✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माणुसकी....

अ — अमितसांगली, Sun, 09/16/2012 - 11:46
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते इथे नसे कधी दुजाभाव, न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट, बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास कारण हीच आहे माझी वाट ... करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे, कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव, कारण हीच आहे माझी वाट ...

प्रतिक्रिया द्या
3909 वाचन

💬 प्रतिसाद (10)

कवितेचा आशय चांगला आहे.

ज्ञानराम
Sun, 09/16/2012 - 12:46 नवीन
कवितेचा आशय चांगला आहे. कवितेचे यमक जुळत नाहीत , पहिल्या कडव्यात त्यामुळे थोडी विसंगती वाटतेय.
  • Log in or register to post comments

यमक ..?

सस्नेह
Sun, 09/16/2012 - 14:43 नवीन
अहो, ते मुक्तक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

ठिक आहे.

ज्ञानराम
Sun, 09/16/2012 - 14:49 नवीन
ठिक आहे.
  • Log in or register to post comments

काय म्हणू मी याला? काय

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/16/2012 - 15:18 नवीन
काय म्हणू मी याला? काय लिहायचा घातला घाट? वृत्त नाही,छंद नाही, नुसतीच भावना तोंडपाठ. .... ;) ........................Image removed. सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा? नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा! :-p
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच जबरा विडंबन

अमितसांगली
Sun, 09/16/2012 - 17:00 नवीन
अहो अ.आ. तुमचे विडंबन वाचण्यासाठी तर आम्ही कविता (जीलब्यासकट) पाडतो......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ठिक आहे,मग या पुढे असले फालतू

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/16/2012 - 17:28 नवीन
ठिक आहे,मग या पुढे असले फालतू कष्ट घेऊ नका,,, आणी मी टोला हाणलेल्याला जर विडंबन म्हणत असाल,तर आपल्यालाही पावसात भिजण्यापेक्षा चिखलात लोळण्याची हौस जास्त आहे,असा निष्कर्ष त्यातून निघतोय,हे लक्षात घ्या...! :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या

पक पक पक
Sun, 09/16/2012 - 22:18 नवीन
सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा? नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा :bigsmile: :bigsmile: :bigsmile: यात कुठेच कसा आला नाही ,नाडी तुट्लेला लेंगा..... :d:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

न मानला धर्म न मानली जात धरली

पक पक पक
Sun, 09/16/2012 - 22:23 नवीन
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... ना सुचले शब्द ना जमले यमक फाट्ले आशयाचे फडके लागली जिलबीची वाट... :D:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

..

ज्ञानराम
Sun, 09/16/2012 - 15:28 नवीन
काय म्हणू मी याला? काय लिहायचा घातला घाट? वृत्त नाही,छंद नाही, नुसतीच भावना तोंडपाठ. .... सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या मापाचा हा अंगा? नुसते कापड भारी,...परी शिवता सुटे बोंगा! आवडल्या गेले आहे..... <<<<<<<<
  • Log in or register to post comments

आशय चांगला

पैसा
Sun, 09/16/2012 - 17:10 नवीन
पण हास्य भयानक बीभत्स या क्याटेगर्‍या कशाला ते नाही कळलं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा