वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
15 Jan 2015 - 3:24 am
गाभा: 

मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.

माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.

भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.

शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?

एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.

मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.

ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.

माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.

शिक्षण : जेमतेम डिप्लोमा

पगार : २२००/-

नौकरी : खाजगी.

जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.

इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)

वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल.

आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.

लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.

शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.

अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.

दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.

थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?

संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.

डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

22 Jan 2015 - 3:05 pm | पिलीयन रायडर

स्रुजा हय वो!! एकच लिहील पण नवा धागाच बनवावा लागेल असा प्रतिसाद!!

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 3:12 pm | टवाळ कार्टा

म्हणजे सगळ्या अनाहितांमधून फक्त एकच अनाहिता अशी संयत प्रतिसाद लिहू शकते ...

तुमच्या प्रतिसादाचा असा अर्थ निघू शकतो =))

पिलीयन रायडर's picture

22 Jan 2015 - 3:58 pm | पिलीयन रायडर

(स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील, पण (तो) प्रतिसाद नवा धागा म्हणुन वेगळा काढावा लागेल इतका सुंदर लिहील..

समजलं का?

उठलं की सुटलं तुम्हाला अनाहिताच का वो आठवतं?

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 4:02 pm | बॅटमॅन

उठलं की सुटलं तुम्हाला अनाहिताच का वो आठवतं?

समजा त्यांना आठवतं तर तुम्हांला का ओ दुखतं?

कितीही आठवलं तरी तिकडे काय आहे ते बघता येणार नाही हे सर्वांना माहितीच्चे की. मग प्रॉब्लेम काय आहे?

पिलीयन रायडर's picture

22 Jan 2015 - 4:37 pm | पिलीयन रायडर

वा वा.. कुणी सारखं अनाहिताची आठवण काढत असेल तर अनाहितांना लक्ष घालावं लागणार की नाही?!!

आणि बघता येणार नाही हे मान्य आहे.. पण तसा कुणी प्रयत्न तर करत नाही ना ह्यावर चौफेर लक्ष ठेवावं लागतं बाबा...

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:30 pm | टवाळ कार्टा

खिक्क...नेहमी तुम्हाला"च" का लागत येव्हड...का अनाहितांच्या तुम्ही front warrior आहात :)

पिलीयन रायडर's picture

22 Jan 2015 - 4:38 pm | पिलीयन रायडर

मी अनाहिताची कोण हा प्रश्न वेगळाच आहे.. तुमच्यासाठी "मी अनाहिता आहे" हे कारण पुरेसं आहे.. नाही का?!!

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 4:40 pm | बॅटमॅन

तू अनाहिता??? मग आम्ही सगळे झ्यूस =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अकिलीज...

आणि अकिलीज वरुन मला का कोण जाणे ओडीसीची आठवण होतीये. लिवं की. तिथे १००० मारु. =))

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 4:54 pm | हाडक्या

ब्याट्याच्या इडिपसचं जहाज कुठे अडकलंय कई म्हैत. जरा धका द्या की राव.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:44 pm | टवाळ कार्टा

=))

पिलीयन रायडर's picture

22 Jan 2015 - 4:55 pm | पिलीयन रायडर

तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ.. माझ्या पप्पांच काय जातय...

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:58 pm | टवाळ कार्टा

उगी उगी

पिलीयन रायडर's picture

22 Jan 2015 - 5:06 pm | पिलीयन रायडर

नाय पण तुम्हाला अनाहिताची सारखी एवढी आठवण का येते ह्याच उत्तर राहिलच्चे बर का.. ;)

नाय म्हन्जे कळात नाहीये आम्हाला असं नाही... पण.. असोच..!!

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 5:00 pm | बॅटमॅन

ठीके सूडो-अनाहिता.

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 5:32 pm | हाडक्या

सूडो-अनाहिता

मला का कोण जाणे पण सूडक्याच आठवला.. :))))

सूड's picture

22 Jan 2015 - 5:34 pm | सूड

तसंच आहे ते!! सूडश्च अनाहिताश्च असा सामासिक विग्रह आहे त्या शब्दाचा!!

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 5:46 pm | बॅटमॅन

ख्याक =))

हाडक्या's picture

23 Jan 2015 - 7:22 pm | हाडक्या

अगागा.. त्या इंडो-युरोपिअन भाषीय जननीस आमचा साष्टांग नमस्कार..

>>मग आम्ही सगळे झ्यूस

मला झर्क्सिस व्हायला आवडेल. ;)

म्हणून म्हणतो पिच्चर न बघता इतिहास वाचत चला ओ. झ्यूस हा तिथला इंद्र. त्याने जितकी मजा केली (बादवे संस्कृतात केलि म्हणजे 'मज्जा' बरं का ;) ) त्याच्या सहस्रांशही या बिचार्‍या झर्क्सिसने केलेली नाही. त्या बिनडोक पिच्चरमध्ये इतिहासाचा इतका विपर्यास केलाय की ज्याचे नाव ते.

म्हणून म्हणतो पिच्चर न बघता इतिहास वाचत चला ओ. झ्यूस हा तिथला इंद्र. त्याने जितकी मजा केली (बादवे संस्कृतात केलि म्हणजे 'मज्जा' बरं का ) त्याच्या सहस्रांशही या बिचार्‍या झर्क्सिसने केलेली नाही. त्या बिनडोक पिच्चरमध्ये इतिहासाचा इतका विपर्यास केलाय की ज्याचे नाव ते.

सांगितलंस ते ठीकाय. पण मी लिहीलं त्यात इतिहासाचा फारसा संबंध नव्हता. पिच्चरमध्ये दाखवलेल्या झर्क्सिससारखी आपली physique असावी अशी माझी फारा दिवसांपासूनची इच्छा आहे, म्हणून झर्क्सिस म्हटलं!! ;)

बॅटमॅन's picture

23 Jan 2015 - 3:36 pm | बॅटमॅन

आईंग? झर्क्सिस की लिओआयडस ;)

सूड's picture

23 Jan 2015 - 3:39 pm | सूड

झर्क्सिस की लिओआयडस

झर्क्सिसच!!

बॅटमॅन's picture

23 Jan 2015 - 3:42 pm | बॅटमॅन

आयला. असो. पण तरी फिजिक चांगलंच आहे म्हणा त्याचं. बाकी गोष्टी विचित्र वाटत असल्या तरी.

>>आयला. असो. पण तरी फिजिक चांगलंच आहे म्हणा त्याचं. बाकी गोष्टी विचित्र वाटत असल्या तरी.

बाकीच्या गोष्टी मरोत. तसं फिजिक ठेवणं खायची गोष्ट नाही बाप्पा!! खाणं आणि वर्कआऊट जऽऽरा गंडला की संपलं!

फिजिक आणि पिअर्सिंग पण का मग ?? :))))

गहू तेव्हा पोळ्या!! तस्मात् आधी फिजिक, मग पिअर्सिंगचं बघू!! ;)

मदनबाण's picture

18 Feb 2015 - 2:48 pm | मदनबाण

पिअर्सिंगचं बघू!
हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा प्रकार कळला आहे ! हे पिअर्सिंग फक्त पाखरंच करुन घेतात ! काय एक एक उध्योग !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा

;)

मदनबाण's picture

18 Feb 2015 - 3:03 pm | मदनबाण

हॅ.हॅ.हॅ... ;)
तू हे वाचणार हे माहित होतच बरं का ! ;)
बाकी हे टोचुन घेण्याचा प्रकार पाहुन झाल्यावर पाखरं काहीही म्हणजे काहीही करु शकतात याची खात्री मात्र पटली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

सूड's picture

18 Feb 2015 - 3:18 pm | सूड

हे टोचुन घेण्याचा

'हे' म्हणजे नक्की काय टोचून घेतलेलं पाह्यलंत म्हणे?

"हे" म्हणजे अगदी छोटीशी मेटल पीन असते जी टोचुन घेण्याचे धाडस ही फडफडणारी पाखरं करतात. हा पिअर्सिंग मधला नविन प्रकार आहे असे कळले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा

हे म्हणजे ते, तेही आणि तेसुध्धा ;)

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा

'हे' म्हणजे नक्की काय टोचून घेतलेलं पाह्यलंत म्हणे?

हे म्हणजे माईंचे हे =))

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा

मी सगळे वाचतो...पटो अथवा न पटो

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2015 - 5:50 pm | टवाळ कार्टा

हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा प्रकार कळला आहे ! हे पिअर्सिंग फक्त पाखरंच करुन घेतात ! काय एक एक उध्योग !

अशी पाखरे लय डेरिंगबाज अस्तात ;)

काश्मीर करु नका बे, झर्क्सिस वरुन पाखरांवर काय घसरलात!!

बॅटमॅन's picture

23 Jan 2015 - 3:41 pm | बॅटमॅन

*लिओनायडस.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:44 pm | टवाळ कार्टा

तिकडून्सुध्धा फुटवतात??? =))

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 3:44 pm | अत्रुप्त आत्मा

sex या विषयाबद्दल पण तेच , नैसर्गिक गरज मुलांची आणि मुलींची वेगळी कशी ? अपेक्षा पण वेगळी कशी असणार ? आता तो अनुभव एकमेकांबरोबर घेतल्याशिवाय आणि अनेकदा घेतल्याशिवाय परस्परपूरक आहेत का हे समजणं अवघड आहे पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं . वैवाहिक जीवनाचा पाया जर शारीरिक नातं असेल तर त्याला कमी का लेखायचं ? मुलींच्या अशा अपेक्षा असतात आणि त्या रेटण्या इतक्या किंवा त्यावरून एखादा मुलगा नाकारण्या इतक्या आता त्या धाडसी झाल्या आहेत हे चांगलंच आहे न? घरच्यांच्या दबावाला किंवा असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ? मुली आता बोलून दाखवतात आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्यात असं म्हणण्यापेक्षा जी मुलगी अशा वातावरणात वाढून सुद्धा तुमच्याशी लग्न करायला तयार असेल ती अगदी मनापासून तयार आहे यात दिलासा नाही का वाटत ? किंबहुना तो तसा वाटण्याइतकं प्रगल्भ आता मुलांनी आणि समाजानी पण व्हायला हवं .

वाहव्वा!!! :Happy: एव्हढं कात्रण हायस्कूल/कॉलेजच्या कामविषयाच्या अभ्यासक्रमाचा विषयभाग बनवावं अश्या तोडीचं आहे. क्लासिक वन! :Happy:

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 4:56 pm | हाडक्या

+१ .. :)

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:58 pm | टवाळ कार्टा

+१११११

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद , बाकी कौतुक करताना मिपाकर कधी हातचं राखून करत नाही हे खरं. :) हा धागा वाचनमात्र होईल म्हणून ही घाईने आधी आभार मानून घेते .
स्वॅप्स यांचा प्रतिसाद पण आवडला .

आजानुकर्ण's picture

22 Jan 2015 - 7:17 pm | आजानुकर्ण

पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं

लग्नानंतर एकदोन वर्षातच टक्कल पडलं तर लगेच टर्न ऑफ होणार का? आजकाल केस रुजवूनही मिळतात. टकलावरुन नाकारणं एकांगीच आहे.

सूड's picture

22 Jan 2015 - 7:55 pm | सूड

+१
टक्कल आहे म्हणून नाकारलं ठीकाय, पण लग्नानंतर टक्कल पडलं तर मग काय करावं त्या बिचार्‍यानं!!

याच न्यायाने लग्नानंतर जाड झाल्यामुळे घटस्फोट देणेही चालून जावे.

आमच्या घरी तर तिशीतच टक्कल पडायची परंपरा आहे. हे सगळ वाचून माझे आधीच कुरळे असलेले केस आणखी कुरळे झाले राव!! ;)

जळ्ळा मेला पुर्षांचा जन्म ;)

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 8:28 pm | टवाळ कार्टा

सूड कधीकधी दोन्ही बाजूंनी बोलतो असे वाटते :)

मी मला जे योग्य वाटतं ते बोलतो. अमका तमका आमच्या सो कॉल्ड कंपूतला आहे म्हणून त्याला उगा चान चान कमेंटी लिहीणं जमत नाही. जे वाटलं ते लिहून टाकतो, उगा पंक्तिप्रपंच नाही.

अजया's picture

21 Jan 2015 - 10:23 pm | अजया

काही कन्क्लुजने ^_~
लग्नाळू मुली मिपावर कमी आहेत!
आहेत त्यातल्या काहींनी जमवली असू शकतील!
न जमवलेल्या पण जमण्याबाबत काॅन्फिडंट असलेल्या पाॅपकाॅर्न घेऊनच बसल्या असतील!

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 10:29 pm | आजानुकर्ण

कन्क्लुजन असं आहे की.
१. मिपावरील सर्व विवाहित स्त्रियांनी पैसा, घर वगैरे न पाहता नवऱ्याचा स्वभाव व कर्तृत्वावर विश्वास ठेवून लग्न केले
२. सर्वांचे नवरे अर्थातच कर्तृ्त्ववान असल्याने सगळ्यांची नंतर घरे, पैसे, परदेशप्रवास वगैरे झाले.
३. त्यामुळे अविवाहित मुलांनी शक्यतो मिपावरच काही जमतंय का ते पाहावं.

पैसा's picture

21 Jan 2015 - 10:46 pm | पैसा

या धाग्यावर लग्नाळू मुलींचे प्रतिसाद जास्त का नाहीत याबद्दल कन्क्लुजन पायजे!

बादवे, मी लग्न केलं तेव्हा नवर्‍याजवळ त्याच्या मालकीचा एक प्लेस्टिकचा जग आणि २ कप होते. चमच्यापासून सगळं आम्ही दोघांनी पैसे साठवून विकत घेतलं. आमच्याकडे स्वतःचे घर, गाडी काय सायकल पण नव्हती. कर्तृत्व कोणाचं याबद्दल कोणतेही वाद किंवा भलत्या कल्पना नाहीत. कारण आम्ही दोघांनीही २५ वर्षे नोकर्‍या केल्या. आणि बास झालं असं वाटलं तेव्हा सोडून दिल्या!

सुबोध खरे's picture

21 Jan 2015 - 10:53 pm | सुबोध खरे

पैसा ताई
तुमचा प्रेम विवाह होता. असे म्हणतात कि दोघात प्रेम असलं कि चिंचेच्या पानावरही झोप येते.
बघून करायचं तर कफल्लक माणसाशी किंवा टिनपाट मुलीशी कोण लग्न करेल हो?

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 10:53 pm | आजानुकर्ण

हो पण आता दिवस वेगळे आहेत. खरेदीदाराला मार्केटमध्ये भरपूर चॉईसेस उपलब्ध आहेत. ओनली स्काय इज द लिमिट. त्यात आता शिक्षणापासून नोकरीपर्यंत सर्वोत्तमच पाहिजे असाही हट्ट सगळीकडे धरला जातो. लग्नाच्या बाजारातही सर्वोत्तमच जोडीदार पाहिजे हा आग्रहही त्यातूनच आलाय. सर्वोत्तम जोडीदार म्हणजे ज्याच्याकडे इतरांपेक्षा चांगली नोकरी, इतरांपेक्षा मोठे घर, इतरांपेक्षा जास्त पैसा वगैरे निकष. जर ते डील जमलं नाही तर थोडी किंमत उतरवून पाहायची जुळतंय का ते. जोपर्यंत हे मॅचप होत नाही तोपर्यंत घासाघीस चालतेच.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 2:28 pm | प्रसाद गोडबोले

मी लग्न केलं तेव्हा नवर्‍याजवळ त्याच्या मालकीचा एक प्लेस्टिकचा जग आणि २ कप होते.

आमच्या कडे तर तेही नव्हते .
आजकाल प्लॅस्टीकचे कप फुकट देतात चकना द्या की राव असे म्हणले तर चकन्याच्या फरसाणच्या २-३ पुड्या ही मिळतात =))

प्रसाद१९७१'s picture

22 Jan 2015 - 1:55 pm | प्रसाद१९७१

१. मिपावरील सर्व विवाहित स्त्रियांनी पैसा, घर वगैरे न पाहता नवऱ्याचा स्वभाव व कर्तृत्वावर विश्वास ठेवून लग्न केले
२. सर्वांचे नवरे अर्थातच कर्तृ्त्ववान असल्याने सगळ्यांची नंतर घरे, पैसे, परदेशप्रवास वगैरे झाले.

लहान पणी सगळेच क्रीकेट खेळतात पण २००-३०० मुलेच काहीतरी बनतात. पण फक्त सचिन तेंडुलकरचे उदाहरण घेउन फक्त क्रिकेट खेळा हा सल्ला देण्यासारखे आहे.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jan 2015 - 9:30 pm | श्रीरंग_जोशी

"Naked" Wedding for Poor Chinese Couples

आपल्या शेजारी देशामध्ये हा (नेकेड वेडींग - कृपया शब्दशः अर्थ घेऊ नये) नवा प्रकार सुरू झाला आहे.
हा प्रकार आपल्याकडे आल्यास बरे होईल.

कोमल's picture

21 Jan 2015 - 10:57 pm | कोमल

+१
Great way to bypass big fat indian wedding..

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 10:59 pm | आजानुकर्ण

२४-२५ लाख रुपये हा अॅवरेज लग्नाचा खर्च?

कोमल's picture

21 Jan 2015 - 9:51 pm | कोमल

माझ्यामते तरी,
१)तो व्यसनी नसावा.
२)माझ्याइतका किंवा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असावा, पण कमी नको.
३)कामाव्यतिरिक्त इतर छंदांची जोपासना करणारा असावा. आणि त्याची आर्थिक परिस्थिती, कमीतकमी ते छंद पूर्ण करता येतील अशी असावी. नाहीतर अस नको व्हायला की, फोटोग्राफीची आवड आहे, पण कॅमेराच नाही.

यात पण शिक्षणाचा मुद्दा एवढ्या साठी "होता" की शिक्षण व्यक्तीला प्रघल्भ करते. पण लग्न या गोष्टीकडे सीरियसली पाहायला लागल्यापासून उच्च शिक्षण घेतलेल्या माठ लोकांची उदाहरणे बरीच दिसली आजुबाजूला.

अजुन एक पैसा तै एकदा म्हणल्याप्रमाणे "क्लिक" व्हायला हवा.. ;)

पैसा's picture

21 Jan 2015 - 9:54 pm | पैसा

गुणी मुलगी!

ताका मेळ्ळो असतालो ते कारणालागून अशें बरयतां गे !! ;)

पैसा's picture

21 Jan 2015 - 10:47 pm | पैसा

खबर काढतां आता!

कोमल's picture

21 Jan 2015 - 10:53 pm | कोमल

खिक्क्

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2015 - 10:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१००० कधी?

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 10:06 pm | आजानुकर्ण

होतील. फक्त थोडा जोर लावा अजून. संक्षी कुठे गेलेत?

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 11:08 pm | हाडक्या

संक्षी नाहीत तर ५५० .. संक्षी आले तर मग काय !!

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 11:09 pm | आजानुकर्ण

शिवाय विवाह त्यांचा आवडता विषय आहे.

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 11:14 pm | हाडक्या

आणि सहजीवन .. आणि अपेक्षा.. आणि काय काय..
गुरुवर्य आले तर चर्चा संपून संवाद सुरु होईल हे मात्र नक्की. ;)

अरे पण संक्षी कुठे गेलेत या अजानुकर्णांच्या प्रश्नाचं उत्तर द्या की...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2015 - 11:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमीबी लावा आमीबी लावतो!!!

खटपट्या's picture

22 Jan 2015 - 5:30 am | खटपट्या

प्रत्येक मीपाकराने आपापली कर्मकहाणी प्रेमकहाणी/लग्नकहाणी लीहा. १००० होतात की नाही बघा.

एस's picture

22 Jan 2015 - 8:16 am | एस

लग्न ही दोन व्यक्तींच्यापुरतीच मर्यादित असावी अशी खासगी गोष्ट आहे हे माझे मत. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आणि सर्वोच्च आहे. लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील. त्यात काही गैर नाही आणि संस्कृतीचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा, हा अटळ प्रवास होणार आहे.
तस्मात्, लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाची घटना आहे हा हट्टाग्रह आपण सोडून दिला तर बरेच प्रश्न सुटतील.

आपल्याला काय करायचंय बाकीचे काय करताहेत किंवा त्यांना काय वाटतंय याच्याशी? जग गेलं खड्ड्यात. आपण जगू आपल्या धुंदीत. जोपर्यंत आपल्या हातून काही बेकायदेशीर घडत नाही किंवा कुणावर अन्याय होत नाही तोपर्यंत जगाची पर्वा करत बसू नये. लग्न करा अथवा नका करू. अगर हव्या तितक्या वेळा मोडा आणि करा. आपल्या मुलांनाही त्यांच्या १५-१६ व्या वर्षापासूनच स्वावलंबी जगायला शिकवा. त्यांच्या आयुष्याची मशागत करण्याचा आपला अट्टाहास प्रत्यक्षात त्यांची वाट लावत असतो. मुलांचे भविष्य त्यांचे त्यांना घडवू द्या. तुम्ही तुमच्या वृद्धापकाळाची सोय सर्वात आधी लावा.

बस, इत्यलम्!

यशोधरा's picture

22 Jan 2015 - 8:37 am | यशोधरा

हा प्रतिसाद, सुजा ह्यांचा प्रतिसाद आणि डांबिसकाकांचा शिक्षणाबद्दलचा प्रतिसाद, असे ३ प्रतिसाद खूप आवडले.

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 12:19 pm | मुक्त विहारि

सहमत

पैसा's picture

22 Jan 2015 - 9:28 am | पैसा

अजून एक वेगळा प्रतिसाद!

खूपच योग्य प्रतिसाद ..खूप आवडला

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे करायलाही तत्वतः काही विरोध असून नये.

पण... आणि हा एक फार मोठा पण आहे...

"दर कृतीला आणि दर कृतीच्या अभावालाही फायदे तोटे हे असतातच; ते डोळसपणे स्विकारायची तयारी हवी."

इतकेच, बस :)

तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत पाहिजे. जग हे हिंमतीवर झुकवले जाते.

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 5:04 pm | हाडक्या

स्वॅप्स हे आयडियल आहे. सभोवतालची परिस्थिती नेहमीच तशी नसते.. नेहमीच तशी रहात नाही. तुम्ही ज्या समाजात राहता, त्यांची समग्र सामुहिक भुमिका नक्कीच विचारात घ्यावी लागते. तुमच्या आधीच्या प्रतिसादाला अनुमोदन अगदी डब्बल अनुमोदन पण एक्कांच्या "पण" सोबत. :)

तुम्ही ज्या समाजात राहता, त्यांची समग्र सामुहिक भुमिका नक्कीच विचारात घ्यावी लागते.

बरोबर आहे. स्वातंत्र्यवादी सकारात्मक सुधारणा असे ज्यास म्हणता येईल तशी भूमिका स्वत:च्या जीवनात घेणे हे दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे क्रांतीसारखा बेधडक आणि जाज्ज्वल्य उपाय स्वीकारणे किंवा दोन पावले पुढे - एक पाऊल मागे असा मृदू पण ठाम कार्यक्रम राबवणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

@स्वॅप्स
तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत पाहिजे. जग हे हिंमतीवर झुकवले जाते.

केवळ काही काळाकरिता दाखविलेल्या हिंमतीपुरता हा प्रश्न मर्यादित राहत नाही... त्याचा आवाका त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे.. सद्याच्या समाजात तसा निर्णय घेण्याचे अनेक परिणाम असू शकतात. त्यातले महत्वाचे काही असे :

१. ही हिंमत केवळ हा निर्णय घेण्यार्‍यांनी आयुष्यभर (किंवा त्याच्या नशिबाने त्याअगोदर समाज बदलला तर तोपर्यंत) दाखवावी लागेल. ते समाजातच राहत असल्यामुळे, हे सर्व करण्यात त्यांना बर्‍याच शक्तीचा, मानसिक त्रासाचा आणि कदाचित आर्थिक नुकसानीचा ताण सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल.

२. याउप्पर, जर अश्या जोडप्याने मुलांना जन्माला घालायचे म्हटले तर त्या मुलांनाही लहान वयापासून समाजाचा विरोध सहन करावा लागेल. जोडपे मनाने कितीही हिंमतीचे असले तरी ती बालके तशी मनोधारणा घेऊन जन्माला येणार नाहीत आणि त्यांना ती परिस्थिती खडतर वाटेल हे आजही खात्रीपूर्वक सांगता येईल. शिवाय ज्या निर्णयामुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहेत तो त्यांचा नाही / त्यांचे मत जमेस धरून घेतलेला नसणार आहे.

३. जर अश्या मुलांच्या वयात येण्याच्या काळापर्यंत समाजातील परिस्थिती जोडप्याच्या निर्णयाला अनुकूल झालेली नसली तर अजून समस्या उभ्या राहणार आहेत.

एखादी गोष्ट तत्वतः मान्य असणे आणि तिचे तात्काळ व दूर्गामी परिणामांना तोंड देणे या अत्यंत भिन्न गोष्टी आहेत.

जगाला हिमतीवर झुकणारे मानव विरळा जन्माला येतात... आणि समाजाकडून होणारा तीव्र त्रास सहन करणे ते टाळू शकत नाहीत.

नक्कीच. मी वरील सर्व शक्याशक्यतांचा विचार करूनच जाणीवपूर्वक तो शब्द वापरला होता.

योगी९००'s picture

22 Jan 2015 - 10:03 am | योगी९००

मु.वि.चे अभिनंदन...!! धागा आणि प्रतिसाद एकदम सुरेख...!!

पिवळा डांबिस's picture

22 Jan 2015 - 10:22 am | पिवळा डांबिस

मुविंचे अभिनंदन तर आहेच पण एक गोष्ट जाणवली की खुद्द ते नुसता धागा काढून गायब आहेत. प्रतिसादांत फारसे कुठे दिसत नाहीत.
मुवि, शोभत नाही हो एका कट्टासम्राटाला हे! :)

मुवि कशेळी कट्ट्याच्या तयारीत असतील..त्यामुळे गायब झालेत.

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 12:21 pm | मुक्त विहारि

एक तर रात्रपाळी सुरु आहे आणि चर्चा इतकी सुंदर आहे की, ह्या चर्चेला गालबोट न लागलेलेच उत्तम, ह्या द्रुष्टीने चर्चेचा आनंद घेत आहे.

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 5:21 pm | हाडक्या

धागाकर्त्याने २० प्रतिसाददेखील न देता, कोणीही घसा न ताणता, कोणाचीही अक्कल न काढता, कोणत्याही प्रकारचा अप्रिय वाद न निर्माण करता, धागा ७०० ला गवसणी घालतोय.
मिपाच्या इतिहासात एकमेव अशी घटना असेल ही. (परत कधी घडेल असे वाटत पण नाही) :)

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 5:21 pm | टवाळ कार्टा

मुविंके हाथ लंबे होते है ;)

सूड's picture

22 Jan 2015 - 5:26 pm | सूड

काय सांगतोस काय !!

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 6:58 pm | हाडक्या

तू कधी मोजायला गेला होतास मेल्या.. ;)

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 8:30 pm | टवाळ कार्टा

मला म्हणायचे होते की मुवींचे फ्यॅन्स मिपाभर पसरले आहेत (संपादकांपासून ते डुआयडींपर्यंत) :)

सौंदाळा's picture

22 Jan 2015 - 12:11 pm | सौंदाळा

एक सत्यवचनी धगधगती काडी : मोठी बहिण सुस्थळी पडली असेल तर धाकट्या बहिणीचे लग्न जमवताना प्रत्येक बाबतीत जिजुंशी तुलना केली जाते. जिजुंचा पगार, घर, गाडी, फोरीन ट्रीप्स सासु सासरे, सासर्-माहेर यातील अंतर वगैरे वगैरे आणि अश्या धाकट्या बहिणी बरीच चांगली स्थळे नाकारताना पाहील्या आहेत.
मोठी, धाकटी साली नसलेला :( - सौंदाळा

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 12:22 pm | मुक्त विहारि

सहमत

बहिणीच्या नवर्‍याला जीजू म्हणणं हेही प्रचंड डोक्यात जातं. चार लाथा घालाव्याशा वाटतात असे शब्द बोलणारे लोक्स पाहिले की.

सौंदाळा's picture

22 Jan 2015 - 2:13 pm | सौंदाळा

+१ सहमत
आमचा मेव्हणा जिजु, जिजु करायला लागला तेव्हा सरळ त्याला मला नावाने बोलाव सांगितले तरीपण जिजुचे पालुपद चालुच, मग बायकोला सांगुन त्याच्या मुसक्या आवळल्या ;) आता मेव्हणा सौंदाळादादा (अरे दादा) म्हणतो, ते ठिक वाटते.

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 2:24 pm | बॅटमॅन

उत्तम केलेत. माझ्या बहिणींच्या नवर्‍यांना मीही सरळ नावाने हाक मारतो. असली नॉर्दिंडियन स्टाईल आजिबात आवडत नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 2:30 pm | टवाळ कार्टा

मराठीमधे कोणता शब्दच नाही???

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 2:36 pm | बॅटमॅन

भावजी, दाजी हे शब्द आहेत. भावजी हा शब्द अलीकडे डौनमार्केट झालाय. दाजी हा शब्द तुलनेने जास्त ऐकला आहे- ब्राह्मणेतर समाजात याचा वापर बराच आहे असे वाटते. दक्षिण महाराष्ट्रात हा शब्द वापरला जातो. पुणे मुंबै इ. मोठ्या शहरांत मात्र अशा शब्दांचा विटाळ पाळला जातो.

असंका's picture

22 Jan 2015 - 2:57 pm | असंका

सर्वांगीण प्रतिसाद....!!

:-))

जिजू म्हणलं की भारी विचित्र वाटतं हे तर खरंच. नागपूरला हिंदी प्रभाव आहे जरा जरा. तिथे लोक हा शब्द वापरताना ऐक्लंय जास्ती करून...

नागपुरी/वैदर्भीय लोकांनी असे बोलावे हे समजण्यासारखे आहे. शेवटी भौगोलिक सान्निध्याचा प्रभाव हा पडायचाच. पण न्यूनगंडात्मक अनुकरण करणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातल्यांना मात्र क्षमा नाही.

मी दाजीच म्हणतो. आमच्या जातीत पाव्हण्यांना असलं ऐकायची सवय नाही, त्यामुळे पहिल्यांदा शॉकच बसतो त्यांना.

स्वप्नांची राणी's picture

22 Jan 2015 - 4:36 pm | स्वप्नांची राणी

भावजी आणि दाजी हे शब्द उच्चारले की जाम अनैतिक माणसं डोळ्यासमोर उभी राहतात...

'या रावजी बसा भावजी' टाईप किंवा '...दाजिबा तुमच वागणच खोटं...' टाईप..

मग हा दोष त्या शब्दांचा की तसा ग्रह करून घेणार्‍या माणसांचा?

ब्राह्मणेतर समाजात कैक वेळेस हा शब्द वापरलेला ऐकला आहे. तेही सगळे अनैतिकच असतील?

कमाल आहे राव. चार पिच्चर पाहून लोक कसले कसले पूर्वग्रह करून घेतात. धन्य आहे _/\_

स्वप्नांची राणी's picture

22 Jan 2015 - 4:47 pm | स्वप्नांची राणी

माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात हो..दाजिबा सॉरी झ्युस...

सस्नेह's picture

22 Jan 2015 - 4:41 pm | सस्नेह

दाजीबा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

जीजू, चाचू... असं कोणी (मला किंवा इतरांनाही) म्हणाले की माझ्या तोंडी सहजपणे "बिहारमध्ये असता काय?" असा प्रश्न येतो :)

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 2:37 pm | बॅटमॅन

हाहा, अगदी अगदी!

त्या मानाने भय्या, दीदी हे शब्द इथल्या मातीत चांगल्यापैकी रुजले आहेत...नाही?

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 3:02 pm | टवाळ कार्टा

मराठी घरांत जर भय्या, दीदी असे शब्द वापरत असतील तर मराठीच्या अधोगतीला कारं असणारी मराठी माणसे ती हीच

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 3:05 pm | बॅटमॅन

अगदी अगदी....

असंका's picture

22 Jan 2015 - 3:20 pm | असंका

अच्छा .. म्हणजे अधोगतीवर चर्चेची गाडी न्यायची का आता?

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा

उग्गीच

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 6:18 pm | हाडक्या

टका.. काही कामे नाईत होय रे.. ;)
अखिल पृथ्वीवरल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या सकाळी, दुपारी, संध्याकाळी प्रतिसाद दिसतोय म्हणून विचारतोय.
(प्रतिसाद खूप काल व्यापक आहे हो. आधी नीट समजून घेव )

कपिलमुनी's picture

22 Jan 2015 - 5:05 pm | कपिलमुनी

पुल देशपांडेना भय्या म्हणायचे ना ?

बाळ सप्रे's picture

22 Jan 2015 - 5:27 pm | बाळ सप्रे

भाई म्हणत.. भय्या नव्हे.

खटपट्या's picture

23 Jan 2015 - 11:04 am | खटपट्या

अहो बरोबर काम करणार्‍या सौथ ईंडीयन माणसाचे नावच जीजू आहे. आता काय करणार बोला.

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 12:22 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 11:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी अगोदरच सांगितलं होतं की मुवि खुर्ची टाकून चाय सुलेमानीचे घुटके घेत प्रतिसादांचा गल्ला मोजत बसले आहेत ! :) ;)

अजया's picture

22 Jan 2015 - 12:23 pm | अजया

हा ५९९!

सहाशे एकाव्या प्रतिसादात या धाग्यावरचा बेस्ट प्रतिसाद दिल्याबद्दल स्रुजाचा सत्कार करण्यात येत आहे.
मुविंचे परत अभिनंदन आणि पुस्प्गुच!

चलतकू चुलत असल्याने फार हिरीरीने सहभागी नाही. पण अपेक्षा पाहून मला गंमत वाटली. मुलगी पश्चिम महाराष्ट्र मधली नको. कारण माहीतीनाही.फार भाऊ बहीण नको.अजून काही असतील तर माहीत नाही.
मला हा प्रकार अजिबात आवडत नाही.
पश्चिम महाराष्ट्र पर्मीprmi मनिमौ

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 2:07 pm | बॅटमॅन

पश्चिम महाराष्ट्रातली नको की पुण्याची नको असं म्हटलंय ;)

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 3:06 pm | मृत्युन्जय

पश्चिम महाराष्ट्र पुण्यात येते? ;)

माहिती नै. पण पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातच येते. ;)

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 4:15 pm | मृत्युन्जय

काय बोलता? म्हणजे पुणे हा वेगळा खंड नाही? ऐकावे ते नवलच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुण्याचं नावं काढलतं? आता १७,५०० परंत प्रतिसाद नक्की जाणार. संपादक बेरोजगारीच्या कुर्‍हाडीपासुन वाचणार. =))

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 3:12 pm | टवाळ कार्टा

पुणे नावाचे राष्ट्र करण्याची मागणी होणारै म्हणे ;)

पुणे नावाचे राष्ट्र करण्याची मागणी होणारै म्हणे

जी गोष्ट ऑलरेडी स्वतंत्र आहे तिच्यासाठी मागणी वैगरे काय करायची?

या निमित्ताने " पुणे नावाचे एक स्वतंत्र राष्ट्र " या माझ्या धाग्याची झैरात करतो
http://www.misalpav.com/node/29145

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

१५६१९ वाचने आणि ६११ (ही ६१२ वी) प्रतिक्रिया !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मुवि, हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 2:24 pm | टवाळ कार्टा

१५६१९ वाचने >> यावर जाउ नका...आपणच पान रिफ्रेश करत राहीलो तरी तो काउंट वाढतो ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाचायला असो की प्रतिसाद लिहायला असो, पण इतक्या वेळा पानाला भेट दिली गेली हे ही नसे थोडके ! (नुसते रिफ्रेश दुर्लक्ष करण्याइतके कमी असणार).

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 2:36 pm | टवाळ कार्टा

मुलगी दिसायला जर्रा ठिकठाक असेल तर ती माज करणारच...आणि बाकीचे सुध्धा ती अशी वागणार यात काहीच चुकीचे नाही असेच वागतात

स्नेहल महेश's picture

22 Jan 2015 - 2:45 pm | स्नेहल महेश

या धाग्यावरचा एकमेव वाचनीय प्रतिसाद!

बाकिचे प्रतिसाद पण वाच्लेत की उगी स्क्रोल बार पळवत पळव्त आणलाय.. नाही डॉक्टर काका, टका, पिडां काकांचे इ. इ. इ. प्रतिसाद पण वाचनीय आहेत म्हणून म्हटलं..

ह.घ्या.

स्नेहल महेश's picture

22 Jan 2015 - 3:32 pm | स्नेहल महेश

बाकिचे प्रतिसाद पण वाचलेत पण सुज्रा प्रतिसाद मनापासून आवडला

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 4:23 pm | हाडक्या

हो ते अनाहितांचेच फक्त पर्तिसाद वाचित असतील.. किंवा त्यांनाच फक्त पोच देत असतील. नै का ?

(ह.घ्या नै तर घेऊच नका.. ;) )

स्नेहल महेश's picture

22 Jan 2015 - 4:30 pm | स्नेहल महेश

चांगल्याला चांगलं म्हटल कि कित्ती लागत

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:45 pm | टवाळ कार्टा

self proclaimed??? :P

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 5:49 pm | हाडक्या

चांगल्याला चांगलं म्हटल कि कित्ती लागत

कायपन .. इथे प्रतिसादाला वैट कोण म्हणालंय. मागच्या पानावर जावून पहा की बै आमी छान म्हणून आलोय.
फक्त काही लोक ठराविक प्रतिसादांना प्रतिसाद देण्यापुरते मेन बोर्डावर (म्हणजे मुख्य व्यासपीठ म्हणायचय इथे..) येतात ते काही पटत नाही इतकेच.

विटेकर's picture

22 Jan 2015 - 3:19 pm | विटेकर

लग्न ही दोन व्यक्तींच्यापुरतीच मर्यादित असावी अशी खासगी गोष्ट आहे हे माझे मत. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आणि सर्वोच्च आहे. लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील. त्यात काही गैर नाही आणि संस्कृतीचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा, हा अटळ प्रवास होणार आहे.
तस्मात्, लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाची घटना आहे हा हट्टाग्रह आपण सोडून दिला तर बरेच प्रश्न सुटतील.

ऑब्जेक्शन मि लोर्ड !
लग्न ही वैयक्तिक बाब नाही. मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे आणि विवाह संस्थेमुळे समाजाची धारणा होते. धन्यो ग्रूहस्थाश्रमः| असे म्ह्ट्ले आहे ते उगीच नव्हे.
ती वैयक्तिक बाब असती तर इतकी झड़झडून चर्चा इथे झाली असती का ? ती महत्वाचीच घटना आहे आणि राहीलच कारण समाजाचा पायाच तो आहे. आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल.
समाजाच्या रक्षणासाठी काही एक नियम ( त्यालाच धर्म म्हणतात) घालून दिलेले आहेत ते बहुतांश लोकांनी पाललेच पाहीजेत. धर्मो रक्षिती रक्षित: | हे समाजाला देखील लागू आहे. तुम्ही समाजाचे नियम पाळ्ता म्ह्णून समाज तुमचे रक्षण करतो हे धडधडित सत्य न स्वीकारून कसे चालेल?
अनिर्बन्ध व्यक्तिस्वातंत्र्य विकृतीला जन्म देते हा आजपर्यन्तचा इतिहास आहे.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 3:25 pm | टवाळ कार्टा

लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील.

असे नेहमीच होते असे नाही...पण मुळात असे होउ नये यासाठीच तर जोडिदार निवडणे व्यवस्थित हवे ना

आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल.

आदिवासी समाजात असे चालते. त्यामुळे कुठे अराजक माजल्याचे दिसले नाही. झालंच तर स्त्रियांना तिथे नियमबद्ध समाजापेक्षा जास्ती मान असतो. नुस्ता थेरीत नाही, तर प्रॅक्टिकलमध्येही.

मग त्यांनाच प्र्गत म्हणायचे ना ? आदिवासी कशासाठी? असे एकाच पार्तनर बरोबर आयुष्य काढणारे अप्रगत अणि मागास मानयला हवेत !
एकपत्नी वाला राम ही मग मागासच म्हणायला हवा !
आणि किती पार्ट्नर बदलले यावर जर स्त्रीयांना मान द्यायचे ठरत असेल तर धन्यच म्हणायला हवे. स्त्रियांचा मान ही बाब मूळातच माणसाच्या रक्तात असायला हवी. आमच्या शशी थारूर नी बदलले पार्टनर .. आणि दिला का मान नव्या पार्तनरला?

उगीच रागवू नका. पार्टनर सारखे बदलणे आणि अराजक यांचा परस्परसंबंध नाही इतकेच सांगायचे आहे. त्यामुळे राम, शशी थरूर, इ.इ. वाईड बॉल सोडून दिल्या गेले आहेत.

दुसर्याच्या बाईलीवर डोळा ठेवला / अभिलाषा धरली तर महायुद्धे होतात , नुसते अराजक नव्हे ! उदा. रामायण अथवा महाभारत !
म्हणून धर्मसंमत बाईलीबरोबर संग केला पाहिजे... पार्टनर बदलणे हे धर्मसंमत नव्हे इतकेच !

आता तुम्ही परस्पर संम्मतीने .. काय हरकत आहे ? तसे होत नाही, कामातुराणाम न भयम न लज्जा !

पहिलं आणि दुसरं महायुद्ध काय बाईवरनं झालं? पुराणातल्या गोष्टी सोडून द्या.

बाकी याच धर्माने मस्तानीचा छळ केला तेही धर्मसंमतच असावे.

तदुपरि 'कामातुराणां न भयं न लज्जा' म्हणजे नक्कीच कोल्ह्याला द्राक्षे आंबट असलेल्यांनी रचलेला श्लोक असावा. दोन लोक परस्परसंमतीने काही का करेनात. जोवर कुणाला त्रास देत नाहीत तोवर संभोगाला असे हीन लेखायचे कारणच काय?