वाट बघतील. (ती नाही झाली की बोलतील). नवराबायकोचं पटलं नाही तरी बोलतील. मुलंबाळं मोठी झाल्यावर त्यांना कमी मार्क वगैरे पडले की बोलतील. ते चालूच लाहतं.
काशीचे तिकीट कॅन्सल करण्यात आले आहे :)
टाका चटई,
चटई स्वतःची स्वतःच विकत आणायचीय काय प्रत्येकाने ?
लग्नाच्या पंगतीत वापरलेली बस्तरं चालतील काय? :D
माझा अनुभव (अर्थात माझ्या बहिणीच्या लग्नाचा) फारच चमत्कारिक असेल आजच्या मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या अपेक्षेच्या संदर्भात:
२००९ मध्ये माझ्यापेक्षा लहान बहिणीचे लग्न झाले. बहिण माझ्यापेक्षा ५ वर्षाने लहान २३ वर्षाची होती. आमचे बाबा वरसंशोधन करत होते. तिचे शिक्षण ठीकठाक म्हणजे १२+ATD केले आणि पदवी सुरु होती. रंगरुपाच्या आजच्या परिभाषेत अव्वल. पण लग्न जमत नव्हते. उच्चशिक्षित आणि चांगल्या नोकरीवाल्या मुलांना तिचे शिक्षण कमी वाटत होते, म्हणजे इंजिनिअर वैगेरे मुलांच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या. त्यात आम्ही हुंडाविरोधी. बरे त्याहून आमची वडील म्हणजे महा महा महा शंकेखोर. जमत आलेली १०-१२ स्थळे त्यांनी उगाच नाकारली. कदाचित तिच्यावरच्या अतिप्रेमाने त्यांना निर्णय घ्यायला भीती वाटत होती. शेवटी मी रणांगणात उतरलो. माझी बहिण जिथे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होती तिथल्या एका मुलाने तिला मागणी घातली. तिने ते मला सांगितले. तो आमच्याच जातीतला होता. वय(२८), रूप आणि शिक्षण तंतोतंत जुळत होते. दोघेही अनुरूप होते. पण त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती कारण तो दु----र कुठल्या खेड्यातून आलेला होता. मी त्याला भेटलो त्याच्याशी बोललो. तर पठ्या म्हणाला घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही. मी म्हटले का बुआ? तर म्हणे त्यांना शंका येईल कि हा प्रेमविवाह आहे आणि मग घरात तो मान-सन्मान कदाचित सुनेला मिळणार नाही कारण घरची बहुतेक मंडळी जुनाट वळणाची आहेत. किंवा त्याला अफ़ेअर चा शिक्का लागू द्यायचा नव्हता.
मी त्याचे मूल्यमापन केले. घरच्यांना सांगितले. त्याच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी झाली. सगळे व्यवस्थित होते पण फक्त एकाच समस्या होती.
मुलाला कुठलीही नौकरी नव्हती.
अकोल्याच्या संस्थेत तो मिळेल तसे काम करत होता, पार दूर खेड्यात संगणक शिक्षणाचे वर्ग घेत होता. १०-१२ माणसे असलेल्या घरात भावांसोबत राहत होता. कमाई फारच तुटपुंजी होती.
घर सुशिक्षित आहे, भाऊ वहिनी शिक्षक आहेत, परिसरात त्यांच्या कुटुंबाचे चांगले नाव आहे. पण मुलगा कमवत नाही, मुलीला खेड्यात कसे पाठवायचे हा गंभीर प्रश्न उभा राहिला. कुणीच मान्यता देत नव्हते आमच्या घरातून. कशी देणार? मुलीला खड्ड्यात कोण ढकलणार?
शेवटी मी मुलाशी बोललो, त्याला म्हटले, हे बघा तुमच्या भविष्याच्या योजना काय आहेत ते सांगाल तर बरे होईल. त्याने मला तो करत असलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल सांगितले. त्याचे आयटीआय (इलेक्ट्रिकल्स मध्ये) झाले होते व त्याच भांडवलावर त्याचे एमएसईबी मध्ये नोकरीचे प्रयत्न चालू होते. त्याचा दृढ विश्वास आणि थेट विचार करण्याची पद्धत आवडली. त्यापेक्षा त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि निवडलेल्या क्षेत्रातच सरकारी नोकरी मिळवायची, त्यातच पुढे जायचे हे अगदी ठाम मत, त्याचा त्या विषयातला सखोल अभ्यास आणि दूरदृष्टी हे सर्व जास्त आवडले. शेवटी मीच विचार केला कि हा माणूस आज काहीच नाही पण उद्या नक्कीच यशस्वी होणार. फार धाडस करून मीच हे लग्न ठरवले. घरचे सगळे साशंक होते. वडिलांनी तर ठरलेले लग्न मोडण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला अगदी एंगेजमेंट होऊनही. पण मी ओळखले कि दोघेही वर-वधू एकमेकांस पसंत आहेत आणि त्यांची संसार करण्याची इच्छा प्रामाणिक आहे. मी वडिलांना म्हटले कि तुम्ही ह्यापेक्षा चांगला पर्याय आणून दाखवा आपण लग्न आताच्या आता मोडू. शेवटी आमच्या इतर नातेवाइक जसे मामा वैगेरे ह्यांनी सखोल चौकशी करून कुठल्याही शंका-कुशंका निपटून काढल्या. लग्न लागले.
सुरुवातीचे १ वर्ष आमच्या ताईने खेड्यात निमूट काढले कारण तिचा आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या दादाच्या निर्णयावर प्रचंड विश्वास होता. याबाबतीत ती खरच महान आहे असे म्हणावे लागेल कारण खरा जुगार तिनेच खेळला होता.
लग्नाच्या पहिल्याच वर्षात साहेबाना सरकारी नोकरीची ऑर्डर आली. मग दोन-तीन ठिकाणी पोस्टिंग साठी महाराष्ट्रभ्रमण करून अकोल्यास सेटल झालेत. पुढच्याच वर्षात सरकारी निवास्थान आणि बढती दोन्ही मिळाले. आता आमचे जावईबुवांनी इंजिनिअरची पदवी मिळवली असून पुढची बढती मिळवण्याच्या तयारीत आहेत. अकोल्यात घर घेणार आहेत. गावातच माहेर असल्याने त्यांच्या संसाराकडे आई-बाबांचे लक्ष आहे. सासरी सगळ्यांशी उत्तम संबंध आहेत.
एका होतकरू मुलावर विश्वास टाकला. तो त्याने सिद्ध करून दाखवला. लोक फक्त म्हणतात "पैसा आज आहे उद्या नाही" पण तसे वागत नाहीत. आम्ही रिस्क घेतली कारण माझा माणसावर, त्याच्या असण्यावर, त्याच्या स्वप्नांवर विश्वास आहे. पैसा खरच आज नाही तर उद्या असेल. पण आयुष्य उभारणारी स्वप्नेच नसतील तर असलेल्या पैश्याला पाय फुटायला वेळ लागत नाही.
तेंव्हा मला सगळ्यांनी वेड्यात काढले होते. पण मी म्हणत होतो कि जर एखाद्याची लग्नानंतर नोकरी गेली आणि त्या धक्क्यात तो काम करेनासा झाला तर काय? अनिश्चितता पावलोपावली आहे. म्हणून तमाम होतकरू लग्नकरू लोकांना विशेषत:आई वडिलांना सल्ला कि माणसे ओळखा, धनदौलत, नोकरी, बंगले, गाड्या येतात आणि जातात. राहतो तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास, विश्वास, सोबत आणि तेच महत्वाचे आहे. आणि हे तत्वज्ञान अनुभवावर आधारित आहे.
मी वडिलांना म्हटले कि तुम्ही ह्यापेक्षा चांगला पर्याय आणून दाखवा आपण लग्न आताच्या आता मोडू
भयाणा तयारी होती तुमची.
प्रतिसाद आवडला
म्हणून तमाम होतकरू लग्नकरू लोकांना विशेषत:आई वडिलांना सल्ला कि माणसे ओळखा, धनदौलत, नोकरी, बंगले, गाड्या येतात आणि जातात. राहतो तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास, विश्वास, सोबत आणि तेच महत्वाचे आहे. आणि हे तत्वज्ञान अनुभवावर आधारित आहे.__/\__ आणि टाळ्यांचा कडकडाट!
आमचं कुटुंब हि तसे मध्यमवर्गीयच. सध्या मी सुद्धा याच मानसिक विचारातून जात आहे. लग्नायोग्य छोटा दीर आणि नणंद याच्यासाठी स्थळ पाहता पाहता नाके नऊ येत आहेत. वधु मुलींसाठी आमच्या काही जास्त अपेक्षा नाही आहेत कारण आमचे दीरच शिक्षण १० वि, साधीशी नौकरी, गिरगाव मध्ये छोटे घर. त्यामुळे आजकालच्या मुलींच्या खरेच अपेक्षा खूपच जास्त झाल्या आहेत याची जाणीव मला हि येत आहे. भरपूर पगार, स्वतःचे मुंबई मध्ये घर तसेच एकत्र कुटुंब पद्धत नकोय. वर पक्षासाठी सुद्धा आमच्या अपेक्षा जास्त नसताना सुद्धा मुलगी पदवीधर असावी, चांगली नौकरी करणारी असावी या अपेक्षा आहेत. कधी कधी वाटू लागते कि सर्वसाधारण , सामान्य मध्यमवर्गीय मुला - मुलीनी लग्नाची अपेक्षा करणेच चूक आहे. मुलीनी जर मुला मध्ये त्याचे कर्तुत्व आणि स्वभाव पाहून लग्न केले तर त्या जास्त सुखी होतील. कष्ट आणि साथ देण्याची तयारी असावी. आणि मुलांनी मुलगी सालस आणि मनमिळावू असावी हा गुण हेरून जर तिच्याशी लग्न केले तो जास्त सुखी होणार नाही का? जोडीला जर शिक्षण आणि कर्तुत्व असेल मुलीत तर त्याच्या संसारला सोन्याची झळाळी लागण्यापासून त्यांना कोणी हि अडवू शकत नाही.
गोष्ट लग्नाची ह्या धाग्यात दिलेला प्रतिसाद जसाचातसा खाली देत आहे:
२०११ ची गोष्ट असेल. माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन: १) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं. २) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. ३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम). ४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर). ५) अश्या बर्याच विचित्र मागण्या असण्यार्या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या. बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा. त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.आता मागच्या महीन्यातच त्याच्याबरोबर बोलणं झालं तेव्हा कळलं कि राहत्या घरच्या जवळच नविन प्लॅट घेतला आहे व २ आणि ४ व्हीलर सुद्धा. :)
लेख व प्रतिसाद हे जरी "वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?" या विषयावर असले तरी एकूण सूर हा "हल्लीच्या मूलींच्या / वधू पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत" असाच वाटत आहे . अविवाहीत मुलींचे कमी संख्या प्रमाण हे एक त्यामागचे मुख्य कारण असेल तर हि एकंदर परिस्थिती मुलांनी / वर पक्षाच्या लोकांनीही वेळीच ओळखली पाहिजे . व त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा जर कालबाह्य , अवास्तव असतील तर त्यांत आधीच बदल केले पाहिजेत ( उदाहरणार्थ- पत्रिका ,ठराविक जात , पोटजात यांचा आग्रह ). तसेच आपल्या समाजात चूकीच्या लग्नाच्या बळी ठरलेल्या व फसवणूक झालेल्या घट्स्फोटीत मुलींचेह प्रमाण जास्त आहे . तसेच दुर्दैवाने अकालीच वैधव्य आलेल्या मुलींचेही बरेच प्रमाण आहे .या मुलींचाही लग्नासाठी मुलांनी व वर पक्षाच्या लोकांनीही मनापासून व गंभिरपणे सविस्तर विचार केला पाहिजे . या गोष्टी मनापासून व खरया प्रेमानेच घडाव्यात. त्यामागे कोणताही उपकाराचा किंवा समाज सुधारणेचा हेतू नसावा .
मुलीनी जर मुला मध्ये त्याचे कर्तुत्व आणि स्वभाव पाहून लग्न केले तर त्या जास्त सुखी होतील. >>>>
@ भाक - हे कसे काय ओळखता येते? दोन भेटीत स्वभाव कसा कळतो? कर्तृत्व कशावरुन ओळखायचे?
त्याप्रमाणे नोकरी असलेली मुलगी एखाद्या नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न का करत नाही.खटपट्या - ह्याचे सरळ उत्तर आहे की, त्या मुलीला नोकरी करणारा मुलगा मिळतो आहे. असे असताना कोण स्वताहुन नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न करेल? तिला लग्न करायचे आहे, समाजसेवा नाही. नसेलच मिळत नोकरी असलेला मुलगा तर करेलच नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न.
"तुमचा मुलगा लग्नाचा आहे"
"हो" मुलगी किती शिकली, नाव गाव झाले.
"मुलगी सुंदर आहे का? गोरी आहे का?"
"साधारण"
"लांब केस आहेत का?"
"साधारण"
"कंबरेखाली केस नसतील तर आमच्या घरी पायसुद्धा ठेवू नका." च्यायला आता कंबरेखाली केस असतील तर तुमच्या घरी पाय ठेवनार नाही. ही माणसे भागवताचे सप्ताह करायचे.
माझ्या एका मित्राच्या मित्राने लग्न जमत नाही म्हणून सेकंड हँड कार घेतली.गाडी व्यतिरीक्त त्या मुलात बरेच चांगले गुण होते. लग्न झाल्यावर महीन्याभरात खर्च परवडत नाही म्हणून त्याने गाडी विकून टाकली.
माझा एक मित्र मारवाडी होता. त्याच्यासोबत एका मुलीच्या आजोबांना भेटायला गेलो. २००२ मधली गोष्ट
"क्या काम करते हो?"
"सॉफ्टवेअर"
"तुम्हारी कंपनी क्या बनाती है?"
"सॉफ्टवेअर सर्विस"
"वो सब तो ठीक है पर तुम्हारी कंपनी बनती क्या है?" त्या बिचाऱ्याला शेवटपर्यंत कळले नाही.
"छोड जानेदो कितना मिलता है?"
"तीस हजार." माझ्या मनात मित्राचा तिरस्कार, खोटारडा फक्त बावीस मिळत असतानाही तीस सांगतो.
"बस. मै एक लाख देतो हूँ आजाओ मेरे पास." आता मी अवाक
"मुंबइत तुमच्याकडे राहायला घर आहे?"
"भाड्याचे"
"किती मोठे?"
"वन रुम किचन"
"घरात हवा उजेड येतो?"
"हो"
"खिडक्या वगेरे आहेत ना?"
"अर्थातच."
"एकटेच राहता?"
"नाही दोन पार्टनर आहेत."
"लग्न झाल्यानंतरही ते तिथेच राहणार आहेत का?" आता मी काही उत्तर द्यायच्या आतच आमच्या वडीलांचे डोके भणकले.
लग्न ही पहीली अशी घटना असते की तुम्ही तुमच्या सर्कल बाहेरच्या माणसांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करता. खोटे बोलनारेही असतात. लव्ह मॅरेज मधे समोरच्या माणसावर विश्वास असतो इथे तो नसतो त्यामुळे अवास्तव वाटाव्या अशा मागण्या दोन्हीकडून होत जातात, पासबुक पडताळली जातात. इतरही बरीच कारणे आहेत. माझा एक चायनीज मित्र सांगत होता चायना मधे एक मुलगा किंवा मुलीमागे सहा लोकांच्या आशा अपेक्षा असतात. विचार करा तिथली परिस्थिती काय असेल ते? माझा भाउ व्यवसायात होता त्यामळे त्याला मुलीच येत नव्हत्या. शेवटी कोणीतरी भेटलेच तेंव्हा जगात सर्वसाधारण विचार करनारी माणसेही आहेतच तेंव्हा काळजी नसावी.
"कंबरेखाली केस नसतील तर आमच्या घरी पायसुद्धा ठेवू नका."
आपण काय बोलतो आहोत ते या माणसाला कळलेच नसावे. :)
=)) =)) =))
@आपण काय बोलतो आहोत ते या माणसाला कळलेच नसावे. >> =)))))) +++१११
मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्यात याच्याशी सहमत होतानाच अशाच विचित्र अपेक्षा पूर्वी वरपक्षाकडून असत हे विसरता कामा नये. लग्नाचा खर्च, मानपान, ज्या वाहनाने वरपक्ष येणार त्याचा खर्च, सणवार, बाळंतपण एक ना दोन, पैसे पुरवताना (मानसिक दृष्ट्याही) मेटाकुटीस आलेले मायबाप मुलींनी जवळून पाहिलेत. याशिवाय मुलीचा सासरी राबून बुकणा पडतो. तिच्या तब्येतीकडे कोणाचेच लक्ष नसते. ही परिस्थिती आता बदलू पाहतिये. आयुष्यातील बेभरवश्याच्या गोष्टी वाढल्यात. त्यातून नवर्याचा अकाली मृत्यू तर मुलींना पुरते पिंजून काढणारा ठरल्याची उदाहरणे आहेत. पैशासाठी मुलींचे जीव घेतले जातात. याअर्थी पैशाला अतोनात महत्व आधीच्या निदान २ पिढ्यांनी तरी दिलेले मुलांनी व मुलींनी पाहिले आहे. पूर्वी मुलगी कितीही गरीब गाय असली तरी हुंड्यासाठी तिच्या बापास रडवल्याशिवाय मुलगे (किम्वा वरपक्ष) जेवण पचवत नसत. म्हणजे काय तर पैसा भय़्ंकर महत्वाचा असतो हे समाजानेच दाखवून दिले आहे. मनातून पैशाची किंमत मर्यादेपलिकडे नसते हेही जरा विचार केला तर कळू शकत असते. पैशापाठोपाठ येणारा मान हा तर आपण अजूनही बघतोय.
नगरीनिरंजन साहेबांनी सिंगल व डबल इन्कमचा मुद्दा मांडलाय तो बरोबर असला तरी त्यात घरी थांबणारे पती असण्यापेक्षा पत्नीच असण्याची शक्यता जास्त असते. जर एका आमदनीवर घर चालू शकत असेल तर आधी घरकामास पुरेसा मान मिळाला पाहिजे म्हणजे 'घरी बसणे' यातील कमीपणा निघून जाईल व जास्त मुलगे हे करण्यास तयार होतील किंवा मुलींना ते करताना कमीपणा वाटणार नाही. हे चित्र दर पिढी बदलत जाणार आहे.
सहमत.
मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्य आहे. पण अनेक वर्षे मुळात मुलीला अपेक्षा असू शकतात हेच कुणी लक्षात घेत नव्हते. आई वडील, विशेषतः वडील बघतील त्या मुलाशी संसार करायचा असे बिंबवले जायचे. आणि आता जेव्हा त्यांच्या अपेक्षा विचारात घेतल्या जाऊ लागल्या, तेव्हा त्यातल्या अनेक अवास्तव समजल्या जाऊ लागल्या. दर्दैवाने फक्त नोकरी करणे हे स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीक समजले गेले. आणि तरीही पारंपारिक कामे त्या प्रमाणात पुरुषांकडून केली गेली नाहीत. मग निदान पैसा तरी असावा, भविष्य सुरक्षित असावे असा विचार अरेंज मॅरेज मध्ये करणे हा देखील एक विचार होऊच शकतो. जसे मुलाने सांगितले की 'माझ्याकडे आत्ता घर नाही, पण तुझी मदत असेल तर होईल' यावर पटकन मुली तयार होत नाहीत, तसे आजही जर मुलीने लग्नाआधी "मला स्वयंपाक येत नाही. शिकेन हळूहळू पण तुझी मदत तेवढीच हवी" असे सांगितले तर किती मुले तयार होतील. अपवाद आहेतच पण दोन्ही बाजूनी आहेत. हे लहानपणापासून मुले मुली दोघानाही शिकवले गेले पाहिजे की ज्याप्रमाणे मुलीना शिक्षण आणि नोकरीचे स्वातंत्र्य आहे तसेच मुलांनीही घरातली कामे करणे यात काही कमीपणा नाही.
मधुराताई
तुमचा मुद्दा तत्वासाठी बरोबर असला तरी घर आणि स्वयंपाक यात गल्लत होते आहे. स्वयंपाक येत नसेल तरीही दीड दोन हजारात स्वयम्पाकीण मिळेल हो पण ५० लाखाचे घर कसे मिळेल.
नवरा मुलगा जर बायको घरासाठी मदत करायला तयार असेल तर "स्वयंपाकीण ठेवू " म्हणून सहज तयार होईल
माझा मुद्दा फक्त दुसरी बाजु काय असु शकते यावर होता. आणि स्वयंपाक हे केवळ एक उदाहरण, ज्यात सर्वसाधारणपणे बायकोने करावा हे ग्रुहीत धरले जाते. असेच इतरही मुद्दे यात येऊ शकतात जे बायकोने किंवा आईनेच करावे असे गृहीत धरले जाते. आणि मुलगा तयार होईलही कदाचित, पण किती मुलांच्या घरचे यावर तयार होतील? आधी लिहिले तसे अपवाद आहेतच आणि हळुहळु बदल होत आहेत.
आणि मुलींच्या फ्लॅटच्या किंवा पगाराच्या अपे़क्षेवर मी आधीच्या प्रतिसादात पण लिहिलंय की हे मलाही पटत नाही. फक्त इथे प्रतिसादात मुलींचे आईवडील आणि अपेक्षा यावर जी चर्चा झाली, विशेष करुन अरेंज मॅरेज मध्ये, त्यातली ही दुसरी बाजु पण असु शकते एवढेच म्हणायचेय.
माझ्याकडे आत्ता घर नाही, पण तुझी मदत असेल तर होईलआमच्या एका वर्गमैत्रिणीच्या लग्नासंबंधीच्या चर्चेमध्ये एका मुलाने असा प्रामाणिक प्रस्ताव मांडला होता. मुलगा चांगला शिकलेला, इंजिनियर म्हणून पुण्यातील नामवंत कंपनीत काम करणारा. मात्र पुण्यात स्वतःचे घर नाही. तिने नकार दिला. एरवी समंजस वगैरे वाटणाऱ्या तिने असा का निर्णय घेतला असावा हे आम्हाला कळले नाही. नंतरच्या काही गप्पांमध्ये 'त्या मुलाचा माझ्या नोकरीच्या पैशावर डोळा होता' असे तिचे मत असल्याचे आम्हाला कळले. (नंतर चांगल्या पैसेवाल्या, बंगला वगैरे असलेल्या मुलाशी तिने विवाह केला.) असो टू इच हिज ओन.
मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्यात याच्याशी सहमत होतानाच अशाच विचित्र अपेक्षा पूर्वी वरपक्षाकडून असत हे विसरता कामा नये. लग्नाचा खर्च, मानपान, ज्या वाहनाने वरपक्ष येणार त्याचा खर्च, सणवार, बाळंतपण एक ना दोन, पैसे पुरवताना (मानसिक दृष्ट्याही) मेटाकुटीस आलेले मायबाप मुलींनी जवळून पाहिलेत. याशिवाय मुलीचा सासरी राबून बुकणा पडतो. तिच्या तब्येतीकडे कोणाचेच लक्ष नसते. ही परिस्थिती आता बदलू पाहतिये. आयुष्यातील बेभरवश्याच्या गोष्टी वाढल्यात. त्यातून नवर्याचा अकाली मृत्यू तर मुलींना पुरते पिंजून काढणारा ठरल्याची उदाहरणे आहेत. पैशासाठी मुलींचे जीव घेतले जातात. याअर्थी पैशाला अतोनात महत्व आधीच्या निदान २ पिढ्यांनी तरी दिलेले मुलांनी व मुलींनी पाहिले आहे. पूर्वी मुलगी कितीही गरीब गाय असली तरी हुंड्यासाठी तिच्या बापास रडवल्याशिवाय मुलगे (किम्वा वरपक्ष) जेवण पचवत नसत. म्हणजे काय तर पैसा भय़्ंकर महत्वाचा असतो हे समाजानेच दाखवून दिले आहे.थोडक्यात काय आधी त्यांनी सोसलं, आता त्यांनी जरा मिजास दाखवली तर कुठे बिघडलं; असंच ना!! :)
असा अर्थाचा अनर्थ करायला बरा जमतो? आँ? ;)
मिजास मुलाने कींवा मुलीने कोणीही केली तरी घातक आहे. पैशाला अपरंपार महत्व देऊन जे काय भजं होऊन बसलय त्याचा गुंता सुटायला वेळ लालेल. शेवटी ज्या मुलीने हुंडा जमवताना मायबापाला जेरीला आलेलं पाह्यलय तिच्या डोळ्यासमोर मस्त चित्र उभं केलं तर एकदम विश्वास बसत नाही. ज्या आईबापांनी पैशापायी जळलेल्या पोरींच्या आठवणीत रक्ताचे अश्रू ढाळलेत त्यांचा या जन्मात माणूसकीवरही विश्वास बसणे कठीण आहे. पैशाचं महत्व अशा घरांमध्ये वेगळं असतं. भावनाआँको समझो सुडकू!
थोडक्यात काय आधी त्यांनी सोसलं, आता त्यांनी जरा मिजास दाखवली तर कुठे बिघडलं; असंच ना!!अगदी अगदी!!!! हेच आणि एवढेच. अर्थात ज्यांचे अच्छे दिन आलेत त्यांनी खुशाल तोंड वर करून मिरवावे. किती काही लिहिलं तरी त्यात बदल होणारे थोडाच! फक्त अवास्तव समानतेच्या बाता तेवढ्या मारणे थांबवावे.
मुविंचा धागा आहे त्यामुळे हक्काने अवांतर प्रतिसाद देऊ शकतो. संमं मुविंच्या धाग्यावरचे प्रतिसाद नक्कीच ऊडवणार नाहीत (अशी अपेक्षा करतो).
मुलींच्या … अपेक्षा
(वय २८) पाचपट पगार आणि १ बहक घर
लग्न जमले नाही…
(वय ३०) चौपट पगार आणि १ बहक घर
लग्न जमलेले नाही…
(वय ३५) दुप्पट पगार आणि २ बहक घर (???)
अजुनही लग्न जमलेले नाही.
अग, मग २८ ते ३५ मध्ये तु का नाही गं प्रयत्न केलास घर घ्यायचा? हिंमत असेल तर सांग ना, माझे १/२ बहक घर आहे. माझ्या पगारातुन मी कर्जाची परतफेड करत आहे. लग्न झाल्यावर आपण माझ्या घरात राहायला जाऊ. तुझ्या (दुप्पट) पगारात आपण आपला घरखर्च भागवू.
आणखी काही अपेक्षा, मुलींच्या …
ठाण्यात रहाणारी मुलगी मुलुंडला येणार नाही, कल्याणला रहाणारी मुलगी डोंबिवलीला येणार नाही, विलेपार्ले/जोगेश्वरीची मुलगी ठाणे कल्याणला येणार नाही…
अरे, इथे पण माणसेच रहातात ना?
बरेच लिहिले असते (अगदी