http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
________________________________________________________
नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया!
आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल! आधीच्या भागाप्रमाणेच मला न आवडलेली चरित्रे/आत्मचरित्रे याबद्दल दुसर्या एका भागात लिहूया!
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 1:34 pm | प्रचेतस
धन्यवाद पुस्तकमित्रा.
आत्मचरित्रांची आवड अजिबातच नाही. एकमेव आहे माझ्याकडे ते म्हणजे मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' जे अजूनही वाचले नाही.
चरित्रे मात्र कमल गोखलेकृत 'शिवपुत्र संभाजी', बाळ भागवतांनी लिहिलेले रिचर्ड बर्टनचे चरित्र ' शापित यक्ष' आणि अजून काही आहेत.
पैकी कमल गोखल्यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे सर्वोत्तम आहे. बर्याच दस्तऐवजांचा वापर करून लिहिलेले हे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.
15 Oct 2014 - 2:02 pm | पैसा
चकवाचांदण मीही घेतलंय. अजून वाचायला मुहूर्त लागला नाहीये. पण त्यात आत्मचरित्रात्मक भागाइतकाच इतर जंगलाबद्दलचा भागही आहे ना?
15 Oct 2014 - 2:05 pm | प्रचेतस
हो.
जंगल जगणारा माणूस हा. जंगलांतील अनुभव आल्याशिवाय कसे राहतील.
17 Oct 2014 - 9:19 pm | दशानन
चकवाचांदण वाचले नसेल सर्वात आधी, हे पुस्तक वाचायला घ्या.
अप्रतिम पुस्तक आहे. मला खूप भावलेले व आवडलेले.
15 Oct 2014 - 10:36 pm | स्पा
मी माझा, मग माझा कोणाचा - सुर्यकांत खोकले
मी माझा न तु हि माझाच - गुरुकांत चोखले
15 Oct 2014 - 10:50 pm | प्रचेतस
ते चरित्र/आत्मचरित्र नसून चारोळी संग्रह आहे.
15 Oct 2014 - 11:18 pm | स्पा
त्या चारोळ्यांमधुन लेखकाचे चरीत्रच उलगडत जाते .. मांडी घातलेले. त्यांचे भाऊ
गुरुकांत चोखले लग्नानंतर गायबच झाले , त्यांच्या काही चारोळ्या अजरामर झाल्यात पण,
16 Oct 2014 - 12:23 am | विलासराव
मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' हे आजच अंबरनाथला एका नातेवाईकांच्या घरी पाहीले. त्यांनी वाचाच म्हनुन सुचवले.
16 Oct 2014 - 1:48 pm | जिन्क्स
वल्ली तुम्ही चकवाचांदण वाचाचं. तुम्हाला नक्किचं आवडेल. कोणत्याही पानापसुन कधिही सुरु करावे असे हे पुस्तक. नवेगावबांध-अंधारी, कर्णाळा, महाबळेश्वर, ढेबेवाडी व इतर जंगलाचे आणि अनुभवांचे सुरेख वर्णन. पुलं, चित्रकार आमलेकर, जी ए यांच्यासोबतचे अनुभव ही सुरेख टिपलेले आहेत.
मला चितमपल्लींचे लिखाण प्रचंड आवडते. त्यांनी निसर्ग सोडुन इतर ही ललीत लिखाण करावे असे वाटते.
अवांतरः पुण्यातील युवाशक्ती ही संस्था पुर्वी चितमपल्लींसोबत महाबळेश्वर येथे जंगलवाचन कम ट्रेक आयोजीत करायचे.
15 Oct 2014 - 1:57 pm | पैसा
सगळ्यात पहिला नंबर अर्थातच लक्षुंबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांचा! त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझी जन्मठेप, ही पटकन आठवलेली आत्मचरित्रे. स्मृतिचित्रे इतकी निरागस आणि प्रांजळ की काय सांगावे, इतक्या साध्या भाषेत लिहिलेलं आहे की एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवता येत नाही. माझी जन्मठेप सुद्धा विलक्षण अनुभव देतं. पु.लं. नी रवीन्द्रनाथ टागोरांच्या लहानपणच्या आठवणींचं भाषांतर केलं आहे. तेही आठवतं आहे.
चरित्रांमधे अर्थातच बाबासाहेब पुरंदर्यांचं राजा शिवछत्रपती आहे, वीणा गवाणकर यांचं एक होता कार्व्हर आहे. अजून आठवेल तशी लिहीनच!
15 Oct 2014 - 2:00 pm | प्रचेतस
अरेच्चा, उपरोल्लेखित दोन चरित्रे माझ्याकडे पण आहेत, आठवली नाहीत चटकन.
15 Oct 2014 - 3:40 pm | विजुभाऊ
एक होता कार्व्हर. झालेच तर मंगला गोडबोलेंचे चीपर बाय डझन , मंगला निगुडकरांचे पॅव्हीलीयन ऑफ अ वूमन चेतना गोसावींचे तोत्तोचान. या पुस्तकांची पारायणे झालीत
15 Oct 2014 - 2:36 pm | अजया
अाशक मस्त फकिर हे वीणा देवांनी त्यांच्या वडिलांवर अर्थात गोनिदांवर लिहिलेलं छोटेखानी पुस्तक आहे.वडिलांच्या निरनिराळ्या छंदांविषयी.त्यांचं लेखन यावर लिहिलंय.आवडतं ते पुस्तक मला.चार्ली चॅपलीनच्या आयुष्यावरचं भा.द. खेरांचं हसरे दुःख पण छान चरित्र आहे.चकवाचांदण तर अप्रतिम,नावासकट! अनिल अवचटांचं आत्मचरित्र नाही म्हणता येणार पण स्वतःविषयी हे पुस्तक आणि छंदांविषयी सुध्दा.माझे आवडते लेखक असल्याने त्यांच्या आयुष्याबद्दल वाचायला अावडलं.
माझ्या अावडत्या आत्मचरित्रांतलं एक ,विंदाच्या पत्नी सुमा करंदीकरांचं रास.साध्यासुध्या गृहिणीने अापली संसारगाथा सांगावी तसं सोप्या शब्दात.एवढा महान कवि नवरा म्हणून असण्याची सुखदुःखं,त्यांच्या स्वभावाशी जुळवुन घेताना उडालेली तारांबळ,तरीही त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान .मला त्यांचं ते सरल लिखाण भावुन गेलं.आहे मनोहर तरी ,सुनिता बाई देशपांड्यांचं आणि रास लागोपाठ वाचल्यावरही सशक्त लिखाण करणार्या सुनिता बाईंच्या आत्मचरित्रापेक्षाही हे अभिनिवेशरहित लिखाण आवडुन गेलं!
अजून लिहिते नंतर,किती आवडता विषय काढला हो पुस्तकमित्र!!
15 Oct 2014 - 2:40 pm | मित्रहो
एपीजे कलाम. मी इंग्रजीत वाचले.
तसेच रश्मी बंसलचे "Stay Hungry Stay Foolish" कुरीयनचे "I too had a dream". आदर्श आणि नफ्यातली सहकार चळवळ म्हणजे काय आणि कशी राबवायला हवी हे समाजायला कुरीयनचे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. भयंकर आवडले.
15 Oct 2014 - 3:46 pm | मित्रहो
आचार्य अत्रे
मी फक्त दोन खंड वाचले.
15 Oct 2014 - 3:25 pm | Gayatri Muley
वरील प्रतिसादापैकी भरपूर आवडीचे आहेत, पण वरील प्रतिसादात उल्लेख न झालेल एक चरित्र सांगते, बी. डी. खेर यांचे "हसरे दुख"
15 Oct 2014 - 8:42 pm | विशाखा पाटील
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय.
'तें दिवस' हे तेंडुलकरांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या नजरेतून तो आरंभीचा काळ बघणं. दुर्दैवाने हे आत्मचरित्र पूर्ण झालं नाही.
16 Oct 2014 - 12:49 am | विलासराव
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय.
मी वाचले आहे. माझा त्यांच्या़कडे प्रत्यक्ष जाण्याचा विचार आहे. ज्यांच्याबरोबर माझी आज चकवाचांदण बद्द्ल चर्चा झाली त्यांना मी हेच पुस्तक सुचवले. त्यात ज्या डॉ. आशीष सातवांचा उल्लेख आहे त्यांची संस्था आहे "महान". त्यांची माझी प्रत्यक्ष भेट आणी चर्चा झालीये मे २०१२ मधे बाबांच्या(आमटे) सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबीरात. त्यांच्याकडेही जायचे आहे. डॉ. विकास आमटेंबरोबर मनसोक्त गप्पाही तेथेच झाल्याच. त्यांना मी माझी ब्राझीलवारी सांगीतल्यावर त्यांनी मला त्यांच्या अशाच आठवणीही सांगीतल्या. येत्या वर्षात हेमलकसा आनी मेळघाट दौरा नक्की करणार आहे. परत येईल तेंव्हा त्यावर लिहीलच. पण तोवर मेळघाटावरील मोहर नक्की वाचा.
मी खुप आत्मचरीत्र वाचले आहेत.पण आता नावे आठवत नाहीत. त्यातली काही नावे बाकी मिपाकरांनी लिहीलेली आहेत.
परंतु व्हाय नॉट आय? हे एक मुलगी डॉक्टरच्या चुकीने कायमचे अंधत्व आल्यावर त्यामुलीने आनी तिच्या आईने त्याचा कसा सामना केला. त्याचे व्रुत्तांकन त्यांच्याच शब्दात वाचताना आनी त्यामुलीने तरीही अर्थशास्त्र हा विषय घेउन पदवी मिळवली तेही पहील्या नंबराने. अर्थशास्रावरील संशोधनात तिने काही रिसर्च पेपर लिहीले आनी आता बहुतेक ती आता परदेशात करियर/रिसर्च करत आहे. अवश्या वाचा. तसंच "जगायचंय प्रत्येक सेकंद" हेही वाचनेबल.
मेळघाटावरील मोहर हे कोणी प्रकाशीत केलंय ते सांगु शकाल काय? मी विसरलो.
16 Oct 2014 - 8:13 am | विशाखा पाटील
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का?
'मेळघाटावरील मोहर' हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. १ ऑक्टोबर पासून त्यांनी एक उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक विकल्या गेलेल्या प्रतीमागे ५० रुपये हे डॉ. कोल्हेच्या सामाजिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. त्यात प्रकाशक आणि लेखक भर घालणार आहेत. राजहंसच्या websiteवर त्याची अधिक माहिती आहे. सर्वानीच जरूर बघावी.
http://www.rajhansprakashan.com/
16 Oct 2014 - 2:49 pm | विलासराव
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का?
लिहीन्याचा प्रचंड कंटाळा आहे. थोडक्यात सांगतो. बाबांनी ४५-४६ वर्शांपुर्वी हे शिबीर भरवायला सुरवात केली. उद्देश नवीन लोकांना समजासेवेत हातभार लावता यावा आनी त्यापेक्षा महत्वाचे एखाद्याला जर नवीन कार्यालाच हात घालायचा असेल तर त्याला पायाभुत माहीती बरोबरच सहकार्य मिळवुन देणे. बाबांपासुन प्रेरना घेउन अनेक लोकांनी जागोजागी सामाजीक काम सुरु केले आहेत. त्यातल्याच काही लोकांना तिकडे शिबीरात मार्गदरशनासाठी बोलावले जाते.ते त्यावर सर्व विवेचन करतात .मग आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो. त्याशिवायही सेशन संपल्यावर त्या वक्त्याशी गप्पा मारु शकतो.
दरवर्षी १५-२२ मे या वेळेत हे शिबीर असते. ५००-१००० लोक येतात. काही सहकुटूण्ब येणारे लोकही आहेत. पण ईन जनरल युवा लोकांचा भरणा जास्त असतो. ति़कडे सोमनाथला त्यावेळेस ४४-४९ या दरम्यान तापमान असते. झोपण्यासाठी मोठमोठे हॉल आहेत.सतरंज्या टाकलेल्या असतात बाकी चादर वगैरे आपण घेउन जायचे असते. पण उन्हाळा असल्याने थंडी नसते.सकाळी ४ ला ऊठायचे, पहील्या दिवशी ५-८ साधारण ग्रुप बनवले जातात. शेवटपर्यंत आपण आपल्याच ग्रुपमधे काम करायचे असते. प्रकल्पातील कार्यकर्ते ग्रुप लिडर असतात. सकाली चहा झाल्यावर प्रार्थना आनी लगेच साईअटवर प्रत्यक्ष काम करावे लागते साधारण २-३ तास. आम्हाला तळ्यातील माती उचलुन बाजुला टाकण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढावा हा उद्देश. मधेच साईटवरच नाष्टा मिळतो. ९ वाजता परत. आंघोळ आटपुन मग थोडा आराम. एका ग्रुपला रोज जेवनात मदतीसाटी कामातुन सुट्टी असते. मग त्यांनी जेवन बनवण्याबरोबरच सदा टाकणे , रांगोळ्या काढणे असे आपापले कौशल्य दाखवायचे असते. शेवटी एका ग्रुपला आपल्या कामाबद्दल छोटेसे बक्षीस दिले जाते. जेवनानंतर आराम झाल्यावर आलेले वक्ते त्यांच्या कार्याची माहीती देतात. मग एखादा विषय देउन त्यावर कुणीही दिलेल्या वेळेत त्यावर आपले विचार मांडू शकतो. कोणी उरलेल्या वेळेत योगा क्लासेश घेतो. कोणी भेंड्या खेळत बसतात. प्रत्येक ग्रूपला स्वतःचे नाटक बसवावे लागते. अशी एकंदरीत धमाल असते.
आमच्या वेळेस शिबीरात नशा हा विषय दिला होता. जेवढे लोक बोलले ते सगळे आमुक नशा कशी वाईट वगैरेवर बोलले. चांगलच बोलले. मग मला रहावले नाही. मी नशामुक्तीवर बोललो आनी त्यावर विपश्यना कशी प्रभावी मदत करु शकते त्यावर बोललो. त्यात मी परीक्रमेमुळे दाढी वाढवलेली होती व सफेद लुंगी आनी शर्ट असल्याने लोक मला महाराजच म्हणत होते. अन मी तेथे सांगीतले की मी १५-१६ वर्श रोज दारु प्यायचो मग विपश्यनेला गेलो आनी नशेतुन मुक्त झालो. मग जवळजवळ प्रत्येक शिबीरार्थी म्ला भेटायला येउ लागला. हे पाहुन मग डॉ. विकास आमटेंनी मला बोलावुन घेतले आनी आमची छानच मैत्री झाली.बाबा स्वतः नर्मदाकिनारी मेघाताइंना पाठींबा द्यायला तब्बल दहा वर्श राहीले त्याकाळात विकारभाउंनी स्वतः आनंदवन सांभाळले. आज आनंदवन स्वयंपुर्ण असुन ते जवळपास २७ प्रोजे़क्ट चालवतात. विकासभाउंना इंजीनीयर व्हायचे होते पण त्यांना डॉ. व्हावे लागले. पण त्यांनी तिथले तळे आनी घरे बांधतानाकत्यांच्या ईंजीनियरींगच्या कौशल्याचा उपयोग केलाय. त्यांना तशी घरे बांधण्यासाठी लातुर भुकंपानंतर ति़कडे बोलावण्यात आले होते. एकंदरीत हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे.
तिथुनच प्रेरणा घेउन स्नेहालय चालु करनार्यांचॉ मोठी टीम शिबीरात दरवर्षी येत असते. असो.
अवांतरः डोंबोली २-९ नोव्हेंबरला एक ग्रुप आनंदवन/ सोमनाथ / हेमलकसा आनी अभय बंगाची सर्च संस्था येथे जाणार आहे.
रेल्वे आरक्षनापासुन(३ एसी कारण आता स्लीपर आरक्षण मिळणार नाही. कोणी स्वतः आरक्षण करत असेल तरी चालु शकते.) जेवनखाण्यासह ९००० रुपये प्रतिव्यक्ती भरायचे आहेत. ति़कडे बसने प्रवास. ६ जागा शिल्लक आहेत.
16 Oct 2014 - 1:08 am | सखी
वा छान आणि जास्त न ऐकलेल्या पुस्तकांची नावं (अजया, विशाखा, विलासराव) कळत आहेत.
मला आहे मनोहर तरी, झिम्मा, अग्निपंख आवडले - मुख्य म्हणजे त्यातला प्रामाणिकपणा आवडला. सध्या मंगला गोडबोले यांच सुनिताबाई वाचतेय.
एक होता कार्व्हर ह्याचं मराठी रुपांतर इतकं भावलं नाही.
15 Oct 2014 - 10:03 pm | अजया
लंडनच्या आजीबाई हे ताराबाई वनारस्यांचं सरोजिनी बाबर यांनी लिहिलेलं चरित्र पण मनोरंजक आहे.लिहिता वाचता न येणारी खेडेगावातली मुलगी स्वकतृत्वावर कसे साम्राज्य निर्माण करते,घरादाराचा उध्दार करते,वाचायला छान आहे.
नाच गं घुमा हे रणजित देसाईंच्या पत्नी आणि लेखिका माधवी देसाई यांचं आत्मचरित्र अस्वस्थ करुन सोडणारं.
नाथ हा माझा हे कांचन घाणेकरांचं अतिशय प्रामाणिकपणे घडलं तसं अायुष्य सांगणारं चरित्र आहे.
श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!
16 Oct 2014 - 2:17 am | आदूबाळ
याचीच आठवण काढायला आलो होतो. एकच नंबर आत्मचरित्र.
16 Oct 2014 - 4:46 pm | सौंदाळा
नाव सांगाल का त्याचे?
(श्री. ना. पेंडसेंचा पंखा ) सौंदाळा
17 Oct 2014 - 7:56 am | अजया
श्री.ना.पेंडसे- लेखक आणि माणूस.
15 Oct 2014 - 11:00 pm | अर्धवटराव
विश्वास पाटलांचं महानायक (सुभाषबाबु) आणि संभाजी बरं वाटलं (छावा पेक्षा तर बरच उजवं). गंगाधर गाडगीळांचं दुर्दम्य अप्रतीम आहे. लोकमान्यांच्या गुणावगुणांचं रेखाटन उत्तम केलय गाडगीळांनी.
16 Oct 2014 - 12:45 am | भृशुंडी
स्मरणगाथा - गो.नी दांडेकर : खरंच वेगळं आणि वाचनीय असं जगलेली थोडकी माणसं असतात, त्यापैकी एक. अनुभव अस्स्ल आहेतच पण निव्वळ शब्दांमध्येही नाद आहे.
दळवींचं "आत्मचरित्राऐवजी" हेसुद्धा आवडलं.
बाकी ऐतिहासिक चरित्रं झेपली नाहीत.
16 Oct 2014 - 1:02 am | विलासराव
कोल्हाट्याचं पोर. बलुतं. पाथरवाटा. सुरेंद्रनाथ कांबळीचं पुस्तक त्याचं नाव आठवत नाही आता.ह्या कांबळींनी अंधत्व असताना केलेले अनेक मोठमोठे उद्यागधांदे. एक असतो बिल्डर. ही श्रींची ईच्छा- श्रीनिवास ठाणेदार. ईडली ऑर्कीड आनी मी- विट्ठ्ल कामत.
16 Oct 2014 - 1:04 am | मुक्त विहारि
गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे.
राजा शिव छत्रपती
श्रीमन योगी
माझी जन्मठेप
चीपर बाय द डझन
आयडा स्कॅडर
चार्ली चॅप्लीन (हसरे दु:ख)
शांतारामा
प्रथम पुरषी एक वचनी
कर्हेचे पाणी
एक होता कार्व्हर
नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त
विन्सटन चर्चील
नशायात्रा (ले. तुषार नातू... वाचले नसेल तर नक्की वाचा....)
क्लोरोफॉर्म
हेलन केलर
आहे मनोहर तरी
स्म्रुतीचित्रे
आमचा बाप अन आम्ही
द रूट (चार पिढ्यांची कहाणी... अप्रतिम पुस्तक जरूर वाचा... फार येडे करून सोडते हे पुस्तक)
आणि प्राण
देव आनंद
मधुबाला
इडली,आर्किड आणि मी (विठ्ठल कामत)
जगाच्या पाठीवर
शोभना समर्थ (ह्यांच्या पुस्तकाचे नांव विसरलो)
माझंही एक स्वप्न होते (वर्गीस... अमूल)
कॉलनी (लेखकाचे नांव विसरलो... बरे आहे पुस्तक... चार घटका करमणूक)
राऊ
त्रिंबक डेंगळे पाटील (जमल्यास नक्की वाचा....)
संघर्ष एका आईचा - नौदलाशी (आमच्या डोंबोलीतल्याच एका सुपुत्राची कथा आणि व्यथा)
स्टीव्ह जॉब्ज
एका चीनी वेश्येचे आत्मचरित्र वाचलेले आठवत आहे... (नेहमी प्रमाणे नांव विसरलो. माओच्या राजवटीच्या काळातले आहे. सरदार कन्या असून पण लहान-पणी केलेल्या एका चूकीची शिक्षा म्हणून तिची रवानगी जपानला केली जाते.पुढे ती जपानसाठीच हेर म्हणून चीनच्या विरिधात काम करते. एक खिळवून ठेवणारे पुस्तक.)
तसेच एका बार बार-बालेचे आत्मचरित्र वाचले होते. (हळदणकर असे नांव असावे...आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क बरीच कमकुवत झाली आहे...)
ही श्रींची इच्छा (श्रीनिवास ठाणेकर ह्यांचे सुंदर आत्मचरित्र...कर्नाटकातला एक मध्यम्वर्गीय मुलगा अमेरिकीत जातो काय आणि १००० एकर शेतीचा मालक होतो काय... प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... ह्याचा अर्थ शिकवणारे आत्मचरित्र...आम्हाला नावांपेक्षा , त्या पुस्तकातून काय शिकलो? हेच शिकायला मिळेते... शेवटी नावांत काय आहे?)
आणि असाच एक टाइमपास म्हणून ऑन लाइन चरित्र आहे. फसवेच आहे पण चार घटका निव्वळ करमणूक म्हणून एकदम योग्य... गरजूंनी व्य.नि. करावा.
10 Nov 2014 - 8:57 pm | श्रीगुरुजी
>>> गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे.
या पुस्तकाचे लेखक गोपाळ गोडसे आहेत.
10 Nov 2014 - 11:51 pm | मुक्त विहारि
यु आर राईट...
गलतीसे मिस्टेक हो गयेली है... गरीब हुं...
10 Nov 2014 - 11:54 pm | अर्धवटराव
=))
मनोजकुमारचा क्लर्क बघितला का इतक्यात ?
16 Oct 2014 - 9:37 am | स्पा
म्या फ्लिपकार्ट वरुन बेअर ग्रील्स चे आत्मचरीत्र मागवलयं, अजुन आलेलं नाही
16 Oct 2014 - 9:40 am | पैसा
लंडनच्या आजीबाई, सांगत्ये ऐका, ईडली ऑर्किड आणि मी, तसंच स्मरणगाथा ही सुद्धा खूप आवडलेली पुस्तकं.
16 Oct 2014 - 9:49 am | जेपी
राजा शिव छत्रपती,श्रीमान योगी, माझी जन्मठेप. संभाजी.
माधवराव पेशवेयांच्या जीवनावरील "स्वामी".आणखिन बरिच आहेत. नाव आठवत नाहित.
16 Oct 2014 - 9:53 am | पैसा
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते.
16 Oct 2014 - 9:56 am | जेपी
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते.
मान्य आहे. आपल्याला चरित्र आणी कादंबर्यात फरक कळत / जाणवत नाही.
16 Oct 2014 - 10:01 am | पैसा
चरित्र असते ना, ते ऐतिहासिक संदर्भ तसेच्या तसे घेऊन लिहिले जाते. त्यात लेखक स्वतःच्या कल्पनेने काही लिहीत नाही. मात्र कादंबर्यांमधे लेखक भरपूर स्वातंत्र्य घेऊन लिहितो. खर्या प्रसंगांबरोबर काही काल्पनिक प्रसंग लिहितो, तसेच काल्पनिक व्यक्तिरेखाही अॅड करतो.
16 Oct 2014 - 10:03 am | जेपी
ओके.
16 Oct 2014 - 9:57 am | विटेकर
एक झाड दोन पक्षी ....
अजिबात आवडले नाही ! उगाच आपल्या अविवेकी वागण्याचे लंगडे समर्थन वाटले.
कसे-बसे पूर्ण केले.
16 Oct 2014 - 10:00 am | विटेकर
स्मरण गाथा अणि कुण्या एकाची ...
दोन्ही क्लास ! पूर्वी त्याबद्दल लिहए आहेच.
16 Oct 2014 - 10:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या विशेष आवडीचा धागा.
१. पु.ल. देशपांडे (सगळी पुस्तकं)
२. माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर)
सिडने शेल्डन (सगळी पुस्तकं)
गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे)
वारस (मला हे पुस्तक हवयं विकतं पण मिळत नाहिये) (वासंती वाळिंबे)
श्यामची आई (पुर्वी आवडायचं आता त्यामधला फोलपणा लक्षात आलाय) (साने गुरुजी)
शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे)
मृत्युंजय (शिवाजी सावंत)
बाजार (लेखकाचं नाव लक्षात नाही पण कादंबरी फार सुंदर आहे, मिळत नाहीये ही पण आता)
श्रीमानयोगी (रणजित देसाई)
शाळा (मिलिंद बोकील)
गारंबीचा बापु (श्री.ना.पेंडसे)
शितु (गो.नी.दांडेकर)
पानिपत (विश्वास पाटील)
आहे मनोहर तरी (सुनिता देशपांडे)
झोंबी (आनंद यादव)
पडघवली (बहुतेक श्री.ना.पेंडसे)
द.मा.मिरासदार (सगळी पुस्तकं)
प्लेजर बॉक्स (व.पु. काळे)
ऐक सखे (व.पु. काळे)
वपुर्झा (व.पु. काळे)
पार्टनर (व.पु.काळे)
कथाकथन मधल्या बहुतेक गोष्टी (व.पु.काळे)
सुहास शिरवळकर (सगळी पुस्तकं)
गॉडफादर (मारिओ पुझो)
सिसिलिअन (मरिओ पुझो)
ओमेर्ता (मारिओ पुझो)
फुल्स डाय (मारिओ पुझो)
द पेट सिमेटरी (स्टिफन किंग)
द तालिस्मान (स्तिफन किंग)
रेझ द टायटॅनिक (क्लाईव्ह कसलर)
पोसायडॉन्स अॅरो (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर)
डीप सिक्स (क्लाईव्ह कसलर)
मे डे (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर)
व्हाईट डेथ (क्लाईव्ह कसलर)
ट्रोजन डेथ ( सद्ध्या वाचतोय, कालचं चालु केलय) (क्लाईव्ह कसलर)
पोलर शिफ्ट (क्लाईव्ह कसलर आणि पॉल केंप्रेकोस संयुक्तपणे)
द टाईम मशिन (एच.जी.वेल्स)
जंपर्स (स्टिव्हन गौल्ड)
पॅपिलॉन (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर)
बँको (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर)
ट्वेंटी थाउसंड लिग्स अंडर द सी (ज्युल व्हर्न्स)
जर्नी टु द सेंटर ऑफ अर्थ (ज्युल व्हर्न्स)
अराऊड द वर्ल्ड ईन एटी डेज (ज्युल व्हर्न्स)
तुन्त्सा (लेखक आठवत नाही, अमेरिकेमधल्या रेड ईंडियन्स चा उगम शोधायसाठी बालसा लाकडाच्या तराफ्यावरुन एक गट समुद्रातुन प्रवास करतो अशी गोष्ट आहे)
अजुन बरीच आहेत. वेळ मिळाला की टंकीन नावं.
16 Oct 2014 - 10:05 am | पैसा
या धाग्यात प्लीज आवडत्या चरित्र आणि आत्मचरित्राबद्दल लिवा, कादंबर्यांसाठी वेगळा धागा आहे.
16 Oct 2014 - 10:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हो आत्ता लक्षात आलं. तिकडे पेस्ट करतोय.
10 Nov 2014 - 8:55 pm | श्रीगुरुजी
>>> गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे)
या पुस्तकाचे लेखक गोपाळ गोडसे आहेत.
16 Oct 2014 - 1:43 pm | Maharani
वा मस्त धागा..वर येउन गेलेल्यातली काही वाचली आहेत.बरीच नवीन add झाली वाचली पाहिजेत च्या यादीत..
16 Oct 2014 - 1:45 pm | स्नेहल महेश
खूप छान आत्मचरीत्र आहे
१९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे,
कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत
नि:पक्षपाती लिखान
16 Oct 2014 - 2:05 pm | विवेक्पूजा
ह्रदयस्थ (डॉ. नितू मांडके)
झोंबी (आनंद यादव)
माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर)
नशायात्रा (तुषार नातू)
शांतारामा
16 Oct 2014 - 2:32 pm | शिद
तुमच्या ह्या धाग्यामूळे बर्याच नविन पुस्तकांची माहिती मिळाली.
धन्यवाद.
16 Oct 2014 - 3:10 pm | सानिकास्वप्निल
माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर
ढोर - भगवान इंगळे
बलुतं - दया पवार
हसरे दु:ख - भा.द.खेर
आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे
इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत
साम्राज्य बुरख्यामागचे द व्हेल्ड किंगडम - कारमेन बिन लादेन
दी ग्लास कॅसल - जेनेट वॉल्स
दी डायरी ऑफ अ यंग गर्ल - अॅनी फ्रँक
सोल सर्फर - बेथनी हॅमिल्टन
वार्ड नं ५ - डॉ. रवी बापट
एका खेळियाने- दिलिप प्रभावळकर
एका मारवाड्याची गोष्ट - गिरेश जाखोटिया
केतकर वहिनी- उमा कुलकर्णी
16 Oct 2014 - 3:43 pm | काळा पहाड
दादा कोंडकेंच्या "एकटा जीव" चं नाव कुणीच कसं घेतलं नाही?
16 Oct 2014 - 5:22 pm | पैसा
काही ठिकाणी जरा अतिरंजित वाटलं, पण एकूण वाचायला छान. वर सानिकाने लिहिलेलं कारमेन बिन लादेनचंही खूप छान आहे पुस्तक.
16 Oct 2014 - 4:47 pm | सौंदाळा
'माझंही एक स्वप्न होते' - वर्गीस कुरियन (मोदकाचा लेख वाचुन हे आत्मचरित्र वाचनालयातुन मिळवुन वाचले होते आणि आवडले)
17 Oct 2014 - 8:06 am | अजया
कारमेनचं पुस्तक घेतलं पाहिजे!
डाॅ.अानंदीबाई जोशींचं अंजली किर्तनेंनी लिहिलेलं चरित्रही छान आहे.कमल पाध्येंचं बंध अनुबंध ही अावडुन गेलेलं.
बेस्टेस्ट आत्मचरित्र नानु सरंजामेंचंच!!
17 Oct 2014 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पहिलं आत्मकथन वाचलं ते बीएला शिकत असतांना ऐच्छिक मराठी घेतलं तेव्हा दलित स्त्री आत्मकथन 'जिणं आमुचं' बेबीताई कांबळे यांच. धर्मांतरापूर्वीच्या महार समाजाचं चित्रण. महारा समाज मी पाहिलेला पण इतके बारीक तपशील त्यात वाचण्यात आले की अरेच्चा आत्मकथनात असं चित्रण असतं तर..सामाजिक उतरंड, ते अंगाण येणे, जातीव्यवस्थेचा संघर्ष ती भूक ती वर्णनं. मग पुढे काही दिवस आणि पुढच्या शिक्षणानिमित्त अशी अनेक आत्मकथनं मला आवडली.
माझ्या जल्माची चित्तर कथा- शांताबाई कांबळे, आठवणींचे पक्षी- प्र.ई.सोनकांबळे, (प्र.ई सर, आमचे औरंगाबादचे आणि यांना अनेकदा भेटण्याचा योगही अनेकदा आला होता. यांची एक सवय होती. कोणताही कार्यक्रम असला की प्रास्ताविकापासून ते आभारापर्यंत सर्व लिहुन काढायची.)
मला बरीच वाचायला मिळाली ती दलित आत्मकथनं मला हे सर्व समजुन घ्यायला खुप आवडलं. बलुतं- दया पवार, मला उध्वस्त व्हायचंय- मलिका अमर शेख, आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे, उपरा-लक्ष्मन माने, उचल्या लक्ष्मन गायकवाड. मिटलेली कवाडे-मुक्ता सर्वगौड, मरणकळा-जनाबाई गिर्हे, उर्मिला पवारांचं आयदान,
जगले जशी-लालन सारंग, सर्वात आवडलेलं आता हे का आवडलं माहिती नाही पण मला भिडणारं पुस्तक 'सर आणि मी' जोत्सना संभाजी कदम, चित्रकार असलेले ते प्राध्यापक आणि त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची विद्यार्थीनी. वयात दोघांच्या पंचवीस वर्षाचं अंतर. विद्यार्थी, प्रेयसी आणि पत्नी या तीनही अवस्थेचं चित्रण अतिशय सुंदर पद्धतीने आलं आहे, मिळालं तर नक्की वाचा.
असो, हल्ली वाचन कमी झालंय. पुस्तक उघडलं की कंटाळा येतो. आयुष्यातल्या एका नव्या वळणावर जरा गुंतलोय. नै तर आत्मचरित्र, आत्मकथनं वाचने ही माझी स्पेशालिटी होती.
-दिलीप बिरुटे
6 Mar 2017 - 3:09 pm | पुंबा
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल.
चिपर बाय द डझन हे आणखी एक सर्वांगसुंदर पुस्तक.
6 Mar 2017 - 4:05 pm | मोदक
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल.
नक्की कोणते पुस्तक..?
6 Mar 2017 - 5:34 pm | पुंबा
स्वारी.. :))
6 Mar 2017 - 7:08 pm | मोदक
धन्यवाद.
17 Oct 2014 - 12:33 pm | मनिष
खूप आहेत अशी चरित्र. आणि बर्याच वेळा केवल स्वतःच्या दृष्टीकोनातून लिहिली असली तरी काहितरी वेगळे काम केलेल्यांचे, वेगळे जीवन जगलेल्यांचे आयुष्य कसे होते - त्यांच्या अडचणी, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी निवडेलेले काम - ह्यात मला खूप रस वाटतो. आणि ती लोकंही माणंसच होती हे मनात असले असले की मग फारसे मुर्तिभंजन होत नाही, कारण त्यांच्या मुळी मुर्ती बनवतच नाही. शिवाय, अशी चरित्र वाचतांना लेखकाला स्वतःविषयी किती इनसाईट आहे ते जाणवतेच की - जसे दादा कोंडक्यांच्या आत्मचरित्रात ते स्वतःच्या एकटेपणाविषयी देवाला/नशिबाला दोष देताता, तेंव्हा ह्या माणसाला स्वतःच्या स्वभावाविषयी काहीच इन्साईट नाही का ह्याचे आश्चर्य वाटते, तसेच लता मंगेशकरांच्या पुस्तकांतही होते (नाव आठवत नाही - कित्येक बाबतीत त्यांची मते त्यांच्या पिढीच्या अल्पशिक्षित सामान्य व्यक्तिंसारखीच वाटतात. अर्थात त्या त्य व्यक्तिंचे त्यांच्या क्षेत्रातले असामान्यत्व सोडले तर तीही आपल्यासारखी सामान्य माणसेच असतात की, आणि चरित्रांतून तर हे फारच प्रकर्षाने जाणवते. तसेच काही व्यक्ति सर्वच बाबतीत (किवा का विशिष्ट गोष्टींचा) किती खोलवर अणी समग्रपणे विचार करतात (जसे अभय बंग), हेही जाणवते आणि मलातरी ते अतिशय स्फुर्तीदायी आणी प्रेरणादायी वाटते. आता मी तशीही ऐतिहासिक किंवा बॉलिवूड्/क्रिकेटर ह्यांची अतमचरित्र वाचत नाही - पण समकालीन किंवा थोडे आधिचे लेखक/नाटककार्/कलाकार, उद्योजक, प्रभावी/मुलखावेगळ्या व्यक्ती ह्यांची आत्मचरित्र आजही वाचायला आवडतात.
असो. ही माझी आवडती काही चरित्र/आत्मचरित्र. माही विशेष क्रम नाही, पण जशी आठवतील तशी लिहितो -
(१) मी अल्बर्ट एलिस (अंजली जोशी) - मानसशास्त्रात रस असलेल्यांनी तर वाचावेच, पण इतरांनीही आवर्जुन वाचावे असे पुस्तक. REBT च्या जनकाची ही गोष्ट मुळातुनच वाचण्यासारखी आहे. आणि त्याच्या अत्मचरित्रावर आधारीत असली तरी अनुवाद नसल्यामुळे भाषा आणि संगत दोन्हीही छान नैसर्गिक आहे. बरेचसे आपल्याला धक्कादायक वाटावेत अशे तपशील असले तरी त्यातून सतत जाणवणारी अल्बर्ट एलिस ह्याची सकारात्मक विवेकवादाची जाणीव ही कित्येक REBT च्या पुस्तकांपेक्षा जास्त परिणामकारक आहे.
(२) स्वतःविषयी (अनिल अवचट) - आत्मचरित्र नसले तरीही बरेचसे आत्मपर लिखाण. मी ह्यावर माझ्या ब्लॉगवर एक मोठा लेखही लिहिला होता. स्वतःविषयी हे पुस्तक म्हणून खूप परिणामकारक आहे. केवळ आत्मपर साहित्यलेखन यापलीकडे ते खूप काही आहे आणि हे यश केवळ अनिल अवचट यांच्या साध्या, सरळ आणि चित्रमय शैलीचं नाही. हे पुस्तक त्यांना वेगळ्या वाटेने जगतांना आलेल्या अनुभवांच्या नोंदींचे (memoirs ) आहे. त्यात कुठेही बडेजाव, आढ्यता नाही. हे अनुभव रोजच्या जगण्यातील आहेत – कुठल्याही क्रांतीच्या रोमहर्षक कथा नाही. कित्येक वेळा असे वाटते, अरे इतक्या साधेपणे आणि सहजपणे आपल्यालाही जगता आले तर? अर्थातच ते साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही.
(३) कैफी आणि मी (शौकत आझमी अनुवादः जयश्री देसाई )- हे असेच पुस्तक प्रदर्शनात अचानक सापडलेले एक रत्न. 'कैफी आझमी' ह्यांच्या पत्नी आणि शबाना आझमी ह्यांची आई शौकत आझमी ह्यांनी लिहिलेले. उदारमतवादी, साम्यवादी/समाजवादी, शायर कैफी ह्यांच्याविषयी - त्यांच्या विचारांविषयी, लिखाणाविषयी आणि कुटूंबाविषयी उत्सुकता होतीच म्हणून हातात घेतले आणि खूपच आवडले. तेंव्हाच्या समाजवादाचा, आदर्शवादाचा आणि जीवनाचा एक छानसा तुकडा आपण प्रत्यक्ष अनुभवतो ह्या पुस्तकात. त्यांच्या आयुष्यात मनस्वी निर्णयांतुनही जपलेले व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम आणि त्यांचा अगदी शायराना/फिल्मी रोमांस हे फार लोभसपणे येते ह्या पुस्तकात. शबानाची वैचारीक बैठक कशी निर्माण झाली असेल ह्याचाही अंदाज येतो. खुपच छान आहे पुस्तक हे. नक्की वाचा. मुस्लिम समाजातील रजिया पटेल, हमीद दलवाई, कैफी आझमी अशा उदारमतवादी विचारधारा नंतर फारशी प्रबळ का झाली नसावी ह्याची खंत वाटते! असो. हे पुस्तक आता कित्येक अमेरिकन विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात! : P
अजूनही आहे बरीच अनवट चरित्रे, लिहितो जमेल तसा नंतर!
17 Oct 2014 - 1:10 pm | पैसा
सगळ्यांनी अशीच थोडक्यात ओळख करून दिली तर अजून कितीतरी पुस्तके माहिती होतील.
19 Oct 2014 - 12:07 pm | एस
मुसाफिर, तराळ-अंतराळ, आमचा बाप आणि आम्ही, अशी बरीच आहेत.
19 Oct 2014 - 12:41 pm | अजया
हो,मुसाफिर छानच आहे.अच्युत गोडबोले या माणसाच्या बुध्दीला काय म्हणावे?किती निरनिराळ्या क्षेत्रात प्रभुत्व!!
19 Oct 2014 - 1:05 pm | प्रचेतस
:)
20 Oct 2014 - 10:31 am | कैलासवासी सोन्याबापु
१.नाझी भास्मासुराचा उदयास्त
२.एक होता कार्व्हर
३.वोल्गा जेव्हा लाल होते
४.अब्राहम लिंकन फ़ाळणी टाळणारा महापुरुष
५.ओपेन्हायमर
६.हसरे दुःख
७.महानायक
८.मृत्युंजय
९.दुर्दम्य
१०.इये सयाजीचिये नगरी
११.अकियो मोरिता एंड सोनी स्टोरी
१२. ली आयकोका
अजुन ही खुप आहेत आता आठवेनात , मुख्य आवड चरित्रे वाचन आहे
22 Oct 2014 - 1:44 am | आदूबाळ
नाझी भस्मासुराचा ... आणि व्होल्गा जेव्हा .... हे चरित्र म्हणता येईल का याबद्दल शंका आहे.
22 Oct 2014 - 7:58 am | कैलासवासी सोन्याबापु
आदूबाळ, सहमत आहे भाऊ साहेब! पण त्या बुक्स चं जे एक लेखाजोखा टाइप स्वरुप आहे त्याच्यामुळे मी बेंबट्या झालोय!!!
20 Oct 2014 - 12:52 pm | वेल्लाभट
मला वाचनाची आवड फार उशीरा म्हणजे चोविशीत वगरे लागलेली आहे. त्यामुळे अर्थातच वाचलेली पुस्तके मोजकी. पण आत्मचरित्र विशेष आवडतात. त्या व्यक्तीशी जवळून बोलता येतं.
मोजक्या वाचलेल्या पुस्तकातून आवडलेली आत्मचरित्रः
ओपन - आंद्रे आगासी - हे खूप आवडलं. इम्पल्सिव्ह परचेस. दिसलं, उचललं. पण इथूनच सुरुवात झाली खरी वाचनाची आवड जागृत व्हायला.
द लास्ट लेक्चर - रँडी पौश - हे ही छान आहे. बरं आहे म्हणजे.
कार्व्हर आणि इतर वर दिलेली नावं नोंद करून घेतोय. पुढे वाचायला.
20 Oct 2014 - 12:55 pm | वेल्लाभट
सी पी श्रीवास्तव लिखित, अशोक जैन अनुवादित लाल बहादुर शास्त्री वाचतोय.
22 Oct 2014 - 7:56 am | कैलासवासी सोन्याबापु
अतिशय उत्तम पुस्तक :)
10 Nov 2014 - 1:48 pm | सिरुसेरि
करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकही खुप छान आहे . त्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी , जुने औन्ध संस्थान , तिथले कर्मचारी , त्यांचे कौटुंबिक जीवन , बदल्या व त्यामुळे होणारी ओढाताण या मनाला हलवुन सोडणारया घटना सांगितल्या आहेत .
10 Nov 2014 - 8:52 pm | श्रीगुरुजी
'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे श्री श्री परमहंस योगानंदाचे इंग्लिशमधील आत्मचरीत्र मराठीत 'योगीकथामृत' या नावाने भाषांतरीत झालेले आहे. हे आत्मचरीत्र अतिशय आवडले. हे अनेकवेळा वाचलेले आहे.
डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरीस्टरचं कार्टं', डॉ. नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही', रमेश देवांचं 'या सुखांनो या', गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी' ही चरित्रे/आत्मचरित्र चांगली आहेत.
10 Nov 2014 - 9:02 pm | श्रीगुरुजी
अजून
'ही श्रींची इच्छा' (श्रीनिवास ठाणेदार),
'आहे मनोहर तरी' (सुनीता देशपांडे),
'अग्निपंख' (डॉ. अब्दुल कलाम),
'जिहाद' (अस्लम जमादार),
'इन्फिडेल' (या सुदानी लेखिकेचे नाव विसरलो)
इराण, इराक, पाकिस्तान, सुदान, सौदी अरेबिया इ. कर्मठ मुस्लिम देशातील महिलांनी लिहिलेली स्वतःची चरित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत. या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत.
7 Mar 2017 - 9:28 am | वडगावकर
अगदी खरंय....
कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही
गम्मत म्हणजे हे पुस्तक म्हणजे अध्यात्माचं प्रवेश द्वार आहे....
अजून थोडी.....
माय विकेड विकेड वेज-एरॉन फ्लीन (मराठी )
दिव्य स्पर्श -डॉ भोसले
प्रकाशाच्या वाटेवर- श्री.कृष्णानंद
सांगत्ये ऐका-हंसा वाडकर
एकटा जीव -दादा कोंडके
शांतारामा- व्ही शांताराम
माझा लढा-हिटलर (मराठी )
पॅपिलॉन-हेन्री शॅरीयर