मागील दुवा :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) http://misalpav.com/node/4650
आज पहाटेच मला जाग आली. अजून उजाडायचे होते. चंद्र माझ्या खिडकीच्या काठावर मावळत होता.
हवाहवासा किंचित गारवा होता. का कोण जाणे मला कुठूनसा प्राजक्ताच्या फुलांचा मस्त दरवळ आला.
प्राजक्ताच्या फुलांचा गंध नेहमी तुला सोबत घेवून येतो.आणि मग माझ्या मनातला प्राजक्त फुलून येतो.
तु मला नेहमीच "तू प्राजक्ताच्या फुलांसारखे हसतेस" असे म्हणायचास.
मला नवल वाटायचे. इतके साधेसे तर फूल असते ते. त्यात काय विशेष?
मग एका भल्या पहाटे तू मला पर्वतीच्या बागेतले बहरलेले प्राजक्ताचे झाड दाखवले होतंस.
शुभ्र फुलांनी डवरलेलं. झाडावर जेवढी फुलं होती त्यापेक्षा कितीतरी फुले जमिनीवर होती.
वातावरणात प्राजक्ताचा गंध होता. आपण निशःब्ध झालो होतो.
मी माझे हसणे इतक्या जवळून कधी अनुभवलचं नव्हतं रे.
कभी कही से कोई याद आती है.
मेरा मन फूलों से भिगो देती है |
हर इक फूल की अपनी एक खुशबू होती है
बुझे हुवे जख्मो को महका देती है.|
त्या दिवशी मी प्राजक्ताच्या फुलांसोबत मी सुद्धा फुलले. अजूनही तो गंध कधी आला की मी "प्राजक्त" होते.
पावसाळा नुकताच सरलेला होता लख्ख काळ्या आकाशात टिपूर चांदणं होतं. अन जमिनीवर प्राजक्ताच्या झाडाखालीही फुलांचं चांदणं अंथरलेलं होतं. मी कितीतरी वेळ त्या जमिनीवरच्या आकाशात नक्षत्र शोधत होते.
अशीच कधितरी मला एखाद्या भल्यापहाटे जाग येते. आसपासचं काहिही दिसत नसतं इतका मिट्ट काळॉख असतो.
त्या मिट्ट काळोखातही तुझी आठवण मला शोधत येते. आठवण येताना कधी एकटी येत नाही सोबत बरेच काही घेवून येते.
एकामागून एक आठवणींची फुले येतच रहातात. माझं प्राजक्ताचं झाड होतं. जमिनीवर आथवणींच्या फुलांचा सडा पडलेला असतो. मी त्यात माझं प्राजक्तांच्या फुलांसारखं हसणं शोधत असते. एका एका आठवणीने माझं ते हसणं जपलेलं असतं.
मी त्या फुलां हरवते. आणि स्वतःशीच हसत सुटते.
ही तर दिवसाची सुरवात असते.आजचा आख्खा दिवस असाच हसत जाणार असतो.
क्यूं हर वक्त मन मे तुम्हाराही खयाल रहता है
पत्ता भी गिरता है तो तुम्हारा जिक्र होता है|
प्रतिक्रिया
21 Oct 2011 - 6:10 pm | हरिप्रिया_
मस्त लिहिलंय विजुभाऊ...
खूप खूप आवडल...
सगळी जुनी मालिकाच वाचून काढली...
एकदम सही...
21 Oct 2011 - 6:48 pm | शुचि
सुंदर.
21 Oct 2011 - 6:55 pm | आत्मशून्य
छान आहे म्हणतो.
21 Oct 2011 - 7:09 pm | पैसा
आधीचे भागही आता वाचून काढते.
22 Oct 2011 - 10:05 am | मदनबाण
वा...मस्त लिहलयं. :)
22 Oct 2011 - 10:56 am | विनायक प्रभू
काय विजुभौ,
हल्ली प्रेम फक्त कागदोपत्री वाट्ट?