http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
http://www.misalpav.com/node/16534 भाग ७
http://www.misalpav.com/node/16661 भाग ८
right;">जर्मनीत येऊन कलोन मध्ये आता ३ एक महीने झाले असतील .तोच ह्या अप्रतिम शहराचा विरह आम्हा दांपत्यांना झाला.
कारण फ्रांक फ्रुर्त मध्ये आम्हाला मिळालेली जॉब ऑफर तीही मंदीच्या काळात (''खरच मी किती शुभ शकुनी नि चांगल्या पायाचा आहे'' अशी स्वताची समजूत करून घेतली.)
.नि आपला बाड. बिस्तरा घेऊन स्वत एक मोठा ट्रक दिवस भर भाड्याने म्हणजे ( तीनशे युरो भाडे व दोनशे युरो ) जमानत भरून आणला. त्यात सर्व घरातील सामान मी केट व सासूबाई व सासरे ह्यांनी त्यात चढवले .नी मुक्कामी साडे तीन तासाचा प्रवास करून परत नव्या शहरात नव्या जागेत ते उतरवून ठेवले . पुढे त्यांची बांधणी करण्यात दोन दिवस गेले .
.''खरच भारतात अत्यंत कमी पैशात मजूर चुटकी सरशी ही काम करतातत.''
''येथे तुम्ही स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'' . हेच खरे . त्यात सर्व फर्निचर म्हणजे पलंग/ टेबल हे एकीया ह्या जगप्रसिद्ध स्वीडिश कंपनीचे असल्याने ते तुकड्या तुकड्यात सुटते करत येते .
जर्मनीत प्रत्येक घरात किमान एकतरी एकीयाची वस्तू नक्कीच वापरत असते .त्यांचे दुकानच ३ मजली मोठे व शिवाजी पार्क एवढे अवाढव्य असते .
दुबईत फेस्टिवल सिटी मध्ये आशियातील सर्वात मोठे एकीया असून त्याची साखळी आता भारतात येत आहे असे वाचून होतो .
मुळात जेव्हा आमचे कुटुंब जर्मनीत प्रथम आले तेव्हा मी मुंबईत जर्मन भाषेची मुळाक्षर गिरवत होतो. .(तिथे स्थलांतरित होण्यापूर्वी किंवा दीर्ध काळ वास्तव्य करायचे असल्यास तेथील भाषा प्राथमिक स्वरुपात आली पाहिजे.
.(मुंबईत किंवा पुण्यात गुटे (मेक्स म्युलर भवन ) ही जर्मन भाषा शिकण्याचे राजमान्य ठिकाण .
मग पुढे आ २ /मग बे १ /अश्या काही लेवल पार झाल्यावर भारतीय विद्यार्थी हे जर्मनीतील युनिवार्सितील शिष्यवृत्ती मिळवू शकतात ( मला ही ह्यांचा पासपोर्ट मिळण्यासाठी ह्या लेवल पार करणे आवश्यक आहे )
.माझ्या वर्गात अभियांत्रिकी /वैद्यकीय / हॉटेल व्यवस्थापनाचे काही विद्यार्थी सुध्धा भाषा शिकत होती
.त्यातील काही विद्यार्थी दोन ते तीन महिन्यात जर्मनीत दाखल झाले .
त्यांना येथे सहजरीत्या आलेले पाहून सहा एक वर्षापूर्वी युके पेक्षा जर्मनीत का नाही आलो ? असा मला प्रश्न पडला .
निदान विसा व इतर गोष्टींची जीव धेणी स्पर्धा टाळली असती .असे वाटून गेले ..(सध्या जर्मन सरकार अमेरिका/ युके ह्या प्रगत देशांचा कित्ता गिरवत म्हणजे उच्च शिक्षित मजूर आपल्या देशात येण्यासाठी शिक्षण व नोकरी करता व स्थायिक होण्याकरिता विविध योजनेद्वारे विशेष प्रयत्न करत आहे.. विसाचे नियम शिथिल केलेले आहेत . इच्छुक व्यक्तींनी ह्याची विशेष नोंद ध्यावी ,)
फ्रांक फ्रुट युरोपची व्यापारिक राजधानी. सर्वात जास्त परकीय लोक ह्या शहरात राहतात .तर अनेक लोक व्यापारानिम्मित ये जा करतात. .त्यामुळे इंग्लिश बोलणे नित्याचे असल्याने माझ्या बाळबोध जर्मन भाषेला ह्या स्थानिकांनी आपलेसे केले. नि मी येथे आता बर्यापैकी रुळलो
.
अर्थात हे जर्मनीतील प्रमुख व्यापारीकेंद्र आहे . महत्वाचे म्हणजे अनेक निर्वासित रेफ्युजी ज्यांना संयुक्त राष्ट्रांच्या कृपेमुळे ह्या देशात आसरा मिळाला.म्हणजे निर्वासितांचा खास पासपोर्ट मिळतो. (ह्यामुळे सर्व जगात कुठेही अगदी अमेरीकेत सुध्धा ही मंडळी जाऊन आरामात स्थाईक होऊ शकतात अपवाद .स्वताचा देश सोडून जगाच्या पाठीवर कोठेही .
. ह्यामुळे अफगाण व ट्रायबल पाकिस्तान म्हणजे बलुच व वझिरीस्तान /इराण //इराक/.सोमालिया /श्रीलंकन तमिळ घाना /नायजेरिया / सुदान /लिबिया /मोरेको /येमेन व अश्या अनेक धोकादायक देशातील मंडळी जीवाच्या भीतीने येथे येऊन स्थायिक झाले आहेत ..त्याच्या प्रत्येकाच्या कथा नि व्यथा ह्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. .पण त्याबद्दल नंतर कधी तरी ..
.तर अश्या शहरात आमचा मुक्काम पडला . .४ तासावर म्युनिक ला तिची धाकटी बहिण तर ३ तासावर माझी सासुरवाडी .त्यामुळे बाईसाहेब खुश होत्या .पण जर्मनीचा इतर शहरांच्या तुलनेत हे शहर इतिहास .कला /शिल्पे /जुन्या इमारती ह्या सर्व बाबतीत जरासे कुमकुवत असून व्यापारापुरते पक्के धंदेवाईक आहे . आहे ..पंजाबी/गुजराती नि पाकिस्तानी लोक जमेल तसे येथे काही दशकांपूर्वी स्थायिक झालेले आहेत .तर दक्षिणात्य संगणक तज्ञ काही वर्षांपूर्वी आलेले आहेत .मी मात्र मराठी माणसे नि मराठमोळ्या वातावरण परका झालो. होतो . (लंडन व आबू धाबीचे दिवस म्हणजे काय बहार होती. आम्हा मराठमोळ्या परप्रांतीयांनी तेथे काय आपलेच संस्थान उभारली आहे. .आता तर लंडन मधील हौन्स्लो मध्ये नवे मराठी मंडळ झाले असून माझे अनेक मित्र कार्यरत आहेत .
.भारतातील कोणतीही वस्तू अगदी टिपिकल भारतीय मानसिकता असलेले /प्रांतवाद जपणारे अनिवासी भारतीय तेथे मुबलक प्रमाणात मिळतात येथे मी पार उपरा होतो .( '' एक अकेला इस शहर मे'') .
जर्मनीत कुठल्याही शहरात आल्यावर सर्वप्रथम सरकारी कार्यालयात तुम्हाला रजिस्टर व्हावे लागते .अर्थात लाल फितीचा फटका येथे आम्हाला बसला .त्यामुळे अनेकदा चकरा मारून शेवटी एकदाचे आम्ही रजिस्टर झालो. .मी वैतागुन म्हणालो पण. .''साला आमच्या कडे निदान दोन गांधी सरकवले कि किती तरी सरकारी कामे कशी चुटकीसरशी होतात'' .येथे तोही प्रकार नाही .बाकी अगदी आरामात /सावकाश म्हणजे आपल्या पद्धतीचे वातावरण येथील सरकारी कार्यालयात असते. पण सब्र का फल मिठा म्हणून ह्या नवीन शहरात आमचे स्वागत म्हणून भली मोठी वौचर देण्यात आली .त्यात सवलतीच्या दरात संग्रालय /उपहारगृहे /डिस्को /नि खरेदीच्या दुकानानात आम्ही भाबड्या जीवांनी जर्मनीतील रिसेशन हि राष्ट्रीय आपत्ती समजून आपल्या परीने अर्थव्यवस्थेला उर्जित अवस्था आणणे असा संदेश कम आदेश होता .हा . भांद्वालादारांचा एक सापळा आहे असा पक्का कोम्रेद्वादी विचार मनात आला
.फ्रांक फ्रुट मध्ये सर्वप्रथम आम्ही नेचालर हिस्ट्री म्युझियम मध्ये जायचे ठरवले .तोंडातून शब्द ऐवजी वाफ बाहेर पडण्या इतका हवेत गारठा होता .पण थंडी सुरु झाली असे म्हणण्याचे धाडस मला नव्हते.
उणे १० ते २० सेल्सिअस तापमान हिमावार्षावत गारठलेला निसर्ग व त्यासंबंधित प्रत्येक व्यक्ती हे थंडीचे खरे रूप .अर्थात आमच्या कारगिल /द्रास मध्ये तर उणे ३२ सेल्सिअस तापमान असते असे सांगून मी स्वताची लाल करून घेतली .
व आमच्या शूर जवानांमुळे अजून हा प्रदेश आम्ही आमचा म्हणू शकतो हे सांगण्यात मी चुकलो नाही. .( सर्व प्रकारे सज्ज नाटो फौजा व अमेरिकन व युकेच्या फौजा ज्यांमध्ये पाशात्या युरोपियन राष्ट्रांचे जांबाज सैनिक असून अजून अफगाण मोहीम का फत्ते झाली नाही?
अशी चर्चा नुकतीच माझ्या सासर्यांच्या मित्रांसमवेत झाली असल्याने माझ्या वक्तव्याला सूचक महत्व आपसूकच प्राप्त झाले. .
नाश्ता करून काळी कॉफीची कडवट चव जिभेवर रेंगाळत आम्ही प्रथम उ बान घेतली .मग एस बान घेऊन मग स्ट्रास बान घेऊन आम्ही म्युझियमच्या समोर येऊन ठाकलो..
बान पुराण
बान म्हणजे रेल्वे.
जर्मनीत कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतुकीचे चार पर्याय असतात.
पहिला
उ बान : U फॉर (अंडर ग्राउंड ) जर्मनीत U चा उच्चार उ असा करतात . थोडक्या भूमिगत रेल्वे दिल्ली मेट्रो
एस बान : लोकल सदृश रेल्वे लांबच्या प्रवासाला म्हणजे सी एसटी ते कर्जत / विरार एवढ्या लांबचे भले मोठे अंतर जायला सर्वोत्तम पर्याय
स्त्रास बान : कधीकाळी मुंबईचा प्राण असलेली ट्राम म्हणजे येथे स्त्रास बान (रस्त्यावरून जाते म्हणून स्त्रास )
आणि बस : हि मुंबई पुण्यासारखी गल्लीबोळातून शहर दर्शन घडवत आणते (गावाला वळसा घालून इच्छित स्थळी जायचे असल्यास हा पर्याय चांगला आहे .)पण कधी कधी हिचे थांबे मोक्याच्या जागेवर असतात .
मुंबईत जशी हार्बर/ वेस्टर्न/ व सेन्ट्रल अश्या ३ लायनी आहेत .तश्या येथे एस बान च्या S १/२/३/३/४ अश्या लायनी असतात . .
व शहराच्या मध्यभागी कोळ्याच्या जाळ्या सारखे भूमिगत रेल्वेचे चौतर्फा जाळे विणले असते .
. व स्ट्रास बान मुख्यत्वे जमिनीवरून लघु पल्याची ठिकाणे गाठण्यासाठी असतो ..
बस हि इतर शहरांप्रमाणे शहराच्या गल्ली बोलातून जाते .. पण बस आणि स्ट्रास बान चे थांबे कितीतरी वेळा उ आणि एस बान च्या जवळ असतात ..मध्यवर्ती स्टेशन अर्थात आपल्या सी एस ती सारखे भव्य फ्रांक फ्रुट आम म्हणून प्रसिद्ध आहे
दळणवळणाच्या एवढ्या सोयी असल्या तरी येथे अनेक सायकलस्वार रस्तावर दिसतात .
फिटनेस ची हौस व जुनी संस्कुती व सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रदूषणविरहित स्वस्त नी मस्त पर्याय
प्रतिक्रिया
28 Feb 2011 - 8:26 am | ५० फक्त
अरे, निनाद,फोटो राहिले की रे, निदान त्या चार रेल्वेचे आणि त्या फोल्डिंग कपाट टेबलाचे फोटो टाकायचे. मी माझ्या घरात एकदा फोल्डिंङ डायनिंग टेबल बनवले होते, आज त्याचे उरले सुरले अवशेष मोरित सेवा देत आहेत. तसेच त्या स्विडिश कंपनीचा दुवा देता येईल का ?
हा भाग जरा जास्त वर्णनात्मक वाटला, पण रेल्वेच्या उल्लेखानं फार बरं वाटलं, जर्मन रेल्वेबददल मला शा़ळेत असल्यापासुन आकर्षण आहे. तुझ्या लिखाणात हा भाग कधी येतो याची वाटच पाहत होतो.
28 Feb 2011 - 11:54 am | बिपिन कार्यकर्ते
.. .... .- -.. .- -.. .. ..-. ..-. .. -.-. ..- .-.. - - .. -- . .-. . .- -.. .. -. --. - .... .. ... .-.-.- ... --- ... - --- .--. .--. . -.. - .-. -.-- .. -. --. .-.-.-
28 Feb 2011 - 12:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
.--. .-.. . .- ... . ..-. --- .-.. .-.. --- .-- - .... . .-. ..- .-.. . ... .-. . --. .- .-. -.. .. -. --. .--. ..- -. -.-. - ..- .- - .. --- -.
(संदर्भ)
28 Feb 2011 - 2:01 pm | गणपा
-.- .- .- -.-- -..-. -.-. .... .- .- ...- .- - .--. .- -. .- -..-. .-.. .- .- ...- .- .-.. .- .- -..-. .- .- .... . -..-. .-. . -..-. -.. --- --. .... .- .- -. .. .-.-.-
28 Feb 2011 - 2:13 pm | पैसा
.-.. --- .-.. .... .- .- .... .- .- .... .- .-
28 Feb 2011 - 2:24 pm | प्रीत-मोहर
... .- .... .- -- .- -
28 Feb 2011 - 11:57 pm | वाहीदा
Points to Ponder ...
4 Mar 2011 - 12:29 am | विश्वनाथ मेहेंदळे
- ..- -- .... .. / .-.. --- -.- .- / -. .- -.- -.- .. / -.- ..- - .... .- .-.. .- / -- --- .-. ... . / -.-. --- -.. . / - .-. .- -. ... .-.. .- - --- .-. / ...- .- .--. .- .-. .- - .- ..--.. / ... .--. .- -.-. . ... / --. .- -.-- .- -... / -.- .- ... .... .- / .... --- - .- - / - ..- -- .- -.-. .... -.-- .- ..--.. / --. .- -. .- .--. .- / -... .... .- ..- / -. . / -- .- ... - / -.-- ..- -.- - .. / -.- .- -.. .... .- .-.. .. / .- .... . --..-- / - -.-- .- ...- .- .-. / -- .- - / -.- .- .-. .- -. -.-- .- ... .- - .... .. .-.-.-
4 Mar 2011 - 9:10 am | पैसा
.- .- - .- .- -..-. -.- .- .-.. .- .-.. .-
28 Feb 2011 - 12:22 pm | स्पा
@#$@#$#%#$%$%$^%^%&^%&*^*&*(&*(*&)^(*)__)(_)+_+_)+*%#$@###$%#^%&*(*)
@E#@$#@%&^*&*(**)(_))_+_)^&^%#$
28 Feb 2011 - 12:26 pm | टारझन
आम्ही पाकृ आणि निनादपुराणात फोटु शिवय पत्रीक्रीया देत नाय :)
28 Feb 2011 - 4:56 pm | स्वाती२
आवडले पण फोटो टाका.
28 Feb 2011 - 9:23 pm | स्पंदना
निनाद थोडा त्रास झाला वाचताना. पण मग एकदा वाचत गेल्यावर तस इंटरेस्टींग वाटल.
बाकि इकिया च सामान वापरायला लागल की मोडुन हातात येत हा अनुभव.
तुम्ही पहिला जी मेल मध्ये लिहा , स्वतः वाचा, थोडफार दुरुस्त करा अन मग इथे टाका.
हा सल्ल्ल मी दोस्तीत देते आहे . कृपया राग नका मानु. आपण सारेच एकमेका कडुन काही ना काही शिकु शकतो.
1 Mar 2011 - 12:50 am | निनाद मुक्काम प...
हे आमचे एकीयाचे फर्निचर पुढील फोटोत
( ह्याचे सुटे भाग करणे /त्याची मोळी बनवून ती तिसर्या मजल्यातून खाली ट्रक मध्ये टाकणे /मग ३ तास प्रवास झाल्यावर ती मोळी इतर मोळ्या सोबत
हसत खेळत नव्या घरी रिती करणे .
दुसर्या दिवशी अतीव आनंदात ( सर्व शरीराचे दुखरे भाग एकत्र जमवून आता मानसिक कष्ट सुरु करायचे.)
म्हणजे काय तर सासू नि कुटुंब हे एकीया ची मार्ग दर्शक पुस्तिका वाचून त्या मोळीतील एकेक भाग कसा जोडायच्या ह्याची माहिती देणार. .मग अकुशल कामगार असा ठपका ठेवून ह्या महिला वर्ग मला आणी सासर्याला कामाला जुंपणार
नवीन घरात शून्यातून विश्व म्हणजे काय प्रकार असतो त्याची अनुभूती आली .
आपण भारतात आपल्या कडे छोटी मोठी काम करणारे अनेक अकुशल कामगार /कारागीर अत्यंत अल्प दारात आपल्याला सेवा पुरवितात .मग कामवाली बाई असो किंवा एखादा गवंडी किंवा सुतार किंवा एखादा हमाल .
ज्या पद्धतीने आपण मल्टी प्लेक्स मध्ये दौलतजादा करतो .त्याच्या काही टक्के तरी मानसिकता ह्या लोकांचा मोबदला देतांना असावी असे मला वाटते .
बाहेर गेल्यावर श्रमाची महती कळली .( नि कोणतेही काम छोटे नसते हा अनेक वेळा फळ्यावर लिहिलेला सुविचाराचा मतितार्थ ध्यानात आला .
माझा बिछाना स्वहस्ते तुकडे तूकड करणे जीवावर आले .ते परत साधतांना जीव मेटाकुटीस आला .
घर सोडून जाताना मालकाला घराला रंग फासून हवा होता .( असे वाटते भारतातून काही घोटाळे वीरांचा पैसा येथील रियाल एस्तेत मध्ये गुंतवावा
नि भाडेकरूच्या डोक्यावर खवीस बनून नाचावे ..नि भाडे वसूल करावे .
सर्वात हास्यास्पद गोष्ट भाडे करारातील म्हणजे ३ महिने आगाऊ नोटीस .
शक्यतो माणूस नवीन शहरात किंवा देशात स्थलांतरित होतो कारण तेथे त्याला नोकरी मिळाली असते.
आता नोकरीचा कॉल आला कि एक महिन्याची नोटीस आधीच्या नोकरीच्या ठिकाणी द्यायची .
व एका महिन्यात दुसर्या नोकरीत रुजू व्हायचे (म्हणजे दोन महिन्यांचे भाडे मालकाच्या खिशात ) ह्या तीन महिन्यांच्या काळात जर मालकाला नवीन भाडेकरू नाही मिळाला तर आपण त्याला उर्वरित २ महिन्याचे भाडे द्यायचे .रिकाम्या जागेचे .
1 Mar 2011 - 1:16 am | गोगोल
तू फर्निचर विकून का टाकत नाही?
नवीन ठिकाणी परत विकत घ्यायच.
1 Mar 2011 - 3:53 am | गणपा
-... .... .- .. -.- .- -.- .- -. -.-. .... -.-- .- -..-. -- .. -..-. .- .- -. .. -..-. -- .- .- --.. .- -..-. ... .... .- .-. - ..- -....- .--. .- -..- .- -..-. -.-. .... .. -..-. .-. .- .... ..- -. -....- .-. .- .... ..- -. -..-. .- .- - .... .- ...- .- -. -..-. -.-- . - -..-. .- .- .... .
1 Mar 2011 - 7:31 am | स्पंदना
गणपा भाउ मोहर्या तेलात टाकायच्या असतात, अश्या घर भर उधळायला काय भुत रहातात काय घरात?
1 Mar 2011 - 1:11 am | निनाद मुक्काम प...
आजकाल राजकीय सभेत टाळ्या वाजवणारी/ भाड्याची माणसे व अंकांचा पाऊस पाडणाऱ्या भाड्याच्या प्रतिक्रिया बक्कळ झाल्या आहेत .
देशाला आमच्या सारख्या बाहेरून पिझ्झा खाणार्या नाही तर अश्या कर्तुत्ववान लोकांची खरी गरज आहे .
1 Mar 2011 - 2:25 am | निनाद मुक्काम प...
गोगल भाऊ
अगदी हाच प्रश्न माझ्या मनात आला .
.पण हि जर्मन लोक लहानपणापासून स्क्रू ड्रायवर व आदी उपकरणाशी खेळत मोठी होत असावीत
.त्यांना असे शारीरिक व मानसिक शक्तीचे प्रदर्शन करणारे खेळ खेळायला खूप आवडते ..
त्या पुस्तकातील आकृत्या व सूचना पाहून पोटात खरच गोळा आला .पण माझा एक तमिळ अभियंता मित्र आहे .तो हि काम लीलया करतो .
अपर्णा अक्षय म्हणतात तसे एकीया चे फर्निचर म्हणजे सामान वापरले कि तुटून हातात येतात .
पण हे सर्व सामान्य लोकांच्या बाबतीत घडते .
आमच्याकडे फर्निचर कसे हाताळावे ? ह्यासाठी एक भली मोठ्ठी आचारसंहिता आहे .तिचे कसोशीने पालन करणे मला माझे आद्य कर्तव्य समजावे लागते .
मी माझ्या एकियाच्या फर्निचरला बायकोच्या भावनेपेक्षा जास्त जपतो .
त्यांचे मेंबर झालो म्हणून जेव्हा तिथे जाऊ तेव्हा माझ्या कार्डवर मला एक कॉफी मोफत मिळते .तिची किंमत काही तास त्या भव्य प्रसादात भटकंती केल्यावर (म्हणजे बायकोच्या पडदे / छोटी रोपटी /ग्लास वेअर आदी गृहपयोगी वस्तूच्या खरेदीत माझा सक्रीय सहभाग असल्याचा साभिनय करून खिसा हलका करून चुकवावी लागते .
'' ह्याला जीवन ऐसे नाव ''
1 Mar 2011 - 7:38 am | स्पंदना
>>अपर्णा अक्षय म्हणतात तसे एकीया चे फर्निचर म्हणजे सामान वापरले कि तुटून हातात येतात .
पण हे सर्व सामान्य लोकांच्या बाबतीत घडते .
आमच्याकडे फर्निचर कसे हाताळावे ? ह्यासाठी एक भली मोठ्ठी आचारसंहिता आहे .तिचे कसोशीने पालन करणे मला माझे आद्य कर्तव्य समजावे लागते >
अहो निपज, घरात दोन पोर आहेत, अन मला माझ्या मुलांनी भरपुर दम्गा केलेला आवडतो. मी फर्निचर पेक्षा मुलाना मोकळेपणा देण्याची आचार संहिता जास्त महत्वाची मानते.
तस पण भारतिय सामान कस? अहो दहा पिढ्यांनी वापरल तरी स्क्रु हलायचा नाही अस. अन इकिया नुसत आमच्या कडे वस्तु आहेत या दिखाव्याच अस मला वाटत. मी दोन साइड टेबल्स आणली होती, दुसर्या दिवशी दोन वर्षीय चिरंजीव त्यावर चढले. संपल! हे राम झाल टेबलाच.
1 Mar 2011 - 8:36 pm | निनाद मुक्काम प...
सहमत
ये फेविकोल का जोड हे
आपले सागवानी फर्निचर म्हणजे एकदम झकास
हि स्वीडीश कंपनी असो किंवा अजून एखादी परदेशी परराष्ट्रीय कंपन्या
ह्या खुपदा गाजावाजा करून आपली वस्तू समोरच्याच्या गळ्यात मारतात .
आमचे कुटुंब बालपणापासून ह्या ब्रांड ची एकनिष्ठ आहेत .व घरचे गृह खाते हे त्यांच्याकडे असल्याने आमचे काहीच चालत नाही.
.
बाकी माझ्या सासूने बहुदा भविष्यातील नातवांसाठी शिस्तीची एखादी पंचवार्षिक योजना आखली असल्याचा दाट संशय आहे .
ह्यांना लहानपणी शिक्षा म्हणजे काही तास एकांतवासात खोलीत बंद करून (केलेल्या कृत्यांचे आत्म परीक्षण करण्यास संधी देणे )
किंवा जरा मोठे झाल्यावर शिक्षा म्हणून घराचे शौचालय व स्नानगृह साफ करणे / व पौगुंदावस्थेत गेल्यावर आर्थिक नाकेबंदी करणे/ पोकेट मनी मध्ये कपात असे उपाय योजले जायचे .
आपल्यासारखे धपाटे /धम्मक लाडू असे प्रकार अजिबात नव्हते .
त्यासाठी सरकारने शाळेत ह्यांना लहानपणी मुलांसाठी असणाऱ्या हेल्प लाईन बद्दल कल्पना दिली होती .
प्रांजळ पणे सांगायचे तर दोन्ही संस्कृतीमधील चांगले ते घेण्याचा प्रयत्न असतो .
पण ज्या गोष्टी खटकतात त्या आम्ही लगेच एकमेकांना सांगतो
.
आम्हाला भारतात पहिल्यांदा भेटायला व सोडवायला जमलेला २५ ते ३० जणांचा कुटुंब कबिला व मित्र परिवार पाहिल्यावर बाईसाहेब म्हणाला
'' हि खरी फेमेली''
आता डिसेंबर मध्ये लग्नाच्या निम्मिताने यायचे मनात आहे .( तिचा उत्साह माझ्या पेक्षा दांडगा आहे )
सायनच्या गुरु कृपाचे ५ पंजाबी सामोसे एका दमात खाणारी म्हणून त्यांच्या ही ती लक्षात आहे ..
1 Mar 2011 - 3:10 am | पक्या
छान लेख ..आवडला.
जर्मन आख्यान छान चालू आहे. येऊ द्यात अजून लेख.
1 Mar 2011 - 5:25 am | अभिज्ञ
जर्मन आख्यान आवडले.
लिहीत रहा.
अभिज्ञ.
2 Mar 2011 - 12:04 am | चिंतामणी
लिहीत रहा.
पण....
(तुला सांगायची गरज नाही)
2 Mar 2011 - 4:37 am | निनाद मुक्काम प...
नाही काका तुमचे बरोबर आहे .
तुम्ही हे आधीच सांगून झाले आहे .
2 Mar 2011 - 8:48 am | विलासराव
वाचतोय.
2 Mar 2011 - 10:21 am | मस्त कलंदर
मिपावर शुद्धलेखनाला फाट्यावर मारतात, पण म्हणून तुम्ही व्याकरणाची का वाट लावत आहात? आणि वाक्यात मध्येच येणारे न्यू लाईन फीड्स अर्थाचा अनर्थ करतात. किंवा वाचताना त्रास देतात.
मिपावर बरेच जण लिहितात. सगळेचजण काही शुद्ध, व्यवस्थित लिहू शकतातच असं नाही, पण त्यांची लेखनात सफाई आणण्याची किमान तयारी असते.(याला आमची चुचु अपवाद हो ;-) ). पण तुमचे एकंदर लेख आणि प्रतिसाद वाचल्यावर तुम्हाला स्वत:ला बदलण्याची इच्छा आहे असं दिसत नाहीय.
एक साधी सरळ गोष्ट आहे: इतर सर्वसाधारण (व्यवस्थितपणे लिहिलेले) लेख वाचताना तुम्हाला डोळ्यांना आणि मेंदूला त्रास होत नसेल, तर तुम्ही अव्यवस्थित(पक्षी: किमान योग्य ठिकाणी विरामचिन्हे, थोडंफार जमेल तसं व्याकरण, जमलंच तर शुद्धलेखन इ.इ. नसलेलं) लेखन त्यांच्या माथी मारून त्यांना असा त्रास द्यावा का?
अर्थात तुम्हाला पटवून घ्यायचंच नसेल तर गोष्ट वेगळी. मग आम्हीही ज्याची त्याची जाण........ म्हणून सोडून देऊ.
आता तुमच्या लेखाबद्दलः एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगता सांगता दुसरं काही मधे आलं की लेख भरकटून त्या नवीन विषयावर जातो, आणि मग पुन्हा परत फिरून येतो. हे भरकटणं आणि परत येणं या लेखातच नाही, तर एकंदरीत लेखमालेतच पुष्कळ जाणवतं. लेख लिहिल्यावर लगेच प्रकाशित न करता एकदा वाचून पहा, थोडीफार सुसंगती लावता आली तर पहा, आणि मगच प्रकाशित करा. तुमच्या आख्यानाचे नऊ भाग आले म्हणजे आतापर्यंत हे आपसूक व्हायला हवं होतं, पण.... असो.
2 Mar 2011 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
आदरणिय मस्त कलन्दर,
सदर लेखन हे .पौगुंदावस्थेतील वाचकांसाठी नाही. आपण ते वाचुन आपल्याला त्रास झाला .असल्यास, ती आपलीच चूक आहे. तरी पुन्हा. अशा पौगुंदावस्थेतील प्रतिक्रीया देऊ नयेत. आंब्याच्या पेट्यांचे कपाट करुन. वापरणार्या तुम्हा सामान्य लोकांनी कधी एकिया. फर्निचरचे नाव तरी ह्याआधी. ऐकले होते का?
आजकाल राजकीय सभेत टाळ्या वाजवणारी/ भाड्याची. माणसे व अंकांचा पाऊस पाडणाऱ्या भाड्याच्या. प्रतिक्रिया बक्कळ झाल्या आहेत. त्यापैकीच तुमची. एक प्रतिक्रीया आहे. तो तुमचा हक्काचा ब्रांडच बनला आहे. आता तुमचे कंपुबाज. भारतिय मुर्ख मित्र. येतीलच +१ +१ करायला.
मिपाला. तुमच्या सारख्या पौगुंदावस्थेतील सदस्यांची. नाही तर अश्या कर्तुत्ववान लोकांची .खरी गरज आहे .
असो...
2 Mar 2011 - 2:08 pm | बिपिन कार्यकर्ते
-१ + १ = ०
2 Mar 2011 - 5:25 pm | मृगनयनी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
परा... आवरा...! __/\__
एकीकडे काश्मीराची आग शान्त झाली म्हणून ओरडायचं आणि दुसरीकडे मिपावरच्या स्त्री सदस्यांना असं पेटवायचं! ;) ;) तुमचं दुटप्पी धोरण आम्ही पुरते ओळखून आहोत बरं! ;) ;) ;)
2 Mar 2011 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार
नैने अग तुझ्या जिभेला नाही पण बोटाला तरी हाड आहे का नाही ?
2 Mar 2011 - 5:59 pm | मस्त कलंदर
अरे प्रत्येक धाग्यावर हातभर लांबलचक प्रतिक्रिया, त्यात एका वाक्याचा तिसर्या वाक्याशी संबंध नाही, अनावश्यक न्यू लाईन्स आणि वर माझाच बैल दूध देतो असा आव!!! म्हणून वाचनमात्र असलेतरी सांगावंच लागलं...
असो, बिकांच्या तेंडूलकरांच्या धाग्यावरच्या प्रतिक्रियेसारख्या 'प्रगल्भ' प्रतिक्रिया कशा लिहायच्या याचे क्लासेस चालू कर रे तूच मग!!!!
बाकी, हे पाप नक्की कुणाचं आहे याची आतल्या गोटातली खबर आहे बरं आम्हाला!!!
6 Mar 2011 - 3:55 am | पंगा
हे भारी आवडले. :)
7 Mar 2011 - 5:37 pm | आजानुकर्ण
माझाच बैल दूध देतो याचा एक पाठभेद माझाच बैल गूळ देतो असाही आहे.
2 Mar 2011 - 6:10 pm | वाहीदा
नैनी,
काय सिक्सर मारलायस !!
हसून हसून मरतायत आता लोकं!
काश्मीराची आग की कश्मिर ची आग ?? ;-)
(काळे काकांच्या काश्मिर ची आग आता कश्मीराची आग झाली ) =))
2 Mar 2011 - 6:50 pm | पैसा
.--. .- ... .... .- ...- .. -..-. .--. .-. .- - .. ... .- -..
2 Mar 2011 - 7:46 pm | निनाद मुक्काम प...
सहज
तुमचे मुद्दे सडेतोड आहेत .
निव्वळ एका मोहीमेचा भाग म्हणून म्हणून तुम्ही तुमची प्रतिक्रीया खरडली नाही .ह्या विषयी खात्री आहे .
चिंतामणी ह्यांनी जे मला सांकेतिक भाषेत सुनावले .ते तुम्ही परखड पणे सुनावले .
व्याकरणाचा खून वाचकांचा रसभंग करतात .(आधीच आमचे लेखन भिकार ) त्यात दुष्काळात तेरावा महीना.
ह्यावर '' विचार करेन'' असे आश्वासन मी बिका ह्यांना देऊन मोडले .(जुनी सवय येवढ्या लवकर सुटत नाही .)
त्यामुळे तुम्हाला वचन देणे निरर्थक आहे
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
अवांतर ( माझ्या लेखन शैलीत पहातो काय करता येते का ? तुमच्या मुद्द्यात दम आहे .)
बाकी तुमची स्वाक्षरी आमच्या बाबतीत थोडी वेगळी आहे .
नीट आवरलेले घर हे आमच्या बाबतीत ............ .
2 Mar 2011 - 8:33 pm | मस्त कलंदर
मोहिमेचा भाग नाही, पण चार लोक बोलतात तेव्हा त्यात तथ्यही असू शकतं हे ध्यानी घ्यावं.
नमुनाच हवा असेल तर विलासरावांचे धागे पहा. पहिला भाग फक्त फोटोंचा होता, आणि कालांतराने त्यात हळूहळू लेखनगाभा वाढत गेला. प्रत्येक लेखामागे त्यांच्या लेखनातला फरक दिसतो, अधिक सुसूत्रता जाणवते. त्यांचे हे पहिलंच लेखन असावं, आणि तुम्ही तसे मुक्तपीठमधे लिहायचात म्हणे आधी. तेव्हा अशक्य काहीच नाही.
विलासरावांच्या आणि तुमच्या लेखांमधलं आणखी एक साम्यः दोघांच्याही लेखात तुमचे स्वतःचेच फोटो जास्त असतात. फरक इतकाच, की विलासरावांच्या एकंदर विषय सादरीकरणामुळे त्यांना त्यांच्या फोटोजवरून कुणी छेडलेलं मी तरी पाहिलं नाही. तुमच्याबाबतीत काय होतं हे मी सांगायला नको.
असो. बदलावंच असा आग्रह नाही. फक्त एक निरिक्षण नोंदवलं इतकंच.
6 Mar 2011 - 3:29 am | निनाद मुक्काम प...
तुमचे लिखाण हे मिपावर आल्यापासून १ नंबरी होते तर तसे जाहीर रित्या सांगायचे की माझा आदर्श ठेव ,.
उगाच विलास राव ह्यांच्या सारख्या एका भल्या मिपाकाराचे नाव कशाला मध्ये आणले?
त्यात त्यांचे लिखाण टुकार ते अनुक्रमे चढत्या आलेखाने चांगले झाले हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला आपल्याला ?
आपण मिपावरील अधिकृत समीक्षक आहात का आपण ?
पाणिनी आपले कोणी लागतात का ?
माझ्या आख्यानात ९ भागात व इतर लेखात आपण दर्शन दिले नाहीं आणी आता धूम केतू सारखे अचानक येथे आगमन ..........?
@ मोहिमेचा भाग नाही, पण चार लोक बोलतात तेव्हा त्यात तथ्यही असू शकतं हे ध्यानी घ्यावं.
आपला कंपूबाजी ह्या विषयावर मत काय ?
( सदर मत सर्व मिपाकर वाचणार आहेत .)
मी तशी व्यवस्था करेन .
6 Mar 2011 - 8:59 am | मस्त कलंदर
>>>तुमचे लिखाण हे मिपावर आल्यापासून १ नंबरी होते तर तसे जाहीर रित्या सांगायचे की माझा आदर्श ठेव ,.
माझे लेख्न आणि आदर्श? इश्श!!!!
>>>त्यात त्यांचे लिखाण टुकार ते अनुक्रमे चढत्या आलेखाने चांगले झाले हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला आपल्याला ?
विलासराव यांच्या लेखनाला कुठेही टुकार म्हटलं नाहीय. पहिल्या लेखात अगदीच काही वाक्यं आणि पुष्कळ फोटोज होते. नंतर ते लिहू लागले, आणि प्रत्येक लेखासोबत त्यांच्या लेखनातली सुसूत्रता आणि सफाई वाढत गेली असं मी म्हटलंय.
खरमरीत सूचना: नसते शब्द माझ्या प्रतिसादात घुसडवू नका!!!
>>आपण मिपावरील अधिकृत समीक्षक आहात का आपण ?
मिपावरचा प्रत्येक सदस्य समीक्षक आहे. त्यांनी केलेले कौतुक चालते तर टीका/टिप्पण्या केल्या तर इतक्या मिरच्या का झोंबताहेत तुम्हाला?
>>पाणिनी आपले कोणी लागतात का ?
तो माझा विद्यार्थी होता. काय म्हणणं आहे?
>>माझ्या आख्यानात ९ भागात व इतर लेखात आपण दर्शन दिले नाहीं आणी आता धूम केतू सारखे अचानक येथे आगमन
माझे प्रतिसाद वाचा. मी वाचनमात्र आहे, आणि अतिच झाल्यानं तुम्हाला लिहिलं असं आधीच म्हणून झालंय. तुम्हाला किमान इतरांनी लिहिलेल्या( वाक्याच्या आधी पूर्णविराम नसलेल्या व शुद्धलेखनाचे नियम पाळून लिहिलेल्या, तसेच अनावश्यक ठिकाणी वाक्य तोडून न्यू लाईन फीड्स नसलेल्या ) मराठी वाक्यांचे अर्थ कळत असावेत असा माझा समज आहे. खोटा असल्यास कळवणे, इथून पुढे तसदी घेतली जाणार नाही.
>>>आपला कंपूबाजी ह्या विषयावर मत काय ?
कंपूबाजी आहे, असावी आणि राहील. कुणीच आपल्याला कुणी सामावून घेत नाही, म्हणून एखाद्याचा एकट्याचा कंपू असू शकतो, कुणाचा अधिक जणांचा. आम्ही तारतम्याने सभ्य भाषेत तुम्हाला लिहित आहोत, याला कंपूबाजी म्हणत नाहीत. ज्या लोकांशी मी कधी बोललेही नाही, तेही लोक तुम्हाला हेच सांगत आहेत. याचा अर्थ मिपावरच्या एकापेक्षा अनेक कंपूंना तुमची लेखनशैली आकलनीय व्हावी असं वाटतंय.
आणि प्यारे१ ने जे सांगितलंय तेचः 'तुम्ही कोण टिकोजी लागून गेलात तुमच्या विरूद्ध आम्ही मोहिमा चालवू?'. आधी एक-एक वाक्य नीट लिहायला आणि परिच्छेद बनवायला शिका.
(कंपूबाज) मस्त कलंदर
ता.क.:-@ सहजमामा तुम्ही माझे डयुआयडी आहात हे मला तिसर्याच भलत्या माणसाकडून कळावं, याचा मला आत्यंतिक खेद झाला आहे.
6 Mar 2011 - 3:50 am | पंगा
आदरणीय मस्त कलन्दर,
'सहज' ही आपली ड्युप्लिकेट आयडी असण्याची कधी कुणकूण लागू न दिल्याबद्दल निषेध!
6 Mar 2011 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रातःदवणीय मस्त कलन्दर,
तुमचा/चे डु.आयडी असल्याचं मला न सांगितल्याबद्दल तुमचा पंगा या आयडीने केला आहे त्याच्या ३.१४ पट जास्त निषेध.
4 Mar 2011 - 9:31 am | Nile
आर्र्र हे आधी पाहिलं असतं तर तिथे प्रतिसाद टंकन्यात वेळ फुकट घातला नसता. असो. बाकी ते एकिया नसुन आयकीया आहे काय? अर्र्र्र्र.. असो असो.
चु(चुक मधला)तिया.
4 Mar 2011 - 9:36 pm | निनाद मुक्काम प...
निळू भाऊ
रादिया बाई (मालकीण बाईने जाताना आपल्या गड्याला सांगून ठेवले आहे .
'' माझ्या गैरहजेरीत शुध्लेखनाची मोहीम नीट पणे चालू राहिली पाहिजे .''
अवांतर -- आता आपली मस्तानी चा प्याला नक्की समजा .
6 Mar 2011 - 12:05 pm | Nile
ये मस्तानीच्या, च्यायला लेखाचं जाउदे पण प्रतिसाद तरी नीट दे की. बसवला टेंपोत, प्रतिसाद कळला नाही तर उत्तर काय देणार कप्पाळ?
-मुक्काम पोस्ट टेंपो
6 Mar 2011 - 7:36 am | पंगा
निर्वासिताच्या पासपोर्टावर (बहुधा आश्रयदाता देश वगळता इतरत्र) कोणत्याही देशास भेट देणे असल्यास व्हिसा मिळवणे हे काय दिव्य असते, याची कल्पना बहुधा असावीच आपल्यास.
नसल्यास कृपया जमले तर एखाद्या निर्वासितास गाठून चौकशी करून पाहावी. उद्बोधक अनुभव यावा असा अंदाज आहे. (चूभूद्याघ्या.)
6 Mar 2011 - 10:28 pm | निनाद मुक्काम प...
अहो माहीत नाही तर कशाला अक्कल पाजळत आहात ,
आमच्या हॉटेलात निर्वासित लोक (किमान ५० तरी काम करतात .)
ह्यात पाकिस्तानी / अफगाण (हिंदी येते थोडे ) व तमिळ ( इंग्लिश व थोडे हिंदी )
ह्या लोकांशी जेव्हा हॉटेलातील लोकांना संवाद साधायचा असेल तेव्हा कितीतरी वेळा मी दुभाषा म्हणून त्यांच्या ( दोघांच्या मदतीला असतो )
कमी पैशात जास्त काम करणारे तेह्ही बिनतक्रार म्हणून त्यांना महत्व असते आमच्या धंद्यात (कॉस्त कटिंग )
त्यामुळे ते कुठे कसे सहज फिरतात हे मला माहीत आहे .(त्यावर एक एक लेख लिहीन तेव्हा सगळा खुलासा करेन )