जर्मन आख्यान भाग भाग १२ दुसेलडॉल्फ

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in जनातलं, मनातलं
7 Nov 2011 - 4:16 am

http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
http://www.misalpav.com/node/16534 भाग ७
http://www.misalpav.com/node/16661 भाग ८
http://www.misalpav.com/node/17013 भाग ९
http://www.misalpav.com/node/19426 भाग १०
http://www.misalpav.com/node/19475 भाग ११

दुसेलडॉल्फ हे नॉर्थ राहिन वेस्ट फालीया ह्या जर्मन राज्याच्या राजधानीचे शहर आहे .व्यापार व आर्थिक उलाढाल प्रचंड असलेल्या ह्या शहराचा आत्मा फेशन आहे . युके किंवा भारताप्रमाणे अनुक्रमे लंडन व मुंबई अश्या एकाच ठिकाणी इंडस्ट्री केंद्रित आहेत तसे येथे नाही. तर हे शहर वृत्तपत्र व्यवसाय व फेशन साठी प्रसिध्द आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत हे देशाच्या पहिल्या ५ चात येते .

आम्ही डी बी ह्या मध्यम पल्याच्या गाडीतून फ्रांक फ्रुर्त पासून २ तास प्रवास करत तेथे पोहचलो आम्ही ह्या बान चे सभासद झालो होतो ते पण १५० युरो प्रत्येकी भरून. त्यामुळे जर्मनी व युरोपात जिथे जिथे हि बान जाते विशेतः इटली व फ्रांकारीश म्हध्ये (फ्रांस ला जर्मन ह्या नावाने संबोधतात) तर आपल्याला इंडीश ,युरोपला आयरोपा. तेथे आम्हाला तिकिटात ५०% सवलत मिळणार होती. आम्हा दांपत्यांचा भटक्या स्वभावाचा दूरदर्शी विचार करून मी ३०० युरोची आगाऊ गुंतवणूक केली होती (ह्या बाबतीत मनमोहन माझे आदर्श आहेत .)तेथे गेल्यावरच अनेक पातळ माझ्या जवळून जातांना मॉडेल रेंप वर जाताना जसा नट्टा पट्टा करतात तश्या ह्या सुपर मॉडेल च्या थाटात फिरत होत्या .अधिक तपशीलात लिहू शकत नाही कारण तपशिलाने लिहिण्यासाठी दांडगे निरीक्षण करायला फुरसतच मिळाली नाही . मैत्रिणीचे बायकोत रुपांतर झाल्याचे हे एक दुष्परिणाम असतात. असो .

आमच्या सौ हातात नकाशा घेऊन बारीक अक्षरातील अगम्य रस्तामधून माग काढत हिल्टन हॉटेल चा पत्ता शोधीत होत्या. मी पण त्यात माझी मान मध्येच घालून माझेही लक्ष आहे असा अभिनय करत होतो.(शाळेत बालनाट्यात उत्तेजनार्थ बक्षिश मिळालाय मला. .) तर शेवटी आम्ही हिल्टन ला पोहचलो. तेथे जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याची प्रमुख डागी ही आमची हिल्टन मधील लंडन हित्रोची बॉस. तिने आम्हाला जर्मनीत मध्ये सेटल होण्याची अभिनव कल्पना दिली होती व तिचा पाठपुरावा करून आमच्या कुटुंबांच्या डोक्यात रुजवली होती. तेव्हा तिला सदिच्छा भेट देणे क्रमप्राप्त होते. ( लंडन ला आम्ही तिच्या आतल्या गोटातील माणसे होतो) तिने खरेतर हॉटेलात राहण्यासाठी बोलावले होते. पण दुसर्या दिवशी म्युनिक मध्ये नोकरीसाठी काही कॉल आले होते. त्यासाठी दागीचे मार्गदर्शन ,जमल्याच ओळख ,वशिला ह्या गोष्टी ओघाने आल्या होत्या . ( हिल्टन साला पगार कमी देतो पण जगभरातील हिल्टन मध्ये स्टाफ ला सवलतीच्या दरात राहण्यास मुभा देतो.) तेथे गेल्यावर पहिला शेरा म्हणजे आपल्या हिथ्रोची सर नाही .इति बाईसाहेब.

बाकी हीथ्रोच्या हॉटेलात आमच्या रेशीम गाठी जुळल्याने त्या वास्तू बद्दल आम्हाला ममत्व आहे.त्यात ह्या दागीच्या कुशल नेतृत्र्वाखाली आम्ही सलग ३ वर्ष बेस्ट एअर पोर्ट हॉटेल ऑफ द वल्ड असा किताब पटकावला होता.अर्थात आमची डागी म्हणजे गोबेल ची आजी शोभावी एवढी प्रचार तंत्रात वाकबगार. सतत काही न काही रित्या हॉटेल सतत झोतात राहील ह्याची दक्षता घ्यायची.इराक युद्धात ब्रिटीश सैनिकांसाठी रक्तदान शिबीर तेही रेड क्रोस च्या माध्यमातून हि माझी कल्पना तिला भन्नाट आवडली होती.

तिने आमचे प्रसन्न चित्ताने स्वागत करून व्यवस्थित सरबराई केली. ४५ वर्षाची हि डागी एकदा केट ला म्हणाली होती कि मला घरी जायलाच आवडत नाही-कारण संध्याकाळी रिकामे घर खायला उठते-हि कर्तुत्ववान महिला अजून सिंगल होती.तिचा प्रियकर म्हणजे आमचा माजी बॉस हा विवाहित आहे-त्याची मुलगी आता १६ वर्षाची होती-तो इंग्लिश साहेब आपल्या परिवारासह अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी शिगागो हिल्टन ला जॉईन झाला- व जातांना स्कॉट लेंड वरून हिची वर्णी लंडन ला लावून गेला होता-पुणेकर मुंबईत नोकरी करत असताना व आठवडा किंवा महिन्यातून एकदा तरी पुण्यात येतात तसे हि लोक अमेरिका ते युके वारी करत असल्याची वंदता होती- ( डागी ने आम्हाला शिगागो ला जायचे का म्हणून विचारले होते पण युरोप आम्हाला सोडवला नाही.
हिल्टन चे विशाल मायाजाल अमेरिकेत पसरले आहे. युरोपातही आहे मात्र येथे त्यांचा भर चार तारांकित हॉटेलांवर जास्त असतो. )

तिथून आमची स्वारी निघाली ते शहर पाहण्यासाठी वल्ड कप चा ज्वर सगळीकडे कडे चढला होता.
मुंबईत फेशन स्ट्रीट जवळ जशी खाऊ गल्ली आहे तशी येथे बियर गल्ली आहे.अल्त बियर हि ह्या शहराची प्रमुख बियर हे नाव बियर ला १८०० व्या साली पडले-भर उन्हात बियर व सोसेज ब्रेड खाणे हा खाऊ गल्लीतीतील मस्त अनुभव होता. जोडीला ह्या गल्लीत विविध आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे ठेले होते-आपलाही होता-पण मी काही तेथे गेलो नाही ,जर्मनीत भारतीय अन्न म्हणून बेचव पदार्थ विकले जातात- त्यामुळे लंडन व दुबई अबू धाबिची देसी पदार्थांची चव अजूनही मनी रेंगाळत असते.
.तसे लोक संख्येच्या मानाने १७ टक्के परदेशी नागरिक येथे राहतात पण त्यात बहुसंख्य तुर्की /ग्रीक व इटालियन ह्यांचा भरणा आहे-येथे जर्मनीतील ३ र्या क्रमांकाची ज्यू कम्युनिटी आहे काही साडे सात हजार च्या आसपास जी एकूण लोक संख्येच्या १ टक्का आहे-

.रायन नदींचा किनार्यावरून भटकणे व किनार्याला लागून असेल्या बोटीवर उपहारगृह आहेत त्यावर भोजन करणे म्हणजे गंमत असते- तेथून आमची स्वारी थेट टीवी टॉवर कडे गेली-हे ह्या शहराचे प्रमुख आकर्षण आहे-हा एक उत्तुंग मनोरा असून त्याच्या वर जायला वेगवान विजेचे पाळणे आहेत-१० युरोचे तिकीट देऊन जसे टपावर आलो-काचेच्या बंदिस्त घुमट असलेल्या टपावरून सर्व शहर नजरेच्या टप्यात येत होत-तेथून शहराची मनमोहक छबी टिपून घेतली . येथे एक छोटेखानी यंत्र होते-त्यात २० सेंट युरो चे नाणे टाकले तर ते पार चपटे होऊन बाहेर येते-म्हणजे लहानपणी आम्ही नाणी रुळाखाली ठेवायचो-व ती चपटी नाणी संग्रहात ठेवायचो-तसा प्रकार होता-ह्यांचे विमान तळ जर्मनीत ३र्य क्रमांकांचे आहे, .१हिले फ्रांक फ्रुट तर दुसरे म्युनिक.
रेल्वेस्थानक पण भव्य दिव्या आहे .दिवसाला १००० गाड्या येथे थांबतात युरोपला जाण्यंचा एक प्रमुख थांबा म्हणून हे शहर फेमस आहे.

मग आमची स्वारी तडक को कडे आली . को म्हणजे कोनिग , किंग्स अवेन्यू म्हणजे खरेदीचे मोक्याचे ठिकाण-या रस्त्यावर अनेक जगातील अनेक नामवंत ब्रांड ठाण मांडून बसले आहेत-त्यात ज्वेलरी ,कपडे आदी गोष्टींचा समावेश होतो- ह्या भागात गाळ्यांचे भाव जर्मनीत सर्वात जास्त आहेत-(मी लगेच आमच्या नरीमन पोइंत च्या कार्यालयीन जागांचे भाव जगात महागाईत २ र्या क्रमांकावर आहेत हे सांगून टाकले.

येथील उपहारगृहे नेहमीच एलिट का काय म्हणतात अश्या लोकांनी गजबलेली असतात- एखाद दुसरी हॉलीवूड चे प्रसिद्ध आजी माजी सेलेब्रेटी सुद्धा येथे बाहेर बसून शेम्पेन च्या ट्युलिप ग्लास घेऊन (खास ह्या वारुनीसाठी बनविलेला ) त्या बरोबर चीज आणि द्राक्ष किंवा स्ट्राबेरी असा सरंजाम असतो. भारतात पंचतारांकित हॉटेलात मुशाफिर गिरी करण्याआधी चकणा म्हणजे चमचमीत मसालेदार तिखट पदार्थ असे माझ्या मनात समीकरण होते.तेव्हा चीच वैगेरे हा चकणा म्हणून वापरणे हे म्हणजे सुरवातीला पुचाट वाटले होते-आता त्याची सवय झाली म्हणा सगळे कसे पॉश वाटते-
बाकी प्रेटी वूमन ह्या प्रख्यात सिनेमात रिचर्ड शाम्पेन सह स्त्राबेरी व क्रीम मागवतो तेव्हा पासून मला नेहमीच प्रश्न पडायचा ह्या कोन्बिनेशांच्या एवढ्या लोकप्रिय असण्याचे रहस्य काय आहे.?

.अनेक गौरांगनांना ह्याबाबत विचारले असता हे कॉम्बिनेशन हिट आहे रात्रीच्या उत्तरार्ध जर मधुर करायचा असेल तर पूर्वार्धात हॉटेलच्या रूम मधून ह्या जोड गळीची मागणी केले जाते.
अनेक विख्यात कंपन्यांचे बडे अधिकारी वर्षातून अर्धा वेळ जगभरातील निरनिराळ्या पंचतारांकित हॉटेलातून वास्तव्य करून असतात तेव्हा सिंगल स्टेटस ने रूम बुक असली तरी रात्री ह्याच खोल्यातून ह्या गोष्टींची मागणी होते. मग डू नोट डिस्टर्ब चा बोर्ड लटकतो. ह्यावरून माझ्या आयुष्यात कधीही न विसरणारा एक प्रसंग मला आठवला.

एकदा असाच बोर्ड असतांना आमच्या हॉटेलातून नाईलाजाने एकाचा दरवाजा वाजवला गेला. . आतील माणसाने खेकसून हॉटेल कर्मचार्यास हाकलले ,रूम मधील फोन चा रिसीवर आधीच बाजूला काढला होता .सकाळी तो इसम रागात हॉटेलच्या लॉबीत आला.( आपली गैरसोय झाली आहे अशी बोंब मारली की हॉटेलवाले मग अनेक फ्री वोवचर देतात. हे त्याला अनुभवाने ठावूक असावे.) अशी काय इमर्जन्सी होती म्हणून रात्री तुम्ही कडमडला ,तुम्हाला इंग्रजीत लिहिलेला दारावरील बोर्ड दिसत नाही का ?...
त्याचे सारे बोलणे संपल्यावर रिसेप्शन वरील माझ्या मित्राने त्याला सांगितले .की रात्री तुमचा मुलीचा फोन आला होता .तुमच्या पत्नी अकस्मात हदया विकाराने वारल्या ( सदर इसम वयस्कर होता ,ही बातमी कानावर पडताच मटकन तेथेच खाली बसला .आता आम्हाला इम्ब्यूलेन्स मागवावी लागते का अशी भीती वाटू लागली. त्याचा तो भकास चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो.

.नंतर हन्देल्स्ब्लात्त ,
हेइनिस्चे पोस्त , विर्त्स्चाफ्त्स्वोचे , देऊत्स्चेस विर्त्स्चाफत्स्ब्लात्त अश्या जर्मनीतील उच्चार व लिहिन्यास किचकट विख्यात वृत्त पत्रे व प्रसारमाध्यमांचे प्रमुख कार्यालयांना बाहेरूनच दर्शन झाले-(चांगली २ ते ३ तास पायपीट झाली-मात्र सुसह्य हवामानात व संगतीमुळे ती सुखकारक झाली इतकेच काय ते मिळवले हे शहर अनेक उद्यानानासाठी प्रसिद्ध आहे-त्यापैकी एका उद्यानात (म्हणजे बायको नेईन त्या ) मी मुकाटपणे गेलो-भर शहरात अशी निरव शांतता पाहून खुश झालो-उद्यानात सुंदर तळे होते. त्यात बदके हंस बगळे असे अनेक जलचर मुक्तपणे विहार करत होते.त्यांचा मला नेहमीच हेवा वाटतो.कारण उत्क्रांती काय ती फक्त माणसाच्या बाबतीत झाली. हे जलचर अनेक शतके हेच आपले साधे जीवन मुक्तपणे जगत आहेत.आपण मात्र प्रगतीच्या नावाखाली आपले आयुष्य भौतिक सुखांच्या पाठी लागून जमेल तेवढे संघर्षमय करून ठेवले आहे. वर जीवन एक संघर्ष अशी मुक्ताफळे सुद्धा उधळली आहेत . .
क्रमश ..

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

7 Nov 2011 - 9:04 am | प्रकाश१११

छान अनुभव नि उत्तम भाषा शैली .

रायन नदींचा किनार्यावरून भटकणे व किनार्याला लागून असेल्या बोटीवर उपहारगृह आहेत त्यावर भोजन करणे म्हणजे गंमत असते- तेथून आमची स्वारी थेट टीवी टॉवर कडे गेली-हे ह्या शहराचे प्रमुख आकर्षण आहे-हा एक उत्तुंग मनोरा असून त्याच्या वर जायला वेगवान विजेचे पाळणे आहेत-१० युरोचे तिकीट देऊन जसे टपावर आलो-काचेच्या बंदिस्त घुमट असलेल्या टपावरून सर्व शहर नजरेच्या टप्यात येत होत-तेथून शहराची मनमोहक छबी टिपून घेतली . येथे एक छोटेखानी यंत्र होते-त्यात २० सेंट युरो चे नाणे टाकले तर ते पार चपटे होऊन बाहेर येते-म्हणजे लहानपणी आम्ही नाणी रुळाखाली ठेवायचो-व ती चपटी नाणी संग्रहात ठेवायचो-तसा प्रकार होता-ह्यांचे विमान तळ जर्मनीत ३र्य क्रमांकांचे आहे, .१हिले फ्रांक फ्रुट तर दुसरे म्युनिक

आवडले ....!!

पैसा's picture

7 Nov 2011 - 10:12 am | पैसा

तुमचे हॉटेलच्या नोकरीतील असेच काही अनुभव येऊ द्यात!

५० फक्त's picture

7 Nov 2011 - 12:30 pm | ५० फक्त

मस्त रे येउदे अजुन, यावेळी फोटो का नाही टाकले रे ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Nov 2011 - 3:27 pm | निनाद मुक्काम प...

https://www.facebook.com/media/set/?set=a.431546949788.226479.781934788&...

फेस बुक वरील फोटोंची
लिंक देत आहे.
त्यामागील भूमिका इतकीच आहे. की प्रतिक्रियांमध्ये टाकलेले फोटो पाहणे अनिर्वाय असण्यापेक्षा इच्छुक मिपा मंडळींना
सदर लिंक चा मागोवा घेत फोटो पाहता येतील.

पंचतारांकीत दुनिया मग ती कोणत्याही देशातील असो तिथे नेहमीच काहीना काही घडत असते.

समाजातील प्रभावशाली ,लोकप्रिय ,हुशार ,प्रसिध्द , कृप्रसिध्ध आणी अंगी बर्याच कळा असणारे धुरंदर व्यक्तिमत्व येथे वास्त्यव्याला असतात.

त्यामुळे ह्या अनुषंगाने त्यांचे जीवन ,राहणीमान ह्यांच्याशी संबंध येणे ओघाचे असते.

काही लोक तर वर्षातील अर्धाहून जास्त काळ एकाच हॉटेलात मुक्कामाला असतात. त्यामुळे त्यांच्याशी कळत नकळत ऋणानुबंध जोडले जातात.

पण त्यांच्या जीवनातील खाजगीपण जपणे हे आमचे नैतिक ,व्यावसायिक धोरण असते.

प्रसार माध्यमे कितीतरी वेळा माहिती देण्यासाठी ,काढण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवतात. पण बुराई संग जो मेल रचाया ..........

कितीतरी वेळा सरकारी पातळीवरून मदत मागितली जाते. अश्यावेळी मात्र नाईलाज होतो.

पूर्वी प्रिया ताईचे त्यांच्या तेथील काम करतांना आलेल्या अनुभवावर आधारीत पुस्तक

पंचतारांकीत वाचले होते.

तो काळ व आताचा काळ ह्यात एका तपाचे अंतर आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

पण येथे अनेक महानुभावांचे अनुभव आणी त्यांच्या गमतीदार आंबट गोड आठवणी मात्र नेहमीच येत राहतात.

पुढील काळात माझ्या १० वर्षाहून जास्त काळ ह्या दुनियेतील मुशाफिरगीरीतील माझ्या तुटपुंज्या अनुभवांचे गाठोडे घेऊन मिपावर जरूर हजर होईन.

अनुभवातील व्यक्तींची मूळ नावे न लिहिता पण आवश्यक ती हिंट त्यांच्या बाबत देत राहील.

मिपाकर चाणाक्ष आणी सुज्ञ आहेत. त वरून ताकभात ओळखतीलच.

अर्थात राजकीय ,धार्मिक व्यक्तींचे कोणतेही भलेभुरे अनुभव कटाक्षाने टाळेल. उगाच वादंग नको.

अपवाद दलाई लामा हांच्या भेटीचा क्षण

बहु कधी योग जुळून येतोय ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2011 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनेक विषय लिहिण्याबद्दल म्हणत आहात ते सर्वच विषय जरुर लिहा. बाकी, लेखात निवडक फोटो डकवायला हरकत नव्हती. इतर दुव्यांवर जायचा टंकाळा येतो.

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

7 Nov 2011 - 11:11 pm | अर्धवटराव

साला हे जर्मन आख्यान मूड मस्त फ्रेश करुन टाकते. युरोपच्या प्रेमात पडलेला भटक्या देसी+मराठी निनाद रंगतदार मैफील जमवतो.
वेटींग फॉर नेक्स्ट आख्यान एपीसोड.

अर्धवटराव

रेवती's picture

8 Nov 2011 - 12:47 am | रेवती

जर्मनकरसाहेब, लेखन फारच इंटरेस्टींग झाले आहे.
ही मालिका मस्त चालू आहेच पण त्यानंतर तुमच्या विशेष क्षेत्रातले अनुभव वाचायला आवडतील हे आवर्जून सांगते. त्या महत्वाच्या लोकांची नावे उघड केली नाहीत तरी चालेल. त्यांचे खाजगी जीवन जपणे हा तुमच्या व्यवसायाचा भाग आहे आणि अगदी मान्यही आहे.
अवांतर: लेखनावरून पुन्हा नजर फिरवणे आवश्यक आहे असे सुचवते.
माझ्या चुका होतच असतात हेही कबूल करते.;)

दादा कोंडके's picture

8 Nov 2011 - 1:04 am | दादा कोंडके

शुद्धलेखनाच्या चुका, शब्दांच्या चुका वगैरे असूनही च्यामारी तुमचं लिखाण अगदी मनातून उतरलेलं असतं, त्यामुळे आवडतं! :)

इंटरनेटस्नेही's picture

8 Nov 2011 - 1:14 am | इंटरनेटस्नेही

चांगला लेख. मनापासुन आवडला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 5:30 am | निनाद मुक्काम प...

प्रतिसादासाठी सर्वांचे आभार.

सर्व सूचनांचा नक्की विचार करेन

.( माझ्यात राजकारणी होण्याची नक्की पात्रता आहे असे मला वाटायला लागले आहे .दरवेळी आलेल्या सूचनांच्या संदर्भात मी नम्रतेने हेच पालपूद खरडतो .

पण पहिले पाढे पंचावन अशी माझी अवस्था होते. सूचनांचे पालन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. ते करण्यास माझा तोटा काहीच नसतो उलटपक्षी फायदा असतो.,पण कधीकधी लवकर लिहून न पुरेसे न वाचता खरडतो.)

जर्मन आख्यानमालेला जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आले आहे. अजून जर्मनी बराच पहायचा आहे. उत्तरेचा भाग( जेथे मोहनराव राहतात )आणी पूर्व जर्मनी

तेव्हा काही भागात ही आख्यानमाला काहीकाळ शीत निद्रेस जाईल.

.युरोपियन आख्यान सुरु करावे म्हणतो.

( माझे फोटो टाकणार नाहीत )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Mar 2012 - 12:38 am | निनाद मुक्काम प...

ह्या आख्यानात फोटो टाकायचे राहून गेले होते. टीवी टॉवर वरून शहराचे दर्शन
.

फुटबॉल च्या विश्व चषक स्पर्धेनिमित्त असे बियरचे ठेले शहरभर लागले होते.

फोटोत पुतळा नसून चक्क एक माणूस उभा आहे.
युरोपात सर्वत्र मेकअप व वेशभूषा करून पुतळ्या प्रमाणे स्तब्ध उभे राहून आपली कला सादर करणारे कलाकार आढळतात. शहराच्या मोक्याच्या व पर्यायाने गर्दीची ठिकाणे ह्यांचे प्रमुख अड्डे.
सदर ठिकाण हे शहराच्या रेल्वे स्थानकाबाहेर आहे.
सदर इसम शहरात दाखल होणारे पर्यटक व .स्थानिक . लोकांचे फोटो काढण्याचे सोंग वठवत होता.

बॅटमॅन's picture

11 Mar 2012 - 11:52 pm | बॅटमॅन

Uber Deutschland बद्दलचा हा लेख तसाच Uber झाला आहे :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Mar 2012 - 11:55 pm | निनाद मुक्काम प...

रात्रीच्या वेळी नदीकाठावरून दिसेल्डोर्फ कमालीचे गोडंस दिसत होते.


प्रत्येक आख्यानात फोटोंच्या तक्त्यात किमत ३ ते ४ वेळा स्वतःची छबी टाकण्याची प्राचीन परंपरा येथे ही ........

अश्याच एका बियरच्या गल्लीत दिसेल्डोर्फ ची अधिकृत बियर अल्त बियर ( स्थानिक भाषेत जुनी बियर ) नळी सारख्या ग्लासातून

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Mar 2012 - 12:28 am | निनाद मुक्काम प...


हे शहर छोट्या उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे.
सदर फोटो जर्मनी मधील विख्यात को म्हणजे किंग अवेन्यू जवळील आहे


शिल्पकले विषयी माझे गाढे अज्ञान लक्षात घेता आमचे कुटुंब मला एका उद्यानातील मध्यवर्ती असलेल्या शिल्पाबद्दल उत्साहाने सांगत होती.( ते त्यांचे राखीव कुरण आहे ) मात्र पोटपूजा झाल्यावर व दिवसभर भटकंती करून शिणलेला मी हिरवी हिरवळ पाहण्यात दंग होतो. सबब ह्या शिल्पाविषयी माहिती शून्य




जर्मनी मधील कुठल्याही शहरांमध्ये अश्या छोट्या गल्यातून उपहारगृह ,पब उन्हाळ्यात रस्त्यावर बाकडे टाकतात.
ह्या फोटोत रिकामे बाकडे दिसत आहेत कारण सगळी माणसे आत सामना पहात होते.

एरवी रस्त्यावरचे पदार्थ खाण्यात नेहमी तुडूंब गर्दी असते