मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
प्रतिक्रिया
19 Jan 2015 - 3:06 pm | टवाळ कार्टा
मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह-इनला पर्याय नाही
19 Jan 2015 - 3:53 pm | हाडक्या
याला +१ आणि
टका.. याला +१००
आमच्या मनातले बोललात.!! खरेतर ५ भेटीत पण कोणी मुखवटा घेवून येणार असेल तर त्यालाच नंतर जास्त त्रास असणार नाही का ? (आयुष्यभर त्याच मुखवट्याच्या दबावाखाली राहण्याचे).
म्हणजे असे की दोन्ही बाजूंना दुसरी बाजू नीट जाणून घ्यायची इच्छा असते, त्यामुळे दुसरे ५-५ भेटींसाठी मुखवटेच घेऊन येतील हे काही पटत नाही. (तसेही थोडे HR प्रश्न गाठीशी ठेवावेतच की आपल्याला हवे ते माणूस शोधायला. :) )
19 Jan 2015 - 7:39 pm | आजानुकर्ण
तिला आयटीमधला नकोय तरी तुम्ही पाहिलेला पहिला मुलगा आयटी हमालच होता की!
19 Jan 2015 - 8:11 pm | टवाळ कार्टा
ओ...असे जे बोलून तेच करणारी स्त्री बघितली आहे का कुठे? =))
19 Jan 2015 - 8:16 pm | आजानुकर्ण
हो ना. शिवाय अपेक्षांच्या यादीत तो नंबर १ चा मुद्दा असल्याने मला सर्वात महत्त्वाचा निकष आहे असे वाटले.
19 Jan 2015 - 8:23 pm | टवाळ कार्टा
लोल
19 Jan 2015 - 10:03 pm | मीता
"शक्यतो "असे लिहिलेले आहे. सगळ्याच गोष्टी हव्या तशाच मिळतात असही नाही. तडजोड प्रत्येक ठिकाणी आहेच .पण ती किती आणि कुठे करायची ते कळल पाहिजे .
19 Jan 2015 - 2:10 pm | प्रसाद१९७१
माझ्या मते कसलेही explaination द्यायची गरज नाही. "मुलीची इच्छा आहे नोकरी करायची" इतके पुरेसे आहे.
ह्या पहील्या प्रश्नाच्या उत्तरावरच मुलीनी संभाषण थांबवायला हवे होते.
19 Jan 2015 - 2:14 pm | टवाळ कार्टा
हे खरे कारण असू शकते
19 Jan 2015 - 2:20 pm | प्रसाद१९७१
मी म्हणुनच CCD च्या प्रश्ना नंतर थांबायला पाहीजे होते असे लिहीलय.
19 Jan 2015 - 2:25 pm | टवाळ कार्टा
या वाक्यानंतर मुलालाच विचारायला हवे होते एकदा कि बाबा कुठे भेटायला जमेल...दर वेळी मुलगीच ठिकाण सुचवते आहे असे १ निरिक्षण नोंदवतो
19 Jan 2015 - 2:26 pm | बॅटमॅन
मुलगा य-झ आहे असेही एक निरीक्षण नोंदवतो.
19 Jan 2015 - 6:09 pm | काळा पहाड
बाय द वे, पुढे काय झालं?
19 Jan 2015 - 2:26 pm | मृत्युन्जय
दुसर्या किश्श्यातला मुलगा लहान आहे अजुन. त्याला नक्की कशासाठी भेटायचे आहे हेच कळाले नसावे
19 Jan 2015 - 2:35 pm | मीता
दुसऱ्या किस्श्यातला मुलगा लहान नाही . वय वर्ष 29 . तिच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठा होता.
19 Jan 2015 - 2:42 pm | सूड
मग त्याला तिला भेटायचं नसेल, सगळेच जण फटकळ नसतात. "बाई गं, मला तुला भेटायचं नाही." असं स्पष्ट सांगणं नाही जमत काही लोकांना.
19 Jan 2015 - 2:44 pm | नाखु
पोरगा "बघणेबल" असेल "भेटणेबल" नसावा.
19 Jan 2015 - 2:41 pm | सूड
अजून हे दळण चालूच आहे का? हम्म!!
19 Jan 2015 - 2:43 pm | बॅटमॅन
एव्हरग्रीन\एव्हरलाल विषय आहे. चरचा तर होनारच.
19 Jan 2015 - 2:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता आलाच आहात तर लावा हातभार... कमीत कमी एखादी काडी टाकून तरी. :) (मुविंचा चाय सुलेमानीचा कप अजून संपला नाही ;) )
19 Jan 2015 - 2:54 pm | सूड
असं म्हणता!! बरं!!
धागा आणि प्रतिसाद वाचून एक सहज आपलं मनात आलं बरं का!! एवढे उपद्व्याप, वाढलेल्या अपेक्षा, लग्नाचे खर्च आणि मनासारखं नाही झालं तर परत ते टिकवायची कसरत...येवढं होऊन सुद्धा बाबांनो/बायांनो तुम्हाला वाटेल आणि पटेल तेव्हा लग्न करा असं म्हणणारी एकही व्यक्ती भेटलेली नाही. "अमुक इतकं वय? अजून लग्न नाही?" फार मोठा काहीतरी गुन्हा घडल्याचे भाव आणून अशाच पद्धतीची येणारी आणखी काही वाक्य!! अरे काय चाल्लंय काय!! *dash1*
19 Jan 2015 - 3:00 pm | बॅटमॅन
जाणिवांचा विकास झालेला नस्तो, मग वक्तव्येही अशीच येणार.
19 Jan 2015 - 3:50 pm | सस्नेह
जाणिवांचा विकास झाल्यामुळे वयाचे परिणाम होणे थांबते की काय ?
वेळेत लग्न झाले तर मुले, त्यांची आजारपणे, शिक्षण सेटलमेंट इ. जबाबदाऱ्या शरीरात ताकद असेपर्यंत निभावता येतील, हा विचार, वेळेत लग्न करण्यामागे.
19 Jan 2015 - 3:53 pm | सूड
योग्य मार्गावर चाल्लंय, अजून थोडी फुंकर घातलीत की चारशेची निश्चिंती झाली !! ;)
19 Jan 2015 - 3:58 pm | टवाळ कार्टा
शंकाच आहे संमं ४००+ जायला देतील ;)
19 Jan 2015 - 4:02 pm | सूड
उचलली जीभ, चाटला कडुलिंब !! *nea*
19 Jan 2015 - 4:05 pm | टवाळ कार्टा
गप्रांव...वशाड मेलो ;)
19 Jan 2015 - 4:02 pm | जेपी
तस काय नाय आता,
लोक आणी संम दोघपण काश्मीर ला कंटाळले आहेत.
त्यामुळे धागा 400 काय 700 (सप्तपदी)
पर्यंत गेला तरी चालेल. *biggrin*
19 Jan 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा
700 (सप्तपदी)
खिक्क
19 Jan 2015 - 4:00 pm | बॅटमॅन
लग्न ही अपरिहार्य गोष्ट आहे असे मानणे हेच जाणिवा विकसित नसल्याचे लक्षण आहे.
19 Jan 2015 - 4:03 pm | सूड
बलीवर्दनेत्रभञ्जक!! ;)
19 Jan 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा
+१११११
19 Jan 2015 - 4:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
फूsss... फूsss... फूsss... ;) :)
19 Jan 2015 - 4:25 pm | सूड
असं एका लयीत नका म्हणू....लोक आधीच पुर्षांची मंगळागौर म्हणतायेत, असं लयीत म्हणून फुगडी खेळायचा किंवा घागरी फुंकायचा इफेक्ट येतोय. ;)
19 Jan 2015 - 4:38 pm | टवाळ कार्टा
आयला...काका एकदम जोरात आज :)
20 Jan 2015 - 1:07 pm | टवाळ कार्टा
फूsss... फूsss... फूsss...
20 Jan 2015 - 12:35 pm | सस्नेह
आमच्या जाणीवा पुरेशा 'विकसित' नाहीत !
नैतर आम्ही अजून 'पडीक'च राहिलो असतो *wink*
20 Jan 2015 - 1:53 pm | टवाळ कार्टा
अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा स्पष्टवक्तेपणा
तुम्ही पडीक राहिला असता म्हणजे बाकीचे सुध्धा पडीक रहातील असे कशावरून वाटले =))
20 Jan 2015 - 2:17 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!
20 Jan 2015 - 2:23 pm | टवाळ कार्टा
१४/१५ च्या सत्यनारायणाला आहेस का?
20 Jan 2015 - 2:48 pm | सूड
कोणाच्या लग्नाचा?
20 Jan 2015 - 2:49 pm | टवाळ कार्टा
मुविंच्या...तुला नै बोलावले?
20 Jan 2015 - 2:53 pm | सूड
हायला? परत?
20 Jan 2015 - 3:07 pm | टवाळ कार्टा
मुवि "सत्यनारायण पुजेचे" अॅडिक्ट आहेत...पण या पुजेत तीर्थ-प्रसाद वेगळा अस्तो ;)
20 Jan 2015 - 6:25 pm | सूड
टक्कोजीराव, आपणांस प्रश्न समजलेला दिसत नाहीये. अभ्यास वाढवा!!
20 Jan 2015 - 8:06 pm | टवाळ कार्टा
मुविंचे लेख + प्रतिसादांचा अभ्यास कर मग "सत्यनारायण" कळेल काय ते ;)
20 Jan 2015 - 5:15 pm | सस्नेह
'बाकीचे' हा उल्लेख कुठे दिसला तुम्हाला ?
चोराच्या मनात .... *biggrin*
20 Jan 2015 - 5:29 pm | जेपी
टक्याशी सहमत..
बाकी चोराच्या मनात..
ऐवजी ,
पोराच्या मनात...
हे चपखल ठरेल =))
20 Jan 2015 - 8:07 pm | टवाळ कार्टा
याचाच अर्थ तुम्ही आत्ता पडिक नाही पण बाकीचे आहेत
19 Jan 2015 - 4:23 pm | सुखी जीव
त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात --------
ह्याच गोष्टी आजकाल वाढल्या आहेत असच काथ्या कुटणे चालू आहे ना
19 Jan 2015 - 4:26 pm | जेपी
धागा आला तिनशे पाशी,
धागा आला तिनशे पाशी,
19 Jan 2015 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
३००
अहो मुवि.... उठा, उठा आता (तरी) !
19 Jan 2015 - 4:34 pm | अजया
जेप्याने काही सत्कार केला नाही ३००+ चा!!
सर्व लग्नेच्छुक मुलामुलींच्या काळजाला हात घालणार्या धाग्याची तीन शंभरी भरल्याबद्दल मुविंचा सत्कार करण्यात येत आहे.पाचशेसाठी आगावु शुभेच्छा!!
19 Jan 2015 - 4:39 pm | बॅटमॅन
सगळे संपादक दुष्ट आहेत. ५०० प्रतिसाद आजवर एकदाही करू दिलेले नाहीत. अगदी त्या इंच इंच वाल्या धाग्यावरही ४७४ च प्रतिसाद आहेत. अजून २६ प्रतिसादांनी काय झालं असतं? अच्रत मेले :(
19 Jan 2015 - 5:02 pm | अभ्या..
हा आपी. लैच दुश्ट ग्यांग हाय. त्या स्पावड्याच्या धाग्यावर डॉक विंजीनेराइरुध्द आवाज ऊठवू देत नैत. आयटीवाल्याइरुध्द आवाज उठवू देत नैत. काय क्रावं ब्रं अमी ग्रिबांनी. :( :(
21 Jan 2015 - 12:06 pm | कोमल
बरे विंजीनेर आन आयटीवालेच दिसतात का तुमाला.![](http://www.pic4ever.com/images/vahidrk.gif)
बाकि कै विषय नैत का जगात उखाळ्या-पाखाळ्या काडायला
21 Jan 2015 - 3:36 pm | सविता००१
:)
कित्ती दिवसांनी तुझी कमेंट. एकदमच राग आला वाटतं!! ;)
21 Jan 2015 - 5:08 pm | कोमल
खिक्क..
नै ग तै.. कंटाळलेले जरा इतकचं! ;)
19 Jan 2015 - 4:51 pm | जेपी
हा धागा वाचल्यानंतर एक विचार चमकुन गेला.
मालकांना विनंती "
मिपा वधु-वर सुचक मंडळ" अशी उपशाखा चालु करावी.
किमान आमच्या टक्याचा तर फायदा होईल. *wink* *blum3* *biggrin* =)) :-( :-)
19 Jan 2015 - 4:55 pm | सूड
हुस्श!! टक्याला कुणीतरी 'आमचा' म्हटलं!!
19 Jan 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा
जळ जळ
19 Jan 2015 - 5:08 pm | जेपी
'आमच्या' म्हटल आहे,
'आमचा' अस नाही.. *beee*
अवांतर-धाग्याची 400 कडे वाटचाल सुरु झाली.
जरा पारंपारीक टोटके द्यावे म्हणतो मुली पटवायचे.
19 Jan 2015 - 5:09 pm | टवाळ कार्टा
मला व्यनीतून पाठव...
19 Jan 2015 - 4:58 pm | विटेकर
धागाकर्त्याने हे ध्यानी घ्यावे
प्रतिसाद सख्या हे यात कुठे ओलावा
कोठून मुली-परी जोडीदार मिळावा
घालूनी व्यर्थ ही धाग्याची चारोळी
वाहिल्या तुजला प्रेमाने चार - ओळी
संम ने ध्यानात घ्यावे .. हा धागा आम्ही ५०० वर नेणारच !!
नेणार नेणार नेणार हा धागा पाचशेवर
करणार करणार करणार नवा विक्रम मिपावर
संपादकांनी ठेवावीत काही काळ डोई गहाण
तरच ठरेल काश्मिरासम हा ही धागा महान
आंतरजालीय इतिहासात एक नवे सुवर्ण पान
संपादकानी लिहू द्यावे आम्हांसाठे हे एक पान
"अच्रत बावलत" येऊन गेले , सहमत झाले + एकने
अजून येतील थांबा थोडे "बाडिस" आणि "रच्याकने"
जटील आहे खरी समस्या उत्तर याचे नसेच एक
कुणास ठाऊक? उत्तर याचे वर्गमूळातील वजा एक
- धागा कर्त्यास समर्पित
19 Jan 2015 - 5:04 pm | टवाळ कार्टा
कट्टाकिंग मुविंचा धागा ५०० प्रतिसाद पाहो
आमेन
22 Jan 2015 - 6:17 pm | पैसा
आवडले!
19 Jan 2015 - 5:54 pm | कपिलमुनी
आमचे पूर्वज कि नै , लै लै शहाणे !
बालविवाह हा या समस्यांवरील उपाय आहे ! ( म्हणजे १० पोरा व्हायला पुरेसा वेळ पण मिळेल )
19 Jan 2015 - 6:17 pm | काळा पहाड
पूर्वीच्या गोष्टी फारच छान होत्या हो.. बालविवाह, राक्षसविवाहाला मान्यता, द्विभार्या प्रतिबंधक कायदा नसणे, स्वयंवरासारखे वेळखावू नसलेले प्रकार..
बाकी सध्या पण स्वयंवर असतं तर एकाच दिवशी आठ आठ स्वयंवरं अटेन्ड करता करता नवर्या मुलांचा पिट्टा पडला असता.
19 Jan 2015 - 7:35 pm | धर्मराजमुटके
गाडी, बायको आणि मोबाईल च्या बाबतीत एक मित्र म्हणतो की प्रत्येकाला नेहमी वाटते की थोडा और रुक जाता तो अच्छा / लेटेस्ट मॉडेल मिल जाता. पण हे अनुभव बघितल्यावर वाटते आपले जुने मॉडेलच चांगले !
19 Jan 2015 - 8:04 pm | हाडक्या
अहो, जेव्हापासून हे स्मार्ट-फोन, स्मार्ट-कार आणि स्मार्ट-पोरी झालेत ना तेव्हापासून असेच वाटतेय की गड्या अपुला जुना फोन बरा, जुनी कार बरी आणि ... (सुज्ञास अधिक सांगणे न लगे) :)
19 Jan 2015 - 8:07 pm | सूड
पोरं स्मार्ट कधी होणार गॉड ओन्ली नोज!!
-देवरुखकर मास्तर
बटाट्याची चाळ.
19 Jan 2015 - 8:17 pm | धर्मराजमुटके
आतापर्यंत नोकीया आशा ३०२ चा क्वेर्टी की वाला फोन वापरत होतो. स्मार्टफोन घेतला पण वापरायला फारच कटकटीचा वाटतो. एकतर पहिले कवर उघडा, नंतर पासवर्ड टाका, नंतर उंगल्या करुन हवे ते फंक्शन निवडा. शिंची कटकट. जुनाच फोन बरा असे वाटायला लागलेय.
19 Jan 2015 - 8:22 pm | काळा पहाड
मी दोन मोबाईल फोन ठेवतो. एक म्युझीक साठी (कीबोर्ड वाला), दुसरा फोन म्हणून (स्मार्ट फोन). स्मार्ट फोन खरेच तापदायक आहे पण त्याचे फंक्शन कीबोर्ड फोन मध्ये नाहीयत. बाकी या उदाहरणाचा लग्नाशी संबंध जोडू नये.
19 Jan 2015 - 8:29 pm | धर्मराजमुटके
पण माझ्यासारख्या स्मार्ट नसलेल्या माणसाचे काम साध्या मोबाईलवर चालून जाते. माझ्या आधीच्या नोकीया फोनमधे मेल, व्हाटसअप आणि कॉलींग हे मला हवे असलेले सगळे फीचर्स होते. पण दुर्दैवाने तो पडला. आता बाजारात क्वेर्टी फोन मिळतच नाहित. Blackberry घ्यावा तर त्याला Blackberry सर्विस घ्यावी लागतेय. आता आमच्यासारख्या स्मार्ट नसलेल्या माणसांनी काय करावे ?
20 Jan 2015 - 12:00 pm | सुबोध खरे
स्मार्ट व्हा कि!
कोण नको म्हणतय. एकदा स्मार्ट फोन वापरून पहा त्याचा किती फायदा आहे ते.
20 Jan 2015 - 6:51 pm | धर्मराजमुटके
प्रयत्न चालू आहेत
19 Jan 2015 - 8:28 pm | मेघनाद
सध्या लग्न हा विषय उभयातांसाठी "दोन मनाचे मिलन","एक पवित्र रिश्ता" वगैरे राहिलेला नसून निव्वळ एक डील राहिलेले आहे. (हे माझ वैयक्तिक मत आहे.)
रग्गड पैसा, स्वताचे घर (तेही व्यवस्थित मोठे बरं का), काही बाबतीत दोन-चारचाकी हि सर्व लग्नासाठी लागणारी भांडवलं आहेत. ज्या पामराकडे ह्यातील काही नाही (किवा एखादं भांडवल नाही) तो सध्या नालायक ठरत आहे लग्नाच्या बाजारात. मग मुलाचे/मुलीचे आई-वडील किवा मुलगा/मुलगी स्वतः कितीही सुस्वभावी वगैरे असले तरी त्याला काहीही किंमत नाही.
वरील सर्व अनुभव मुलगी आणि मुलगा दोघांच्या बाबतीतले सध्या अगदी जवळून बघतो आहे नात्यात म्हणून बिनधास्त लिहिलंय एवढ. अगदी मुलींच्या बाबतीत सुधा काही वर कुटुंबांकडून वरील अपेक्षा थोड्या फार प्रमाणात केल्या जातात सध्या. बाकी माझ लग्न झालेलं आहे आणि अतिशय सुस्वभावी पत्नी आहे माझी, माझ्या आई आणि पत्नी मध्ये आई-मुली सारख नात आहे.
जर का मुलगा १५-२० हजार कमावत असेल आणि तो बारावीच शिकला असेल तर त्याने लग्न करूनच नये का?
19 Jan 2015 - 8:34 pm | आजानुकर्ण
अहो पहिल्यापासनंच ते डील आहे. उगीच दोन मनांचे मीलन वगैरे सुधीर फडके-अरूण दाते ष्टाईलच्या मध्यमवर्गीय भावगीती कल्पना आहेत. पूर्वी राजेरजवाडे आपला गोतावळा वाढवण्यासाठी लग्नं करत. शिवाजीराजांनीही लग्ने करुन वेगवेगळ्या ठिकाणी सोयरीक केलीच की. त्याच्याकडे तसंच बघायचं.
बाकी माझंही लग्न झालेलं आहे आणि अतिशय सुस्वभावी पत्नी आहे माझी, माझ्या आई आणि पत्नी मध्ये सासू-सुनेसारखं नात आहे.
19 Jan 2015 - 11:20 pm | सुबोध खरे
मेघनाद साहेब
१०-१२००० मिळवणार्याला सुद्धा बायको मिळतेच. पण सुंदर, सुस्वभावी, सुशील, भरपूर कमावणारी अशी मुलगी कशी मिळेल? दोन दात पुढे असलेली अंमळ आडव्या अंगाची अशी मिळते. आता तुमची अपेक्षा जर दीपिका पदुकोणची असेल तर कसे चालेल?
किंवा हिडींबा आणि शूर्पणखा असलेल्या जॉन अब्राहमशी लग्न करण्याची अपेक्षा करतात बरेच दिवस सायडिंगला पडल्यावर गपचूप जॉनी लिव्हरशी लग्न करतात नाहीतर आजकाल चांगली मुलं आहेतच कुठे म्हणून समस्त पुरुषजातीला शिव्या देत स्त्री मुक्तीचे गोडवे गातात.
बर्याच वेळेला दोन्ही बाजू हे ध्यानात घेत नाहीत. म्हणून हा असा प्रश्न उभा राहतो.
मुद्दा पुढे रेटण्यासाठी जर अतिशयोक्ती केली आहे. परंतु संसार चांगला होण्यासाठी दोघात सामन्जस्य असणे जास्त आवश्यक आहे. बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.
20 Jan 2015 - 12:24 am | मेघनाद
खरे साहेब
अगदी हेच म्हणायचय मला पण. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुण-दोष ह्याला प्राधान्य देणे जास्ती आवश्यक वाटत मला लग्नाच्या बाबतीत. पैसा आणि प्रतिष्ठा नक्कीच महत्वाची आहे पण त्याचा अतिरेक होऊ नये अस मला वाटत.
20 Jan 2015 - 1:03 am | मेघनाद
आणि कृपया साहेब म्हणू नका....अतिशय सामान्य मानव आहे मी.
20 Jan 2015 - 8:13 pm | सुबोध खरे
खरे साहेब
मला साहेब म्हणताय आणी वर साहेब म्हणून नका म्हणताय.
कि आजकाल आम्ही "कुणालाही" साहेब म्हणतो तसे "खरे साहेब" म्हटले आहे
20 Jan 2015 - 11:59 pm | मेघनाद
हाहाहाहा...नाही हो तास अजिबात नाही.....तुम्हाला साहेब अगदी मनापासून म्हटलय.
20 Jan 2015 - 12:26 am | कपिलमुनी
अरे पोरांनो ,
ती मातोंडकरांची उर्मिला आहे बघ रे लग्नाची !
हवा असेल तर यांना विचारून शब्द टाकते ;)
20 Jan 2015 - 1:05 am | मेघनाद
अंमळ उशीराच झाला....अलीकडेच लग्न झाल माझ.
20 Jan 2015 - 11:23 am | टवाळ कार्टा
विचारा विचारा....मला चालेल ;)
20 Jan 2015 - 11:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मुनिवर तेवढं जरा बसुंच्या बिपाशाकडे शब्द टाका की माझ्यासाठी. किमानपक्षी आपल्या मराठमोळ्या ताम्हनकरांच्या सईला विचारा (लग्नं झालं तिचं :( )
20 Jan 2015 - 11:59 am | विटेकर
याचे वर्गमूळातील वजा एक ... या माझ्या प्रतिसादावर एक ही उपप्रतिसाद आला नाही त्याबद्दल णिषेद !
" जुन्या सदस्यांसाठी मिपा संकेतस्थळ अडचणीचे ठरत आहे काय ? " असा धागा काढण्याच्या विचारात आहे.
.
.
.
.
.
.
.
जिथे कोणतेच "संकेत" पाळले जात नाहीत त्याला "संकेतस्थळ" का म्हणावे ? याचा खुलासा होईल का ?
20 Jan 2015 - 12:15 pm | विटेकर
लग्न ही एक अत्यंत गंभीर बाब आहे, थिल्लरपणा करायची नव्हे ! त्यामुळे दोन माणसे , दोन कुटूम्बे आणि समस्त समाजाचा फायदा अथवा तोटा होत असतो याचे सहभागी मंडळीनी भान ठेवायला हवे.
डॉक्टर साहेब म्हणतात ते खरेच आहे , रुप, पैसा, शरिर यष्टी, प्रतिष्ठा या अत्यंत दुय्यम बाबी आहेत.
आयुष्याच्या पर्फोर्मन्सचा ग्राफ सरळ रेषेत वर जात नाही .. सतत खाली-वर होतो , त्यावेळी डो़के जागेवर ठेऊन समंजसपणे साथ देणारा जोडीदार असणे ही लग्नाची उपलब्धी असली पाहीजे. हा करार नसून समर्पण आहे. असे समर्पण करणारा जोडीदार असेल तरच लग्न यशस्वी होते. ते परस्पर समर्पण जितके अधिक तितके लग्न अधिक यशस्वी! रुप पैसा,प्रतिष्ठा, नोकरी , मुले-बाळे , रुप या सार्या बाबी खरोखर अत्यंत गौण आहेत.
( मी समर्पण हा शब्द वापरला ... त्याग नाही ! त्यागा मध्ये मी त्याग करतो / करते ही भावना असते , समर्पणात मी- तू हे द्वैत रहात नाही )
३०-३५ वर्षे संसार केल्यावरही मुला-मुलींच्या आई- बापाना ( विशेषतः आयांना ) हे समजत नाही हेच फार मोठ्ठे आश्चर्य वाटते मला ! आणि मी करून दाखवीनच या अविर्भावाने आया लेकीचा संसार करायला सरसावतात आणि विवेक आणि स्वास्थ्य हरवून बसतात.
आपल्या पूर्वसुरींनी फार जाणीवपूर्वक शब्दरचना केली आहे - "लोपा-मुद्रा !" असे समर्पण असेल तर आयुष्य यशस्वी होणारच !
20 Jan 2015 - 12:20 pm | टवाळ कार्टा
सग्गळे हेच्च बोलतात हो...पण जर खरोखर असा प्रयत्न करायला गेलो तर समोरच्याची पारख कशी करावी याची काही चेकलिस्ट आहे का?
अवांतर - अशी चेकलिस्ट मी बनवायच्या प्रयत्नात आहे...जर कोणी आधी बनवली असेल (बहुतेक "प्रगो" किंवा "प्रसाद१९७१" यांनी आधीच बनवली आहे) तर प्लीज मला व्यनीतून पाठवावी...यावर १ लेख लिहून मिपावर प्रकाशीत करायचा विचार आहे
20 Jan 2015 - 1:00 pm | सुबोध खरे
ट का शेट
हि पारख कशी करावी याला दुर्दैवाने नक्की कोणतेच आडाखे नाहीत. बायकोचा/ नवर्याचा स्वभाव कसा आहे यावर होणारा संसार किती सुखाचा होईल ते अवलंबून असते. पण स्वभाव कसा पारखायचा? आपण दुसरी व्यक्तीची पारख किती चांगली करू शकतो यावर हे अवलंबून असते. बर्याच वेळेस बाकी इतर माणसे मुलगा/ मुलगी बघायला येतात त्यांचे प्रांजळ मत या कार्यक्रमा नंतर घ्यावे. कारण एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुलगा/ मुलगी हे त्यावेळी त्यांचा दाखवण्याचा सर्वात महत्त्वाचा मुखवटा घालून आलेले असतात. ( हीच गोष्ट प्रेमविवाहातहि सत्य आहे) जोवर प्रत्यक्ष लग्न होत नाही तोवर खरे स्वभावाचे पैलू समजत नाहीत. त्यामुळे मुलगा/ मुलगी जे बोलतात ते फार बारकाईने आणि काळजीपूर्वक ऐकावयास पाहिजे.छिद्रान्वेषी असणे यावेळेस फायद्याचे ठरते. आपल्याला मुलगी नोकरी न करणारीच हवी असेल आणि मुलीचा रोख तसा नसेल तर स्पष्टपणे या गोष्टी बोलणे आवश्यक आहे. मुळात बहुसंख्य मुलामुलींना नक्की काय हवे आहे हेच स्पष्ट नसते. मुलगा/ मुलगी बरी वाटली म्हणून लग्न केले तर आयुष्य "बरे" जाईल त्यापेक्षा चांगले नाही.
चेकलिस्ट हि प्रत्येकाने स्वतःला हवी तशी बनवणे आवश्यक आहे दुसर्याला आवडेल अशा मुलीशी (/ मुला) तुम्ही लग्न कराल काय? पण काही मुद्दे ठरवणे आवश्यक आहे यात १) MUST HAVE २) SHOULD HAVE ३) WOULD BE DELIGHTED TO HAVE असे ठरवावे. यात मुद्दा १ मध्ये तडजोड नाही हा केक आहे मुद्दा २ हे आईसिंग आहे आणी मुद्दा ३ म्हणजे वरची चेरी. तुम्हाला तिन्ही मिळाले तर सोन्याहून पिवळे.
बापरे लिहिता लिहिता फारच लिहून गेलो
असो. BEST OF LUCK.
20 Jan 2015 - 8:07 pm | टवाळ कार्टा
u hit bulls eye
एक्झक्टली मी हेच बनवले आहे...पण नुकतेच २-३ अनुभव असे आलेत की आपणच जास्त प्रश्न विचारणारे, जास्त अपेक्षा असणारे ठरतो...ते सुध्धा very well educated मुलीकडून
तिला अपेक्षा विचाराव्या तर १० पैकी ८ वेळा "we should feel connection" असे उत्तर येते (ज्यात काहीच चुकीचे नाही) पण "हे connection चे feeling आहे की नाही हे कसे ठरवणार ग तु" असे विचारले तर "माहीत नाही...बघू" असे उत्तर येते![headbang](http://fun.resplace.net/Emoticons/Angry/BangHead.gif)
20 Jan 2015 - 8:28 pm | सूड
अशा व्यक्तींच्या पत्रिकेत नेपच्युन स्ट्राँग असतो 'म्हणे'.
20 Jan 2015 - 1:17 pm | जेपी
कुणाचा सत्कार करावा ?
20 Jan 2015 - 8:07 pm | टवाळ कार्टा
खिक्क...कुणाकुणाचा असे विचारायचे आहे काय? ;)
20 Jan 2015 - 3:06 pm | विटेकर
डॉक्टर साहेबांशी बाडीस !
१. हा फार विवादास्पद विषय आहे पण पत्रिका जुळत असेल तर शक्यतो स्वव्हाव जुळतात असा वैयक्तिक अनुभव आहे . पण हा ठोकताळा आहे कन्फर्मेटरी टेस्ट नव्हे !
२. प्रेमविवाह नसेल तर शक्यतो घरी पसंत असलेलीच मुलगी करावी. ९९% घरात आपण कसे आहोत आणि आपल्याला नेमके काय चालेल/ आवडेल हे आपल्यापेक्षा आपल्या आईला अधिक चांगले समजत असते. घरच्यांच्यात मतभेद असतील तर आ़ईचे ऐकावे.अर्थात अपवाद असू शकतील.
३. प्रेम विवाह नसेल तर - शक्यतो मुलगी जातीतीलच करावी. परजातीतील केली तर फार बिघडत नाही पण काही वेळा कंगोरे त्रास देतात,त्याची तयारी हवी. रोजच्या जगण्याच्या त्रासात तो एक जादाचा त्रास होऊ शकतो. पण स्मूथ गोईन्ग हवे असेल तर जातीतील करावी. किमान काही संस्कार - विचारपद्धतीमध्ये समानता असण्याची शक्यता असते. अर्थात यात ही ठोकताळाच आहे. कन्फर्मेटरी टेस्ट नव्हे.
त्याशिवाय डो़क्टर साहेबांनी सांगितलेल्या टेस्ट आहेतच ! त्याचे परिंमाणदेखील ठोस असायला हवेत.आपण पुरेसे होमवर्क केलेले असायला हवे. चांगला स्वभाव म्हणजे नेमका कसा ? याची आपली संकल्पना पुरेशी स्पष्ट हवी. ( आपण बरे आपले बरे असा जोडीदार ही काहींसाठी चांगला तर काहिसाठी "एकलकोण्डा" असू शकतो. तर मिळून मिसळून असणारा खेळ्कर अथवा लाऊड असू शकतो ) आपल्याला आयुष्यात नेमके काय मिळवायचे आहे याची आपली यादी आणि त्याची टाईमलाइन ( मिशन स्टेट्मेन्ट) ही निश्चित असायली हवी. त्याचे चार आयाम स्तीफन कोवे ने सांगितले आहेत ( मी / माझा व्यवसाय / माझे कुतुम्ब/ समाज-देवकारण-अध्यात्म) म्हणजे तसे घडेलच असे नाही पण काही एक निश्चिती हवी आणि हे सगळे मोकळे पनाने बोलण्याची पारदर्शकता हवी. म्हणजे समजा तसे घडले नाही तर एकमेकासोबत उभे राहण्याची तयारी असते.
आणि कधीकधी एका क्षणात हे सगळे घडून जाते .. अक्षरशः शब्दावाचून कळले सारे ..!
माझ्याबाबतीत असेच झाले थोडेसे ! रितसर पोहे खाणे झाल्यावर मंडळी आम्हाला दोघांना तिथेच सोडून पांगली.
मी माझा पूर्ण परिचय करून दिला ( त्या काळात खूप मुलाखती दिल्या नोकरी साठी त्यामुळे त्याची बर्यापैकी तयारी होती ) १५ मिनिटे मीच बोलत होतो अखंड ! मग लक्षात आले ती काहीच बोलत नाही .. म्हनून म्हंट्ले .. तुझ्याबद्दल काहीतरी सांग .... ,
म्हणाली , "सांगण्यासारखे इतके काही नाहीच माझ्याकडे .. मी फारच सामान्य आहे !"
" तरी पण काहीतरी असेलच ना ? काही खास आवड वगैरे ? ...
" तसे खास नव्हे पण मला पाठांतराची आवड आहे .. "
"अरे वा ! काय काय पाठ आहे ? "
"गीता १८ अध्याय "
"पण १२ वा / १५ वा पाठ करतात , माझाही १२ वा पाठ आहे , १८ वा का पाठ केलात ?"
" तसं नव्हे , माझे १ ते १८ पाठ आहेत, शिवाय श्री सूक्त, शनीमहात्म्य, शिवलिलामृत ..वगैरे ...."
मी जागेवरून उडालो .. स्वतःलाच शाबासकी दिली , म्ह्ट्ले लेका लकी आहेस .. घे चान्स .
संभाषण संपले , पुढच्या १८ दिवसात डो़क्यावर अक्षता !
निवड चुकली (असे अजून मला तरी ) वाटत नाही !
20 Jan 2015 - 5:26 pm | टवाळ कार्टा
तुम्हाला खरोखर लॉटरी लागली मग...पण १०० पैकी किती जणांना एका भेटीतच असा अनुभव येईल
जाता जाता १ निरिक्षण...तुमच्या बाबतीत कदाचित तुमच्या मुलीकडून कमी अपेक्षा होत्या म्हणून पटकन सूर जुळले :)
20 Jan 2015 - 5:40 pm | पिलीयन रायडर
अरेंज मॅरेज हा जुगारच आहे.. ह्याचं फार भयानक उदाह्रण कालच पाहिलय.. १ महिना झालाय लग्नाला आणि घटस्फोट घ्यायचा म्हणुन मुलगी अचानक घरातुन निघुन गेली, काहिही न साम्गता सवरता.. का तर दुसरा मुलगा आवडतो (जो तिला आधीच स्पष्ट नाही म्हणाला आहे..) एवढं धाडस लग्नाआधी दाखवलं असतं तर एका मुलाच आयुष्य बरबाद नसतं झालं.. आणि हो मुलगा आयटी मधला, भरभक्कम पगार आणि होम लोन उसगावात जाऊन आल्याने "निल" केलेला आहे..
20 Jan 2015 - 6:48 pm | सौंदाळा
अगदी अश्शीच केस (१ महिन्यात घटस्फोटाची) प्रेमविवाहाबाबत माझ्या मित्राचीच झाली आहे.
लग्नाला १ महिना झाला आणि घट्स्फोट!! अजुन हा मित्र ताळ्यावर आला नाही, फोन बंद / उचलत नाही, फेसबुक अकाउंट डिलीट केले आहे. नक्की काय झालय कळायला मार्ग नाही.
माझ्या अजुन एका डॉक्टर मित्राचा (माझा शाळामित्र) प्रेमविवाहानंतर ६ महिन्यात घटस्फोट झाला, मागच्या वर्षी त्याचे दुसरे लग्न झाले. आधीचे लग्न आंतरजातीय (ब्राह्मण - मराठा) होते. क्षुल्लक कारणावरुन भांडण होऊन घटस्फोट झाला असे तो म्हणाला.
माझ्या मते प्रेमविवाहात आधीच ओळख असल्यामुळे काही केसेसमधे जोडीदारावर हक्क गाजवण्याची प्रवृत्ती येते लग्नाशी सगळे गुडी गुडी, ग्गोग्गोड असल्यामुळे आधी मस्त असते पण नंतर एकत्र राहायची वेळ येते तेव्हा खटके उडाले तर ताणुन धरण्याचा स्वभाव अजिबात नसतो आणि अशा क्षुल्लक भांडणांची निष्पत्ती घटस्फोटात होते. मात्र अॅरेंज मॅरेजमधे लग्नानंतर लगेचच कडाक्याची भांडणे होत नाहीत जोडीदाराच्या बर्याच गोष्टी पटल्या नाहीत तरी बरेच जण सबुरीचे धोरण घेतात एकमेकांना ओळखत-आजमावत असतात आणि या काळातच भांडणे विरुन (म्हणजे कडवट्पणा न राहणारे भांडण ;)) एकमेकांबद्दल प्रेम / आदर वाढीला लागतो. या स्टेजनंतर साधारणतः पुढे वैवाहिक आयुष्यात कितीही भांडणे झाली तरी विशेष काही बिनसत नाही
अर्थात तुम्ही वर सांगितलेली केस तर आता अरेंज मॅरेजमधे इतकी कॉमन झाली आहे की दर १०/१५ लग्नांमधुन एकदा तरी अशी घटना ऐकायला मिळतेच.
20 Jan 2015 - 9:25 pm | आजानुकर्ण
इथे तर अरेंज मॅरेज ऐवजी लवमॅरेज बरे हे मान्य झाले होते. आता तुम्ही लवमॅरेजचे काही प्रश्न उपस्थित केले. मजा आहे.
21 Jan 2015 - 10:53 am | पिवळा डांबिस
सौदाळ्याच्या आणि सरंग्याच्या दृष्टीकोनात फरक हा असणारच ना! :)
सौंदाळ्या, कृ. ह. घेणे!
21 Jan 2015 - 10:59 am | सौंदाळा
हलकेच घेतले आहे काकाश्री
काळुंद्री प्रेमी सौंदाळा
20 Jan 2015 - 8:07 pm | टवाळ कार्टा
बहुतांश वेळेस घरच्यांच्या दबावात येउन लग्न केले की असे होते
12 Jun 2016 - 3:11 am | पुष्कर जोशी
ह्या सगळ्या प्रश्नाची उतारे शोधणे सोपे नाय ... बर्याचदा स्वतःचा स्वतःवर अभ्यास नसतो ... बर्याचदा आपण दुनिया (इतरांचे स्वभाव) पाहिलेली नसते ...
काही तरी रामबाण एकाच उपाय हवा ... Love at First Site वगैरे ... कूछ कूछ होता ही वगैरे ?
20 Jan 2015 - 7:58 pm | हाडक्या
अखेर, ३६८ प्रतिसादांनंतर धागा थंड पडाला का ? वधु आणि वरांच्या (आणि त्यांच्या मित्रमंडळी व नातेवाईकांच्या) अपेक्षा फकस्त ३६८ प्रतिसादात मांडून झाल्या काय ?
अर्रे उठा ... जागे व्हा... *diablo*
20 Jan 2015 - 8:20 pm | आजानुकर्ण
काही कॉम्प्रमाईज न करण्याची तत्त्वे सोडली तर बाकी बायकोचे ऐकले की लग्न टिकण्याची शक्यता बरीच जास्त असते. Women and cats will do as they please, and men and dogs should relax and get used to the idea.
20 Jan 2015 - 8:31 pm | टवाळ कार्टा
म्हणजे थोडक्यात "शुध्ध बैलोबा" होणे
20 Jan 2015 - 8:38 pm | आजानुकर्ण
चॉईस आहे. एक तर लग्न टिकावे असे वाटण्यासाठी बैल होऊ शकता किंवा लग्न मोडावे असे वाटण्यासाठी गाढव. :p
20 Jan 2015 - 8:44 pm | जेपी
बैल किंवा गाढव होण्यापेक्षा माणुस होणे चांगले. *wink*
20 Jan 2015 - 8:46 pm | आजानुकर्ण
हो ते मान्य आहेच. (आणखी थोडे प्रतिसाद येऊ द्या राव)
20 Jan 2015 - 8:42 pm | सुबोध खरे
ट का शेट
बायका नवर्याचे पहिल्या वर्षात पाणी जोखतात. नव्या नवलाईत नवरे पण बायकांच्या तालावर नाचतात. एकदा बायकोने पाणी जोखले आणि डोक्यावर बसली कि परत उतरत नाही. तेंव्हा उगाच पहिल्या वर्षात बायकोला जास्त खुश करायला जाऊ नका. आपला सी आर/ एप्रेजल वगैरे लक्षात ठेवा. जोवर बायकोचा पर्फ़ोर्मन्स चांगला येत नाही तोवर जास्त लाड केलेत तर बायको डोक्यावर बसलीच. मग तुमचा नंदीबैल व्हायला वेळ लागणार नाही.मग मान कितीही हलवा बायको डोक्यावरून उतरत नाही
20 Jan 2015 - 9:02 pm | हाडक्या
अरारारा.. अत्यंत स्त्रीद्वेष्टा प्रतिसाद.. णिशेध .. णिशेध .. अगदी त्रिवार णिशेढ ..!!
20 Jan 2015 - 9:08 pm | सूड
ऑस्शं नॉऽऽऽ कलाच्चं!! ऑपन उन्हात घल बांदु हॉ!! उगी..उगी!!
21 Jan 2015 - 4:11 pm | हाडक्या
अहो सूड भौ,
हे डॉक ना सांगायला काय होतय, त्यांची गाडी आता पाचवा गिअर टाकून निवांत चालली आहे. आमचे लग्ना नंतरचे पहिलेच वर्ष आहे आणि बायको पण मिपावर आहे.
आता तिने हे वाचून असा विचार केला की हेच vice versa पण लागू होते (आणि लागु करुयात) तर झालेच की कल्याण हो...!! ;)
समजले ? म्हणून अशा विचारांचा मुळातच णिशेढ करायला हवाय आणि आम्ही तो सर्व ताज्या ताज्या लगीन झालेल्यांच्या वतीने करतो आहोत..
21 Jan 2015 - 4:15 pm | टवाळ कार्टा
बायकोला तिची सवत दाखवलीतच कशाला...आता भोगा :P
20 Jan 2015 - 9:50 pm | टवाळ कार्टा
सर
हे माहीत आहे (बर्याच मित्राचे अनुभव बघितले आहेत ;) )
माझ्याकडे तर अजुन वाईट परिस्थिती आहे...माझ्या आई-बाबांना मुलगी हवी होती त्यामुळे घरात ३ विरुध्ध १ असा मामला असणार भविष्यात :(
20 Jan 2015 - 11:29 pm | खटपट्या
टका !!
थोडं स्वानुभवावरुन सांगतोय की लग्नाचे दुसरे नाव अॅडजस्ट्मेंट आहे. लग्न अॅरेंज असो वा प्रेमविवाह, दोघांना स्वतःमधे बदल करावेच लागणार. "हा मी असा आहे, पटलंतर बघ" हा पवित्रा मतभेदाचं कारण होवू शकतो.
21 Jan 2015 - 10:30 am | टवाळ कार्टा
१००% मान्य पण कोणत्या मुद्द्यांवर अॅडजस्ट्मेंट करू शकतो आणि कोणत्या नाही हे मुलाला आणि मुलीला क्लीअर असावे"च"
21 Jan 2015 - 7:20 am | कंजूस
एक जोडपे हनिमूनला माउंट अबूला जाते. अर्थातच दोघेजण आपापल्या मित्रमैत्रिंणींचे सल्ले घेऊनच. साईट च्या टुअरमध्ये पहिल्या पॉइंटला मुलगी बसमधून उतरत नाही म्हणून तोही तिच्याजवळ बसून राहतो. दुसऱ्या पॉइंटलाही तेच होते. तिसऱ्याला तो म्हणतो तू बस, मी पॉइंट पाहून येतो, मला आबू पाहाचय.
20 Jan 2015 - 11:33 pm | सुजल
हा डस्टबिनवाला डायलॉग गेले दोनएक वर्ष फेसबुक वर वाचते आहे . फार फेमस आहे हा मुलीचा डायलॉग ( कित्येक मुलीनी अस म्हटलंय अस म्हटलं जात) खरच का हो ? :)
20 Jan 2015 - 11:50 pm | आजानुकर्ण
To make a woman happy a man only needs to be :
1. a friend
2. a companion
3. a lover
4. a brother
5. a father
6. a master
7. a chef
8. an electrician
9. a carpenter
10. a plumber
11. a mechanic
12. a decorator
13. a stylist
14 . a gynaecologist
16. a psychologist
17. a pest exterminator
18. a psychiatrist
19. a healer
20. a good listener
21. an organiser
22. a good father
23. very clean
24. sympathetic
25. athletic
26. warm
27. attentive
28. gallant
29. intelligent
30. funny
31. creative
32. tender
33. strong
34. understanding
35. tolerant
36. prudent
37. ambitious
38. capable
39. courageous
40. determined
41. true
42. dependable
43. passionate
WITHOUT FORGETTING TO:
44. give her compliments regularly
45. love shopping
46. be honest
47. be very rich
48. not stress her out
49. not look at other girls
AND AT THE SAME TIME, YOU MUST ALSO:
50. give her lots of attention, but expect little yourself
51. give her lots of time, especially time for herself
52. give her lots of space, never worrying about where she goes
IT IS VERY IMPORTANT:
53. Never to forget:
* birthdays
* anniversaries
* arrangements she makes
HOW TO MAKE A MAN HAPPY :
1 . Leave him in peace
21 Jan 2015 - 3:49 am | पिंगू
कठिणच दिसतयं मग मला तर.. *dash1* *DASH* *WALL*
21 Jan 2015 - 7:27 am | अजया
*clapping*
थोड्याश्याच तर आहेत अपेक्षा ^_~
21 Jan 2015 - 8:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
यादी लै लहान आहे. काहीतरी मुद्दे कमी पडल्यासारखं वाटतयं. ;)
21 Jan 2015 - 10:30 am | टवाळ कार्टा
=))
21 Jan 2015 - 8:01 am | अजया
बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल नावं ठेवणार्या कोणीच कमी शिकलेली,गृहिणी बनून घर सांभाळेल अशी मुलगी चालेल लिहिलेले दिसले नाही हे एक निरिक्षण.
चारशेसाठी मारलेला धक्का!!
21 Jan 2015 - 8:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हल्ली कमी शिकलेल्या मुली शक्यतो सापडतं नाहीत. आणि सापडल्या तरी शिकल्या सवरलेल्या मुलांशी त्यांचे विचार पटतीलचं असं नाही. मॅरी इन लीग. ज्यांची वैचारिक पातळी जुळते अश्यांनी एकमेकांशी शि़क्षण मधे नं आणता लग्नं केलं तर काही हरकत नाही. (हा मुद्दा कमी शिकलेली मुलगी आणि उच्चशिक्षित मुलगा आणि वाईस व्हर्सा लागु आहे)
आणि शिकलेल्या मुलींनी आपलं शिक्षण स्वयपाकघर, भांडी-कुंडी आणि इडीयट बॉक्स मधल्या कुबौद्धिक हाणामार्यांमधे घालवु नये असं माझं मत आहे. त्या ऐवजी स्वतःच छान करीअर उभं करावं. हवं तर त्यातुन मिळणार्या पैश्यांमधुन स्वतःच्या आईवडीलांना सुद्धा आर्थिक मदत करावी.
21 Jan 2015 - 9:02 am | अत्रुप्त आत्मा
@ज्यांची वैचारिक पातळी जुळते अश्यांनी एकमेकांशी शि़क्षण मधे नं आणता लग्नं केलं तर काही हरकत नाही. >>> हेच तर आहे ना! पण अजुनंही विवाह-सहजीवनात शिक्षण हा निरर्थक मुद्दा मधे का आणतात? कोणतं भय असतं त्यामागे..की निव्वळ प्रतिष्ठेची हौस असते? मला अजूनंही कळलेलं नाही. मुळात...सहजीवनाचा आणि शिक्षणाचा संबंधच काय???
21 Jan 2015 - 9:17 am | निनाद
खरे आहे. त्या ऐवजी इमोशनल इंटेलिजंस किती आहे हा मुद्दा आणला पाहिजे.
त्याचे महत्त्व जास्त आहे.
21 Jan 2015 - 9:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ज्यांच्या वैचारिक पातळ्या जुळु शकतील अश्यांच्या बाबतीत शिक्षण हा दुय्यम मुद्दा ठरेल. पण असं जोडपं कदाचित लाखामधे एखादंचं असेल.
एखाद्या एम.एस. करुन आलेल्या मुलीचं किंवा मुलाचं दहावी पास झालेल्या जोडीदाराशी कितपत जुळु शकेल? जो एम.एस. झाला असेल त्याला सुपियारिटी काँप्लेक्स आणि दुसर्याला न्युनगंड वाटणारचं हे सत्य आहे.
माझ्या एका इंजिनिअर मित्राचं (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स/ एम.टेक इंडस्ट्रिअल ऑटोमेशन) चं लग्नं (प्रेमविवाह) एम.कॉम केलेल्या मुलीशी झालं. टेक्निकली दोघही पोस्ट ग्रॅजुएट आहेत.
पण जेव्हा कधी भांडतात तेव्हा शिक्षणाचा मुद्दा येतोचं मधे. :(
21 Jan 2015 - 11:08 am | अत्रुप्त आत्मा
@जो एम.एस. झाला असेल त्याला सुपियारिटी काँप्लेक्स आणि दुसर्याला न्युनगंड वाटणारचं हे सत्य आहे. >> पण हा असा वाटुन घेतात कशाला मुळात? हे जे काहि 'शिक्षण' असतं.याचा माणासाच्या उच्च नीचतेशी ,हुशार किंवा मठ्ठ असण्याशी काहिही संबंध नसतो. मग तरी ह्या निरर्थक गोष्टीला महत्व जर का कुणी देत असेल.तर तो त्याचा दोष आहे.
@टेक्निकली दोघही पोस्ट ग्रॅजुएट आहेत.
पण जेव्हा कधी भांडतात तेव्हा शिक्षणाचा मुद्दा येतोचं मधे.>> हेच्च तर ते! ते तो-आणतात..भांडणात एक सोइचा-उपाय म्हणून!!! मुळात सहजिवनाची मुल्य व्यक्तिंच्या परस्पर स्वभाव-मेलनाशी निगडीत असतात. तेच आहे की नाही? ते पाहायचं नाही..आणि माझ्या इतकं किंवा तेव्हढच शिक्षण ह्याचंही झालय..ही अनावश्यक निरर्थक गोष्ट पाहायची...मग असच होणार! सहजीवनात जे खरच लागतं ते पहायचं नाही, आणि लागत नाही तेच पाहायचं...म्हणजे बेसिक मधेच फॉल्ट ..करुन घ्यायचा म्हटल्यावर, असं होणारच. मी तर म्हणेन (अश्या केसेस मधे) त्यांचं-लग्न झालेलच नव्हतं.. तर आता तुटलं तरी कश्याचा आधारे म्हणायचं? :)
21 Jan 2015 - 12:41 pm | खटपट्या
१००% सहमत !!
21 Jan 2015 - 2:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वाटुन घेतं नाही हो गुर्जी. वाटला जातो. किती नाही म्हणलं तरीसुद्धा ही अत्यंत नैसर्गिक रितीनी घडणारी गोष्ट आहे. बाकी सगळ्या प्रतिसादाशी सहमत.
21 Jan 2015 - 2:40 pm | सूड
शिक्षण ही निरर्थक गोष्ट आहे? कशी काय ब्वॉ?? समजून घ्यायला आवडेल.
21 Jan 2015 - 3:10 pm | बाळ सप्रे
उच्चनीच/ हुषार-मट्ठ ठरवायला निरर्थक.. असं म्हणायला हवं
सर्वार्थाने निरर्थक नव्हेच ..
21 Jan 2015 - 3:12 pm | सूड
पण लेखनपद्धतीवरुन सर्वार्थाने निरर्थक म्हटल्यासारखं वाटतंय!
21 Jan 2015 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा
बाळ सप्रे म्हणातात ,तोच आशय आहे माझ्या सांगण्याचा...तरिही आपाणास ते प्रथम दर्शनी तसं वाटावं..याला माझा काहिच इलाज नाही.
21 Jan 2015 - 9:12 am | अजया
*HAPPY*
21 Jan 2015 - 10:50 am | पिवळा डांबिस
कमी शिकलेल्या मुलाला त्याच्यासारखीच कमी शिकलेली मुलगी चालण्यात काही प्रत्यवाय नसावा.
पण शिकलेल्या मुलग्यांनी कमी शिकलेली मुलगी का पसंत करावी? ती फक्त घर चालवेल म्हणून?
घर चालवायला हाऊसकीपर मिळतात की! आणि ती कमी शिकलेली मुलगी आजच्या ऑन लाईन २१व्या शतकातल्या जमान्यात घर कितीसं एफिशियंन्टली चालवू शकेल?
मुळात शिकलेल्या मुलाला त्याचे विचार किमान समजू शकणारी सहचारिणी हवी असं वाटलं तर त्यात काय चूक आहे?
आणि ह्या कमी शिकलेल्या मुलींना (मॅट्रिक पास समजू) चौथी पास मुलगा चालतो का? मग तो सुखवस्तू घरातला असला तरी?
21 Jan 2015 - 11:00 am | पैसा
आपण शाळा कालेजात जे शिकतो त्याचा घरात, किंवा नाती जोडताना आणि टिकवताना किती उपयोग अस्तो?
21 Jan 2015 - 11:17 am | पिवळा डांबिस
शिक्षण हे माणसाला अधिक व्यापक विचार करायला, स्वतःची बुद्धी चालवायला उद्युक्त करतं यावर जर सहमती असेल तर शिक्षणाचा संसारात बराच काही उपयोग असतो.
आणि अल्पशिक्षीत माणसंच घर चालवू शकतात वा नाती जोडू आणि टिकवू शकतात असं काही नसतं. उच्चशिक्षित लोकंही ते करू शकतातच! नाती जोडणं वा टिकवणं हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं, त्याच्या शिक्षणावर नाही.
किंबहुना मी थोड्या धाडसाने असं म्हणेन की शिक्षीत माणसं ही त्यांच्या ज्ञानाचा आणि बाहेरील जगाचा अनुभव वापरून (आपली पर्सुवेसिव्ह स्किल्स वापरून)नवीन संबंध निर्माण करू शकतात!!
21 Jan 2015 - 2:44 pm | अनुप ढेरे
प्रतिसाद आवडला!
21 Jan 2015 - 2:46 pm | बॅटमॅन
हांगाश्शी...नायतर लोक शिक्षणाची निंदाच करत होते...शिक्षण नसेल तर दमड्या कमावताना नाकीनऊ येतात. बाकी स्वभाव गेला उडत.
21 Jan 2015 - 2:52 pm | सामान्य वाचक
शिक्षणाने व्यक्तिमत्वात् बराच बदल होतो
21 Jan 2015 - 3:38 pm | पैसा
असं नाहीच ना!
हेच तर म्हणतेय!
शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया आहे का? की अनेक गोष्टींपैकी एक घटक आहे? उदा. त्या मेक्यानिकल इंजिनिअर आणि आयटीवालीचं उदाहरण वाचलं आणि फिस्सकन हसू आलं. की "आपलं कसं काय होणार?" या उदाहरणातले दोघेही उच्चशिक्षित आहेत. पण "सुशिक्षित" असतीलच असं नाही.
मात्र मेक्यानिकल इंजिनिअर किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर अगदी पीयच्डी झाला किंवा झाली तरी त्याला / तिला बांगडे फ्राय करताना त्या पीयच्डीचा किती उपयोग असतो? तिथे वेगळं स्किल लागतं ना!
21 Jan 2015 - 9:58 pm | पिवळा डांबिस
शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. परंतु शैक्षणिक अनुरूपता हा एक अत्यंत महत्वाचा क्रायटेरिया आहे याबद्दल काहीही संशय नाही. उच्चशिक्षीत व्यक्ती ही सुशिक्षीत असू वा नसू शकते पण अल्पशिक्षित व्यक्ती कधीच सुशिक्षित असू शकत नाही. (मी सुशिक्षित हा शब्द वापरतोय, सुसंस्कृत हा नाही).
संसार हा 'सहजीवन' म्हणून करायचा असेल तर वधू-वरातील शैक्षणिक अनुरूपता ही आवश्यक असते. नुसती फक्त 'पेजेला आणि शेजेला' बायको हवी असेल तर ती अल्पशिक्षित असण्याचीही जरूर नसते, अशिक्षितही चालेल! आपल्याकडे जुन्या काळात बहुतेक संसार(?) दुर्दैवाने तसेच झाले आहेत.....
22 Jan 2015 - 10:53 am | पैसा
हे मी कधी कुठे म्हटलेलं नाही. बांगडे फ्राय करायचं फक्त उदाहरण दिलंय. संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.
१९५६ सालची एक गोष्ट सांगते. माझ्या आईवडिलांचं लग्न झालं तेव्हा वडील इंटर आर्ट्स आणि आई म्याट्रिक डी एड होऊन नोकरी करत होते. आताच्या दृष्टीने पाहता ते अल्पशिक्षितच. पण त्या १९ वर्षाच्या मुलीने सासूसासरे, ३ दीर, नंतर झालेली ३ मुले असा सगळा संसार सांभाळत पुढे शिकायची आस धरली. लग्नानंतर संसार नोकर्या मुलेबाळे करत ते दोघेही शिकत राहिले. दोघेही एम.ए. बी एड. पर्यंत शिकले. आता हे शिक्षण फार मोठे वाटणार नाही, पण एकूण परिस्थितीचा विचार करता ही फार मोठी झेप होती. साधा स्वयंपाक म्हणजे तेव्हा चूल, खलबत्ते, पाटेवरवंटे यांच्याशी मुकाबला असायचा. या सगळ्याशी सामना करून त्या दोघांनी हे कसं साध्य केलं असेल माहीत नाही.
सहा दिवसाच्या मुलीला हॉस्पिटलमधे ठेवून माझी आई हॉस्पिटलमधून बी ए चा पेपर द्यायला गेली होती! ही शिक्षणाबद्दलची कमिटमेंट! त्यांच्या तुलनेत आम्हाला भरलेलं ताट समोर येतं पण तरी ते गिळता येत नाही! आज मी जी काही आहे ती या दोघांमुळेच आहे. त्यांचं लग्न झालं तेव्हा दोघेही अल्पशिक्षित असूनही त्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ होत्या. अनेक बाबतीत ते काळाच्या पुढे होते. आणि एका दुर्गम खेड्यात रहायला जाऊनही त्यांना जगाबरोबर रहायची आवड होती. महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्या पिढीला अपवाद नव्हते! नवीन स्वातंत्र्य मिळालेल्या काळची ती त्यांची पिढीच अशीच ध्येयचादी, शिक्षणासाठी काहीही करणारी होती. आता आपल्याला शिक्षणासाठी फक्त पैशाची सोय करावी लागते, पण तेव्हा पैसा ही फार नंतर विचार करायची गोष्ट होती.
तात्पर्य काय,
याला काही आधार नाही. शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. कित्येकदा अगदी अशिक्षित लोकांकडूनही मी कमालीचे पुरोगामी विचार ऐकले आहेत!!
शिक्षण, पैसा हे सगळं कधीही मिळवता येतं. ते प्रत्येक माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. आणि त्याबाबतीत ठराविक असे ठोकताळेही मांडता येणार नाहीत. तसंच एखादं नातं निर्माण करणं आणि ते फुलवणं, टिकवणं यातही इतर अनेक गोष्टींचा हातभार असतो. एकच एक पद्धत सगळीकडे लागू होईल असेही नाही!
22 Jan 2015 - 11:05 am | मुक्त विहारि
...याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही."
सहमत...
22 Jan 2015 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा
मु.वि. आणि पैसा ताई ... >> +++++१११११
अगदी पूर्ण सहमत आहे.
23 Jan 2015 - 12:45 pm | मदनबाण
शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान ....
..याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही."
आणि पैशाच्या सुद्धा नाही !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }