प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 Jun 2008 - 10:27 am

मागील दुवा http://misalpav.com/node/2158

तू अशी नेहमी माझ्या पासुन दूर कधी नसतेसच...माझा प्रत्येक क्षण तुझी काही ना काही आठवण करुन देतोच...माझ्या टेबलावरचे हे घड्याळ....तुला यायला ऊशीर झाला की तू काटे फ़िरवुन ते थोडेसे मागे करायचीस..आणि म्हणायचीस बघ आले की नाही मी बरोब्बर वेळेवर......हम....वेडी..... काटे मागे फ़िरवुन का कधी भूतकाळात रमता येते. मीही आता तो विचार करतोय...घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...तुझ्या समवेत जगलेला प्रत्येक क्षण पुन्हा तितक्याच उत्कटतेने जगायचाय मला....खरच ते क्षण ....आठवतात तुला?
तुम्हारे साथ जीना
कुछ अलग ही बात है.
जैसे एक ही पल में
दिन और रात है
खिलखिलाते हसते हुवे भी
आंखों मे नमी का साथ है
सिसकियां लेते हुवे भी
होठों पर मुस्कान की राहत है.
तुम्हारा गुस्सा भी प्यारा लगता है
इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी
पुरे दिन जितना लंबा लगता है
और साथ बीताया दिन भी
चन्द लम्हो में समेट जाता है.
तुम्हारा कहा एकाध छोटा लब्ज़ भी
बहुत कुछ कह जाता है.
और वो घन्टो की बातचित भी
कुछ मायने नही रखती.
कभी लगता है
की तुम एक वो पुलिन्दा हो
अतीत और वर्तमान
जिसमे एक साथ समेटा हो
तुम्हारी उन्ही नम आंखोंमे
ज़ज़्बातों का बारूद भी है
मै इसे करिश्मा कहु या फ़िर क्या कहु
ये तय नही कर पाता हु
बस तुम्हारी तरह ही.....
बहुत कुछ चाहते हुवे भी....
बोल नही पाता हुं..
आपण फ़िरायचो तो चतु:श्रुंगीचा रस्ता आठवतो तुला....काहीही न बोलता चालत असायचो.....कशी कोण जाणे आसपास एकदम शांतता असायची....खरे तर आसपास कितीही वर्दळ असली तरी आपण आपल्याच नादात असायचो....आपले लक्षच नसायचे...
रस्ता काही फ़क्त आपल्यासाठीच केला असावा असे आपण चालायचो..... हात हातात घेतला की ते तुला आवडायचे नाही..तू म्हणायचीस की प्रेमात मालकीहक्क कशाला.....पण मग थोड्यावेळाने तूच माझा हात हातात घ्यायचीस.....मग मी सहजच गालात हसायचो..तु रागवायचीस..थोडावेळ आपण पुन्हा अबोल व्हायचो.....
एकटा असताना डोळे मिटुन घेतले की ते सगळे पुन्हा आठवते
जब भी कभी आंखे मूंद लेता हुं
कुछ दूसरीही दुनियामे चला जाता हुं
वहां तुम होती हो और साथ कुछ खामोशी
कुछ कदम चलकर तुम मेरे पास आती हो
एक हवा का झौका आता है.
तुम्हारे पास होने का एहसास दिलाता है
आंख खुल जाती है........
सामने कुछ खामोशी पाता हुं
शायद तुम उसे यहां छोडकर
मेरी दुनिया मे आ बसी हो.....
एकदा तू विचारले होतेस की "काय पाहिलेस माझ्यात " मला उत्तर सुचले नव्हते....खरे तर मीही कधी स्वत:ला हा प्रश्न विचारला नव्हता
या असल्या प्रश्नांचे उत्तरे नसतात....आणि जी मिळतात ती तेव्हढी सद्धर नसतात. तू तरी सांग काय पहिले होतेस माझ्यात तू? देशील उत्तर कधी याचे? मी तुला जेंव्हा हे विचारले तेंव्हा तू हसली होतीस....त्या हसण्यात मी विरघळुन गेलो आणि आपण काही प्रश्न विचारला आहे हेच विसरुन गेलो.
तुझ्या हसण्यात काय जादु होती हे कधी उमगलेच नाही....खूपदा विचार केला...आरशात पाहुन तुझ्यासारखे डोळे मिचकावुन हसता येते का तसा प्रयत्न केला......पण ते जमणार आहे थोडेच.
तुला सुद्धा माझ्या थोडे पॊज घेउन बोलण्याची मजा वाटायची..तु म्हणायचीस सुद्धा की मी थोडा अजून मोठा पॊज घेतला तर कर्मा चित्रपटातल्या दिलीपकुमारलाही मागे टाकेन म्हणुन.....
मी तुझ्या बोलण्यातले "अय्या हो" मोजायचो आणि तू माझ्या "शॊटच की " या ऊद्गारांचा स्कोर मोजायचीस.....काहीही कारण नसताना उगाचच मधेच कधितरी ३५ / ३७ / ५७ / ६३ असा काही आकडा तुझ्या तोंडुन आला की समजायचे की आज मी जरा जास्तच "शॊटच की " बोलतोय. तीन मिनिटात दोन वेळा चालेल ही आपण घालुन घेतलेली लिमिट.....
वेडेच होतो आपण दोघेही...छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायचो....भांडलो की अबोला धरायचो.आणि अगोदर आपल्या दोघातलं कोण बोलतय याची वाट बघत बसायचो......
ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना..........
मला तर तू कधी कधी अगदी लहान दुसरी तिसरीतली मुलगी वाटायचीस.....निरागस....हसरी.......रुसकी... तांबडी रेबीन आणि चप्पट केस असते तर मी कदाचित शाळेत नेउन सोडलं असतं......पण खरे सांगु............तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं....
"काय पाहिलेस माझ्यात " याप्रश्नाला मी हे उत्तर दिले असते तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस कोण जाणे पण त्यावर मी मात्र म्हणालो असतो.
एक सादासा फ़ूल
और उसकी सादिसी पंखुडिया
कुछ जादूसा कर देते हैं
किसी राह पडे पत्थर को.....
................. भगवान बना देते है.......
...............................ही प्रचिती मी घेतली आहे.............
तुझे हे साधेपण तुला कधीच जाणवायचं नाही. हे साधेपण तुझ्या वागण्या बोलण्यातही असे. बाहेरच्या देखाव्याला भुलुन न जाता दबुन न जाता समोरच्याशी सहज बोलण्याची अवघड कला तु कुठुन अवगत केली होतीस कोण जाणे.....तुझ्या या असल्या सहज बोलण्यामुळे उलट समोरचाच दबुन जायचा.
तुझ्या सोबत असताना मला एखाद्या पारिजातकच्या फ़ुला सोबत असल्यासारखे वाटायचे. पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.

मी कधी कधी एकटा असताना या खिडकीतुन बाहेर बघत असतो........मल कळत नसते मी काय पहात असतो ते......नजरेला दिसत नसणारे काहितरी दिसत असते.....
खिडकी से बाहर झांकना
अब ये आदतसी हो गयी हैं
उस मोड से तुम्हे आते निहारना
ये भी आदतसी हो गयी हैं
नजरे मिलतेही मुस्कुराना
ये आदतसी हो गयी है
उसी से बस दिन अच्छा गुजरेगा कहना
ये आदतसी हो गयी है
कभी ना दिखायी दिये तो
दिन काट लेते है
तुम्हारी रुखत के बहाने
इंतजार में खिडकी से झांकना
ये आदतसी हो गयी है
तुम नही आओगी...ये तो पता है
बाहर झांकना फ़िज़ुल है....
ये दिल को समझाने की भी
अब आदतसी हो गयी है.
(क्रमश:)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋचा's picture

25 Jun 2008 - 10:39 am | ऋचा

मस्तच!!!

एक हवा का झौका आता है.
तुम्हारे पास होने का एहसास दिलाता है
आंख खुल जाती है........
सामने कुछ खामोशी पाता हुं

हे मला आवडलं :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

प्राजु's picture

25 Jun 2008 - 10:55 am | प्राजु

तुम्ही खरंच सिक्सर मारला आहे.
कभी कभी मरे दिल में खयाल आता है च्या शायरी ची आठवण झाली. खूपच सुंदर लिहिले आहे.

कभी कभी मेरे दिल में खयाल आता है..
के जैसे बजती है शहनाईयॉसी राहो में..
..... मै जानता हूं के तू गैर है मगर यू ही....

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

II राजे II's picture

25 Jun 2008 - 10:59 am | II राजे II (not verified)

ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना..........
...........तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं....

असं सारखं सारखं काळजात हात नका हो घालू.... कोठे तरी आत खुप दर्द होतो... :)

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 11:35 am | विसोबा खेचर

तुझ्या सोबत असताना मला एखाद्या पारिजातकच्या फ़ुला सोबत असल्यासारखे वाटायचे. पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.

वा! फारच सुंदर...!

तात्या.

फटू's picture

25 Jun 2008 - 12:11 pm | फटू

तुमचा हा सुंदर लेख वाचला आणि आम्ही नकळत तीन वर्षांनी मागे गेलो... थेट अभियांत्रीकिच्या तिसर्‍या वर्षाला...

सुंदर लिहिलंय...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनस्वी's picture

25 Jun 2008 - 12:27 pm | मनस्वी

मस्त लिहिलंय विजुभाऊ!

घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...

मी पण क्षणभर भूतकाळात गेले..

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

धमाल मुलगा's picture

25 Jun 2008 - 12:32 pm | धमाल मुलगा

क्या बात है विजुभाऊ!
मस्तच!

तू तरी सांग काय पहिले होतेस माझ्यात तू? देशील उत्तर कधी याचे? मी तुला जेंव्हा हे विचारले तेंव्हा तू हसली होतीस....त्या हसण्यात मी विरघळुन गेलो आणि आपण काही प्रश्न विचारला आहे हेच विसरुन गेलो.

हाऽऽय.. खरंच! हे अगदी..अगदी असंच.

पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.

मस्तच. पारिजातकाची नाजुकता आणि शुचिर्भुतता ह्यांच्या उपमेचा सुंदर वापर :)

तुम नही आओगी...ये तो पता है
बाहर झांकना फ़िज़ुल है....
ये दिल को समझाने की भी
अब आदतसी हो गयी है.

क्या बात है!! क्या बात है!!

जियो विजुभाऊ :)

अनिल हटेला's picture

25 Jun 2008 - 12:34 pm | अनिल हटेला

लै भारी विजुभाउ........

ह्रदयाच्या नाजुक तारा छेडल्यासारख्या झाल्यात.........

आणी आठवल ते गीत....

"चलो एक बार फिर से
अजनबी बन जाये हम दोनो...."

येऊ देत पु. भा. प्र..

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मदनबाण's picture

25 Jun 2008 - 2:12 pm | मदनबाण

व्वा,,,इजुभाऊ लय झकास.....

खिडकी से बाहर झांकना
अब ये आदतसी हो गयी हैं
उस मोड से तुम्हे आते निहारना
ये भी आदतसी हो गयी हैं

सॉलिड.....

मदनबाण.....

ऍडीजोशी's picture

25 Jun 2008 - 2:52 pm | ऍडीजोशी (not verified)

भाऊ :)

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

पद्मश्री चित्रे's picture

25 Jun 2008 - 5:05 pm | पद्मश्री चित्रे

>>>इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी
पुरे दिन जितना लंबा लगता है
और साथ बीताया दिन भी
चन्द लम्हो में समेट जाता है.
अगदी खरं...
सुरेखच लिहिल आहे...

इनोबा म्हणे's picture

25 Jun 2008 - 5:14 pm | इनोबा म्हणे

विजुभाऊ... अगदी भूतकाळात घेउन गेला तुम्ही.

घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...
खरंच, असं करता आलं तर...

इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी
पुरे दिन जितना लंबा लगता है
और साथ बीताया दिन भी
चन्द लम्हो में समेट जाता है.
तुम्हारा कहा एकाध छोटा लब्ज़ भी
बहुत कुछ कह जाता है.
और वो घन्टो की बातचित भी
कुछ मायने नही रखती.

मस्तच...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

तुला यायला ऊशीर झाला की तू काटे फ़िरवुन ते थोडेसे मागे करायचीस..आणि म्हणायचीस बघ आले की नाही मी बरोब्बर वेळेवर......हम....वेडी..... काटे मागे फ़िरवुन का कधी भूतकाळात रमता येते.
हो कधी कधी येते.....

कभी लगता है
की तुम एक वो पुलिन्दा हो
अतीत और वर्तमान
जिसमे एक साथ समेटा हो
तुम्हारी उन्ही नम आंखोंमे
ज़ज़्बातों का बारूद भी है
मै इसे करिश्मा कहु या फ़िर क्या कहु
ये तय नही कर पाता हु
बस तुम्हारी तरह ही.....
बहुत कुछ चाहते हुवे भी....
बोल नही पाता हुं..
सह्ही.......

वेडेच होतो आपण दोघेही...छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायचो....भांडलो की अबोला धरायचो.आणि अगोदर आपल्या दोघातलं कोण बोलतय याची वाट बघत बसायचो......
ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना..........

खुप छान...

वरदा's picture

25 Jun 2008 - 6:02 pm | वरदा

खरे तर आसपास कितीही वर्दळ असली तरी आपण आपल्याच नादात असायचो....आपले लक्षच नसायचे...
रस्ता काही फ़क्त आपल्यासाठीच केला असावा असे आपण चालायचो..... हात हातात घेतला की ते तुला आवडायचे नाही..तू म्हणायचीस की प्रेमात मालकीहक्क कशाला.....पण मग थोड्यावेळाने तूच माझा हात हातात घ्यायचीस.....मग मी सहजच गालात हसायचो..तु रागवायचीस..थोडावेळ आपण पुन्हा अबोल व्हायचो.....

मस्तच.

............तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं....
"काय पाहिलेस माझ्यात " याप्रश्नाला मी हे उत्तर दिले असते तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस कोण जाणे पण त्यावर मी मात्र म्हणालो असतो.
एक सादासा फ़ूल
और उसकी सादिसी पंखुडिया
कुछ जादूसा कर देते हैं
किसी राह पडे पत्थर को.....
................. भगवान बना देते है.......

झक्कास!!!
शब्दच नाहीत प्रतिक्रीया द्यायला आणखी... सगळा लेखच छान आहे...पारिजातकाच्या फुलाची उपमा मस्तच...
प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय? :?

इनोबा म्हणे's picture

25 Jun 2008 - 6:40 pm | इनोबा म्हणे

प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय?
बरोबर बोललीस वरदा... विजुभाऊंची तारीफ करावी तेवढी कमीच आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

डोमकावळा's picture

25 Jun 2008 - 7:09 pm | डोमकावळा

पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.

झकास....
अतिशय सुरेख लिहीलय...
आवडलं.. :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Jun 2008 - 9:40 pm | डॉ.प्रसाद दाढे

खासच! आम्हीपण चार वर्षे मागे गेलो.. हर हर..गेले ते दिवस..

आनंदयात्री's picture

26 Jun 2008 - 9:53 am | आनंदयात्री

एक सादासा फ़ूल
और उसकी सादिसी पंखुडिया
कुछ जादूसा कर देते हैं

...

तुम नही आओगी...ये तो पता है
बाहर झांकना फ़िज़ुल है....
ये दिल को समझाने की भी
अब आदतसी हो गयी है.

... !!

धम्याच्या शब्दात : साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब?

आपलाच,
...

फिझा's picture

24 Jan 2012 - 11:32 am | फिझा

खुप छान !!!

श्यामल's picture

24 Jan 2012 - 12:11 pm | श्यामल

नितांत सुंदर !

विजुभाऊ's picture

4 Apr 2013 - 11:45 pm | विजुभाऊ

का कोन जने पूजाच्या लेखा नन्तर हा लेख वर आणावासा वाटतोय