चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी

Primary tabs

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
14 Nov 2008 - 2:26 am

अखेर होय-नाय होय-नाय करता करता गेल्या आठवड्याच्या शेवटाला आम्ही "पॅरीसला" जाऊन आलो, २ दिवस पुर्ण अगदी शक्य तेवढा वेळ वापरुन अख्खे शहर पायी, बस, बोट, रेल्वे ह्या मार्गाने हिंडुन पाहिले. पण खरं सांगतो मंडळी, पॅरीस हे अशा २ दिवसात गडबडीत पाहण्याचे शहर नाहीच, मस्त तब्येतीत महिनाभर सुट्टी टाकुन मग जावे पॅरीसला आणि पाहुन घ्यावे असे वाटते आहेत, २ दिवसात पॅरीसचा "प" सुद्धा होणार नाही ....
जेवढे शक्य तेवढे पाहिल्यावर "फ्रेंच माणुसाला कलासक्त का म्हणतात " ह्याचा पुरेपुर प्रत्यय आला ....

तेव्हाच ठरवले की अनुभव आपल्या मायबाप मिपाकरांसमोर मांडायचा ...
मग चला मंडळी पाहु यात आणि वाचुयात पॅरीस माझ्या नजरेतुन आणि लेखणीतुन ...
जर उत्साहात ( आणि गडबडीत ) काही चुका आढळल्यात तर कॄपा करुन गोड मानुन घ्याव्यात ...

तर दिवसाच्या सुरवातीला आम्ही हॉटेलमधुन निघुन "हाव्र कॉमार्टीनी ( हा माझा देशी उच्चार, ह्याचा अस्सल फ्रेंचशी दुरचा सुद्धा संबंध नाही ) " ह्या भु-रेल्वे स्थानकावर पोहचलो व तेथुन जवळच आम्हाला आमची "ओपेन डेक बस" मिळणार होती व त्यातुन पुढे आम्ही प्रवास करणार होतो.
जातानाच आम्हाला लांबुनच एक जहबहर्‍या इमारत दिसली, गर्दीही बर्‍यापैकी होती तिथे. आम्ही मग लगालग तिथे गेले व जवळुन पाहिले तर मंडळी ते "पॅरीसचे ऑपेरा हाऊस" होते, जिथे राजा हेन्री खास ऑपेरा पहायला यायचा. आम्ही मग तोंडाचा आऽऽऽऽ करुन चर्चा करत फोटो काढत होतो. तेव्हा तिथला म्हातारा जवळ आला व बिल्डींगबद्दल काही सांगु लागला, त्याचे फ्रेंच व आमचे हिंग्लिश असे काही जमेना, पण तो ज्या पद्धतीने सांगत होता ते पाहुन वाटते की तो म्हणत असावा "बेटा, ही तर सुरवात आहे. खरे पॅरीस अजुन पुढेच आहे.". असो.

तर मंडळी पहा "अत्युत्तम ऑपेरा हाऊस" व त्याचा परिसर ...

नंतर आम्हाला ती "ओपेन डेक बस" मिळुन आमचा प्रवास पुढे सुरु झाला. खर सांगतो त्या बसच्या वरच्या मजल्यावर बसुन शहर पहायला जाम मजा येत होती.
मध्येच आम्हाला एक मस्त हॉटेल दिसले, ते होते "जगविख्यात लुव्र म्युसीअमचे हॉटेल" ...

लै भारी लै भारी म्हणुस्तोवर गाडी एका चौकात पोहचली व आम्ही "हे काय ,हे काय ?" म्हणत असताना तो "लुव्र म्युसीअमचा प्रसिद्ध काचेचा पिरॅमीड " दिसला व घोषणा झाली की तुम्ही आता " ला लुव्र म्युसीअम" समोर आहात, आम्ही इथे उतरण्याचा निर्णय घेऊन हे पाहण्याचे ठरवले, इथुन पुढे सगले चित्रस्वरुपात, सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, केवळ अप्रतिम ...

आता सफर करुयात "जगप्रसिद्ध लुव्र म्युसीअमची" ... काही निवडक फोटो इथे देतो आहे ...


मंडळी शप्पथ सांगतो की आपण पाहता पाहता व फोटो काढुन थकुन जाऊ पण इथला अनमोल नजराणा संपणार नाही. " दाखवणार्‍याचे हजातो हात, फाटका माझा कॅमेरा" अशीच गत झाली होती. विस्तारभयाने जास्त फोटो इथे देत नाही, काही निवडक "पेंटिंग्स" पहा ...

आणि हीच ती, "लिओनार्डो दा विंची ची जगप्रसिद्ध मोनालीसा" ...
ह्याच अनुपम तस्वीरीच्या शोधात दरवर्षी लाखो लोक "मोनालिसा मोनालिसा" चा गजर करत ह्या वास्तुला भेट देतात ...

आम्ही नुसते धुंद होऊन एका वेगळ्याच कैफात हे सगळे अलौकीक सौंदर्य पहात होतो, आम्हाला पुढेचे उरकायचे असल्याने आमची पळापळ करत पहाणे चालु होते पण तुम्हाला सांगतो मंडळी काही "अस्सल रसिक " एकेक गोष्ट तासनतास पहात असतात व त्या सौंदर्याचा अस्वाद घेतात, हीच खरी कलेची कदर ...
आम्ही काय नुसते वखवखल्यासारखे पाहुन घेतले व पुढच्या प्रवासासाठी बाहेर पडलो ...
बाहेर आल्यावर वाटत होते की कोणत्या तरी वेगळ्याच दुनयेत आलो, आत जे काही होते ते दैवी, अलौकीक, अप्रतिम, अमानवी, उच्च असे काही आणि बाहेर तुमच्याआमच्यासारखे सामान्य, छे शब्दच नाहीत आतले सौंदर्य शब्दातुन उतरवायला, फोटो तरी किती काढणार ???
असो.

आता अख्खे पॅरीस पहायला जर १ महिना पुरणार नसेल तर त्याचे वर्णन एका भागात कसे शक्य आहे ?
मला हा लेख क्रमशः लिहावाच लागेल, म्हणुन आता इथेच थांबतो ...
बाकीचे वर्णन पुढीच (कदाचीत २ ) भागात आणि अर्थात वाचकांची इच्छा असेल तर....

ता.क.: जवळपास ५०० + फोटो काढले आहेत व सर्व आंतरजालावर चढवले आहेत, त्याचा "दुवा" सुद्धा शेवटच्या भागात ...
वा रे वा, आत्ताच दुवा दिल्यावर तुम्ही कशाला ही "पॅरीस यात्रा" वाचताय ... ;) ;) ;)

अर्थातच क्रमश :
( पुढचा भाग जास्तीत जास्त २-३ दिवसात नक्की )

आस्वादलेखशिफारसमांडणीसंस्कृतीकलाइतिहास

प्रतिक्रिया

नंदन's picture

14 Nov 2008 - 2:31 am | नंदन

झकास फोटोज. पॅरिस हे घुटक्याघुटक्याने प्यायचे शहर आहे हे खरं असलं, तरी धावती भेटही तितकीच मोहून टाकणारी असणार, यात शंका नाही. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2008 - 2:44 am | स्वाती दिनेश

मस्त रे डॉन्या.. पारीच्या आठवणी ताज्या केल्यास..इतक्यांदा गेले आहे तरी अजून कितीही वेळा जायला तयार आहे पारीला..
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
स्वाती

प्राजु's picture

14 Nov 2008 - 2:57 am | प्राजु

तू ज्या पद्धतीने पॅरिस पाहिलेस.. त्याच पद्धतीने इथे वर्णन लिहिलेस.. म्हणजे धावत पळत. तरिही वाट पहाते आहे पुढच्या भागांची.
मोनालिसाचं पेंटींग पाहून छान वाटलं. सगळीच चित्रे मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

14 Nov 2008 - 3:11 am | छोटा डॉन

खरे सांगु का प्राजुताई, मी आधी नुसते फोटो टाकणार होतो व म्हणुन लेख आधी मी "कलादालन" मध्ये टाकला होता. मग नुसते फोटो मला तर्कसंगत वाटले नाही म्हणुन ४-४ वाक्ये लिहली प्रत्येकाबरोबर ...
बघता बघता लेखच तयार झाला ...
मी जेव्हा प्रकाशीत केला तेव्हा तो गेला होता "कलादालनात"
असा आहे माझा वेंधळेपणा एकंदरीत ...
मग चतुरंगशेठ व केसुशेठशी बोलुन तो योग्य ठिकाणी हलवला ... :)

असो पुढचा भाग आता सविस्तर, परफेक्ट, तब्येतीत व खास माझ्या स्टायलीत ...
अपेक्षा भंग होणार नाही ही माझी ग्वाही ...

बाकी खाली भाग्यश्रीताई म्हणते तसे मला पण क्रेज होती बॉ "लुव्र आणि मोनालिसा" पहायची ते "दा विंची कोड " वाचल्यावर व पाहिल्यावर ...
सारखे तो "काचेचा त्रिकोण" डोळ्यासमोर यायचा व त्याखालची "मेरी मॅक्लडेन" दिसायची ... :)

छोटा डॉन दा विंची
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाग्यश्री's picture

14 Nov 2008 - 2:58 am | भाग्यश्री

वॉव!! पॅरीस,लुव्र.. सहीच..
थोडीफार का होईना लुव्रची सहल घडवल्याबद्दल थँक्स.. दा विन्ची कोड वाचताना नेहमी वाटायचे आधी फिरून येऊ ते..
वाचकांची इच्छा काय अरे.. आग्रह समज.. लवकर येऊदे वर्णन्,फोटोज!

http://bhagyashreee.blogspot.com/

अनामिक's picture

14 Nov 2008 - 3:07 am | अनामिक

मस्तं डॉन भौ... लवकर लवकर येऊ दे पुढचे भाग....

शितल's picture

14 Nov 2008 - 3:11 am | शितल

डॊन्या,
फोटो क्लास काढले आहेस.
पॆरिस खुपच सुंदर शहर आहे असे ऐकुन आहोत,
लवकरच पुढचा भाग लिहि आणि जगप्रसिध्द आयफेल टॊवरच्या फोटोची ही वाट पहात आहे. :)

भास्कर केन्डे's picture

14 Nov 2008 - 3:13 am | भास्कर केन्डे

डॉन साहेब, सहल मस्त चालली आहे. पुढचा भाग येऊ द्यात.

निवडक चित्रे आवडली. पण एक मनातलं सांगू का साहेब... या मोनालिसाचे फोटो लहानपणा पासून पहात आलेलो आहे. प्रत्येक वेळी तो फोटो पाहिला की मला तर बॉ ती मिस्टर मोना वाटतो. ;)
कदाचित कलेची जाण नाही :P अथवा ती कला प्रत्यक्ष पहावी लागणार.

पुढील सहलीसाठी शुभेच्छा!

आपला,
(भटका) भास्कर
आम्ही येथे वसतो.

डाण्या भैताडा .... इथं तरी नक्की ठेवणार ना लेख ? का पुन्हा इकडून उचलून तिकडं ?

आम्ही काय नुसते वखवखल्यासारखे पाहुन घेतले व पुढच्या प्रवासासाठी बाहेर पडलो ...

वा !! तुम्ही वखवखलेल्या नजरेने कोणतं सौंदर्य पाहिलं असावं याची अंमळ कल्पना आलीच ..
=)) =)) =))

बाकी तो काचेचा पिरॅमिड कोणत्या तरी प्रसिद्ध हॉलिवूडपटात पाहिल्यासारखा वाटतोय .. नक्की आठवत नाहीय.
डॉणेश .. जरा फ्रेंच संस्कृत्ती बद्दल लिवा राव .... प्रभु सरांची दिक्षा मिळाल्याने आपल्यात थोड तरी सामर्थ्य आलं असेल अशी अपेक्षा करतो ..

-- टारझिनेदिन टारझिदान
आम्ही सर्व संस्कृत्यांपासून चांगल्या गोष्टी शिकतो .

घाटावरचे भट's picture

14 Nov 2008 - 4:25 am | घाटावरचे भट

मस्त झालेली दिसतीये सहल. पुढचा भाग लवकर टाका...

मदनबाण's picture

14 Nov 2008 - 4:56 am | मदनबाण

मस्त रे डॉन्या ....पुढच्या भागाची वाट पाहत आहे...

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

कपिल काळे's picture

14 Nov 2008 - 5:51 am | कपिल काळे

फोटु चांगले आहेत. पण...

पाहुयात हे क्रियापदाचे कोणते रुप ?

हल्ली ह्या पाहुयात, जाउयात, करुयात , बसुयात अश्या रुपांचा सुळसुळाट वाढला आहे.

आय.बी.एन लोकमत, स्टार माझा, झी चोवीस तास अश्या वाहिन्यांवरचे मराठी तर एकवत नाही.

http://kalekapil.blogspot.com/

आनंदयात्री's picture

14 Nov 2008 - 12:16 pm | आनंदयात्री

>>पाहुयात हे क्रियापदाचे कोणते रुप ?

तो शब्द वापरतांना लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले ना ??

>>हल्ली ह्या पाहुयात, जाउयात, करुयात , बसुयात अश्या रुपांचा सुळसुळाट वाढला आहे.

ते शब्द म्हणजे काय खिसेकापु आहेत का भुरटे चोर आहेत त्यांचा सुळसुळाट वाढायला !!

तुम्ही मराठी शुद्ध्लेखनावर लेख लिहा हवा तर एक !!

सुनील's picture

14 Nov 2008 - 1:51 pm | सुनील

तुम्ही मराठी शुद्ध्लेखनावर लेख लिहा हवा तर एक !!
लिहा पण तो छंदशात्र विभागात टाकायला विसरू नका नाहीतर अप्रकाशित होईल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंदयात्री's picture

14 Nov 2008 - 1:56 pm | आनंदयात्री

ठ्ठो ... ठ्ठो ... ठ्ठो !!
=))

कपिल काळे's picture

14 Nov 2008 - 7:47 pm | कपिल काळे

आनंदयात्रींना मी लिहिलेले उत्तर वाचावे

http://kalekapil.blogspot.com/

कपिल काळे's picture

14 Nov 2008 - 7:46 pm | कपिल काळे

जे चूक आहे ते आहेच की. त्यात ज्याला दाखवून दिलं त्याला न दुखता तुम्हाला कसला त्रास झाला?

जे सांगायचे ते समजलं म्हणजे झालं......

हे ही बरोबरच कारण उसाला व्याकरण शुद्ध "पाणी" घाला किंवा गावरान " पानी" उस मरणार नाही. मग विचार करा एखाद्या भाजीत ठराविक क्रमानेच का बरं घालतात मसाले. शेवटी ते एकत्रच होतात तर सगळे भस्स्कन घालून का नाही टाकायचे बरं?

काही नियम पाळल्यास त्याच गोष्टीची चव अजून चांगली लागते. भाषेचेही असेच आहे. काही नियम पाळल्यास ती अजूनही चांगली वाटते. त्यालाच शुद्धलेखनाचे नियम म्हणतात.

आता राहिला सुळसुळाटाचा मुद्दा...

मी सांगितलेल्या वाहिन्या तर दिवसाढवळ्या भयंकर मराठी स्पीक करुन मराठीला स्टॅब करत आहेत. त्यांच्या इम्पॅक्टखाली येउन रिमेनिंग मराठी स्पिकींग पॉप्युलेशनच्या लॅन्ग्वेजवर बॅड इफेक्ट होत आहे.

आणि ही "करुयात" जमातीची क्रियापदे वापरणे ही हल्ली फॅशन होउन बसली आहे.

http://kalekapil.blogspot.com/

छोटा डॉन's picture

14 Nov 2008 - 8:17 pm | छोटा डॉन

मुळात अशा लेखावर "ह्या प्रकारच्या प्रतिक्रीया" टाकणेच प्रचंड खटकले.
असो, सकाळीच मी पाहिले होते पण वाद नको म्हनुन सोडुन दिले, यात्रीने पण "योग्यच" लिहले ना ?
आता तुम्ही अजुन एक लंबीचौडी प्रतिक्रीया टाकुन "वाद" घालायला उद्युक्त करत आहात ...

असो. हरकत नाही ....
मुळात खुप दिवसांनी मला " पान पान भर मोठ्ठे वाद घालणारे प्रतिसाद " लिहायला मिळणार हीच आनंदाची गोष्ट आहे व त्याबद्दल मी आपले आभार मानायला हवेत, मी अशी संधी कधीच सोडत नाही.
पण ..... ती जागा ही नव्हे, आपण वेगळा धागा काढा किंवा माझ्या "खरडवहीत" या, तिथे आपण मनसोक्त "बोलु /भांडु/वाद घालु", कसे ???
कधीही या, आपले स्वागतच असेल, मला तर लै आवडते असले, येताय का मग ?

उगाच "अशा" प्रतिसादाने "माझ्या लेखाचा तोल" ढासळु नका ही नम्र विनंती. उगाच चांगल्या धाग्याचा इस्कोटा होऊन पुढेचे लिहायचा माझा मुड जाईल. मी मनापासुन लिहीत असलेल्या "सिरीअस धाग्याचे" अशा प्रकारे " वाट्टोळे" करण्याचा अधिकार कुणालाही नाही ...
याउप्पर जे काही असेल ते "खरडवहीत किंवा नव्या धाग्यावर" ....

धन्यवाद !!!

( लेखक )छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाग्यश्री's picture

14 Nov 2008 - 11:52 pm | भाग्यश्री

बापरे, नविन दिसताय इथे..
नाही, मिपावर येऊन शुद्धलेखनावर बोलायचं म्हणजे अवघडच आहे!

हे असे , मूळ लेखनाशी संबंध नसलेले, शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका काढणारे प्रतिसाद आत्ता पर्यंत 'तिथे'च पाहीले होते.. आणि हो, मूळ लेखाच्या विषयाला वगैरे काही प्रतिसाद न देता..
मिपावर, शुद्धलेखनाचं अवडंबर न माजवता, भावाला(भाऊ नव्हे!) महत्व देणारी लोकं जास्त आहेत.. माणूस उत्स्फुर्तपणे लिहीत असतो.. असा खडा टाकून काय आनंद मिळतो!? इथे 'लेख/फोटोज'ना प्रतिसाद देऊन , ती व्याकरणाची सूचना ख.व. मधे नसती का टाकता आली?

जाता-जाता, माझा नवराही पाहुयात-जाऊयात म्हणत असतो. ज्यांना सवय नसते त्यांना वेगळं वाटेल कानाला इतकंच. पाहुयात म्हणणं म्हणजे काही शब्दाचा अर्थ बदलत नाही की काही नाही. प्रत्येक ठीकाणची बोलीभाषा वेगळी असते एव्हढंच ! ..
एखादी गोष्ट छान झाली याला, मी 'जबरी होतं ते', किंवा 'सह्ही होतं ते' वगैरे म्हणीन.. माझे बाबा 'झक्कास!' असं म्हणतील.. एखादा गावातला माणूस 'लई ब्येस झालं बगा', म्हणेल.. अर्थ एकच नं ?

अवांतर : छोटा डॉन, तुझ्यालेखात हे लंबेचौडे प्रतिसाद द्यायचे नव्हते खरंतर.. राहवलं नाही म्हणून दिला.. सॉरी!

http://bhagyashreee.blogspot.com/

पाहूया आणि पाहूयात ही दोन्ही रूपे समानार्थी आहेत. कुठलेही एक रूप चूक नाही. व्याकरणाचा असा कुठलाही नियम नाही जो यातील एका रूपाला चूक ठरवतो. निव्वळ प्रमाण बोलीपेक्षा किं ऽचित वेगळे असलेल्या रूपाची चूक म्हणून संभावना करणे हे अतिशय चूक आहे.

अनिल हटेला's picture

14 Nov 2008 - 7:31 am | अनिल हटेला

पॅरीस ची सहल झोकात झालीये...
आंदे और भी ......

(एन एवीनींग इन पॅरीस चा चाहता)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सहज's picture

14 Nov 2008 - 8:20 am | सहज

खरे आहे पॅरीस जादुनगरी दोन दिवसात, एका लेखात म्हणजे अशक्य.

वाचतो आहे.

ऋचा's picture

14 Nov 2008 - 9:59 am | ऋचा

डॉण भौ लैच म्हन्जी लैच भारी :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मनस्वी's picture

14 Nov 2008 - 1:58 pm | मनस्वी

>"दाखवणार्‍याचे हजातो हात, फाटका माझा कॅमेरा"
तिथे म्युझिअममध्ये कॅमेरा घेउन जायला चक्क चक्क परवानगी आहे??!! सही!
डान्या धावते वर्णन आवडले.
पुढचाभागलवकरटाक.

यशोधरा's picture

14 Nov 2008 - 11:28 am | यशोधरा

मस्त फोटू आणि वर्णन! पटपट 'लिहूयात' असा नियम कर बरं!! :)

आनंदयात्री's picture

14 Nov 2008 - 11:52 am | आनंदयात्री

>>"दाखवणार्‍याचे हजातो हात, फाटका माझा कॅमेरा"

सही !! मोप मजा केलेली दिसतीये भाउ !! फोटो लै भारी... वर्णन अजुनच भारी !! औ भी आन दो !!

अवांतरः पॅरिसचा फोनवर झालेला तह आठवतोय का ? पॅरिस लकी म्हणायचे तुमच्यासाठी ;)

>> "हाव्र कॉमार्टीनी ( हा माझा देशी उच्चार, ह्याचा अस्सल फ्रेंचशी दुरचा सुद्धा संबंध नाही ) "

हा तुमचा अस्सल भारतीय उच्चार .. फ्रेंच लोक वेगळ्या पद्धतीने करतात. वरचे वाक्य असे बदलुन घ्या. अस्सल बिस्सल काही नसते हो ! फ्रेंच,लंडनचे झालेच तर गेलाबाजार अमेरिकेचे तेवढे अस्सल आन आपले गावठी का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2008 - 11:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आहेत. धन्यवाद पारीची सफर घडवून आणल्याबद्दल.

एक प्रश्न जे जे कोणी पश्चिम युरोपात फिरले आहेत त्यांच्यासाठी: सगळा पश्चिम युरोप (युके, फ्रॉन्स, जर्मनी, नेदरलंड्स्, डेन्मार्कसुद्धा इत्यादी) सारखंच दिसतं का? मलातरी या सगळ्या बिल्डींग्स पाहून असंच वाटलं. मी एका आंग्ल-डॉईश माणसाला हाच प्रश्न कोपनहेगनच्या रस्त्यांवरुन चालताना विचारला होता. माणूस शेवटी ब्रिटीशच, त्याने आपल्या मूळ देशाच्या परंपरेला जागून उत्तर दिलं, "आत्ता एकच बिअर घेतलेली आहे तरीही मला क्षणभर बॉनच्या रस्त्यावरुन चालत मी घरीच निघालेलो आहे असं वाटलं. तू बाहेरून आलेली आहेस म्हणूनच तुला असं वाटतंय असं माझं तरी मत नाही, मलाही तसेच भास होत आहेत."

बाकी डान्या, आयफेल टावर नाही रे दिसला का तुला? का तो पुढच्या भागात??

सुनील's picture

14 Nov 2008 - 1:57 pm | सुनील

भाषा आणि वाहतुकीची दिशा (फक्त इंग्लंड्-आयर्लंडात भारता प्रमाणे, इतरत्र त्या उलट) सोडली तर फारसा बाह्य फरक नाही. ७०-८० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती गॉथिक का कुठल्या शैलीत (चित्राताई सांगू शकतील) असल्यामुळे सारख्याच दिसतात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

14 Nov 2008 - 2:04 pm | छोटा डॉन

अदिती, अगदी अचुक निरीक्षण आहे .
मी आत्तापर्यंत जो काही युरोप पाहिला आहे त्यात मला सगळीकडे "इमारतींच्या बांधकामांची शैली" थोड्याफार फरकाने एकच आढळली. इमारती आणि वसाहतींची रचना अगदी जवळपास सारखीच म्हणता येईल, कदाचित तिथल्या देशाप्रमाणे व संस्कॄतीप्रमाणे रंगात फरक असु शकतो पण "बेसीक इन्फ्रास्ट्र्क्चर" अगदी तंतोतंत सारखे म्हणायला हरकत नाही ...
ह्याला आपण खास "युरोपीअन शैली" म्हणु ...
पण फ्रान्स मध्ये जरा सजवणुकीकडे जास्त कल आहे, कमीत कमी पॅरीसमध्ये तरी मला "रंग, धातु, कलाकुसर" यांचा वापर अगदी सढळ हाताने केलेला दिसला.

हाच प्रकार दक्षिण भारतातल्या "मंदिरांबाबत" आढळतो, सगळी मंदिरे जवळपास सारखीच, हेमाडपंथी का काहीशी अशीच शैली आहे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुनील's picture

14 Nov 2008 - 1:49 pm | सुनील

येउदे अजून घुटक्या-घुटक्याने.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मैत्र's picture

14 Nov 2008 - 2:05 pm | मैत्र

डॉन भाऊ, मस्त लेख आणि फोटो... मलाही पॅरिस भेटीचे वर्णन लिहिण्यास उद्युक्त करतो आहेस...
अजून एक लेख लिहिला तर चालेल का मंडळी पॅरिस वर ?
तेवढं फोटो कसे चढवायचे ते सांगेल का कोणी ... मला काही केल्या ते नीट जमत नाही...

अभिज्ञ's picture

14 Nov 2008 - 3:16 pm | अभिज्ञ

डॉन्या,
मस्तच लिहिले आहेस.
छायाचित्रे फारच छान आलीत.
ती ५०० छायाचित्रे देखील पहायची जाम उत्सुकता आहे. लवकर त्याचा दुवा देणे.

अभिज्ञ.

आनंद's picture

14 Nov 2008 - 3:58 pm | आनंद

डॉन भाऊ पॅरिस ची सफर चांगली झालेली दिसतेय. पण "प्रेक्षणीय" स्थळांचे फोटु कुठे आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Nov 2008 - 4:08 pm | बिपिन कार्यकर्ते

दोन दिवसात ५०० फोटो?

डॉन्या, पारी एकदम 'फॉर्मिदाब्लं' आहे रे... आणि फोटो जरा जास्त टाक ना...

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

14 Nov 2008 - 4:30 pm | लिखाळ

अरे वा वा !
पॅरिस सफर उत्तमपैकी झालेली दिसते ! मस्त !
खरं आहे पॅरिस घाइगडबडीत पाहायचे शहर नाही. पण आपल्या सारख्यांना दोन-चार पेक्षा अधिक दिवस कसे मिळणार !

'फाटका कॅमेरा' हे आवडले :) तशीच गत होते..
तिथली भिंत भरुन मोठी चित्रे पाहिली की आवक व्हायला होते..

फोटो छान आहेत. पुढचा भाग अजून सविस्तर लिही...
-- लिखाळ.

मिसळ's picture

14 Nov 2008 - 8:59 pm | मिसळ

डॉन,
छान लिहिले आहेस. पु. भा. प्र.
- मिसळ

सोनम's picture

7 Dec 2008 - 2:22 pm | सोनम

तुम्ही जो प्रवासाचा आ॑नद घेतला तो मिपाबरोबर शेअर केला त्याबद्द्ल आपले आभारी आहोत्.तुम्ही पॅरीसची सफर खूप छान लिहिली आहे.आणि फोटो ही छान आहे. न॑तर ही अशीच माहिती मिळो अशी आहे. :)] :)] :)]

(पुण्याची सोनम) राम राम मिपा

नाना चेंगट's picture

6 Jun 2012 - 6:57 pm | नाना चेंगट

हल्ली फिरणे बंद केले की काय डान्रावांनी ??? ;)

चौकटराजा's picture

6 Jun 2012 - 8:51 pm | चौकटराजा

हम्म...... प्रेमनगरी पॅरिस ... कला नगरी पॅरिस...... संग्रहालय नगरी पॅरिस.... आपले फोटो
अतिशय दर्जेदार आलेत. पण पॅरिसचे वर्णन नोत्र देम ...लुव्हर,,, कॉनकॉर्ड चौक....शांजे लीस रस्ता..द गॉल प्लेस... आयफेल टॉवर अशा क्रमाने आले असते तर मला अधिक आवडले असते. पण धागा मस्त आहे यात शंकाच नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Jun 2012 - 8:52 pm | निनाद मुक्काम प...

झकास व तजेलदार सचित्र लेख

अवांतर खूप दिवसांनी भेटलेल्या नंदा प्रधान युरोपात भटकून आल्यावर कळल्यावर
भाई त्याला " पेरीस पहिले असशील ना ? असा प्रश्न विचारतात
त्यातील भोटपणा नंदाला कळला नव्हता.

पण डॉन्या तुला लेका कळलाच असेल.
कलासक्त ह्या शब्दाचा आम्ही हवा तसा अर्थ घ्यावा का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2012 - 12:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर आपले स्वागत आहे. लेख चाळला. धन्यवाद.
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

भरत कुलकर्णी's picture

7 Jun 2012 - 12:40 am | भरत कुलकर्णी

14/11/2008 सालचा लेख आहे हा डॉ साहेब. स्वागत कशापायी?

२-३ दिवसात पुढचा भाग देणारेत साहेब...!

लवकर टाका लवकर टाका. :)

पियुशा's picture

7 Jun 2012 - 1:25 pm | पियुशा

मस्त !!!पुढिल फोटो अन वर्णनाच्या प्रतिक्षेत :)