भूतकाळातील रम्य आठवणी जागवताना सध्याच्या वर्तमान काळाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते .हिवाळा सुरु झाला तोच मुळी अंगात हुडहुडी भरायला लावेल इतक्या ताकदीचा म्हणजे उणे ५ पर्यत तमामान घसरले .हिमवर्षाव सुरु झाला .माझी लहान मुलांसारखी पावसाळ्याची खरेदी असतेना तशी हिवाळ्याची खरेदी सुरु झाली .सर्वात प्रथम लोकरीचे मोजे व टोपी ती पण आवडत्या प्रसिद्ध जर्मन ब्रांड एस्प्रीत चे .अंगावर अद्यावत कोट चढविण्यात आला .मग सगळ्यात महत्वाचे म्हणजे आतून लोकर असलेले लेदरचे जाड हिवाळा व हिमवर्षाव ह्यांसाठी खास बनविलेले वजनदार बूट घेण्यात आले .त्याआधी दोन दिवस हिम वर्षावात मी साधे बूट घालून फिरत होतो .तेव्हा काही वेळात माझे सर्व शरीर व आतील रक्त गोठले जातेय अशी भावना व अवस्था निर्माण व्यायची .अश्यावेळी वेम्पायार ने जर माझे रक्त शोषले. तर त्याला गोळे वाल्या चा लाल भडक बर्फाचा गोळा चोखायला मिलेल अशी कल्पना मनात आली .दोन दिवसांनी आमची सुट्टी असल्याने तडक बूट खरेदी करायला बाहेर पडलो .माझ्या बुटाचे त्या दोन दिवसातील दयनीय हाल पाहून दुकानदार म्हणाला. कि दोन दिवस तुम्ही फिरला ह्या बुटात? तेव्हा मी उत्तरलो काही इलाज नव्हता. .(मनात विचार आला ह्याहून जास्त हिमावार्षावत कारगिल मध्ये आपले सैन्य हिवाळ्याचे बूट व कपडे पुरेसे नसताना सुद्धा लढले नि जिंकले .करदात्यांचा पैसा ह्याच्या कामी आला नाही तो कोणाकडे जातो हे जगजाहीर आहे. कोणा विकी लीग ची गरज नाही असो) .मग घराच्या बाजूला फार मोठे म्हणजे लांबीच्या बाबतीत वानखेडेच्या दुप्पट असे मैदान आहे. तेथे प्रचंड वनराई आजू बाजूला आहे .काही भाग कुंपण घालून वन्यजीवांसाठी आरक्षित केला आहे .तर बाकीच्या भागात कडेला प्रशस्त जोन्गिंग ट्रेक आहे .( युरोपात १००० युरो कमवत असाल तर ८०० युरो हातात येतात .कारण विमा व कर ह्यात पैसा जातो .पण पंचतारांकित वैद्यकीय सेवा व भरलेल्या कराचे असे सार्थक झाले पहिले तर तो देताना वाईट वाटत नाही .)लोक तिथे स्केटिंग करायला लागली होती .आम्ही त्या बर्फाळ प्रदेशात भटकायला सज्ज झालोमध्येच एक नदी लागली .एका मोठ्या ओढ्यासारखी नदी वाटत होती. .तिच्या सोबतीने आम्ही थोडी मजल मारत पुढे गेलो. तर सुरेख राजहंस व बदके आणि बीवर ह्यांचा समूह आम्हाला दिसला. ही लोक त्यांना गाजर ब्रेड खायला घालत होते ..थोड्याच अंतरावर एका छोट्या हिम टेकडी वरून दोन छोटी पोर व त्यांची आई एका लाकडी बाकावर बसून घसर घुंडी खेळत होते. .मी फोटो काढतोय असे पाहतच त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. .मग बर्फाच्या गोळ्यांची फेका फेक आई विरुद्ध पोरे अशी सुरु झाली. .मी हे सर्व पाहताना दंग होतो .तेव्हा गानिमाने वेळ साधली नि माझ्या पाठीत किसलेला बर्फा टाकला. .मी अनेपेक्षित हल्याने बिथरलो. ,आता इट का जवाब पथार्रसे म्हणून मुठी वळल्या. अब संभाल मेरा वार ह्या अर्थी महाभारतातील विरासारखी. गर्जना केली .. व बर्फ उचलणार तेव्हा सॉरी अशी गोड लाडिक हाक एकू आली .नि आमचा आरपार लढाईचा बेत रद्द झाला .च्यायला माझे म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय खात्यासारखे झाले. .निषेधाचा खलिता पाठविला. .नि प्रत्यक्ष कृती शून्य .
घरी परतांना भली मोठी गाड्यांची रांग दिसत होती .पहिल्या हिमवर्षावाचा तडाखा जबरदस्त बसल्याने अनेकांनी खाजगी वाहने रस्त्यावर न आणण्याचा शहाणपणा केला होता. .पण जी वाहने २ दिवसापासून जागेवर उभी होती ..त्यांच्या सर्वांगावर बर्फ पसरला होता .मी लगेच सहचारीणीस कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला हि म्हण संधार्भासाहीत स्पष्टीकरण करून सांगितली. एका घराच्या अंगणात एक सुरेख बर्फाचा पुतळा दिसला . . .आता विजेचे बिल वाढणार कारण घरात हिटर आपल्या पूर्ण शक्तीनिशी आमच्या दिमतीला असणार. .असा मनाच्या कप्यात कुठेतरी जपलेला मध्यम वर्गीय डोकावला . ख्रिसमस एन महिन्यावर येऊन ठेपल्याचे बाजार दर्शवत होता .लोकांची दुकानात खरेदी साठी झुंबड .उडाली होती .पण आम्हाला वेध लागले होते ते ख्रिस मास मार्केटचे जे जर्मनीतील नाताळचे प्रमुख आकर्षण असते .कच गोष्टीचे आमच्या बाई साहेबाना दुख वाटले. ते म्हणजे जर्मनीत अनेक ठिकाणी मार्केट असतात ,तेथे एक परंपरा म्हणून एक उंच व भलामोठ्ठा डेरेदार पाईन वृक्ष जो ख्रिसमस त्रि म्हणूनही ओळखला जातो तो तोडून
मार्केटच्या मध्यभागी उभारून सजवला जातो .अर्थात जानेवारीत त्याचे तुकडे तुकडे सरपण म्हणून वापरले जातील .येथील वृक्ष चांगला ८० वर्ष जुना होता .केट म्हणाली ८० वर्ष हा वृक्ष उभा होता डवरला होता तो ह्या दिवसाची वाट पाहत कि एखाद्या नाताळात माझा नंबर येणार आणि मी असा मुळापासून वेगळा होऊन शोभेचे झाड म्हणून महिन्यापुरते उभे राहणार .तिचे हे पर्यावरणाचे अनोखे ममत्व पाहून माझ्याही काळजाला पाझर फुटला नि माझ्यातला जयराम जागा झाला .मी म्हणालो अग वेडे तो ८० वर्ष ह्याच दिवसाची तर वाट पाहत होता त्याच्या जज मेंट डे ची . अगदी दुसर्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचे विमानातीन पडणारे अग्नीचे गोळे त्याला ठार करू शकले नाही ते स्वकीयांनी केले .(आमच्या कडे हिंदीत ह्या प्रसंगाच्या साजेसे एक गाणे आहे दुश्मन न करे दोस्त न वो काम किया हे ) तर मतितार्थ काय तर त्या वृक्षाचा परंपरेसाठी बळी गेला .आमच्या कडे भारतात बळी जातो ते आमच्या वाढत्या लोकसंख्येच्या उदरभरणासाठी .नागरीकारणासाठी विकासाठी ,पण अजूनही आम्ही म्हणतो वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी http://images.orkut.com/orkut/photos/OAAAAGv1ae-LP7oqUB-i0oSKuiESD35moHC...
प्रतिक्रिया
9 Dec 2010 - 6:26 am | निनाद मुक्काम प...
http://images.orkut.com/orkut/photos/ht/photos/OgAAAEgfQqUyjCKq0WOsgA5a92TQjeWfsTIb4otuHt5hYjnGjncMMscNflVdX-Y2y3j19l47Jc9q0RzZVsZA3Q2Q61AAm1T1UOIqRW22Gds-Vwtj15lxdJRqZNTK.jpg
9 Dec 2010 - 6:32 am | निनाद मुक्काम प...
9 Dec 2010 - 6:43 am | निनाद मुक्काम प...
9 Dec 2010 - 6:43 am | शिल्पा ब
राजहंस आवडला...तुमचे फोटो नसते तरी चाललं असतं ;)
9 Dec 2010 - 6:49 am | निनाद मुक्काम प...
तुमचे म्हणणे रास्त आहे ( प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे करण्याची खोडच आहे मला लहानपणापासून )
9 Dec 2010 - 6:45 am | निनाद मुक्काम प...
9 Dec 2010 - 11:28 am | utkarsh shah
फोटो छान आलेत.... वर्णन अजुन केले असते तर अजुन थोडा छान लेख झाला असता................
9 Dec 2010 - 8:27 pm | निनाद मुक्काम प...
@वर्णन अजुन केले असते तर अजुन थोडा छान लेख झाला असता.
नक्की विचार करेन आपल्या सल्ल्याचा .
शब्द कमी नि फोटो फार हे झालाय खर
10 Dec 2010 - 4:46 am | निनाद मुक्काम प...
आपल्या सल्यानुसार जर्मन मार्केट वर्णन चे करीत आहे प्रतिक्रियेमध्ये .पुढच्या वेळी काळजी घेईन कि आख्यानात विषयानुरूप तपशीलात लिहीन .
9 Dec 2010 - 2:59 pm | चिंतामणी
च्यायला माझे म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय खात्यासारखे झाले. .निषेधाचा खलिता पाठविला. .नि प्रत्यक्ष कृती शून्य .
मस्त रे. फटु आणि लेखसुध्दा.
हे वरचे वाक्य म्हणजे एकदम Sixer.
9 Dec 2010 - 3:09 pm | टारझन
फोटु दिसण्यासाठी कोणत्या देवाची प्रार्थणा करावी लागेल ?
बाकी लेखन विस्कळीत वाटले. लिहील्यानंतर पुन्हा एकदा वाचुन पहावे आणि जमल्यास करेक्शन करावे :)
9 Dec 2010 - 8:23 pm | निनाद मुक्काम प...
लेखन विस्कळीत वाटण्यात वाव आहे खरा .पण मला उस्फुर्त व स्वैर लिहायला आवडते .लिहिल्यावर परत वाचून करेक्शन करायला हा मराठीच्या परीक्षेतील निबंध थोडीच आहे
@फोटु दिसण्यासाठी कोणत्या देवाची प्रार्थणा करावी लागेल ?
मला माझे सर्व फोटो दिसत आहेत .इतर सदस्यांना सुद्धा दिसत असावेत .हे त्याच्या प्रतिक्रियेतून दिसून येतेय .आपल्याला नक्की कोणते व कोणाचा फोटो अपेक्षित आहे
9 Dec 2010 - 11:44 pm | टारझन
अच्छा, मग तो पुर्वपरिक्षण चा बळजबरी दिलेलं बटण केवळ साईट चे हिट्स वाढायला असावं :)
असो , फुकाचा सल्ला होता , मानलाच पाहिजे असं काही नाही.
10 Dec 2010 - 2:27 am | निनाद मुक्काम प...
ती कळ मी शुद्ध लेखनासाठी वापरतो .( एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्ती परत्वे बदलतो .)
तरीही बर्यापिकी अशुध्द लिहितो .
मोजुन मापून बोलणे व लिहिणे जमले नाही कधी .
जे करावे ते उस्फुर्त
लेखनात मिळतो चान्स करेक्शन करायला .आयुष्यात मिळतोच असे नाही .
10 Dec 2010 - 4:43 am | निनाद मुक्काम प...
आपल्या सल्यानुसार जर्मन मार्केट वर्णन चे करीत आहे प्रतिक्रियेमध्ये .पुढच्या वेळी काळजी घेईन कि आख्यानात विषयानुरूप तपशीलात लिहीन .
ख्रिस मास मार्केट हे जर्मन नाताळचे प्रमुख आकर्षण ते साधारणता डिसेंबरच्या सुरवातीला शहरातील मुख्य व मध्यवर्ती ठिकाणी भरतात. भर थंडीत हिम वर्षावात हे मार्केट दिवसभर गजबजलेले असते .येथे विविध प्रकारचे स्टोल लावले जातात .तेथे पारंपारिक जर्मन खाद्य पदार्थ विक्रीस ठेवले असतात .प्रमुख आकर्षण म्हणजे ग्लू वाईन .एरवी बियर प्राशन करणारे जर्मन त्यांच्या मुख्य सणाच्या वेळी चक्क वाईन पितात म्हणजे घोर पातक हे म्हणजे भर दिवाळीत शिरखुर्मा खाण्यासारखे झाले . असे माझे मत काही वर्षापूर्वी जेव्हा ह्या प्रथेबद्दल एकले तेव्हा झाले होते .पण जेव्हा कळले कि अत्यंत पारंपारिक पद्धतीने वेगळ्या धाटणीची हि वाईन अत्यंत गरम असताना पिणे हे भर थंडीत सुखद गरमागरम अनुभव असतो .. ग्लू वाईनला थोडक्यात वर्णन करावे म्हणजे जर्मन हॉट spiced वाईन ह्यातील प्रमुख घटक म्हणजे ड्राय रेड वाईन /लिंबाचा रस / लवंग /दालचिनी /
जायफळ ची पूड व चवीपुरता साखर .कृती एकदम सोप्पी साखरेव्यातिरिक्त सर्व जिन्नस एका भांड्यात घेऊन उकळून घ्यायची . .नि मग चवी पुरता नाममात्र साखर घालून तो उकळता द्रव थंडीत घासाखाली उतारवयाचा प्रती ग्लास अडीच युरो व अडीच युरो ग्लास ची जमानत भरली तर ह्या ह्या वाईन चे घुटके घेत पूर्ण मार्केट आपण फिरू शकतो .काही घोटात अंगात उष्णतेचा प्रवाह वाहू लागतो .शरीर बर्फाला जुमानत नाही .एक चहाचा कपमध्ये हि वाईन नरड्याखाली उतरल्यावर मग पोटासाठी अनेक खाद्य पदार्थाच्या स्टोल पैकी एकात जायचे .चविष्ट पारंपारिक जर्मन पदार्थ चाखायचे .तेही त्यांनी उभारलेल्या तंबूत बसून वेगळीच मजा असते .आपल्याकडे एखादा मालवणी फूड फेस्टिवल च्या वेळी जो एक प्रकाचा मोहोल असतोना तसेच येथे हो होते .मग तांदळाचे गोड दाम्प्लिंग ( साधरण इदलीच्याहून मोठे ) असे गरम वेनिला सॉस बरोबर खाण्यात लई मजा आली .त्याच्या नंतर नाताळ
निम्मित्त कुकीज बेक्स केल्या जातात त्यात बटर /वेनिला/ चोकोलात असे अनेक प्रकार असतात .त्याचा पण विकत घेऊन फन्ना उडवला .ह्या मार्केट मध्ये अनेक लघु उद्योग करणारे लोक एकत्र येऊन त्यांचा रोजगार कमावतात .व १०० % पारंपारिक व स्वदेशी वस्तू हा ह्या मार्केटचा मूलमंत्र असतो. वर्षभर हि लोक समूहाने संपूर्ण जर्मनी पिंजून काढतात .मोठ्या शहरात दर महिन्याला किमान दोन मार्केट भरत असतात .मुंबईला असेच मार्केट महालक्ष्मी ला नवरात्रीत तर मौंत मेरीची जत्रा वांद्र्याला भरते .त्याची आठवण झाली .विदेशीचा विरोध करायचा का त्याला स्वदेशी उत्तर द्यायचे व निकोप स्पर्धा करायची . हे ज्याचे त्याने ठरवावे
10 Dec 2010 - 6:05 am | शिल्पा ब
डम्प्लींग चायनीज पदार्थ आहे.
10 Dec 2010 - 5:24 pm | निनाद मुक्काम प...
अगदी बरोबर
ह्या पदार्थाचे मूळ जर्मन नाव अतिशय किचकट आहे .व हा पारंपारिक पदार्थ कोणत्याही जर्मन उपहारगृहात मिळणार नाही .(मुळात जर्मन उपहारगृह .........) अर्थात ह्या मार्केट चे वैशिष्ट्य म्हणजे एरवी दुर्मिळ असणारे जर्मन पदार्थ खाणे हा असतो .
त्यामुळे जागतीकरणामुळे अर्थात अनेक विदेशी पर्यटकांसाठी हा सोप्पा पर्याय आहे ह्यालोकांकडे सोपी नावे देतात .
(आपण सुध्धा नेपाली व ईशान्य भागातील लोक जे खायला घालतात त्याला चायनीज म्हणतो .(अर्थात त्या चवीपुढे खरे चायनीज पण पाणीकम लागते .)
बाकी विविध खाद्यसंस्कृतीची माहिती व आवड आहे वाटते तुम्हाला .
आम्ही सारे खवय्ये .
17 Dec 2010 - 12:57 am | शिल्पा ब
अगदी उच्च दर्जाचे जर्मन हाटेल नसेल सगळीकडे पण हेब्रो (hafbrau ) बहुतेक वेळेस काही मोठ्या शहरात असते...
17 Dec 2010 - 12:51 am | पर्नल नेने मराठे
ह्यांचिच बायको जर्मन आहे का? अगो बै..मस्तच नै..वेगळेच थ्रिल्.. नाहितर आम्ही २ घे मुम्बै चे ..लग्न पण मुम्बै तच.. ते पण अॅरेन्जड ... कहि कहि म्हणुन आयुश्यात थ्रिल म्हणुन नाही :(
17 Dec 2010 - 1:01 am | शिल्पा ब
अगं मग शुचीच्या धाग्यावरुन शिक काहीतरी...
बाकी आतापर्यंतच्या यांच्या लेखावरून समजले ते असे :
यांची बायको जर्मन
सासू सासरे जर्मन
यांचे सासरे फुटबॉल खेळतात तर सासूबाई मेरेथोन धावतात
हे परदेशात पक्षी: जर्मनीत राहून बाटलीतले पाणी पितात अन घरातून कोणतातरी डोंगर दिसतो
यांच्या ऑफिसात फाय स्टार सुविधा आहेत
यांना अजून जर्मन नीटसे बोलता येत नाही...शिकाऊ आहेत.
अजुन बाकी लेख आले की सांगते..
17 Dec 2010 - 1:13 am | पर्नल नेने मराठे
आइया कय मस्त नै...माझ्या उभ्या खानदानात मॅरेथोन धावले नाहिए...
आता सासुबैना सान्ग्तेच मॅरेथोन धावायला.
अग पण एक समानता आहे हो आमच्यात ...मी पण बाटलीतलेच पाणी पिते, नळाखाली फक्त ती स्वच्छ आधी भरुन घेते ;)
उन्दिर घुशिचे काय फोटो टाकता :ओ मी पन आम्च्या गिरगावातल्या चाळितल्या घुशीचे फोटो ताकेन मग बोलनेका नाय मेरेकु किस्ने.
17 Dec 2010 - 1:16 am | शिल्पा ब
आता बाटलीत नळातले पाणी भरून दुधाची तहान ताकावर भागवली तरी घरातून एखादा तरी डोंगर , नाहीच तर एखादी टेकडी तरी दिसते का?
बाकी आमच्या कडे पाणी भरायला बाटल्याच नाहीत...अन नळ त त्याहून नै ....आडातून पण काढावं लागतंय ;)
17 Dec 2010 - 1:18 am | पर्नल नेने मराठे
अगो टेकडया नाहित पण झोपडपट्ती दिस्तेय्...ती पण आशिया मधली सर्वात मोठी ;) ह्यांच्या जर्मनित काय नुस्ते उन्दिर न घुशी =))
17 Dec 2010 - 1:38 am | निनाद मुक्काम प...
अहो सासू बाईंना मेरेथोन सारख्या शुद्र खेळ कशाला सांगता खेळायला ?
त्यापेक्षा आदेश भाऊजी तुमच्या गल्लीत येतील .त्याच्या सोबत रोमहर्षक चित्त थरारक खेळ खेळायला सांगा ( बादलीत चेंडू टाकणे / घरातील लपवलेली आगपेटी शोधणे ) व त्यात त्या विजेत्या झाल्या तर आनंद आहे .एक विनम्र सूचना (ह्या खेळात म्हणे विजेत्याचा नवरा बायकोला उचलून घेतो .तेवढे मात्र सासरेबुआच्या तब्येतीकडे पाहून .....)
राज हंसाचे देखील टाकले आहे .आपल्या डोळ्यात मात्र उंदीर भरला
असो आवड एकेकाची
नाव भारी आवडले आपले चुचू
17 Dec 2010 - 3:34 am | रेवती
आपला लेख व फोटो पाहून आमची परम मैत्रिण शाल्मली हिच्या लेखाची आठवण झाली.
17 Dec 2010 - 6:38 am | निनाद मुक्काम प...
तो लेख वाचला
फारच मुद्देसूद व आटोपशीर लिहिला आहे .
स्वाती /शाल्मली ह्यांच्या लेखामुळे खरच खूप चांगली माहिती मिळाली .आता बायको व तिच्या घरच्यांपुढे शायनिंग मारता येईल (आम्ही पडलो साहित्यातील लखू रिसबूड ) त्यामुळे येथे जर्मनीत अल्पसंख्यांक (मुस्लीम )जनतेची २ री ३ री पिढी अजूनही जर्मन संस्कृतीची एकरूप झाली नाही आहे बर्लिनच्या सध्याच्या मेयर ने आपल्या पुस्तकात असे म्हटल्याने येथे मोठे राजकीय वादळ उडाले .तुमच्या येथे सुध्धा ग्राउंड झिरो प्रकरण जोरात आहे .तेव्हा भारतीय (हिंदू ) मात्र स्थानिक जनतेत आपल्या सरळ मार्गी वागण्यामुळे व आचारणामुळे प्रचंड लोकप्रिय असल्याचा अनुभव मला येथे पदोपदी येतो .
आम्ही पडलो साहित्यातील लखू रिसबूड त्यामुळे