प्रिय माधुरीस

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
20 Sep 2011 - 6:57 pm

प्रिय माधुरीस,

तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते. त्यानंतर त्याच शिनेमात लोठिया पठाणचा अड्डा उध्वस्त करुन मुन्नाबरोबर जाणारी प्रचंड धास्तावलेली, घाबरलेली मोहीनी तु साकारलीस आणि तुझ्या अभिनय क्षमतेची चुणुक दिसली.

त्यानंतर तुझे सिनेमे येत गेले आणि तु तुझ्या अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्याच नव्हे तर तमाम चाहत्यांच्या काळजाचा तुकडा बनत गेलीस. दाक्षिणात्य ताराकांच्या दाक्षिणात्य हिन्दी उचारांनी बॉलीवुडमधे बडबड करुन सुपरस्टारपद मिळवण्याच्या मालिकेला सुरुंग लावुन तु बॉलीवुडची अनभिषिक्त साम्राज्ञी बनलीस ते केवळ तुझ्या अभिनय, नृत्य क्षमतेने आणि मधाळ हसण्याने.

अनिल कपुर ह्या तगड्या अभिनेत्याबरोबर तु अभिनयाची तितकीच तगडी टक्कर देउन तु राम - लखन, परिंदा, खेल, जिंदगी एक जुआ, बेटा ह्या सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिलीस. प्रेम-प्रतिज्ञा, दिल बेटा, दिल तो पागल है, देवदास ह्या चित्रपटांमधुन फिल्मफेअरच्या बाहुलीला जिंकलस! तुझ्या मादकतेने घायाळ करत करत तु असंख्य गाण्यांवर उन्मादक नृत्य करत करोडो लोकांच्या दिल की धडकन बनलीस. तुझ्या ह्या गाण्यांमुळे संस्कृती रक्षकांनी अश्लील - अश्लील म्हणुन तुला आणि तुझ्या नाचाला टीकेचे लक्ष केले. मी आणि करोडो चाहत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तुही त्या टीकेला भीक घातली नाहीस.

तुझ्या मधाळ हसण्याने, नितांत सुंदर अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्या हृदयावर राज्य करीत असल्यामुळे तुझ्या अनेक प्रमादांकडे डोळेझाक केली. वर्दी सारखा चिल्लर सिनेमा तु केलास. दयावानसारखा चित्रपटात थिल्लर भुमिकाही केलीस. चुकुन तु संजय दत्तच्या प्रेमातही पडलीस (पण त्यातुन सावरुन तु सुखरुप बाहेरही आलीस) हे सगळे मी माफ केले. कह दो के तुम हो मेरे वरना, धक धक करने लगा, हमको आजकल है किसक इंतजार, मुझको चांद लाके दो ह्या आणि अश्या अनेक गाण्यांमधील तुझ्या अदांपुढे हे सगळे प्रमाद काहीच नाही. देवदास तर केवळ तुझ्यामुळे आणि तुझ्या लाजवाब अभिनयामुळे दर्शनिय आणि लक्षणीय झाला.

त्यानंतर अचाकन तु श्रियुत नेन्यांना आपले करुन अमेरिकेत निघुन गेलीस. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे (लग्न करुन अमेरिकेत जाणे) तुही वागलीस. क़ाळजावर दगड ठेउन 'जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा' असा डोळेभरला निरोप तुला दिला. अचानक तु पुन्हा आलीस आणि नच बलिये म्हणालीस. सिनेमा चालला नाही तु परत गेलीस. काळाची पावले ओळखत परत आलीस ती छोट्या पदड्यावर. पण कुठे माशी शिंकली काय माहित. तु आलीस ते तुझा अमेरिकन "अक्सेंट" घेउन. कार्यक्रम नृत्याशी निगडीत होता त्यामुळे तुझा कार्यक्रमाचा चॉइसही बरोबर होता पण अमेरिकन अक्सेंट मात्र नाही झेपला. पण तरीही तुझे अढळपद अजुन शाबुत असल्यामुळे हेही कसेबसे सहन केले.

पण आज ही बातमी ऐकली, माधुरी मुंबइला परत येणार आणि बिग बॉस मधे येणार. मग मात्र रहावले नाही.

काय झाले आहे तुला? नेन्यांशी काही भांडण - बिंडण? अग होतात भांडणे नवरा बायको मधे त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे? की नेन्यांची डॉक्टरी नीट चालत नाहीयेय? उगाच परत येउन बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती.

तुला एक उदाहरण देतो. आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये.

अजुन काय बोलु, सुज्ञास सांगणे न लगे...

तुझा,
(बातमी वाचुन कळवळुन गेलेला) सोकाजी

जीवनमानप्रकटनविचारमतसल्लाप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

22 Sep 2011 - 1:40 pm | नगरीनिरंजन

तिचं पाठमोरं नृत्य आजही मागल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांत चित्रीत झालेल्या कुठल्याही क्लासिकल नृत्यांपैकी एक अभिजात कलाकृती मानावं इतकं सुरेख आहे

'प्रेमग्रंथ'मधल्या तिच्या पाठमोर्‍या नृत्यां(?)बद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 12:52 pm | सोत्रि

मृत्यन्जय,

ह्या प्रतिसादाबद्दल एक दिल्खेचक कॉकटेल तु(म्हा)ला माझ्याकडुन :)

- (कॉकटेल इतकीच मादक असलेल्या माधुरीचा चाहता) सोकाजी

मी ऋचा's picture

21 Sep 2011 - 1:20 pm | मी ऋचा

>>तब्बुनेही अनेक उत्तम चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे पण तिच्या अभिनयाची जातकुळी वेगळी आहे.

एकदम सहमत. तब्बुचाही अभिनय अतिशय आवडतो. दोघींची तुलना होउ शकत नाही. The two of them belong to different schools of cinema. त्यमुळे ही चांगली ती वाईट असं नाही. दोघीही एकत्रितपणे चांगल्या असू शकतात. तरीही माझं झुकतं माप मात्र माधुरीकडे. क्या करे?

प्रमोद्_पुणे's picture

21 Sep 2011 - 3:57 pm | प्रमोद्_पुणे

कधी पासून माधुरी आवडायला लागली रे? अहो त्या मृत्युंजयाला कसले काकटेल देताय मला द्या, मी लय वेळा लढलो आहे माधुरी कशी बेस्ट आहे ह्यावरून साहेबांबरोबर..

१. माधुरीचा पुकार मधला सीन (लेक जवळचा) अनिल कपूरबरोबरचा जिथे तो तिला म्हणतो न जाणे त्या सिगारेट्स तूच ओढ्त असशील त्यावर ती म्हणते "और नही तो क्या?" काय सहज अभिनय आहे..

२. आणि संगीत मधला ओ रब्बा गाण्यातला अंध स्त्रीचा अभिनय्..केवळ लाजवाब.

३.लज्जा मधली तिची एंट्री आणि टिनू बरोबरचे सर्व ड्वायलाग एक नं.. आणि मॉबसीन बद्दल तर बोलायलाच नको..

४.बेटा मधले अरूणा ईराणी बरोबरचे संवाद तर जबरा आहेत.

५.देवदासतर केवळ तिच्यामुळे सुसह्य आहे वपाडाव ने लिहिले आहेच पण त्याच सीन मधे ती शाहरुख ला प्रेम म्हणजे काय ते सांगते तो संवाद आणि त्या आधीचा जॅकीबरोबरचा संवाद (पिंजर्यातल्या पोपटाला उद्देशून म्हणते) "बडा एहसान फरामोश है चुन्निबाबू हमने इसे प्यार किया और इसने हमपे ही वार किया"..

माधुरीने बीग बॉस मधे मात्र सहभागी होउ नये. अगदी गेस्ट अपीअरंस सुद्धा नको..

मृत्युन्जय's picture

21 Sep 2011 - 4:21 pm | मृत्युन्जय

कधी पासून माधुरी आवडायला लागली रे?

तळटीप वाचा साहेब.

बाकी कॉकटेल प्रतिसादासाठी असल्याकारणाने तो मिळणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ;)

संपत's picture

22 Sep 2011 - 12:29 am | संपत

तब्बुचे मी विजयपथ, माचीस, चांदनीबार सारखे अनेक चित्रपट पाहिले आहेत.चांदनीबारमध्ये ती अप्रतिम होती. पण अनेक चित्रपटात ती पाट्या टाकते. चीनी कम चित्रपट आवडला तरी तब्बू ने मात्र पूर्ण चित्रपटात पाट्या टाकल्या आहेत. झाडापर्यंत धावण्याच्या सीन मध्ये अमिताभचे काम लाजवाब पण तब्बू मात्र अगदीच ओके.

मशाल, साहेब, परिंदा, तेजाब, विरासत बघितलेले दिसत नाहीत तुम्ही.

माधुरी अभिनय करत नाही हा अतिभयंकर विनोद झाला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 1:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ती करते तो "अभिनय". पण तरीही तिला अभिनेत्री किंवा नटी म्हणण्याएवढं धैर्य माझ्याकडे नाही.

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 12:54 am | सोत्रि

अभिनय तर सो सो होता

इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, वेलकम, जाँबाज़, राम लखन, मेरी जंग असे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले नसावेतच!

बॉडीसुद्धा काय जॉन अब्राहम, सनी देऑल सारखी तगडी नव्हती.

बॉडीबरोबरच अभिनयसुद्धा तगडा असतो प्राजुतै. तुम्ही सर्वव्यापी असुनही मी हे सांगावे म्हणजे......

तर अमिताभ, दिलीप कुमार ह्यांच्याकडेही तगडी बॉडी नव्हती पण ते तगडा अभिनय मात्र होता.

जॉन अब्राहम आणि सनी देऑल ह्याने आभिनयाचे लावलेले दिवे मी पाहिले आहेतच.
जॉन अब्राहम हा अभिनेता नाहीयेय हो, तो एक मॉडेल आहे चुकुन तो चित्रपटात आला आणि टिकला. हो फक्त बॉडीच्या जिवावर. अभिनय कशाशी खातात हेही त्याला माहित नाहीयेय. :lol: :) :lol:

-(तगड्या अभिनयाच्या अनिलचा पंखा) सोकाजी

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 1:07 am | विनीत संखे

मान्य. अनिल कपूरचा (माधुरीसोबतचा) पुकार पाहा... नॅशनल अवॉर्ड सार्थ झालेलं आहे तिथे. विरासत आणि अरमान पण.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 1:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, वेलकम, जाँबाज़, राम लखन, मेरी जंग असे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले नसावेतच!

'पुकार' मी पाहिलेला नाही, पास. 'विरासत' मधे अनिल कपूर ठीक ठीक आवडला; तिथेही छोट्याश्या रोलमधे तब्बू जास्त इंप्रेस करून गेली. पण 'अर्मान'बद्दल साफ असहमत. तिथे प्रिती झिंटासमोर इतर कोणीही टिकत नाहीत. तिच्या कॅरॅक्टरवर बहुदा दिग्दर्शकाचं प्रेम असावं, तिचा रोलही तगडा आहे आणि तिने तिची निवड सार्थ केली आहे.

'राम लखन' आणि 'मेरी जंग' ही दोन पिच्चरं सॉरी आहेत हां अगदी, कैतरीच काय! बाकीचे मी पाहिलेले नाहीत. 'वेलकम'चा अपवाद मी मगाशीच वर लिहीलेला आहे.

ठोकळा बॉडीगार्ड नटांमधे हवं तर जॉन आणि सनीच्या जोडीला बॉबो देओल, संजूबाबा, अर्जुन रामपाल वगैरेही टाक. पण जॉन टिकला ते "आय-कँडी" असल्यामुळे!
'राम और श्याम'मधे दिलीपकुमार वात आणतो. वैताऽग येतो त्याचा! बाकी इतर पिच्चर पहाण्याचं धैर्य झालं नाही. एक तो 'मुघल-ए-आझम' पाहिला. सगळा वेळ ही सुंदरी या म्हातार्‍याच्या प्रेमात का पडते हाच विचार करण्यात गेला.

सोक्या, लिहीच रे मला पत्र तू, मग पहाते कितपत हलकटपणा आहे तुझ्यात ते!

शाहिर's picture

21 Sep 2011 - 1:42 am | शाहिर

दिलिप कुमार ची अक्टींग छान आहे...

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 10:23 am | चेतन सुभाष गुगळे

<< पण 'अर्मान'बद्दल साफ असहमत. तिथे प्रिती झिंटासमोर इतर कोणीही टिकत नाहीत. तिच्या कॅरॅक्टरवर बहुदा दिग्दर्शकाचं प्रेम असावं, तिचा रोलही तगडा आहे आणि तिने तिची निवड सार्थ केली आहे. >>

प्रीतीचं पात्र तगडं होतंच, त्या आक्रमकतेपुढे इतर कोणी टिकणं कठीण होतं. तरीही अनिल कपूर, अमिर बशीर (ग्रेसी सिंगचा मित्र) व काही प्रमाणात ग्रेसी सिंग आपल्या लक्षात राहतात ते त्यांच्या संयत अभिनयामुळेच. अनिल कपुर ऐवजी दुसरा कोणी अभिनेता नायकाच्या भुमिकेत असता तर लक्षात तरी राहिला असता की नाही शंकाच आहे.

बाकी अनिल कपूरच्या राम लखन, तेजाब, नो एंट्री वगैरे चित्रपटांमध्ये त्याने लाऊड ऍक्टींग केलेली आहे, हे मान्य. त्याचा सर्वात सुंदर अभिनय पाहायचाच असेल तर विजय ला पर्याय नाही. अनुपम खेर आणि अनिल कपूर यांची जुगलबंदी अफलातून आहे. त्या दोघांच्या जागी आपण इतर कोणाची कल्पना ही करू शकत नाही.

स्वैर परी's picture

21 Sep 2011 - 12:24 pm | स्वैर परी

'पुकार' मी पाहिलेला नाही

ह्म्म!! तरीच! अनिल आणि माधुरी या जोडगोळीचा एक अतिशय उत्क्रुष्ट चित्रपट आहे तो. कधी जमल्यास नक्की पहावा! :)

इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, वेलकम, जाँबाज़, राम लखन, मेरी जंग असे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले नसावेतच!

ईश्वर मी पाहिलेला नाही.. साहेब पाहिलाय पण त्यात त्याने कस लावलाय अभिनयाचा असं वाटत नाही, लम्हे मध्ये श्रीदेवी पुढे सगळेच शून्य आहेत, विरासत मध्ये गोविंद नामदेव च्या अभिनयापुढे अनिलकपूरला करण्यासारखे बरेच होते पण तो करू शकला नाही, जाँबाज मल्टिस्टार्स असल्यामुळे त्याच्या वाट्याला आलेला रोल यथातथाच होता, तो रोल अतुल अग्निहोत्री सारखा माणूसही करू शकला असता, राम-लखन.. राखीच्या विचित्र संवादफेकी मुळे लक्षात राहिला(राखीच्या अभिनयामुळे म्हंटलेलं नाहीये) मेरी जंग बरा होता.. त्यातही नूतन सारखी अभिनेत्री असल्यामुळे तो कमीच पडला.. किंवा मला तसा वाटला.

खाली आदिती म्हणतेय त्याप्रमाणे आरमान मध्ये प्रितीझिंटा सबकुछ आहे.. त्यातला त्यात मला अनिलकपूर आवडला तो 'नायक' मध्ये. तिथे त्याने अभिनय केला आहे असे म्हणेन.

आवांतर : माझ्या सर्वव्यापी असण्याचा अनिल कपूरच्या अभिनयाशी काडीमात्र संबंध नाहीये.. !

अमिताभ, दिलिप कुमार अभिनयात नक्कीच तगडे होते.. १००% त्यामुळे त्यांना तगड्या बॉडीची गरज नव्हती.
असो... सध्या माधुरी बद्दल चालले आहे.. विषय भरकटू नये.

पैसा's picture

20 Sep 2011 - 9:15 pm | पैसा

आतापर्यंत तिने प्रत्येक पाऊल उचललंय ते शहाण्यासारखं. इतर ये केन प्रकारेण चमकणार्‍या थिल्लर नट्यांसारखी ती वागेल असं वाटत नाही. रेवती म्हणते, तसं भारतात तिला जास्त आरामाचं आयुष्य जगता येईल. शिवाय तिची मुलं अजून लहान आहेत, आताच इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला त्याना सोपं जाईल.

दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत मी ज्या बातम्या वाचल्या, त्यात आपण कधी परत येऊ हे तिने अजून सांगितलेलं नाही. "प्लॅनिंग चालू आहे" असं म्हणालीय ती. डॉ. नेने मुंबईच्या उपनगरात हॉस्पिटल विकत घ्यायचा विचार करत आहेत अशीही बातमी आहे. तेव्हा त्यांचं भांडण वगैरे झालं की काय या शंकांना जागा राहू नये. आताच्या परिस्थितीत अमेरिकेपेक्षा भारतात जास्त पैसे कमवायची संधी आहे हे या हुषार जोडप्याने ओळखलं आहे इतकाच याचा अर्थ!

वपाडाव's picture

21 Sep 2011 - 10:33 am | वपाडाव

आणी ती बिग बॉस मध्ये गेस्ट अ‍ॅप्पियरन्स देतेय हे सोकाजीरावांनी का नाही अधोरेखलं ??
का जाणुन बुजुन त्याकडे दुर्लक्ष केलं?

बाकी, बिग बॉस होस्ट केल्यास कुणी हरकत घेइल काय ही शंकाही आलीच हे.वे.सां.न.ल.

राजेश घासकडवी's picture

20 Sep 2011 - 9:32 pm | राजेश घासकडवी

मिपावर पत्र पाठवण्याची कल्पना अतिशय उत्तम. जकार्ताहून अशीच पत्रं पाठवल्यानेच काश्मीर अजून शाबूत आहे. तेव्हा माधुरीच्या भावी करीयरवरदेखील आपण नक्की परिणाम करू शकू ही खात्री वाटते. पण तुम्हीच नाही, तर मिपावरच्या माधुरीच्या असंख्य चाहत्यांनी ही पत्रं लिहायला हवीत. तेव्हा माधुरीच्या पीआर मॅनेजरचा संपर्क पत्ता कळवणे.

बाकी माधुरीप्रेमाची भावना पोचली. मधुबालानंतर माधुरीच असं आम्ही पूर्वीच म्हटलेलं आहे. (दुवे मागू नयेत, कारण स्वतःशीच म्हटलेलं होतं.)

एके काळचा माधुरी (धर्माची दीक्षा घेतलेला) 'दिक्षित' - राजेश

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Sep 2011 - 9:40 pm | बिपिन कार्यकर्ते

जेब्बात! बाकी कुणाला कळो न कळो, तुमच्यासारख्या गुणग्राही माणसाला नक्कीच कळणार हो!

पांथस्थ's picture

20 Sep 2011 - 10:22 pm | पांथस्थ

जकार्ताहून अशीच पत्रं पाठवल्यानेच काश्मीर अजून शाबूत आहे.

ह्या धाग्यातील बेष्ट!

सुहास झेले's picture

20 Sep 2011 - 10:08 pm | सुहास झेले

एकदम पटलं... !!

It is believed that the actress is being offered a huge amount for a special appearance in the ‘Bigg Boss’ house.

जर तिने ह्या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला, तर कठीण आहे... असो सुज्ञास सांगणे न लगे...

मदनबाण's picture

20 Sep 2011 - 10:14 pm | मदनबाण

साकोजीरावांच्या भावना समजल्या,आणि त्या योग्यच वाटल्या.
असो....
नृत्य करण्यात माधुरीला तोड नाही ! ;)
तिच्या दमदार अभिनय क्षमतेमुळेच तिला लेडी अमिताभ असे देखील म्हंटले जाते... ( काही जणांचा अभिनयातील अभ्यास देखील कमीच दिसतोय ! ;) )
माधुरी आणि श्रीदेवी यांच्यात श्रेष्ठ किंवा नंबर १ कोण यावर जालावर अनेक चर्चा / लेख वाचायला मिळतील...
अगदी ताजी लिंक इथे देतो :--- http://entertainment.in.msn.com/specials/star_wars/Sridevi-Madhuri-Dixit...

जाता जाता :---

माधुरी चाहत्यांसाठी :---- http://www.youtube.com/watch?v=YVMzJdcTT4o

(धक धक गर्ल चा फुल स्पीड पंखा) ;)

आदिजोशी's picture

20 Sep 2011 - 11:39 pm | आदिजोशी

माधुरीला अभिनय येत नाही ह्या विधानांनी फारच मनोरंजन झाले. अजून काय बोलणार. मुळात ज्यांना असं वाटतं त्यांना अभिनय म्हणजे काय हे कळत नसावं अशी शंका येते.

आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये.

साधनाने फोटो न काढू देण्याचे कारण दुसरे तिसरे काही नसून तिला झालेला दुर्दैवी अपघात हे आहे. ह्या अपघातामुळे सुंदर बाहुलीसारखी दिसणार्‍या साधनाचा चेहरा विदॄप झाला होता. प्लॅस्टीक सर्जरी केली पण वय वाढू लागलं तसा चेहर्‍यावरचा परिणाम अधिकच जाणवू लागला. दुर्दैवाची गोष्ट आहे, पण खरी आहे. म्हणून तिला रसिकांच्या हॄदयात आपली जुनीच छबी असावी असं वाटणं स्वाभाविक आहे.

माधुरीला अभिनय येत नाही ह्या विधानांनी फारच मनोरंजन झाले.
खी खी खी... ;)
असं मनोरंजन हल्ली रोज मिळतय मला ! ;) तेही अगदी चकटफु ! ;) काय म्हणतात ते हां... विथआउट टिकीट फुल टाईम पास ! ;)

माधूरी आपल्याला आवडायची ब्वॉ. उगाच कशाला खोटे बोला. उगाच प्रतिक्रीया वाचल्या नाहीत. आपल्या मनात जी छबी आहे तिला नाहक धककककक्का लागायचा.

अवांतरः बाकी हिरो हिरोईन्स ची असली काय क्वालीफिकेशन्स असतात जेणे करून त्यांना सिनेमाशिवायच्या सामाजीक स्टेजवर इतका मानसन्मान मिळतो, पद्म पुरस्कारदेखील मिळतात?

सिद्धार्थ ४'s picture

21 Sep 2011 - 3:03 am | सिद्धार्थ ४

माझ्या top लिस्ट मध्ये असलेल्या माधुरीच्या गाण्यांपैकी हे एक ,

http://www.youtube.com/watch?v=MwVwZxhe_Wc

मराठी_माणूस's picture

21 Sep 2011 - 9:24 am | मराठी_माणूस

मुलं मोठी होउ लगली कि परतीचे वेध लगण्याच्या असंख्य उदाहरणात अजुन एकाची भर

स्पा's picture

21 Sep 2011 - 9:38 am | स्पा

मस्तच पत्रये आवडल

माधुरी ही 'माधुरी' आहे . तिने काही चुकीच्या चित्रपटात कामे केली म्ह्णून तिच्या अभिनय क्षमतेवर शंका घेण्याचे कारण नाही.

तसे भारतीय चित्रपटांमधे अभिनेत्रींना फारच लिमिटेड स्कोप असतो. छान छान दिसायचं, नाच गाणी करायची, आणि थोडेफार अश्रु ढाळायचे -- या पलिकडे त्यांना फारसं काही करण्यासारखं नसतच, मग ती कितीही सक्षम अभिनेत्री असु देत. आणि आर्ट फिल्म मधे काम केले नाही, म्हणजे तिला अभिनय येत नाही असे म्हणणे जरा धाडसाचेच होईल . (तसेच आर्ट फिल्म मधे काम केले म्हणजे अभिनय येतो असे समजायचे कारण नाही.)
नृत्य, अभिनय, आणि सौन्दर्य या सगळ्या बाबतीत ती परिपूर्ण आहे म्हणूनच ती माधुरी आहे.

पण तिने " बिग बॉस " मधे सहभागी होऊ नये - सहमत

बिग बॉस या कार्यक्रमाला काय दर्जा आहे हेच समजत नाही. काही प्रसिद्ध लोकांना एका घरात रहायला लावायचे . त्या घरात जगोजागी कॅमेरे लावून ती लोकं दिवसभर काय काय करतात हे बघत बसायचं, हा मनोरंजनाचा काय प्रकार आहे?
मला तर ही एक विकृती वाटते.

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 12:21 pm | विनीत संखे

बरोबर.

नगरीनिरंजन's picture

21 Sep 2011 - 11:38 am | नगरीनिरंजन

१. माधुरी दिक्षीत उत्तम अभिनेत्री-नर्तकी असली तरी ती बुद्धिमती आहे याला काहीही पुरावा नाही.
२. "दिल" या चित्रपटात ती आत्यंतिक प्राणघातक सुंदर आणि मादक दिसली होती.(कारण तेव्हा मी १४ वर्षांचा होतो.)
३. "राजा" या चित्रपटात तिने साडीचा पदर काढून दोन पायातून मागे नेऊन असा काही काष्टा मारला की तिच्या माझ्या मनातल्या प्रतिमेचा चक्काचूर होऊन मला त्यानंतरचे तिचे चित्रपट पाहवले नाहीत.
४. त्यामुळे तिने बिगबॉसमध्ये वा अन्यत्र कुठेही काशी केली तरी मला काही फरक पडत नाही.
५. बाकी चालू द्या. धन्यवाद.

कानडाऊ योगेशु's picture

21 Sep 2011 - 7:22 pm | कानडाऊ योगेशु

३. "राजा" या चित्रपटात तिने साडीचा पदर काढून दोन पायातून मागे नेऊन असा काही काष्टा मारला की तिच्या माझ्या मनातल्या प्रतिमेचा चक्काचूर होऊन मला त्यानंतरचे तिचे चित्रपट पाहवले नाहीत.

ठयॉ..!
जाम हसलो.
बाकी "काष्ठा" हा शब्द फार दिवसांनी वाचला.
धोतर नेसताना कराव्या लागणार्या कसरतींची आठवण झाली.

बादवे.. काष्ठा मारल्यानंतर तिने पुढे केलेल्या अदांनी बर्याच जणांचा बल्ल्या झाला होता हे ही प्रामाणिकपणे नमूद करु इच्छितो.!

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Sep 2011 - 12:55 pm | चेतन सुभाष गुगळे

तुम्ही केलेली विधानं फारच उद्बोधक आहेत. त्यावरून माझ्याही अनेक आठवणी जाग्या झाल्यात आणि काही बाही सूचलं ते इथे मांडतो.

>> १. माधुरी दिक्षीत उत्तम अभिनेत्री-नर्तकी असली तरी ती बुद्धिमती आहे याला काहीही पुरावा नाही.

काजल किरण हिच्या अभिनय, नृत्य कशाचाही काही ही पुरावा माझ्यापाशी नाही.

>>२. "दिल" या चित्रपटात ती आत्यंतिक प्राणघातक सुंदर आणि मादक दिसली होती.(कारण तेव्हा मी १४ वर्षांचा होतो.)

"हम किसीसे कम नही" हा चित्रपट मी दूरदर्शन वर पाहिला होता त्यात काजल किरण मला अत्यंत सुंदर आणि पवित्र दिसली होती. (कारण तेव्हा मी ८ वर्षांचा होतो)

>>३. "राजा" या चित्रपटात तिने साडीचा पदर काढून दोन पायातून मागे नेऊन असा काही काष्टा मारला की तिच्या माझ्या मनातल्या प्रतिमेचा चक्काचूर होऊन मला त्यानंतरचे तिचे चित्रपट पाहवले नाहीत.

"भागो भूत आया" या ड श्रेणीच्या चित्रपटात तिने देवेन वर्मा या क श्रेणीच्या अभिनेत्या सोबत जे काही केलं ते मी इथे लिहू देखील शकत नाही (जिज्ञासू युट्युब वर बघतीलच म्हणा). अर्थात तरीही मनातल्या प्रतिमेचा चुरा पुन्हा मनातल्या मनातच फेविकॉलने जोडून घेत तिचे त्यातल्या त्यात सबूत, अंदर बाहर, मांग भरो सजना, हमसे बढकर कौन हे ब श्रेणी चित्रपट पाहिलेच. निष्ठूर चित्रपटसृष्टीने तिला पुन्हा अ श्रेणी चित्रपटात संधीच दिली नाही.

>> ४. त्यामुळे तिने बिगबॉसमध्ये वा अन्यत्र कुठेही काशी केली तरी मला काही फरक पडत नाही.

होय हे खरंच. मस्त चित्रपटात दाखवलंय तसं कधी प्रत्यक्षात घडत नाही. या स्वप्नपर्‍यांपर्यंत आपली कळकळ पोचू शकत नाहीच तेव्हा करून तरी काय उपयोग? अर्थात काजल किरण या अभिनेत्रीचा अंदर बाहर चित्रपट पाहिल्यास तिचा चाहता तिच्या दर्शनाकरिता किती टोकाची भुमिका घेतो याचा अंदाज येईल. संपूर्ण चित्रपटात काजल किरण ही अभिनेत्री काजल किरण म्हणूनच दाखविली आहे व तिचा चाहता असलेला एक गुंड (अनिल कपुर) आयुष्यभर तिच्या भेटीची आस लावून राहिलेला दाखविलाय. तिला अनेकदा ती कुठे कुठे दिसते, पण नंतर त्याला कळते तो भास होता. एकदा खरंच ती त्याला भेटते तर त्याला वाटते आता पुन्हा भास झाला असणार. एखाद्या अभिनेत्रीला समर्पित (धारावीचा अपवाद वगळता - त्यात ओम पुरी माधुरीचा चाहता दाखविलाय. पण अंदर बाहर मध्ये अनिल कपुर जितकी टोकाची आस घेऊन दाखविलाय तितकी धग धारावीत नाही. शिवाय तो समांतर चित्रपट आहे. त्यात व्यावसायिक चित्रपटांचा / संबंधित कलाकारांचा उल्लेख प्रामुख्याने खिल्ली उडविण्याकरिताच करतात.) असा अजुन कुठलाही दुसरा चित्रपट मी तरी पाहिला नाही. अभिनेत्यांना समर्पित असणारे असे दोन चित्रपट ठाऊक आहेत.

१. मै सोलह बरस की (देव आनंदचा आहे, पण तो त्याने स्वत:च काढलाय तेव्हा स्वसमर्पित म्हणता येईल का?)
२, नन्हे जैसलमेर (बॉबी देवल ला समर्पित आहे, असं वाचलं होतं. बघितला नाहीये अजून)

समीरसूर's picture

21 Sep 2011 - 2:37 pm | समीरसूर

सोकाजीरावसाहेब,

पत्र एकदम झकास!!

बिकाशेठ,

माधुरीचा फोटो अक्षरशः हृदयाला छिद्र पाडून गेला. भळभळ रक्त यायला लागलंय. पुन्हा पुन्हा बघतोय.

१९८८ मधला कुठलातरी दिवस. मी आणि माझे मित्र आमच्या गावातल्या एका टॉकीजमध्ये 'तेजाब' बघायला गेलो होतो. माधुरीचे 'एक दो तीन...' सुरु झाले आणि आम्ही खल्लास झालो.

मधुबाला टॉपच होती पण माधुरीमध्ये काहीतरी खास नक्कीच होते जे मधुबालामध्येही नव्हते. माधुरीचे अपील, तिच्या शरीराचा, चेहर्‍याचा मादकपणा काही औरच होता. ती जितकी सोज्वळ वाटू शकत असे तितकीच दाहक ही वाटू शकायची. 'धक धक' किंवा 'दयावान' मधले 'आज फिर तुम पे प्यार आया हैं' मधली माधुरी आग होती. मधुबाला इतकी ज्वलनशील नव्हती असे मला वाटते. माधुरीचे शरीरसौष्ठव फारच सुरेख होते. अभिनयाच्याबाबतीत ती खरच तोफ होती. मधुबालादेखील अभिनयात श्रेष्ठ होतीच पण तिच्या अभिनयाकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही हे तिचे दुर्दैव.

प्रत्येक पुरुषाच्या मनात एक सुप्त 'मस्तानी' असते असे म्हणतात (कुठेतरी अशा आशयाची कविता वाचली होती). माधुरी अशीच मस्तानी होती. कुणाच्या अजून कोणी-कोणी वैयक्तिक मस्तानी असू शकतात पण माधुरीला ते स्थान प्रत्येकानेच दिलेले होते.

आजकाल कत्रिना कैफ फारच सुंदर दिसतेय. ती टीव्हीवर आली की 'किती कुरूप आहे ही? शी!' असं मनातल्या मनात म्हणून मी चॅनल बदलतो. उगीच का स्वतःला त्रास करून घ्या? शेवटी आपला कोल्हाच होणार आहे तर मग द्राक्षांना आंबटच काय, कडू, तुरट, तिखट, मातकट असं सगळं म्हणायला काय हरकत आहे? तेवढाच मनाचा त्रास कमी होतो, नाही का? ;-)

कोण म्हणते माधुरीला acting येत नाही ?
तीचे अंजाम मधील डोळ्यातील भाव बघा, तिरस्कार पूर्ण कटाक्षाची आग बघा अन मगच बोला
राहीला प्रश्न तिने Big Boss मध्ये यायचा तर ती एक celebrity guests म्हणून येत आहे त्यात वावगे काय आहे ?
ती तुमची पसंत असली म्हणून काय झाले, तिला काय भावना नाहीत ? पैश्यांचा मोह नाही ? का तिला तिचे निर्णय घेण्याची क्षमता नाही ? ती जर Food Food वाहीनी वर येऊ शकते तर Big Boss मध्ये ही येऊ शकते. Dude, it is her personal choice . Accept it !
कोणी काहीही म्हणा आम्ही तिचे फ़ैन आहोत अन नेहमीच रहाणार पण तिच्या वैयक्तिक निर्णयाला आम्ही कोण बापडे चुकीचे ठरविणार ?

मिहिर's picture

21 Sep 2011 - 9:03 pm | मिहिर

अहो इथे 'फ़ैन' लिहायला हे हिंदी संस्थळ वाटले काय? जरा मराठीत मराठीच्या पद्धतीने लिहा की कधीतरी.

अहो इथे 'फ़ैन' लिहायला हे हिंदी संस्थळ वाटले काय
फ़ैन' हा शब्द कधी पासून हिंदी झाला ?

Fan = मराठीतील पंखा हो, खोटे वाटत असेल तर आपल्या मदनबाळाला विचारा

जरा मराठीत मराठीच्या पद्धतीने लिहा की कधीतरी.
अय्या खरेच ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Sep 2011 - 12:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Fan हा शब्द मराठीत फॅन असा लिहितात. हिंदीत फैन असा लिहितात असे माझे निरीक्षण आहे.
त्यांनी पण आक्षेप त्याच बाबीवरून घेतला असेल.

मला फॅन नाही टंकता आला, आता ही चोपा पेस्त केला आहे :-(

वपाडाव's picture

22 Sep 2011 - 2:03 pm | वपाडाव

------fEn------
लैच सोप्पं आस्तंय बगा.....

सुहास..'s picture

21 Sep 2011 - 6:50 pm | सुहास..

या धाग्यापेक्षा मी सरळ बिग-बास का काय ते का नाय बघीतले असे झाले ;)

तिमा's picture

21 Sep 2011 - 7:06 pm | तिमा

सगळे प्रतिसाद वाचून संपले एकदाचे. मा. दि. वरील उलटसुलट प्रतिक्रिया वाचून भरपूर करमणूक झाली.
आम्ही जुन्या पिढीचे, त्यामुळे मधुबाला फॅन! मुले लहान होती तेंव्हा त्यांना मा.दि. खूपच आवडायची. त्यांना चिडवण्यासाठी मी तिला 'हिरड्याकुमारी' असे म्हणत असल्याचे स्मरते.

नगरीनिरंजन's picture

22 Sep 2011 - 12:52 pm | नगरीनिरंजन

=)) =))
फुटलो.

नाना चेंगट's picture

7 Feb 2013 - 10:51 pm | नाना चेंगट

खत्तरनाक मनोरंजन !!

मदनबाणा ! तु दिलेल्या दुव्यावरुन इथे पोचलो... आणि अहाहा ! मजा मजा मजा !!

कसं असतं मदनबाणा ! एकदा एक भुमिका घेतली ना की ती शेवट पर्यंत वठवता यायला हवी ! आता पिच्चरमधे काम करणारा व्हिलन हा खर्‍या आयुष्यात व्हिलन असतोच असे नाही. पण ती भुमिका घेतली की व्हिलनगिरी नीट करावीच लागते. त्यालाच अ‍ॅक्टींग म्हणतात ! अ‍ॅक्टींग !!
आपल्याला सुद्धा बर्‍याच वेळेला अशी अ‍ॅक्टींग करावी लागते. अनेकांनी वरती तशी केली आहे. जी भुमिका घेतली ती पार पाडली !! :)
असो.

माधुरीची ४० पोस्टर एकेकाळी हॉस्टेलमधे लावली होती भित्ताडावर.... गेले ते पोस्टर गेली ती भिंत...

(माधुरीचा फॅन ) नाना

मदनबाण's picture

7 Feb 2013 - 10:59 pm | मदनबाण

मदनबाणा ! तु दिलेल्या दुव्यावरुन इथे पोचलो... आणि अहाहा ! मजा मजा मजा !!
हा.हा.हा... काय साहेब गरिबाची चेष्टा करता काय ? ;) म्या फकस्त मनोरंजन कसं असतं त्याचं उदा.म्हणुन ह्या धाग्याचा दुवा त्या धाग्यात दिला होता.
तुम्हासमी धन्यवाद. कारण कारण तुमच्या एका प्रतिसादानेच धाग्यातील मि.इंडिया झालेले प्रतिसाद चक्क दिसु लागले आहेत.
वाचकांनी या धाग्याचा काय म्हणतात ते... हा लुफ्त घ्यावा. ;)

अग्निकोल्हा's picture

7 Feb 2013 - 11:19 pm | अग्निकोल्हा

- खत्रि

उपास's picture

8 Feb 2013 - 12:34 am | उपास

अंमळ करमणूक..
ती कसल्यातरी पावडरीची जाहिरात करताना गंगूबाई माधुरी मध्ये बघितली टीव्हीवर.. आणि काळजात चुकचुकलंच.. 'कोण होतिस तू काय झालीस तू?' असं वाटून गेलं.. पंधरा एक वर्षांपूर्वी बीपीएल च्या अ‍ॅड मध्ये येणारा अमिताभ आठवला..
आयुष्य तुझं, पैसा तुला, निर्ण्य तुझे, तू ही माणूस असं सगळं खरं असलं तरी ह्या वयात तू ही धडपड करु नयेस असं वाटतं माधुरी.. निदान आमच्या मनात तुझी असलेली ओळख तशीच राहावी.. काही झालं तरी तू काय आणि सचिन काय, तुमच्या सोबतच वाढलेय आमची पिढी आणि आमचा गतकाळ तुमच्याशिवाय सुनाच.. तस्मात, तुझ्या वयाला आणि प्रतिमेला शोभेल असा सज्जड पिक्चर येउंदे.. इतर थिल्लरपणापेक्षा तुझ्या चाहत्यांना अत्ता तेच सगळ्यात आवडेल!

समद्या लोकास्नी एक इन्न्ती हाये. लिवताना एक एक फोटू टाकत जा.

शुचि's picture

14 Feb 2013 - 6:17 pm | शुचि
दादा कोंडके's picture

14 Feb 2013 - 6:37 pm | दादा कोंडके

कुठल्याश्या च्यानलवर (युट्युब) तिची मुलाखत बघत होतो. या बाई म्हणत होत्या, "तुमचा विश्वास बसणार नाही पण मी अमेरिकेत असताना अगदी साध्या गृहीणी सारखी रहायचे. इतकच काय, पण स्वतः सुपर मार्केटमध्ये जाउन शॉपींग करायचे! हो हो. अगदी ग्रोसरी शॉपिंगसुद्धा. दुकानात गेल्यावर तिथल्या भारतीय लोकांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नसे. त्यांना वाटायच की ही माधुरी सारखी दिसते पण माधूरी असणं शक्यच नाही. कुणितरी धाडस करून जवळ येउन विचारायचं आणि मग सहीचे वगैरे कार्यक्रम व्हायचे. तश्या ठिकाणीही माझ्या सिनेमाबद्द्ल, अभिनयाबद्दल भरभरून बोलायचे!" :)

भारतात परत येण्याबद्दल त्या म्हणतात, "पण जेंव्हा मुलं थोडी मोठ्ठी झाली तेंव्हा त्यांच्या ब्रिंगअप साठी भारतिय वातावरणच चांगलं आहे असं कुठतरी वाटल होतच वगैरे वगैरे"

शेजारीच सिमिलर विडीओच्या लिस्टमध्ये "धक-धक" आणि 'हॉट सीन विथ विनोद खन्ना' वर क्लीक केलं लगेच. ;)

मनोरा's picture

14 Feb 2013 - 7:46 pm | मनोरा

माधुरि दिक्शित, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, नाना पटेकर वगैरे वगैरे हे सर्व प्राणी कोन? याक्टींग हा प्रकार काय आहे? याक्टींग म्हणजे 'नकल' करने. नकला करने करने म्हनजे मुर्ख पना. मुर्खपना करनार्याना एव्ह्ढा भाव?

माधुरीने काय चित्रपट निवडले त्या वरुन च तिची "महान" अभिनय क्षमता कळते.
नविन नविन अंग प्रदर्शना चा ट्रेंड आणला माधुरीने ( त्या काळाच्या मानाने ). कमी बुद्धी असलेल्या मुली सारखे ते हसणे. आणि फिगर बद्दल तर बोलुच नये.
जिचा choice संजय दत्त असु शकतो, तिच्या बद्दल काय बोलणार?

१९९५-९६ सालापासुनच नी जरठ कुमारी दिसु लागली होती.

गजानन५९'s picture

6 Dec 2013 - 4:34 pm | गजानन५९

कोल्हयाला द्राक्षे आंबट असे वरती वाचले पण इतकी आंबट लागतात हे पहिल्यांदाच समजले :P