जर्मन आख्यान भाग ७

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in जनातलं, मनातलं
29 Jan 2011 - 4:59 pm

http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
आबू धाबी काही कारणास्तव आम्हाला रुचले नाही म्हणून त्यासाठी जर्मनीत मुक्काम शकयतो कायमचा करायचा बेत ठरला .त्या साठी भाषा शिकणे आवश्यक होते .जी मी जर्मनीत आल्यावर शिकू शकलो असतो .पण भारतात स्वतात मस्त अशी काळा धोडा येथील गुटे संस्था (त्या निम्मिताने माझ्या सारख्या माहेरवाशिणीला तब्बल २ महिने मुंबईत उंडारायला मनसोक्त मिळणार .अशी संधी साधण्या इतका संधिसाधू मी नक्कीच होतो .) तेव्हा जर्मन भाषा प्राथमिक अवस्थेत ग्रहण करून मी जर्मनीला पांथस्थ झालो .आई बाबा नातेवाईक ह्यांना सोडून जाण्याचे शल्य पण ह्या पेक्षा लाडक्या बायकोला भेटण्याचा आनंद / आतुरता जास्त होती मनी ..

कलोन च्या विमानतळावर उतरलो तेव्हा गडद धुके होते थंडी होती .पण दोन महिन्यांनी बायकोला भेटणार असल्याने ह्या सर्व गोष्टींची तमा न बाळगत माझे समान घेऊन मी बाहेर आलो .केट माझी वाट पाहत होती मला पाहताच तिचा मुळात गोड असलेला चेहरा अजूनच खुलला .मग प्रवास कसा झाला वैगेरे शिळोप्याच्या गप्पा झाल्या .मीही उगाच शेजारी एक तरुणी सुबक ठेगणी बसली होती .तिच्या सोबतीत प्रवास सुखकारक झाला .तिने ह्याच शहरात राहत असल्याने दूरध्वनी क्रमांक दिली .व ह्याचा वापर कर हे सांगायला विसरली नाही .असे सांगताच बाईसाहेबांनी मुळात तू नंबर घेतलाच कशाला ?अश्या अर्थाचा चेहरा केला तिच्या चेहऱ्यावरचा तो लटका राग व मत्सर पाहून मी खुश झालो .मत्सर हा प्रेमापोटी व आवडत्या व्यक्तीवर असलेल्या अधिकारापोटी निर्माण होतो .तो यायचा संपला कि नात्यामधील आकर्षण कमी होत जाते .मी लगेच मस्करीची कुस्करी होणार नाही ह्याची दक्षता बाळगून योग्य तो खुलासा केला .
मग कलोन शहरात आमच्या आवडत्या अमेरिकन कॉफी शॉप स्टार बग्स मध्ये कॉफी प्यायलो .हा अमेरिकन ब्रेंड युकेत रुळला .पण जर्मनीत त्याचे बस्तान हळू हळू बसतेय .ह्याचे कारण म्हणजे चीबो .हा चीबो एक अस्सल जर्मन ब्रांड असून स्वस्त नि मस्त खुसखुशीत अशी ख्याती असणारे बेकरी पदार्थ/ कॉफी व कपडेसुद्धा जर्मनीत लोकप्रिय आहेत .येथे बेकरी हा एक बडा ख्याल आहे .ती जशी चीबो किंवा इतर नामवंत जर्मन ब्रांड च्या असतात तसे लघु स्वयामुद्योग उद्योगासारख्या स्वतंत्र सुद्धा असतात .वेगवेगळे आकाराचे ताजे पाव .तोंडाला पाणी सुटेल अश्या विविध चवीच्या आकाराच्या गोड पेस्ट्री ह्या बेकर्या केवळ एक ते दीड युरोमध्ये देतात .त्यांची दीड युरोची मोठ्या कपातली कॉफी हि अमेरिकन स्टार बगच्या लहान कपाच्या दोन युरो ८० सेंट च्या मानाने स्वस्त असते .व मोठी असते .खुल्या बाजारात चीन व अमेरिका अश्या नावाला न घाबरता स्वताचे सत्व ओळखले तर जनता जनादर्न हि देशःच्या ब्रान्डला प्राधान्य देते .हे लक्षात आले
.तेथून आमची स्वारी एस बान (( रेल्वेला जर्मन भाषेत बान म्हणतात .) म्हणजे लांब पाल्यासाठी जाण्यास बेस्ट अशी जर्मन लोकल मधून १५ मिनिट लांब असलेल्या होलवायदा ह्या टुमदार उपनगर आलो .घर तिसर्या मजल्यावर होतो.
त्यामुळे कुली नंबर १ कामाला लागला .घर मात्र प्रशस्त होते आमच्या अबुधाबी व लंडन मधील घरापेक्षा मोठे व भरपूर प्रकाश असणारे . .माझी अवस्था येथे नुकतेच अनिवासी भारतीयाशी भारतातून लग्न होऊन अमेरिका वा परदेशी नवर्याच्या घरी आलेल्या बायकोसारखी होती .कारण घर व्यवस्थित रित्या सजलेले होते हे घरकुल मी जर्मन भाषा मुंबईत शिकत असताना तिने एकटीने जर्मनीत येऊन आईबाबांकडे राहून पहिले घर शोधले .ते शोधणे म्हणजे आपल्या कडील अरेज विवाह करण्यासारखे असते .येथे नेटवरून किंवा पेपरातून घराच्या जाहिराती पाहीच्या .शक्यतो दलाल टाळायचे कारण ते ५०० ते ८०० युरो दक्षिणा घेतात (८०० युरो फांक फ्रुट साठी पुढे मोजलेच ..)मग मुलाखतीचा कायक्रम असतो म्हणजे प्रत्यक्ष घर पाहण्यासाठी वेळ दिली जाते. त्या वेळेवर अनेक इच्छुक येतात घर पाहून जर ते आवडले तर थाबायचे नाही तर कल्टी मारायची
.ज्यांना घर आवडले त्यांनी आपला नावं व्यवसाय अशी प्राथमिक माहिती द्यायची .त्यातून एक दोन दिवसात शोर्ट लिस्ट झालो तर मुलाखतीला जायचे. .ह्यातून प्रश्न उत्तराच्या माध्यमातून भाडेकरूच्या आर्थिक/ सामाजिक /सांस्कृतिक आणि बर्याच परिस्थितीचा अंदाज घेऊन मग घर हातात येते .त्यासाठी ३ महिन्याचे भाडे अनामत रक्कम म्हणून द्यायची .व दर महिन्याच्या पहिल्या तारखेला भाडे अंदाजे ६०० युरो विथ वार्म म्हणजे काय तर साडे ४०० युरो हे घराचे मूळ भाडे व हिटर /नैसर्गिक वायू /.वीज ./पाणी ह्या सर्वांचे मिळून दीडशे युरो म्हणजे वार्म (हिटर मुळे त्याला वार्म म्हणतात )
आबू धाबीला सर्व घरात एसी तर येथे सर्वत्र हिटर हा आवश्यक भाग असतो .थोडक्यात काय तर निसर्गाला तोंड देण्यासाठी २४ तास मानवनिर्मित उर्जा साधनांवर आम्ही परावलंबी होतो .आबुधाबित एसी बिघडला तर त्या घरात ४५ ते ५० च्या तापमानात राहणे शक्य नसल्याने मुक्काम हलवावा लागतो .तोच न्याय येथे हिटर बिघडल्यावर असतो .
पंख्याशिवाय नुसत्या खिडक्या उघड्या ठेवून झोपायला हे काही पुणे नाही .
नशीबवान आहेत लेकाचे.
कलोन हे शहर मला प्रथमदर्शनी आवडले .माझ्या बायकोने आलम जर्मनीतून ह्या शहराची का निवड केली हे कळले .शेवटी तिच्या निवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे (मी सुद्धा तिचीच निवड नाही का ?)
जर्मनीतील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले कलोन हि जर्मनीची सांस्कृतिक राजधानिच रैइन ह्या त्यांच्या प्रमुख नदीवर वसलेले हे शहर ह्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे स्टेशन बाहेर ९०० वर्षापूर्वीचे भव्य चर्च अत्यंत भव्य व अप्रतिम कलाकृतीचे हे चर्च म्हणजे सुंदर लेणे आहे .माझी बायको व तिचे कुटुंब पक्के नास्तिक कर्म वादावर विश्वास ह्याब्बत तिने मला सांगितले आमच्या कडे दुसर्या महायुद्धानातर स्वकर्तुत्वावर प्रगती केल्याने कर्म वादाचा पगडा जनतेवर बसला त्यामुळे चर्चात तरुण पिढी फारशी जात नाही ..पण आर्ट व शिल्प कला हे माय लेकींच्या आवडीचा विषय .त्यामुळे आम्ही त्या भव्य चर्च पासून माझे कलोन दर्शन सुरु केले
.नंतर सासू आल्यावर आम्ही दोघांनी त्या चर्चा माथा गाठला तेही एकाच वेळी जेमतेम दोन माणसे जातील इतका रुंद नागमोडी जिन्हा चढत गेलो .वरून बर्फाची रजई पांघरलेले कलोन दिसत होते .आखीव रेखीव तारुण्याने मुसमुसलेले (मी कलोन शहराबद्दल बोलतोय ) बाकी ११ व्या शतकात बांधलेले हे चारच म्हणजे मला ट्वीन टॉवर ची आठवण झाली .दोन उत्तुंग मनोरे .अप्रतिम बांधकाम व भव्य मोठी घंटा जिचा घंटानाद रविवारी बारा वाजता होतो तो निरव शांततेत अर्ध्या शहराच्या कानी पडतो ..पण ह्या लोकांना आपल्या कडे असते तसे होली टुरिझम जमले नाही .
चपला संभालाण्यापासून ते नैवैद्य दाखवण्यासाठी थाळी किंवा मुर्त्या व सीड्या /पुस्तके विकणे असे लघु उद्योग ह्यांच्या देव स्थानाच्या आजूबाजूला नसतात हे मात्र खटकल .चर्चा खाली तळघरात संताच्या कबरी होत्या .
तळघर कमालीचे थंड व एखाद्या गूढ वातावरणे भारले होते .ती निरव शांतता मनाला अंतर्मुख करून गेली .वरती चर्चा भिंती रंगीबेरंगी काचा त्यावर बायबलचे प्रसंग चितारले होते .मग मेणबत्ती लावून मी तिथे जरावेळ बसलो .आजू बाजूला अनेक देशांचे पर्यटकांचा थवा आपल्या मार्ग दर्शकासः माहिती जाणून घेत होते .तेथून निघाल्यावर बाहेर मोठी प्रशस्त जागा आहे व पाठीमागे रायन नदी
.
.ह्या शहरात नेहमीच काही ना काहीतरी जलसे अथवा कायक्रम होत असतात .कारण हे शहर प्रसार माध्यमे व रेडियो ह्याचे माहेर घर आहे .आपल्या सारखे सगळे काही मुंबईत आल्याने सर्व परप्रांतीयांना दुसरा पर्याय उरला नाही .यथे प्रत्येक शेत्र हे जर्मनीच्या विविध भागात विभागले गेले आहे .जसे आर्थिक भाग फ्रांक फ्रुट वगैरे .
कलोन ची माणसे माझ्या मते सर्व जर्मनीत प्रेमळ म्हणून प्रसिद्ध आहेत .हे माझ्या बायकोचे म्हणणे मला पटले .नदीकाठी फेरफटका मारून झाला .ह्या शहराची बांधणी म्हणजे नव्या जुन्याचा संगम आहे .सगळ्यात प्रसिद्ध चोकालेत म्युझियम मला पाहायला जायचे होते .
चोकलेट चे म्युझियम म्हणजे काय असा प्रश्न मी बायकोला नि सासूला विचारला तेव्हा त्यांनी सांगतिले चोकलेत खाण्यात जर्मनी जगात पहिल्या ३ नात येते .ते आणि बियर ह्या दोन गोष्टी जर्मन आयुष्यातील अविभाज्य अंग आहे .
ह्या चोकलेट बद्दलची समग्र माहिती ह्या ,म्युझियम मध्ये मिळेल .तेथे गेल्यावर ते बनण्याची प्रक्रिया अगदी कोको जगात कुठे किती प्रमाणात पिकते . ,मग जगभरात कोणते देश ह्याचे प्रमुख भोक्ते आहेत .व जगातील प्रमुख चोकलेट चे उत्पादक व त्यांचे लोकप्रिय ब्रांड ह्या बद्दल बौद्धिक झाले .मी मात्र थियरी खूप झाली जरा डेमो पाहूया म्हणून पुढे सरकलो .नि समोर चक्क चोकलेट चे कारंजे होते .ज्यातून फक्त चोकलेट चा एकसंथ फवारा येते होता .लांब अंतराने ते चिखलाचे डबके वाटत होते .पण ह्या डबक्यात चुकून पडलो तर उठायचे कष्ट कोण घेईन .? बाकी गाईची अस्सल प्रतिकृती असलेला पुतळा व हत्तीची छोटी छबी खूपच चांगली होती ..डबक्यात हात घालावा असा मला मोह होत होता .पण डबक्याजवळ चोकलेट एवढी गोड स्वयंसेविका एक रेफेल त्या डबक्यात व्यवस्थित बुचकळून आम्हाला देत होती .चव निव्वळ अवर्णीय होती
.तिथून आम्ही आलो ते रायन नदीच्या पुलावर येथे ट्रेन करिता मोठा पूल होता व त्याच्या लगत पादचारी लोकांकरिता एक छोटा पूल होता त्या पुलाला जाळ्यांचे कुंपण होते .त्या कुंपणावर हजारो कुलपे लावली होती .मग कलोन शहराची आगळी वेगळी प्रथा कळली .ह्या शहरात लग्नाच्या गाठी मारल्या कि नव विवाहित जोडपे येथे येते .व जाळीला कुलूप बांधते व चावी नदीत फेकून देतात .कुलपाचा अर्थ येथे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकल्याचे सिंबोलिक .म्हणून लावतात .लग्नाच्या बेडीत (आयमिन कुलपात अडकल्याची निशाणी )
काही कुलापांवर आपण पूर्वी डब्यांवर जशी नावे लिहायचो तशी नावे व लग्नाची तारीख लिहिली होती .तेथून आम्ही स्टेशन वर आलो .अल्बर्ट येणार होता .आता पित्याला पाहून दाटून कंठ येतो अशी अवस्था होणार कि काय बायकोची .अशी गमतीदार कल्पना आली. त्याने आल्या आल्या आज त्याचा क्लब जिंकला म्हणून मी खुशीत आहे .असे सांगितले .बाकी ह्या फुटबॉल पटू व गाढवामध्ये एक साम्य असते म्हणजे दोघेही लाथा मारतात . आपण सर्व भारतीय गाढव असल्याची समजूत करून नेते आपल्याला आश्वासनाचे गाजर दाखवत असतात .असो... .दुसर्या दिवशी आम्ही भटकंतीला निघालो

.जर्मनीचे रस्त्यावरचे खाद्य म्हणून प्रसिद्धीला आलेले करी सोसेज .हा पदार्थ बर्लिन मध्ये १९४९ मध्ये
प्रसिध्धीस आला . मस्त मसालेदार असलेला सॉस म्हणून बहुदा नावं करी व त्यात सॉसेज चे काप व वर मिरपूड शिंपडलेली व त्या बरोबर क्रिकेट मधील बेल्स च्या आकाराचे पाव ..देतात .सासर्याने तिखा डालो अशी फार्मैश केली .आम्ही दोघे अचंबित .मग पावले मधुशालेकडे वळली .काय भव्य आणि दिव्या अर्वाचीन वारसा सांगणार्या अश्या ह्या मधुशाला हे त्यांचे सांस्कृतिक वैभव गोथिक पद्धतीच्या जुन्या काळाच्या इमारती आत प्रवेश केल्यावर वातावरण निर्मिती आम्हाला थेट
काही शतके मागे घेऊन गेली .त्यातच सेविका मोठ्या झगा घालून तर सेवक आमच्या दिमतीला तंग विजार व तलम अंगरखा घालून होता सगळे कसे एकदम पारंपारिक .मेज व बहुतेक सर्व गोष्टी लाकडाच्या .बनलेल्या तर भिंतीवरील चित्रे देखील जुनी व कलात्मक होती (मला ह्या कलेतील फारसे काही कळत नाही .मला सर्वच चित्रे कलात्मक वाटतात .
येथे बियर चा ग्लास एका परीक्षा नळी असते ना त्यासारखा फक्त परीक्षा नळी हून मोठा असतो . तो आणण्याची तरा एकदम न्यारी एक लाकडी बास्केट तिला त्या ग्लासच्या आकाराची भोक अश्या भोकात ग्लास एकदम फिट बसवलेला असे २० ग्लास भरलेली बास्केट घेऊन हि मंडळी फिरत असतात .व अंधुक मेणबत्तीचा सर्वत्र राज्य होते .काचा तावदाने सर्व काही जुनी कि आत बसल्यावर थोडक्यात हॉलीवूड मध्ये सेट उभारावा इतकी सुंदर वातावरण निर्मिती जणू त्यात सेविका आदबीने येणार व जर तिला काही ऑर्डर केले नाही तर न बोलता ती जितक्या व्यक्ती तेवढे ग्लास ठेवून जाणार .फक्त जाताना कोस्टर ठेवून जाणार ह्या कोस्टर वर ती एक फुली करून जाणार .पुढच्या वेळी जर तुमच्या गप्प रंगत आल्या असतील .आणि तुमचा चषक रिता झाला असेल तर ती न सांगता अजून एक चषक ठेवणार व अजून एक फुली मारणार .अर्थात तुम्ही नको असे सांगू शकतात .व जेवढ्या फुल्या तेवढे पैसे द्यायचे जुनी पारंपारिक पद्ध्ध्त .तसे पहिले तर येथे जगभरातील मद्य असतात.
पण कर्जत स्टेशन वर कचोरी व अकोला स्टेशन वर कोणी वडा ऑर्डर करत नाही .त्यातला हा प्रकार .कलोन वासियांचे त्यांच्या कुल्श (स्थानिक बियर ) वर जीवापाड प्रेम व प्रचंड अभिमान .तेवढ्यात हातात हात घालून ते दोघे आले .एकच वेशभूषा .एकाच रंगाचे कपडे'' अगदी दो जिस्म एक जान'' हे जगाला दाखवण्यासाठी त्याची सर्व सारखे घालण्याची अगदी हातातील अंगठ्या वैगेरे ह्यात अहमिका होती ,सगळ्यात मस्त चट्टेरी पट्टेरी विजार(पुरवी दादा न अलीकडे गोविंदा घालतो तश्या )
सुंदर ते ध्यान बसले आमच्या शेजारी नि घातल्या चोचीत चोची .

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2011 - 5:14 pm | निनाद मुक्काम प...


.चर्च आतील गाभारा
भिंतीवरील रंगीबेरंगी काचकाम

चर्च मधील मुख्य मूर्ती

आमोद शिंदे's picture

1 Feb 2011 - 6:33 pm | आमोद शिंदे

चर्चमधील मुख्य मुर्ती बाहेर पुलावर उभी?

भारी एकदम निनादराव.. तुम्ही तर एकदम जर्मनी दर्शन करुन आणताय आम्हाला..

- पिंगू

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2011 - 5:29 pm | निनाद मुक्काम प...



नदीच्या काठावरी चर्चचा देखावा व चर्चच्या लगत कलोन शहराचे मुख्य रेल्वेस्थान

कारंजे

विविध आकाराचे चोकलेट कसे बनते ह्याचे प्रात्यक्षिक

हि गाय कापून खावी का नको? अश्या धर्म संकटात सापडलो .

५० फक्त's picture

29 Jan 2011 - 5:49 pm | ५० फक्त

निनाद,

"सुखी माणसाकडे अमेरिकन कंपनीत नोकरी, जपानी बायको, , जर्मन कार तर दुखी माणसाकडे अमेरिकन बायको, भारतीय कंपनीत नोकरी, चिनी कार असते. - " असो बापडे कोणाकडे काहिहि असो,

पण मिपाकडे तु आहेस हे खुप छान आहे. तुझ्या लेखनाने सुख मि़ळावं अशा ब-याच गोष्टी भरुन पावतो आम्ही. घरबसल्या जर्मनि दर्शन आणि ते पण आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर फिरणा-याकडुन या सारखं दुसरं सुख ते काय असणार आहे रे ?

लिहिते राहा, आम्ही वाचत राहु. अतिशय धन्यवाद.

हर्षद.

आख्यानचा हा भागही रंगलाय.

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:37 pm | दादा बापट

निनाद,
येउ द्या. वाट बघतोय.

संजय अभ्यंकर's picture

29 Jan 2011 - 10:34 pm | संजय अभ्यंकर

कोलोनची चित्रे डकवल्या बद्दल! आभारी आहे!

भुतकाळात गेलो. कोलोन हे माझे जर्मनीतले आवडते शहर (कोल्श बिअर सुद्धा! प्रोस्त!).
कोलोनला गेलो होतो तेव्हा तेथे १५ दिवस होतो. कोलोन शहर मनोसोक्त फिरलो.

कोलोनचे प्रसिद्ध चर्च (ज्याचा फोटो डकवला आहे) ज्याला क्योलनर डोम म्हणतात व त्या जवळचे मार्केट.
येथे देशोदेशीची ब्यांड पथके संगीताचे कार्यक्रम सादर करतात, डोमच्या प्रांगणात ऑपेरासुद्धा सादर होतात.
येथे तासनतास टाईमपास होतो.

र्‍हाईनकाठी बीयर पीत येत्याजात्या बोटी पहाणे ह्या सारखे आनंदाचे क्षण आठवले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2011 - 11:29 pm | निनाद मुक्काम प...

अगदी अगदी
डोमच्या प्रांगणात बारा महिने जत्रेचा माहोल असतो .
कलोन हे कलासक्त शहर आहे .टीवीचे अनेक डेली सोप /व विविध कार्यक्रम येथून साजरे होतात .आजही माझ्या बायकोला नि मला कलोन सर्वात जास्त प्रिय आहे .(वसंत ऋतूत म्युनिक फिर म्हणजे बाकी जर्मनी तुला मिथ्या वाटेल .असा सल्ला खूप जणांकडून मिळाला आहे मुंबईत वैशाख वणवा नकोसा वाटायचा. घामाच्या धारा नि लोकल मध्ये घामामुळे कपडे अंगाला चिकटलेले तर बाजूला लोक अंगाला चिकटलेले .
पण येथे युरोपात तो आल्हादायक असतो . (खाण्यापिण्याची मात्र बोंब आहे .लंडन ला मिसळ व पावभाजी रेडी तो कुक तरी मिळायची .येथे तोही प्रकार नाही )
.त्यात मिपावर पाककृती सदरात हि मंडळी जिव्हेची वासना चेतवतात .)
त्या मार्केट मधील प्रसिध्द करी वूस्ट चाखले आहे का ?
ते नाही तर शाकाहारी बटाट्याच्या तळलेल्या चकत्या (चिप्स ) त्यात कांदा/ चीज आणि करी सॉस किंवा मेयोनेज /टोमेटो सॉस असतो .
ते तर अप्रतिम .ह्या सॉस मध्ये साफ बुडालेले चिप्स खाणे म्हणजे जबरदस्त ( फोटो मध्ये मी तेच खात आहे .)

स्वाती दिनेश's picture

30 Jan 2011 - 12:25 pm | स्वाती दिनेश

फ्राफु पासून क्योल्न १९१ किमी अंतरावर आहे.. आणि आय सी इ ने म्हणजेच जलदगतीने जाणार्‍या ट्रेनने सव्वा तासात फ्राफु ते क्योल्न अंतर कापता येतं, त्यातून सांस्कृतिकतेचा वारसा असलेलं , क्ल्योल्निश वासर म्हणजेच कलोन वॉटर- आउ द कलोनचे जन्मगाव पहायला कितीवेळा कितीजणांबरोबर गेलो तरी प्रत्येक वेळी ते नव्याने आवडते.
निनाद, सगळ्या आठवणी ताज्या केल्यास..
जाता जाता- फ्राफु - क्योल्न हा रेल्वे फास्ट ट्रॅक आमच्या आकिम आजोबांच्या टिमने डिझाइन केला आहे.
स्वाती

सोत्रि's picture

30 Jan 2011 - 4:24 pm | सोत्रि

चॉकलेटच्या कारंज्याचा फोटो डकवू शकाल का ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Jan 2011 - 1:29 am | निनाद मुक्काम प...



मी जेव्हा ह्या कारंज्या विषयी प्रथम वाचले ( म्युझियम मध्ये तिकीटा सोबत एक पुस्तिका दिली .त्यात म्युझियम चा नकाशा व प्रत्येक भागाची माहिती दिली होती .)
''मला असावा सुंदर चोकलेट चा बंगला'' हे बालगीत आठवले .होते .अगदी खरे सांगायचे तर मी चोकलेत चे बरेच प्रसिध्द ब्रांड खाल्ले आहेत .पण जिभेवर बालवयात रुळलेली डेरी मिल्क च्या चवीला तोड नाही

.(भले त्यात कोको कमी आणि साखर जास्त असायची .) मी प्रथम जेव्हा ७० % कोको किंवा अगदी ९० % कोको असलेले अस्सल चोकलेट पहिल्यांदा खाल्ले तेव्हा मला ते चोकलेट वाटलेच नाही .कारण चवीला ते कडू वाटले .होते
.नि रेड वाईन ची चव कशी वाटली? . असे पहिल्या वर्षी भारतात कॉलेजात विचारले .तेव्हा माझे उत्तर होते '' वैद्य पाटणकर काढ्या सारखी ''

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 5:58 am | गुंडोपंत

मस्त लेखन.

खुल्या बाजारात चीन व अमेरिका अश्या नावाला न घाबरता स्वताचे सत्व ओळखले तर जनता जनादर्न हि देशःच्या ब्रान्डला प्राधान्य देते .हे लक्षात आले हे आवडले.

धमाल मुलगा's picture

1 Feb 2011 - 6:23 pm | धमाल मुलगा

झकास!

एव्हढी चाकलिटं पाहूनच गार पडलो. तिथं लोकांना चाकलेट एव्हढं आवडतं?

बाकी, फोटू भारीएत हां निनाद. :)

आमोद शिंदे's picture

1 Feb 2011 - 6:32 pm | आमोद शिंदे

हीच का ती अमेरिकेतली प्रसिद्ध 'स्टार बग्स' कॉफी?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Feb 2011 - 7:10 pm | निनाद मुक्काम प...

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे धन्यवाद .
बाकी खरच रोज गोड खाण्यात आणि चोकलेट खाण्यात हि लोक प्रसिध्द आहेत .
स्टार बग्स किंवा कोस्टा असे अनेक जगभर प्रसिध्द ब्रांड भारतात यायला मात्र कचरतात .
ह्याचे कारण भारतीय बरिश्ता व सी सी डी इतके स्वस्त नि मस्त खान पान सेवा ते दु शकत नाहीत .
लावाझा हे युरोपातील नामवंत कॉफी शेत्रातील नामवंत नाव .पण प्रत्येक युरोपियन देशात आपले अस्तित्व टिकवून आहेत .ह्या उलट स्टार बग्स मात्र वेगात युरोपियन बाजारपेठ काबीज करत आहे .
मात्र भारतात लावाझा ने बरीष्टाला भागीदार केले .व त्यामुळे आज भारतीय बाजार पेठ हि त्यांची अंकित आहे .माझ्या बायकोने आणि अनेक परदेशी मित्रांनी जाहीर कबुली दिली कि आईस कॉफी मध्ये बारिष्ट व केक्स व इतर बाबीत सी सी डी हे परदेशी कॉफी चेन्स पेक्षा अप्रतिम आहे .
मला स्वताला मुंबईतील भटाचा कटिंग प्राणप्रिय आहे .( हि लोक राजस्थान वरून काही वर्षापूर्वी आली .आता पिढ्यान पिढ्या शंकराच्या नावाने टी हाउस चालवतात )
कॉफी प्यावी तर टपरी वरची .जिथे कोणालाही शिव्या /हिणकस शेरे ./ताशेरे ज्यात राजकारणी /जुने नवे दोस्त / मैत्रिणी / ह्यांचा समावेश होतो .
त्याला बंदिस्त सोफेस्टी करणाची झाल बसली नसते .खुल्या हवेत गटाराच्या साक्षीने (त्यांचा सुंगंध वातावरणाला एक वेगळाच कैफ चढवतो ) .साथीला मुसळधार पाऊस नि बसायला कट्टा किंवा बाईक्स (शक्यतो दुसर्याच्या )
भन्नाट रसायन .

परिकथेतील राजकुमार's picture

1 Feb 2011 - 7:38 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे !

चॉकलेट आणि त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या मिठाईचा फोटू मस्तच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2011 - 4:18 pm | निनाद मुक्काम प...

कलोन च्या डोम व मुख्य बान हौफ (मुख्य रेल्वेस्थानकाच्या )मध्ये ह्या पायर्या व विस्तीर्ण पटांगण आहे .तेथे गायनाचे जलशे/ किंवा एखादे वाद्य कला स्वताची कला सदर करत असतात
.त्याचे बहुरंगी वेशभूषा व बहुगुणी कला पाहणे हा एक सोहळाच असतो.
.बारा महिने सैदैव विविध कलांचा येथे जल्लोष चालला असतो .
कलासक्त कलोन चा विरह जाणवतो .
अश्या शहराची रंजक माहिती त्यांचे वर्षभर चालणारे उपक्रम ह्यांची रोचक माहिती माझ्या रटाळ आख्यानातील पुढील भागात

वाहीदा's picture

5 Feb 2011 - 5:32 pm | वाहीदा

निनाद तुझे yummy लिखाण खूप खूप आवडले. :-)

सुंदर लेख्..आणि फोटो ही छान. हा आधी वाचायचा राहिला होता बहुतेक.

सुंदर लेख्..आणि फोटो ही छान. हा आधी वाचायचा राहिला होता बहुतेक.