बापू के भी ताऊ निकले तीनों बन्दर बापू के!
सरल सूत्र उलझाऊ निकले तीनों बन्दर बापू के!
सचमुच जीवनदानी निकले तीनों बन्दर बापू के!
ग्यानी निकले, ध्यानी निकले तीनों बन्दर बापू के!
जल-थल-गगन-बिहारी निकले तीनों बन्दर बापू के!
लीला के गिरधारी निकले तीनों बन्दर बापू के!
सर्वोदय के नटवरलाल
फैला दुनिया भर में जाल
अभी जियेंगे ये सौ साल
ढाई घर घोड़े की चाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
लम्बी उमर मिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
दिल की कली खिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
बूढ़े हैं फिर भी जवान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
परम चतुर हैं, अति सुजान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
सौवीं बरसी मना रहे हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
बापू को हीबना रहे हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
बच्चे होंगे मालामाल
ख़ूब गलेगी उनकी दाल
औरों की टपकेगी राल
इनकी मगर तनेगी पाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
सेठों का हित साध रहे हैं तीनों बन्दर बापू के!
युग पर प्रवचन लाद रहे हैं तीनों बन्दर बापू के!
सत्य अहिंसा फाँक रहे हैं तीनों बन्दर बापू के!
पूँछों से छबि आँक रहे हैं तीनों बन्दर बापू के!
दल से ऊपर, दल के नीचे तीनों बन्दर बापू के!
मुस्काते हैं आँखें मीचे तीनों बन्दर बापू के!
छील रहे गीता की खाल
उपनिषदें हैं इनकी ढाल
उधर सजे मोती के थाल
इधर जमे सतजुगी दलाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
मूंड रहे दुनिया-जहान को तीनों बन्दर बापू के!
चिढ़ा रहे हैं आसमान को तीनों बन्दर बापू के!
करें रात-दिन टूर हवाई तीनों बन्दर बापू के!
बदल-बदल कर चखें मलाई तीनों बन्दर बापू के!
गाँधी-छाप झूल डाले हैं तीनों बन्दर बापू के!
असली हैं, सर्कस वाले हैं तीनों बन्दर बापू के!
दिल चटकीला, उजले बाल
नाप चुके हैं गगन विशाल
फूल गए हैं कैसे गाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
हमें अँगूठा दिखा रहे हैं तीनों बन्दर बापू के!
कैसी हिकमत सिखा रहे हैं तीनों बन्दर बापू के!
प्रेम-पगे हैं, शहद-सने हैं तीनों बन्दर बापू के!
गुरुओं के भी गुरु बने हैं तीनों बन्दर बापू के!
सौवीं बरसी मना रहे हैं तीनों बन्दर बापू के!
बापू को ही बना रहे हैं तीनों बन्दर बापू के!
नागार्जुन (यात्री) मैथली भाषेतील एक नामवंत कवी यांनी अनेक सामाजिक, राजकीय कविता लिहिल्या, काव्याच्या माध्यमातून बोचरी टिक्का ते समाजव्यवस्थेवर नियमित करत आले, यांच्या कवितेचा परिचय मला एका दैनिक भास्कर मध्ये आलेल्या त्यांच्या कवितेवरून झाला, व एक आशय संपन्न असे साहित्य हाती लागले. सध्य राजकारणावर ही कविता कुठेतरी लागू होते असे वाटले म्हणून याच कवितेवर लिहितो आहे. बापू म्हणजे गांधीबाबा, त्यांची जगप्रसिद्ध माकडे कोण कसे विसरेल? कारण त्यांच्या तत्त्वाचे सार सांगणारी ही माकडे! वाईट पाहू नका, वाईट बोलू नका व वाईट ऐकू नका! देशाला स्वातंत्र्य मिळाले, जनतेचे राज्य प्रस्तापित झाले. व त्याच सोबत आपल्यावर अधिकार गाजवायला ही तीन माकडे देखील सोबत आली. ही कविता त्यांनी गांधीबाबाच्या १०० व्या जयंती निमित लिहिली असावी.
बापू के भी ताऊ निकले तीनों बन्दर बापू के!
सरल सूत्र उलझाऊ निकले तीनों बन्दर बापू के!
गांधीबाबाचे पण आजोबा/काका निघाले हे तीन माकड, त्यांचे सरळ साधे असलेले तत्त्वज्ञान, त्यांनी आपल्या गरजेनुसार असे वापरले की कवीच्या दृष्टीने ते सरळ साधे त्यांनी अगम्य करून ठेवले.
सचमुच जीवनदानी निकले तीनों बन्दर बापू के!
ग्यानी निकले, ध्यानी निकले तीनों बन्दर बापू के!
जल-थल-गगन-बिहारी निकले तीनों बन्दर बापू के!
लीला के गिरधारी निकले तीनों बन्दर बापू के!
ही माकडे तर एवढी हुशार निपजली की, त्यांचे ज्ञान, बुद्धी याच्या जोरावर ते तर जनतेसाठी अत्यंत गरजेचे होऊन बसले, त्यांचा वावर कोठे नव्हता? जल-जमीन-आकाश त्यांनी व्यापून टाकले. कृष्णाच्या लीला त्यांच्या लीलांच्यासमोर फिक्या पडाव्यात, एवढे हे चतूर होते.
सर्वोदय के नटवरलाल
फैला दुनिया भर में जाल
अभी जियेंगे ये सौ साल
ढाई घर घोड़े की चाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
भारतीय स्वातंत्र्य यशाच्या सोबत हे देखील उगवले, जसा जग व्यापणारा सूर्यदेव, हे सदासर्वदा येथेच वास करणार आहेत. क्षणात आभा जशी दाखवते निराळे रंग, तसे हे बदलतात आपले रंग, आपल्याला वाटते ते चालेले दोन पाऊले सरळ पण क्षणात बदतील आपली दिशा, आपण गाफील राहतो, कारण पण त्यांच्या मनात काय आहे याची आपल्याला सुतराम जाणीव नसते. बोलतील एक, दाखवतील एक व होईल एक. कोण खात्री देणार?
लम्बी उमर मिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
दिल की कली खिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
बूढ़े हैं फिर भी जवान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
परम चतुर हैं, अति सुजान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
सौवीं बरसी मना रहे हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
बापू को हीबना रहे हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के!
हे जवळपास अमरत्वाला पोचले आहेत, त्यांना कोणी संपवू शकत नाही याची त्यांना खात्री झालेली आहे, एवढी की तारुण्याचा जोश अंगी भिनला आहे त्यांच्या जरी लटपटत असले वयोमानाने त्यांचे पाय. शंभरावा जन्म दिवस गांधीबाबाचा रंगून साजरा करत आहेत ही माकडे. अनेक योजना आणि कल्पनाचे हे सृजन करत आहेत, मलिदा मिळवण्यासाठी. पण सोबत ते गांधीबाबाला पण खूष करत आहेत, प्रत्येक योजनेला त्यांचे नाव देऊन.
बच्चे होंगे मालामाल
ख़ूब गलेगी उनकी दाल
औरों की टपकेगी राल
इनकी मगर तनेगी पाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
कमवायचे फक्त आपल्यासाठी नाही आहे, सात पिढ्याचा उद्धार झाला पाहिजे ना? मग तेवढी व्यवस्था नको करायला? अनेक पिढ्यान पिढ्या चालतील अश्या योजना निर्माण करून आपल्याच मुला-बाळांची व्यवस्था त्यांनी नीट लावली आहे, ज्यांना जमले नाही ते यांच्या मागे आहेत, लाळ गाळात, ते देतील तो तुकडा आपला आणि ते आपले मालक समजत! हे स्वत:सह आपल्या सात पिढ्यांसाठी तयारी करून अमर होऊन बसले आहेत.
सेठों का हित साध रहे हैं तीनों बन्दर बापू के!
युग पर प्रवचन लाद रहे हैं तीनों बन्दर बापू के!
सत्य अहिंसा फाँक रहे हैं तीनों बन्दर बापू के!
पूँछों से छबि आँक रहे हैं तीनों बन्दर बापू के!
दल से ऊपर, दल के नीचे तीनों बन्दर बापू के!
मुस्काते हैं आँखें मीचे तीनों बन्दर बापू के!
दाम करी काम! या तत्वाचे हे नेहमीच पालन करत आले आहेत, पण इतर जगासाठी त्यांचे प्रवचन म्हणजे काय बोलावे! नेहमी सत्य आणि अहिंसा याची जप माळ ओढत, समोरचा आपल्याच पैकी दिसला की त्याला आपल्यात सामावून घ्याचे. मग तो कोणी का असेना? त्याचा झेंडा कुठला याचा यात संबध आला कुठला? जो "दाम" मूल्य जाणतो तो आपला, त्याचे हसत-गात आपल्या कळपात स्वागत करणे हीच तर नीती. बाकी सगळी अनीती.
छील रहे गीता की खाल
उपनिषदें हैं इनकी ढाल
उधर सजे मोती के थाल
इधर जमे सतजुगी दलाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
कर्म, कांड, धर्म, गीता, उपनिषेद हे सर्व गरजेनूसार वापरायचे, हवे ते घ्याचे, नको ते दुसऱ्यावर थापायचे. मग कधी यातून देखील माल जमा करायचा, यांना कश्याचाच विधिनिषेध नाही आहे, जे जे मिळत आहे ते ते आपले, मार्ग भले कुठला ही असो, आपले पोट भरले की झाले!
मूंड रहे दुनिया-जहान को तीनों बन्दर बापू के!
चिढ़ा रहे हैं आसमान को तीनों बन्दर बापू के!
करें रात-दिन टूर हवाई तीनों बन्दर बापू के!
बदल-बदल कर चखें मलाई तीनों बन्दर बापू के!
गाँधी-छाप झूल डाले हैं तीनों बन्दर बापू के!
असली हैं, सर्कस वाले हैं तीनों बन्दर बापू के!
हातात वस्तरा घेऊनच फिरत असतात तिन्ही लोकात ही माकडे. एवढे त्यांनी स्वत:ला मोठे करून ठेवले आहे की आकाश देखील त्यांच्या समोर छोटे दिसत आहे. दोन्ही हातांनी जेवढे घेता येईल तेवढे ते घेत आहेतच पण सोबत फक्त बदल म्हणून अनेक परिक्रमा जगाची ते करत असतातच, सरकारी खर्चावर. आपल्या अस्तित्वाची एक खुण मात्र नेहमी ते जवळ बाळगतात, डोक्यावर टोपी गांधीची आणि अंगावर सदरा खाकीचा.
दिल चटकीला, उजले बाल
नाप चुके हैं गगन विशाल
फूल गए हैं कैसे गाल
मत पूछो तुम इनका हाल
सर्वोदय के नटवरलाल
कुठे कुठे त्यांचे अस्तित्व आहे? त्यांनी तर आकाशासारखे आपल्याला वेढले आहे, जेव्हा तो वृद्ध, तेवढाच तो अस्सल असे आपल्यावर त्यांनी ठसवले आहे. याचा लाभ घेत, मोठी मोठी रसिक पदे मिळवत ते अमरत्वाचा आनंद घेत आहेत.
हमें अँगूठा दिखा रहे हैं तीनों बन्दर बापू के!
कैसी हिकमत सिखा रहे हैं तीनों बन्दर बापू के!
प्रेम-पगे हैं, शहद-सने हैं तीनों बन्दर बापू के!
गुरुओं के भी गुरु बने हैं तीनों बन्दर बापू के!
सौवीं बरसी मना रहे हैं तीनों बन्दर बापू के!
बापू को ही बना रहे हैं तीनों बन्दर बापू के!
या शेवटच्या ओळी मी न लिहिताच सर्व गर्भित अर्थासह तुम्हाला समजल्या असतीलच. काही लोक आपापल्या पद्धतीने समाजाचे भले करत असतात, मग कोणी कार्य करून, कोणी हाती शस्त्र धरून, तर कोणी हातात कलम घेऊन! कवी हा सर्वात शेवटी असतो, हातात कलम घेऊन, पण त्याचा घाव खूप खोलवर होतो, अगदी आपल्याला मनाच्या तळापासून झटका देऊ शकेल एवढी ताकद त्याच्या लेखणीमध्ये असते.
असो, असेच सुचले, मनाला पटले म्हणून तुमच्यासमोर या चार ओळी घेऊन आलो. कवी नागार्जुन (यात्री) मैथली भाषेतील एक नामवंत कवी होते, यांचा मृत्यु १९९८ मध्ये झाला. त्यांना ही माझ्याकडून श्रद्धांजली!
प्रतिक्रिया
11 Sep 2014 - 6:03 am | कवितानागेश
खूपच छान आहे कविता. :)
अवांतरः ही कविता 'हिन्दी'च वाटतेय. मैथली भाषा जरा वेगळी आहे ना?
11 Sep 2014 - 9:24 pm | दशानन
मैथली लिपी ही वेगळी आहे, ही देवनागरी मध्ये आहे.
11 Sep 2014 - 8:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कविता आवडली.
बाकी गांधींच्या माकडांचे सद्ध्याचे संदेश असे आहेत.
१. जनतेवर होणार्या अन्यायाविषयी, भ्रष्टाचाराविषयी बोलणार नाही.
२. जनतेचे म्हणणे ऐकणार नाही.
३. जनतेवर होणारे अत्याचार, बेकारी, बलात्कार आदी समस्या मला दिसणार नाहीत.
13 Sep 2014 - 3:08 pm | विलासराव
आजच्या परीस्थीतीचं यथार्थ वर्णन वाटतेय.पण हेही दिवस जातील.
13 Sep 2014 - 3:51 pm | काउबॉय
अन्वयार्थ असलेली कविता.
13 Sep 2014 - 3:59 pm | पैसा
कविता आणि रसग्रहण आवडले. असेच आणखी लिखाण येऊ दे.
1 Oct 2014 - 10:46 pm | दशानन
उद्या, गांधी जयंती!
त्यांचे पुण्यस्मरण म्हणून ही कविता पुन्हा वर घेऊन येत आहे.