इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत.
नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले. नकुलाची अश्वपरीक्षा आणि सहदेवाची भविष्यपरीक्षा यांवर काही मिथके तरी वाचायला मिळाली आहेत. नकुल / सहदेव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर महाभारतातले नकुल सहदेवच येतात. शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.)
पण आज शत्रुघ्नाबद्दल विचारले तर आपल्यापैकी कितीजण धाडधाड १० ओळी म्हणुन दाखवु शकतील. राम बोला लक्ष्मण बोला, अर्जुन म्हणा कर्ण म्हणा लोक अधिकारवाणीने थोडेफार बोलतील. महाभारतातल्या खलनायकांबद्दलही लोकांना माहिती आहे पण रामायणातल्या बंधुनिष्ठ शत्रुघ्नाबद्दल नाही. कारण मुळात त्याचे आख्खे जीवनच अळणी आहेत. त्यात काही माल मसाला नाही, मेलोड्रामा नाही. तो रामासारखा वलयांकित नाही, लक्ष्मणासारखा पराक्रमी आणि सेवाव्रती नाही. भरतासारखा उदार आणि त्यागी नाही कारण मुळात त्याला कधी तो चान्सच मिळाला नाही. भरतासारखे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेउन त्याने कधी राज्य केले नाही कारण मुळात त्या राजपदाचे मापच त्याच्या पदरी पडले नाही. शत्रुघ्नाचे आख्खे आयुष्यच आपल्यासाठी केवळ भरताचा धाकला भाऊ इतपतच सिमीत आहे. आणि हीच मुळी प्रचंड मोठी शोकांतिका आहे कारण तो भरताचा सख्खा धाकटा भाऊ नसुन लक्ष्मणाचा जुळा भाऊ आहे. शत्रुघ्न मुळात कोण होता हेच जर माहिती नसेल तर त्याचे कार्य काय माहिती असणार?
शत्रुघ्न म्हणजे शत्रुंचा नाश करणारा. दशरथ आणि सुमित्रेचा मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणी भरताचा सावत्रभाऊ आणि चार भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी आहे. त्याच्या आयुष्यातला प्रसिद्धीचा एकमेव क्षण लवणासुराच्या वधात आला. लवणासुर म्हणजे मधु राक्षसाचा मुलगा. या मधुच्या नावावरुनच मथुरा हे नाव आले. या मधुने देव दानव मनुष्य या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. प्रजाहितदा होता. त्यावर खुष होउन साक्षात शिवाने त्याला स्वतःचा त्रिशूळ दिला. जो मधुच्या मृत्युन्ंतर लवणासुराकडे आला. लवणासुर स्वत: पराक्रमी आणि अस्त्रनिपुण होता. मात्र ऋषीमुनींना आणि मनुष्यांना त्रास देणारा होता. प्रजानन त्रासले आणि रामाकडे आले आणि रामाने याकामी भरताला लावुन दिले. पराक्रम गाजवण्याचा हा एक क्षणही वाट्याला येत नाही हे बघुन अखेर शत्रुघ्नाने रामाकडे या कामगिरीची मागणी केली आणि मिळवली. रामाने खास विष्णुने दिलेले अस्त्र शत्रुघ्नाकडे देउन त्याला लवणासुराकडे धाडले. आख्यायिका अशी आहे की लवणासुराच्या महालात अनेक दैवी अस्त्रे होती जी जवळ असेतो तो अजेय होता. त्यामुळे शत्रुघ्नाने भक्ष्याचे आमिष दाखवुन त्याला महालापासु दूर नेले आणि मग युध्दाचे आव्हाने दिले. याबाबत त्याने त्याच्या जुळ्या भावाचा कित्ता गिरवला. त्यानेही इंद्रजिताला असेच अजेय अस्त्रांपासुन दूर ठेवले होते. अखेर लवणासूर मेला. मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली.
पण शत्रुघ्नाचा मोठेपणा लवणासुर वधात किंवा अश्वमेधाच्या दिग्विजयात नाहिच मुळी. त्याचा मोठेपणा इतिहासाने कधी अधोरेखितच केला नाही. त्याचा मोठेपणा आहे राम - लक्ष्मण वनवासात गेलेले असताना आणि भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन अयोध्येबाहेर कुटीत राहत असताना निरपेक्ष, नि:स्पृह वृत्तीने अयोध्येच रक्षण करण्यात आहे. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्या शत्रुघ्नाकडेच जाते. याबदल्यात त्याच्या पदरात कुठलेच कीर्तीचे माप पडले नाही. १४वर्षांनी राम परतल्यावर लोक म्हणाले भरताने रामाला राज्य परत केले. पण ते राज्य भरताने तरी कुठे केले होते. ते शत्रुघ्नानेच तर केले.
वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही.
राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
प्रतिक्रिया
8 Feb 2013 - 2:07 pm | नक्शत्त्रा
छान नवीन माहिती समजली. अशाच अपरिचीत व्यक्तिरेखांवर वाचायला आवडेल.
संस्कृतातला दाखला दिल्याने लेख आणखी चांगला झाला आहे.
13 Feb 2013 - 11:31 pm | इशा१२३
वाचनिय, मस्त लेख...
14 Feb 2013 - 1:07 pm | मृत्युन्जय
सर्व प्रतिसादकर्त्यांना पुनःश्च धन्यवाद.
15 Feb 2013 - 9:45 am | नाना चेंगट
आभारी आहे
15 Feb 2013 - 12:57 am | श्रीरंग_जोशी
शतुघ्नाच्या दुर्लक्षित कामगिरीविषयी प्रथमच वाचण्यास मिळाले.
धन्यवाद!
18 Feb 2013 - 8:18 am | अग्निकोल्हा
प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो!
:) आता क्रेडीट चुकांना द्यायचा विचार झाला की काय ?
तसेच आदर्श शत्रुघ्न युध्द काळात सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, तो चर्चेचा मुख्य मुद्दा नाही पण अनुशंगाने उजेड जरुर टाकावा. भरताकडे बहुदा सैन्यच न्हवते, लक्ष्मण तर सावलीच होता... शत्रुघ्न चा मोबाइल स्विचॉफ होता काय ?
मुळातच विरोधाभासी वागणुक असताना ज्या महाकाव्याच्या मुलभुत घटनाक्रमात अथवा घटनांना कलटणी देणार्या कृत्यामधे शत्रुघ्नाचे ठोस योगदानच नाही त्यात त्याला क्रेडीट न दिल्या बद्दल विषेश दखल कशाला ? थोडक्यात जर लक्ष्मणासोबत तो ही निघाला असता...
१) रामाची सेवा घडली असती.
२) निरपेक्षपणे का होइना भरताकडुन राज्य करणे घडले असते, त्याच्या मातेला संतोष मिळाला असता. त्याच उद्देशाने तर रामाने राज्यत्याग केला होता.
३) सिता एकटी पडली नसती व रावणाला तिला पळवायची संधी मिळाली नसती. होता जिवा म्हणुन वाचल शिवा म्हणतात तसे होता शत्रुघ्न म्हणुन राहीला श्रीराम प्रसन्न असे काही क्षणोक्षणी ऐकायला मिळाले असते पण त्या वेळी एखाद्याने कदाचीत गैरसमजातुन भरताला त्या रामायणात राम नसताना राज्य केल्याबद्दल क्रेडीटच दिलं गेलं नाय म्हणुन ओरड केली असती हा भाग अलहिदा.
18 Feb 2013 - 10:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार आहे की नाही ?? ;-)
18 Feb 2013 - 11:11 pm | नाना चेंगट
वैचारीक मैथुनात कुणीही थकत नसतं ;)
19 Feb 2013 - 11:01 am | मृत्युन्जय
मला लेच उत्साह आहे. किमान धाग्याने शंभरी गाठेपर्यंत तरी. नाहितर आमच्या धाग्यांनी कधी १०० प्रतिसाद बघावेत. नर्मदामैय्याच्या कृपेने जरा बरे दिवस आले आहेत तर तुम्ही आला लगेच दृष्ट लावायला. ;)
19 Feb 2013 - 11:24 am | विश्वनाथ मेहेंदळे
तसे आधी सांगितले असते तर हातभार लावला असता ना भौ ;-)
19 Feb 2013 - 11:24 am | विश्वनाथ मेहेंदळे
तसे आधी सांगितले असते तर हातभार लावला असता ना भौ ;-)
19 Feb 2013 - 11:59 pm | अग्निकोल्हा
हा धागाच जंक विषय आहे हे कळल न्हवतं की डोळे मिटुन घेतले होते आत्तापर्यंत ? हाताचाच काय आण्खीहीए कुठ भार असेल तयार तर तो पण इथे बिंधास्त लावा.
20 Feb 2013 - 1:49 am | विश्वनाथ मेहेंदळे
लैच पेटला आहात !!! योग्य वेळ येऊ देत, यथास्थित जागी योग्य ते भार बिनधास्त लावू.
तोवर स्टे टयुण्ड.....
20 Feb 2013 - 2:41 am | अग्निकोल्हा
की भारनियमनाची बोंब होती ?
20 Feb 2013 - 3:44 am | अग्निकोल्हा
लैच पेटलो म्हणुन तर अजिबात राग नको. तुमची योग्य वेळ जेंव्हा येइल तेव्हां बघु काय बदलले असाल, पण तो पर्यंत किमान समोरच्याला हातभार लावुन आनंद निर्मीतीची आवड तुम्ही राखली आहे हे काही कमी न्हवे! स्टे टयुण्ड.
20 Feb 2013 - 10:14 am | मृत्युन्जय
फिल्टर लावुन घ्या म्हणजे जंक धागे दिसणार नाहित. तशी सोय नसेल तर निरुपाय आहे. आम्हीही तुमचे जंक प्रतिसाद दिसु नयेत म्हणुन खुप प्रयत्न करतो. दिसतातच. निरुपाय आहे.
20 Feb 2013 - 8:39 pm | अग्निकोल्हा
आपला तो बाब्या समोरच्याचं ते कार्ट!
21 Feb 2013 - 10:49 am | मृत्युन्जय
हरकत नाही. चष्मा काढलात तरी हरकत नाही. डोक्यातुन मेंदु काढण्यापेक्षा कानांवरुन चष्मा काढुन टाकणे कधीही चांगले.
21 Feb 2013 - 10:50 am | मृत्युन्जय
डोक्यातुन मेंदु काढण्यापेक्षा
म्हणजे इतर लोक डोक्यातुन मेंदु काढतात तसे म्हटले आहे हो मी. नाहितर वैयक्तिक टीका केली म्हणुन प्रतिसाद उडायचा.
21 Feb 2013 - 10:55 am | गवि
अरे मित्रांनो.. बास की आता.. सकाळी ताजेतवाने होऊन पुन्हा सुरु कशाला? ;) चष्मा, मेंदू, प्रतिसाद काही म्हणजे काही काढण्याची वेळच येणार नाही... :)
22 Feb 2013 - 5:43 am | अग्निकोल्हा
विषेशतः इतरांना तुमच्यापैकी कोणी थांबताय की नाही असं पुसता पुसता एखाद्या कारणमात्रे स्वतःच हातभार लावायला पलटी माराणे हा प्रकार तर आपणाकडुन निश्चीतच घडणार नाही वा सपोर्ट केला जाणार नाही याची अतिशय शाश्वती वाटते. असे आयडी आख्खं संस्थळच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात हे नक्कि.
19 Feb 2013 - 10:57 am | मृत्युन्जय
आता क्रेडीट चुकांना द्यायचा विचार झाला की काय ?
आता आदर्श वागणुकीलाही क्रेडिट द्यायच्चा नाही असा ठराव पास झाला की काय :)
तसेच आदर्श शत्रुघ्न युध्द काळात सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, तो चर्चेचा मुख्य मुद्दा नाही पण अनुशंगाने उजेड जरुर टाकावा. भरताकडे बहुदा सैन्यच न्हवते, लक्ष्मण तर सावलीच होता... शत्रुघ्न चा मोबाइल स्विचॉफ होता काय ?
परत तोच प्रश्न आला आहे म्हणुन माझ्या तोकड्या माहितीनुसार सांगु इच्छितो की राम - रावण युद्धाबद्द्ल भरत - शत्रुघ्नाला माहिती नव्हती. रामायणात तसे उल्लेख मला सापडले नाहित. आपल्याला माहिती असतील तर कृपया सांगावे
मुळातच विरोधाभासी वागणुक असताना ज्या महाकाव्याच्या मुलभुत घटनाक्रमात अथवा घटनांना कलटणी देणार्या कृत्यामधे शत्रुघ्नाचे ठोस योगदानच नाही त्यात त्याला क्रेडीट न दिल्या बद्दल विषेश दखल कशाला ?
थोडक्यात म्हणजे त्याच्या आयुष्यात कुठलेही नाट्य नाही म्हणुन त्याची दखल घ्यायची नाही असेच ना? आपण कृपा करुन लेख परत वाचावा. त्याचा उल्लेख मीही केलेला आहे. पण त्याउप्परही जाउन शत्रुघ्नाची दखल घ्यावी असे त्याचे व्यक्तिमत्व नक्की आहे.
थोडक्यात जर लक्ष्मणासोबत तो ही निघाला असता...
ओक्के. म्हणजे हा राम - लक्ष्मणाबरोबर, भरत राज्याबाहेर (कारण राज्य करणे त्याच्या वृत्तीतच नव्हते. स्वतःच्या आईने केलेल्या अपराधामुळे ते राज्य त्याला नको होते), दशरथ मेलेला. १४ वर्षांनंतरही रामाला वनवासात रहावे लागले असते किंवा राज्य परत मिळवण्यासाठी अजुन एक युद्ध करावे लागले असते. त्याकाळात राज्याची घडी नीट बसवण्यासाठी आणि राज्य समृद्ध करण्यासाठी शत्रुघ्नाने केलेले प्रयत्न जास्त महत्वाचे होते.
१) रामाची सेवा घडली असती.२) निरपेक्षपणे का होइना भरताकडुन राज्य करणे घडले असते, त्याच्या मातेला संतोष मिळाला असता. त्याच उद्देशाने तर रामाने राज्यत्याग केला होता.
सगळ्या जर तर च्या बाता आहेत, त्याही अमान्य आहेत हे वरती लिहिले आहेच. पण त्याहुनही महत्वाह्चे म्हनजे जे होउ शकले असते त्यापेक्षा जे झाले ते जास्त महत्वाचे आहे. आणी असेही जे होउ शकले असते त्यापेक्षा जे झाले ते जास्त उदात्तच आहे.
३) सिता एकटी पडली नसती व रावणाला तिला पळवायची संधी मिळाली नसती. होता जिवा म्हणुन वाचल शिवा म्हणतात तसे होता शत्रुघ्न म्हणुन राहीला श्रीराम प्रसन्न असे काही क्षणोक्षणी ऐकायला मिळाले असते पण त्या वेळी एखाद्याने कदाचीत गैरसमजातुन भरताला त्या रामायणात राम नसताना राज्य केल्याबद्दल क्रेडीटच दिलं गेलं नाय म्हणुन ओरड केली असती हा भाग अलहिदा.
आयला मग रावण आणि इंद्रजिताला कोणी आणी का मारले असते. मग तर तुम्ही कोण राम? त्याने असे काय तीर मारले ? असलेच प्रश्न विचारले असते. शत्रुघ्न राहिला बाजुला मला राम कसा आदर्श यावरच लेख लिहायला लागला असता. त्यावर मग लोकांनी राम आदर्श नव्हताच यावर वैचारिक मैथुन झाडले असते ( ते आजही होतेच म्हणा). त्यापेक्षा जे झाले तेच जास्त बरे झाले की.
19 Feb 2013 - 11:06 pm | अग्निकोल्हा
तुम्हाला लेखनात काहि त्रुटी आहेत त्या सुधारायच्या आहेत काय ?
19 Feb 2013 - 11:52 pm | अग्निकोल्हा
अदखलपात्र वागणुक आदर्श अथवा अनादर्श वगैरे ठरवायला लेख पाडला जाउ नये इतकीच अपेक्षा.
मला माहिती नाही म्हणुन कुतुहल आहे ज्याबद्दल प्रश्न विचारला.
होय. ज्याचे काव्य रचले जाण्याच्या मुलभुत घटनांमधे कोणतेही योगदान नाही त्याची दखल घ्यायची आवश्यकता नाही असेच.
होय लेख वाचला आहे पण एक व्यक्तिमत्व म्हणुन असण्यापेक्षा रामाचाभाउ या अनुशंगानेच तो कसा झाकोळला गेला यावरच जास्त फोकस लेखामधे आहे. सुरुवातीलाच राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत.... असे वाक्य बरेच काही स्पश्ट करते.
अतिशय अप्रस्तुत विचार कारण रामायण हे काव्य आयोध्या कशी सांभाळली गेली यावर प्रकाश टाकणेस रचले नाहीये.
आपण या धाग्यवरील चर्चेत अनेकदा अनावश्यक वैयक्तिक झालेले आहात, त्रागा करुन तुमच लेखन जस्टिफाय करु नका.
20 Feb 2013 - 10:23 am | मृत्युन्जय
अदखलपात्र वागणुक आदर्श अथवा अनादर्श वगैरे ठरवायला लेख पाडला जाउ नये इतकीच अपेक्षा.
दखलपात्र वागणुकीसाठीच हा लेख होता. आपल्या दृष्टीने अदखलपात्र असल्यास आपण इग्नोर + डिलिट करु शकता.
मला माहिती नाही म्हणुन कुतुहल आहे ज्याबद्दल प्रश्न विचारला.
ओक्के.
होय. ज्याचे काव्य रचले जाण्याच्या मुलभुत घटनांमधे कोणतेही योगदान नाही त्याची दखल घ्यायची आवश्यकता नाही असेच.
माझ्यामते दखल घेण्याजोगी कुठलीही गोष्ट एखाद्याने केली असेल किंवा ज्याच्याबद्दल माहिती करुन घेण्यात लोकांना उत्सुकता असेल अश्या कुठल्याही गोष्टीवर लेख लिहिण्यात हरकत नसावी. लेख खोडसाळ नसावा म्हणजे झाले. ते तत्व मी कसोशीने पाळतो.
होय लेख वाचला आहे पण एक व्यक्तिमत्व म्हणुन असण्यापेक्षा रामाचाभाउ या अनुशंगानेच तो कसा झाकोळला गेला यावरच जास्त फोकस लेखामधे आहे. सुरुवातीलाच राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत.... असे वाक्य बरेच काही स्पश्ट करते.
मग? त्याच अनुषंगाने शत्रुघ्नाचे कार्यही पुढे दिले आहेच की. केवळ काही नाट्य नाही म्हणुन त्याच्या कार्याला योग्य ती पावती दिली गेली नाही असे म्हणतो आहे मी. प्रॉब्लेम काय त्यात?
अतिशय अप्रस्तुत विचार कारण रामायण हे काव्य आयोध्या कशी सांभाळली गेली यावर प्रकाश टाकणेस रचले नाहीये.
महानुभाव तोही एक भाग आहेच की. राज्य कोणीच सांभाळले नसते तर कोणी तरी रानटी टोळ्यांनी प्रजेवर अत्याचार केले असते की हो. अतिशय प्रॅक्टिकल विचार आहे तो.
आपण या धाग्यवरील चर्चेत अनेकदा अनावश्यक वैयक्तिक झालेले आहात, त्रागा करुन तुमच लेखन जस्टिफाय करु नका.
मी एकदाही वैयक्तिक झालेलो नाही आहे. आपणच तशी काही वक्तव्ये केली आहेत. धागा आणी त्यावरचे प्रतिसाद परत वाचु शकता. त्रागा करुन आपणच आपले प्रतिसाद जस्टिफाय करायल जाऊ नका.
20 Feb 2013 - 8:39 pm | अग्निकोल्हा
अगदी माझ्या इथल्या पहिल्या प्रतिसादापासुन सर्व पुन्हा वाचा म्हणजे कळेल. कोणी वैयक्तिक टिकेला सुरुवात केलिय.
शत्रुघ्नासाठी इतर तिन भावांच्या प्रसिध्दीला टारगेट करुन शत्रुघ्नाला न्याय द्य्यायचा प्रयत्न तुम्ही केला आहे.
विषेशतः म्हणे त्याने आपलं जिवन भावांसोबत संपवलं यापेक्षा उदात्त व निस्पृह ते काय ? त्या काळात वानप्रस्थाश्रम हे सहकूटूम्बही घेतले जायचे, पांडवांनीही प्रुथ्वीचा त्यागही एकापाठोपाठ केला पण तो बंधुप्रेमाचा उदात्त अविश्कार न्हवे...
21 Feb 2013 - 10:57 am | मृत्युन्जय
मी नीटच वाचले आहे हो. तुम्हीच एकदा परत वाचा.
शिवाय मी शत्रुघ्नाबद्दल चांगले लिहिले म्हणजे मी तुमच्यावर वैयक्तिक टीका करतो हे काही कळाले नाही. हा युक्तिवाद लवणासुराने केला असता तर किमान बादरायण संबंध तरी जोडता आला असता. बाकी इतर ३ भावांना मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल सुद्धा मी नाके मुरडलेली नाहित हो. त्यांना योग्य ती प्रसिद्धी मिळाली आहे तेच लिहिले आहे. त्यांची (मला भावणारी) गुणवैशिष्ट्ये देखील दिली आहेत. त्यामुळे त्या तिघांनीही मी वैयक्तिक टीक केली म्हणुन रुसण्याची काही गरज नाही.
विषेशतः म्हणे त्याने आपलं जिवन भावांसोबत संपवलं यापेक्षा उदात्त व निस्पृह ते काय ?
सगळ्या भावांनी आपले जीवन एकापाठोपाठ संपवले. हा बंधुप्रेमाचा उदात्त अविष्कार आहे असे मी म्ह्टले आहे. यात नक्की चुकीचे काय ते मला कळले नाही. (शिवाय यातुन वैयक्तिक टीका कशी होते हा वेगळा प्रश्न आहेच). पांडवांचे उदाहरण वेगळे आहे. त्यांनी एकमेकांचा विरह सहन होणार नाही म्हणुन एकापाठोपाठ आयुष्य संपवले नाही. त्यांना सदेह स्वर्गारोहण करायचे होते. ते त्यांना जमले नाही इतकेच.
तुलना करायचीच झाली तर हंस आणि डिंभकाशी करता येइल.
तळाटीपः चारही भावांचे आयुष्य कसे संपले ते मला माहिती आहे. लक्ष्मण कुठे त्या तिघांबरोबर होता हा प्रश्न कृपया विचारु नये. तो घटनाक्रमही मला माहिती आहे.
त्या काळात वानप्रस्थाश्रम हे सहकूटूम्बही घेतले जायचे, पांडवांनीही प्रुथ्वीचा त्यागही एकापाठोपाठ केला पण तो बंधुप्रेमाचा उदात्त अविश्कार न्हवे...
21 Feb 2013 - 9:08 pm | अग्निकोल्हा
तुम्ही माझ्या प्रतिसादाना उत्तरे देताना वैयक्तिक टिका केली आहे. ते समजत नसेल तर सोडुन द्या. शत्रुघ्नाच उदत्तिकरण करायला मात्र बादरयण संबध जोडलाय हे नक्कि.
संपुर्ण लेखात शत्रुघ्नाला प्रसिध्दी दिली नाही यावर भर दिलाय अन त्याची महती काय तर
१) आपलं जिवन त्याने आपलं जिवन भावांसोबत संपवलं म्हणून तो महान ?
२) म्हणे भाउ निघुन गेल्यावर राज्य सांभाळलं ?
या मधे एकही गोश्ट उदात्त निस्पृहता दर्शवणारी नाही.
21 Feb 2013 - 9:47 pm | अग्निकोल्हा
शत्रुघ्नाची पुरेशी नोंद घेतली नाही असं म्हणताना तुम्ही व्यासांवर्ती टिका नाही करु शकत!
22 Feb 2013 - 12:19 am | विश्वनाथ मेहेंदळे
नाहीच करू शकत, कारण रामायण वाल्मिकींनी लिहिले आहे ;-)
बाकी शत्रुघ्नाने तुमचे काहीतरी घोडे मारलेले दिसते. त्याचे कौतुक अजिबात सहन होत नाही तुम्हाला...
22 Feb 2013 - 12:23 am | अग्निकोल्हा
ओढुन ताणुन कौतिक कस काय समजायच बुआ ?
20 Feb 2013 - 10:34 am | मृत्युन्जय
जरुर. त्रुटी असतील तर त्या सुधारायला नक्कीच आवडेल. त्रुटी नाहित असे तर म्हणुच शकत नाही. शेवटी मी हौशी लेखक आहे. प्रोफेशनल नाही.
19 Feb 2013 - 11:12 am | llपुण्याचे पेशवेll
शत्रुघ्नाला क्रेडीट दिले नाही वगैरे बळंच बाता वाटतात. जसे कर्ण कसा लय भारी होता त्याच्यावर कसा अन्याय झाला वगैरे या प्रकारच्या असतात ना तशाच!
मूळात जेवढी प्रवचने वगैरे मी ऐकली (शी! प्रवचने कसली ऐकतो प्रतिगामी) तिथे सर्वच रामायणांमधे प्रवचनकाराने शत्रुघ्नाचे कर्तृत्व आवर्जून नमूद हे केले होते की उत्तम प्रशासक म्हणून शत्रुघ्नाने आयोध्या सांभाळली होती. आता रामायणाच्या नाट्यात त्याचा काही रोल विशेष नव्हता त्याला काय करणार.
आता आमच्या कुंपणीत अॅप्रेझलच्या वेळेला मॅनेजर म्हणतो की तू काही जबाबदारीच घेत नाहीस. तो अमुक ढमुक बघ रात्री १०-१० वाजेपर्यंत टिम बरोबर थांबतो नाहीतर तू. मग मी म्हणतो त्याचे प्रोजेक्ट फाटले म्हणून तो थांबला माझे प्रोजेक्ट कधी फाटतच नाही त्याला मी काय करणार.
19 Feb 2013 - 12:12 pm | मृत्युन्जय
सर्व प्रतिसादकर्त्यांचे (त्यात माझा स्वतःचाही मोठा हातभार) मनापासून धन्यवाद. :)
शंभरी गाठलेला माझा पहिला लेख बघुन डोळे पाणावले, आयुष्याचे सार्थक झाले. थोड्या प्रयत्नांती मीदेखील त्रिशतकी काकू टाकु शकेन हा विश्वास बळावला ;)
19 Feb 2013 - 7:06 pm | नाना चेंगट
वा वा वा
अभिनंदन हो.... :)
19 Feb 2013 - 11:28 pm | कवितानागेश
ह्ह्पुवा.
वाट्टेल तशी सुरु आहे चर्चा.
:D
19 Feb 2013 - 11:45 pm | पैसा
अजून चालूच आहे का हे! मृत्युंजया, ट्रेड शिक्रेट सांग बाबा!
20 Feb 2013 - 12:51 am | राघव
एक कथा अशीही वाचलेली [कितपत खरी वाल्मिकी जाणोत] -
पायस ३ द्रोणांत तिघी राण्यांसाठी दिले गेले. त्यातला एक द्रोण कुणा पक्ष्याने पळवला व अंजनी वानरीच्या ओंजळीत नेऊन टाकला जी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करत होती. तो मारुतीराय.
इकडे उरल्या दोन द्रोणांतील थोडे-थोडे काढून आणखी एक द्रोण भरला व तो एका राणीला दिल्या गेला जिला २ मुले झालीत. बाकी दोघींना १-१ मुलगा झाला.
आता नक्की कोणत्या राणीचा द्रोण पळवल्या गेला ते काय आठवत नाही. :)
राघव
20 Feb 2013 - 2:27 am | विकास
या महत्वाच्या धाग्यावर उशीरा प्रतिसाद आहे पण तो वाचताना जाणवले की आज देशाला अशाच निरपेक्ष आणि नि:स्पृह वृत्तीची गरज आहे. त्यामुळे शत्रुघ्नास लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेता आपण शत्रुघ्न मंदीर उभारायला हवे असे मी सुचवतो... (आणि येथून पळ काढतो)
20 Feb 2013 - 2:45 am | अग्निकोल्हा
अश्याच निस्पृह वृत्तिचे पंतप्रधान आज देशाला लाभले आहेत हे मी भाग्यच समजतो.