पाऊसगोष्ट तुझी माझी

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
27 Aug 2011 - 9:53 am

तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो...
रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच. तो भुरभूर करीत बरसू लागला... पुढे पुढे रपरप... अन् नंतर तर धोधोच! मी पुढील बाजूने दे दणादण धारा झेलीत होतो. तू मात्र माझ्या आडोशाने स्वतःला बचावित होतीस. भिजणे तुझ्या मनी नव्हते. मी तर केव्हाच आतपर्यंत भिजलो होतो, प्रेमातही... पावसातही! वारा असा होता, धारा अशा होत्या की कोरडी राहण्याचा तुझा आटोकाट प्रयत्न त्यांच्या बेभानपणापुढे फसत गेला आणि माझ्यासह तूही अगदी नखशिखांत ओली झालीस...
ते भिजणं तुझं वरवरचं होतं तर मी अंतर्बाह्य ओलेता झालो होतो. प्रीतीवर्षावात मी आतमध्येही नाहलो, बाहेरूनही. तू मात्र तशीच कोरडी राहण्याचा अट्टाहास बाळगून होतीस. बाहेर निसर्ग ओलाचिंब होत होता, पण तू फक्त शरीराने भिजणे अनुभवत होतीस. माझं मीपण विसरून मी सर्वस्वी तुझाच झालो होतो, तर तू कधी एकदा आपला थांबा येतो अशा चिंतेत गुंतल्याने भिजपावसाच्या मौजेला पारखी झाली होतीस. घाट पार करतांना येणारी वळणं झोंबरा वारा घेऊन येत गेली आणि तुझं मला बिलगणं ओघाने आलंच की सखी. होय, मी तुला सखी समजत होतो तर तू मला मित्रत्वाच्या नात्यानेच जोखीत होतीस, तोलीत होतीस...
असो.
‘यही सही’ म्हणालो मनातल्या मनात पण तुला काय ऐकू आलं कोण जाणे तू पटकन अचानक बोलून गेलीस, ‘असं वाटतं, हा प्रवास संपूच नये...’
तुझं ते एकच वाक्य माझ्या मनात इतकं झिरपलं की मी आत खोलवर रुजत गेलो, सजत गेलो. त्या वाक्याने माझ्या काळजावर रेखीव नक्षी अशी रेखली की जशी वळवाची पहिली सर उनलेल्या फुफाट्यावर शितलतेची रांगोळी काढते. तुझं बिलगणं मनतळी असं साचत गेलं की जणू एखादा ओहोळ कोरड्या कपारीतून कोसळून जावा, ओसंडून जावा. तुझा स्पर्श असा चिंब करून गेला की जसा काही एखादा कोमल नभ उंच शीतलशा टेकडीवर अलगद रुतावा, आल्हाद करून जावा.
तुला त्या तुझ्या इच्छित स्थळी सोडलं आणि तू मुग्धपणे स्मित करीत नजरेआड झालीस. मी तिथेच त्याच धुवांधार पावसात कितीतरीवेळ तुझ्या पाठमोऱ्या आकृतीला आठवित राहिलो... मागे फिरलो तेव्हा कडकडीत उन पडल्याने मी खडखडीत वाळून गेलो!
तुझं येणंही असंच अवचित येणाऱ्या मृदुल सरीसारखं असायचं. आणि तुझं जाणं? तुझं जाणं पुन्हा मान्सूनसाठी आतुरलेल्या चातकाच्या मनःस्थितीसारखं. तू पुन्हा येशील, पुन्हा बिलगशील, पुन्हा आतपर्यंत झिरपशील अशी वेडी आशा मनी बाळगून मी आजही त्या मान्सूनच्या प्रतिक्षेत जीवनपथाचे विराण वाळवंट मंदगतीने चालतो आहे... चालतो आहे...

(लोकमत 'ऑक्सिजन' १९-०८-२०११. उल्लेखनीय लेखन.)

कथामुक्तकजीवनमानमौजमजाप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

sagarparadkar's picture

27 Aug 2011 - 2:19 pm | sagarparadkar

तुम्ही असंपण लिहु शकता? ..... नवलच आहे

कोण रे ते म्हणतंय .... कि फक्त टवाळकीच करता येते हणून ..... परत बोलाल तर याद राखा ...

स्पा's picture

27 Aug 2011 - 2:27 pm | स्पा

सुरेखच लिहिलंय

नगरीनिरंजन's picture

28 Aug 2011 - 2:01 pm | नगरीनिरंजन

सुरेखच लिहीलंय.

utkarsh shah's picture

27 Aug 2011 - 2:38 pm | utkarsh shah

छान तन्द्री लागली वाचताना........

छान लेखन. गारवा आठवला.

मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो...

होतं असं कधी कधी. परंतू समोरुन जोडीदाराची साथ लाभतेच असं नाही. मग "स्वप्नायुष्यातच" सारं उरकावं लागतं.

पुढे पुढे रपरप... अन् नंतर तर धोधोच! मी पुढील बाजूने दे दणादण धारा झेलीत होतो. तू मात्र माझ्या आडोशाने स्वतःला बचावित होतीस. भिजणे तुझ्या मनी नव्हते. मी तर केव्हाच आतपर्यंत भिजलो होतो, प्रेमातही... पावसातही! वारा असा होता, धारा अशा होत्या की कोरडी राहण्याचा तुझा आटोकाट प्रयत्न त्यांच्या बेभानपणापुढे फसत गेला आणि माझ्यासह तूही अगदी नखशिखांत ओली झालीस...

क्या बात हैं डॉक्टरसाहेब !!!

घाट पार करतांना येणारी वळणं झोंबरा वारा घेऊन येत गेली आणि तुझं मला बिलगणं ओघाने आलंच की सखी.

अंमळ हळवा झालो हे वाचून...

(लोकमत 'ऑक्सिजन' १९-०८-२०११. उल्लेखनीय लेखन.)

तुम्हालाही आराधनावाल्या गणनायक नातलगांची सवय लागली का राव?

शुचि's picture

28 Aug 2011 - 12:10 am | शुचि

मस्त!!! आजच हे गाणं ऐकलं. -

Look at me, I'm as helpless as a kitten up a tree;
And I feel like I'm clingin' to a cloud,
I can' t understand
I get misty, just holding your hand.
Walk my way,
And a thousand violins begin to play,
Or it might be the sound of your hello,
That music I hear,
I get misty, the moment you're near.
Can't you see that you're leading me on?
And it's just what I want you to do,
Don't you notice how hopelessly I'm lost
That's why I'm following you.
On my own,
When I wander through this wonderland alone,
Never knowing my right foot from my left
My hat from my glove
I'm too misty, and too much in love.
Too misty,
And too much
In love.....

हा प्रतिसाद डॉक्टरसाहेबांचा लेख चांगला आहे हे सांगायला आहे की तुम्ही आज कुठलं इंग्रजी गाणं ऐकलं हे सांगायला आहे? ;)

आम्ही आपले बापडे अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे म्हणणार्‍या मिसळपाववर काहीतरी मराठी वाचायला येतो तर कधी कविता आस्वाद नावाखाली तर कधी प्रतिसादातच इंग्रजी कविता वाचायला लागतात :(

हे असं इंग्रजी कविता कुठून तरी उचलून इथे पेष्टवण्यापेक्षा त्या कवितेचा मराठी भावानूवाद किंवा गेला बाजार स्वैर अनुवाद करुन इथे टाकलात तर ते जास्त चांगलं होईल असं वाटतं... आणि आम्हालाही मराठी संकेतस्थळावर आल्याचं समाधान मिळेल ;)

हा प्रतिसाद लेख चांगला म्हणायलाच आहे.

"शुचि" या आयडी चे लेख न वाचण्याचा, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. 'अस्सल मरठीतून अभिव्यक्ती' करणे = इतर भाषेतील संदर्भाचे वावडे असणे असे नव्हे.

मला स्वैर अनुवाद जमणार नाही. जमला तर करेन. नाही जमला तर नाही करणार.

धन्या's picture

28 Aug 2011 - 1:24 am | धन्या

"शुचि" या आयडी चे लेख न वाचण्याचा, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.

मराठी संकेतस्थळावर मराठी लेखनाची अपेक्षा करण्यात काही गैर नसावे असे मला वाटते.

'अस्सल मरठीतून अभिव्यक्ती' करणे = इतर भाषेतील संदर्भाचे वावडे असणे असे नव्हे.

इतर भाषेतील संदर्भ देणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य जसेच्या तसे पेष्टवणे नव्हे. :)

मला स्वैर अनुवाद जमणार नाही. जमला तर करेन. नाही जमला तर नाही करणार.

आमच्या शाळेतील उनाड पोरं मास्तरांना बरेच वेळा अशीच उत्तरे देत असत. :)

>> इतर भाषेतील संदर्भ देणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य जसेच्या तसे पेष्टवणे नव्हे. >>
बरं!! मग कसा देतात संदर्भ?

तुम्ही आता अगदी खोदताच आहात म्हणून सांगते. -

काल जी मी कविता दिली ती एक अप्रतिम इन्टेन्स कविता आहे जिच्या वाचनाचा यु-ट्युबवरही त्या कवयित्रीच्या भाषेत दुवा आहे. ही वडीलांनी लहान मुलीच्या केलेल्या लैगिक शोषणावरची कविता असून मला त्यावर जास्त बोलावसं वाटलं नाही. कारण त्या कवितेची नायिका ही स्वतः कवयित्री आहे पण मला ही बाब उल्लेख करावीशी वाटली नाही.
Because some things are better left unuttered.
पण ही माहीती दिली नाही म्हणून त्या कवितेची दाहकता कमी होत नाही. मला आवडलेला एक मास्टरपीस इतरांबरोबर वाटून घेता यावा याकारणाने मी ती काल टाकली.

पण बरोबर आहे इथल्या नियमानुसार - मूळ उद्देश पडतो बाजूला तिसर्‍याच गोष्टीवर चर्वितचर्वण सुरु होते.
_______

डॉक्टरसाहेबांचा लेख वाचला आणि त्यांची अंतर्बाह्य भीजलेली अवस्था जी त्यांनी वर्णन केली आहे ती वाचून मला "MISTY" हे आज सकाळी ऐकलेले गाणे आठवले. म्हणून तो संदर्भ दिला.
आणि मला जर काही असे आठवले तर यापुढेही देईन.

बरं!! मग कसा देतात संदर्भ?

संदर्भ देणे म्हणजे दुसर्‍या लेखकाचे लेखन जसेच्य तसे चिकटवणे नव्हे. त्या दुसर्‍या लेखकाचे लेखन या गोष्टीच्या संदर्भात कसे लागू होते हे सांगणेही अपेक्षित असते.

डॉक्टरसाहेबांचा लेख वाचला आणि त्यांची अंतर्बाह्य भीजलेली अवस्था जी त्यांनी वर्णन केली आहे ती वाचून मला "MISTY" हे आज सकाळी ऐकलेले गाणे आठवले. म्हणून तो संदर्भ दिला.

याच ओळींना जोडून कवितेचा सारांश मराठीत आणि तुमच्या मुळ प्रतिसादात दिला असतात तर ते संदर्भ देणं झालं असतं :)

आणि मला जर काही असे आठवले तर यापुढेही देईन.

ते वरच्या एक दोन प्रतिसादातच कळलं. आणि त्याला मी उत्तरही दिलं. गुगळेंची देव आनंद - मदन पूरी काँबॅट थिअरी वापरुन सांगायचं झालं तर तुमच्या या मुद्दयाला मी वर उत्तर दिलंय. आता तुम्ही पुढच्या कितीही प्रतिसादात हे लिहा, मी त्याला उत्तर देणार नाही ;)

शुचि's picture

28 Aug 2011 - 2:03 am | शुचि

यापुढे सविस्तर संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन.

धन्या's picture

28 Aug 2011 - 2:07 am | धन्या

उत्तम...

खरं तर मी सर्वात पहीला प्रतिसादच "किडींग नोट" म्हणून दिला होता. तुम्ही उगाचच सिरियस होत गेलात आणि मी मजा घेत गेलो. :)

शुचि's picture

28 Aug 2011 - 2:19 am | शुचि

हाहा ... पण खरच मला शब्द सुचण्याची खूप समस्या आहे. म्हणजे खरच शब्द सुचत नाहीत. :( ........ असो.आपले म्हणणे पटते. संदर्भ द्यायचा तर व्यवस्थित विस्तारपूर्वक, दुसर्‍याला समजेल असा देणे केव्हाही चांगले. कसंतरी ताट वाढल्यासारखं मी करते आणि दर वेळेला खंतावते अरे हेच आपल्याला निगुतीने करता नसते आले का?

पण कालच्या कवितेच्या विषयावर मला खरच काही सुचेना. विषय फार विचित्र आहे. कवितेते केलेली गूढ वातावरणनिर्मीती फार अप्रतिम आहे. वडीलांना दिलेली "वेअर्वूल्फ" ची उपमा, घुबडांचा आवाज हे सर्व अतिशय परीणामकारक आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्‍या लहान्शा मुलीचे वर्णन तर दयनीय आहे. हे सर्व मला नाही बोलता आले.

सल्ल्याबद्दल, आपले अनेक धन्यवाद. :)

सगळ्या चर्चा अशा संपतील तर किती मस्त होइल,
शुचीतै आणि धनाजीरावांच्या बद्दल आदर वाढला..

बाळकराम's picture

28 Aug 2011 - 2:25 am | बाळकराम

फक्त "घन उतरू आलं" च्या ऐवजी "नभ उतरू आलं" असं पाहिजे होतं- अर्थात त्याने मूळ लेखाला काही बाधा पोचत नाही म्हणा..

अप्पा जोगळेकर's picture

28 Aug 2011 - 6:29 pm | अप्पा जोगळेकर

ते भिजणं तुझं वरवरचं होतं तर मी अंतर्बाह्य ओलेता झालो होतो. प्रीतीवर्षावात मी आतमध्येही नाहलो, बाहेरूनही.
तुमचे जिलब्या, कुस्ती वगैरे वगैरे लेख वाचलेले असल्यामुळे हे वाक्य वाचल्यावर मनात पाचकळपणा डोकावून गेला.
लेख ठीक वाटला.

स्पंदना's picture

29 Aug 2011 - 5:58 am | स्पंदना

व्वा !!

अक्षरशः

न भिजता ही भिजवत गेला
आठवणींना उठवत गेला,
मनः कोपरा ओला ओला
शब्द साथ ना या ह्रदयबोला ॥

गणेशा's picture

30 Aug 2011 - 2:26 pm | गणेशा

अप्रतिम लेखन