कंदमूळ-उन्हा़ळ्याचं फळ

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
22 Mar 2012 - 5:40 pm

आपल्याला कंदमुळ या नावावरुन सामान्यतः सुरण/रताळी इ.इ. कंद जमातीची अठवण होते...पण आज मी एक वेगळाच कंद प्रथम पाहिला... म्हणजे खाऊनही पाहिला.आणी तोही मिळावा कुठे..? तर आमच्या त्या अजब दुनियेत...मार्केटयार्ड मधे...! उद्या पाडवा असल्यानी फुलं आणायला मुद्दामच यार्डात ११:३० ला गेलो होतो,कारण सगळीकडचा मालही आलेला असतो,आणी बाजारही जरा बरा मिळतो,म्हणुन. आधी उन्हानी फुल्लं तापलेलो होतो.तेंव्हा आधी जरा एक शहाळं मारावं,आणी मग आत गाळ्यात उकडुन निघायला घुसावं अश्या विचारात होतो... तर कडेनीच जाणार्‍या एका हार वाल्यानी... ''काका लवकर जा १२ नंतर मोगरा,पाला आणी छडी उडणार्‍हे'' अशी खबर दिली.मग शहाळं वगैरे सोडुन आधी आत घुसलो..आणी १/२ तास ''तापुन'' बाहेर आल्यानंतर शहाळं असं मनात येइपर्यंत समोर एका सायकलच्या कॅरियरला एक चांगल दांडग फ्रेश केशरी रंगाचं खोडासमं असं काहितरी दिसलं.

मनात विचार आला...हे मृदुंग किंवा ढोलकी साठीचं खोड तर नसावं,एखाद्या शेतकर्‍यानी इकायला आणलेलं.म्हणुन जवळ गेलो आणी विचारलं, ''केवढ्याचं हो हे..?'' त्या विक्रेत्यानी,''आयचं गाढावंच दिसतय बेनं'' असा भाव डोळ्यात आणत मला,''तुमी आख्खं ग्येनार काय..?'' असा सवाल टाकला..मी,हो...! असं म्हटल्यावर मला,''१५०० रुपयाला बसेल...'' असा जबाब दिल्यावर मी-बसलोच..! पण पुन्हा विचारलं,''एवढं महाग का हो..?'' त्यावर त्यानी मला,'' येका खापंला धा रुपे पडत्यात,आदी तेवडी खाऊन बगा'' असं मला ऐकवल्यावर मी चक्रावलोच...ढोलिकिचं खोड खातात का..? हे मला काही केल्या कळेना...! पण मग माझा सगळा गाढवपणा त्याच्या एका मारलेल्या हाळी'नी उतरवला...'' कंदमुळ...ए कंदमुळ... उनाचं खा कंदमुळ,प्वाटाला ग्गार कंदमुळ,रामानी खाल्यालं कंदमुळ'' मग मला जरा अंदाज आल्यावर त्याला विचारलं,,,हे खातात होय..?'' माझ्या अज्ञानीपणाला आधीपासुन वैतागलेल्या त्यानी मला,,''न्हाएतं काय डोक्यात घालतात व्हय..?'' असा शॉट मारुन खलास केलं.. मग मी आणखिन फार न बोलता,,''द्या दहा रुपायचं..'' अशी ट्रायल बेसिस वर आर्डर दिली... तरिदेखिल त्यानी माझ्याकडे,, ही कुठची ''केस'' हितं आलिये'' असा चेहेरा करत(आधी पैसे घेऊन..!) ...त्या कंदाची वरची गोल खाप सुरिनी काढुन एका पेपराच्या तुकड्यावर माझ्या हातात दिली... आणी पुन्हा हाळ्या मारण्यात दंग जाहला..

मी ही खायला लागलो...साधारण मोठ्ठी बोरं ज्या चविची लागतात,तशी फिक्की गोड चव होती... अर्धी खाप उडवुन झाल्यावर मी ती त्याच पेपरात गुंडाळुन पिशवित टाकली...आणी पुढे जाऊन त्याचा थोडासा इंटर-व्ह्यू घेतला...(मनात म्हटलं अता आपण याला मोबॉइलवर शुट करावा ;-) ) त्यातुन मिळालेली माहिती येणे प्रमाणे...
हे फळ खाल्लेल्या-रामरायाच्या नाशिकमधे मिळतं,कर्नाटक,आंध्र आणी (आमच्या) रायगडमधेही (?) मिळतं, अत्ता जे खाताय ते रायगडमधनच आलेल आहे...(रंग बघा ना त्याचा...!-इति तो विक्रेता..) मी त्याला म्हटलं की मी हे फळ पुण्यात पहिल्यांदाच बघतोय... ''हा वो...हे आमी बि इशेष कदी आनीत न्हाय पुन्यात इकायला... हित खपतच नाय ज्यादा... ह्ये हुंबैला लै चालतं...!'' अता हे खरं होतं का मला त्याच घुश्यात ''दगड'' मारलावता...याची फार तेहेकिकात न करता मी अजुन १प्रश्न विचारला,,, हे किती दिवस टिकतं हो...? '' त्यानी लगेच ''पंधरा दिवस र्‍हातं..आनी तुमच्या पुन्यात इकायला ५ दिस जात्यात,हुंबैला २ दिवसात खपत...!'' असा अजुन एक दगड (कदाचित) मला मारला..पण मीही सरावलेल्या पत्रकारा सारखा त्याला,,, ''पण ह्याचं खर नाव क्काय..?'' असा पाठीपडल्यावर त्यानी मला माझ्या या आणी पुढे येऊ शकणार्‍या अश्या इतर प्रश्नांचीही उत्तरं एकत्र मला दिली... ''ह्याला नाव असं काय नाय बगा,कंद-मुळच म्हनत्यात...ह्ये रामानी वनवासात खाल्लवतं,-लक्ष्मणानी आनी शीतेनी पन ह्येच खाल्लवतं.. :-D (इथे आम्चा दोघांचाही हशा...आणी त्यामुळे त्याला,,मी ही एक खोलात मुळ असलेला कंद(च) आहे ही झालेली जाणिव ;-) ) ह्ये फक्त उन्हाळ्याला येतं आनी प्वाटाला लै ग्गार बी असतं... चाला जाऊ का'' असं म्हणुन तो फुड ग्येला आणी मीही पार्किंगच्या दिशेनी वळलो... :-)

हे त्या फळाचे (इक्रेत्यासह) फोटो...

आणी हे त्या खापेचे (फोटोंसाठी ;-) ) घरी आणल्यावर काढलेले फोटो...

दिसतात कापलेल्या बटाट्यासारखेच..पण चव मात्र ऑफ बिट ..गोड... :-)

हाय का नाय मजेशीर... मंग आता खावा आनी सांगा बरं,कसं लागलं त्ये... ह्या लेखामंदे...

संस्कृतीसमाजजीवनमानअनुभवमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सूड's picture

22 Mar 2012 - 5:50 pm | सूड

मूळ हेच 'फळ' आहे ??

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2012 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा

@मूळ हेच 'फळ' आहे ?? >>> मग तुंम्ही रताळ्याला केळं म्हणता काय..? :-p

अवांतर--- आशय पोहोचवताना शब्द चुकता कामानये.. अशी सही ''आता'' करावी असे म्हणतोय... ;-)

यकु's picture

22 Mar 2012 - 6:08 pm | यकु

याच्या छोट्या आवृत्तीला बहुतेक 'गराडू' म्हणतात हिंदीत..
इथे सराफ्यामध्‍ये हे मस्त तळून, त्यावर तिखट-मीठ भुरभुरुन देतात..
हे कंदमुळ फार मोठं दिसतंय.. हे गराडू रताळ्यापेक्षा थोडे मोठे असतात.

आता उन्हाळ्यात गराडू खात नाहीत.
गराडूचे तळलेले तुकडे खावेत हिवाळ्यात.
(गराडू उन्हाळ्यात खाणे म्हणजे गळवांना आमंत्रण.)

यकु's picture

23 Mar 2012 - 4:05 pm | यकु

थँक्स रामदास काका.
:)

आम्ही रताळ्याला रताळं म्हणतो, रताळ्याचं 'फळ' म्हणत नाही. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2012 - 8:10 pm | अत्रुप्त आत्मा

@रताळ्याचं 'फळ' म्हणत नाही. >>> ठिक हाय...तुमचं बराबर,,, म्या फळलो तुमच्यावर ;-)

सोत्रि's picture

23 Mar 2012 - 4:59 pm | सोत्रि

म्या फळलो तुमच्यावर

शब्दांचे खेळ करताना आशय काय होतोय ह्याची काळजी घ्यावी गुर्जी. ;)
सही बदलाच आता :)

- (आशयपूर्ण) सोकाजी

प्रचेतस's picture

23 Mar 2012 - 5:43 pm | प्रचेतस

सोकाजीराव _/\_

भटजी, आवरा.

ऐला, भलतंच मोठं दिसतंय हे प्रकरण.. माणसाच्या निम्म्या उंचीचं..

मीही पहिल्यांदाच पाहिलं.. कोकणात पिकतं आणि मुंबईत खपतं असं असूनही खाण्यात येऊ नये आश्चर्यच आहे..

कदाचित याहून लहान भाग आणत असतील भाजीमंडईत आणि त्यामुळे आम्ही त्याला कोहळा भोपळ्याचा प्रकार किंवा लांबून पाहूनच एखादा दुग्धजन्य पदार्थ (खर्वसादि) मानून पुढे जात असू.

आता लक्ष ठेवतो.. अनवट प्रकार आमच्यापुढे ठेवल्याबद्दल धन्यवाद.. डोळे आणि मन उघडं ठेवून आजुबाजूच्या गोष्टी टिपण्याची तुमची हातोटी आनंददायक आहे.. मिसळीच्या धाग्यावेळीही हाच अनुभव आला होता..

५० फक्त's picture

22 Mar 2012 - 6:19 pm | ५० फक्त

भटजी, तुमचा खुप खुप राग आला आहे, पार लहानपणीची आठवण उजळवुन दिलीत, हे खाल्लंय, आणि याबरोबर मार पण खाल्लाय, ' लाकडाच्या ढलप्या' खाताय म्हणुन,

ते देउळ, तो खांब, देवळाच्या दगडी खिडकीत लावलेले लोखंडी गज, आणि समोर असलेली दगडी पायरी, समोरचा इस्त्रीवाला, छ्या स्क्रीन धुसर ह्वायलालागलंय.

लहान असताना खाल्लयं आणि हे काय आहे हे विचारल्याबद्दल मारही खाल्ला आहे. त्यामुळे आठवणीतून कसे जाणार हे.

- पिंगू

चौकटराजा's picture

22 Mar 2012 - 6:33 pm | चौकटराजा

याच नाव टॉपिओका असून हे केरळ मधे जास्त प्रमाणात आढळते. हे मूळ असून फळ नाही. खोड ही नाही. याचा गाभा जवळ जवळ ९० टक्के
स्टार्च असून प्रक्रियेने यापासून साबुदाणा बनवितात. जगात अनेक प्रकारे याचे खाद्य प्रकार बनवितात .जास्त माहिती साठी विक्याचा पेड्या.

या माहितीत काही चुकीची माहिती असू शकते. कारण टॉपिओका ची मुळे इतकी मोठी दिसत नाहीत असे चित्र दर्शविते.
सबब चू भू द्या घ्या .

पांथस्थ's picture

22 Mar 2012 - 6:42 pm | पांथस्थ

चौकटराजा हे टॉपिओका नाहि. टॉपिओकाचा आकार साधारण पणे रताळ्याऐवढा असतो.

मोहनराव's picture

22 Mar 2012 - 6:29 pm | मोहनराव

कोल्हापुरला एकदा खाल्लं होतं... जोतिबा देवस्थानी. मस्त गोड चव असते.

स्पंदना's picture

24 Mar 2012 - 11:48 am | स्पंदना

हो ! मी पण जोतिबा वरच पाहिल पण खायच धाडस नाही केल. पुढच्या वेळी कदाचित खाउन बघेन.

वपाडाव's picture

26 Mar 2012 - 2:54 pm | वपाडाव

जोतिबा वाट बघतायेत, कधी येणारेस?

पैसा's picture

22 Mar 2012 - 6:29 pm | पैसा

पण खायचं धाडस कधी केलं नाही. हे कंदमूळ एवढं मोठं वाढायला बरीच वर्षं लागत असतील ना?

पैसातै, याला म्हणतात कंदमुळ पण हे कंद नसावं, बहुतेक हे त्या झाडाचं खोड असावं किंवा असं किमान ऐकलं तरी आहे. खरं खोटं माहित नाही.

वपाडाव's picture

23 Mar 2012 - 3:59 pm | वपाडाव

लहाणपणी चिक्कार वेळा खाल्लेले आहे. लैच वेगळी पाण गोड चव असते याची. वडील घेउन जायचे अन मग ३-४ काप तर ठरलेलेच.

याला म्हणतात कंदमुळ पण हे कंद नसावं, बहुतेक हे त्या झाडाचं खोड असावं किंवा असं किमान ऐकलं तरी आहे

५०च्या तर्काशी अशक्य सहमत.

मोदक's picture

24 Mar 2012 - 7:17 am | मोदक

५०, हे खोड नसावे बहुदा...

याचा गाभा खूपच रसाळ असतो आणि बाहेरचा भाग (Skin.) खूपच पातळ असते...

हां अर्थात जर खोड सोललेले असले तर बाहेरचा भाग असा दिसू शकेल, पण हे १००%जमिनीखालचे मूळच असावे.

गणपती बसतात त्या काळात हे फळ पुण्यामधे पाहिले आणी चाखले पण आहे. पुण्यामधे विक्रेत्याने कंदाचा काप जसाच्या तसा दिला.

२ वर्षापुर्वी हेच फळ बेंगलोर मधे खाल्ले तेव्हा विक्रेत्याने कंदाच्या कापावर लिंबु पिळले आणी साखर भुरभुरली. उभ्या उभ्या ३-४ काप खाल्ले :)

हा कंद रानात उगवतो. आत्तापर्यंत ह्या फळाचे नाव - कंदमुळ, रामकंद असेच ऐकले आहे.

५० फक्त's picture

22 Mar 2012 - 9:29 pm | ५० फक्त

एक झॅक्टली रे पांथस्था, सोलापुरात जो माणुस यायचा ना तो सांगायचा की
'सीतामाईला रावणानं प़ळिवल्यावर शीरीरामानं हेच कंद खाउन दिवस काढ्यले.'

पुण्यात बघितलेलं आहे, मुंबईत तर खूपदा बघितलेलं आहे. कधी खाल्लं नाही अजून.

मी-सौरभ's picture

22 Mar 2012 - 11:11 pm | मी-सौरभ

एक पुणेकर हे फळ मुंबईत बर्‍याच वेळेला पाहिले आहे म्हणतो याचा काय अर्थ घ्यायचा??

प्रचेतस's picture

22 Mar 2012 - 11:12 pm | प्रचेतस

पुण्यातील लोक मुंबईत जात नाहीत काय कधी?

मी-सौरभ's picture

26 Mar 2012 - 3:14 pm | मी-सौरभ

कधी कधी जाऊन बर्‍याच वेळा कसं काय बघितलस असा प्रश्न मला पडलाय मित्रा :)

लहानपणी खाल्ले आहे.. पण दातपाडीचे किस्से ऐकून असले काही (माहीत नसलेले खाद्य) खाण्याचे आता धाडस होत नाही. :-)

मन१'s picture

22 Mar 2012 - 7:26 pm | मन१

कोल्हापूर व एकूणच त्याच्या आसपासच्या जंगल असणार्‍या भागातील गावातल्या मित्रांकडून ऐकल्य ह्याबद्दल.
मराठवाड्यात लातुरातलेही ह्याचा उल्लेख करायचे.

प्राजु's picture

22 Mar 2012 - 8:25 pm | प्राजु

>>>>>कोल्हापूर व एकूणच त्याच्या आसपासच्या जंगल असणार्‍या भागातील गावातल्या मित्रांकडून ऐकल्य ह्याबद्दल.<<

च्यायला.. मी कसं नाही ऐकलं आणि खाल्लं.. आणि पाहिलं???

आत्म्या.. धन्स रे!

मी हे फळ चांदोलीत खाल्ले आहे..

चांदोली - जि. सांगली.

मुंबईत मिळते... पण ती माणसं फार चेंगट असतात.. पापडागत पातळ कापून देतात.. म्हणून परत खाल्ले नाही..

रेवती's picture

22 Mar 2012 - 8:16 pm | रेवती

छानच.

प्रभाकर पेठकर's picture

23 Mar 2012 - 12:11 am | प्रभाकर पेठकर

नक्कीच पाहिले आहे पण कधी खाल्ले नाही. आता चव घ्यावी म्हणतो कधीतरी.

प्रास's picture

23 Mar 2012 - 11:34 am | प्रास

पाहिलेय, खाल्लेय आणि आवडलेय.....

धन्यवाद आत्मा...!

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2012 - 12:02 pm | स्वाती दिनेश

एकदम वेगळीच माहिती .. पुण्यामुंबईत मिळत असूनही प्रथमच पाहत आहे.. संधी मिळाली कि चाखून बघेन!
स्वाती

स्वातीविशु's picture

23 Mar 2012 - 12:12 pm | स्वातीविशु

लहाणपणी पुण्यात खाल्लं होतं हे कंदमूळ. पिं-चिं भागात तो विक्रेता सायकलवरुन कंदमूळ-कंदमूळ असे हाळी देत होता. वडिलांना याची माहिती असल्याने त्यांनी सर्वांसाठी घेतले होत. चवीला जास्त गोड नसते. मुंबईला २-३ वेळा बघितले आहे.

उन्हाळ्यात पोटाला हे गार गार असते, हे मात्र आजच कळले. परत नक्की खाणार आहे. :)

आमचे एक मिपाकर इंडियाना जोन्स श्री वल्ली हे आजच पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या मोहिमेस निघत आहेत. एका जुन्या बखरीत त्याना ही फळे
डायनासरॉस खात असत असे आढळले आहे. त्याना नव्या मोहिमेबद्दल विचारले असता ते म्ह्नणाले " जाअर्थी ही असली मोठीच्या मोठी फळे
अस्तित्वात आहेत त्याअर्थी ते डायनासरॉस देखील पृथ्वीच्या पोटात कुठेतरी लपून ही फळे खात असले पाहिजेत. अत्रुप्त आत्मा यांच्या जादूटोण्याच्या प्रभावाखाली डायनासरॉस नी काही फळे मार्केट यार्डात पाठवून दिली. मला यातून एक संशीधनाचा धागा मिळाला असल्याने मी
पाडव्याचा सुमुहुर्त साधून हपिसला आजाराची रजा टाकून निघत आहे. डायनासरॉस जरी नाही सापडले तरी मी नेट वरून त्यांच्या अंड्यांचे फोटो
मारून मिपावर एक धागा करेन . व प्रत्येक प्रतिसादामागे माझा " धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल" असा दरवेळी कट पेस्ट करून तासाभरात सेंचुरी ठोकणार हे नक्की. याची मूळ ( याची म्हंजे या अशा सेंचुरीची ) कल्पना निश यांची असल्याने मी आताच त्यांचे आभार मानतो .....जय हिद ,,
जय महाराष्ट ...... "

सहज's picture

23 Mar 2012 - 3:44 pm | सहज

पहील्यांदाच पाहीले, ऐकले हे कंद. :-)

करेक्शन - http://www.misalpav.com/node/17209 ह्या धाग्यावर पाहीले होते पण विसरलो होतो.

धन्यु गणपा!

गणपा's picture

23 Mar 2012 - 3:43 pm | गणपा

http://www.misalpav.com/node/17209
योगेश२४च्या या धाग्याची आठवण झाली.

आजवर हा कंद*(?) केवळ जालावरच पाहिला आहे. भविष्यात कधी दिसला तर चाखुन पाहीन म्हणतो.

*कंद म्हटला की तो शक्यतो जमीनी खाली असतो. हा ही जमीनी खालीच वाढतो का?
येवढ्या मोठ्या कंदासाठी जमीनही तेवढीच भुसभुशीत लागत असणार.
मुटेकाका यावर अधिक प्रकाश टाकुशकतील अस वाटतय.
इतका स्वच्छ फोटो पाहुन तरी तो कंद आहे का? अशी शंका येतेय.

जयंत कुलकर्णी's picture

23 Mar 2012 - 3:45 pm | जयंत कुलकर्णी

हे कंदमूळ जास्त खाऊ नये. मुलांना देऊ नये यात अर्सेनिक असते असे कोठेतरी वाचल्याचे आठवते. जास्त प्रमाणात खाल्यास वीषबाधा होऊ शकते. जास्त म्हणजे किती हे माहीत नाही. ते वाचल्यावर मी हे खाणे सोडले. पण या सगळ्याची खात्री करून मग आपापला निर्णय घ्यावा...

तुमच्या म्हणण्यात तथ्य असावं, म्हणुन कदाचीत पातळ पातळ फोडी करुन विकत असतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2012 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंदमूळ म्हणून एक चकती खाल्ली आहे. पण या प्रकाराचं मूळ काय आहे, अजूनही काही कळलेलं नाही.
कोणी जरा तपशिलवार माहिती-बिहिती, फोटो-बिटो, वाचनीय लिंका-बिंका असेलेला प्रतिसाद दिला तर खुलासा होईल.

-दिलीप बिरुटे

आत्मशून्य's picture

26 Mar 2012 - 3:15 pm | आत्मशून्य

.

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2022 - 2:03 pm | अत्रुप्त आत्मा

https://sahasa.in/2022/03/21/bhoomi-chakra-gedde-or-bhoomi-sakkaravalli-...

आज मी टाकलेत्या विषयाची आणखी माहीती देणारी ही लिंक मिळाली .

अत्रुप्त आत्मा's picture

27 May 2022 - 5:36 am | अत्रुप्त आत्मा

https://www.facebook.com/reel/1577276435941948?fs=e&s=cl
ध्ये अज्जून येक !

अमरेंद्र बाहुबली's picture

30 May 2022 - 11:00 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्याला रामकंद म्हणतात. हे आरोग्यास हानीकारक आहे. हे बहुतेक घायपात ह्या झाडाचे मूळ असते. मागे ह्यावर सकाळ मध्ये लेख आला होता. आता तो लेख मिळत नाहीय नेट वर.