प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं(९)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
3 Aug 2013 - 3:22 pm

मागील दुवा
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५) http://misalpav.com/node/3583
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) http://misalpav.com/node/4650
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (७) http://misalpav.com/node/19477
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (८) http://misalpav.com/node/20485

वो पहली नजर......वो बारीश का असर...... रेडीओवर गाणं लागलंय. मी कणीक मळता मळता ऐकतेय. हात तिथेच थांबतात. मन मागे जायला लागतं. कॉलेजचं फुलपाखरी वातावरण आजुबाजूला वावरायला लागतं. फर्ग्यूसनरोड वरचं कोणत्यातरी जादूने भारलेल्या अवस्थेत उगाचच भटकणं. कॉलेज इव्हेन्ट्च्या नावाखाली खिदळत टाईमपास करणं. वक्तृत्व स्पर्धा, भावगीत स्पर्धा , चित्रकला प्रदर्शने, भरत नाट्यमंदीरातल्या एकांकीका स्पर्धा. एस्स्पी...... पी एस... पी किंवा मॉ.ड्र्न मॉडर्न....च्या त्या तालासुरातल्या आरोळ्या. एकांकीका जिंकली की आपण जगत्जेते आहोत ही येणारी भावना. पुरुषोत्तम साठी जिवापाड घेतलेली मेहनत.
अंधार्‍या रंगमंचावर स्पॉटलाईट मध्ये उभे रहाताना जगात आपणच काय ते एकटे महान वाटणारी भावना.
ग्यादरिंग अ‍ॅन्युअल डे चे मजा काही वेगळीच. त्यातल्या गमती. गृप डान्सत्यातल्या मेक अप ड्रेपरी साठी केलेलील धावपळ.
यात वर्गात लेक्चररने मारलेले नेहमीचेच यशस्वी फालतु विनोद. आपन त्याना दिलेली टोपण नावे. इंग्लीशच्या गोखले सरानी शिकवलेला रॉबर्ट फ्रॉस्ट, शेले, वर्ड्स्वर्थ्, बायरन ,मराठीच्या पागे मॅडमनी शिकवलेली ज्ञानेश्वरांच्या विराण्या.
हे सगळे क्षण फेर धरून चहुबाजूला नांदू लागले.
मला तर त्याकाळचे कोणतेही गाणे ऐकले की ते सगळे क्षन पुन्हा पुन्हा आठवतात.
माझी एकदम तंद्री लागते. मी पुन्हा एकवार तीच अल्लड शोडषा होते. भन्नाट जीन्स , टीशर्ट अन बुंगाट फिरवायला स्कुटी हातात येते. शनीवार पेठ आप्पा, बळवंत चौक, सारस बाग , निलायमच्या ब्रीजवरू वळसा घेवून डेक्कन च्या गरवारे पुलावर येते. तेथून भांडारकर रोड वरून कमला नेहरु पार्कच्या हिरव्या गार सावलीच्या रस्त्या वरून उजवीकडे वळत प्रभात रोडवर येते. सर्रळ जात एकदम लॉ कॉलेजच्या मागच्या टेकडीकडे ..... स्कूटी खाली लावून मी तो चढ चडायला लागते. हिरव्या गार झाडीतून वर वर जात. मधेच कसलेसे गारगोटीचे क्रिस्टल असलेले दगड शोध वर वर चढत रहाते.
अचानक कुठेतरी आता वर चढायला जागा नाही डोंगर संपला. ही जाणी होते. इकडे समोर चतु:श्रुंगी. पलीकडे तळजाई.
हिरव्या गार पांघरुणात गुरगुटून झोपी गेलेल्या असतात.वरुन पावसाची भुरभुर चालू असते. माझ्य चेहेर्‍यावर शिरशीरी आणणारे बारीक थेंब बरसत असतात. अचानक धुके येते. समोरचा देखावा नाहीसा होतो. मी एकटीच असते. धुक्यातून तुझा चेहेरा प्रकटतो. तुझ्या हातात थरमास. दोन काचेचे ग्लास. तु थरमास मधला वाफाळता चहा ग्लासात ओततोस. भरपूर आले घातलेला चहा तु मला देतोस. मी थंडीने हुडहुडत असते. दातावर दात कडकड वाजत असतात. चहाच्या घोटाबरोबर थंडी नाहीशी होते. मी सुखवते. तु गालात हसतोस.आणि म्हणतोस. " बघ मी आल्याचा परीणाम कसा होतो बघतोय"
ए चल चल.....तु आल्याचा नाही काही हा चहाचा परीणाम आहे" तु मोठ्याने हसलास म्हणालास "आल्याचा म्हणजे मी आलो त्याचा नाही तर चहात आले टाकलय त्याचा परीणाम म्हणालो"
त्या यडच्याप विनोदावर आपण कितीतरी वेळ हसत बसलो होतो. ते क्षण आठवून मी आत्ताही गालात हसतेय.
अचानक काहितरी गूढ शांतता पसरते. तु माझ्याकडे एकटक्पहातो आहेस हे मला जाणवते. अन बोलताच तुझी नजर बरेच काही सांगून जाते. मला आपण कोणीतरी महाराणी आहोत वाटायला लागतं.भोवतालचे पक्षी उगाचच सुरात ओरडताहेत वाटायला लागतं. घशाला कोरड पडलीये.तळहातात काहीतरी मजेदार गुदगुल्या होताहेत. छातीचे ठोके जगाला ऐकु येतील इतक्या जोराने पडताहेत.माझी नजर खाली जाते.तुला ते समजतं. तू इकडे तिकडे बघायला लागतोस. माझी मान खाली आहे. हळुच तिरप्या नजरेने मी तुला पहातेय. तूही माझ्या कडेच पहातो आहेस.आपली नजर भेट होते.एक क्षण. जादूचा. आपण दोघेही नजरा फिरवतो.
बराच वेळ नि:शब्द. घड्याळातले काटे फिरायचे थांबले आहेत. किती वेळ झाला कोण जाणे.
मग मलाच काहीतरी जाणवते मी म्हणते चल रे उशीर होईल. निघुयात.
तू गालात हसतोस.मीही हसते का कोण जाणे. उगाचच.
टेकडीवरून उतरल्यावर आपण बराच वेळ काहीच न बोलता उभे असतो. मी स्कूटी हातात धरून उभी असते. हा क्षण इथेच थांबवून धरावासा असे प्रकर्षाने वाटतय. मी तो क्षण थांबवून ठेवलाय माझ्या मनात. मला जेंव्हा हवा असतो तेंव्हा मी पुन्ह पुन्हा त्याची उजळणी करणार असते.
घरी जाताना मला ट्रॅफीक. सिग्नल ,गर्दी कशाकश्याची जाणीव होत नाही. मी अलगद घरी पोहोचते. घरी पोहोचताच आईला घट्ट मिठी मारते. का कोण जाणे .मी दिवसभर स्वतःशीच हसत असते. गुणगुणत असते.
आत्ताही मी माझ्या नकळत गुणगुणतेय.
अचानक कसलीशी जाणीव होते. कसलासा खरपूस भाजल्याचा वास येवू लागतो.मी या जगात येते.
तव्यावर पोळी जळायच्या बेतात असते.

कीमत ना लगा पाओगे मेरे ख्वाबों की.
गीरवी भी नही रख पाओगे. उन यादोंको.
जो पल हमने साथ बीताये थे
वो मेरे कोहीनूर है.

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Aug 2013 - 5:37 pm | पैसा

मस्त लय सापडली आहे विजुभौ! साध्या गोष्टीतलं सुख छान टिपलंय. आणखी पुढचा भाग कधी लिहिताय?

खुप मस्स्त्त्त्त... तुमच्या सोबत मी पण डेक्क्न, लॉ कॉलेज, प्रभात रोड, कनेपा फिरुन आले. खरच यार.. आपल्या पुण्यासारखे शहर जगात कुठेही नाही.

विजुभाऊ's picture

5 Aug 2013 - 5:34 pm | विजुभाऊ

पैसा तै.
पुढचा भाग लवकरच टाकतो.
सुना ये वो कम्बखत मुहोब्बत बडी नायाब चीज होती है.
ना हो जाये तो जलन होती है. हो जाये तो तकलीफ होती है.

विजुभाऊ's picture

18 Jan 2021 - 8:30 am | विजुभाऊ

:)

विजुभाऊ's picture

18 Jan 2021 - 8:30 am | विजुभाऊ

मिपा वरचे ते दिवस आठवले