बाजीरावांची टोलेबाजी :१: हा माझा वसंत नाही...
बाजीरावांची टोलेबाजी :२: कोंबडी कविसंमेलन
बाजीरावांची टोलेबाजी :३: अर्धांगीची वटपौर्णिमा...
ज्याची त्याची गुरूपौर्णिमा...
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे पूजन करायचे असे इन्स्पेक्टर साहेबांनी ठरवले. त्यांचे गुरू म्हणजे डीएसपी साहेब. आपण साधे शिपाई होतो, तेव्हा साहेब इन्स्पेक्टर होते. गुन्हे वगैरे शोधून बढती मिळवायची अशी आपली स्वप्ने होती. पण साहेबांनी कानमंत्र दिला. त्या मंत्रामुळे मंत्रालयाची जवळीक वाढवली. मोक्याची पोलीसस्टेशने कशी मिळवायची, बार मालक, जुगार अड्डेवाले यांच्याकडून हप्ते कसे गोळा करायचे, ते बिनबोभाट वर कसे पोचवायचे, लोकांना धमक्या देऊन खंडणी गोळा करणार्या गुंडांना एन्काउंटरची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी कशी वसूल करायची असल्या गोष्टीत आपण बघता बघता तरबेज झालो. साहेबांच्या पाठोपाठ आपल्यालाही बढत्या मिळत गेल्या. साहेबांसारखे गुरू भेटले म्हणून आज इथपर्यंत पोचलो. इन्स्पेक्टर साहेबांच्या मनात एकाएकी कृतज्ञता दाटून आली. साहेबांचा मोबाईल लागेना म्हणून घरी फोन केला. तर साहेबांच्या मिसेसनी सांगितले की त्या बनावट स्टॅंपपेपरच्या प्रकरणात अडकल्याने साहेब स्वत:च तुरुंगात आहेत म्हणून. आता त्यांना नमस्कार करायला तुरुंगात जाणे शक्य नव्हते. म्हणून इन्स्पेक्टर साहेबांनी तिथूनच तुरुंगातल्या आपल्या गुरुंना सॅल्यूट ठोकला.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना आपल्या गुरूंची म्हणजे महास्वामींची फार आठवण झाली. आपण साधे कुडमुडे ज्योतिषी. पण
स्वामींसारखे गुरू भेटले. त्यांनी गुरूमंत्र दिला. आपण भगवी कफनी घालून तांत्रिक बनलो. राजकारणी लोकांना सल्ले देऊ लागलो.
त्यांच्यासाठी यज्ञ करू लागलो. निवडणूक लढणार्या सगळ्या उमेदवारांना विजय-यज्ञ करायला सांगायचा. एकजण नक्की जिंकतो. तो पाच वर्षे आपली प्रसिद्धी करत राहतो. मग त्याच्याकडून आणखी गिर्हाइकं चालून यायची. मग आमदार-खासदार फोडणे, उद्योगपतींची सरकारातली कामे करुन देणे, राजकीय पक्षांना उद्योगपतींकडून निवडणूक निधी जमवून देणे असली कामं सहज करू लागलो. पंधरावीस वर्षात आपण मालामाल झालो. ही सगळी आयडिया महास्वामींची. ते भेटले नसले तर आपण असेच कुडमुडे ज्योतिषीच राहिलो असतो. महाराजांच्या मनात एकाएकी कृतज्ञता दाटून आली. महास्वामींचा मोबाईल लागेना म्हणून त्यांच्या पी.ए.ला फोन केला. तर तो म्हणाला की, सध्या शनीची दशा चालू असल्याने परदेशी चलनाच्या एका भानगडीत अडकून महास्वामी तुरुंगात आहेत. महाराजांनी तुरुंगातल्या महास्वामींना तिथूनच लोटांगण घातले.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सरांना आपल्या साहेबांची आठवण झाली. आपण शाळेत साधे शिक्षक होतो. साहेब तेव्हा शिक्षण खात्यात
सहसचिव होते. मॅट्रिकच्या परीक्षेत आपण एक्झामिनर होतो. साहेबांच्या मुलाला गणितात एकोणतीस मार्क पडले होते. आपण त्याचे ब्याण्णव करुन दिले. साहेबांनी सरांच्या शिकवणीमुळे आपल्या मुलाला इतके मार्क पडले असे जाहीरपणे सांगितले. आपल्याकडं मुलांची ही रीघ लागली. शाळा सोडून आपण ट्यूशन क्लास कधी काढले, त्याच्या इतक्या शाखा कधी निघाल्या कळलेच नाही. सरांच्या मनात कृतज्ञता दाटली. पण चौकशी केल्यावर कळले की बनावट गुणपत्रिकेच्या एका प्रकरणात अडकल्याने साहेब तुरुंगात आहेत. सरांनी आपल्या गुरुंना तिथूनच वंदन केले.
भारतातून तडीपार झाल्याने परदेशातून आपला व्यवहार सांभाळणार्या डॉनला गुरुपौर्णिमेच्या दिवशी भारतातल्या आपल्या गुरूंची आठवण झाली. आपण साधे पाकीटमार होतो. एकदा तुरुंगात असताना एक खंडणीदादा भेटला. तो तुरुंगातनंच आपला कारभार चालवायचा. त्यानं टीप्स दिल्या. बाहेर आल्यावर आपण खंडणीचा धंदा सुरू केला. मग सुपार्यांचा व्यवसाय केला. बघता बघता आपण नामवंत डॉन झालो. भारतात फार त्रास व्हायला लागल्यावर परदेशातून आता आपण आपला कारभार चालवतो. डॉनला आपल्या गुरुंबद्दल फारच कृतज्ञता वाटू लागली. त्यांना वंदन करण्यासाठी आपल्या नेटवर्कच्या सहाय्याने भारतातले सगळे तुरुंग शोधले. पण गुरुंचा पत्ता लागेना. बाहेर चौकशी केल्यावर कळले की दादा आता तुरुंगात नसतात. मधल्या काळात ते निवडून येउन खासदार झाले आहेत. ते आता संसदेत असतात. डॉनने मनोमन दादांना "गुरू आहात" असं म्हणत साष्टांग नमस्कार घातला.
-बाजीराव
(दै. तरुण भारत, बेळ्गाव मध्ये पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 10:54 pm | प्राजु
आवडली टोलेबाजी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Jul 2008 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाजीराव,
टोलेबाजी आवडली. :)
18 Jul 2008 - 11:00 pm | बेसनलाडू
झ का स! ! !
(शिष्योत्तम)बेसनलाडू
18 Jul 2008 - 11:06 pm | सखाराम_गटणे™
आवडले रे.
सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
18 Jul 2008 - 11:09 pm | वरदा
मस्तच टोलेबाजी खूप आवडली..."The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
18 Jul 2008 - 11:24 pm | llपुण्याचे पेशवेll
खूप छान वाटला.
पुण्याचे पेशवे
18 Jul 2008 - 11:33 pm | मुक्तसुनीत
धमाल आली ! आगे बढो !
19 Jul 2008 - 12:05 am | खडूस
मस्तच :)
19 Jul 2008 - 1:18 am | मदनबाण
छान !! :)
मदनबाण.....
19 Jul 2008 - 12:28 pm | श्रीमंत दामोदर पंत
आवडले रे..................
उत्तम टोलेबाजी......................
19 Jul 2008 - 2:23 pm | ऋषिकेश
वा! मजा आली
:))
और आने दो! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 Jul 2008 - 3:27 pm | बाजीरावाची मस्तानी
आवद्ला आप्ल्याला...(म्हणजे मला आणि 'माझ्या' बाजीरावाला)
बाजीरावाची मस्तानी.
(मीच लय ........=नम्र आहे.=)
19 Jul 2008 - 7:52 pm | सहज
सही लेख!!!
बाजीराव यांची उत्तुंग टोलेबाजी!!!
19 Jul 2008 - 8:01 pm | अर्चिस
एकदम झकास!!!!!!!!!
आर्चिस
20 Jul 2008 - 8:20 pm | बाजीराव
सर्वांचे मनापासून आभार. आपण लिहिण्याची माझी उमेद वाढवलीत.
20 Jul 2008 - 10:38 pm | तळीराम
सुंदर लेख... आता आधीचे वाचायला हवेत...
21 Jul 2008 - 12:40 am | नंदन
लेख, आवडला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Jul 2008 - 2:55 am | चतुरंग
:) :)
चतुरंग
22 Jul 2008 - 3:05 am | ब्रिटिश टिंग्या
मस्तच! टोलेबाजी आवडली!
- टिंग्या