प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
19 Sep 2008 - 9:13 am

मागील दुवे
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153

ए काय पाहिलेस रे माझ्यात तू ? हा प्रश्न तू मला बरेचदा विचारला होतास.
एकदा मी मला स्वत:लाच हा प्रश्न विचारला. आणि उत्तर शोधत बसलो.
खरेच नक्की काय पाहिले असेल मी तुझ्यात की ज्या मुळे असा वागु लागलो?
तू चांगली दिसतेस ? तू चांगली वागतेस? तू चांगली हसतेस? तू चांगले गाणे म्हणतेस? तू चांगली भाषणे देतेस? तू मला समजून घेतेस ? एक ना अनेक प्रश्न उभे राहिले डोक्यात.
तू चांगली दिसतेस? तू चांगली दिसतेस म्हणून मला आवडतेस की मला आवडतेस म्हणून तू मला चांगली दिसतेस असे वाटते ? ते पहाणा-यावरच बरेचसे अवलंबून असते
काळ्या सावळ्या साधारण रूपाच्या मुमताज़ला पाहुन एका फ़कीराने शहाजहान ला विचारले होते "क्या ये है तेरी मुमताज़; जिसके लिये तू इतना पागल हो गया है? "
त्याला उत्तर देताना "अगर मुमताज़ को देखना है तो मेरी नजरोंसे देखो". असे तो शाहजहान म्हणून गेला.
असू ही शकेल ते खरे. ......सौंदर्य पहाणाराच्या नजरेत असते.
तू चांगली वागतेस? तू खरोखरीच तशीच आहेस की मला ते तसे वाटते?
तू चांगली हसतेस? हसरा आनन्दी चेहेरा हा जगातला सर्वात सुंदर चेहेरा असतो असे मीच एकदा तुला म्हंटले होते. ते तुला पाहुनच म्हंटले होते.
तु अगदी सहज उत्तरलीस "हो ना. लहान बाळे बघ कशी सुंदर दिसतात"

तू चांगले गातेस? एखादा गायक तल्लीन होऊन गात असेल तर त्याचा तल्लीन झालेला चेहेरा हा नेहमीच देवाचा चेहेरा वाटतो. आंब्याची कोवळी पालवी ही देखील काहितरी आनन्दाने गुणगुणत असते असेच वाटते. तल्लीन होऊन गाणारा गायक , स्वत:च्याच नादात मग्न होऊन बाहुलीशी खेळणारी लहान मुले , स्वत: घडवलेल्या घाटदार माठाकडे तृप्तीने पहाणारा कुंभार ही त्या क्षणी एकदम सुंदर दिसत असतो.
काळ्या खडबडीत दगडी विठोबाच्या चेहे-याला सुंदर ते ध्यान म्हणणा-या वारक-या सारखे आपल्याला आपले प्रेमपात्र सुंदरच दिसत असते.
तु चांगली हसतेस ? हो तुझे मोकळे खळखळुन हसणे हे मला खूप आवडायचे. लहान मुलाचे हसु असते तितके ते निरागस असायचे. उत्साही असायचे. एखाद्या गोष्टीला तु अगदी मनापासुन हसायचीस. तुझे हसणे मला चेहे-यावर पडणा-या पावसाच्या सरी सारखे वाटायचे. मी तसे तुला

ये काले बादल और गीली हवायें
जहांसे भी आती हैं साथ खुशीयां लाते है
टपटप बारीश की बूंदे , हर चेहरे पर
मुसकान लाती हैं
सूखी, थकी बूढी आखों मे भी
चमकसी छा जाती हैं
चेहरी की झुर्रीयां खिल उठती हैं
बचपनकी यादों मे फ़िर एक बार नहाती हैं
मौसम की हर बारीश में
हमे हर बार ये एहसास हुवा हैं
चेहरे पर टपकती हर बूंद पर
हर बार वही महसूस किया हैं
आखों से बहते आसूओं को हमने
तुम्हारी उस खिलखिलाती हसी की
यादों से थामा हैं

आपण एकत्र बरोबर असायचो तेंव्हा मला वेळ थांबवुन ठेवता आला तर किती बरे होईल असे वाटायचे. आणि तू नसताना वेळ थांबलाय असे वाटायचे. हे असे का व्हायचे ते कधीच कळाले नाही. असे होणे म्हणजे नक्की काय तेच कळायचे नाही. त्यात गंमत यायची. तू आलीस की मला आपण बरोबर असतानाचा प्रत्येक क्षण आठवणीत जपून ठेवावा आणि तू नसताना तो जपलेला क्षण फ़ोटोच्या अल्बम प्रमाणे पुन्हा पुन्हा अनुभवावा असे वाटायचे.
तू मला समजून घेतेस ?म्हणजे नक्की काय असते? एखाद्याने एखाद्याला समजून घेणे म्हणजे काय? हा तर साधा संवाद. उत्तम श्रोता कोणालाही हवाच असतो. एखाद्याला हवी ती दाद देणारा श्रोता मिळाला की त्याला वाटते श्रोता समजून घेतोय. समजून घेणे हे सापेक्ष असते. मी जे समजलो ते तू समजली असशीलच असे नाही होत..
आपण दोघेच असताना तू कधी कधी गप्प गप्प रहायचीस.
तुला जे वाटते ते तु मौनातुन बोलत असायचीस जणु. आणि मी बोलायला लागलो की म्हणायचीस आपण एकमेकाना न बोलताही समजू शकतो की. शब्द कशाला हवेत.
ते खरे ही असायचे.

आखें सूखी और पलके बंद
आप ऐसे खामोषी से ही
सारी बाते कह देती हो.
आपकी अदाओं से;
आपके तवर पहचनने में
हम इतने वाकीफ़ हो गये है;
के अब बन्द दीवाले भी
हसती और खुशमिज़ाज़ नज़र आती हैं

कसा कोण जाणे एक दिवस अचानक मी एकाकी झालो. एकटेपणाचा उत्सव साजरा करु लागलो. कोणातच न मिसळता मी माझ्या दुनियेत मग्न असायचो. माझ्या जगाची दारे स्वत:पुरताच उघडायचो. कसलातरी ठेवा कपाटात जपल्यासारखा काहितरी जपत रहायचो. एकटेपणाची सोबत बरी वाटु लागली. मौनाची भाषा उमगायला लागली.या एकटेपणालाच मी सखा सोबती समजुन त्याच्याशीच गूज करायचो ही अवस्थाही मागे पडली. एकटेपणात मी कुठेतरी स्तब्ध झालो.

ये खामोशी अब सताने लगी हैं
फ़ुरसत ही फ़ुरसत चुभने लगी हैं
हमने तारे गिनना छोड दिया हैं
घडी देखना भी बंद किया हैं
काटे घूमकर कोई फ़र्क नही होता
वक्त ही कुछ अटकसा गया हैं
दिन पर दिन बीत जाते हैं
आसमान और फ़िज़ा वही रहते हैं
मैने जोरसे चीखना चाहा
फ़ूट्फ़ूट कर आवाजे लागायी
लाखोंसे पूछा भी
के वक्त का ठहरना मेरे साथ ही क्यूं ?
क्या मेरा हम राह भी है कोई?
सिला तो कोई नही आया
मेरे सवाल का.
शायद मेरे लब्ज़ भी बीच हवां मे
जमकर ठहर गये
बस......इस वक्त की तरह.

हे का असे तूही कधी विचारले नाहीस. तू विचारणार नाहीस हे ही मला माहीत आहे. तुझ्याही बाबतीत कधीकधी असेच होत असेल.. तेंव्हा काय करत असशील तू. झाडाखाली बसून माझी आठवण काढत असशील? की मोठ्याने रेडीओ वर गाणी लाउन मनातल्या भावनाना गोंगाटाने गप्प बसवत असशील? गोंगाटात विचाराना दाबुन टाकता येते. पण पापण्यां बाहेर पडु पहाणा-या त्या पाण्याचे काय ? त्याना कसे लपवतेस? मला माहीत आहे हे तू कधीच कोणालाच सांगणार नाहीस. खोटे हसुन; हसण्यामुळे डोळ्यात पाणी आले असे सांगण्याचा तुझा स्वभाव नाही.
स्वत:ची समजूत काढत, दिवसभर वेगवेगळ्या भूमिकांत वावरत असताना एखादातरी क्षण येतो की जेंव्हा आपण स्वत:च स्वत:ला भेटतो. काय करतेस त्या क्षणाला? कोणाला कोणापासुन झाकतेस?

जानना भी चाहा
पहचानना चाहा
मगर पहचान ना पाया
ये होगा कभी सोचा भी ना था
तुम्हारे जाने के बाद
आईने मे खुदही को
अनजान पाया.

माझेच प्रतिबिंब माझ्याकडे विस्फ़ारुन पहात असते. कोणितरी नवा माणुस पाहिल्या सारखे.ओळखीची बरीच लक्षणे दिसतात पण ओळख पटत नाही कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो असा चेहेरा आरशात दिसत असतो. मी गोंधळतो पुन्हा पुन्हा आरशात पहातो. माझ्या प्रतिबिंबात काय फ़रक आहे ते ताडुन बघतो. माझ्याच प्रतिबिंबाच्या डोळ्यात अविश्वासाने पहातो. आणि एका क्शहणी जाणीव होते त्यात काय दिसत नाही त्याची. मी नजरेला नजर द्यायचे टाळतो. स्वत:ला त्या प्रतिबिंबाचा अपराधी मानु लागतो. ही जाणीव होते त्यावेळी हातातुन काय निसटून गेलंय ते उमगतं. स्वत:ला ही न कळेल अशी नुसतीच मान हलवण्या शिवाय मी काही करु शकत नाही.

इन दिनो आप कुछ
अलगसे लगते हों
डर लगता हैं नजरे मिलाने से भी
लब्जों का सहारा
अब नही ले सकता.
हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है

(क्रमश:)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2008 - 11:17 am | प्रभाकर पेठकर

प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते.
ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|'

सखाराम_गटणे™'s picture

19 Sep 2008 - 11:31 am | सखाराम_गटणे™

>>ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|'
बरोबर बोलतात,
तो परी क्या चीझ है, प्यार आ गया गधी पर तो

इनोबा म्हणे's picture

19 Sep 2008 - 11:31 am | इनोबा म्हणे

प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते.
हेच म्हणतो

विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रामदास's picture

19 Sep 2008 - 11:25 am | रामदास

आता कसं बरं वाटतंय.
काल मधुशालेची नशा पुरली, आज प्रेमाची.
चला आज प्रेमाचे धडे गिरवू या.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

डोमकावळा's picture

19 Sep 2008 - 11:32 am | डोमकावळा

आखें सूखी और पलके बंद
आप ऐसे खामोषी से ही
सारी बाते कह देती हो.
आपकी अदाओं से;

काय छान लिहीलय....
विजूभाऊ तुमच्या लेखनाचा आपण तर फ्यान झालोय....

आणि हे तर मस्तच...

हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है

- (विजूभाऊच्या कवितांचा फ्यान) डोम

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

वाचलं विजुभाऊ तुम्ही खुप लोकांना रडवताय....

इन दिनो आप कुछ
अलगसे लगते हों
डर लगता हैं नजरे मिलाने से भी
लब्जों का सहारा
अब नही ले सकता.
हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है

हे अप्रतिम

(निशःब्द) गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मृगनयनी's picture

19 Sep 2008 - 11:55 am | मृगनयनी

विजुभाउ...... खरोखर्च्.....सौंदर्य हे पाहणार्‍याच्या नजरेत असावे लागते... तरच सर्व जग सुन्दर दिसते....

आणि शेवटी खर्‍या बुद्धीमत्तेचे तेज, हेच खरे सौंदर्य असते.....

विजुभाय..... या जन्मात तुमची बरोबरी कोणी करणं.... केवळ अशक्य आहे!!!

:)

"क्या ये है तेरी मुमताज़; जिसके लिये तू इतना पागल हो गया है? "

हाय्यssss !!

मैने जोरसे चीखना चाहा
फ़ूट्फ़ूट कर आवाजे लागायी
लाखोंसे पूछा भी
के वक्त का ठहरना मेरे साथ ही क्यूं ?

मिळाले कधी उत्तर ?

इन दिनो आप कुछ
अलगसे लगते हों
डर लगता हैं नजरे मिलाने से भी
लब्जों का सहारा
अब नही ले सकता.

काय लिहलय विजुभाउ सातारवी !! क्लास्स !!

पद्मश्री चित्रे's picture

19 Sep 2008 - 2:34 pm | पद्मश्री चित्रे

तुम्हारे जाने के बाद
आईने मे खुदही को
अनजान पाया.
...क्या बात है..
छान लिहिलं आहे तुम्ही खूप

सखाराम_गटणे™'s picture

19 Sep 2008 - 2:42 pm | सखाराम_गटणे™

भाउ, प्रेम कसे करावे याचे क्लासेस सुरु करा.
लवगुरु विजुभाउ सारखे

ह. घ्या.

मनस्वी's picture

19 Sep 2008 - 2:40 pm | मनस्वी

विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास!

हेच म्हणते.
छानच लिहिलंय विजुभाऊ!

मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .*
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

छोटा डॉन's picture

19 Sep 2008 - 3:11 pm | छोटा डॉन

कविता, भावना आणि त्यांचे विश्लेषण डायरेक्ट +++१

मस्त लिहलयं ....
असेच "णॉणस्टॉप" लिहीत रहा ....

छोटा डॉन
* पालथा पडलेला पिरॅमीड सरळ करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
*तुमच्याकडे " आलं लसुण " नसतील तर तात्पुरते पाटा वरवंट्याचे बारीक तुकडे करुन ते पोळपाट-लाटाण्यावर लाटले व नंतर मिक्सरमध्ये भरडाले तरीही चालतील *
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

राघव's picture

19 Sep 2008 - 3:24 pm | राघव

जियो.. खूप सुंदर!

हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है
वाहवा.. खूप हळवा सूर.

माझ्या एका मैत्रिणीने लिहिलेल्या ४ ओळी आठवतात -

आता तुझ्या आठवणींना झरु द्यायचे असते..
पाण्याकडे पाहतांना पाण्याला वाट करून द्यायची असते..
तू अचानक येशील अशी कल्पना करायची असते..
..नकळत वळून पहायची मनाला सवय झाली असते!!

(हळवा)मुमुक्षु

अनिल हटेला's picture

19 Sep 2008 - 4:10 pm | अनिल हटेला

आखों से बहते आसूओं को हमने
तुम्हारी उस खिलखिलाती हसी की
यादों से थामा हैं

क्या बात है ~~~~~

अप्रतीम वर्णन ...

प्रत्येक भावनेच. .. .. .. ..

(किसी नजर को तेरा इन्तजार आज भी है !!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2008 - 5:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इन दिनो आप कुछ
अलगसे लगते हों
डर लगता हैं नजरे मिलाने से भी
लब्जों का सहारा
अब नही ले सकता.
हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है

क्या बात है !!! प्रेमातले बारकावे, शब्दबद्ध केलेले सौंदर्य......ओहो, क्या कहने.

शितल's picture

20 Sep 2008 - 6:06 pm | शितल

इन दिनो आप कुछ
अलगसे लगते हों
डर लगता हैं नजरे मिलाने से भी
लब्जों का सहारा
अब नही ले सकता.
हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है


मस्तच.
:)

विजुभाऊ's picture

22 Sep 2008 - 2:46 pm | विजुभाऊ

धन्यवाद मित्रानो

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

जैनाचं कार्ट's picture

22 Sep 2008 - 5:13 pm | जैनाचं कार्ट (not verified)

छानच लिहिलंय विजुभाऊ

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

स्वाती राजेश's picture

22 Sep 2008 - 5:42 pm | स्वाती राजेश

कविता अप्रतिम झाल्या आहेत..:)
प्रेमातील भावानांचे विस्तारीत कथन पण छान झाले आहे..:)
इन दिनो आप कुछ
अलगसे लगते हों
डर लगता हैं नजरे मिलाने से भी
लब्जों का सहारा
अब नही ले सकता.
हमने कुछ सपने मिलके देखे थे.
कैसे बयॊ करु नजरों से;
के उन सपनों को;
आखों की नमी बहां ले गयी है
सही ओळी आहेत...

बाकी काही म्हणा सौंदर्य पहाणाराच्या नजरेत असते हेच खरे..:)
अवांतरःतुझे हसणे मला चेहे-यावर पडणा-या पावसाच्या सरी सारखे वाटायचे.
हे एकदम काय वाटले असेल हे जाणले असेलच....:) ह.घ्या.

पारिजातक's picture

22 Sep 2008 - 6:25 pm | पारिजातक

आस लिहायला अनुभव येन जरूरी असत काहो विजुभावु ?
तस् नसेल तर तुमच्या प्रतिभा शक्तिला आमचा सलाम !!!!

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!