http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २
http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
http://www.misalpav.com/node/15893 भाग ४
http://www.misalpav.com/node/15996 भाग ५
http://www.misalpav.com/node/16085 भाग ६
http://www.misalpav.com/node/16534 भाग ७
http://www.misalpav.com/node/16661 भाग ८
http://www.misalpav.com/node/17013 भाग ९
म्युझियम च्या आवारात शिरतांना वायोलिन चे सूर कानावर पडले .कदाचित ते एवढे काही मनाला हुरहूर लावणारे नव्हते पण धुक्याची गडद झूल घेऊन पहुडलेल्या त्या गर्द झाडा झुडपांच्या पार्श्वभूमीवर ते मला आवडून गेले . येथे भिक मागण्याचा रिवाज नाही .आपली कला सादर करून कष्टाने पैसा मिळवण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न असतो. .त्या वादकाची वेशभूषा सुद्धा एका प्राचीन युरोपियन नाईट सारखी होती. त्याला तब्बल अर्धा युरोची बिदागी देऊन मी मार्ग्रस्थ झालो .. सकाळी पोहोचल्याचा एक फायदा म्हणजे रांग जास्त नव्हती.
.आत आल्यावर त्या भव्य इमारतीत पहिले मोठे दालन डायनासोर ने व्यापले होते . करोडो व लक्षावधी वर्षापूर्वी च्या भूतलावरच्या रहिवाशांचे .जगभरात उत्खालनात सापडले जीवाश्म व हाडे त्यांनी येथे जमा करून ठेवली होती . .मेमेथ म्हणजे हत्तीचा पूर्वज व त्याच्या हाडाचा अजस्त्र सापळा पाहून तसेस दोन मजली उंच डायनासोरचे मांडीचे हाड पाहून माझी छातीच दडपली .
दुसर्या दालनात अनाकोंडा /सिंह आदी जनावरांचे पेंढे भरून ठेवले होते .त्यातील जगभरातील सापांचा दालन अप्रतिम होते. .भारतीय किंग कोब्रा .आणी माझ्याहून उंच आफ्रिकन मंबा (सर्वात विषारी साप पाहून मी शहरलो ).पुढचे दालन जगभरातील चिमण्या व पक्षी जसे मोर /गिधाड /गरुड / शहामृग /व अनेक विविध पक्षी जमातींचे होते ..जगभरातील पक्षि हे येथे त्यांच्या मूळ वसतीस्थान व माहितीसह येथे उपलब्ध होते .त्यांच्यावर आधारित छोटी शोर्ट फिल्म काही तासाच्या अंतराने तेथील थिएतर मध्ये दाखवत होते . मग अचानक पोटात परत कावळे कोकलायला लागले .त्यांच्या आलिशान उपहारगृहात माझा मस्तपैकी ब्रंच झाला .
ब्रंच ह्या संकल्पनेचे जनक इंग्रज आहेत . हा इंग्लिश साहेब रविवारी आपल्यासारखे जरासे उशिरा उठतो .ब्रेक फास्ट जे त्याच्या दैनदिन जीवनातील प्रमुख जेवण असते .त्याला ब्रेक देऊन लंच व ब्रेक फास्ट ह्यांची सरमिसळ करून दुपारचे भलामोठा जेवणाचा शाही बेत असतो..इंग्लिश हॉटेलात हा ब्रंच करणे म्हणजे पर्वणी त्याला साथ फ्रेंच वारुणी हवीच .मी मात्र वारुणीची तहान येथे बियर वर भागवली
.
.मग मुक्काम पुढचे दालन म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट स्फटिक /दगड धोंडे. थंड झालेल्या ज्वालामुखीचा लाव्हा ह्यांचा होता . अथांग अवकाशातून आलेल्या उल्कांना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्या अनावर आकर्षणाने आपल्या कडे खेचते व पतंगाप्रमाणे ह्या सुद्धा बिनधास्त झेपावतात व जळून खाक होतात . त्यापैकी दस का दम असेल्या क्वचितच आपले अस्तित्व टिकवून ठेवतात . मानवांसाठी तो एक संशोधनाच्या द्र्ष्टीने फार मोठा ठेवा असतो .हा अमूल्य ठेवा मला हाताळायला मिळाला ह्याचे मी भाग्य समजतो. त्यातल्या काही इतक्या मोठ्या होत्या कि जर एखाद्याच्या डोक्यावर पडल्या असत्या तर कपाळमोक्ष ठरला असता.
.
मोठ्या व छोट्या उल्का हाताळतांना ह्या पृथ्वी वरील नाहीत ह्याच गोष्टीचे थ्रील जास्त होते .तीच गोष्ट डायनासोर व मेमेथ चे खरे खुरे सांगाडे पाहताना होती .बाकी सुट्टीचा दिवस असल्याने पालक लहान मुलांना घेऊन आले होते. .पाशात्यां देशात मुलांवर वैज्ञानिक संस्कार व दृष्टीकोन हा बाल्यावस्थेत जाणीवपूर्वक विकसित केला जातो हि नवी माहिती मिळाली. ..
मला व केट ला फ्रांक फ्रुट फारसे आवडले नव्हते .
कारण ह्या शहर जगभरातील निर्वासित लोकांनी भरलेले आहे अरब व आफ्रिकेतील व अफगाण व पाकिस्तान मधील निर्वासित ह्या शहरात वस्ती करून आहेत .
. त्यामुळे प्रमुख स्टेशनच्या बाहेर आल्यावर गर्दुल्ले /बेवडे रस्त्यावर दिसतात व समोरच युरोपातील प्रख्यात व मोठे वेश्यालय आहे . स्टेशन बाहेरील फार मोठा एरिया हा वेश्यागृहांनी व्यापला आहे .व युरोपातील अत्यंत स्वस्त दरात येथे हा व्यापार चालतो .येथे पूर्व युरोपातील व दक्षिण अमेरिकेतील मुलींचा भरणा जास्त असतो . हा बाजार येथे एवढ्या खुल्या रीतीने अधिकृत रित्या चालतो .कारण जर्मनीत वेश्या व्यवसाय हा काही प्रमाणात कायदेशीर आहे . .खरे तर शहराच्या मध्यभागी अशी वस्ती असणे हे काही भूषण नव्हे पण युरोपातील हे प्रमुख व्यापारी शहर बारा महिने व्यापारी संमेलन कितीतरी मेळावे /प्रदर्शने ह्यांनी व्यस्त असतात .
त्यामुळे परदेशी लोक येथे मोठ्या प्रमाणत व्यापाराला येतात . ह्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून लाल इमारती येथे उभारल्या आहेत .
.बाजूला अनेक सेक्स शॉप आहेत .ह्यांच्यात पुस्तके /विडीयो .ह्यांच्यात निळ्या सिनेमांचे मिनी थिएतर असते . ते पाहून मला थेट चेंबूर ते टिळकनगर स्थानकादरम्यान राहुलनगर ची आठवण झाली .हे संपूर्ण नगर ( झोपडपट्टी ह्या सिनेमागृहांसाठी प्रसिद्ध होती .)
तसेस हंटर /हातकड्या /चित्र विचित्र मुखवटे व बाहुल्या आणि बरेच काय काय विकायला असते .लंडन मध्ये सोहो हा परिसर ह्या सर्व गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे .अर्थात तो शहराच्या खूपच आतल्या भागात आहे . येथे अमली पदार्थ सहजासहजी कसे काय मिळू शकतात ह्याचे मला नेहमीच नवल वाटते . युरोपातील अनेक शहरात आढळतात तसे सार्वजनिक टेलिफोन बूथ मध्ये खाजगी नंबर सचित्रासह दिले असतात. तेथे अनेक खाजगी व स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या वेश्यांचे त्या कोणती सुविधा किती दराने दिल्या जाणार हे खुलेआम लिहिले असते .. ह्याला सेक्स मेन्यू कार्ड म्हणतात . अर्थात वेश्याव्यवसायाला मान्यता असल्याने त्यांना बँकेत कर्ज सुद्धा मिळू शकते .
युरोपियन युनियन मध्ये पूर्व युरोपातील राष्ट्रे सामील झाली नि त्यांच्या गरीब देशातील बेकारांचे तांडे ह्या प्रगत देशात घुसले नि हा व्यवसाय येथे बहरात आला ..ज्या पूर्वेतील देशांना युरोपियन युनिअन मध्ये प्रवेश मिळाला नाही त्या देशातील तरुणी मग आखाती देशात व आजकाल मुंबई गोवा दिल्ली सारख्या बड्या शहरात आल्या आहेत .केवळ दोन वेळच्या अन्नासाठी त्यांना हे काम नाईलाजाने करावे लागते . अर्थात त्यांना फसवून येथे आणले जाते .अशीच एक फसवून आलेली मुलगी कशी बशी पळून निघाली .सध्या ती आमच्या हॉटेलात काम करते . ती येथे बेकायदेशीर असल्याने शुद्ध मराठी भाषेत भंगी काम करते .आय मीन करायची .कारण एका जागी जास्त वेळ काम करण्याचा धोका ती स्वीकारत नाहीत .इमिगेग्रेशन तेथे कधीही धाड टाकू शकते .अत्यंत गोड व कामसू वृत्तीच्या ह्या मुलीने तिची सर्व कर्मकहाणी व अनुभव आम्हाला सांगितले . . केट ने तीला विचारले .तू तुझ्या देशात का परत नाही ? मी काही मदत करू का ?पैशाची...
तर ह्यावर तिने थंड पणाने उत्तर दिले . सध्या माझ्या देशात यादवी चालू आहे . माझे सारे कुटुंब युद्धात मरण पावले .मी व माझा धाकटा भाऊ वाचलो .तो सध्या माझ्या एका आप्तांकडे मोठ्या मिनतवारी करून ठेवला आहे .जर महिन्याला पैसे तिथे पाठविले नाही तर कदाचित त्याला त्रास होईल. .मी येथे वेटरचा नोकरी मिळावी ह्या आशेवर आली होती . पण नशिबी केवळ २० युरोमध्ये वेश्या व्यवसाय करणे नशिबी आले. ह्यात तिला हातात फक्त १५ च मिळत होते . म्हणून तेथून निघून तीने हॉटेलात हे काम स्वीकारले .
'''मी तुमच्या देशात कर न भरता राहते .पण माझा नाईलाज आहे '' ह्यावर मी केट ला सांगितले
.
''भारतातील २ कोटीहून जास्त बेकायदेशीर बांगलादेशी सुद्धा दारिद्र्याला कंटाळून आपल्या देशात आले .'' पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते . .आमच्या देशात गरीब लोकांना खायला नाही .वर ह्याचे पोषण कोण करणार ? मला अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्याकाशाचे विधान आवडते''.नैतिकता देशाच्या सीमेवर संपते '',
ह्याचा अर्थ देशाच्या सुरक्षिततेसाठी आदर्शवाद व नैतिकता बासनात गुडाळून ठेवायची .प्रगत देशातील पंचतारांकीत हॉटेलात हलक्या दर्जाची कामे अश्या बेकायदेशीर वस्ती केलेल्या लोकांकडून करून घेतात . कमी पैशात जास्त काम म्हणजे भरपूर नफा असे अस्सल भांडवलशाहीचे सूत्र वापरतांना कायदा फाट्यावर मारला जातो .
लवकरच आम्ही ह्या शहरातून मुक्ततेचा मार्ग शोधू लागलो .पण आहे त्या वास्तव्यात आजूबाजूची शहरे पाहून घेऊ असा विचार डोक्यात आला . नि जर्मनीत अत्यंत उच्चभ्रू लोकांचे स्टायलीश शहर डिसेलदोर्फ कडे आमचा मोर्चा वळला .
प्रतिक्रिया
16 Oct 2011 - 12:12 am | निनाद मुक्काम प...
16 Oct 2011 - 12:14 am | माझीही शॅम्पेन
वेलकम बॅक ड्यूड :) बर झाल परत लिहिता झालास ते :)
16 Oct 2011 - 8:33 pm | आमोद
+१००
16 Oct 2011 - 8:33 pm | आमोद
+१००
16 Oct 2011 - 12:18 am | निनाद मुक्काम प...
अवकाशातुन आलेल्या मोठ्या उल्का जर एखाद्याच्या डोक्यावर पडल्या असत्य तर ..
16 Oct 2011 - 12:19 am | निनाद मुक्काम प...
म्युझियम
16 Oct 2011 - 3:33 am | अर्धवटराव
आयला... हि उल्का तर थेट माणसासारखी दिसते... कपडे देखील घातलेत... उगाच लोकं आमच्या प्राचीन ग्रंथांना नावं ठेवतात... त्यांना म्हणावं बघा, अंतरीक्षात मानवसदृश प्राण्यांचा अस्तीत्वाचा हा ढळढळीत पुरावा ;)
जोक्स अपार्ट, फोटो छान आलेत. तुम्ही जेंव्हा हे सगळं बघितलं त्यावेळची जर्मन स्थिती आणि आजच्या घटकेत काहि फरक जाणवतो का? माझा एक बल्गेरियन मित्र सांगतोय कि युरोपियन युनिअनच्या कर्जबाजारी देशांचा भार वाहता वाहता जर्मन मेटाकुटीला आलय... पुर्वी सार्वजनीक बाबींवर त्यांचं सरकार जितका खर्च करायचे तेव्हढं आता जमत नाहि वगैरे...
(ना-झी) अर्धवटराव
16 Oct 2011 - 10:54 am | ५० फक्त
+१ अर्धवटराव,
16 Oct 2011 - 11:46 am | निनाद मुक्काम प...
जर्मनी हा युरोपियन युनियन मधील सर्वात महत्वाचा देश ( सगळ्यात जास्त फंड देणारा ) युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था
जिने युरोपात सर्वप्रथम मंदीतून बाहेर आल्याची घोषणा केली .
इंग्लड ला टाटा करत आम्ही जर्मनी मध्ये यासाठी आलो ( जहाज बुडत असेल तर सर्व प्रथम उंदीर ..) हे माझ्यासाठी लागू होतो .
मात्र तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे . ह्यावर जरूर लिहीन .
16 Oct 2011 - 12:45 am | वाहीदा
परत एकदा लिहीते झालात यात आनंद आहे !
16 Oct 2011 - 6:25 am | रेवती
मिपावर परतलात याचा आनंद वाटला.
मालिका वाचत आहे. हा भाग चांगला झालाय.
डायनासॉरचे सांगाडे आवडले.
आईस एज सिनेमातला मॅमथ आठवला. (अर्थातच हसू आले.)
16 Oct 2011 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मालक, लेखन वाचतोय. फोटोही छानच.
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
16 Oct 2011 - 12:00 pm | प्रास
वेलकम बॅक!
जर्मन आख्यान पुन्हा सुरू केल्याबद्दल आभारी आहे.
यावेळचे वर्णन आणि फोटोज छानच आहेत.
पुलेप्र.
:-)
16 Oct 2011 - 2:21 pm | साती
पुन्हा लिहायला सुरूवात केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!
16 Oct 2011 - 3:06 pm | अविनाशकुलकर्णी
निनाद राव मस्त लिहिले आहे...
16 Oct 2011 - 4:14 pm | इरसाल
छान निनाद.वृतांत आवडला.डसेलडॉर्फ च्या भागाची वाट पाहतोय.(२०१० ला डसेलडॉर्फ आणि क्लेवेला होतो).
वापसी में बडी देर लगा दी भई ?
16 Oct 2011 - 4:22 pm | प्रभाकर पेठकर
सर्व १० भाग एका बैठकीत वाचले. मस्त वर्णन आहे.
वाचनिय लेखन (शुद्ध म्हणत नाहिए मी) आणि स्वतःची छायाचित्र टाळण्या बाबत जी काही टिका टिपण्णी झाली आहे त्याशी १०० टक्के सहमत.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
16 Oct 2011 - 9:13 pm | स्मिता.
निनाद, पुन्हा लिहायला लागलात हे बघून छान वाटले.
या भागात शुद्धलेखनातही बरीच सुधारणा दिसतेय.
लिहित रहा. पुलेशु :)
18 Oct 2011 - 1:06 pm | निनाद मुक्काम प...
@ माझीही शेम्पेन ,आमोद,अर्धवटराव ,५०फक्त ,वहिदा, रेवती ,प्रा.डॉ दिलीप बिरुटे,प्रास ,साती,अविनाश कुलकर्णी, इरसाल,प्रभाकर पेठकर ,स्मिता,गणपा,विश्वनाथ मेहेंदळे
सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद
पुढचा भाग शुक्रवारी टाकतो .