न मानला धर्म
न मानली जात
धरली फक्त माणुसकीची कास
कारण हीच आहे माझी वाट ...
बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी
नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते
माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो
जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते
इथे नसे कधी दुजाभाव,
न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट,
बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास
कारण हीच आहे माझी वाट ...
करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट
मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे
घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे,
कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव,
कारण हीच आहे माझी वाट ...
प्रतिक्रिया
16 Sep 2012 - 12:46 pm | ज्ञानराम
कवितेचा आशय चांगला आहे.
कवितेचे यमक जुळत नाहीत , पहिल्या कडव्यात त्यामुळे थोडी विसंगती वाटतेय.
16 Sep 2012 - 2:43 pm | सस्नेह
अहो, ते मुक्तक आहे.
16 Sep 2012 - 2:49 pm | ज्ञानराम
ठिक आहे.
16 Sep 2012 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा
काय म्हणू मी याला? काय लिहायचा घातला घाट?
वृत्त नाही,छंद नाही, नुसतीच भावना तोंडपाठ. .... ;)
........................
सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा?
नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा! :-p
16 Sep 2012 - 5:00 pm | अमितसांगली
अहो अ.आ. तुमचे विडंबन वाचण्यासाठी तर आम्ही कविता (जीलब्यासकट) पाडतो......
16 Sep 2012 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा
ठिक आहे,मग या पुढे असले फालतू कष्ट घेऊ नका,,, आणी मी टोला हाणलेल्याला जर विडंबन म्हणत असाल,तर आपल्यालाही पावसात भिजण्यापेक्षा चिखलात लोळण्याची हौस जास्त आहे,असा निष्कर्ष त्यातून निघतोय,हे लक्षात घ्या...! :-p
16 Sep 2012 - 10:18 pm | पक पक पक
सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा?
नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
यात कुठेच कसा आला नाही ,नाडी तुट्लेला लेंगा..... :d:
16 Sep 2012 - 10:23 pm | पक पक पक
न मानला धर्म
न मानली जात
धरली फक्त माणुसकीची कास
कारण हीच आहे माझी वाट ...
ना सुचले शब्द
ना जमले यमक
फाट्ले आशयाचे फडके
लागली जिलबीची वाट... :D:
16 Sep 2012 - 3:28 pm | ज्ञानराम
काय म्हणू मी याला? काय लिहायचा घातला घाट?
वृत्त नाही,छंद नाही, नुसतीच भावना तोंडपाठ. ....
सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा?
नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा!
आवडल्या गेले आहे..... <<<<<<<<
16 Sep 2012 - 5:10 pm | पैसा
पण हास्य भयानक बीभत्स या क्याटेगर्या कशाला ते नाही कळलं.