वेताळाचे प्रश्न

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
16 May 2012 - 2:20 pm

बर्‍याच काळाने आमचा नान्या सक्रिय राजकारणात परत आला, आणि आमचा आनंद बाटलीत मावेनासा झाला. तोबताबड आम्ही आमच्या चौपाटीवरती प्यार्टी आयोजीत केली. सगळी चौपाटी सजली होती, बार टेंडर, कॅप्टन, वेटर सगळे नवीन धुतलेले कपडे घालून सेवेला हजर झाले होते, मात्र नान्याच्या चेहर्‍यावरती उदास उदास भाव दाटून राहिले होते. गप्प गप्प नान्या काय मला बघवेना. शेवटी गुमसुम मध्ये २ पेग झाल्यावरती मी नान्यावरती सरळ डाफरलोच.

मी :- नान्या, काय मयतीला जौन आला बे ? असा का बसला आहेस ?

नाना :- पर्‍या काय सांगू तुला ? मला ४ दिवस झाले वेताळाने पकडले आहे. त्याने मला काही प्रश्न विचारले आहेत आणि त्यांची उत्तरे बुधवारच्या रात्री द्यायलाच हवी असे सांगितले आहे रे. आज बुधवार रात्र आहे आणि मी विचारच करू शकलेलो नाही.

मी :- अरे असे काय विचारले बे त्याने ? मला सांग आपण भिडू आज जाऊन त्याला.

मी येवढे बोललो आणि नान्या फ्लॅशबॅक मध्ये गेला ...

रविवारी मी नको नको म्हणत असताना देखील नान्या पार्टी झाल्यावरती रात्री १२ च्या सुमाराला नाना एकटाच घराकडे निघाला होता..
अचानक त्याला पाठीवरती ओझे जाणवायला लागले, बघतो तर काय.. वेताळ खुद्द पाठीवरती हजर. नान्याने विक्रम वेताळ बघितलेले असल्याने वेताळाने डायरेक्ट गोष्टच सांगायला सुरुवात केली.

एक खूप मोठे जंगल होते... जंगलात अनेक छोटी मोठी राज्ये, विहिरी, समुद्र सुखाने नांदत होती. आपल्या राज्यात मौजमजा करावी आणि अधे मध्ये शेजारच्या राज्यात काड्या साराव्यात, त्यांच्या नावाने खडे फोडावेत असे उद्योग चालू होते. जंगलातले अनेक रहिवासी हे एकाचवेळी अनेक राज्यांचे नागरिकत्व बाळगून असल्याने दंगल जोरात सुरू असायची. ह्या जंगलात एक आयटम राज्य होते. ह्या राज्याचा राजा भारी हिकमती होता. तो पाणी अडवायचा, जिरवायचा आणि वेळ पडली तर कृत्रिम पाऊस देखील पाडायचा. त्यामुळे त्याचे राज्य कायम हिरवेगार असायचे. सगळीकडे हिरवेगार गवत असायचे, फळे फुले लगडलेली असायची, त्यामुळे शाकाहारी प्राणी इकडेच धाव घ्यायचे. शाकाहारी प्राण्यांच्या मुबलकतेमुळे मांसाहारी प्राण्यांचा देखील ह्या जंगलावरती भारी जीव होता. हे सगळे बघून शिकारी देखील आपले मचाण इकडेच बांधायला लगबग करायचे. असे हे मोस्ट हॅपनींग प्लेस असलेले राज्य होते.

सगळे काही सुखसमाधानाने चाललेले असतानाच अचानक ह्या राज्याचा राजा राज्य सोडून निघून गेला. कोणी म्हणाले त्याने पापाचे प्रायश्चित्त केले, तर कोणी म्हणाले त्याला हुसकावून लावले. पाप म्हणजे काय तर राजाने काही प्राण्यांच्या शिकारी मधला वाटा पळवून नेला. जे झाले ते झाले... प्रचंड गदारोळ, राज्य बुडाले इ. इ. चर्चा देखील मागे पडल्या आणि राज्याचा कारभार पुन्हा सुरळीत झाला. नव्या राजाने नवी घडी बसवली.

ह्या नव्या अमदानीत सामान्य प्रजा नेहमीच्या व्यवहारात मग्न होती, मात्र पडद्यामागे अनेक कारवायांना ऊत आला होता. राजाने नव्याने नेमलेल्या काही अधिकार्‍यांना आता जंगलाचे कायापालट करण्याचे स्वप्न पडू लागले होते. जुन्या अधिकार्‍यांचा रुबाब कायम होता पण त्यांना पूर्वीचे निष्ठावंत नागरिक आता देशद्रोही वाटू लागले होते. आपल्या माणसांची वर्णी लावण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू होती. अशातच राज्यात दुही माजली आणि काही दुखावलेल्या रहिवाशांनी आपले वेगळे राज्य स्थापन केले. मग झाडे कोणाची, समुद्र कोणाचा असे वाद सुरू झाले.

काही जुन्या अधिकार्‍यांनी मग आपले सुपीक डोके लढवले आणि राज्यात नव्या नागरिकांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. हे नवे नागरिक तसे 'आपण बरे आणि आपले काम बरे' अशा वृत्तीचे. अधिकार्‍यांनी मग त्यांना नव्या नव्या स्वप्नांचे गाजर दाखवायला सुरुवात केली. त्यांना अधिकार मिळवा, तुमचे हक्क मिळवा अशा काड्या सारायला सुरुवात केली. नवे नागरिक भांबावले, त्यांना काय करावे, कसे करावे सुचेना. शेवटी प्रसिद्धी आणि अधिकार कोणाला नको असतो ? ते पण ह्या भूलथापांना बळी पडले आणि एका नव्याच नाटकाला सुरुवात झाली.

जुन्या अधिकार्‍यांच्या पाठिंब्याने मग ह्या नव्या निष्ठावंताच्या मेळाव्यांना, परिषदांना सुरुवात झाली. पडद्याआडून बरीच सूत्रे हालवली जात होती, मात्र पडद्यासमोरच्या नाटकात फक्त नव्या नागरिकांचाच अभिनय दिसत होता. ह्या सगळ्याला जोर म्हणून मग जुन्या निष्ठावंताच्या गटावरती दबाव आणायला सुरुवात झाली. कधी कर चुकवला म्हणून शिक्षा कर, तर कधी राजाज्ञा डावलली म्हणून हद्दपारी कर, तर कधी एकांतात भेटी घेऊन दमदाटी कर असे प्रकार सुरू झाले. नवीन अधिकारी हे सगळे खेळ बघत होते, मात्र कुठल्याश्या अगम्य कारणाने ते ह्यात हस्तक्षेप करतच नव्हते. ह्या सगळ्यामुळे नुसती अनागोंदीच माजली होती.

अशातच एका जुन्या जाणत्या अधिकार्‍याने शाकाहारी - मांसाहारी, झाडावरचे- जमिनीवरचे अशा वर्ण आणि जातीद्वेषाचे बीज राज्यात रोवले आणि एकच धुमाकूळ माजला. 'सय्या भये कोतवाल.. अब डर काहे का ?'. नव्या नागरिकांनी आणि वर्णद्वेषींनी एकच गल्ला केला. काही हुशार लोकांनी जुन्या स्कोर सेटिंगला सुरुवात केली. राज्याला पार रसातळाला न्यायचाच विडा जणू उचलला गेला.... आणि मग एकवेळ अशी आली की समंजस नागरिकांनी आपला राज्यातला वावरच कमी केला.

नाना, आता मला सांग हे राज्य वाचवायचे कसे ?

ह्या राज्याची अवस्था ओसाडगावासारखी होऊ नये म्हणून काय करायला हवे ?

जुन्या अधिकार्‍यांच्या सत्तालोलुपतेला आळा कसा घालावा ?

सगळ्या नागरिकांच्यात सामंजस्य कसे आणावे ?

समुद्र आणि विहीर दोन्ही आपलेच आहेत हे दोन्हीकडच्यांना समजवावे कसे ?

वैतागून राज्यकारभारातुन अंग काढून घेतलेल्या मंत्र्यांना परत आणावे कसे ?

"तू विक्रमादित्य नाहीस म्हणून तुला बुधवार पर्यंत वेळ देत आहे. बुधवारी रात्री जर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर कायमच तुझ्या समोरच्या ग्लासचे आणि बाटलीचे १०० तुकडे होऊन तुझ्याच टेबलाशी लोळण घ्यायला लागतील. " येवढे बोलून वेताळ परत पानटपरीवरती जाऊन बसला.

मी आणि नान्या ह्या प्रश्नांची उकल करतो आहेच, पण तुम्ही देखील काही हातभार लावावात ही अपेक्षा.

कथाइतिहासराजकारणमौजमजाप्रश्नोत्तरेमदतप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

16 May 2012 - 2:28 pm | कवितानागेश

च्यायला!!

स्पा's picture

16 May 2012 - 2:41 pm | स्पा

जुने वर्सेस नवीन..
वा वा आता यील मजा

चला मी पोप्कॉर्ण घेऊन बसलोय रे ...

आता होऊन जाऊ द्या ...................

-(एवर्ग्रीण) स्प्या

मुक्त विहारि's picture

16 May 2012 - 2:35 pm | मुक्त विहारि

त्या वेताळाने बुधवार दिला आहे.

महिना आणि साल कुठले ते कुठे सांगितले आहे.त्यालाही माहित आहे की हा प्रश्न काही सूटणार नाही.

झोपा हो. ज्यांनी चिंता करावी ते झोपले आहेत मग आपणच का चिंता करा.

प्यारे१'s picture

16 May 2012 - 2:50 pm | प्यारे१

>>>>"तू विक्रमादित्य नाहीस म्हणून तुला बुधवार पर्यंत वेळ देत आहे. बुधवारी रात्री जर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर "कायमच" तुझ्या समोरच्या ग्लासचे आणि बाटलीचे १०० तुकडे होऊन तुझ्याच टेबलाशी लोळण घ्यायला लागतील. "

काहीही असो, वेताळानं नान्याची दारु सोडवलेली आहे! :)

माताय, या वेताळाचा प्रॉब्लेम कायै. नक्की कसले कसले आणि किती किती प्रश्न पडलेत बेट्याला. जिवंतपणी 'सपे'त राहायचा का हो हा वेताळ ? नक्की कसलं उत्तर हवंय हे न कळल्याने पास, उत्तर दिलं नाही म्हणून बाटली फुटली तरी बेहत्तर !!

उत्तर दिलं नाही म्हणून बाटली फुटली तरी बेहत्तर !!

तुम्हाला लैच मजा येते अस दिसतंय बाटली फुटल्यावर ;)

>>तुम्हाला लैच मजा येते अस दिसतंय बाटली फुटल्यावर
हा प्रतिसाद देताना हातात स्लाईस मँगोलाची काचेची बाटली होती , ती फुटली तरी बेहत्तर असं म्हणालो मी. आता यात कसली मजा ? तुम्हाला यात आणखी कोणता अर्थ अभिप्रेत असल्यास तुमच्या विचारक्षमतेला हॅट्स ऑफ !!

प्यारे१'s picture

16 May 2012 - 3:18 pm | प्यारे१

अरे तुम्हाला काय वाटतंय?
तुम्ही हे असे प्रतिसाद कुणाच्या सांगण्यावरुन देता आहात ते आम्हाला कळत नाहीये का???? ;)

स्मिता.'s picture

16 May 2012 - 2:54 pm | स्मिता.

शांतता पाहवत नाही काय रे पर्‍या?? दहशतवादी कुठला...

प्रीत-मोहर's picture

16 May 2012 - 3:00 pm | प्रीत-मोहर

आपण याकार्यार्थ एक सप्त सदस्यीय समिती बसवु. समिती जो निर्णय देईल तो मान्य करु.

या समितीचे सदस्य - सप्तचिरंजीव असतील. ;)

मागे एकदा कोणीतरी " बुधवारचा उतारा" नावाचे सदर सादर करायचा त्याची ८वण झाली

टवाळ कार्टा's picture

16 May 2012 - 3:37 pm | टवाळ कार्टा

त्या कुंडलीवरुन सोलुशन सांगणार्या मिपावरच्या बाबांना विचार
ते नाही तर नाडीपट्टीवाली लोक आहेत
तेही नाही तर मग तो वेताळ कोणत्या जातीचा आहे ते चेक करुन दम्दाटी करावी (पान टपरी कोणाची आहे ते पण बघावे)

आज्काल अशाच लोकांचे लेख/प्रतिसाद येत आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2012 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

अरे...? नवीन मालिका आली... चालु राहु द्या गिरण आता...
शेवटच्या भागा पर्यंत ;-)

श्रावण मोडक's picture

16 May 2012 - 3:56 pm | श्रावण मोडक

बुधवारी रात्रीच उत्तर हवंय? शनिवारपर्यंतची मुदतवाढ मागून घ्या. आपोआप उत्तर मिळालेलं असेल. ;)

मृत्युन्जय's picture

16 May 2012 - 4:10 pm | मृत्युन्जय

अर्रे वेताळा कुठे फेडशील ही पापे? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 May 2012 - 4:22 pm | बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश's picture

16 May 2012 - 4:39 pm | कवितानागेश

हा वेताळाचा फटु आहे का?
डोळा मारणं आणि आरोळी ठोकणं एकाच वेळेस कसे काय बरे जमतं? :P

छोटा डॉन's picture

16 May 2012 - 4:50 pm | छोटा डॉन

चालु द्यात ...

- छोटा डॉन

पैसा's picture

16 May 2012 - 4:54 pm | पैसा

p1

आंजावरून साभार!

सानिकास्वप्निल's picture

16 May 2012 - 5:02 pm | सानिकास्वप्निल

+ १
=)) =))

गणपा's picture

16 May 2012 - 5:04 pm | गणपा

वेताळ बराच हुशार आहे, आणि सगळ्यांच्या नाड्या/पुर्वेतिहास ही ओळखुन आहे.
तस्मात वेताळानेच कारभार हातात घ्यावा अस माझ मत आहे.

प्रीत-मोहर's picture

16 May 2012 - 5:06 pm | प्रीत-मोहर

आणि कारभार हाती घेउन वेताळ खुद्दच अडकला तर?

त्याला तर स्वतःलाच कितीतरी प्रश्न पडलेत.

प्यारे१'s picture

16 May 2012 - 5:13 pm | प्यारे१

ही आली हडळ. ;)
ह. घ्या.

बाकी वेताळाचं काम 'फक्त प्रश्न विचारणं' हे असल्यानं वेताळ कारभार हाती घेण्यास 'नम्रपणे' नकार देईल असं माझा आतला आवाज सांगतो. ;)

वेताळाला नानुडीची मान आहे ना. ;)

इरसाल's picture

16 May 2012 - 5:09 pm | इरसाल

हेताळानं कारबार हाती गेतला तं इक्रम नाय का पाटगुळी बसनार ?

चिंतामणी's picture

16 May 2012 - 5:18 pm | चिंतामणी

प-या, किती जणांचा बाजार उठवायचा हाय रे.

कोणाकोणाला पाहीजे हे?? नोंदणी करा.

याच्या पुढची गोष्ट ऐका. विक्रमच तो. वेताळ काय विचारतोय, हे त्याला कळेना. मग वेताळाला विक्रमाने काही प्रतिप्रश्न विचारले.

१. नक्की नवे आणि जुने यांची व्याख्या काय आणि ती कोणी केली?
२. रोज नवे नागरिक येत असताना ओसाडगाव होईल अशी भीती का वाटते?
३. अधिकारी हे इतरांसारखेच सामान्य नागरिक आहेत कोणी वेगळे नाहीत हे काही नागरिक विचारात न घेतल्यासारखं का करतात?
४. इथे समुद्र आणि विहीर कुठून आली?
५. वैतागलेल्या मंत्र्यानी कारभारातून अंग काढून कशाला घ्यायला पाहिजे? मंत्रिमंडळात सगळ्याना प्रतिनिधित्व मिळेल अशी राजाने काळजी घेतली आहे, तर काय खटकतंय ते राजाजवळ बोलू शकतातच ना!

सामंजस्य दुसर्‍या कोणी आणावं म्हणून वाट कशाला बघायला पाहिजे? मैत्रीचा हात कोणीही पुढे करू शकतोच की! समस्येचं मूळ आहे ते गैरसमजात. जुन्यांनी नव्यांना हिणवू नये आणि नव्यांनी जुन्यांच्या पायावर पाय देऊ नये. जेव्हा जुने आणि नवे एक होतील तेव्हा काड्या सारणार्‍यांचं काही चालणार नाही. अर्थात, तोपर्यंत आणखी नवे आलेले असतीलच. आजचे नवे, उद्याचे जुने. तेव्हा हे थोडंफार चालणारच. गोंधळून जायची काही गरज नाही.

हे उत्तर मिळाल्यावर वेताळाने काय केलं असावं बरं?

परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2012 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार

व्यास कोण ?

प्रीत-मोहर's picture

16 May 2012 - 6:49 pm | प्रीत-मोहर

आमची ज्योताय स्टेनो आहे होय रे?

स्पा's picture

16 May 2012 - 5:41 pm | स्पा

पॆका शी सहमत. आणि दणदणित अणुमोढण

मृगनयनी's picture

16 May 2012 - 5:54 pm | मृगनयनी

पैसा ताईंसाठी जोरदार टाळ्या!!!...... :)

एक कॅज्युअल प्रश्न :-

सध्याच्या लेटेस्ट सम्पादकांची यादी व माहिती कुटे वाचायला भेटेल ? :)

आपणाकडुन पुर्वीही आलेला आहे असे जाणवते/आठवतेय.
तेव्हा वेताळाऐवजी विदुषक होता.

आदिजोशी's picture

16 May 2012 - 5:55 pm | आदिजोशी

ह्याची आठवण झाली

सुहास..'s picture

16 May 2012 - 10:54 pm | सुहास..

नाना, आता मला सांग हे राज्य वाचवायचे कसे ? >>>

हॅ हॅ हॅ ,,,, राज्य वाचलेलेच आहे ..राज्य-संस्थापकाने 'पाया; तेव्हढा भक्कम ठेवला होता...

संस्थापकाचा फॅन
वाश्या

ह्या राज्याची अवस्था ओसाडगावासारखी होऊ नये म्हणून काय करायला हवे ? >>>

अनौरस गैरसमज कसे होतात, या च उत्तम उदाहरण , " अक्षरे " मोजदाद करावीत म्हणजे ओसाडगाव झाल्याचे गैरसमज होणार नाहीत.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे ओळखुन असणारा
वाश्या

जुन्या अधिकार्‍यांच्या सत्तालोलुपतेला आळा कसा घालावा ? >>

गरज ही शोधाची जननी आहे म्हणे , पण मग मूळात गरज का लागावी ..

गरज, निकड आणि सत्ता यातला फरक ओळखणारा
वाश्या

सगळ्या नागरिकांच्यात सामंजस्य कसे आणावे ? >>>

हिकडुन तिकड आणि तिकडुन हिकड काड्या सरकाव्यात , आणि दिवस-रात्र, र्रिकामटेकड्या बायकांशी संवाद साधावा ,म्हणजे आपोआप सांमजस्य येते ....

समजुन उमजुन डोळेझाक करण्यार्‍या भिकारचोटांना फाट्यावर मारणारा
वाश्या

समुद्र आणि विहीर दोन्ही आपलेच आहेत हे दोन्हीकडच्यांना समजवावे कसे ? >>>

त्याची ( टीआरपी करिता ) गरज असणार्‍यांनी हे खुशाल करावे.

खारट आणि गोड्या पाण्याची चव माहीत असलेला
वाश्या

वैतागून राज्यकारभारातुन अंग काढून घेतलेल्या मंत्र्यांना परत आणावे कसे ? ??

राज्यकारभार अनांगोदी करून सामान्यास वैताग आणणार्‍या मंत्र्यास परत आणणे म्हणजे कोट्यावधी चा भ्रष्ट्राचार केलेल्या तरूंग-वाश्यास निवडुन देणे...उद्या डॅडी ला सपोर्ट द्यायला सचीन गेला तर ...

चुक आणि बरोबर हे नीट पणे ओळखणारा
वाश्या

( वेताळ च काय ? पण सगंळ्यांना पुरुन उरणारा )
अजुन कोण ?? वाश्या च !!

स्पंदना's picture

17 May 2012 - 5:09 am | स्पंदना

आता तुला जर सगळ ठाव असल तर आमी काय सांगाव तुला? पर त्ये एक रेक्काच ( हा तीच ती काल सांसद्सदस्यतेची शपथ घेणारी) आन राज्बब्बर, आन आपल्या रमेशदेवाचा पोरगा अजिंक्य देव ह्यांच पिच्चर होत त्ये आटव. त्यात कशी नंतर राजबब्बर्ची गोची हुन त्याला आपल्या स्वार्थासाटन परत येयाच आसतय ना तशी काय तरी गोची असावी ब्वा!

पिक्चर ब्गुन ज्ञान वाडवणारी

माश्या.

श्श्या!
वाश्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मर्दा!
बसवला टेम्पोत च्यायला!
राजकारणात बोलणं कमी आणि 'निरीक्षण जास्त करायचं असतं' हे का आम्ही तुला सांगावं???
ह्यामुळंच तिकीट मिळत नाही बघ तुला! ;)

शांत राहा, मजा पहा! :)

चिंतामणी's picture

18 May 2012 - 1:09 am | चिंतामणी

8-)

ऋषिकेश's picture

18 May 2012 - 10:04 am | ऋषिकेश

आता मला सांग हे राज्य वाचवायचे कसे ?

बहुदा यासाठी (महा)विष्णूलाच दहावा ड्यु आयडी आपलं 'अवतार' घ्यावा लागणार. कल्की का काय म्हंतात तो

ह्या राज्याची अवस्था ओसाडगावासारखी होऊ नये म्हणून काय करायला हवे ?
जुन्या अधिकार्‍यांच्या सत्तालोलुपतेला आळा कसा घालावा ?
सगळ्या नागरिकांच्यात सामंजस्य कसे आणावे ?

एकदा का कल्की आला की तोच काय ते करेल आपण फक्त बघायचे.

समुद्र आणि विहीर दोन्ही आपलेच आहेत हे दोन्हीकडच्यांना समजवावे कसे ?

दोन्ही आपलेच आहेत. नुसते समुद्रात राहून तहान कशी भागवणार आणि नुस्त्या विहिरीत राहून जलक्रीडा कशी करावी? तेव्हा सुज्ञ दोन्हीकडे मुक्त संचार करतात

वैतागून राज्यकारभारातुन अंग काढून घेतलेल्या मंत्र्यांना परत आणावे कसे ?

हे तर कल्कीलाच काय महाविष्णूलापण माहित नसावे :P

पैसा's picture

18 May 2012 - 10:18 am | पैसा

अरे पण मूळ गोष्टीत समुद्र आणि विहीरीचा उल्लेख नाहीये ते प्रश्नात आले कुठून?

ऋषिकेश's picture

18 May 2012 - 11:26 am | ऋषिकेश

आता ते त्या वेताळकथेतील राजकुमाराला माहित.. ;)
आम्ही फक्त उत्तरे दिली