यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p
-------------------------------------
मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे? ब्रम्ह कुठे गेले? सत्य कुठे गेले? ब्रह्म सत्य होते ना? भजे तयार झाले काय रे?
चहा गोड आहे. सिगारेट कडू आहे. जग मिथ्या आहे. ब्रम्ह सत्य आहे. भजे मस्त आहेत. तुम्ही इथेच आहात ना? तुम्ही ब्रह्म आहात. मी परमात्मा आहे. आपण मिथ्या आहोत. युद्धे झालीच पाहिजेत. रिसेशन आलं पाहिजे. बेकारी वाढली पाहिजे. जग हे सत्य आहे. जगात शांतता नांदली पाहिजे. युद्धावर जायलाच नको, हे तुम्हाला कळलं पाहिजे. कामावर मात्र जायलाच पाहिजे. जग हे मिथ्या आहे. आपण परमात्मा आहोत. तुम्ही गुरु केलाय का? गुरुशिवाय परमात्मा नाही. गुरु हाच परमात्मा. परमात्मा म्हणजे आपण. तुम्ही गुरु करुन घ्याच. सगुण उपासना करता की निर्गुण. तुमचा तमोगुण कसा आहे? तुम्ही निर्गुण उपासना करा. मी सगुण उपासना करतो. हे सगळं खोटं आहे. परमात्माच सगळीकडे भरला आहे. मी कोण आहे. अहो आपण परमात्मा आहोत ना? परमात्मा कोण आहे? मोहन कुठे आहे.. राधा दिसत नाहिये. सत्यम् शिवम् सुंदरम.
तुम्ही कोण आहात? मी कुठे आहे?
प्रतिक्रिया
28 Apr 2012 - 4:54 am | स्पंदना
आमचे एक महाराज लय भारी आहेत. एकदम ओरिगिनल!
त्यांनी ना हिमालयात जाउन लय मोठ्ठी तपश्चर्या केली. हा ! फोटु हाय त्यांचा . महाराज असे तपश्चर्या करता अन ते वाघाची बायडी असते ना ती बायडी त्यांना एक टांग उपर करुन दुध पाजते. हा! असा फोटो हाय.
तर तु सगळ सोड अन त्या महाराजांना शरण जा. तुला सगळ मिथ्य अमिथ्य एका बैठकीत उलगडेल.
बाकि तुझ्या कडुन लवकरच http://www.misalpav.com/comment/reply/21499/391918 (अलगद आनंदाची )अपेक्षा करत आहोत.
28 Apr 2012 - 4:57 am | पिंगू
सबकुछ झूट आणि मिथ्या.. याची आठवण झाली..
हाहाहा....
- पिंगूबाबा
28 Apr 2012 - 5:43 am | अत्रुप्त आत्मा
यक्कू जाहले ब्रम्हद्न्यानी
छपरावरूनी गळले पाणी
परलोक जरासा हलका झाला
मुखी आली इहलोक वाणी :-)
28 Apr 2012 - 7:06 am | रेवती
एव्हरीथिंग इज ओके.
मग ठिकाय.
अजूनही सांगतिये यकु, लग्न करा.
ही सुद्धा एक लिंकच झाली म्हणा!;)
28 Apr 2012 - 9:33 am | प्रभाकर पेठकर
हा धागा वाचता 'यकुंचं लग्न नुकतंच झालं असावं' असा दाट संशय मला येतो आहे.
ही सुद्धा एक लिंकच झाली म्हणा!
'लिंक' शब्दात श्लेष दडला असल्यासारखे भासते आहे.
28 Apr 2012 - 4:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आज्जे एक मज्जा सांगतो. माणसे दारू प्यायला बसली आणि त्यांना चढली की एकच गोष्ट परत परत म्हणतात.
"मला कुठे चढली आहे? मी नॉर्मल आहे रे."
असो.... ;-)
28 Apr 2012 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा
@ही सुद्धा एक लिंकच झाली म्हणा >>> ख-ला-सं---
28 Apr 2012 - 7:11 am | चौकटराजा
यशवंता हा सत्य तर यक्या हा मित्थ्या आहे. यकू यक्या आहे. य्कू यशवंत आहे. यशवंत कुल्कर्ण्यी आहे.कुलकर्णी एक आडनाव आहे. आडनाव हे मित्थ्या आहे. मिथ्या हे एक सत्य आहे. सत्य हेच खरे सत्य आहे की यकू आयडी हाच यशवंत एकनाथ असून यशवंत एकनाथ हा सत्य व मिथ्या दोन्ही आहे. कारण त्यात आडनाव नाही.पण नाव आहे .
ब्रहमग्यानी यकूंचा पिळर शिष्य- चाउरा
28 Apr 2012 - 8:00 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो ;)
28 Apr 2012 - 9:47 am | मदनबाण
एव्हरीथिंग इज ओके.
मग ठीक आहे ! ;)
खालील सर्व जालावरुन घेउन इथे टाकलेले आहे ! ;)
हे साहित्य आपल्यासाठी... ;)
जर... इथेही नजर टाक हो !
प्रथम अवस्था !
द्वितीय अवस्था !
उच्च अवस्था !
कारण....
"prayatnad yatamanas tu
yogi samshuddha-kilbisah
aneka-janma-samsiddhas
tato yati param gatim"
अर्थात
श्रीमद् भगवत गीता
अध्याय ६ /४५
28 Apr 2012 - 11:17 am | संजय क्षीरसागर
रूद्राक्षाच्या माळेवर असलेलं पात्र कशासाठीये? त्याच्या (आणि त्याच्या आतल्या) आकारानं साधकाचं चित्त विचलित होणार नाही का?
साधनेत त्रिशूळाचा उपयोग काय आहे?
त्रिशूळाच्या शेजारी असलेली नळी रिकामी आहे का? असल्यास तिचा उपयोग काय आणि नसल्यास बाकीचं साहित्य कुठेय?
प्रथम अवस्थेतला बैरागी थम्स अप मागतोय का आसन साधल्याचा आनंदात आहे?
द्वितीय अवस्थेतल्या संन्याशाची कटींग वाढलीये मग दाढी का नाही?
अंतीम अवस्थेतल्या सिद्धामागे असलेला वाघ काय विचार करत असावा?
28 Apr 2012 - 1:13 pm | चौकटराजा
अंतीम अवस्थेतल्या सिद्धामागे असलेला वाघ काय विचार करत असावा?
वागोबा म्हणतो" आयला, हयाला काय खाऊन मिळणार फक्त हाडं ? "
किंवा " ही तर र आयाळवाल्या प्राण्याची व्हारायटी दिसतीया मायला, हल्ल्ला केला तर आपल्यालाच नाही ना खाउन टाकणार ? "
28 Apr 2012 - 10:03 am | सुहास..
तुम्ही सुप्रा कॉन्सश मध्ये ऑकल्ट येक्सपिरियन्स घेत असताना जो कॉसमॉस निर्माण होतो, त्या युनिवर्शल केयॉस मधुन ...
यकु , तुम्ही 'ईन ट्युन विथ द ट्युन' वाचाच , पाच रू. किमंत आहे ;)
28 Apr 2012 - 3:18 pm | दादा कोंडके
तुम्ही 'ईन ट्युन विथ द ट्युन' वाचाच
सहमत! :)
(सुरणाचा गड्डा दिसणारा) दादा
28 Apr 2012 - 10:20 am | मृत्युन्जय
कोण? कोण आहे हा? प्लीज याचे नाव सांगा. आधी राखाडी रंगातला खुलासा वाचला नव्हता तेव्हा तुम्हाला इंदौराहुन तत्काळ परतण्याचा सल्ला दिला होता. पण आता याचे नाव सांगण्याची कृपा करा.
28 Apr 2012 - 12:27 pm | गणपा
एकंदर प्रकार वाचुन बोळा निघनण्याची नितांत गरज आहे अस वाटतय. ;)
28 Apr 2012 - 3:15 pm | प्रभाकर पेठकर
निघनण्याची ह्या शब्दामुळे, बोळा फारच गच्च बसला असल्याचा आभास निर्माण होतो आहे.
28 Apr 2012 - 3:29 pm | गणपा
=))
असो, संपादकिय अधिकारांचा वापर करुन दुरुस्ती करण्याचा मोह टाळतो आहे. ;)
28 Apr 2012 - 3:08 pm | मनीषा
यातली दोन वाक्ये नीट समजली ..
आणि एक प्रश्न मलाही पडला ..
बाकी सारं सुक्ष्मदर्शकाच्या मदतीशिवाय कळणे अशक्य ..
आणि एक शंका आली . या लेखाचे शिर्षक, "माझे (लोकांना सांगायचे) ब्रम्हज्ञान " असे तर नाही ना ?
28 Apr 2012 - 4:00 pm | पैसा
>> युद्धावर जायला नको
कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल.
>>कामावर जायला पाहिजे.
कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!! :D
>>तुम्ही गुरु करुन घ्याच.
तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना!
>> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये
दोघेही गायब का? चान चान!
आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का?
ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील!
28 Apr 2012 - 4:43 pm | यकु
परमात्मा महान आहे. युद्धात लोक मरतात. परमात्माही लोक मारतो. युद्ध हाच परमात्मा आहे, याचा बोध फक्त तुम्हाला व्हायला हवा एवढंच माझं म्हणणं आहे.
पैसा तुम्ही आहात. पैसा ब्रह्म आहे, बाकी जग मिथ्या आहे, याचा बोध फक्त अंतरी जागवायला हवा.
पुण्य हेच पाप आहे. मी पापी आहे. मीच परमात्मा आहे. तुम्ही कोण आहात?
मोहन मीच आहे, राधाही मीच आहे आणि इंदूरही मीच आहे. लग्न कशाचे? भटजी हे परमात्मा आहेत, वाजंत्रीवाले परमात्मा आहेत. हा बोध फक्त व्हायला हवा.
होयहोय
___________________
जे बघतो तेच जगतो
28 Apr 2012 - 6:33 pm | धन्या
उठता बसता, खाता पीता कायम महाजनांची भाषणं ऐकायचेत का?
28 Apr 2012 - 9:23 pm | संजय क्षीरसागर
कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल.
हे असं म्हणा,
परिक्रमा करायला नको
कारण परिक्रमेपूर्वीच तुम्ही सत्य आहात
परिक्रमी, ज्यात परिक्रमा होतेय ते अवकाश आणि साधनेची व्यर्थता यांचा फक्त बोध हवा
>>कामावर जायला पाहिजे.
कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!!
हे असंय,
लग्न करायला पाहिजे
कारण लग्न ही कमिटमेंट आहे आणि कमिटमेंटमधे जवाबदारी आहे
कमिटमेंटसाठी निश्चय लागतो, निश्चयासाठी स्वतःवर विश्वास लागतो आणि आपण सत्य आहोत हा निश्चय होणंच बोध आहे
>>तुम्ही गुरु करुन घ्याच.
तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना!
नको, कारण गुरूनं काहीही सांगितलं तरी साधकानं ते मानायला हवं, मानायला कृतज्ञता हवी आणि कृतज्ञता नसेल तर गुरू व्यर्थ आहे
>> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये
दोघेही गायब का? चान चान!
आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का?
ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील!
ब्रह्मज्ञान एकदाच आहे, ते झाल्यावर सगळी धावपळ संपणारये पण ते नसेल तर नुसतं इतरांकडे बघत जगणं आहे, सह्या कॉपी करणं आहे, याला तपास-त्याला तपास अशी वणवण आहे आणि मग असं जगणं भंकस आहे
28 Apr 2012 - 10:21 pm | यकु
शब्द बापुडे केवळ वारा ! किती गरमी होतेय ना..
लग्न ही स्वर्गात बांधलेली गाठ आहे, लग्न हे, लग्न हे (टाळ्या)
आमचे येथे अस्सल बांधानी वासयुक्त बोध किलोवर फुकट मिळेल, फक्त घेणारा पाहिजे. दुकान अजून उघडणे बाकी आहे. कोरेगाव पार्कमध्ये आमची शाखा नाही :p
भंकस गुरुने काहीही सांगितलं तरी साधकाने ते मानायलाच हवं (समजले नाहीतरी चालेल. भंकस गुरुला कळ्ळंय ना सगळं? बस्स मग). साधकाने चांगली कॉपी मारायला हवी, भंकस गुरुसारखीच वटवट स्टैल आत्मसात करायला हवी. शब्द बापु डे केवळ वारा संकल्पना विचारमुक्त झालेल्या मनात, विचार कर-करुन मांडता यायला हव्यात. ते सर्वसामान्यांसारखे साधेसुधे विचार नसून तो महाबोध आहे हे ठसवता यायला हवं. यासाठी ठरवुन शब्दाशब्दात मेस्मरिझम भरता यायला हवं (ते पांघरलेलं आहे हे उघडं पडतं ही गोष्ट वेगळी). संभोगातून समाधीकडे, युद्ध बंद करणं सामान्य जनतेच्या हातात आहे, त्यांनी युद्धावर जायलाच नको, देशा-देशामध्ये असलेल्या सीमा व्यर्थ आहेत असल्या भन्नाट कल्पना मांडता यायला हव्यात. त्या पूर्ण होण्याची काहीच गरज नाही, आपले विचार प्रसवन, 'पोकळ हस्ती स्थापन' पार पडणे महत्त्वाचे - दॅट इज कंज्युमिंग ओन टाइम इन नॉन्सेन्स रिपीटेशन !
62 लेख आणि साडेबत्तेचाळीसशे प्रतिक्रिया लिहून साधकू बकरे हलाल करता यायला हवेत. हे जर नसेल तर गुरुही व्यर्थ आहे.
29 Apr 2012 - 12:42 am | संजय क्षीरसागर
स्वतःला काही गवसलं नाही याचं किती ते फ्रस्ट्रेशन!
लग्न स्वर्गात आणि स्वर्ग कल्पनेत !
शब्द व्यर्थ म्हणून अर्थ हरवला
अर्थ हरवला म्हणून बोध शून्य
आणि बोध शून्य म्हणून सगळंच भंकस!
आणि सही राहिलीना मारायची ड्युप्लिकेट!
29 Apr 2012 - 1:09 am | यकु
हे एवढंच खरंय :)
पण तुमच्यासारखा आत्मज्ञानी असं कसं म्हणू शकतो हो? स्वत: हरवून जाणं हेच आत्मज्ञान असेल तर स्वत:ला काही गवसण्याची भाषा यावीच का?
फ्रस्ट्रेशन नाही, वरच्या प्रतिसादाला चिकित्सा म्हणतात. त्या चिकित्सेच्या योग्य अयोग्यतेबद्दल बोला. की चिकित्सा तुम्हाला मान्यच आहे समजायचं? वरच्या पर्दाफाश संवादामुळं फ्रस्ट्रेशन कदाचित तुम्हाला आलेलं असेल. पण आपले असे संवाद होत रहाणार तेव्हा असं काही फ्रस्ट्रेट वगैरे होऊ नका. :) च्यायला मी पण काय सांगतोय. आत्मज्ञानी फ्रस्ट्रेट कसा होऊ शकेल ;-)
आणि हो, आत्मज्ञान झालेल्या माणसाने दुसर्या आत्म-अज्ञानी माणसाला हिणवू नये. बरे दिसत नाही ते. :p
29 Apr 2012 - 7:11 am | संजय क्षीरसागर
हिणवू नये. बरे दिसत नाही ते.
प्रश्न आत्मज्ञानाचा नाहीये, कुणीच कुणाला हिणवू नये.
काय बरं दिसेल याचा विचार पोस्ट टाकण्यापूर्वी झाला नव्हता का?
आणि मला वाटलं पोस्ट जनरल आहे म्हणून पहिला प्रतिसाद मी देखील निर्वैयक्तिक दिला पण जेव्हा सहीची ड्युप्लिकेट मारली तेव्हा खरा रोख कळला.
पुढचा प्रतिसाद देखील सत्य नक्की काय आहे असाच दिला पण जेव्हा सगळंच पर्सनल व्हायला तेव्हा प्रतिसाद असे का येतायेत त्याचा उलगडा करावा लागला.
इतर कुणाच्या व्यक्तिगत जीवनाला मी जवाबदार नाही आणि माझं लेखन उगीच इतरांशी जोडू नये हे कुणाही अज्ञानी माणसाला कळेल.
मला नैराश्य येणं अशक्य आहे पण प्रत्येक व्यक्तिगत हल्याला मी एकटा पुरेसा आहे.
असो, >`काही गवसलं नाही हे एवढंच खरंय' ही जर प्रामाणिकता असेल तर विषय संपलेलाय आणि मैत्रभाव हा तर माझा स्वभाव आहे
29 Apr 2012 - 2:21 pm | यकु
असो.
आता कंटाळा आला.
29 Apr 2012 - 2:26 pm | पैसा
कंटाळा मिथ्या आहे.
29 Apr 2012 - 2:36 pm | यकु
;-)
हो ना.
29 Apr 2012 - 10:34 pm | शिल्पा ब
यक्कु, अरे एखादी गर्लफ्रेंड शोध, नाहीच जमलं तर फुलटैम जॉब शोध...म्हणजे असले विचार करायला वेळ सुद्धा मिळणार नाही.
30 Apr 2012 - 10:01 pm | प्रास
वरती कुठे तरी आम्ही
हे पण वाचलं तेव्हा म्हण्टलं
असणारच. पैसा असत्य कसं सांगेल? ;-)
30 Apr 2012 - 10:58 pm | पैसा
म्हणजे ब्रह्मज्ञान आणि भ्रमज्ञान यांचं सार तुम्हाला नीट कळलं तर! :D
28 Apr 2012 - 11:38 pm | स्वानन्द
सुप्परलाईक!! :)
28 Apr 2012 - 10:42 pm | यकु
सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद लेकांनो आणि लोकांनो ;-)
मस्त पिक्चर सुरु झालाय की नाही ?
आता डेली सोप लागणार बहुतेक ;-)
29 Apr 2012 - 1:40 am | भडकमकर मास्तर
ही सारी गद्य शरदिनी आहे, इतकेच म्हणतो
29 Apr 2012 - 3:53 am | स्मिता.
यकु, हा लेख नक्की कधी सुचला? शुक्रवारच्या रात्री का? तळीरामाच्या त्या प्रसिद्ध कवितेसारखाच वाटतोय ;)
29 Apr 2012 - 5:09 am | योगप्रभू
गडी इंदूरला ग्येला आन् भांग प्याला न्हाय, आसं कुटं झालया व्हय? :)
29 Apr 2012 - 4:47 pm | कवितानागेश
तुम्ही निर्गुण उपासना करा. मी सगुण उपासना करतो.>>
हे फार आवडले.
एकदम भेदक वस्तव आहे! ;)
29 Apr 2012 - 6:09 pm | मन१
:)
1 May 2012 - 7:08 am | रमताराम
हू आर यू? हू इज ही? ही इज यू इन द आय ऑफ मी.
तुम्ही ना सुप्र-कॉन्सस मधे ऑकल्ट एक्सपिरियन्स घेत असताना जो कॉस्मोस निर्माण होतो ना... ;)
1 May 2012 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते
यक्या... लेका... तुला माझं एकच सांगणं आहे.... गेट अप अँड गेट लॉस्ट!!!! ;)
1 May 2012 - 12:23 pm | शिल्पा ब
ही डज साउंड लॉस्ट टु मी!! ;)
1 May 2012 - 12:27 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहाहा! नाही हो तै... तो भानावरच आहे. इतरांना लॉस्ट करतो आहे तो... लै भारी आहे ते बेनं!
1 May 2012 - 6:51 pm | नाना चेंगट
वेळी अवेळी दोन पेग मारत जा. फायदा होईल.
1 May 2012 - 7:06 pm | प्यारे१
डिस्क्लेमर टाकावं लागणं मिथ्या आहे....! डिस्क्लेमर टाकणारा हात मिथ्या आहे...! डिस्क्लेमर मिथ्या आहे....!
त्याखालचा लेख 'सत्य' आहे. सत्य म्हणजे आहे, आहे नि आहे. होते नाही, आहे नाही, होणार आहे नाही....!
भंजाळणे सत्यमिथ आहे! :)