राजर्षी शाहू महाराज

अजातशत्रु's picture
अजातशत्रु in जनातलं, मनातलं
26 Jun 2012 - 2:12 pm

लोक कल्याणकारी,आरक्षणाचे जनक,बहुजनांचे प्रेरणास्थान
रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १३८ व्या जयंती निमित्त
त्यांच्या कार्य, कर्तुत्व, क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

संस्कृतीसमाजजीवनमानराजकारणशिक्षणविचारसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

26 Jun 2012 - 2:24 pm | रणजित चितळे

चिकटवला असेल म्हणून पाहिले तर दोनदा झाले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2012 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा

+1

लेख कुठाय? :(

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2012 - 2:49 pm | llपुण्याचे पेशवेll

शाहू महाराजांच्या राष्ट्रप्रेमाला, कुस्तीप्रेमाला सलाम.
बाकी त्यानी केलेल्या ब्राम्हणद्वेषामुळे मला ते आदरणीय वगैरे काही वाटत नाहीत.

मृत्युन्जय's picture

26 Jun 2012 - 3:14 pm | मृत्युन्जय

त्यांच्याबद्दल काही गोष्टी कळाल्या तर तुम्ही नक्कीच त्यांचा आदर करायला लागाल. देवबाप्पा तुम्हाला अक्कल देवो अशी प्रार्थना.

नाना चेंगट's picture

26 Jun 2012 - 3:22 pm | नाना चेंगट

>>>बाकी त्यानी केलेल्या ब्राम्हणद्वेषामुळे मला ते आदरणीय वगैरे काही वाटत नाहीत.

याविषयी विस्तृत वाचायला आवडेल.

मन१'s picture

26 Jun 2012 - 3:39 pm | मन१

पुन्हा झाकण झाकणेतर
बादवे पेशवे उल्लेख करत असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट वेदोक्त्-पुराणोक्त ष्लोक, अभिषेक ह्यांचा वाद असावा.
दुसरे म्हणजे टिळक -शाहू ह्यांचा जो काही जोरदार संघर्ष झाला त्याचाही संदर्भ असावा.
(दोन्ही व्यक्ती इतिहासात आदरणीय, पूजनीय वगैरे म्हणून शिकवतात आपल्याला ढोबळमानानं.
त्यांचं जोरदार भांडाण होतं हे कुणीच बोलत नाही. तसच टिळकांना प्रत्येकवेळी जे जेलमध्ये जावं लागलं ते
देशभक्तीसाठीच(ब्रिटिशांचा कडाडून विरोध केला म्हणून) असाही बर्‍याच जणांचा गैरसमज असतो.
एका अब्रुनुकसानीसदृश भलत्याच प्रकरणात ते दोषी ठरल्यानं त्यांच्यावर प्रथम जेलात जायची वेळ आली होती. बहुतेक डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवस हा उल्लेख त्याचाच. पण इतिहास शासनाच्या सोयीनं शिकवतात तो असा.)
.
.
.

जन्माने झाकण कर्माने कारकून --

JAGOMOHANPYARE's picture

26 Jun 2012 - 3:56 pm | JAGOMOHANPYARE

----

JAGOMOHANPYARE's picture

26 Jun 2012 - 3:54 pm | JAGOMOHANPYARE

बाकी त्यानी केलेल्या ब्राम्हणद्वेषामुळे मला ते आदरणीय वगैरे काही वाटत नाहीत.

http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=1&id=745 इथे त्यांच्या कार्याबद्दल माहिती आहे. शाहू महाराज ब्राह्मण द्वेष्टे नव्हते.

उलट, जातीयवादी लोकानी महाराजांवरच दोनदा हल्ले केले होते, एकदा बंदुकीने एकदा बाँबने.

महाराजानी राधानगरी धरण बांधले सन १९१० च्या आसपास . तिथल्या विजेवर महाराष्ट्रात आज थोडाफार उजेड पडतो. तुमच्याही डोक्यात जरा उजेड पाडून घ्या.

दोन धागे काढलेत ते बरच झालं म्हणायच. :)

नाना चेंगट's picture

26 Jun 2012 - 3:28 pm | नाना चेंगट

एक करा वाचनमात्र ;)

तिमा's picture

26 Jun 2012 - 4:54 pm | तिमा

थोर पुरुषांचे पुण्यस्मरण, जयंत्यांना अभिवादन हे ठीक, पण प्रतिक्रिया टोपणनांवाला शोभली नाही.
विशेषतः- नाकात बोलणारी मंडळी

अधिक माहितीसाठी सांगू इच्छितो की आता फक्त नाटक-सिनेमातच ही मंडळी नांकांत बोलतात, प्रत्यक्षात नाही.

प्राध्यापक's picture

26 Jun 2012 - 4:58 pm | प्राध्यापक

भारतात शाहु महाराजांचे समकालीन संस्थानिकांची संख्या ६०० च्या वर जाते,तत्कालीन संस्थानिक ज्या प्रमाणे प्रजेकडे दुर्लक्ष करुन विलासी जिवन जगत होते,त्या पार्श्वभुमिवर शाहु महाराजांचे प्रजाप्रेम ठळक दिसते. प्रजेला अत्यंत जपणारा त्यांच्या हिताची काळजी घेणारा राजा त्यांच्या समकालीना मधे दिसत नाही.
राजा म्हणले की आपल्या नेहमी राजकीय क्रांती दिसते,मात्र शाहू महाराजांनी सामाजीक क्रांतीच्या मार्गाने कोट्यावधी दलीत जनतेला गुलामीच्या जोखडातुन मुक्त करण्याचा प्रयत्न केला.माणुसकीचे मुलभुत हक्क ज्या लोकांना समाजाने,धर्ममार्तांडानी,नाकारले अशांना पोटाशी धरण्यात जे उच्च कोटी चे धॅर्य लागते ते या निधड्या छातीच्या राजाने दाखवले.खर्‍या अर्थाने मानवतावादाचा केवळ विचार न करता त्याला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
सनातन अनिष्ठ धर्मपरंपरा,रुढी याविरुध्द लढणार्‍या या बलदंड राजाला मानाचा मुजरा.

संपादक मंडळ's picture

26 Jun 2012 - 5:37 pm | संपादक मंडळ

एकाच विषयाचे २ धागे आणि त्यात एकावर जातीय विद्वेष दाखवणारे प्रतिसाद आल्यामुळे हा धागा वाचनमात्र करत आहोत. सर्व वाचकांना विनंती, थोर व्यक्तींचे पुण्यस्मरण करताना कळत नकळत जातीय द्वेष पसरवणार्‍या प्रतिक्रिया कृपया देऊ नयेत.