मागील दुवे : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266
काल मी असाच गावात फ़िरत होतो. एकटाच.या दूर देशात मला माझं असं कोण भेटणार आहे.
ऊन रणरणत होते....रस्त्यावर काही बघणं ही नको वाटत होतं.डोक्यावरचा सूर्य कोणावरतरी रागावुन आल्यासारखा आग ओकत होता.माणसे नाईलाजाने रस्त्यावरुन जात होती.
शर्टच्या बाही नंतरच्या उघड्या अंगाला जळत असावे तसे उन्हाचे चटके बसत होते. रणरणत्या ऊन्हात मी का भटकत होतो ते मलाच कळत नव्हते.आपण या गावात का आलो .मी असा एकटा निरुद्देश का फ़िरतो ते शोधत होतो.आपले ध्येय काय......ते साधुन काय मिळणार आहे हे प्रश्न सतावत होते. काम असले की बरे असते. हे असले प्रश्न डोके सुद्धा वर काढत नाहीत.
तेव्हढ्यात मला तो दिसला...एकटाच थांबलेला सिगरीट ओढत स्वत:च्याच विचारात मग्न....जगाची फ़िकिर नसलेला...जणु माझे विचारांचे प्रतिरूप बनुन या जगात आलेला....
सडक के किनारे ; चिलचीलाती धूप मे
मै जलती सिगरेट लिये खडा था
पैरो के जूते इस कदर घिस गये थे
के एडीयां और सडक एक से लगते थे
कपडे मैले और फ़टे
हम अपनी ही हालात पे हस रहे थे
हर समय मुझे अतीत ही लग रही थी
जलती सिगरेटसा मै भी जल रहा था
छोडे कश के धुवें मे
खुद को ही पाता
और बिखरता देख रहा था.
त्याचाच विचार करत थोडा वेळ तसाच चालत राहिलो.....रणरणतं ऊन....... आसपासच्या झाडांच्या केरसुण्या झाल्या होत्या....उन्हाने जळुन कोळसा होत नाही म्हणून त्याला झाड म्हणायचे.इतकेच.....एखादे दुसरे पान नावाला सुद्धा शिल्लक नव्हते......कन्दील जळावा तशी दुपार ढाण ढाण जळत होती........रस्त्यावर चिटपाखरु नव्हते.......मग हा का इथे ? काय करतो आहे?
मग मी तरी काय करतो आहे इथे?
स्वत:ला प्रश्न विचारण्याव्यतिरिक्त आपल्याला काहीच करता येण्यासारखे नाही हे लक्षात येताच मी विचार करणं बंद केले....नुसताच चालत राहीलो....दूर एका निष्पर्ण झाडाखाली त्याच्या वठलेल्या सावलीत कोणी दुष्काळी कामावरचा मजूर झोपला होता. शेजारीच एक छोटे मूल तिथेच निवान्त बिनघोर खेळत होते.त्याला मी पहातच राहिलो. गारुड केल्यासारखा डोळे विस्फ़ारुन......
चिलचिलाती धूप..; रूखे सूखे पेड
पत्ते भी जल गये थे
बस; सर कटी लाशों की तरह
सूखे दरख्त खडे थे.
ऐसेही एक दरख्त की सूखी छांव मे
तुम थकान के नशे मे सोये थे
पासही में कुछ औजार भी सो रहे थे
शायद पत्थर फ़ोड फ़ोडकर वे भी थक गये थे.........
तुम्हारे चेहरे पर मुस्कान थी
शायद भूक की दूनिया से तुम आज़ाद हो गये थे
पास खेलता हुवा तुम्हारा बच्चा
वो हसी देखकर खिलखिलाया
उसे क्या मालुम....
के ख्वाबों मे देखे
वो चावल के दाने
असल की भूख नही मिटाते.............
काल पाऊस आला होता........हो काल पाऊस आला होता...या दूर देशात कोणीतरी आपलं भेटायला आलं असावं असं वाटलं.आपल्या इथे येतो तसा जोराचा शिडकावा नव्हता थोडावेळ आला मग ये जा करत राहीला.....कसाही असला तरी पाउस आपला वाटतो...पाऊस येताना नेहमी मला "रिमझीम के तराने लेके आयी बरसात..याद आयी वो पहली मुलाकात " हेच गाणे आठवते...का कोण जाणे....अगदी लहानपणापासुन....आपली पहिली भेट कुठे झाली होती आठवते तुला.....आपण असेच कॊलेजमधुन घरी निघालो होतो. बसची वाट पहात स्टॊप वर उभे होतो. मी चिक्क भिजलो होतो आणि तू माझ्याकडे पाहिलेस आणि मोठ्याने हसायला लागलीस.....तू का हसते आहेस ते मला कळेना....रागारागानेच मी तुझ्याकडे पाहिले...तू आणखीनच जोराने हसायला लागलीस.....तुझे हे नेहमीचेच...हसायला लागलीस की थांबतच नाहीस....एक हात पोटावर आणि दुसरा तॊंडावर......तु हसत राहिलीस...मी तस्सा बसची वाटसुद्धा न पहाता भिजत निघुन गेलो.......दूर जाउन प्यान्टवर कुठे कुठे चिखलाचे डाग लागले ते पहात बसलो......मला कळालच नाही तू का हासली होतीस ते....मी नन्तर कितिदातरी विचारले तुला त्याबद्दल.....पाऊस आला की तुला काय उत्साह यायचा........चेहेरा वर करुन मिटल्या डोळ्यांवर पावसाचे थेम्ब झेलणे तुला खूप आवडायचे...अगदी लहान मूल व्हायचीस तू त्यावेळी....
पाऊस आला की मला हे नेहमीच आठवते.....अर्थात ते आठवण्यासाठी पाऊसच यायला हवा असे नाही...........उघड्या खिडकीतुन त्या दूरच्या टेकडीकडे पहाताना देखिल मला पाऊस आठवतो....आणि त्या मागोमाग ते क्षण धावत येतात............
मै युंही जब
कभी वक्त गुजारता हुं..
बादल अचानक कहीसे दौडे आते हैं
अन्धेरासा छा जाता है....
बारीश की फ़ुहार होती हैं
फ़िज़ा मे कुछ नमी कुछ तवानाई....
गुजरा वक्त तरो ताज़ा होकर
युं सामने आ बैठ जाता है..
बारीश की हर बूंद
एक एक पल ले आती हैं
कुछ बुंदे मैं हाथों मे समेटना चाहता हुं
वो चन्द हसींन पल; तुम्हारी खिलखिलाती हसी....
वो सलोनी रुसवाई
सब कुछ हातों मे रोकना चाहता हुं
मै खुद भीग जाता हुं
आखों मे नमी लिये
बरसते बादल ताकता हुं......
तुला आठवतं? तू एकदा अशीच घरी आली होतीस...कोणतेतरी गाणे गुणगुणत स्वत:शीच हसत होतीस....आपल्याच नादात होतीस....गाणे गुणगुणताना तू सगळ्या खिडक्या उघडल्यास.........जोराचा वारा आला....टेबलावरचे सगळे कागद उडत विखुरले गेले...एकदोन कागद तर खिडकी बाहेर गेले.........मला तर कागद शोधु की खिडकी बंद करु या गोंधळात बावचळायला झालं...माझी ती अवस्था पाहुन तू आणखीनच जोरात हसायला लागलीस.........तुला हसायला निमित्य लागायचे नाहीच........कधीही तयार.....ए... पण एक सांगु...तुझे हसणे एकदम खळखळत्या पाण्याच्या झ-या सारखे वाटायचे.....वातावरणात एक उत्साह पसरवायचे.....तू येउन गेलीस की आख्खे घर जणु उत्साहात न्हालेले असायचे. तुझ्या आवडी निवडी घरातल्या लोकानाच काय पण घरातल्या फ़र्निचर ला सुद्धा पाठ असतील.....बेडशीट ला एकही सुरकुती पडलेली तुला खपायचे नाही....सोफ़्यावरचे कव्हर प्रत्येकवेळा तू नीट करायचीस.....अन मी तर असा.......पसारा असल्याशिवाय काम राहुदे; मला काही बोलणही सुचायचे नाही..... अन तू पसारा आवरायचे जणू व्रत घेतलेली......माझे टेबल आवरुन ठेवलेस की मला कोणतीही वस्तु सापडायची नाही........माझ्या या चरफ़डीला तू हसायचीस.प्रत्येकवेळा वस्तु शोधायला मला तुला फ़ोन करावा लागायचा.........
पण तू माझे टेबल आवरुन ठेवलेस की त्याला एक वेगळाच रुबाब प्राप्त व्हायचा........ते काही वेगळेच दिसायचे. खोलीचे रूपरंगच पालटुन जायचे.
शहर से कुछ दूर
और थोडा करीब भी
एक आशियां है मेरा
हर शामचमकते जुगनू
और सुबह तितलीयों के साथ गुजारता...
पास के पेडो मे चहकती चिडीयां
और महकते फ़ूलों की बाते सुनता
एक आशियां है मेरा......
टूटी फ़ूटी खपच्चड दीवाले
और सादासा फ़र्निचर लिये
वक्त गुजारता....
एक आशियां है मेरा
एक पुरानी अलमारी
साथ मे दीवाल से सटा टेबल
और कुछ ताजा तरीन यादें लिये
एक आशियां है मेरा....
तुम कभी यहां आती थी
दो प्याली चाय के साथ खिलखिलाती थी
तुम्हारी आवाज़ ; तुम्हारे हौसलें
और वो सादे से सपने
सब कुछ अपने मे समेटायें
एक आशियां है मेरा.....
वैसे तो हर वक्त तुम याद आती हो
जब भी याद आती हो
दीवाले , अलमारी , कुर्सी
सब तरो ताज़ा हो जाते हैं
वही खुश मिज़ाज़ी त्योहार मनाता
एक आशियां है मेरा........
(क्रमश:)
प्रतिक्रिया
30 Jun 2008 - 10:59 am | शेखर
विजुभाऊ ,
बारीश की हर बूंद
एक एक पल ले आती हैं
कुछ बुंदे मैं हाथों मे समेटना चाहता हुं
वो चन्द हसींन पल; तुम्हारी खिलखिलाती हसी....
वो सलोनी रुसवाई
सब कुछ हातों मे रोकना चाहता हुं
मै खुद भीग जाता हुं
आखों मे नमी लिये
बरसते बादल ताकता हुं......
खल्लास...अप्रतिम...
30 Jun 2008 - 11:07 am | मदनबाण
तुला हसायला निमित्य लागायचे नाहीच........कधीही तयार.....ए... पण एक सांगु...तुझे हसणे एकदम खळखळत्या पाण्याच्या झ-या सारखे वाटायचे.....
हे मस्तच.....
(अवखळपणे हसणारा)
मदनबाण.....
30 Jun 2008 - 11:10 am | मनिष
बरसू द्या! :)
30 Jun 2008 - 11:10 am | आनंदयात्री
तुम थकान के नशे मे सोये थे
पासही में कुछ औजार भी सो रहे थे
शायद पत्थर फ़ोड फ़ोडकर वे भी थक गये थे.........
क्लास !
30 Jun 2008 - 11:13 am | डोमकावळा
विजूभाऊ,
अतिशय छान लिहिलय...
तुम्हारे चेहरे पर मुस्कान थी
शायद भूक की दूनिया से तुम आज़ाद हो गये थे
पास खेलता हुवा तुम्हारा बच्चा
वो हसी देखकर खिलखिलाया
उसे क्या मालुम....
के ख्वाबों मे देखे
वो चावल के दाने
असल की भूख नही मिटाते.............
अप्रतिम...
प्रतिक्रिया देण्यासाठी शब्दच सुचत नाहीयेत...
30 Jun 2008 - 12:08 pm | इनोबा म्हणे
जलती सिगरेटसा मै भी जल रहा था
छोडे कश के धुवें मे
खुद को ही पाता
और बिखरता देख रहा था.
तुम्हारे चेहरे पर मुस्कान थी
शायद भूक की दूनिया से तुम आज़ाद हो गये थे
पास खेलता हुवा तुम्हारा बच्चा
वो हसी देखकर खिलखिलाया
उसे क्या मालुम....
के ख्वाबों मे देखे
वो चावल के दाने
असल की भूख नही मिटाते.............
अप्रतिम...
तुमच्या काव्यप्रतिभेला आपला सलाम!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
30 Jun 2008 - 12:38 pm | पद्मश्री चित्रे
जलती सिगरेटसा मै भी जल रहा था
छोडे कश के धुवें मे
खुद को ही पाता
और बिखरता देख रहा था.
सुन्दर...
फुलवा
30 Jun 2008 - 12:48 pm | अरुण मनोहर
छान लिहीले आहे.
अवांतर- सिगारेट पीना स्वास्थ्य के लिये हानीकारक है.
जलती सिगरेटसा मै भी जल रहा था
छोडे कश के धुवें मे
खुद को ही पाता
और बिखरता देख रहा था.
30 Jun 2008 - 3:59 pm | विदुषक
वा !!!
गुलजार आणी नीदा फाजली ची आठवन करुन दिलित
क्या बात है !!!
मजेदार विदुषक
30 Jun 2008 - 5:53 pm | वरदा
नेहेमीसारखाच मस्त लेख...
बारीश की हर बूंद
एक एक पल ले आती हैं
कुछ बुंदे मैं हाथों मे समेटना चाहता हुं
वो चन्द हसींन पल; तुम्हारी खिलखिलाती हसी....
वो सलोनी रुसवाई
सब कुछ हातों मे रोकना चाहता हुं
मै खुद भीग जाता हुं
आखों मे नमी लिये
बरसते बादल ताकता हुं......
हे खूप आवडलं....
30 Jun 2008 - 6:34 pm | शितल
मै युंही जब
कभी वक्त गुजारता हुं..
बादल अचानक कहीसे दौडे आते हैं
अन्धेरासा छा जाता है....
बारीश की फ़ुहार होती हैं
फ़िज़ा मे कुछ नमी कुछ तवानाई....
गुजरा वक्त तरो ताज़ा होकर
युं सामने आ बैठ जाता है..
बारीश की हर बूंद
एक एक पल ले आती हैं
कुछ बुंदे मैं हाथों मे समेटना चाहता हुं
वो चन्द हसींन पल; तुम्हारी खिलखिलाती हसी....
वो सलोनी रुसवाई
सब कुछ हातों मे रोकना चाहता हुं
मै खुद भीग जाता हुं
आखों मे नमी लिये
बरसते बादल ताकता हुं......
हे तर एकदम खतरा लिहिले आहे,
1 Jul 2008 - 4:16 am | पिवळा डांबिस
चिलचिलाती धूप..; रूखे सूखे पेड
पत्ते भी जल गये थे
बस; सर कटी लाशों की तरह
सूखे दरख्त खडे थे.
ऐसेही एक दरख्त की सूखी छांव मे
तुम थकान के नशे मे सोये थे
पासही में कुछ औजार भी सो रहे थे
शायद पत्थर फ़ोड फ़ोडकर वे भी थक गये थे.........
सुरेख वर्णन!!
तुमचं प्रेम शेवटी सफळ होऊ द्या बुवा!!
|तुम अगर साथ हो तो, किसी और चीज की जरूरत नही|
||तुम अगर साथ छोड दो तो, किसीभी चीजकी कोई कीमत नही||
उगीच प्रेमभंग वगैरे करू नका...
या वयात आता आम्ही काय काय सहन करायचं?:)
1 Jul 2008 - 5:11 am | बेसनलाडू
तिन्ही भाग आजच क्रमाने वाचून काढले. फार छान. आवडले.
पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
(उत्सुक)बेसनलाडू
1 Jul 2008 - 6:59 am | अनिल हटेला
@ विजुभाऊ!!!!!!
एकच शब्द.......
अप्रतीम..........
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
15 Sep 2008 - 12:07 pm | मृगनयनी
विजुभाउ........ द ग्रेट पोएट / गझलाकार / शायर ........
१ कुतुहल : ही वर उल्लेखलेली रचना आपलीच आहे ना?
:-?
15 Sep 2008 - 12:07 pm | मृगनयनी
विजुभाउ........ द ग्रेट पोएट / गझलाकार / शायर ........
१ कुतुहल : ही वर उल्लेखलेली रचना आपलीच आहे ना?
:-?
15 Sep 2008 - 12:15 pm | विजुभाऊ
१ कुतुहल : ही वर उल्लेखलेली रचना आपलीच आहे ना?
१०००% माझीच आहे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
15 Sep 2008 - 1:14 pm | राघव
विजुभाऊ,
सगळे भाग एकदम वाचल्यामुळे वाटलं असेल कदाचित पण... काय जीव घ्याल काय राव? :)
अहो किती सुंदर वर्णन करायचे? त्याला काही सीमा? एकेका वाक्यागणिक बेहोष व्हायला होतंय इथं अन् तुमचं चित्र आणखी रंगतंय.. माहित नाही आपले काय होणार आणखी.. !!
तसे आम्हीसुद्धा या मार्गातनं गेलेलोय अन् सफलही झालोय.. पण असे मांडता नाही येत बॉ. बाकी अनुभव सगळे अस्सेच! :D
झकास लिहिलंय!
एक शेर आमचाही -
तस्वीर नजरोंमे हो, पर कागज़ पर न आएं,
लब्ज ज़हनमें हो, पर जुबांपर न आएं,
तड़प दिलमें हो, पर किसीकी समझमें न आएं,
...शायद, प्यार की राहमें पहला कदम है!
मुमुक्षू