(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)
_____________________________________
मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे
वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे.
मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो}
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.}
मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.}
वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :-
An Introduction to the "MantraŚãstra"
MANTRAS
दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे !
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो.
वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो.
मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १}
या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती.
२)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता.
३}घरात अनेकदा मला न मिळणार्या,दॄष्टीस न पडणार्या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली.
४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली.
या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत.
या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख}
जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
प्रतिक्रिया
12 Feb 2014 - 9:33 pm | बिपिन कार्यकर्ते
:)
13 Feb 2014 - 12:01 am | कवितानागेश
सापडलं का?
13 Feb 2014 - 5:36 am | स्पंदना
धन्य आहे!
आधी मंत्र, मग श्रद्धा, मग गाई म्हशी अन आता चक्क बिकांवर गाड उतरलं.
असोच!
13 Feb 2014 - 12:41 pm | प्यारे१
गाडं घसरण्यासाठीच असतं! ;)
13 Feb 2014 - 3:30 am | नंदन
बाहुसहस्त्रवान् की बाहुसहस्रवान्?
नै म्हंजे इत्का पावरबाज मंत्र चुकीचा म्हणून कसं चालेल नै का? मग बिकांना जुनं मिपा सापडायचं कसं? (शुद्धलेखनाला काय, जुनं मिपा सापडलं की पुन्हा फाट्यावर मारता येईल.)
13 Feb 2014 - 3:44 am | मदनबाण
बाहुसहस्रवान्
चूक निदर्शनास आणुन दिल्या बद्धल धन्यवाद ! :) यापुढे देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. :)
बाकी बिकांशी "सहमत" म्हणुन देखील प्रतिसाद दिला असता तर जुने मिपावर प्रतिसाद वाचतो आहे असा फिल त्यांना लगेच आला असता. ;)
13 Feb 2014 - 11:48 am | कवितानागेश
इतक्या गंभीर विषयांवर चर्चा चालली असताना मध्येच २ ज्येष्ठ सदस्यांनी शुद्धलेखनाचा आग्रह धरलेला पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली!
13 Feb 2014 - 12:32 pm | बॅटमॅन
अन कार्तवीयोजुनो असाही एक चुकीचा पाठ आलाय. तो 'कार्तवीर्योऽर्जुनो' अथवा 'कार्तवीर्यार्जुनो' असा पाह्यजे.
13 Feb 2014 - 6:40 pm | मदनबाण
अन कार्तवीयोजुनो असाही एक चुकीचा पाठ आलाय. तो 'कार्तवीर्योऽर्जुनो' अथवा 'कार्तवीर्यार्जुनो' असा पाह्यजे
ओक्के. धन्यवाद. तुझ्या पाहण्यात याचा संदर्भ असेल... तर जरुर कळव. { हे खोचकपणे सांगत नाही.} म्हणजे चूक दुरुस्त करण्यात मदत होइल. मला संस्कॄत विषयक जास्त माहिती नसल्याने { ते तुला जास्त योग्य माहित असल्यानेच ही विचारणा करतो आहे.} चूक होण्याची शक्यता अधिक आहे.
मुद्रा राक्षसामुळे तसेच टंकन चुकांमुळे हा त्रास होतो. मी दिलेला मंत्राचा फोटो पाहिलास तर त्यात स्त्र आहे, पण नंदन ने ती चूक {स्र} निदर्शनास आणुन दिली. ज्या पीडीएफचा संदर्भ दिला आहे त्यात सुद्धा असे दोष आहेत.
बर्याच वेळेला असे वाटते की पूर्वी जे मौखीक स्वरुपात पाठांतर आणि त्याचे अध्ययन आणि शिकवले जायचे त्यामागे उच्चारात चूक राहु नये हा मुख्य उद्देश असावा... अर्थात हा तर्क आहे.
13 Feb 2014 - 2:48 pm | आंबट चिंच
पण मी काय म्हणतो की बायकोचं तोंड बंद करण्यासाठी काही मंत्र आहे काय हो?
तसेच तिचा संशयी स्वभाव जाण्यासाठीही काही असेल तर सांगा ब्वॉ .
नाही म्हणजे घरात शिरल्या शिरल्या जी भुणभुण चालु होते त्यातुन जरा तरी शांतता मिळेल.
13 Feb 2014 - 3:34 pm | प्यारे१
एका आश्रमात एक माणूस जातो.
मुख्य साधू नि पाच सात सादू चटई टाकून ध्यान करत बसलेले असतात.
माणूस मुख्य साधूला तुम्ही विचारला तोच प्रश्न विचारतो.
साधू म्हणतो, ती कोपर्यातली चटई घे आणि हो ज्जा शुरु!
13 Feb 2014 - 8:30 pm | सोत्रि
आज,
सार्थक झाले!
आज मी धन्य झाल्या गेले आहे!!
- ('मरा...मरा' असे मंत्राचरणारा) सोकाजी
13 Feb 2014 - 11:38 pm | अर्धवटराव
हाए बेवफा...तुम्ही आपल्या वारुणी बाईचे उपकार नाहि स्मरले हो सोत्री शेठ...
14 Feb 2014 - 2:52 pm | धन्या
किंचित सुधारणा: वेलकर नव्हे; वेलनकर.
13 Feb 2014 - 10:23 pm | खटपट्या
हा लेख वाचायला लागल्यापासून माझा हरवलेला पेन ड्राइव्ह नाही सापडला, पण मला दुसरा पेन ड्राइव्ह सापडला.
14 Feb 2014 - 12:08 am | कवितानागेश
कुणाचा सापडला?
माझा एक हरवलाय ८जीबी चा.
14 Feb 2014 - 2:33 am | खटपट्या
८ जीबी चा कुठला सापडायला. एक जीबी चा सापडला.
मंत्रा मध्ये ताकद आहे कि नाही माहित नाही पण या लेखामध्ये आहे.
आता माझे काहीही हरवले कि मी हा लेख नजरेखालून घालणार …
----------------------------------------------------------------------
अंधश्रद्धेकडे झुकत चाललेला
14 Feb 2014 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा
मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव
(संपूर्ण प्रतिसदांसह)धागा वाचल्यावर...
माझ्या मनाची कमजोरी हेच मंत्राचे सामर्थ्य आहे..
अशी सही घ्याविशी वाटतीये! ;)
14 Feb 2014 - 12:08 am | यसवायजी
टाळ्या. :))
14 Feb 2014 - 1:45 am | अर्धवटराव
बुवा, एका शंकेचं समाधान करा ना...
मनाची कमजोरी कशाला म्हणावे? कुठल्याही प्रकारची भावना उत्पन्न होणं-अगदी शौर्याची, प्रणयाची सुद्धा- मनाची कमजोरी असावी काय?
14 Feb 2014 - 5:20 am | अत्रुप्त आत्मा
@कुठल्याही प्रकारची भावना उत्पन्न होणं-अगदी शौर्याची, प्रणयाची सुद्धा- मनाची कमजोरी असावी काय?>>> नाही ती कमजेरी नव्हे... आणि असलीच,तर तिचा मंत्र म्हणून काही परिणाम होण्याशी (ह्या धाग्यात म्हणतात..) तसला काही संमंधही नव्हे. :)
14 Feb 2014 - 5:37 am | अर्धवटराव
कारण ति कमजोरी आहे असं बुद्ध म्हणतो. आणि मग कुठल्याच प्रकारचं सामर्थ्य काहिच उपयोगाचं राहात नाहि. मग तुम्ही कुठली सही वापरणार?
14 Feb 2014 - 7:45 am | अत्रुप्त आत्मा
@कारण ति कमजोरी आहे असं बुद्ध म्हणतो. >>> म्हणू दे. बुद्धानी किंवा अजुन कोणी काय म्हटलं यापेक्षा मी खरं जे असेल. ते पाहुन वागावं,असं मानतो.
@आणि मग कुठल्याच प्रकारचं सामर्थ्य काहिच उपयोगाचं राहात नाहि. मग तुम्ही कुठली सही वापरणार? >>> ते त्यानी म्हटलेलं आहे. आणि वर स्पष्ट केल्याप्रमाणे तो माझा विषय नाही. त्यामुळे सहि'चा मुद्दा आपोआपच रद्दबातल होउन जातो.
14 Feb 2014 - 8:35 am | अर्धवटराव
मला वाटलं तुम्ही विचाराल कोण बुद्ध =))
असो. तो तुमचा विषय नाहि, सहिचा मुद्दा रद्दबातल केला म्हटताय... मंत्रांचे साईड इफेक्ट्स खरच दिसायला लागलेत मिपावर.
14 Feb 2014 - 8:54 am | अजया
माझ्या मनाची कमजोरी हेच मंत्राचे सामर्थ्य आहे.....लाख वेळा अनुमोदन आहे!
14 Feb 2014 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा
@मला वाटलं तुम्ही विचाराल कोण बुद्ध Lol>>> =)) छे..छे.. आमी तर नीरं-बुद्ध =)) कुठले एव्हढे कळणार आंम्हाला?
@असो. तो तुमचा विषय नाहि, सहिचा मुद्दा रद्दबातल केला म्हटताय... मंत्रांचे साईड इफेक्ट्स खरच दिसायला लागलेत मिपावर.>>> प्यार के होते है..तो मंत्रा'के क्यूं नही???
14 Feb 2014 - 8:49 am | अजया
=))
14 Feb 2014 - 12:24 am | बॅटमॅन
अगदी खरेय बुवा =)) =)) पूर्ण सहमत.
या धाग्यावर चाललेला निर्बुद्धजखमीपणा पाहून तुम्ही म्हणता तसेच वाटू लागले आहे. संतांच्या नावाने प्रत्यही गळे काढणारे लोक विकारात लिडबिडल्याचा भयाण साक्षात्कार या निमित्ताने पुनरेकवार झाला हे मात्र या धाग्याचे बलस्थानच मानले पाहिजे बाकी. इतके सद्गुणपुतळे इ. असणारे दांभिकसम्राट जेव्हा भ्यँ करून लहान पोरागत गळा काढतात तेव्हा मजा येते खरी.
14 Feb 2014 - 12:26 am | प्यारे१
अलेलेलेलेले!
14 Feb 2014 - 12:29 am | बॅटमॅन
फार लागलं का बे? मंत्र टाकूया हं त्याच्यावर!
14 Feb 2014 - 12:31 am | प्यारे१
झाले २००!
मदनबाणाचे द्विशतकाबद्दल अभिनंदन!
14 Feb 2014 - 12:36 am | बॅटमॅन
बाणाचे अन सर्व उत्साही मांत्रिकांचेही हबिणंदण!
14 Feb 2014 - 2:37 am | खटपट्या
अहो हे सर्व अनिरुद्ध बाबाच्या जपा मुळे होतंय
त्रिशतक नक्की गाठणार
14 Feb 2014 - 2:38 am | अर्धवटराव
Koro pndu Singer Howie brings chaos and holistic medicine APP
! Tsy ldhly betel leaf Marathi reach glky Coins
च्यायला... त्या वल्ल्याला पकडावं लागतय आता याचा अर्थ समजुन घ्यायला. नक्कीच कुठला तरी शिलालेख वगैरे असावा. पण हे उर्दु आहे... मग काय वाळवंटात शिलालएख शोधले का काय??
14 Feb 2014 - 11:24 am | बॅटमॅन
कौरवपांडव संगरतांडव द्वापरकाली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती
असे लिहिले आहे. त्या गुगलबाबाने पानपतीचे betel leaf इ.इ. भाषांतर करून धमाल केलेली आहे न्हेमीप्रमाणेच.
14 Feb 2014 - 1:16 am | लंबूटांग
तुम्ही कधी हे प्रयोग केले आहेत का? अथवा आत्तापर्यंतच्या अनुभवांवरून उत्तरे दिलीत तरी चालेल.
आता मलाच पडताळा घेऊन पाहायला सांगणार असशील तर राहू देत कारण मला माझ्या हरवलेल्या वस्तू मिळायला त्याच जागी परत जाणे शक्य नाही आणि इथे मला ओळखणारे लोकही फारसे नाहीयेत जे वस्तू सापडली तर परत आणून देतील. बरेचदा तर वस्तू कुठे पडतात/ विसरल्या जातात तेच आठवत नाही.
14 Feb 2014 - 1:04 pm | बाळ सप्रे
अहो एवढी चिकित्सा करायची नसते.
श्रद्धा वाढवा !!
वस्तु परत न मिळाल्यास, भक्ति ही मोबदल्यात काहीतरी मिळावे म्हणून करायची नसते असे सांगायला शिका !!
14 Feb 2014 - 2:42 pm | यसवायजी
+१
काय राव, तुम्ही तर धाग्यातली हवाच काढली की.
मंत्र काय मुखशुद्धीला वापरायचे का मग :D
14 Feb 2014 - 2:18 pm | साती
कुठला मंत्र म्हटल्यावर बॅटमनची मंत्रशक्तीवरची हरवलेली श्रद्धा परत येईल?
;)
14 Feb 2014 - 2:57 pm | पिलीयन रायडर
हरवलेली गोष्ट मुळात आधी तुमच्याकडे असावी लागते...!
14 Feb 2014 - 4:47 pm | प्यारे१
___/\___
14 Feb 2014 - 4:53 pm | बॅटमॅन
मूळ मुद्दा समजून घेण्याचाही पेशन्स असावा लागतो. :)
असो, बाकी चालू द्या.
14 Feb 2014 - 4:59 pm | पिलीयन रायडर
दादा... तुझ्या प्रमाणे माझाही अशा कोणत्याही मंत्रावर विश्वास नाहीये.. मी "तुझ्याकडे अक्कल नाहीये" असं म्हणल्या सारखा का उचकतोयस? "मंत्रशक्तीवर श्रद्धा" नाहिचेना तशीही तुझी!!
आणि
हे तू मला सांगतोयस ?!!
14 Feb 2014 - 5:02 pm | बॅटमॅन
ताई,
जजमेंटल ओव्हरटोन वाटला म्हणून म्हटले. असो. बाकी नो वरीज & नो नाचणीज हे ओघाने आलेच.
अन
हो. येणी पिराब्ळेम ;)
14 Feb 2014 - 5:01 pm | प्यारे१
अक्षरसमूहामध्ये काही अर्थ असतो राजे.
त्याचा उपयोग काहीच नाही असं कसं काय म्हणता राजे?
त्या शब्दाच्या उच्चारातून काही अर्थ व्यक्त होतो त्यामागची भूमिका समजून घ्या की.
बॅटमॅनच का? कॅटवुमन म्हणू उद्यापासून तुम्हाला. चालतंय की! राम काय नि कोक काय सारखं ना? मग बॅटमॅन काय नि कॅटवुमन काय? उगा ताणायचं म्हणून ताणायचं!
14 Feb 2014 - 5:04 pm | बॅटमॅन
तो काहीएक अर्थ आपणच दिलेला असतो इतकं कळत नसेल तर डोकेफोड करूनही काही अर्थ नाही.
पण आमच्या क्षुद्र असहमतीला तुमच्यासारख्यांनी इतके महत्त्व का द्यावे हे अजूनही कळत नाही. असो.
14 Feb 2014 - 5:18 pm | प्यारे१
डोकेफोड ... नाही ब्वा!
अर्थ आपण दिलेला असतो म्हणजे कुणी दिला? त्याला तो अर्थ का नि कसा आही? त्यामागे काही विषय/ अभ्यास आहे का? तोच शब्द असेल तर तो तसा का? दुसरा का नाही?
जगातल्या बहुतांश साधकांचा निर्वाळा मंत्रांमध्ये ताकद आहे नि त्या मंत्रांच्या अभ्यासानं, जपानं काही एक फरक पडतो.
(वेगवेगळे शब्दसमूह वेगवेगळे रिझल्ट्स असं काहींबाबत, बीज मंत्रांबाबत विशिष्ट टप्प्यानंतर ते एकाच जागी नेतात. मात्र ठराविक काळ मं त्रातले शब्द जसे आहेत तसेच वापरावेत.)
ठराविक नावांऐवजी दुसरी नावे/ काहीही शब्द वापरुन तेच रिझल्ट आले असा काही विदा असला तर वाचायला आवडेल. तो तसा नसतानाही माझं मत माझं मत म्हणून भुई धोपटणं थांबवावं.
असो!
14 Feb 2014 - 5:59 pm | बॅटमॅन
हे कन्व्हेन्शन आहे. याला खास कारण नाही. दोनला दोनच का म्हणायचं? याला उत्तर नाही. दोन म्हणजे काय हा अर्थ एकमताने ठरवला गेलाय कधीकाळी. तो अर्थ दर्शवणारा शब्द वा शब्दसमुच्चय काय असावा हा कैकदा राजकीय निर्णय असतो. प्रमाणभाषाही काहीशी अशीच ठरते. याबद्दल पाणिनीय संस्कृत ते पुणेरी मराठी किंवा लंडनमधली इंग्लिश इ.इ.इ. शेकडो भाषांचा विदा देता येईल.
हा आर्बिट्ररीनेस सर्व ठिकाणीच पहावयास मिळतो. शेवटी भाषा हा चिन्हांचा संच आहे. त्यांना अर्थ काय असावा, हे आपण ठरवलंय. आपण ठरवलं तर उद्या अधिक चिन्हाला वजा चिन्हही म्हणू शकतो. आपण केलेल्या स्वीकाराव्यतिरिक्त अधिक चिन्हाचं खास स्वतःचं असं 'वेगळेपण' नसतं- मग भलेही जगभरचे लोक अधिक चिन्ह वापरून शेकडो आकडी बेरजा करत असल्याचा विदा दिला तरी यात फरक पडत नाही.
तुमचं म्हणणं इतके लोक अधिकचिन्हाचा फायदा सांगताहेत आणि त्याला नाकारणारा मी कोण? तर उत्तर असं की एक उभी अन एक आडवी अशा दोन रेषा परस्परांवर ओढून त्याचा अर्थ अधिक असे म्हणणे हे आर्बिट्ररी कन्व्हेन्शन आहे. जे लिपीबद्दल, तेच भाषेबद्दल. सततच्या वापराने तो अर्थ मनात दृढमूल झाला तरी त्याचे स्वयंसिद्ध असे काही अर्थरूपी अस्तित्व नसते. भाषाशास्त्रात याचा विचार करण्यात येतो.
सोयीस्कर ठिकाणीच विदा मागायची सवय नजरेआड करून उदा. देतो. वल्लभाचार्यांची गोष्ट आहे. ती वाचण्याचे कष्ट घ्यावेत. त्यांच्याकडे ते सोवळ्यात असताना एकजण आला आणि ते त्याला 'परे' म्ह. बाजूस हो इ. म्हणाले. त्याला तोच मंत्र वाटला आणि तो पुढे मोठा योगी झाला इ.इ.
वाल्मिकींचीही गोष्ट अशीच आहे- मरा मरा फेम.
अन शेवटी हे लक्षात ठेवावे 'क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महतां नोपकरणे'. उपकरणांना नको तितके महत्त्व दिले तर क्रियासिद्धी होत नाही. अमुकच मंत्र पॉवरबाज असतात इ.इ. विचारसरणी ही जातिवंत तुच्छतावादी आणि तितकीच अज्ञानमूलक आहे.
मूळ मुद्दा समजला नसेल तर फुकाचा त्रागा करणं कुणी मूर्ख असेल तर आणि तरच समजू शकतो- अन्यथा नाही.
14 Feb 2014 - 6:24 pm | धन्या
तुम्ही समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत म्हणून त्रागा करत आहात. :)
14 Feb 2014 - 7:11 pm | सूड
लाख बोललात!!
15 Feb 2014 - 12:29 am | अत्रुप्त आत्मा
@तुम्ही समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत म्हणून त्रागा करत आहात. >>> तुफ्फान रे धन्या!
अपनी तरफ से तेरे को लाख लाख सलाम! __/\__/\__/\__
15 Feb 2014 - 12:32 am | बॅटमॅन
बरोबरे धनाजीराव, अंमळ गफलत झाली खरी. :)
15 Feb 2014 - 3:18 am | आत्मशून्य
समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत म्हणून त्रागा करण्या एव्हडे बॅटमॅन निर्बुध्द अजिबात वाटत नाहीत. खरे तर इथे दोन वर्तुळं आहेत, आणी हे जे काही चालु आहे ते फक्त कोणते वर्तुळ कोणत्या वर्तुळाच्या आत आहे याबाबत परिक्षण म्हणता येइल, म्हणूनच मुळात याला त्रागा म्हणनेच चुक आहे.
15 Feb 2014 - 9:11 am | धन्या
निर्बुद्ध वाटत नाहीत म्हणजे निर्बुद्ध असण्याची शक्यता आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
अरे वा. तुम्ही दिक्षा वगैरे घेतलीत की काय "तू चुक आहे, मीच बरोबर आहे" म्हणण्याची?
प्रत्येकाची प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. जे मला कधीही न छेदणार्या विचारधारा वाटल्या ते तुम्हाला दोन वेगळी विश्वं किंवा वेगळी वर्तुळं वाटली. हे चालायचंच. मात्र तुम्ही "चुक आहे" हा जो निष्कर्ष काढलात त्याचे मात्र आश्चर्य वाटतंय.
15 Feb 2014 - 7:48 pm | आत्मशून्य
वाटत तर नाहीतच. होय... तशी शक्यता नाकारत नाही!
कूठे मिळते ? आपल्यास बराच अनुभव दिसतोय ?
.
तुम्हाला आश्चर्यही वाटतं ही एक सकारात्मक गोष्ट आहे. मला यात कुठेही छेदाछेदी दिसत नाही म्हणून त्याला रेषा मानणे चुकच असेच माझे ठाम मत आहे. कारण समांतर रेषा या कधीच जुळणार नाहीत...! पण मानवी मतांचे तसे नसते. ती बदलतात, अगदी याच धाग्यावरही हे सहजी घडु शकते, आणी हे न घडणारच नाहीचसे मानणे म्हणजे एकमेकांच्या निव्वळ अहंभावास मान्यता देणे होय. याला सकारात्मकता म्हणता कदापी येत नाही.
14 Feb 2014 - 7:10 pm | प्यारे१
मूर्ख, पालथा घडा वगैरे शब्दांमध्ये तुमच्या दृष्टीनं पॉवर नसते ते आम्ही 'तात्पुरतं' स्वीकारलं. ( हा भाग मान्य करतो) त्यामुळं आमच्यावर काही परिणाम झालेला नाही. असो!
भाषाशास्त्राचे नियम बनवून जमलेले शब्द आणि मंत्र अथवा नाम ह्यामध्ये फरक ह्यासाठीच आहे. त्या त्या शब्दामध्ये ताकद असते असा माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे. ते सिद्ध करणं आम्ही म्ह टल्याप्रमाणं ११ माळा जप करा हा भाग तुम्हाला मान्य नाही.
भाषाशास्त्र नसताना उत्पन्न झालेला फक्त ॐ हा स्वतःसिद्ध मंत्र आहे. (अकार, उ कार नि म कार हे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारे प्राणायामामध्ये वापरले जातातच तो भाग वेगळा आहे) म्हणा रोज आणि फरक तुम्हीच सांगा.
असाच विषय कोणतीही प्रतिमा, संस्कार, नसलेल्या दोन व्यक्ती घेऊन मंत्र आणि कोक अथवा दुसरा कुठलाही शब्द अथवा वाक्य घेऊन प्रयोग करु शकता!
मरा मरा म्हणण्याची सुरुवात अथवा परे परे वगैरे ह्या गोष्टी काहीच न करता सुरुवात करावी ह्यासाठी सांगितलेल्या आहेत. संस्कृतात मारणे वगैरे काहीही नाही ना? वाल्याला राम उच्चारता येत नव्हतं म्हणून बाबा रे तुला मरा माहिती आहे ना मग मरा म्हण असं म्हणून सुरुवात कर वगैरे कथा आहे. परे परे ची गोष्ट शिष्याचा गुरुप्रति असलेला भाव व्यक्त करण्यासाठी आहे.
गुरु नाही, इतर कुणी नाही. त्या नामावर/ मंत्रावर विश्वास आहे/नाही असं असलं तरी नाम काम करतं. त्याच्याबद्दलचा निग्रह काम लवकर करतं. एवढंच.
मी थांबतो आहे.
14 Feb 2014 - 7:20 pm | धन्या
प्रत्येक गोष्टीला अध्यात्मिक मुलामा देण्याची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. :)
14 Feb 2014 - 8:22 pm | प्यारे१
मुलामा कसला?
परे परे म्हणाल्यानंतर त्या माणसानं आपला निग्रह ठेवून त्याच शब्दांचं आलंबन वापरलं नि योगी झाला. योगी झाला नि वल्लभाचार्य त्याला भेटायला गेले ही कथा गुरुंनी उच्चारलेले शब्द जसेच्या तसे अमलात आणण्या चा परिणामच व्यक्त करतात ना? आता तो माणूस योगी झाला त्याला गुरुमुखातून आलेले शब्द कारणीभूत होते त्याबरोबर त्याचा निग्रह कारणीभूत होता असं म्हटलं तर लगेच आम्ही जिंकलो ची पाटी ऑलरेडी लावली आहे ती दोन फूट वर करणार.
(जिंकणं हरणं ह्यापेक्षा योग्य अयोग्य गोष्टींसाठी झगडणं जास्त उत्तम)
दोन गोष्टींची सरमिसळ होतेय. १. मनोनिग्रह नि २ शब्दांमध्ये असलेली ताकद.
मनोनिग्रह नसेल तरीही शब्द उच्चारत उच्चारत मनोनिग्रह होतो नि काम होतं हे मी आधीही सांगितलं आहे नि आत्ताही सांगतो आहे. ती त्या शब्दांची ताकद आहे. मरा मरा म्हणणारा वाल्या नंतर राम राम म्हणू लागला नि त्याचं काम झालं. रावण म्हणून दुसरं काही काम होईल, तेच काम होणार नाही.
आता आवरलं. ;)
14 Feb 2014 - 8:28 pm | धन्या
आवरायच्या आधीही प्रवचन दयायचा चानस मारलात. :D
14 Feb 2014 - 9:08 pm | प्रचेतस
वाल्मिकी रामायणातील ह्याचा संदर्भ देऊ शकाल काय?
कारण स्वतः वाल्मिकी रामाला म्हणतात
प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनन्दन |
न स्मराम्यनृतं वाक्यं तथेमौ तव पुत्रकौ |||
मी प्रचेताचा (वरूणाचा) दहावा पुत्र आहे. मी कधीही असत्य बोललेले मला स्मरत नाही. हे तुझेच पुत्र आहेत याची खात्री बाळग.
संदर्भः http://sanskritdocuments.org/mirrors/ramayana/valmiki.htm
15 Feb 2014 - 1:54 am | बॅटमॅन
ओरिगिनल रामायणात नसले तरी (अंध)विश्वासात त्याने कै फरक पडत नै हो. शेवटी लोक हवे गंडवायला ;)
15 Feb 2014 - 3:08 am | प्यारे१
:)
मरा मरा थिअरी तुम्हीच आणलीत प्रतिसादात. ती ऐकीव गोष्ट आहे हे आ म्हालाही मान्य आहेच. तरीही सुरुवातीलाच मदनबाण नं म्हटल्याप्रमाणं त्यानं रिझल्ट मध्ये काहीही फरक पडत नाही...
15 Feb 2014 - 4:13 am | बॅटमॅन
खिक्क!
15 Feb 2014 - 12:38 am | अत्रुप्त आत्मा
@ अध्यात्मिक मुलामा देण्याची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.>>>
माताय..येक लै भारी अभंग सुचलावता राव! पण वजन पेलायचं नाही त्याचं..म्हणून नै टाकत ! =))
14 Feb 2014 - 11:37 pm | बॅटमॅन
कौंटर एग्झांपल दिले तरी मान्य करवत नाही, अन सगळे रामायण ऐकून राम कोण असा प्रश्न विचारून 'असेल कुणी लंकेचा राजा' असे स्वतःच उत्तर देताहात याची खात्री पटली खरी.
प्रूफ बाय अॅसर्शन अर्थात खरेखोटेपणाचा विचार अज्जीच न करता नुस्ते मी बरोबर मी बरोबर असा जप करत बसायचे ही दिशाभूलच जेन्युइन म्हणून खपवू पाहताहात या दांभिकपणाला तोड नाही. इतके अज्ञानाभिनिविष्ट होणे येरागबाळाचे काम नोहे. या दांभिकपणाबद्दल कौतुक वाटतं तुमचं. :)
14 Feb 2014 - 5:10 pm | पिलीयन रायडर
ए मी पण मैदानात उतरू का? मी ह्या वेळेस बॅट्याच्या साईडनी आहे (चक्क)..!!
14 Feb 2014 - 5:24 pm | बिपिन कार्यकर्ते
उतरा! उतरा! हा दिवस बघितला की आम्ही सुखाने डोळे मिटायला मोकळे!!! ;)
14 Feb 2014 - 5:28 pm | प्यारे१
चला तयारीला लागू.....
हॅलो, वै कुं ठ????
काय जागा नाही?
ओ बिकादा ... थांबा म्हणायलेत!
२५-३० व र्षं मिनिमम!
14 Feb 2014 - 5:32 pm | पिलीयन रायडर
का???...मी आणि बॅट्या एकाच साईडने आहोत हे बघुन?!!
नको.. नको..तुम्ही डायरेक्ट डोळेच मिटणार असाल तर मग नको...!
(अवांतर :- तसंही आता हे "चर्चा"सत्र मंत्रशक्ती बद्दल राहीलेलंच नाहीये, नाही का?! ;) )
14 Feb 2014 - 5:57 pm | बिपिन कार्यकर्ते
मी डोळे मिटले म्हणजे तुम्हा सर्वांकरता मी हरवलो! मग तुम्ही मंत्र म्हणायचा, की मी परत हजर! हाकानाका! ;)
14 Feb 2014 - 3:49 pm | स्पा
मस्त
14 Feb 2014 - 5:13 pm | जेपी
बस्स करा भौ , दुसर काय तर बगा . एक प्रतिक्रीया वाचुन पुना मेन बोर्डावर जातोय तोपर्यंत एक नवी प्रतिक्रीया येतेय . पुना येतोय पुना जातोय पुना येतोय .....
14 Feb 2014 - 5:39 pm | शिद
इंचाइंचाने धागा काश्मिरकडे वाटचाल करु लागला आहे हे निरीक्षण नोंदवतो.
14 Feb 2014 - 6:10 pm | सूड
हे दळण चालू आहेच का अजून!!
14 Feb 2014 - 7:47 pm | जेपी
या मंत्राची चर्चा इथच थांबावा नवीन धागा काढुन
अनंतंम वासुकी शेषम या मंत्रावर चर्चा करा .ते झाल की नवग्रह घ्या .नंतर त्याचे मुल मंत्र घ्या . मटेरीयला काय कमी नाय आपल्याकड . मोबाइल गंडायला माझा आता
14 Feb 2014 - 8:06 pm | सूड
>>या मंत्राची चर्चा इथच थांबावा नवीन धागा काढुन
अनंतंम वासुकी शेषम या मंत्रावर चर्चा करा
नको नको, जे काय व्हायचं ते इथेच होऊ दे त्यापेक्षा!!
14 Feb 2014 - 8:31 pm | आदूबाळ
प्रतिसादसंख्येने पहाता हा मिपाच्या आयुष्यातल्या २७००० धाग्यांपैकी १७वा सुपरहिट धागा आहे. माझ्या प्रतिसादाने १६वा होईल.
और इस धागे के प्रस्तुतकर्ता हय....
वर जेपी (मिपाचे बबनराव) म्हणतात त्याप्रमाणे नवीन मंत्र घ्या मंत्रचळ लागलेल्या या मंत्रमुग्ध धाग्याची घोडदौड अशीच चालू राहील.
आमेन.
14 Feb 2014 - 9:23 pm | लॉरी टांगटूंगकर
ऐला, हे स्टॅट्स कुठून काढले??
14 Feb 2014 - 9:43 pm | बाळ सप्रे
'नवे लेखन' पान प्रतिसाद या कॉलमवर उतरत्या क्रमाने सॉर्ट करा..
14 Feb 2014 - 9:11 pm | प्रसाद गोडबोले
मंत्रात शक्ती असुच शकत नाही हे तावातावाने माडले आहे ते काही फारसे आवडले नाही ...."न बुध्दिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम | " असं काही तरी म्हणलय बुवा गीतेत ... (तेही प्रक्षिप्त असु शकतं बहुधा) ... ज्याची त्याची श्रध्दा ...
मंत्रात शक्ती असतेच हे तावातावाने मांडले आहे ते ही काही फारसे आवडले नाही ....मंत्र आणि त्यांचा परिणाम ह्यात कॉज इफेक्ट रेलेशनशिप अजुन तरी कोणालाही दाखवता आली नाहीये... मंत्रांच्या गायनानाने मनाला आनंद होतो इतकेच...
बाकी माझा वैयक्तिक मत : आजपर्यंत मला फक्त एकाच मंत्राचा खणखणीत अनुभव येतो हे पटले आहे ... तो मंत्र म्हणजे "अल्लाहु अकबर " !! बाकी मंत्रांविषयी आयेम स्टील स्केप्तीकल !
14 Feb 2014 - 9:13 pm | प्रचेतस
कर्मसंन्यासयोग का? मग बहुधा प्रक्षिप्त नसावा. :)
14 Feb 2014 - 11:48 pm | सागरलहरी
http://en.wikipedia.org/wiki/Hans_Jenny_%28cymatics%29
http://www.cymaticsource.com/cymaticsbook.html
http://cymatics.tribe.net/thread/7af10b05-1994-4abe-a014-d5310dcf99be
15 Feb 2014 - 3:08 am | आत्मशून्य
मुळात एखाद्या व्यक्तीचं मंत्र शक्तिला विरोध करणं ही त्या व्यक्तीमधील मानसिक विकृती किंवा मानसिक आजार असू शकेल हेच सहसा लक्षात येत नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत "ही व्यक्ती अशी का मुर्खासारखी/बावळटासारखी वागते? एव्हढा मोठा/मोठी होउनही एव्हढी साधी गोष्ट कशी कळत नाही?" असे प्रश्न पडू लागतात. समजा हा प्रकार मानसिक आजार किंवा मानसिक विकृतीच आहे असं लक्षात आलं तर ही माणसं नकारात्मक पवित्रा (डिनायल) घेतात त्यामुळे त्या व्यक्तीला प्रचिती घ्यायची हौस होणेच अवघड होऊन जाते...!
शरीराला जसे छोटे मोठे आजार होतात तसेच मनालाही छोटे मोठे आजार होतात आणि त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे असते. मात्र ही गोष्ट आजही समाज सहजा सहजी स्विकारत नाही. एखादी व्यक्ती मानसोपचारतज्ञाकडे (सायकियाट्रीस्ट) किंवा मानसशास्त्रज्ञाकडे (सायकॉलॉजिस्ट) गेली तर त्या व्यक्तीला वेड लागले असावे असा सरधोपट अर्थ घेतला जातो. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय मंत्रशक्ती तपासायची निपक्षपाती इच्छा होणे कठीण... असे या धाग्यावरील चर्चेतुन एकंदर अनुमान निघतय.
15 Feb 2014 - 3:16 am | प्यारे१
काहीसा असहमत आहे.
टोकाचा विरोध असला तरी तो ज्या पद्धतीनं व्यक्त होतो त्या पद्धतीला विरोध करणं हे एवढंच अपेक्षित आहे. वयाचा परिणाम, उसळतं रक्त वगैरे बाबींचा विचार करता ह्या गोष्टी नैसर्गिक मानाव्या लागतील. त्यात मानसिक रोग वगैरे विचार 'लगेच' होऊ नये. हा, समोर विरोधी माणूस दिसला तर त्याला शिव्या घाल, हाणामारी कर वगैरे मानसिक संतुलन ढासळण्याची चिन्हं असतात असू शकतात. त्या अनुषंगानं बरेच लोक मानसिक रुग्ण ह्या लेबलखाली येतील.
असो!
15 Feb 2014 - 3:23 am | आत्मशून्य
म्हणूनच फक्त आजार असू शकेल हेच ठामपणे म्हटलं आहे. आजार आहे असे निदान मी करणार नाही..!
15 Feb 2014 - 3:32 am | प्यारे१
मान्य!
15 Feb 2014 - 4:14 am | बॅटमॅन
:)
पुनरेकवार मूळ मुद्दा डावलला गेलाय. असो.
15 Feb 2014 - 4:23 am | आत्मशून्य
वाटुन जातं असं कधी कधी...!
15 Feb 2014 - 4:25 am | आत्मशून्य
न डावलायची तुम्ही काळजी घेत राहीलात म्हणजे झाले की...! हा.का.ना.का.
15 Feb 2014 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा
@यापुढे मात्र मुळ मुद्दा
न डावलायची तुम्ही काळजी घेत राहीलात म्हणजे झाले की...! >>> या'लाच आत्म शून्य म्हणावे काय ? :p