जर्मन आख्यान भाग ५

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in जनातलं, मनातलं
24 Dec 2010 - 10:40 am

http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
हा देश हा महायुद्ध्नातर दोन भागात विभागला केला .भांडवलदार पाशिमात्या ज्या पैकी फ्रांस व अमेरिकेने वेस्ट जर्मनीचा विकासाचा मक्ता घेतला .जर्मन नविन पिढीला इतिहास व भांडवलशाही आपल्या पद्धतीने शिकवली.तर पूर्व जर्मनी साम्यवादी रशियाच्या ताब्यात आला . दोघांची बर्लिन येथे भिंत उभी करून ह्या देशाची फाळणी केली .एकि कडे मुक्त व्यापार व्यवस्था /लोकशाही व विकासाच्या मार्फत अमेरिकेतून जन्माला आलेला चंगळवाद होता .व दुसरीकडे पूर्व जर्मनीत रशियन आदर्शवाद / साम्यवादी विचारसरणी व सरकारी व्यवस्थेने पूर्ण कब्जा केलेले लोकांचे जीवन होते .आजही एकसंध झाल्यावर त्यांच्यातील मुल्ये व जीवन पद्धती वेगळ्या असल्याने भौगोलिक दृष्ट्या जरी एक आले असले तरी त्यांचे मनोमिलन अजून झाले नाही आहे ..एखादा पूर्वेचे जुने खोड येथे अजूनही साम्यवाद /नैतिकता /आदर्शवाद /मुल्ये थोडक्यात मार्क वादाचे गोडवे गातो .त्यावर वेस्ट जर्मनीची लोक अगदी माझी बायकोसुद्धा मग त्यांना सुनावते येवढा पुळका आहे तर मग जा परत पूर्व जर्मनीत . अर्थात हा प्रांत अजूनही आपल्या बिमारू राज्यांसारखा काही प्रमाणात आहे .पण तिथे आता विकासाचे वारे वाहू लागले आहेत .भारताच्या आय टी व इतर कंपन्या तेथे गुंतवणूक करीत आहेत .आपल्या महारष्ट्र राज्याने त्यांच्या एन आर डब्लू ह्या राज्याची करार केला आहे .त्या राज्याची राजधानी कलोन हिला युरोपची सिलीकोन व्याली बनविण्याचा विडा आपल्या राज्याने घेतला आहे .पुण्याच्या बाबा कल्याणी ह्यांची व इतर अनेक कंपन्या येथे तळ ठोकून आहेत .थोडक्यात काय आपली भारतीय कॉलर ताठ होती .जर्मनीत अनिता बोस ( सुभाष चंद्र बोस ह्यांच्या जर्मन बायकोची एकमेव कन्या ). ह्यांना भेटण्याचा मानस आहे .पाहूया कधी योग येतो ते .रोबोट हा तमिळ भाषेत जर्मनीत ४० ठिकाणी लागला होता .तो पाहायला प्रत्यक्ष थिएतर मध्ये गेलो .आम्ही तो पाहणार म्हणून खास माझ्या हॉटेल मधील तमिळ( निर्वासित) कलीग ने खास काही तास रांगेत उभी राहून आमच्या साठी तिकीट काढली होती . अर्थात स्वतासाठी पण (तो तिसर्यादा सिनेमा पहात होता. )ह्या सिनेमाची भाषा आम्हाला परकीय होती .तिला काही एवढा हा सिनेमा आवडला नाही .शाहरुख ची सर नाही. अशी मताची एक पिंक आमच्या कुटुंबाने टाकली .. पण मी तिला तिथे नेले होते ते भारतीय खास करून दक्षिणात्य पंखे दाखविण्यासाठी जे बेभान होऊन शिट्या .आरोळ्या व फोटो काढत होते,.येथे सिनेमागृहात फोटो काढायला साहजिकच बंदी आहे .पण रजनी भक्त मात्र त्याची छबी टिपण्यासाठी खुशाल आपल्या खुर्चीवर चढून आपला कार्यभाग सिद्धीस नेत होते .
केट च्या ओमा म्हणजे आजीचा वाढदिवस जवळ आल्याने तिच्या वाढ दिवसानिम्मित आम्हाला येत येईल का? अशी चाचपाणी अनिताने( माझी सासूने ) केट कडे करून पहिली .वाढ दिवस हा रविवारी आल्यामुळे आम्ही लगेच होकार दिला .माहेरी जायला मिळणार म्हणून बाईसाहेब खुशीत होत्या .आपल्या आई वडिलांना भेटण्याचा आनंद पाहून मी विचारले .एवढे आवडतात तुला तुझे पालक. तर त्याच्या जवळच्या एका शहरात स्थलांतरित होवुया .म्हणजे तुमच्या नित्य गाठी भेटी होत राहतील ..ह्यावर बाईसाहेब म्हणाल्या हेच मला नको आहे .माझ्या संसारात मला आपल्या व्यतरिक्त अजून कोणाचीही दखल चालणार नाही . मला आपल्या घरात त्यांनी व इतरांनी पाहुणे म्हणूनच आलेले आवडेल . .मी तिला ह्यावर आमच्या मराठीत दुरून डोंगर साजरे हि म्हण सुनावली. अश्या म्हणी मी तिला सारख्या सुनावत असतो .मागे मुंबई मुक्कामी तिने माझ्या नातेवाईकांना बॉलीवूड मध्ये कोणत्याही प्रसंगाला गाणे व मराठीत कोणत्याही प्रसंगाला म्हणी असतात. असे विधान करून भर उन्हाळ्यात सर्वाना गार केले होते .
तिचे आई वडील स्टूट गार्ड जवळ रैन सबन ह्या टुमदार गावात राहतात ..अर्थात हे पाशिमात्या गाव असल्याने येथे शहरात असणाऱ्या सर्व सुखसोयी . शेजारच्या गावात ५०० किशोर वयीन तरुणाईला नाईट क्लब देखील होता . अर्थात हे क्लब त्याच्या गावापासून दूर माळरानावर असल्याने गावाच्या शांततेत विघ्न येत नाही .च्यायला आमीच कर्म दरिद्री ( पब सोडा पण दहावीच्या शालांत परीक्षा नामक यज्ञकुंडात आमच्या तारुण्य सुलभ भावना स्वाहा झाल्या होत्या .) .कोणत्याही गावात अपेक्षित अशी शांतता कोणत्याही चोप्रा /जोहर सिनेमात दिसणारी रम्य हिरवळ
गर्द वनराई व राज ठाकरे ह्यांना अपेक्षित असा जीन्स घालून यात्रिक शेती करणारा शेतकरी असे मनोहर दृश्य होते ..येथे हवामानाची साथ नसल्याने काही महिने निसर्ग व मान्सून ह्यावर न अवलंबून हा जर्मन शेतकरी यंत्रांच्या सहाय्याने शेकडो एकर जमिनीत बटाटे व आदी गोष्टीचे उत्पादन लीलया काढतो .हे पाहतांना मला विदर्भातील शेतकरी आठवला .आय मीन त्यांच्या कडे जर्मन वाहिनीवर एक लघु पट दाखवला. त्यात एक पत्रकार भारताच्या खेड्यापाड्यातून भारत हिंडून भारत दर्शन करत होता .( भारतावर येथे खंडीभर कायर्क्रम दाखवत असतात .).माझ्या शायनिंग इंडियाचे म्हणजे प्रचाराचे त्या दिवशी पितळ उघडे पडले. .स्वत अन्न पिकवून हा बळीराजा स्वत उपाशी कसा ? असा प्रश सासू सासरे ह्यांनी मला विचारला अर्थात ह्याचे उत्तर द्यायला मी काय ज्योतिषी आहे का ?
सासू बाई आपल्या धाकट्या विधवा मुलीसोबत शेजारच्या गावात सरकारी घरात राहतात. .अर्थात ते घर त्यांना सरकारने त्यांच्या पतीने दुसर्या महायुद्धात रशियात शहीद होऊन हिम निद्रा घेतली त्या बद्ल्यात दिले होते ..अर्थात आपण सुद्धा कारगिल शहीदांसाठी आदर्श व्यवस्था नाही का केली ? आजीने ह्या दोन मुली व एक मुलगा असा परिवार वाढवला .थोडक्यात केट ला एक मामा व मावशी आहे अर्थात आपल्या एवढी शब्द संपत्ती त्यांच्या जवळ नसल्याने अंकल व आंटी ह्यावर बोळवण करावी लागते .आजीच्या घरी गेलो. तेव्हा म्हातारपणी घराची निगा नीट राखता येत नसल्याचे आढळले .अर्थत तिचा व तिच्या मुलीचा अर्ध्याहून अधिक वेळ तिच्या कोबड्या बदके / नि जुना सोबती रुबी हा माझ्याहून उंच घोडा व एक श्वान ह्यांच्या साठी खर्ची होतो .अर्थात अनिताकडे ताजी अंडी नियमित येतात .गंमत म्हणजे म्हातारपणी एकटेपणाच्या जाणीवेने म्हणा कि अजून कशाने म्हातारीला ह्या प्राण्याचा अतोनात लळा लागला आहे .एवढा कि ति आता कोबंड्या किंवा बदके जिव्हेच्या चोचाल्यासाठी उदर भरणासाठी मारत नाही .तर त्यांचा नैसर्गिक मृत्य झाल्यावर दफनविधी करते ..पूर्वी शर्यतीसाठी घोड्याचे ब्रीडिंग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता .अनेक शर्यतींसाठी घोडे पोहचवण्यासाठी छोटी केट स्वत आजी आणि मामा सोबत गाडीतून जायची .रुबीने तरुण वयात अनेक शर्यती गाजवल्या होत्या .त्याच्या पाठीवर केट व तिची बहिण खेळली होती .अर्थात उतार वयातहि तो विलक्षण देखणा दिसत होता .वाढ दिवाच्या निम्मित आजी एकदम नटली होती. .आम्ही सगळे आजीच्या आवडत्या उपहारगृहात जेवायला आलो .७० रीची आजी वयाच्या ५ पासून येथे येत होती .उपहारगृहाची मालकीण आजी पेक्षा १ वयाने मोठी पण एकाच शाळेतील असल्याने त्यांची व तमाम काम करणाऱ्या इमानी नोकर मंडळी जी उपहारगृहाच्या परिवाराचे सदस्य होते ते आजीच्या परिचयाचे होते. .आजी म्हणाली शेत कामाव्यातारिक्त तिच्या वडिलांना शिकारीचा छंद होता व लहानवयापासून आजी त्यांच्या सोबत असायची .पान कोबड्या .ससे ह्याची शिकार ते करायचे पण कधी जर शिकार मिळाली नाही तर मात्र संध्याकाळी उपहार गृहाकडे मोर्चा वळायाचा. अश्या आजीचा गोड निरोप घेतल्यावर अनिता व केट खरेदीसाठी बाहेर पडल्या .अल्बर्ट म्हाणाला मी व माझे काही मित्र सौना बाथ ला जाणार आहोत येशील का ?
मी लगेच हो म्हटले .ह्यावर केट जाताना कानात कुजाबली तुला माहिती आहे का येथे सौना बाथ महिला व पुरुषांचा एकच असतो. व सगळे दिगंबर पंथीय असतात .तिथे .मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखे कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?

देशांतरअनुभव

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 11:18 am | निनाद मुक्काम प...

ओमाच्या परसात
जर्मन झेंडा (आजीला नवर्याचा लय अभिमान )
ओमाच्या लाडक्या उपहारगृहात
ओमाच्या मैत्रिणीची मुलगी (सध्या तीच उपहारगृह सांभाळते .)

विलासराव's picture

24 Dec 2010 - 11:00 am | विलासराव

छान लिहिताय.

छान रे
पुढचा भाग लवकर येउदे

धुमकेतू's picture

24 Dec 2010 - 1:11 pm | धुमकेतू

छान लिहता आहात !

जर्मन-एकीकरणा बद्दल , त्याचे सामाजिक , आर्थिक आणि राजकीय परिणाम ह्यावर एखादा लेख लिहून टाका ! :)

वारकरि रशियात's picture

24 Dec 2010 - 3:08 pm | वारकरि रशियात

छान ! - विशेषतः
बॉलीवूड मध्ये कोणत्याही प्रसंगाला गाणे व मराठीत कोणत्याही प्रसंगाला म्हणी असतात. हे आवडले !

अवांतरः अनेक प्रसंगांची मनात दाटी होउन घाई करून लिहीणे अत्यावश्यक, नाहीतर विसरेल ! अशा मनःस्थितीतून लिहीले असावे काय ? धाव-या मुंग्यांची आठवण झाली !

सुनील's picture

24 Dec 2010 - 4:36 pm | सुनील

बॉलीवूड मध्ये कोणत्याही प्रसंगाला गाणे व मराठीत कोणत्याही प्रसंगाला म्हणी असतात
लै भारी!!

पुढचं येऊद्या लौकर!

रेवती's picture

24 Dec 2010 - 7:05 pm | रेवती

लेख आवडला.

स्वानन्द's picture

24 Dec 2010 - 9:47 pm | स्वानन्द

मस्त वर्णन. :)

>>उपहारगृहाची मालकीण आजी पेक्षा १ वयाने मोठी
तुम्हाला १ वर्षाने असं म्हणायचं असावं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 10:03 pm | निनाद मुक्काम प...

होय

तेच म्हणायचे होते .

वाहीदा's picture

25 Dec 2010 - 11:12 am | वाहीदा

पण सारखे सारखे स्वत:चे फोटो का टाकतोस ????
त्यामुळे सुत्रबध्दता विस्कळीत होते

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Dec 2010 - 11:37 am | निनाद मुक्काम प...

पण सारखे सारखे स्वत:चे फोटो का टाकतोस ????
कारण माझ्या लेखणीत जी ए सारखे चित्र उभे करायचे सामर्थ्य नाही आहे .म्हणून कदाचित ...(प्रत्यक्ष फोटो पहा म्हणजे माझ्या लिखाणातील काही वर्णनात त्रुटी राहिली असेल (अशुध्द लेखणामुळे जर समजत नसेल )फोटोतून आशय समजून घेता येईल असे मला वाटते .
बाकी फोटो बायको कौतुकाने काढते

.

तिला मराठी भाषा वाचायला येत नाही .अश्यावेळी हा माझा लेख आहे हे समजावे म्हणून पण मी आमचे फोटो टाकतो .( नि मग तिची आई तमाम तिच्या मैत्रीणीना मिम वर येऊन त्य्नाच्या जावयाच्या लेख पाहायला सांगते .(तिचा स्वताचा तिच्या मातृ भाषेत ब्लोक आहे ) मीप वरील पाहुण्यात कितीतरी गोरे असतात ते फक्त माझा फोटो व मी काही बाही लिहिले आहे हे पाहून जातात व कधी सासुरवाडी गेल्यावर मला भारत /अध्यात्म व अजून बरेच काही समजते अश्या अविर्भावात प्रचंड प्रश्न विचारतात (येथे क्रीडा प्रकारचे प्रस्थ आहे .त्यामुळे लिखाण करणारा येथे जरा वेगळा मानला जातो

निनाद, राग मानू नकोस पण आमच्या कुटंबाचे अगदी जवळचे स्नेही होते, डॉ. अब्दु्ल्हा खान म्हणून त्यांचा मुलगा जर्मनीला गेला अन परत आलाच नाही तो ही असेच जर्मनीचे गुणगाण पत्रातून करायचा.
लिफाफ्यात आपल्या जर्मन बायको बरोबर काढलेले भरगच्च फोटो पाठवायचा. सुरवातीला खुप कौतुक वाटायचे मग राग यायला लागला कि तो आईच्या शेवटच्या क्षणी देखील परत यायला तयार नाही. मग खान चाचा आजारी पडल्यावर त्याला रागाने कोणी कळविले नाही.

तुझा तुझ्या बायको वर दिल कुरबान आहे हे समजले पण तुझ्या लेखात कुठेतरी भारताशी घनिष्ट ऋणानुबंध कायम दिसून येतो तो तसाच ठेव आपण जगात कुठ्ल्या ही कोपर्‍यात का असेना तरिही शेवटी 'ऐ मेरे प्यारे वतन, तुझपे दिल कुरबान !! ' असणे महत्वाचे :-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Dec 2010 - 11:57 pm | निनाद मुक्काम प...

हा सर्व नशिबाचा खेळ आहे .सध्या हिमवर्षावामुळे सगळी उड्डाणे (विमानांची थांबली आहेत .) अश्यावेळी मनात असून लोकांना त्यांचे नाताळ व नववर्षाच्या सहलीचे कायर्क्रम मोडीत काढावे लागले आहेत ,त्यात कितीतरी भारतीय भारतात विविध कारणासाठी जाण्यास खोळंबले आहेत .भारतातून सहलीला आलेल्या पर्यटकांचा नवीन वर्ष व नाताळ अनायासा येथे अडकून पडल्याने साजरा होणार असे दिसते .(आमच्या हॉटेलात आले आहेत त्यापैकी काही . व्यापाराच्या बायका तर शॉपिंग वैगैरे करत आहेत भर बर्फात पण भारतीय व्यापारी आणि उच्च पदावरील अधिकारी भारतात जाण्यासाठी तळमळत आहेत .एका हिरे व्यापाराच्या एक मोठा व्यापारिक सौदा भारतात खोळंबला आहे .म्हणून तो भारतात जाण्यासाठी आतुर आहे .थोडक्यात काय तुम्ही म्हणाला तसे आईवडिलांच्या शेवटच्या क्षणी भेटायला जमले नाही त्या मुलाला ?
मला सांगा सीमेवर लढणाऱ्या जवानांना भेटायला मिळते का ? त्यांना हव्या तेव्हा रजा मिळतात का ?
मुंबई पोलिसांना सुध्धा मिळत नाही .शेवटी भेट होणे न होणे सर्व दैवाच्या हातात आहे (कुणा न कळले त्रिखंडातल्या हात विणकराचे)
बाकी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी देशाला विसरणे शक्य नाही .कारण मी विसरायचा प्रयत्न केला तरी ज्या बहुतांशी जर्मन लोकांमध्ये मी वावरतो .ते मला विसरू देत नाहीत . सध्या येते दशक हे चीन व भारताचे असल्याने भारत व चीन विषयी काहीतरी लिहिल्याशिवाय ह्यांच्या वृत्त पत्रांना अजिबात चैन पडत नाही ,बाकी देशाची खरी इमेज ह्या लोकांपुढे येणे मी गरजेचे समजतो .कारण बॉलीवूड म्हणजे भारत अशी भावना खुपश्या युवावर्गात आहे येथे .तसेस हॉटेल व्यवसायात एक पाकिस्तान सोडला तर इराण इराक अफगानिस्तान इंदिनेशिया व इतर अरब राष्ट्रातील लोक जसे मोरेको ह्यांचे भारताविषयी खूप चांगले मत आहे . व मी भारतातून आलो आहे समजल्यावर मला खूप चांगली वागणूक हि लोक तसेस गोरे देतात .तेव्हा देश कुहेतरी काही तरी चांगले करत आहे .ह्यावर विश्वास बसतो .सेक्युलर पणाचा फायदा हा परदेशात मला नेहमीच मिळतो .परवा काही कोलंबियन मुलामुलींचा ग्रुप आमच्या हॉटेलात कामानिमित आला होता .मी भारतातून आहे .म्हटल्यावर खूप गप्पा मारल्या .व भारताने चीन सारखे आमच्या खंडात गुंतवणूक केली पाहिजे .आम्ही खूप उत्सुक आहोत .तुमच्याशी व्यापार करायला . सगळ्यात गंमत म्हणजे आपल्या निवडणूक प्रक्रिया ( वेगवान ) असल्याने रशिया आपल्या कडून ती शिकण्यासाठी ह्यावेळी भारतात खास करार केला .ह्या अंतर्गत आपले निवडणूक अधिकारी तेहते जाऊन त्यांना प्रशिक्षित करणार आहेत .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 9:51 pm | निनाद मुक्काम प...

विलास राव /आमोद /रेवती /धुमकेतू /वारकरी रशियात /सुनील ह्या सर्वांचे मनपूर्वक आभार .
धुमकेतू तुमची कल्पना आवडली .किंबहुना हा लेख पुढे मागे कधी तरी लिहिणारच होतो .कारण ३ वर्षात मला येथेईल पासपोर्ट मिळणार आहे ,मात्र येथील भाषा व जर्मन इतिहास (जो दोस्त राष्ट्रांनी सेन्सॉर केलेला ) व नागरीशास्त्र ह्यावर एक जर्मन भाषेत मला कोर्स करावा लागणार आहे .ज्यावर परीक्षा द्यावी लागणार असून ती ह्यांच्या सरकार कडून घेतली जाते .त्यामुळे त्यावेळी मिळालेली माहिती आपल्या मायबोलीत मी लिहिली असतीच पण सध्याच्या आख्यानात सुध्धा मी जमेल तशी माहिती देण्यात प्रयत्न करेन .कारण कोणत्याही देशात राहण्यासाठी त्यांची संस्कृती समजून घेण्याची गरज आहे .असे मला वाटते .
नागरीशास्त्र म्हणजे समाजात येथे आम्ही अवाच्या सव्वा कर भरतो .त्याबद्दल सरकार तुम्हाला बर्याच सुख सुविधा देते .तेव्हा त्यांच्या नागरिकांसाठी योजना ./नागरिकाचे मुलभूत हक्क /ह्याबद्दल सविस्तर माहिती जाऊन घेतली तरच भरलेल्या कराचे सार्थक करता येईल .आणि परदेशातून आलेल्या माझ्या सारख्याला एवढा कर सरकारला का द्यायचा हा प्रश्न सतावणार नाही ,बाकी मिळतात त्या सुविधा कमीच आहेत असे येथील कोकांना वाटते .(मी म्हणतो तुम्हाला सुविधा मिळतात तरी ) बाकी आल्याकडे कडे मुठभर लोकच कर भरतात. कारण कदाचित जनता व सरकार मध्ये एक अलिखित करार झाला आहे .कि आम्ही कर देत नाही .त्याबदल्यात तुम्ही सोयी सुविधा पुरवू नका .ह्यात जो प्रामाणिक रित्या कर देतो तो गाढव ठरतो . त्यांचा पैसा राजा महाराजांच्या तिजोरीत जातो /स्विस च्या खात्यात जातो .(२५००० भारतीय वर्षातून अनेकदा स्विस वार्या नियमित करतात .)
पुढेमागे स्विस मधील जर्मन बहुल भागातील पंचतारांकित हॉटेलात काम करण्याची मनीषा आहे .तेव्हा हि भारतीय धेंडे भेटतील अशी अशा करूया .
बाकी वारकरी रशियात म्हणतात त्यात नक्कीच तथ्य आहे ,किंबहुना माझ्या लेखात प्रसंगांची सुसूत्रता नसल्याने मनातील प्रसंग मी एका पाठोपाठ रिते करत आहे .(एकूण जीवनात सुसूत्रता नव्हती .ती बायको आणण्याचा प्रयत्न करीत आहे .तिच्या प्रयत्नांना यश मिळो.) तिनेच उपहार गृहात माझी एक छबी घेतली .जी तिच्या आजीने मह्वून घेतली .त्यांच्या परिवारातील मी सदस्य झाल्यामुळे आता त्याच्या फेमेली अल्बम मध्ये मी समाविष्ट झालो .हे म्हणजे गरुडाच्या ताफ्यात मोर आला .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Dec 2010 - 4:32 am | निनाद मुक्काम प...

http://www.youtube.com/watch?v=QqERWqRSNl4
http://www.youtube.com/watch?v=3BcEM6MhUDA
जर्मन आख्यान भाग १ व २ मधील दास्ताने फुट बॉल चा सामन्याची चलचित्र फीत येथे अडकवत आहे .