प्रिय माधुरीस

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
20 Sep 2011 - 6:57 pm

प्रिय माधुरीस,

तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते. त्यानंतर त्याच शिनेमात लोठिया पठाणचा अड्डा उध्वस्त करुन मुन्नाबरोबर जाणारी प्रचंड धास्तावलेली, घाबरलेली मोहीनी तु साकारलीस आणि तुझ्या अभिनय क्षमतेची चुणुक दिसली.

त्यानंतर तुझे सिनेमे येत गेले आणि तु तुझ्या अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्याच नव्हे तर तमाम चाहत्यांच्या काळजाचा तुकडा बनत गेलीस. दाक्षिणात्य ताराकांच्या दाक्षिणात्य हिन्दी उचारांनी बॉलीवुडमधे बडबड करुन सुपरस्टारपद मिळवण्याच्या मालिकेला सुरुंग लावुन तु बॉलीवुडची अनभिषिक्त साम्राज्ञी बनलीस ते केवळ तुझ्या अभिनय, नृत्य क्षमतेने आणि मधाळ हसण्याने.

अनिल कपुर ह्या तगड्या अभिनेत्याबरोबर तु अभिनयाची तितकीच तगडी टक्कर देउन तु राम - लखन, परिंदा, खेल, जिंदगी एक जुआ, बेटा ह्या सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिलीस. प्रेम-प्रतिज्ञा, दिल बेटा, दिल तो पागल है, देवदास ह्या चित्रपटांमधुन फिल्मफेअरच्या बाहुलीला जिंकलस! तुझ्या मादकतेने घायाळ करत करत तु असंख्य गाण्यांवर उन्मादक नृत्य करत करोडो लोकांच्या दिल की धडकन बनलीस. तुझ्या ह्या गाण्यांमुळे संस्कृती रक्षकांनी अश्लील - अश्लील म्हणुन तुला आणि तुझ्या नाचाला टीकेचे लक्ष केले. मी आणि करोडो चाहत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तुही त्या टीकेला भीक घातली नाहीस.

तुझ्या मधाळ हसण्याने, नितांत सुंदर अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्या हृदयावर राज्य करीत असल्यामुळे तुझ्या अनेक प्रमादांकडे डोळेझाक केली. वर्दी सारखा चिल्लर सिनेमा तु केलास. दयावानसारखा चित्रपटात थिल्लर भुमिकाही केलीस. चुकुन तु संजय दत्तच्या प्रेमातही पडलीस (पण त्यातुन सावरुन तु सुखरुप बाहेरही आलीस) हे सगळे मी माफ केले. कह दो के तुम हो मेरे वरना, धक धक करने लगा, हमको आजकल है किसक इंतजार, मुझको चांद लाके दो ह्या आणि अश्या अनेक गाण्यांमधील तुझ्या अदांपुढे हे सगळे प्रमाद काहीच नाही. देवदास तर केवळ तुझ्यामुळे आणि तुझ्या लाजवाब अभिनयामुळे दर्शनिय आणि लक्षणीय झाला.

त्यानंतर अचाकन तु श्रियुत नेन्यांना आपले करुन अमेरिकेत निघुन गेलीस. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे (लग्न करुन अमेरिकेत जाणे) तुही वागलीस. क़ाळजावर दगड ठेउन 'जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा' असा डोळेभरला निरोप तुला दिला. अचानक तु पुन्हा आलीस आणि नच बलिये म्हणालीस. सिनेमा चालला नाही तु परत गेलीस. काळाची पावले ओळखत परत आलीस ती छोट्या पदड्यावर. पण कुठे माशी शिंकली काय माहित. तु आलीस ते तुझा अमेरिकन "अक्सेंट" घेउन. कार्यक्रम नृत्याशी निगडीत होता त्यामुळे तुझा कार्यक्रमाचा चॉइसही बरोबर होता पण अमेरिकन अक्सेंट मात्र नाही झेपला. पण तरीही तुझे अढळपद अजुन शाबुत असल्यामुळे हेही कसेबसे सहन केले.

पण आज ही बातमी ऐकली, माधुरी मुंबइला परत येणार आणि बिग बॉस मधे येणार. मग मात्र रहावले नाही.

काय झाले आहे तुला? नेन्यांशी काही भांडण - बिंडण? अग होतात भांडणे नवरा बायको मधे त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे? की नेन्यांची डॉक्टरी नीट चालत नाहीयेय? उगाच परत येउन बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती.

तुला एक उदाहरण देतो. आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये.

अजुन काय बोलु, सुज्ञास सांगणे न लगे...

तुझा,
(बातमी वाचुन कळवळुन गेलेला) सोकाजी

जीवनमानप्रकटनविचारमतसल्लाप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Sep 2011 - 7:11 pm | बिपिन कार्यकर्ते

सोक्या, लेका... आपलं दु:ख आपल्यालाच कळणार रे! :(

हा फोटो पूर्वीपण एकदा टाकला होता...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2011 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेका चांगलं पत्र लिहिलं रे....!

ज्या लोकांना मोठ्या पडद्यावर यायचं असतं, ज्या लोकांना लोक विसरले आहेत, ज्या लोकांना प्रसिद्धी हवी असते, ज्या लोकांना पैसा हवा असतो, ज्या लोकांना आपली [डागाळलेली] प्रतिमा लोकांमधे उंचवायची असते, अशा लोकांना बीगबॉसची वाट चोखाळतांना पाहिलं आहे.

काय झाले आहे तुला? नेन्यांशी काही भांडण - बिंडण? अग होतात भांडणे नवरा बायको मधे त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे? की नेन्यांची डॉक्टरी नीट चालत नाहीयेय? उगाच परत येउन बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती.

माझंही सेम टू सेम मत आहे. :)

-दिलीप बिरुटे

शाहिर's picture

21 Sep 2011 - 2:37 am | शाहिर

माधुरी सह कुटुम्ब भारतात परत येते आहे .
दै. सकाळ मधे या विषयीचे वृत आले आहे

मृत्युन्जय's picture

20 Sep 2011 - 9:47 pm | मृत्युन्जय

चांगला फोटो शोधलाय ;)

बाकी माधुरी बिग बॉस मध्ये येणार असेल तर अवघड आहे. बाहेर संजुबाबा सुत्रसंचालन करणार. आत माधुरी. अनिल कपूरलाही द्या पाठवुन म्हणाजे ......

पाषाणभेद's picture

21 Sep 2011 - 12:21 am | पाषाणभेद

हॅ हॅ हॅ विनोद खन्ना विसरले की काय?

चिंतामणी's picture

21 Sep 2011 - 9:14 am | चिंतामणी

:O :-O :shock:

बिका You too????:(( :-(( :cry:

तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच आहे.;)
पण पोटापाण्याची सोय बघायला नको का?
तशीही ती आता हिरवीन म्हणून शोभत नाही.
चेहर्‍यावरचे वय लपत नाही.
आयुष्यभर अमेरिकेत राहणे आणि सवय, मानसिकता नसलेली कामे उपसणे जमणार आहे का तुमच्या माधुरीला?;)
दोन मुलांचे काम, स्वयंपाक, खाणे, पिणे, अभ्यास झेपणार आहे काय?
बेबीसिटर ठेवण्याच्या वयातून मुले आता मोठी झाली असावीत.
त्यापेक्षा भारतात हवे तेवढे पैसे देवून उत्तम दर्जाच्या सेवा ती मिळवू शकेल.
ती तिची सोय बघणार की रसिकांची?
हां, पण काम मात्र तिला येनकेन प्रकारेण मिळवावेच लागेल.

तिमा's picture

20 Sep 2011 - 8:12 pm | तिमा

हिरविणींना कामं मिळेनाशी झाली की त्या 'चा' चं दुकान टाकून 'चाचा' करतात असं खुद्दं पुलंनी सांगून ठेवलं आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2011 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा

@-तुला एक उदाहरण देतो. आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये....

१००००००० टक्के सहमत... हे पत्र तीला मिल वर रोज १दा पाठवा...आम्ही अनुमोदन देत राहू... बाकी विनाश काल नसताना माधुरीला अशी विपरीत बुद्धी कशी सुचली कोण जाणे.. ? :( :-( :sad:

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 1:01 am | विनीत संखे

हॉलीवूड ने सोळा वेळा ऑस्करसाठी नामांकित झालेल्या मेरील स्ट्रीपला अस म्हटलं नाही. ती मात्र एकाहून एक जबरदस्त रोल करत गेली. प्रौढत्त्वासोबत आलेली म्याच्युरीटी फक्त वयाची पन्नासी पोचलेल्या किंवा साठी ओलांडलेल्या अभिनेत्यांनी आपल्या धाकट्या मुलींच्या वयाच्या नट्यांसोबत मर्कटलीला करण्यात दाखवावी असा आपला ग्रह दिसतो.

माधुरी सारख्या अभिनेत्रीने रेखा, हेमा मालिनी, शर्मिला टागोर, डींपल सारख्या, लग्नानंतल्या सक्सेसफूल सेकंड इनिंग करून धाखवणार्‍या प्रौढ पण प्रभावी व्यक्तिरेखा साकारून दाखवाव्या तर त्यात वावगं काय? तिनं केलेला "आजा नचले" जरी फुसका बार निघाला तरी तो चित्रपट (काही शे कोटी कमवणारा बॉडीगार्ड स्मरून) टुकार नव्हता किंवा त्यात माधुरीचे अ‍ॅक्टींग खराब नव्हती.

हिंदी (किंवा मराठी) चित्रपटांना (किंबहुना प्रेक्षकांना) प्रौढ अभिनेत्रांशी एवढं वावडं का असावं?

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Sep 2011 - 8:11 pm | चेतन सुभाष गुगळे

<< उगाच परत येउन बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती. >>

तुम्हाला खरंच असं वाटतं? पण मला तुमचा उद्देश सफल होणे अंमळ कठीणच वाटते...

सुरूवात च पाहा की तुमच्या पत्राची,

<< प्रिय माधुरीस, >>

अरे का मायना झाला? ४३ वर्षी देखील आपल्याला कोणी तरूण असे लिहीत आहे हे वाचून ती इतकी सुखावेल की पुढील मजकूर न वाचताच अजून १० वर्षे पडद्यावर दर्शन देतच राहील...

त्यापेक्षा पत्र माझ्याकडून लिहून का घेतलं नाही..

मी माझ्या नेहमीच्या स्टाईलने...

आदरणीय सौ. माधुरी श्रीराम नेने यांस,

सादर प्रणाम विनंती विशेष,

पत्रास कारण की ----

असं काही लिहीलं असतं की... त्या पुढचं काही न वाचताच लगेच पळाल्या असत्या..

काही नाती वयाने नाही मनाने ठरतात..
उ दा सचिन तेंडुलकर वयाने आणि मानाने मोठा आहे ..पण आम्ही सच्या आहे का ? सच्याने काय माराला काल . असेच म्हणतो ..

तुम्ही बसा आता किस पाडत ..तत्व्ज्ञान झोडत !!

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 9:36 am | चेतन सुभाष गुगळे

<< तुम्ही बसा आता किस पाडत ..तत्व्ज्ञान झोडत !!>>

धागाकर्त्याच्या पत्रलेखनशैलीत एक आपलेपणा आहे, त्या आपलेपणामुळे सदर अभिनेत्री सुखावेल. ती सुखावली तर पुन्हा पडद्याचा नाद सुटणार नाही. याउलट माझी पत्रलेखन शैली रुक्ष आहे (इतर लोक म्हणतात तशी ऑफिस स्टाईल) हे मान्य करीत माझे लेखन वाचून ती नक्की पळून जाईल असे विधान करून, स्वत:च्या उणीवांवर बोट ठेवत मी इथे विनोद केला आहे. तत्वज्ञान तर अजिबात मांडलेले नाही.

मुख्य म्हणजे मी केलेला हा विनोद धागाकर्त्याला निश्चितच कळलेला आहे हे त्यांच्या खालच्या प्रतिसादावरून लगेचच समजून येईल.

कुंदन's picture

20 Sep 2011 - 10:28 pm | कुंदन

बरेच फिरता म्हणे तुम्ही.
जाकार्ताला जाउन आलात की काय ?

आपल्याला कोणी तरूण असे लिहीत आहे हे

धन्यावाद चेतन! मला काका म्हणणार्‍यांच्या मांदियाळीत तुम्ही नाही आहात ही एक आनंदाची गोष्ट :)

त्या पुढचं काही न वाचताच लगेच पळाल्या असत्या..

त्या ???? तीने ते वाचावे अशीच इच्छा आहे म्हणुनच माझ्या स्टाइलने लिहीले ;)

- (माधुरीप्रेमी) सोकाजी

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 9:28 am | चेतन सुभाष गुगळे

<<मला काका म्हणणार्‍यांच्या मांदियाळीत तुम्ही नाही आहात ही एक आनंदाची गोष्ट>>

मी स्वत:च इथल्या अनेकांच्या दृष्टीने आजोबा आहे. तेव्हा मी कसा काय तुम्हाला काका म्हणणार?

पप्पु अंकल's picture

21 Sep 2011 - 10:35 am | पप्पु अंकल

हे बाकी खर आहे

शाहिर's picture

20 Sep 2011 - 8:19 pm | शाहिर

रंगभुमी वरुन योग्य वेळी योग्य प्रकारे एक्झिट घे...तु आम चा मान बिंदू आहेस ..
लता..आशा. सुनिल, सचिन तसा माधुरी.... आमची निराशा करु नकोस

प्राजु's picture

20 Sep 2011 - 8:20 pm | प्राजु

>>>>>अनिल कपुर ह्या तगड्या अभिनेत्याबरोबर तु अभिनयाची तितकीच तगडी टक्कर देउन तु राम -

माधुरीचा अभिनय, नृत्य... याला तोड नाहीच आहे.. पण वरती अनिल कपूरचा 'तगड्या' असा उल्लेख वाचून.. ठ्ठो करून हसू आले. नक्की कोणत्या बाबतीत तगडा? अभिनय तर सो सो होता... बॉडीसुद्धा काय जॉन अब्राहम, सनी देऑल सारखी तगडी नव्हती. मग कसला तगडा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2011 - 8:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माधुरी छान दिसते, चांगली चित्रपट-नृत्य करते हे मान्य आहे. पण ती अभिनय करते असा संशय कधीपासून आला? म्हणजे ती 'और प्यार हो गया'मधल्या ऐश्वर्यापेक्षा बरी आहे पण म्हणून अभिनय?

अनिल कपूरच्या बाबतीत सहमत. पण त्याने 'वेलकम' चित्रपटात चांगलं काम केलं आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Sep 2011 - 8:57 pm | चेतन सुभाष गुगळे

<< पण ती अभिनय करते असा संशय कधीपासून आला? म्हणजे ती 'और प्यार हो गया'मधल्या ऐश्वर्यापेक्षा बरी आहे पण म्हणून अभिनय? >>

पूर्णत: सहमत..

<< अनिल कपूरच्या बाबतीत सहमत. पण त्याने 'वेलकम' चित्रपटात चांगलं काम केलं आहे. >>

वेलकमचं ठाऊक नाही पण त्याने अरमान चित्रपटात अप्रतिम काम केलंय.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 9:23 pm | शाहिर

तुमच्या मते अभिनय कोण करते ते स्पष्ट करा ..

आणि अभिनयाची व्याख्या पण

चिंतामणी's picture

21 Sep 2011 - 1:05 am | चिंतामणी

हे फक्त चे.सु.गु.यानाच लागु नाही. सगळ्यांना आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 9:42 am | चेतन सुभाष गुगळे

<< तुमच्या मते अभिनय कोण करते ते स्पष्ट करा .. >>

सध्या सक्रिय असणार्‍या तरूण अभिनेत्रींचीच नावे इथे लिहीत आहे.

नंदिता दास, सिमॉनी सिंग आणि असिन.

<< आणि अभिनयाची व्याख्या पण >>

जे पात्र पडद्यावर साकारत आहात ते पात्र वाटायला हवे. माधुरी कुठल्याही भूमिकेत माधुरीच वाटते. ती जे पात्र रंगविते त्या पात्रा प्रमाणे वाटत नाही (अपवाद फक्त दोनच - संगीत आणि प्रहार).

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Sep 2011 - 11:42 am | बिपिन कार्यकर्ते

मला तर ब्वॉ नाना पाटेकर हा कोणत्याही भूमिकेत नाना पाटेकरच वाटतो... भूमिका कोणतीही असो शैली तीच... आता काय करू?

विनीत संखे's picture

20 Sep 2011 - 9:16 pm | विनीत संखे

मग तेजाब, प्रेम प्रतिज्ज्ञा, देवदास, बेटा, हम आपके है कौन, मृत्युदंड, पुकार, लज्जा कुठून टपकले?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2011 - 9:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'और प्यार हो गया'मधे दोन्ही मुख्य पात्रांना अभिनय म्हणजे काय हे माहित नसूनही पिक्चर आलाच ना? त्यात तर ऐश्वर्या राय 'नाचली'सुद्धा आहे. पण म्हणून काय त्याला अभिनय आणि नृत्य म्हणायचं का काय? गाणी छान आहेत हो, नुसरतचं संगीत आहे.

या वरच्या यादीतले मी फक्त तेजाब आणि हम आप के है कौन (होय, हा पण!) पाहिले आहेत. त्यात अभिनय आहे? असेल बुवा. साधारण तिच्याच काळातल्या, वयाच्या हिंदी चित्रपटातल्या अभिनेत्रीचंच चटकन उदाहरणच आठवायचं तर 'मकबूल' आणि 'चीनी कम'मधली तब्बू किंवा 'भूत', 'एक हसीना थी'मधली उर्मिला आठवल्या. (अगदी फालतू चित्रपटांत कैतरीच काम करूनही पुढे सुंदर अभिनय करणार्‍या दोघी आठवाव्यात ही एक गंमतच).

राजेश दीक्षित, माधुरी तिरळी दिसत नाही हो. ;-)

चिंतामणी's picture

21 Sep 2011 - 1:11 am | चिंतामणी

"अंजाम".

शारूक घाणला मारतानाचा तीचा अभीनय म्हणजे....................

बंदिनी (चित्रपट. मालीका नव्हे) मधील नुतनची आठवण झाली हा प्रसंग बघताना.

सिद्धार्थ ४'s picture

20 Sep 2011 - 9:48 pm | सिद्धार्थ ४

माधुरी जर अभिनय करत नाही, तर तुमच्या मते कुठली अभिनेत्री अभिनय करते? कृपया माधुरीच्या काळातलीच उदाहरणे द्या.

बाकी मी मात्र जाम पंखा आहे माधुरीचा. college मध्ये होतो तेंव्हा पासून वाटायचे माधुरी सारखी बायको मिळावी. :) हे नंतर लक्षात आले कि पडद्या वरचे life आणि real life हे खूप वेगळे असते. :)

माधुरीच्या अभिनयाबद्दल मी नक्कीच पॉझीटीव्ह आहे.
बेटा, १०० डेज, लज्जा, मृत्युदंड, प्रहार आणि अगदी हम आपके है कौन सुद्धा!
आणि या चित्रपटातून तिची अ‍ॅक्टींग दिसत नसेल तर मग कोणत्याच अभिनेत्रीच्या चेहर्‍यावरच्या हाव-भावांना मी एक्टींग म्हणणार नाही.
तबू ची चिनी कम मधले काम.. एक्टिंग म्हणण्यासारखे नक्कीच नाहीये. इनफॅक्ट चिनी कम माझ्या लक्षात राहिला नव्हताच. केव्हाच रद्दी झालीये त्याची. उर्मिला बद्दल बोलायचं.. तर मला तिचीही एक्टींग आवडते.. खूप आवडते. भूत असूदे नाहीतर रंगिला असुदे.
तसेच नृत्याच्या बाबतीतही.. दिल तो पागल है मध्ये करिष्मासोबत नाचत असताना.. तिच्या नाचण्यात नजाकत नक्कीच जाणवते उगाच नुस्तेच हात -पाय हलवले आहेत असे वाटत नाही. असो..
माझ्यामते माधुरी अभिनय आणि नृत्य तोडीसतोड करते यात काडीमात्र शंका नाहीये.

सिद्धार्थ ४'s picture

20 Sep 2011 - 10:45 pm | सिद्धार्थ ४

+ १

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 12:42 am | विनीत संखे

अगदी बरोबर. मी तर आजही तिचा पंखा आहे. वैजयंतीमाला, ए के हंगल, कै. अशोक कुमार ई. सिनियर आर्टिस्टनी सुद्धा माधुरीलाच आजच्या घडीची सर्वोत्तम फिल्म अभिनेत्री असे म्हटले आहे. "गाईडमधला रोझीचा मनस्वी अवतार आजकलच्या अभिनेत्रींपैकी कुणाच्या अभिनयाने सजलेला आवडेल", असं वहिदा रेहेमान यांना विचारलं असता त्यांनी माधुरीचंच नाव घेतलं. वरील सर्व मंडळी (अशोक कुमारजी सोडून) ही माधुरीने फिल्मलाईनमधून एक्झिट घेतल्यावर असे बोल्ले होते.

चंदेरीमध्ये कै. गौतम राजाध्यक्षनी एक किस्सा सांगितला होता. जेव्हा हेमा मालिनीने माधुरीचं सैलाब ह्या टुकार चित्रपटातलं "हमको आज कल है" हे गाणं पाहिलं तेव्हा ती म्हणाली की क्षणाक्षणाला बदलणारे इतके हावभाव एक कसलेली अभिनेत्रीच देऊ शकते.

आणि तिच्या नम्र स्वभावाचे तर एक न एक किस्से सांगितलेल जातात... दिल तो पागल है च्या फोटोसेशन्च्या वेळी जेव्हा करिश्मा कपूर सतत आरशात आपला चेहेरा न्याहाळायची तेव्हा शाहरूखने माधुरीला थोडं मिश्किलीत थोडं चिडून विचारलं की ती तिचा चेहेरा आरशात का बघत नाही... तेव्हा माधुरीने त्यांचा मेकप आर्टीस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरकडे बोट दाखवून म्हटले, 'तिथं बसलाय माझा आरसा..."

मिकी आणि गौतमने आयुष्यभर आपला मनात संचित करून ठेवलेली ही एक आठवण आहे जी त्यांच्या मते एक मध्यमवर्गीय संस्कार लाभलेली मुलगीच दाखवू शकते. गौतमने आधीही एक आठवण झी मराठीच्या वस्त्रहरण मध्ये सांगितली होती की कित्येक वर्षांपूर्वी (हम आपके है कौन च्य वेळीस) माधुरीला त्याने कुणाशी लग्न करणार असे विचारले तेव्हा मी एका डॉक्टरशीच लग्न करणार असे तिने म्हटलेले आणि "पुकार" करे पर्यंत तिच्या मतात फारसा बदल झाला नव्हता असं गौतम राजाध्यक्ष म्हणायचे.

ह्रितिक रोशनचे वडील राकेश रोशन आजही माधुरीलाच त्यांनी काम केलेल्या सर्व फिल्मी अभिनेते आणि अभिनेत्र्यांमध्ये त्यांची फेवरीट मानतात, कारण ती कुठलाही रोल करू शकते. शिवाय ती बरीच प्रोफेशनलही आहे आणि हे त्यांनी कॉफी विथ करणच्या एका भागात म्हटले आहे.

मराठी मनाचा मानबिंदू असणं ही एक गोष्ट पण फिल्म लाईन सोडून गेल्यावरही एका दशकानंतर सुद्धा भारतीय लोकांच्या मनात अन बोलण्यात रुळणं ही दुसरी. म्हणूनच तर तिचं दादासाहेब फाळके, लताबाई, आशाताई, सचिन तेंडुलकर च्या सोबत नाव घेतलं जातं. अगदी आजही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 1:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

... माधुरी माणूस म्हणून खूप चांगली असेल (मला कल्पना नाही म्हणून 'असेल' असा शब्दप्रयोग), ती खूप छान दिसते (अगदी आजही), चित्रपटांत खूप चांगली नृत्य केली आहेत म्हणून तिला चांगली अभिनेत्री म्हणण्याएवढं माझं धैर्य नाही. आणि "डॉक्टरशीच लग्न करणार" असं सांगण्यात फार काही हुशारी लागते असं मला वाटत नाही. फारतर मराठी लोकांची कुवत डॉक्टर (आणि इंजिनियरांची)१ पात्रता ओळखण्याएवढीच आहे हे पुन्हा एकदा दिसलं असं वाटलं२.

माझा माधुरीबद्दल आक्षेप आहे तो 'हम आप के', 'राजा', 'दिल', 'बेटा', 'राम लखन', 'दिल तो पागल है' असले टुकार पिक्चर्स करण्याबद्दल आहे, असल्या चित्रपटांतून कोणाचे कसले गुण मोजता येणार? छान दिसणं, नाच करणं आणि कधी डोळे फिरवणं आणि कधी डोळ्यातून पाणी काढणं यातून काय अभिनयकौशल्य दिसणार आहे? '१०० डेज' हा चित्रपट झकास आहे, पण त्यात जावेद जाफरीच सगळ्यांना खाऊन जातो. 'प्रहार' चित्रपट चांगला आहे पण त्यात तिला फारसा काही रोलच नाही. 'आजा नच ले' या पुनरागमनाच्या चित्रपटात निदान विशीतली दिसण्याचा आटापिटा न करता तिशीतलीच(!) दिसण्याचा प्रयत्न केला हे मान्य, पण तरीही अभिनयाच्या खात्यात फार गुण टाकता येत नाहीत. मुळात पिक्चरची मर्यादाच तेवढी असेल तर त्यात कोण अभिनेता, अभिनेत्री काय करणार?

त्या-त्या वयात अनेक गोष्टींची क्रेझ दिसते. आज तिशी, चाळीशीतल्या लोकांना माधुरी आवडते (/आवडायची) यात आश्चर्य वाटत नाही. माझे विशीतले मित्र आहेत त्यांना दीपिका, कत्रिना आवडतात.

माधुरीचीच समकालीन जुही चावला हिचेही तरूण हिरॉईन असलेले बरेचसे चित्रपट टुकार आहेत. पण ती मला आठवते ते 'तीन दिवारें'साठी. त्यात अभिनयात नसीरूद्दीन शहासमोरही जुही चावला उठून दिसते.

१. हे दोन्ही व्यवसाय आणि त्या व्यवसायांतल्या लोकांबद्दल अजिबात तुच्छता नाही.
२. त्यातही मला डॉक्टर व्हायचं होतं, आहे यात काहीतरी आत्मसन्मान आहे. अमक्या व्यवसायतल्या माणसाशीच लग्न करणार यात काय अभिमानाने सांगण्यासारखं आहे?

क्राईममास्तर गोगो's picture

21 Sep 2011 - 11:31 am | क्राईममास्तर गोगो

माधुरीचे काही चित्रपट पुकार, लज्जा, हम आपके है कौन, तेजाब, pre pratigyaa बरेत.

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 11:33 am | विनीत संखे

मी माधुरीच्या नम्रपणाविषयी बोलणे केले कारण काही जणांनी तिच्या "निवडी" आणि "विनाशकाले विपरित बुद्धी" विषयी विचार व्यक्त केले होते.

ठिक आहे ते जाऊ द्या पण तुम्ही पहिला परिच्छेद सोयीस्कररीत्या विसरलात. जेव्हा ही अनुभवसंपन्न मंडळी आपल्या मते सध्याच्या अभिनेत्रांपैकी एक अभिनेत्री निवडायचं म्हणतात तेव्हा माधुरीलाच पसंती देतात? ती का? फकत डांस करते म्हणून? मग शिल्पा शेट्टी का नाही?

त्याऊपरही एक गोष्ट माधुरीने साबित केलीय (पुन्हा साबित केलीय म्हणायला हवं) आणि ती म्हणजे अभिनयगुरू होण्यासाठी तुम्हाला आर्ट किंवा सिरियस फिल्मचा अनुभव असणे गरजेचे नाही. अमिताभलाही त्याच्या करीयरमध्ये वयाच्या पन्नाशीनंतरच दोन "आर्टीस्टिक" रोल मिळाले आणि ते म्हणज अग्निपथ आणि ब्लॅक. पण तोवर त्याच्या अभिनयाकडे कुणी बोट दाखवलं नाही.

मुत्युदंड (पाहिला असेल अशी मी आशा करतो) साठी माधुरीला अभिनयाचं नॅशनल अवॉर्ड न देण्यात आल्या कारणाने दिलीपकुमार यांनी स्टारडस्ट कडे खंत व्यक्त केली होती.

'१०० डेज' हा चित्रपट झकास आहे, पण त्यात जावेद जाफरीच सगळ्यांना खाऊन जातो. 'प्रहार' चित्रपट चांगला आहे पण त्यात तिला फारसा काही रोलच नाही.

१०० डेज मध्ये तुम्हाला माधुरी सोडून जावेद जाफरी जास्त आवडला तर मात्र आम्ही हतबल आहोत. :(

प्रहार फक्त नाना पाटेकरच्या अग्रहास्तव माधुरीने केला हे नाना पाटेकर म्हणतो. त्यात तिला किती स्कोप होता नव्हता ह्या बद्दल मी काही बोलत नाही. म्हणूनच माझ्ये लिस्ट मध्ये तो नाही.

माझा माधुरीबद्दल आक्षेप आहे तो 'हम आप के', 'राजा', 'दिल', 'बेटा', 'राम लखन', 'दिल तो पागल है' असले टुकार पिक्चर्स करण्याबद्दल आहे, असल्या चित्रपटांतून कोणाचे कसले गुण मोजता येणार?

"हम आपके है कौन" आणि "दिल" हे जर टुकार असतील तर कठीण आहे. कमर्शियल सिनेमाला अर्थच उरत नाही मग. "दिल" मधला उत्तरार्ध फक्त माधुरीच आपल्या "हतबलत" आणि "असहाय्य " अभिनयाने वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवते.

"प्रेम प्रतिज्ञा" चित्रपटात मिथुन ने आणि निळू फुलेंनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयापुढे माधुरीने केलेली "डबेवाली" कितीतरी भाव खाऊन जाते.

स्पष्टपणे म्हणावं तर आपल्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत आणि अभिरूचीही. मला माधुरी अभिनयाच्या बाबतीत एक "मापदंड" वाटते तर तुम्हाला "दंड". इथंच धागा वाढतो.

अवांतरः तब्बू (चांदनी बार, अस्तित्त्व, नेमसेक), श्रीदेवी (लम्हें, चालबाज), ऊर्मिला (पिंजर, कौन), मनिषा कोईराला (खामोशी), जूही (तीन दिवारें, माय ब्रदर निखिल), करीश्मा (झुबैदा), रानी (ब्लॅक), विद्या बालन (परिणीता, इश्किया) ह्या माझ्या नव्वदीतल्या व मागल्या दशकातल्या काही आवडत्या स्त्री भूमिका आहेत.

आणि माझ्या मते माधुरी त्या सर्व करू शकली असती (काकणभर सरसच). ह्यातल्या चार व्यक्तिरेखांसाठी (खामोशी, अस्तित्त्व, परिणीता, झुबैदा) आधी माधुरीलाच पाचारण करण्यात आलं होतं. पण तिला काही कारणास्तव त्या जमल्या नाहीत्. पण आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्यासाठी तसं करावं हा माझा तिच्याकडे हट्टही नाही. कारण तिनं अमिताभसारखं कमर्शियल चौकटीत राहून आधीच स्वतःला बरंच सिद्ध केलंय.

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 11:51 am | सोत्रि

- (संख्यांचा पंख़ा) सोकाजी

स्वैर परी's picture

21 Sep 2011 - 12:02 pm | स्वैर परी

कुठल्या अभिनेता किंवा अभिनेत्रिचे सगळे च चित्रपट 'चालले' आहेत?? तुम्ही ज्यांना टुकार म्हणत आहात त्यातले निम्म्यापेक्षा जास्त चित्रपट चालले आहेत.
विशीतल्या तुमच्या मित्रांना ज्या अभिनेत्री आवडत आहेत, त्याना 'अभिनय' म्हणजे काय हे माहित तरी आहे का ???
'डायलॉग डिलीवरी' म्हणजे जणु चणे फुटाणे अस वाटुन बॉलीवूड मध्ये प्रवेश करणार्या आणि मेक अप करुन छान छान दिसणार्या या अभिनेत्रींना देखील माधुरीचा हेवा वाटतो!!! यातच सगळ आलं नाही का?

अगदी बरोबर. मी तर आजही तिचा पंखा आहे. वैजयंतीमाला, ए के हंगल, कै. अशोक कुमार ई. सिनियर आर्टिस्टनी सुद्धा माधुरीलाच आजच्या घडीची सर्वोत्तम फिल्म अभिनेत्री असे म्हटले आहे. "

मी सांगणार आहे ती गोष्ट १९८७ सालची आहे. त्यावेळी माधुरीचा फक्त "अबोध" प्रदर्शीत झाला होता. (तेजाब नव्हता आलेला). त्यावेळी मुलाखती दरम्यान जयाजींना प्रश्ण विचारला. "सुपरस्टार म्हणून अमीताभचे दिवस संपत अले आहेत. तुमच्या मते पुढचा सुपरस्टार कोण असेल???? त्यावेळी जयाजींनी उत्तर दिले होते की "नजीकच्या भवीष्यकाळात कोणि सुपरस्टार होणे अवघड आहे. पुरूष्यांच्यात तर कोणिही दिसत नाही. पण मला वाटते पुढची सुपरस्टार "माधुरी दिक्षीत" असेल.

हे आठवुन मी तेजाब गाजल्यानंतर जयाजींना {मनोमन) साष्टांग दंडवत घातला होता मी.

अगदी बरोबर. मी तर आजही तिचा पंखा आहे. वैजयंतीमाला, ए के हंगल, कै. अशोक कुमार ई. सिनियर आर्टिस्टनी सुद्धा माधुरीलाच आजच्या घडीची सर्वोत्तम फिल्म अभिनेत्री असे म्हटले आहे. "

मी सांगणार आहे ती गोष्ट १९८७ सालची आहे. त्यावेळी माधुरीचा फक्त "अबोध" प्रदर्शीत झाला होता. (तेजाब नव्हता आलेला). त्यावेळी मुलाखती दरम्यान जयाजींना प्रश्ण विचारला. "सुपरस्टार म्हणून अमीताभचे दिवस संपत अले आहेत. तुमच्या मते पुढचा सुपरस्टार कोण असेल???? त्यावेळी जयाजींनी उत्तर दिले होते की "नजीकच्या भवीष्यकाळात कोणि सुपरस्टार होणे अवघड आहे. पुरूष्यांच्यात तर कोणिही दिसत नाही. पण मला वाटते पुढची सुपरस्टार "माधुरी दिक्षीत" असेल.

हे आठवुन मी तेजाब गाजल्यानंतर जयाजींना {मनोमन) साष्टांग दंडवत घातला होता मी.

माधुरीच्या अभिनयाबद्दल मी नक्कीच पॉझीटीव्ह आहे
सहमत. पॉझीटीव्ह आहे असे मात्र म्हणू शकते.
पण १००% वेळा माधुरीचा अभिनय नाही आवडला पण १००% वेळा तिने हावभाव व नृत्यकौशल्याने सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. चिनी कम पाहिल्याबरोबर तब्बूने हे काय केले? असे वाटले आणि सिनेमा लक्षात राहण्यापलिकडे गेला. उर्मिला, तब्बू, माधुरी या आवडत्या आहेत. करिश्मा कपूरने केलेला एकच सिनेमा आवडला पण नाव लक्षात नाही. जुन्या प्रकारातला होता. दिल तो पागल है मध्ये माधुरी भन्नाट नाचलिये पण नर्तिका नसतानाही करिश्मा चांगली नाचलिये. अंजाम भयानक असल्याने पाहिला नाही. बाकी माधुरी प्रसिद्ध असताना डोंगरांवर, टेकड्यांवर गाणी चित्रीत करीत आणि पंखे लावून अतोनात वार्‍यात नाच करवून घेत ते आवडत नाही. उदा. कह दो के तुम हो मेरी वरना...
गेल्या १० ते १५ वर्षात सिनेमा बराच बदलला आणि या नट्यांना परत येताना ते चांगलेच जाणवते आहे/जाणवेल. अगदी फिटनेस, मेकअप पासून ते पेहेरावापर्यंत!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 2:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

माधुरीने अनेकदा मनोरंजन केलं आहे, अगदी 'राजा' पाहूनही मी धोधो हसले होतेच. ;-)

'अंजाम'मधे हिंसेसाठी हिंसा दाखवलेली आहे म्हणून तो आवडला नाही. माधुरीपेक्षा शाहरूख (कधी नव्हे ते) आवडला. पंखे लावून नाचण्याबद्दलही सहमती.

गेल्या १० वर्षांत 'एक हसीना थी', 'जॉनी गद्दार', 'काबूल एक्स्प्रेस', 'ओंकारा', 'मकबूल', 'तेरे बिन लादेन'* असे चित्रपट बघितल्यानंतर आपण पूर्वी काय(तरीच) चित्रपट बघत होतो असा एक विचार आला.

माधुरी एवढी टॉप क्लास अभिनेत्री आहे तरीही तिची ओळख 'धकधल-गर्ल' अशीच का? स्मिता पाटील, शबाना आझमी, नंदिता दास, कोंकोणा सेन-शर्मा यांची ओळख अशा प्रकारे होत नाही.

*इथे मुद्दामच इंग्लिश आणि इतर परदेशी चित्रपटांची यादी काढलेली नाही.

हा प्रतिसाद प्रकाशित झाला याचा आनंद आहे.
नेमके 'साठवा' च्यावेळेस इंटरनेट बंद पडले होते.
प्रतिसादाशी सहमत.
आताचे शिनेमे पाहताना पूर्वी आपण कितीतरी 'माकड' सिनेमांना मनोरंजक म्हणत होतो असे वाटते.
त्यावेळची ती पद्धत होती असे म्हणायला हवे.
भारतभूषण काळातले शिनेमे, गाणी पाहून तर हसून गडाबडा लोळावेसे वाटते. (काळाचा महिमा!)
बाकी एखाद्या नावाने ओळखले जाणे हे त्यावेळच्या नाच, गाण्याच्या प्रसिद्धीवर अवलंबून आहे.
तात्कालिक प्रसिद्धीचा भविष्यासाठी उपयोग कश्याप्रकारे करून घेतला जातो यावरही अवलंबून आहे.
उदा. 'स्टिव्हन स्पिलबर्ग फिल्म' असे वाचावयास मिळते.
माझ्या वयाच्या मुलींना/पुरुषांना स्टिव्हन स्पिलबर्ग हा ज्युरासिक पार्क साठी लक्षात आहे.
खरेतर त्याचे आधी/ नंतरचे सिनेमेही आहेत.
आजकाल मिडीयाचा हातही प्रसिद्धीमध्ये बराच असतो.
एखाद्याने मिडीयाशी वैर पत्करायचे ठरवले तर म्हणे तो/ती गाळात गेले असे समजले जाते.
माधुरी भारतात येणार याची प्रसिद्धी अतोनात केली जात असे वाटते पण ती तशी व्हावी असेच दिवस आलेत.
अवांतर: मीही भारतात जावे म्हटले तर कोण प्रसिद्धी देणार?;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 7:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रतिसाद प्रकाशित झाला याचा आनंद आहे.

संपादकांनीच असे म्हणावे याची अंमळ मौज वाटली. ;-)

बाकी सहमती आहेच.

प्राजु's picture

21 Sep 2011 - 7:44 am | प्राजु

स्मिता पाटिल, शबाना आझमी, कोंकणा सेन शर्मा... या कोणत्याही अँगलने ग्लॅमरस वाटत नाही. आणि त्यांना नृत्यामधले काही येत असेल असेही वाटत नाही. त्यामुळे त्यांची ओळख सहसा आर्ट फिल्म अ‍ॅक्ट्रेसेस अशीच होते.
हेमा मालिनीचे सीता और गीता, शोले आणि बरेच चित्रपट हिट होऊनही.. आणि ती सुद्धा एकेकाळची टॉपक्लास हीरॉईन असूनही... तिची ओळख अजूनही 'ड्रीम गर्ल हेमा..' अशीच होते त्यातलाच हा प्रकार. (इथे हेमा मालिनीच्या अभिनय क्षमतेबद्दल मी काहीही बोलत नाहीये याची नोंद घ्यावी.)
या ओळखीचा अभिनय क्षमतेशी फारसा संबंध नसतो.. !
या सर्वांमधून माधुरीला अ‍ॅ़टींग येत नाही... हे कुठेच सिद्ध होत नाही. असो..
माझ्यामते माधुरीची अभिनय क्षमता सरसच आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 7:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या सर्वांमधून माधुरीला अ‍ॅ़टींग येत नाही... हे कुठेच सिद्ध होत नाही. असो..
माझ्यामते माधुरीची अभिनय क्षमता सरसच आहे.

निदान येत्या काळात तरी तिला अ‍भिनय जमतो असं दाखवणारा एकतरी चित्रपट तिला मिळावा आणि तो तिने स्वीकारावा.

चिंतामणी's picture

21 Sep 2011 - 3:00 pm | चिंतामणी

जरा शंकाच आहे की "बंदिनी, अनुराधा, अनुपमा, सिमा, सत्यकाम, हकीकत" हे चित्रपट पाहीले आहेत का?

असे विचारायचे कारण "गेल्या १० वर्षांत 'एक हसीना थी', 'जॉनी गद्दार', 'काबूल एक्स्प्रेस', 'ओंकारा', 'मकबूल', 'तेरे बिन लादेन'* असे चित्रपट बघितल्यानंतर आपण पूर्वी काय(तरीच) चित्रपट बघत होतो असा एक विचार तुझ्या मनात आला म्हणून विचारतो.

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 1:02 am | सोत्रि

पण ती अभिनय करते असा संशय कधीपासून आला? म्हणजे ती 'और प्यार हो गया'मधल्या ऐश्वर्यापेक्षा बरी आहे पण म्हणून अभिनय?

आज तु तुझे '३_१४ विक्षिप्त अदिती' हे नाव सार्थ केलेस.
तुला बहुतेक हिन्दीतला अभिनय कळत नसावा, तु त्या मार्क बरोबर इंग्रजी सिनेमे पहा कसे! ;)

- (हलकट) सोकाजी

स्वगत: सोक्या, "प्रिय अदितीस" असा एक धागा काढावा का रे ?

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 1:14 am | विनीत संखे

स्वगत: सोक्या, "प्रिय अदितीस" असा एक धागा काढावा का रे ?

हवंतर माझे वरील टिपण वापरा. मी मदत करतो.

चिंतामणी's picture

21 Sep 2011 - 1:38 am | चिंतामणी

:bigsmile:

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 1:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोण मार्क? झुकरबर्ग? हल्ली तो म्हणे फेसबुकाकडे अजिबात लक्ष देत नाही असं कानावर आलं!

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 2:20 am | सोत्रि

चुकलो, माती खाल्ली! मार्क नाही माइक (http://www.misalpav.com/node/19167)

- (वाट चुकलेला) सोकाजी

स्वगत: सोक्या, लेका अभ्यास कमी पडतोय, तुर्तास "प्रिय अदितीस" हा धागा काढणे रद्द ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 2:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच रे.

बाकी हिंदीतला अभिनय हा मराठी नाहीतर इंग्लिशपेक्षा वेगळा असतो काय? असो.

गेल्याच आठवड्यात परत एकदा 'ओंकारा' पाहिला. त्यातला दीपक डोब्रियाल आणि सैफने केला आहे ना, तो अभिनय. विशेषतः सैफ आरशासमोर उभा राहतो आणि त्याला बाहुबली बनवला नाही म्हणून आरसा फोडतो, तो सीन पहा. हसून, मुरक्या घेत, लाडे-लाडे थोडं सेन्शुअस दिसत नाच करणं ठीक आहे, पण चेहेरा खास नाही, नर्तक म्हणून विशेष प्रावीण्य नाही तरीही 'बीडी' गाण्यात दीपक डोब्रियाल जे काही करतो ना, ते पहा. नाहीतर 'चीनी कम'मधली अमिताभला बागेतल्या बाकावरून उठवून झाडापर्यंत पळवणारी तब्बू पहा, किंवा 'जॉनी गद्दार'मधे धर्मेंद्रला गोळी घालण्याच्या सीनमधली नील नितीन मुकेशची उलघाल पहा ... यातलं काही टक्केसुद्धा माधुरीने केलं आहे का?

१०० डेज मधला ती झोपेत असताना घाबरते तो सीन बघा, बेटा मध्ये सासूला मात दिल्यावर चेहर्‍यावर येणारी जिंकल्याची गुर्मी बघा, अंजाम मध्ये तुरूंगात मीस केरेज झाल्यावर संताप आणि दु:ख एकाच वेळी चेहर्‍यावर दाखवणारी माधुरी बघा, परिंदा मध्ये तिच्या होणार्‍या नवर्‍याचे प्रेत पाहून धक्का बसलेली माधुरी बघा, दिल तो पागल है मध्ये.. राहुल बद्दलचे तिचे विचार कॅसेट मध्ये रेकॉर्ड करत असताना मध्येच फरिदा जलाल येऊन तिचे (माधुरी)आणि अजय चे लग्न नक्की झाल्याचे सांगितल्यावर चेहर्‍यावरचे बदललेले भाव बघा...एकाच वेळी फरिदा जलाल साठी आनंद आणि राहुलबद्दल दु:ख.. नक्की पहा. दिल सिनेमा मध्ये अनुपम खेरच्या घरी आमिरखान च्या उपचारांसाठी मदत मागायला गेलेली असताना, अनुपम खेरच्या अटी कबूल करत असतानाचं अ‍ॅक्टींग पहा.. आणखी किती उदाहरणे देऊ?
उगाच आरशात बघून खुनशी हसलं म्हणजे अभिनय होत नसतो (सैफ अली खान बद्दल बोलतेय). ती अमिताभ ला उठवून पळवणारी तब्बू तर मला आठवतही नाहीये.. इतका तो सुमार अभिनय तिचा. तब्बूचा अभिनय फक्त अस्तित्व आणि दायरा मध्येच आवडला. जॉनी गद्दार पाहिला नसल्याने काही सांगू शकत नाही.
असो..

सिद्धार्थ ४'s picture

21 Sep 2011 - 9:37 am | सिद्धार्थ ४

एक नंबर .....ह्या हि पेक्षा किती तरी उदाहरणे देता येतील. च्यायला माधुरी, सचिन आणि शिवाजी महाराजान बद्दल कोणी काही बोलले तर समोरच्याचा जीव घ्यावयास वाटतो. :)

सुहास झेले's picture

21 Sep 2011 - 10:42 am | सुहास झेले

अगदी अगदी.... :) :)

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 11:02 am | सोत्रि

सिद्धु,

एक्दम सहमत रे!

(म्हणुन तर एका पाशवी आयडी बरोबर पंगा घेण्याची हिंमत करु शकलो) ;)

- (माधुरीमय) सोकाजी

ढब्बू पैसा's picture

21 Sep 2011 - 11:48 am | ढब्बू पैसा

सोकाजी , पाशवी आणि पंगा एकाच प्रतिसादात?
सांभाळून हां ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Sep 2011 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते

सोक्या, घाबरू नकोस.. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर... जॉन अब्राहाम आवडणार्‍यांनी माधुरीच्या अभिनयावर टीका करावी तर ती टीका फाट्यावरच मारावी! काय म्हन्तो?

माझ्या माहितीप्रमाणे जॉन अब्राहाम जन्माला आल्यापासून त्याच्या चेहर्‍यावर आत्ता आहेत तसेच भाव आहेत म्हणे... खरे खोटे तो अब्राहामच जाणे! ;)

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 12:21 pm | सोत्रि

माझ्या माहितीप्रमाणे जॉन अब्राहाम जन्माला आल्यापासून त्याच्या चेहर्‍यावर आत्ता आहेत तसेच भाव आहेत म्हणे

फुटलो! मेलो!! वारलो!!!

- (तरीही जॉनच्या सिक्स पॅकचा चाहता) सोकाजी

श्रावण मोडक's picture

21 Sep 2011 - 3:08 pm | श्रावण मोडक

सांभाळ. तुझा अण्णा हजारे होत चालला आहे. ;)

चिंतामणी's picture

21 Sep 2011 - 3:20 pm | चिंतामणी

सोकाजी, बिका की ३-१४?????????

श्रामो- कोड्यात नका बोलू.

मोडक,

मी 'अण्णा हजारे' होणार हे लक्षात आले होते, त्यामुळेचतर
(तरीही जॉनच्या सिक्स पॅकचा चाहता) अशी स्वाक्षरी चाणाक्षपणे टाकली होती. तसा त म्हटले की ताकभात असं थोडाफार समजु लागलय आपल्यासारख्या बर्‍याच चाणाक्ष मिपाकरांच्या संगतीत राहुन. ;)

- (चाणाक्ष) सोकाजी

सुहास झेले's picture

21 Sep 2011 - 5:39 pm | सुहास झेले

हा हा हा ... अहो सोकाजी, अण्णा निघाले पाकिस्तानला ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Sep 2011 - 3:11 pm | बिपिन कार्यकर्ते

'अण्णा निघाले पाकिस्तानला' वाचल्यावर का कोणास ठाऊक एकदम 'चला मुरारी हिरो बनने' हेच आठवलं!

सुहास झेले's picture

21 Sep 2011 - 11:58 am | सुहास झेले

हा हा हा :D

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 10:55 pm | चेतन सुभाष गुगळे

<< माधुरी, सचिन आणि शिवाजी महाराजान बद्दल कोणी काही बोलले तर समोरच्याचा जीव घ्यावयास वाटतो. >>

या विधानाला आपण सहमती दर्शविलीय हे काही पटलं नाही बुवा.

कोणी काही बोलले तर त्याचा जीव घ्यायचा हा न्याय जर लावायचा असे ठरविले तर एखादा कट्टर व्यक्तिपूजक आपल्यालाही हाच न्याय लावू शकतो कारण जेव्हा आपण http://www.misalpav.com/node/10277 हा धागा काढला होता त्या काळात हा पक्ष भलताच फॉर्मात होता. त्याचप्रमाणे पक्षप्रमुखांची लोकप्रियताही दुर्लक्ष करण्याजोगी नव्हती आणि अजुनही नाही. मराठी मनाच्या हळव्या बिंदुंमध्ये (Weak Points) मध्ये यांची गणना केली जाते (हे मी http://www.misalpav.com/node/10095#new या धाग्यातील मजकूर आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून म्हणतोय). तरीही आपण हे धाडस दाखविले होतेच ना.

सबब, माधुरीच्या विरोधात बोलणार्‍याचा जीव घ्यावेसे वाटणे हे काही योग्य नव्हे. स्वत: माधुरी तरी या विधानाचं समर्थन करतील का?

(मी मला काय पटलं नाही आणि का? इतकंच इथं मांडलंय. कुणाविषयीही कुठलेही अनुद्गार काढले नाहीत. याची कृपया नोंद घ्यावी)

सिद्धार्थ ४'s picture

21 Sep 2011 - 10:59 pm | सिद्धार्थ ४

शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो हो गुगळे साहेब.

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 11:12 pm | चेतन सुभाष गुगळे

मला देखील एवढंच म्हणायचं होतं की तुमच्या एखाद्या अतिप्रिय गोष्टी विषयी तुम्ही कितीही हळवे असाल तरी ती गोष्ट (व्यक्ती, पक्ष, वस्तु, इ.) इतरांना आवडेलच असे नाही. त्यांनी जर त्यांची काही विरोधात जाणारी मते मांडली तर तुम्ही ती पुरेसा संयम दाखवून शांतपणे ऐकून घ्यायला हवीत.

पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न: हे सत्य स्वीकारायला हवे की नको?

मी तुमच्या भावना जाणून च हे विधान केले होते. तुमच्या मूळ विधानात तुम्ही जीव घ्यावासा वाटतो या शब्दांऐवजी जीव द्यावासा वाटतो अशी सुधारणा कराल काय?

सिद्धार्थ ४'s picture

22 Sep 2011 - 12:20 am | सिद्धार्थ ४

मी तुमच्या भावना जाणून च हे विधान केले होते. तुमच्या मूळ विधानात तुम्ही जीव घ्यावासा वाटतो या शब्दांऐवजी जीव द्यावासा वाटतो अशी सुधारणा कराल काय?

उत्तर आहे नाही

प्राजुतै,
एवढं सगळं पाहायला न सांगता देवदास एकरकमी पहायला सांगा....

त्यातला शारुकला टाकलेला एक दायलॉग.....
"आप वोही चुका दिजिये जो हमने आप पे खर्च किया है,
आप पे ये दो रातो का कर्ज उधार रहा, देवबाबु..."

किंवा, त्या दोघांचा एक सीन,
शारुक तिला म्हणतो, "चंद्रमुखी, ये शराब से भरा पैमाना देख रहि हो.... इसमे और शराब डालोगी तो क्या होगा".
ती म्हणते, "शराब छलक कर जमीन पर आ जायेगी"
शारुक, "इसी तरह पारो के प्यार से भरा हुआ है ये प्याला देवदास, खुद तो गिरेगा ही, तुम्हे भी गिरा देगा"
ती अगदी आर्ततेने म्हणते," जमीन पर गिरी हुइ शराब देखकर लोग तो यही कहेंगे ना, देखो पैमाने को छूकर निकली है"
ह्या वेळेला तिच्या डोळ्यातली कणव पहा, चेहर्‍यावरचे ओसंडुन वाहणारे प्रेम पहा.....
(ह्यानंतर माझ्या चेहर्‍यावरची स्माइल पहा वाटल्यास, सध्या कलीग विस्मयकारकरित्या टवकारुन माझ्याकडे बघतोय)

सोत्रि's picture

21 Sep 2011 - 10:54 am | सोत्रि

वडापाव,

आजपासुन मी तुमचा गुलाम ह्या प्रतिक्रियेनंतर _/\__/\__/\_

चंद्रमुखी सारखी तवायफ मी अजुन तरी बघितली नाही (उमरावजान नंतर) .
तो ग्रेस, ती अदा उफ्फ..... मार डाला.... मार डाला....अल्लाह मार डाला.

- (माधुरीचा देवदास) सोकाजी

तुमचा प्रतिसाद वाचतानाही डोळ्यापुढे आलेला तो सीन अंगावर शहारं उभं करून गेला.. माधुरी आणि शाहरुख दोघांनीही जीव ओतला आहे या आणि देवदास मधील इतरही अनेक सीन्स मधे. पारो चंद्रमुखीकडे देवीच्या मुर्तीसाठी माती मागायला येते तो सीन पण आपला एकदम फेवरेट ब्वॉ.

लव्ह यु माधुरी!

वपाडाव's picture

21 Sep 2011 - 1:45 pm | वपाडाव

बास्स का?
घ्या त्यांच्यात झालेले संवाद.....

पारो :: तवायफों की तकदीर मे शौहर नही होते.....
चंद्रमुखी :: तवायफों की तो तकदीर ही नही होती ठकुराईन.....

अजुनही आहेत पण ते टंकायला लैच वेळ लागेल....
अन भावनांच्या भरात काम करणे विसरुन जाईल म्हणुन हात आखडता घेतोय.....

मृत्युन्जय's picture

21 Sep 2011 - 1:48 pm | मृत्युन्जय

बाबारे विषय जरा बघुन मग प्रतिसाद साठवत जा. ;)

वप्या, आपलं अ‍ॅक्टींग बद्दल चाल्लंय ना माधुरीच्या? का संवादलेखनाबद्दल? का असं करतोएस?

तुम्हाला संवादफेकनाबद्दल म्हणायचंय का???

पण जास्त खाजवु नका हो जखमेतुन रगुत वाहतंय.... भळाभळा
अगदी तसंच जसं फुल्यांना थेंब थेंब पाणी गळताना भदाभदा गळ्यालाचे आभास होतात.....

- (माधुरीवर सोकाजीपेक्षा जास्त प्रेम करणारा) वपाडाव

>> (माधुरीवर सोकाजीपेक्षा जास्त प्रेम करणारा) वपाडाव

तुमचे सोकाजीवर ईतके प्रेम आहे हे माहिती नव्हतं मला. ;)

चिंतामणी's picture

21 Sep 2011 - 10:30 pm | चिंतामणी

__/\__

वाहीदा's picture

22 Sep 2011 - 12:55 pm | वाहीदा

माधुरीवर सोकाजीपेक्षा जास्त प्रेम करणारा)

तु सोकाजीवर प्रेम करतोस :-?

वडापाव हे आम्हाला माहीत नव्हते हो , ऐकावे ते नवलच ! ;-)

सोत्रि's picture

22 Sep 2011 - 1:27 pm | सोत्रि

ओssss उगा माझ्याबद्दल गैरसमज नको म्हणुन हा प्रतिसाद!

मला वप्याच्या 'नवाबी' शौकांबद्दल काहीही माहिती नाही म्हणुनच तर मी त्यांचा गुलाम व्हायची तयारी दर्शवली होती.
सबब, मी साधा-'सरळ' गृहस्थ आहे, माझे माझ्या बायको मुलांवर फार्फार प्रेम आहे ;).

- ( 'स्ट्रेट' ) सोकाजी

शाहिर's picture

22 Sep 2011 - 1:36 pm | शाहिर

खि खि खि ..
किती हसु असा झला आहे ..
मॅनेजर बहुतेक येरवड्याला पाठवनार मला

नंदन's picture

21 Sep 2011 - 3:46 pm | नंदन

काय अभ्यास! काय अभ्यास!! दंडवत, मालक

(ह्यानंतर माझ्या चेहर्‍यावरची स्माइल पहा वाटल्यास, सध्या कलीग विस्मयकारकरित्या टवकारुन माझ्याकडे बघतोय)

खी: खी: खी: :)

बादवे, माधुरी ही कमर्शियल चित्रपटांतली उत्तम अभिनेत्री आहे असं माझं मत आहे. तिच्या अभिनयाची तुलना स्मिता पाटील, शबाना आझमी इ.शी होणार नाही अर्थात, पण अभिनयाला मर्यादित स्कोप आणि घिसीपिटी कथानकं ह्यातूनही ते जाणवतं. वर वपाडावकाकांनी उदाहरण दिलेलं आहेच.

वपाडाव's picture

21 Sep 2011 - 5:27 pm | वपाडाव

वर वपाडावकाकांनी उदाहरण दिलेलं आहेच.

माझ्या वैनींनी नंदन सारखा पुतण्या प्रसवुन खुपच उपकृत केलेलं आहे....
अन त्याच्या अशा अभ्यासु, सर्वसमावेशक प्रतिक्रिया वाचुन उर, कंठ अन ड्वळे सगळं काही भरुन येतं.....
बाळा, सदैव अशीच उत्तमोत्तम प्रगती करत रहावेस इतकेच सांगावे वाटते....
काळजी घे.....
- ( सर्व पुतण्यांना काळजी घ्यायला सांगणारा ) वपाडाव

प्रचेतस's picture

21 Sep 2011 - 6:15 pm | प्रचेतस

:)

मालोजीराव's picture

21 Sep 2011 - 8:06 pm | मालोजीराव

;)

- (माधुरीवर नेनेंपेक्षा जास्त प्रेम करणारा) मालोजीराव

रेवती's picture

21 Sep 2011 - 7:11 pm | रेवती

मी देवदास पूर्ण पाहिलाच नाही.
ऐश्वर्या रायच्या केसाला धुरी देण्याच्या प्रसंगाला तोंड देत असताना चक्क झोप लागली.
सिनेमाबद्दल काही म्हणायचे नाही. नंतर तूनळीवर डोला रे डोला गाणं पाहिलं.
आणि प्राजु तू चांदनी बार मधली तब्बू विसरलीस की काय?
पुन्हा तो सिनेमा पाहण्याचं धाडस होणार नाही इतकं दु:ख तब्बूनं हुबेहुब दाखवलय.
चांदनी बार सोसवला नाही बुवा! त्यानंतर तब्बुचा चिनी कम पाहिल्यामुळे जरा निराशा झाली एवढेच!

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 11:55 am | विनीत संखे

लज्जा मधे "चारीत्र्यहीन" म्हणून लोकं अंगावर आलेली असताना तिच्या वाईट नजर ठेवणार्‍या "पुरूषोत्तम" ची प्रतारणा करणारी आणि तिथेच लोकांनी केलेल्या दंगलीत आपलं बाळ गमवून आक्रोश करणारी "जानकी" पहा... हृदय हेलावून टाकते रे....

पुन्हा कालीबाबूला धारेवर धरणारी चंद्रमुखी.. आग असते तेव्हा तिच्या डोळ्यांत.

पुकारमध्ये आधी अगतिक होऊन "जय" कडे असहाय्यपणे प्रेम मागणारी आणि नंतर केलेल्या कृत्यासाठी पश्चातापदग्ध होऊन त्यासाठी आपला जीवपणाला लावणारी अंजली पहा.

"प्रेम प्रतिज्ञा" मध्ये आपल्या वजन उचलणार्‍या बाबाच्या पाठीवर तेल चोपून त्याला मसाज देताना एक चेहेर्‍यावर वेगळंच कौतुक असलेली पण बाबाच्या पिण्यावर ताशेरे ओढणारी लक्ष्मी पाहा.

मृत्युन्जय's picture

21 Sep 2011 - 6:19 pm | मृत्युन्जय

प्रतारणा करणारी

प्रताडना असे म्हणायचे आहे काय तुम्हाला?

मृत्युन्जय's picture

21 Sep 2011 - 12:01 pm | मृत्युन्जय

माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण आणि महत्व तिच्या सहजपणात आहे. ती जसा अभिनय करु शकते तसा तब्बु करु शकत नाही हे तर सत्यच आहे आणि ते सत्य विजयपथ / साजन चले ससुराल वगैरे चित्रपटात दिसुनही येते. तब्बुनेही अनेक उत्तम चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे पण तिच्या अभिनयाची जातकुळी वेगळी आहे. नानाच्या अभिनयातला अंगार अमिर खान किंवा शाहरुख खान दाखवु शकत नाही म्हणुन आगपाखड करण्यात अर्थ नाही. अमिताभ बच्चन सारख एक परिपुर्ण अभिनेता दुसरा कोणीही नाही. पण आमिर त्याच्या परीने योग्य काम करतो आणि दर्जेदार चित्रपट देतो.

माधुरीनेही अनेक उत्तम चित्रपटात अभिनय केला आहे. हम आपके है कौन तिने त्याच सहजपणावर ओढला. तिनेदेखील लज्जा, मृत्युदंड वगैरे वेगळ्या धाटणीचे चित्रपटही केले आणी तसा अभिनयही करु शकते हे सिद्ध केले. मला वाटते इथे थोडी गल्लत अश्यामुळे होते आहे की ती इतका सहज अभिनय करते की त्याच्यात नाटकीपणाचा अभिनिवेश नसतो, कृत्रिमता नसते, बोजडपणा नसतो त्यामुळे तिला महान अभिनेत्री म्हणताना कदाचित तु(म्हा)ला त्रास होत असावा. परंतु ज्याप्रमाणे साहित्य हे केवळ दर ३ पानांमागे ४ खुन, ५ भूकबळी, ६ गलिच्छ शिव्या आणि ७ भांडणांमुळे उच्च दर्जाचे आहे असे होत नाही त्याचप्रमाणे अभिनय देखील केवळ अश्रु आणि निराशेचे भाव दाखवुन श्रेष्ठ होत नाही. सहजता हा देखील अभिनयाचा एक सुंदर पैलु असु शकतो.

माननीय अध्यक्षा, एवढे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.

तळटीपः

१. माधुरी मलाही फारशी कधी आवडायची नाही. परंतु तिच्या अभिनयक्षमतेबद्दल आणि अभिनयाबद्दल मला कधी प्रश्न पडला नाही.

२. माधुरी मला आवडतच नाही असेही नाही. तिचे वर्दी आणि दयावान नावाचे दोने उच्च चित्रपट मला फार्फार आवडतात.

३. एम एफ हुसैन नावाच्या महान कलाकाराला प्रचंड आवडणार्‍या (आणि त्याच्या मुस का पेस्ट्री ते काय असणार्‍या) अभिनेत्रीला आणि त्यांच्या गजगामिनी नावाच्या अत्त्युच्च दर्जाच्या कलाकृतीमध्ये केवळ कंबरेच्या, पार्श्वभागाच्या आणि पाठीच्या सहाय्याने हेवनली (ब्वॉडी) अभिनय करणार्‍या महान नायिकेवर ताशेरे ओढल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करु नये अशी नोटीस तुमच्यावर बजावण्यात येणार आहे असे कळते. तरी तयार असावे.

कळावे,

लोभ असावा (म्हणजे पाशवी शक्तींना एकत्र करुन आमच्याविरुद्ध आघाडी उघडु नये अशी नम्र विनंती. अश्याही बर्‍याच पाशवी शक्ती या धाग्याबाबत तुमच्या विरोधात आहेत म्हणा)

वर्दीप्रेमी दयाकांक्षी मृत्युंजय.

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 12:15 pm | विनीत संखे

एम एफ हुसैन नावाच्या महान कलाकाराला प्रचंड आवडणार्‍या (आणि त्याच्या मुस का पेस्ट्री ते काय असणार्‍या) अभिनेत्रीला ...

मुस नाही हो "म्युज"

आणि त्यांच्या गजगामिनी नावाच्या अत्त्युच्च दर्जाच्या कलाकृतीमध्ये

इथं फारकत. अत्युच्च की अतार्किक? असो ... पण चित्रपटात कालिदास सायकल घेऊन आला तेव्हा मला विनोदी वाटलेला तो चित्रपट...

केवळ कंबरेच्या, पार्श्वभागाच्या आणि पाठीच्या सहाय्याने हेवनली (ब्वॉडी) अभिनय करणार्‍या महान नायिकेवर ताशेरे ओढल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करु नये अशी नोटीस तुमच्यावर बजावण्यात येणार आहे असे कळते. तरी तयार असावे

हे मात्र खरं हो. तिचं पाठमोरं नृत्य आजही मागल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांत चित्रीत झालेल्या कुठल्याही क्लासिकल नृत्यांपैकी एक अभिजात कलाकृती मानावं इतकं सुरेख आहे.