विघ्नहर्त्यावरचे संकट टळणार?

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
14 Sep 2008 - 10:47 am

गणपती बाप्पा, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला आमच्या उत्सवातली हजेरी संपवुन घरी जाताना काही अडचण येणार नाही असे वाटते.

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराजकारणसद्भावनाबातमीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 11:03 am | विसोबा खेचर

एक अवांतर खंत -

संगणक, आंतरजाल या प्रकाराची ओळख झाल्यापासून आजतागायत मला माझ्या संगणकावर कधीही लोकसत्तेचा फॉन्ट दिसू शकलेला नाही! कुणी मदत करेल काय?

विषयांतराबद्दल क्षमस्व!

तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

14 Sep 2008 - 12:54 pm | सखाराम_गटणे™

आय ई ६ वापरा, फोंट डाउनलोड करा,
मी तेच करतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 1:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या,
फाफॉवरही छान दिसतो फॉण्ट, पण character encoding = Western
आता सांगा काही आणखी झेंगाट असेल तर?

देवदत्त's picture

14 Sep 2008 - 2:05 pm | देवदत्त

तात्या,
मी ही फायरफॉक्स मध्ये लोकसत्ता नेहमी नीट दिसण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण काहीच होत नाही. पहिल्यांदा फक्त ठोकळेच दिसतात. प्रत्येक पानाकरीता View->Character Encoding-> Western (ISO-8859-1) निवडावे लागते :(

आनंद घारे's picture

18 Sep 2008 - 11:14 am | आनंद घारे

लोकसत्ता वाचण्यासाठी आपणास ऍक्टिव्हेक्स कंट्रोलची गरज असते. माझ्या कल्पनेप्रमाणे हा फाँट आपण आपल्या संगणकावर साठवून ठेवू शकत नाही. तो ऑनलाईनच उचलावा लागत असावा. आपण व्हायरस टाळण्यासाठी या कंट्रोलला ब्लॉक केलेले असते त्याला मोकळे करून द्यावे लागेल. आपल्या संगणकावर पिवळ्या रंगात एक आडवी पट्टी दिसेल त्यात याबद्दलच्या सूचना दिलेल्या असतात.

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 1:08 pm | भडकमकर मास्तर

आता व्हेरिफाय अँड ट्रस्ट अशी संकल्पना वापरायची म्हटली तर मी प्रदूषणवाल्यांना व्हेरिफाय केलं नाही आणि या सरकारी लोकांच्या पीओपी पाण्यात विरघळते या संकल्पनेलाही व्हेरिफाय केलं नाही...
पण माझ्या मते पीओपी काही विरघळत नसावे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 1:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर,

बातमीत फक्त शाडूच्या मातीच्या मूर्तींचा उल्लेख आहे. पण कोणत्याही प्रकारच्या रंगांचा नाही. रासायनिक रंग जर पाण्यात विरघळत असतील तर किती घातक असू शकतात हे मी आपल्याला सांगायची गरज नाही.
या बातमीमधे संबंधित संस्थेने कोणती माहिती मागितली होती याचा उल्लेख नाही. म्हणजे त्यांनी जर माहिती मागताना अशी मागितली असेल की शाडूच्या मूर्तींमुळे प्रदूषण होते का, तर उत्तर नकारार्थीच येणार. आणि फक्त पर्यावरणवाद्यांना झोडण्याबरोबरच सदर संस्थेने शाडूच्या मातीचेच गणपती आणा, नैसर्गिक रंगांत रंगवलेले गणपतीच आणा असं आवाहन केलं असतं (किंवा तसं छपवून आणलं असतं) तर उत्तम झालं असतं असं मला वाटतं.

त्यामुळे माझ्या या माहितीवर काडीमात्र विश्वास नाही. अर्धवट माहितीपेक्षा माहितीचा अभावही बरा असं माझं वैयक्तिक मत आहे.

शिवाय माती जलस्रोतांचं प्रदूषण करत नाही हे खरं असलं तरी त्याच मातीमुळे पुराचा धोका वाढतो किंवा धरणांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते हा एक अवांतर मुद्दा आहेच.

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 2:28 pm | भडकमकर मास्तर

बातमीत फक्त शाडूच्या मातीच्या मूर्तींचा उल्लेख आहे

त्यात शेवटी पीओपी ची मूर्ती पाण्यात विरघळते, आणि पी ओपी कॅल्सिअम सल्फेटपासून बनलेले असते त्यामुळे विरघळते असे काय काय लिहिले आहे...
तो फाँट काही कॉपी पेस्ट होईना बुवा...
ठोकळे येताहेत ...

ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 4:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओह, मग मी एलियनायटीसचं औषध घ्यायला विसरले असं दिसतंय! नीट वाचलं नाही. ;-)

पीओपी पाण्यात विरघळतं हा माझ्यासाठीही शोधच आहे. दाल में काला लग रहा है!

तो फाँट काही कॉपी पेस्ट होईना बुवा...
ठोकळे येताहेत ...

लोकवेब किंवा मिलेनियम वरुण पैकी एक फॉण्ट लागतो, दोन्ही टाकून पहा. गुगलवरून लगेचच मिळतील दोन्ही. नाहीच मिळाले तर सांगा, माझ्याकडे आहेत.

देवदत्त's picture

14 Sep 2008 - 6:24 pm | देवदत्त

लोकवेब किंवा मिलेनियम वरुण पैकी एक फॉण्ट लागतो, दोन्ही टाकून पहा. गुगलवरून लगेचच मिळतील दोन्ही.
लोकसत्ताकडेच आहेत की. पण मी ही कॉपी पेस्ट नाही करू शकत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 7:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कॉपी पेस्टचा प्रश्न बहुदा (९९% खात्री) कॅरॅक्टर एन्कोडींगमुळे येत असणार. आणि त्याला उपाय काय माहित नाही.

आनंद घारे's picture

18 Sep 2008 - 11:18 am | आनंद घारे

मी गेले दहा दिवस पाण्यात भिजवून ठेवला आहे. त्याला अजूनपर्यंत ढम्म झालेले नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मी गेले दहा दिवस पाण्यात भिजवून ठेवला आहे. त्याला अजूनपर्यंत ढम्म झालेले नाही.

मंतरलेलं पाणी वापरून पहा, विरघळेल कदाचित! ;-)

देवदत्त's picture

14 Sep 2008 - 2:03 pm | देवदत्त

असे असेल तर चांगलेच आहे.

परंतु त्यात म्हटल्याप्रमाणे असले अभ्यास/निष्कर्ष/विरोध नेमके गणपतीच्या फक्त ८/१० दिवस आधीपासून का सुरू होतात व गणपती विसर्जनासोबत का विसर्जित केले जातात ह्याचाची अभ्यास केला पाहिजे व त्यातही बदल केले पाहिजेत.

जेव्हा विरोध सुरू होतो त्याच्या आधीच मूर्ती बनविणे सुरू झाले असते. मग त्यावर बंदी आणता येत नाही.
वास्तविक जर कोणाला खरोखरच काही वाटत असेल तर आताच ह्यासंबंधी काही नियम बनवून ते आधीच सर्वांना पाळण्यास सांगितले पाहिजे.

नाहीतर हे पुन्हा सिगरेटच्या मुद्याप्रमाणे झाले. माहित आहे वाईट आहे तरी आपण त्याला परवानगी द्यायची आणि फक्त सांगायचे की ह्याने हा धोका आहे.

तसेच आदितीने म्हटल्याप्रमाणे माहिती अर्धवट वाटत आहेच.

अवलिया's picture

14 Sep 2008 - 6:21 pm | अवलिया

परंतु त्यात म्हटल्याप्रमाणे असले अभ्यास/निष्कर्ष/विरोध नेमके गणपतीच्या फक्त ८/१० दिवस आधीपासून का सुरू होतात व गणपती विसर्जनासोबत का विसर्जित केले जातात ह्याचाची अभ्यास केला पाहिजे व त्यातही बदल केले पाहिजेत.

खरे आहे. अशा व तत्सम सर्व हिंदुविरोधी अन्य चळवळीचे प्रायोजक कोण आहेत हे वेगळे सांगायचे गरज नाही. धर्मांतराच्या चळवळी (हिंदुंना इतर धर्मात बदलवणे) या सुद्धा याचाच एक भाग आहेत

नाना

भडकमकर मास्तर's picture

18 Sep 2008 - 2:21 pm | भडकमकर मास्तर

तत्सम सर्व हिंदुविरोधी अन्य चळवळीचे प्रायोजक

गणपती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नसाव्यात , यात हिंदुविरोध कसा काय बुवा?
...
मी पुढल्या वर्षी स्वतः शाडूची मूर्ती बनवायच्या विचारात आहे....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 2:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परंतु त्यात म्हटल्याप्रमाणे असले अभ्यास/निष्कर्ष/विरोध नेमके गणपतीच्या फक्त ८/१० दिवस आधीपासून का सुरू होतात व गणपती विसर्जनासोबत का विसर्जित केले जातात ह्याचाची अभ्यास केला पाहिजे व त्यातही बदल केले पाहिजेत.

भडकमकर मास्तरांशी अगदी सहमत.

मान्य आहे की हे लोक गणपतीच्या आठ-दहा दिवस, धरा महिनाभर आधीच बरोब्बर आरडाओरडा सुरू करतात. पण ते म्हणतात त्यात तथ्य नाही असा त्याचा अर्थ निघत नाही. आणि पर्यावरण वाचवण्याला तर हिंदू धर्माचा आणि धर्मीयांचा विरोध नाही ना? मग काय हरकत आहे शाडूच्या मातीच्या मूर्ती आणायला? त्या लोकांना आरडाओरडा करायला मुद्दाही रहाणार नाही!

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 8:41 pm | देवदत्त

हा प्रतिसाद मला होता की भडकमकर मास्तरांना? ;)

पण ते म्हणतात त्यात तथ्य नाही असा त्याचा अर्थ निघत नाही.
मी ही पुढे तेच म्हणालो की ह्याबाबत काय तो नियम आत्ताच बनविला पाहिजे व सर्वांना आत्ताच सांगितले पाहिजे की अशा प्रकारच्या मूर्ती बनवा अशा प्रकारची नका बनवू. नाही तर पुन्हा तेच होते की पुढल्या वर्षी गणपती येईपर्यंत सर्व शांत.

बाकी आम्ही ही पर्यावरण वाचवायला मदत करत आहोतच. थर्माकोलचा वापर पूर्ण बंद केला आहे.

ह्यावर्षी नाही जमले, पण नेहमीच्या मूर्तीकाराकडून कोणत्या मूर्ती मिळतात तेही विचारीन पुढील वर्षी.