प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Nov 2008 - 6:06 am

मागील दुवे
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५)http://misalpav.com/node/3583

एखादी रात्र अशी येते की चन्द्र गायब असतो. आकाशात अगदी टीपुर म्हणावे असे मस्त चान्दणे असते.

कुठुन तरी दुरून रातराणीचा उन्मत्त गन्ध येत असतो. साधे रस्त्यावर चालले तरी ढगात चालल्याचा भास होत असतो.

थन्डी बेताची म्हणजे अंगावर काटा फुलेल इतकीच असते.सगळ्या वातावरणात कसलातरी मस्त उत्साह नांदत असतो.

आणि का कोण जाणे तू आठवतेस्.चांदण्याना बघुन तुझे ते खळखळून हसणे आठवते.का कोणास ठाउक तू अशी मनमोकळे हसायला लागलीस की मला टीपुर चान्दणे सांडते आहे असेच वाटायचे. मी तुला तसे म्हणायचो देखीलआणि मी तसे म्हणालो की तू अधीकच हसायला लागायचीस. माझ्याकडे पहात हा किती येडबम्बू आहे अशा आविर्भावात तू हसायला लागलीस की मला एकदम चुकल्यासारखे व्हायचे.माझा चेहेरा पडायचा आणि मला एक टपली मारुन तू म्हणायचीस "ए येडबम्बू"

असे म्हणताना तू एकदम काहितरी वेगळीच दिसायचीस. तू तुझी स्वप्ने जगते आहेस असे वाटायचे.

कुछ चन्द अशर्फीयॉ और बन्द मुट्ठी

कुछ उम्मीदे और हौसला अफजाई

बस यही रह गया साथ मेरे....

वो तब भी तो थे साथ मेरे;

जब हम मिलकर जहॉ बसा रहे थे.

हल्ली उजेड नको वाटतो. अन्धारात एकटेच बरे वाटते.एकट्याला तशीही उजेडाची काय गरज असते? काही आठवणी सोबत असल्या की झाले.दिवाळीतल्या पणतीसारख्या त्या अंधार दूर करतात. आपण म्हणतो खरे पण खरेच का त्या अन्धार दूर करतात?

अब हम रौषनदान नही रखते

दियासलाई शमादान की जरुरत नही महसूस होती

आप की याद आती है

रौषन करती है दिल को

................फानूस बनकर

मी काल असाच एकटाच चालत फिरत होतो.त्या रस्त्यावरुन्...आपण तिथे उगाचच हिन्डत बसायचो. हल्ली त्या रस्त्यावर रहदारी नसते.वाहने, रीक्षा, गाड्या,ओळखीचे लोकही नसतात. मी उगाचच अगान्तुकाप्रमाणे तिथे भटकत होतो.समोरुन कोणीतरी एक चेहेरा दिसला. मी पहाणे टाळले. का कोणास ठाउक ?

एखादा हसरा चेहेरा मला हल्ली नकोसा होतो.खरेतर हसरा चेहेरा हाच जगातला सर्वात सुंदर चेहेरा असे तूच तर मला सांगायचीस. पण मी हल्ली कोणत्याच हसर्‍या नजरेला नजर देउ शकत नाही.

इन दिनो आप कुछ

अलगसे दिखते हो

डर लगता है

नजरे मिलानेसे भी

लब्जोंका सहारा

अब ले नही सकता

हमने कुछ सपने

मिलकर देखे थे

कैसे बयॉ करु नजरोंसे

उन सपनो को नमी बहॉ ले गयी है.

मी कैकदा त्या रस्त्याने जात असतो. ओळखीच्या खुणा शोधत फिरत असतो.एखादी ओळखीची खूण दिसली की त्यामागच्या सार्‍या आठवणी धावत येतात. तो रस्ता ते वळण . त्या वळणावरचे बैठं घर. त्या घरा समोर बसणारी भाजीवाली.आणि नेहमी भेटणारा तो फुलवाला. काल तो तिथे नव्हता. तसे पाहिले तर त्या रस्त्यावर कोणीच नव्हते माझ्याखेरीज.

त्या रस्त्यालाही आठवत असतील का एखादे असे क्षण......कोणी कोणाला भेटल्याचे....बोलल्याचे...पाहिल्याचे. ...भांडल्याचे....अबोल्याचे...... नुसतेच निशःब्द न बोलता हातात हात घेउन चालल्याचे........ रस्त्याने तरी कायकाय लक्षात ठेवायचे?

चलते चलते हर कदम पर महकते

हम ताजातरीन होकर राहसे गुजरे

सूर्ख मिट्टी ओढे वह कच्ची सडक

कुछ देर से ही जाग रही थी

सुबह की ओस और

टहनीयो के पत्तों से लुकछिप खेलती

गुनगुनी कच्ची धूप........

वक्त कुछ ऐसा था

सडकने कुछ देर सोनाही चाहा

रातभर पास के पेडोंने

पत्तोकी बौछार की थी

वही चादर सडकने ओढ ली

सुबह कुछ देर सवेर निकलते पंछीयोंने

चहकना रोक लिया था

अब इन्सानी शोरगुल जो शुरु होना था

सडकने फिरभी सोना चाहा

हम ऐसेंही चलते रहे

दूर से एक ट्रक

पीछे बवंडर लिये धूल रगडता चला आया

सडक पर पडे सारे पत्ते बिखर गये

सडक को अब जागनाही पडा

आखीर सुबह भी तो

........अपने वक्त से मजबूर थी.

माझ्या मनात या भावना नक्की भावना येतात हे मला कधीच कळत नाही. बरेचदा तर मी एकटाच माझ्याशीच बोलत असतो. माझ्या त्या बोलण्याला सलगता ही नसते. हे तूच मला एकदा दाखवुन दिले होतेस. आणि ते माझ्या लक्षात आल्यावर मी ओशाळलो होतो. माझ्या त्या पडक्या चेहेर्‍याला तू इतकी जोरदार दाद दिली होतीस की सगळे विसरुन मी हसत सुटलो होतो. ते क्षण आठवले की मी पुन्हा हरवुन जातो......त्या स्वप्नात.....

वो पल जो

आपके ख्वाबों से चुराये थे;

वो अश्क जिनसे

आपके ख्वाबों मे फूल सींचे थे;

दर्या ए तनहाई बनकर.....

हमे आजमा रहे हैं

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

रामदास's picture

16 Nov 2008 - 7:56 am | रामदास

दूर से एक ट्रक

पीछे बवंडर लिये धूल रगडता चला आया

सडक पर पडे सारे पत्ते बिखर गये

सडक को अब जागनाही पडा

आखीर सुबह भी तो

........अपने वक्त से मजबूर थी.
या ओळी खासकरून आवडल्या.
विजूभाऊ, ह्यातल्या कविता मराठीकरण करून वेगळ्या का लिहीत नाही.?

विजुभाऊ's picture

18 Nov 2008 - 9:17 am | विजुभाऊ

ह्यातल्या कविता मराठीकरण करून वेगळ्या का लिहीत नाही.?
मी तसा कधी प्रयत्नच केला नाही
कविता ज्या भाषेत सुचतात त्याच भाषेत लिहितो. बघु याचे मराठीकरण करता येतेय का
आयडीया मस्त आहे.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

छान खुपच छान ....
दिल को छु लिया आपने...

अवलिया's picture

16 Nov 2008 - 3:10 pm | अवलिया

विजुभावु

अप्रतिम लिहिता तुम्ही पण होते काय की नंतर आमचे आम्ही रहात नाही.
वेगळ्याच विश्वात जातो अन मग परत येणे अवघड होते....

तुझ्याबरोबर चालतांना मी जग विसरुन गेलो
आज जग माझ्याबरोवर आहे तर तु विसरुन गेलीस...

नाना

गणा मास्तर's picture

16 Nov 2008 - 8:13 pm | गणा मास्तर

विजुभाउ तुम्ही नका ही लेखमाला पुढे चालवू. वाचवल्याशिवाय रहावत नाही आणि वाचल्यवर जुन्या जखमा ताज्या होतात.

दूर से एक ट्रक
पीछे बवंडर लिये धूल रगडता चला आया
सडक पर पडे सारे पत्ते बिखर गये
सडक को अब जागनाही पडा
आखीर सुबह भी तो
........अपने वक्त से मजबूर थी.

अशाच कोणत्या न कोणत्या कारणांनी, काळापुढे हतबल होउन लोक आपल्या आयुष्यातुन निघुन जातात आणि मग उरतात फक्त आठवणी.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2008 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ,
लिहित राहा वाचतोय !!!

हमने कुछ सपने
मिलकर देखे थे
कैसे बयॉ करु नजरोंसे
उन सपनो को नमी बहॉ ले गयी

ओहो, क्या बात है !!!

-दिलीप बिरुटे