http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
http://www.misalpav.com/node/16534 भाग ७
http://www.misalpav.com/node/16661 भाग ८
http://www.misalpav.com/node/17013 भाग ९
http://www.misalpav.com/node/19426 भाग १०
सध्या वास्तव्य म्युनिक शहरात आहे .येथे नुकताच जगप्रसिध्ध ऑक्टोबर फेस्टिवल साजरा करण्यात आला.
आम्ही हॉटेल व टुरिझम च्या व्यवसायात असल्याने भारतात शिकत असल्यापासून ह्या सोहळ्याविषयी खूप काही वाचून होतो.
जर्मनी आणी युरोप मध्ये म्युनिक म्हटले की ऑक्टोबर फेस्ट असे समीकरण आहे.
ह्या शहराविषयी माहिती मी देईनच .पण फेस्ट मधील मदहोश करणाऱ्या अनुभवावर आधारीत
.
माझा ऑक्टोबर फेस्टिवल ( बियर फेस्टिवल ) वर लेख इ सकाळ मध्ये आला आहे.
तोच येथे भाग ११ मधे अडकवत आहे.भूतलावरील सगळ्यात मोठा मानवी सोहळा असे ह्याचे वर्णन केले जाते.मदिरा आणी मदिराक्षी साठी हा फेस्ट प्रसिद्ध आहे.
जर्मनी मध्ये जर दीर्घकाळ वास्त्यव्यासाठी ( १ एका वर्षाहून जास्त ) जर येणे झाले .की येथे सरकारचा इंटिग्रेशन कोर्स करावा लागतो. ह्या कोर्स मध्ये बे१ म्हणजे ४ त्या लेवल पर्यत जर्मन भाषा आणी जर्मनीच्या आर्थिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,व युरोपियन युनियन बद्दल माहिती शिकवली जाते.त्यावर सरकारतर्फे परीक्षा घेऊन त्यात उतीर्ण झालेल्या लोकांनाच येथे विसा वाढवून दिला जातो. आमच्या देशात राहणार असाल तर आमची भाषा व संस्कृती जाणून घेतलीच पाहिजे असा पवित्रा येथील सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला. युरोपियन युनियन ची स्थापना झाली तेव्हापासून युरोपातील अग्रगण्य अर्थव्यवस्था असलेल्या जर्मन देशात नागरिकांना सर्वाधिक सोशल बेनिफिट दिले जातात .( ते देण्यासाठी प्रचंड प्रमाणात कर देखील आकारतात .) ह्यासाठी युनियन मध्ये नुकतेच सामील झालेले पूर्व युरोपातील विकसनशील देश तर आता त्यांच्या रांगेत स्वतःचे अवमूल्यन झालेले ग्रीस, पोर्तुगाल, इटली ह्या देशातील लोंढे जर्मनीत येत आहेत. ह्या मुळे जर्मनी मधील त्यांच्या सांस्कृतिक व सामाजिक
अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता .त्यांच्या ह्या समस्येत तुर्कस्थान ने मोलाची कामगिरी बजावली आहे.
१हिल्या व दुसर्या महायुद्धात सहकार्य केल्याबद्दल ह्या देशातील लोकांना दुसर्या महायुद्धानंतर
जर्मनी मध्ये विसा सुलभ रीत्या देण्यात आले . ( ह्या मागील खरे कारण देशच्या पुनर्विकासासाठी त्यांना स्वस्त व कष्टाळू मजूर हवे होते .इंग्लंड ने आफ्रिकेतील आपल्या वसाहती मधून उदा केनिया
भारतीय व आफ्रिकन लोक ह्याचं कारणांसाठी इंग्लंड मध्ये आणली .आजही आफ्रिकेतील काही देशातून भारतीय वंशाची व्यक्ती ( जिचे पूर्वज इंग्रजाकडून येथे आणले गेले ) ते इंग्लंड मध्ये कधीही येऊन स्थायिक होऊ शकतात. .त्यांना पासपोर्ट मिळू शक्ती हा कायदा आहे .मात्र श्रीलंकेत नेलेल्या तमिळ लोकांसाठी ही सवलत नाही ( हाच इंग्रजांचा उरफाटा कारभार )
तुर्की लोकांची तिसरी पिढी येथे नांदत आहे. पण राष्ट्राच्या मुख्य विचारधारेपासून त्यांनी स्वतःला जाणीवपुर्वक अलिप्त ठेवले आहे. येथे जन्मलेले अनेक तुर्की हे जर्मन पासपोर्ट धारक असतात .पण त्यांचे पाल्य त्यांना बालवयात तुर्कस्थानात आपल्या नातेवाईकात रहायला पाठवतात .( कमाल पाशाचा आधुनिक तुर्कस्थान कधीच इतिहास जमा झाला आहे. आता त्या जागी कट्टर धर्मांध पिढी निर्माण होत आहे .ह्याच कारणासाठी तुर्कीचे युरोपियन युनियन मध्ये पदार्पण खोळंबले आहे .) ही मुल तरुण झाली की लग्न करून जर्मनी मध्ये परत येतात .आल्यावर जर्मन भाषेचा शिक्षणाचा गंध नसला तरीही छोटी मोठी कायदेशीर व बेकायदेशीर अनेक काम करून आपल उदरनिर्वाह करतात. ह्यांचे सर्वात महत्वाचे काम प्रजोत्पादन असते., किंमान ३ ते ५ मुले हवीत ह्या कडे त्यांचा कटाक्ष असतो .( जर्मनी मध्ये दर महिन्यात पालकांना प्रत्येक मुलामागे २०० ते साडे तीनशे युरो संगोपनासाठी दिले जातात .) माझ्या परिचयातील एक तुर्की कुटुंब महिन्याला १००० युरो सरकार कडू घेते. येथे बेरोजगार भत्ता हे फारच रंजक प्रकरण आहे
.माझ्या परिचयातील एक जर्मन कुटुंब उच्च मध्यमवर्गीय मंदीच्या लाटेत बेरोजगार झाले. त्यांना सरकार कडून बेकार भत्ता त्यांच्या मूळ पगाराच्या ७० % वर्षभर मिळाला .त्यांच्या मुलांच्या खर्चाची बिले सरकारला दाखवून पैसे मिळू लागले. अनेक प्रकारची सवलतींची खिरापत त्यांना मिळाली. उदा जर्मनी मधील प्रवासात सवलत ....
ह्यामुळे किमान १ वर्ष तरी त्यांनी नोकरी शोधण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत .त्यांना दर महिन्याला सरकारला दाखवावे लागते की आम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहोत ह्यासाठी सरकार तर्फ्रे त्यांना नोकरीसाठी अनेक कार्यालयात पाठवले जाते. पण एखाद्या नोकरीत च्या मुलाखतीत रिजेक्ट कसे व्हायचे ( उदा लायकीपेक्षा जास्त वेतन मागणे ...) हे त्यांना अनुभवातून कळून आले .त्या जर्मन जोडप्यातील एका ने नामी शक्कल लढवली .सध्या आपण मंदीमुळे डिप्रेशन चे बळी झालो आहोत व आपल्यावर उपचार चालू आहेत .असे तो मुलाखतीच्या सुरवातीला सांगून मोकळा होतो.( वैद्यकीय सेवेचा खर्च विमा कंपनी देणार असल्याने व सध्या बेरोजगार असल्याने त्यांच्या हफ्त्याचा भार सरकार आपल्या खांद्यावर घेत असल्याने त्याने स्वतःची ट्रीटमेंट चालू केली .) त्यामुळे त्याला नोकरीत लगेच रिजेक्ट करतात व हि खुशखबर तो लगेच भ्रमण ध्वनी वर आपल्या पत्नीस देतो .अर्थात अशी कुटुंब जर्मनीत फारच कमी आहेत. पण नोकरी गेल्यावर दुसरी शोधण्यासाठी जीवापाड धडपड येथील नागरिक करत नाहीत हे देखील सत्य आहे. ह्याच साठी इटालियन व इतर प्रगत युरोप राष्ट्रातील कर्जबाजारी देशातील जनता त्यांच्या देशात कर्जामुळे हे सोशल बेनिफिट कमी केल्याबद्दल स्वतःच्या देशात आंदोलने करत आहेत
.( ह्याच मुळे युके मध्ये काही महिन्यापूर्वी दंगल उसळली, भले तत्कालीन कारण छोटेसे होते .) त्या जनतेपुढे सोपा उपाय जो बिहारी व युपी वाल्यापुढे असतो तोच आहे.
'' जर आपले राज्य ,सरकार आर्थिक विकास करत नसेन, आपल्याला रोजी रोटी देत नसेन तर युरोपियन युनियन च्या कायद्यानुसार ही लोक युनियन मधील २७ देशात कुठही बिना विसा जाऊन वास्तव्य करू शकतात'' .आता जर्मन सरकार पुढे पेच निर्माण झाला ह्या वाढीव लोंढे व त्यांचा खर्च ह्यांचे काय करावे .( अश्यावेळी भारत चीन व अमेरिका येथून येणारे उच्च शिक्षित मजूर जे महिन्याला १००० ते २००० युरो, कर म्हणून सरकारला देतात .मात्र पासपोर्ट धारक नसल्याने ह्या सोशल बेनिफिट पासून वंचित राहतात .त्यांचा प्रमुख आधार आहे.) विज्ञानात जगात अव्वल असणारे जर्मन राष्ट्राला आशियातील जपान व इतर राष्ट्राकडून संशोधन व इतर क्षेत्रात स्पर्धा करावी लागत आहे .ह्या क्षेत्रात अव्वल राहण्यासाठी जर्मन सरकारने अमेरिकेचे एच १ विसा धोरण व शिष्यवृत्ती च्या धाच्यावर आधारीत धोरण राबवले आहे.
तिसर्या जगातील हुशार व अनुभवी अभियंते ,वैद्यकीय पेशातील लोक, व पी एच डी साठी विसा नियम शिथिल केले असून प्रचंड सवलतींचा वर्षाव केला आहे. भारतातून अनेक तरुण ह्या व अनेक क्षेत्रात जर्मनीत सध्या येत आहेत .त्यापाठोपाठ लाल माकडे सुद्धा येत आहेत .आयटी क्षेत्र म्हणजे येथे भारतीयांची मक्तेदारी आहे .मला अनेक जर्मन, मी भारतीय आहे हे कळल्यावर आयटीत आहात का ? असा प्रश्न विचारतात.
.आपल्या लोकांचे ह्या शेत्रातील प्रभुत्व नक्कीच सुखावणारे आहे .आपल्या अनेक भारतीय आयटी कंपन्या येथे कार्यरत आहेत .पूर्व अविकसित जर्मनीत आयटी संस्कृती रुजवण्यात आपल्या देशी कंपन्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील जर्मन भाषा शिकवणारे अग्रगण्य संस्था गुटे अर्थात मैक्स मूलर भवन मध्ये मी जर्मन भाषेची मुळाक्षरे गिरवत होतो तेव्हा अभियांत्रिकी, शिक्षण नुकतेच संपवलेले किंवा शिकत असलेले किंवा सध्या नोकरी करत असलेली मूले येथे भाषा शिकत होते. एका वर्षाच्या आत ते जर्मनीत दाखल झाले .
आज गुटे मध्ये मुंबईत ( काळा घोडा ) येथे जर्मन भाषा शिकतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली .की येथील ८० % शिक्षक ,विद्यार्थी महाराष्ट्रीयन होते .
खुद्द जर्मन सरकार अनुदान देत असल्याने ह्या संस्थेत एक लेवल फक्त १२००० हजारात करता येते. उर्वरीत जगात दीड ते दोन लाख मोजावे लागतात . येथील संधींचा भारतीयांनी व माझ्या मराठी बांधवांनी फायदा करून घ्यावा जर्मनीत मराठी टक्का वाढवा असे मनापासून वाटते .म्हणून हा लेखणी प्रपंच .
ऑक्टोबर फेस्ट च्या लेखाची लिंक
.
प्रतिक्रिया
21 Oct 2011 - 3:54 pm | निनाद मुक्काम प...
आमच्या जर्मन शिकण्याच्या क्लास मधून आम्ही काही मित्र मैत्रिणी दुपारच्या वेळी फेस्ट ला गेलो होतो
21 Oct 2011 - 3:57 pm | निनाद मुक्काम प...
पारंपारिक बवेरीयान वेशभूषेत
21 Oct 2011 - 4:03 pm | निनाद मुक्काम प...
बियर टेन्ट
तंबूच्या आतील दृश्य
21 Oct 2011 - 4:21 pm | lakhu risbud
जर्मनी या राष्ट्राचे तांत्रिक दृष्ट्या सरस असण्याचे कारण तेथील शिक्षणव्यवस्थेत आहे.मागे एका लेखात वाचले होते की तेथे तीन स्तरावरच्या शाळा असतात,मुलाची प्रतिभा ज्या विषयात जास्त,त्याला रुची ज्या विषयात जास्त त्या नुसार मुलाला योग्य त्या शाळेत दाखल केले जाते.त्यामुळेच एकाच घरातील भावंडे किवा मित्रान पैकी एक मेंदूशल्य चिकीत्सक (न्युरोसर्जन) आणि दुसरा नळजोडणी (प्लंबर) करणारा असू शकतो.आणि तो नळ जोडणी करणारा सुद्धा अभिमानाने,कोणताहि न्यूनगंड न बाळगता समाजात वावरू शकतो.तेथे श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते पण व्यवसायावरून उच्च-नीच असा भेदभाव तिथे केला जात नाही.
निनादराव जर्मनी मधील शिक्षणव्यवस्थे बाबत अधिक माहिती येउद्या कि जरा .
21 Oct 2011 - 4:27 pm | निनाद मुक्काम प...
जरूर ( फार चांगला मुद्दा मांडला )
आख्यानाच्या पुढील काही भागात ह्या विषयांवर नक्कीच लिहितो.
ह्यासाठी आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शन घेणे क्रमप्राप्त आहे.
21 Oct 2011 - 4:34 pm | lakhu risbud
फोटू आत्ता बघितले,झ्याक आलेत, खालून दुर्सरा फोटू पघितल्यावर तर तोंडाला पानीसुटल की राव !
बाकी तुमचे ते म्हराटी मान्सा टक्का वाढाया पायजे ह्ये बाकी आमी मनावर घेतलं बरका,फुडल्या वर्षीच आमी तिकडं येतो पघा.
21 Oct 2011 - 4:43 pm | निनाद मुक्काम प...
किमान ८००० लोकांचा चा जमाव होता .
शेवटच्या ४ तासात नुसता कल्ला केला लोकांनी
''लंगुर के हात मे अंगूर '' अशी परिस्थिती झाली होती .( वारुणी देवी मस्तकी आरूढ झाली की मग '' आता कशाला उद्याची बात '' असा विचार लोकांच्या साहजिकच आहे .)
मंदीच्या सावटाखाली सरते वर्ष घालवायचे आहे तेव्हा ''ये लम्हा तो जी लेने दो'' हा व्यवहारी विचार बहुदा सर्वांच्याच डोक्यात होता .
21 Oct 2011 - 6:07 pm | निनाद मुक्काम प...
शीर्षकात योग्य तो बदल करण्यात मदत करण्यासाठी संपादकांचे आभार मानतो.
21 Oct 2011 - 7:25 pm | पिंगू
निनादराव जर्मनीबद्दल "Germans are best designer in the world after god" एक म्हण माहित आहे. तेव्हा त्या अनुषंगाने अधिक माहिती आल्यास खूपच बरे वाटेल. बाकी हा लेख पण सरस वाटला, हे नमूद करु इच्छीतो..
- पिंगू
21 Oct 2011 - 7:33 pm | निनाद मुक्काम प...
पिंगू
ह्या संधर्भात जरूर लिखाण करेन .
त्यांना त्यांच्या डिझाईन व मशीन ह्याबद्दल प्रचंड प्रेम.
जर जर्मन माणसाकडे श्वान नसेल तर एक घरातील एक तरी मशीन असते त्याला ते सख्या मुलासारखे जपतात.
निसर्ग निर्मित बावनखणी डिझाईन व नव्या कोऱ्या गाडीचे डिझाईन जर रस्त्यावर एकाच वेळी दिसले तर हे निसर्गाच्या कलाकृती पेक्षा मानवनिर्मित कलाकृतीकडे आकर्षित होतात.
22 Oct 2011 - 5:44 am | ५० फक्त
पिंगु,
"Germans are best designer in the world after god - तुझं ऑफिस भांडारकर रोड्ला आहे ना, एकदा स्कोडाच्या शोरुम मध्ये जाउन या मग लंच टाईम मध्ये, किंवा टा-याला विचार, जर्मन इंजिनियरिंग म्हणजे काय असतं ते.
अवांतर - कधी शक्य झालंच तर एकदा मी प्रो. संजय ( हे मिपावर नाहित) बरोबर त्यांच्या ऑक्टाव्हिया १.८ डि ची ट्रिप अॅरेंज करतो, मुंबई पुणे इवेवर मधला एक पॅच कार मधुन, (एस्युव्हि नाहि), १८० + ने जाण्याचा आनंद आणि थरार जो अनुभवता येतो तो फक्त या '"Germans are best designer in the world after god' मु़ळेच.
21 Oct 2011 - 7:37 pm | रेवती
काही शब्द वगळता हा भागही माहितीपूर्ण झालाय.
बियरफेस्टच्या कोणत्याही लेखातला आवडता फोटो म्हणजे तंबूच्या आतील हजारोंचा जमाव!
आमच्या गावात मागल्या महिन्यात इथल्या (बहुधा) जर्मन वंशाच्या लोकांनी अगदी छोट्या प्रमाणावर ऑक्टो. फेस्ट केला होता. बवेरियन वेषभूषा आवडली.
मी मॅक्समुल्लर भवनला पहिली यत्ता पास करून नंतर दोन यत्ता हिरवी झाल्यावर केल्या. चौथी लेवल काही जमणार नाही बुवा! जर्मन भाषा ही कधी गणितासारखी तर कधी संस्कृतचे (भाषेचे) नियम पाळणारी वाटली. तिसर्या यत्तेचा अभ्यास करताना मात्र 'आता बास बुवा.' अशी परिस्थिती झाली होती.
21 Oct 2011 - 8:50 pm | निनाद मुक्काम प...
@कधी संस्कृतचे (भाषेचे) नियम पाळणारी वाटली.
अगदी बरोबर म्हणुनच त्यांची भाषा भारतीय जगाच्या तुलनेत लवकर आत्मसात करतात.
21 Oct 2011 - 8:51 pm | निनाद मुक्काम प...
@कधी संस्कृतचे (भाषेचे) नियम पाळणारी वाटली.
अगदी बरोबर म्हणुनच त्यांची भाषा भारतीय जगाच्या तुलनेत लवकर आत्मसात करतात.
22 Oct 2011 - 3:23 am | पक्या
लेख माहितीपूर्ण आहे. चांगला लिहिला आहे.
एक सुधारणा - पाल्य (म्हणजे मूल) शब्दाएवजी पालक शब्द हवा आहे. पाल्यामुळे अर्थाचा अनर्थ होतोय.
फोटोज छान आले आहेत.
22 Oct 2011 - 6:02 pm | रेवती
धन्यवाद!
सुधारणा केली आहे.
22 Oct 2011 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा....! माहितीपूर्ण लेख. तंबुच्या आतील दृष्य लैच भारी. :)
-दिलीप बिरुटे
23 Oct 2011 - 4:52 pm | जाई.
माहितीपूर्ण लेखमाला
23 Oct 2011 - 5:08 pm | प्रकाश घाटपांडे
बियर टेंट मदी कंच्या कंच्या बियर भेटत्यात? यवडी बियर पेल्यावं यवड्या मान्सांना थित लघु/गुरुशंकानिरसनाची सोय कशी अस्तिया?
23 Oct 2011 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> यवड्या मान्सांना थित लघु/गुरुशंकानिरसनाची सोय कशी अस्तिया?
हॅहॅहॅहॅ निनाद उत्तर देईनच पण मला वाट्टं आजूक एक टेंट उभा करुन आडुसा केला आसन.
तंबूत बसून बियर प्यायची सोडून पुढं कसं व्हईन असा इचार सुचतोच कसा तुम्हाला. :)
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 12:29 am | निनाद मुक्काम प...
शौशालये येथे प्रत्येक तंबूत होती आणी तंबूच्या दोन्ही म्हणजे प्रवेशद्वारापाशी व शेवटी अशी किमान दोन तरी होती. तंबूत शिरायला आणी जायला चारी बाजूने भव्य प्रवेशद्वारे होती.
तंबूत बियर फक्त म्युनिक ब्रेवरीज ची असायची. पण एका तंबूत एकाच ब्रेवरीज ची बियर असायची.
गाणी थांबली की गर्दीचा मोठा घोळका शौशालयात जायचा तेव्हा मुंबईच्या लोकल डब्यापेक्षा जास्त गर्दी तीही सोमरसाचे प्राशनाने मदमस्त झालेल्यांची असायची .
त्यामुळे काही जण ह्या गर्दीत चिमटे काढणे धक्के मारणे ,उगाच गळ्यात पडणे किंवा मधेच कोणालातरी थांबवून लगट करणे हे प्रकार करत होते.. ( येथे सरळ हिशोभ असायचा ''गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाही तर मोडून खाल्ली .)
पण जर मुलीने किंवा महिलेने विशेष रस दाखवला नाही तर त्यांच्या पाठी वेळ कोणीच घालवत नव्हते.
नव्या जोशात परत गळाला कोणी लागतंय का ह्याच्या प्रयत्नात तरुण असायचे. ( येथे अजून एक नमूद करायचे म्हणजे हे करण्यात इटालियन ,रशियन अग्रेसर होते.) अनेक बायरिश लोकांनी सांगितले होते आम्ही शनिवार रविवारची संध्याकाळी चुकूनही जात नाही हे दिवस रशियन ,इटालियन लोकांसाठी राखीव असतात.
स्थानिक लोक सहसा ग्रुप मध्ये आले होते. व सगळ्यात महत्वाचे अनेक मुली स्पेन ,रशिया ,दक्षिण ,उत्तर अमेरिकन येथून होत्या व त्या सिंगल यायच्या. कितीतरी जर्मन सुद्धा सिंगल यायच्या .त्यामागील सुत्र साफ होते .की ''what happens in Vegas stays in वेगास'' ( तंबूतील गोष्टी तंबूतच राहूदे ) अर्थात मी मूळ लेखात लिहिले की काही तंबू ज्यात आम्ही गेलो होतो तो पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.
त्यामुळे अश्या गोष्टींसाठी प्रसिध्द आहे.( आमच्या ग्रुप मध्ये अनेक जोडपी विविध देशातील असल्याने आम्ही हा तंबू निवडला होता.) बाकी मूळ लेखात मी प्रत्येक महत्वाच्या तंबूची माहिती ह्यासाठी दिली कि येथे येणारा प्रत्येक जण मजा करायला येतो. पण मजा करायच्या प्रत्येकाच्या संकल्पना, कल्पना वेगळ्या असतात.
24 Oct 2011 - 9:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निनाद, लैच भारी आहे राव. मला घेऊन चल यार जर्मनीला. :)
सहाव्या वेतन आयोगाचे येरीयर्स मिळालं ना तर येतोच.
च्यायला है का नै काय.
>>>> काही जण ह्या गर्दीत चिमटे काढणे धक्के मारणे ,उगाच गळ्यात पडणे किंवा मधेच कोणालातरी थांबवून लगट करणे हे प्रकार करत होते.
नीनादप, असं बळजबरी गळ्यात पडल्यावर गळ्यात पडणार्याला पब्लिक धूत नै कारे ?
-दिलीप बिरुटे
7 Nov 2011 - 12:12 am | निनाद मुक्काम प...
मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा
येथे दिवाळीचा अजिबात जोर नाही आहे. त्यामुळे दिवाळी व त्यानिम्मित्ताने जमणारे मित्र मंडळी ह्या सर्व गोष्टींना फार मिस करतोय. )
म्युनिक मध्ये तेलगु भाषिक आयटी मध्ये प्रचंड प्रमाणात आहेत. कारण तु नळी वर सापडले.
आमचे मुख्य मंत्री पण जाऊन गेट्स ला भेटलं असते तर ..
@ डॉ बिरुटे सर
नक्की या ( आता तर मी ऑक्टोबर फेस्ट तज्ञ झालो आहे.)
कुठचा तंबू बुक करायचा तेही आगाऊ कळवा.
पब्लिक धुलाई वैगेरे येथे काही होत नाही. कारण मुळात अंगचटीला आलेल्या युवकाशी निपटायला त्या मुलीच पुरेश्या असतात .त्यांची मर्जी नसेल तर एक रागीट.त्रासिक कटाक्ष टाकला सदर युवक जास्त मागे लागत नाही . बाकी एका प्रसंगात बोल बच्चन देणाऱ्या युवकाला त्या मुलीने मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येते असे सांगून जी सटकली ..अर्थात त्याने सुद्धा देवदास न होता नव्या जोमाने सज्ज झाला.
आख्यानाचा पुढील भाग ५ नोव्हेबर नंतर लिहीन ( तो पर्यत जरा कामात व्यस्त आहे.)
7 Nov 2011 - 3:46 pm | सोत्रि
निनाद,
मस्त रे! :lol:
- (ऑक्टोबर फेस्टला हजेरी कशी लावावी ह्या विचारात असलेला) सोकाजी
7 Nov 2011 - 4:00 pm | निनाद मुक्काम प...
सोकाजी
तुमच्या सारख्या रसिक व दर्दी माणसाने हा फेस्ट एकदा तरी अनुभवला पाहिजे .
येथील बियर आणि त्यांची चव लय भारी (वाईट बीअर ही बायर्न ची खासियत )
पुढचा वर्षी तुम्हे येणार असाल तर नक्की कळवा.
तुम्हाला आवडलेल्या तंबूत नक्की जाऊ .
16 Aug 2021 - 3:15 pm | अमरेंद्र बाहुबली
सर्व लेख वाचले. लेखाला दहा वर्ष झाली असल्याने कुठलाही फोटो दिसला नाही. खुप छान लेखन केलंय.
16 Aug 2021 - 7:57 pm | कंजूस
डोंबिवलीमध्ये आयोजला होता तेव्हा गेलो होतो. निनादची भेट झालेली.