http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
http://www.misalpav.com/node/16534 भाग ७
समलैंगिक लोक युरोपात चिक्कार आढळतात .अर्थात लंडन मध्ये सार्वजनिक ठिकाणी हे असे काही पहिले नव्हते. येथे निवांतपणे ते दोघे माफक प्रणय क्रीडा करत होते .गुलुगुलू गप्पा रंगात येत होत्या .दोघे हातात गुंफून जोडीने शौशालयात गेले .माझ्या स्मृती पटलावर २००३ साली प्रथमच रात्रीचे लंडन केल्याची आठवण आली
. .बाकी रात्रीचे लंडन पाहायचे म्हणून मित्रांसोबत बाहेर पडलो होतो .बरेच काही आयुष्यात प्रथमच पाहत असतांना आम्ही चार मित्र दमलो .नि अपेयपान करण्यासाठी एका पब मध्ये गेलो .सुरवातीला काहीच नवल वाटले नाही .सगळे नोर्मल वाटले. पण हळू हळू खरा प्रकार लक्षात आला .तो गे क्लब होता .समलैंगिक लोकांची .सार्वजनिक ठिकाणी कुंचबणा होते .त्यामुळे आपल्या जोडोदारासोबत चार क्षण निवांत घालवायला मिळावे म्हणून त्याच्यासाठी हे विशेष मादिरागृह उभारण्यात आले .होते
.एक लबाड वेटर अत्यंत लाडिक हावभाव करत आमच्या कडे आला नि म्हणाला तुम्ही कोणत्या देशाचे ?आम्ही भारत असे म्हंटल्यावर तो खुश झाला ''.तुमचा जोडा खूप क्युट दिसत आहे ''.असे म्हटल्यावर तोंडात जोडे मारल्या सारखी आमची अवस्था झाली .गंमत म्हणजे आम्ही आधी बियर ऑर्डर केली असल्याने आता परतीचा मार्ग कठीण वाटत होता .न जाणो त्यांचा पहिलवान बाउन्सर आम्हाला बुकालायाचा .बरे जीवाचे लंडन करायचा हा पहिलाच प्रसंग त्यामुळे युरोपियन रीतीरीवाजाला आम्ही नवखे होतो . ,.हा सौथ अमेरिकन वेटर त्याची कर्म कहाणी थोडक्यात सांगून मोकळा झाला .अमेरिकेत त्याचा भारतीय जोडीदार होता .प्रियकराच्या घरी प्रकरण कळल्याने प्रोब्लेम झाला .मग हा बेकायदेशीर असल्यामुळे ह्याला तिथून तडीपार केले .थोडक्यात प्रेमी जीवाची ताटातूट लांबी जुदाई .
.मी हळूच त्याला विचारले मग आता लंडन मध्ये कसा काय .त्यावर लाडिक हास्य करत म्हणाला'' येथे त्यांचे बस्तान मस्त जमले आहे. अनेक देशातील त्याचासारखी लोक सोहो परिसरात नांदत आहेत .( मी मनात म्हटले '' नंदा सौख्य भरे '')
बियर संपून जायचे म्हटले तर एकाला लघुशंका आली .पण शौशालायातून तो घाबरून पळत बाहेर आला . .आम्ही मात्र त्याला विचारले काय झाले ?तो म्हणाला आत काही लोक अभद्र व्यवहार करत आहेत मी एक क्षण पहिले तर त्यातील एकाने मला हात पुढे करून चक्क आमंत्रण दिले . मला वाटले . ''मला खेचून घेतले तर ? ''चला लवकर निघूया इथून'' .बाहेर आल्या वर आम्ही खूप हसलो.
.मी त्याला म्हटला'' तू आपनी इज्जत बचा के भाग आया''..
कलोन कडे हे जगातील दुसर्या क्रमांकाचे सम लैंगिक लोकाचे शहर आहे .पहिले बहुदा सेन फ्रान्सिस्को असावे .येथे गे परेड हा सर्वात मोठी असते .अजूनही आपल्या हक्कासाठी ते लढा देत आहेत
ख्रिस्तोफर स्ट्रीट डे म्हणून जगभर साजरा होणारा समलैंगिक लोकांची परेड हि कलोन मध्ये भव्य प्रमाणात आयोजित होते .१० लाखावर लोक एकत्र येऊन आठवडा भर विविध कार्यक्रमात सहभागी होतात .आपल्या कम्युनिटी विषयी आदर व सदभावना व्यक्त करण्यासाठी व आपले हक्क व चळवळी विषयी राजकीय /सामाजिक /सांस्कृतिक स्तरावरून चर्चा येथे होते
.ख्रिस्तोफर स्ट्रीट डे हा दिवस १९६९ साली सकाळी न्यूयार्क शहराच्या
जवळील ग्रीनविच शहरात पोलीस रेड विरुद्ध अमेरिकन प्रशासनाच्या समलैंगिक लोकांविषयी असलेल्या दुट्टपी धोरणाविरुध्ध समलैंगिक लोकांनी उस्फुर्तपणे प्रदर्शने केली .ज्याला हिंसक वळण प्राप्त झाले .हि जगातील बहुदा पहिली समलैगिक चळवळ होती .जी जगभर फोफावली .माझा जर्मन बॉस (हिल्टन हिथ्रो व त्याचा ब्राझिलियन नवरा असे हे दोघे न चुकता कलोन ला लंडन वरून भेट देतात
).
१८व्य शतकात सुरु झालेला स्ट्रीट कार्निवल हा कलोन शहरातील पर्यटनाचा मुकुटमणी . दिवसभर चित्र विचित्र कपडे' घालून आबालवृध्द दैनदिन जीवनातील समस्या /ताणताणाव फाट्यावर मारून निखळ करमणूक करत असतात .तेव्हा प्रत्येकाची चित्रविचित्र वेशभूषा व अनेक राजनैतिक नेत्याचे मुखवटे असणारे पेहेराव कार्निवल ला बहार आणतात .केट ची बहिण सुद्धा कार्निवल साठी आली होती .आम्ही कालोंच्या गल्ली बोळातून दिवसभर नुसते भटकत होतो .जल्लोषाचे वातावरण होते
.
कलोन शहराशी निगडीत दंत कथा तेथील स्थानिकात खूप लोक प्रिय आहे .हैन्झाल मेन्शन म्हणून .कोणे एके काळी कलोन शहरात रात्री बुटकी लोक ( हिम गौरी नि सात बुटके मधील बुटक्या सारखी बुटके लोक ) रात्रीच्या वेळी शहरात येत व ते साफ अगदी चकाचक करून व कलोनवासीयांची घरची कामे दिवस उजाडायच्या आधी निघून जात .त्यांना कोणीही अजून पहिले नव्हते .ह्यामुळे कलोनवासीय खूपच आळशी बनले होते .एक दिवशी एका शिंप्याच्या पत्नीस हे बुटके दिसतात तरी कसे हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली .तिने रस्तावर चिकट नि तेलकट तवंग पसरवला .जेणेकरून हे बुटके पडतील .आणि तिला सकाळी पाहायला मिळतील .त्या दिवसापासून ते बुटके रागावले नि .कलोन शहरात कधीच परत आले नाही .(आता कलोन वासियांना स्वताची कामे स्वतः करावी लागतात .)
अर्थात १८व्य शतकात हि दंत कथा लिहिली केली .तिची लोकप्रियता पाहून शिंप्याच्या बायकोचा दिवा घेऊन त्या बुटक्या लोकांना शोधत आहे .व बुटके मात्र लपले आहेत असे एक सुंदर शिल्प त्यांनी कलोन च्या मध्यवर्ती भागात उभारले आहे .
दुसरे छोटेखानी शिल्प एका सत्य कथेवर आधारित एका विक्षिप्त वजिराचे आहे . .कलोन मध्ये काही शतकापूर्वी शहराचा एक उपराव होता .तो विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होता . आपल्या हवेलीच्या गवाक्षातून तो रस्त्यावरून येणाऱ्या जाणार्या पादचार्यांवर मल मूत्र विसर्जन करायचा त्याची विक्षिप्त पणाची एक नोंद म्हणून हा त्याचा पुतळा त्याच्या स्मृती प्रीत्यर्थ उभारला आहे.
३० हून जास्त म्युझियम १०० हून जास्त आर्ट गेलेरीज असलेले ह्या शहरात अल्पकालीन वास्तव्यामुळे त्या पाहता आल्या नाही .बाकी ह्या शहरात WDR), आर टी एल व वॉक्स, ह्या वाहिन्यांची मुख्य केंद्र आहे .अनेक मोठे व महत्वाचे टीवी शो ह्या शहरात होतात .युरोपातील सर्वात मोठा कलोन कॉमेडी फेस्टिवल येथे होतो .जेथे जगभरातून विनोदी अभिनेते येतात व त्यांना पुरस्कार सोहळा व नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे
.
केनेडाचा (अनिवासी भारतीय रसेल पीटर ह्यांचा एकपात्री विनोदी कार्यक्रम जो बहुदा वर्ण ह्या विषयावर असतो .ज्यात जगातील काळे /गोरे /पिवळे / ब्राऊन ह्या सर्व वर्णीय लोकांची तो बिनधास्त खिल्ली उडवतो .)माझा आवडता विनोदी कलाकार आहे .
प्रतिक्रिया
7 Feb 2011 - 10:25 am | टारझन
आज खरे ( क्लबातले ) फोटु हवे होते :)
- गे म्बलर
7 Feb 2011 - 10:24 am | चिंतामणी
विषय लै भारी. पण बहूधा कसा मांडायचा या विचारामुळे थोडासा विस्कळीत वाटला.
7 Feb 2011 - 10:24 am | निनाद मुक्काम प...
केथे ड्रेल वरून वरून कलोन शहराचा नजारा
विक्षिप्त वजीर
कलोन च्या बुतक्यांचे शिल्प
हैन्झ मेन्शन (शिंप्याच्या बायकोचे शिल्प )
केथे ड्रेल ची भव्य घंटा
http://images.orkut.com/orkut/photos/OgAAAJjO30EHYVUBGgX9gter3JziNMxtqpp...
केथे ड्रेल चे घुमटाच्या खांबावर हौशी पर्यटकांनी स्वताचे नाव व पत्ता लिहायला सुरवात केली .म्हणून त्यांना तारेचे कुंपण घालण्यात आले .
7 Feb 2011 - 2:00 pm | आमोद
अजुन येवुदे.
7 Feb 2011 - 2:00 pm | आमोद
अजुन येवुदे.
7 Feb 2011 - 2:00 pm | आमोद
अजुन येवुदे.
7 Feb 2011 - 3:03 pm | ५० फक्त
निनाद, अजुन एक छान भाग, आणि ऐतिहासिक स्थळांवर नावे लिहिण्यांपासुन रोखण्यासाठी जाळी लावण्याची कल्पना भारतात पण राबवली जाणे खुप आवश्यक आहे असे वाटते.
हर्षद.
8 Feb 2011 - 5:49 am | गोगोल
एखाद आख्यान जर्मन बायको कशी पटवली त्याच पण असू दे की :)
8 Feb 2011 - 10:31 am | निनाद मुक्काम प...
डोमच्या उजव्या बाजूला दुतर्फा दुकाने व मधोमध प्रशस्त रस्ता आहे . तेथे १२ महिने गर्दी असते .त्यात पर्यटक व हौशी कलोन वासीय असतात .त्या रस्त्याच्या सुरवातीला मोठी बेकारी आहे .तिच्या सुरवातीला काचेच्या आड गुटगुटीत बलिना असतात . असतात .१ का युरोला दोन ( अशी स्वस्ताई अजून खचितच कुठे सापडे
माझी मेव्हणी कलोन कार्निवल मध्ये
कलोन कार्निवल ( फुल २ धमाल )
10 Feb 2011 - 10:58 am | निनाद मुक्काम प...
टारझन / चिंतामणी / आमोद /. चार्षद / गोगोल ह्यांचे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
पुढचा भागाची मांडणी अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करेन .
चार्षद ह्यांच्या म्हणण्याची मी सहमत .इतिहासाचे वारसे जपण्यासाठी काटेकोर उपाययोजना हवी .
''माझ्या लग्नाचे आख्यान''
आयडियाची कल्पना आहे .
जरूर लिहीन