पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
22 Jun 2008 - 8:45 am

पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत. नव्या मुंबईच्या क्षितिजरेषेवरच त्यांनी 'हावरे' नाव कोरले आहे. बांधकामक्षेत्रात सर्वात गतिमान आणि विश्वासार्ह व्यवसाय समर्थपणे प्रस्थापित करून ग्राहकांच्या पसंतीस पोहोचवणाऱ्या मराठी मातीतल्या उद्योजकाची ही यशोगाथा आहे. उद्योजकतेची आस मनात धरून समोर येणाऱ्या होतकरू मराठी तरुणांना, आयुष्य घडवावे कसे ह्याचा वस्तुपाठ म्हणून ते उपयोगी ठरू शकेल याचा विश्वास वाटतो.

दुवा क्र. १: हावरे डॉट कॉम या त्यांच्या संकेतस्थळावर आता या पुस्तकाचे 'वि-पुस्तक (e-book)' आविष्करण निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावे आणि उद्योजकतेचा मार्ग गवसतो का ह्याची चाचपणी करावी. मार्ग नाही तरी दिशा अवश्य मिळू शकेल. किमान प्रेरणा तर खासच.

दुवा क्र. २: 'सूर्य पेरणारा माणूस' http://www.haware.com/Surya-Peranara-Manus-Pravin-Davane.pdf

दवणे म्हणतात, "जिद्दीच्या बिया घेऊन सतीश हावरे नावाचा 'सूर्य पेरणारा माणूस' आकाशावर आपली नाममुद्रा कोरून गेला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धडपडणाऱ्या युवकाला जिद्दीच्या बिया देण्याचे मोलाचे काम सतीश हावरे यांच्या आयुष्याने केलेले आहे. इमारती उभ्या करतांना, हजारो उपेक्षितांची, आयुष्ये उभी करणाऱ्या सतीश हावरे यांचे अजिंक्य जीवन नियतीलाही पुसता आले नाही. विदर्भातील पथ्रोट या छोट्या गावातून नव्या मुंबईतील 'हावरे बिल्डर्स'पर्यंतचा हा गगनचुंबी प्रवास. प्रत्येक पालकासाठी! प्रत्येक शिक्षकासाठी! जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! "

समाजजीवनमानराहणीप्रकटनमाध्यमवेधमाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2008 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!!
मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पक्या's picture

22 Jun 2008 - 2:02 pm | पक्या

>> 'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!!
मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते.

हेच म्हणतो मी .

बिरुटेसाहेब आणि पक्या प्रतिसादाखातर धन्यवाद.

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2008 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

धन्यवाद साहेब,
सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? ;)

आपणास झाल्या तसदीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 4:59 am | विसोबा खेचर

सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ?

बिरुटेसरांचं उत्तर आवडलं! :)

गोळेशेठ,

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला!

असो, पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद...

तात्या.

ध्रुव's picture

23 Jun 2008 - 12:46 pm | ध्रुव

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?
विषय - पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस - असा असल्याने परिचय असेल अस वाटले होते. असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला.
पुढच्या वेळेला कृपया विषय: अ ब क - पुस्तक दुवा असा द्यावा म्हणजे इतरांचा वेळ नाही जाणार.

--
ध्रुव

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 1:12 pm | विसोबा खेचर

असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला.

वरील वाक्यातील 'भ्रम' या शब्दाची योजना आवडली! :)

आपला,
(शब्दवेल्हाळ) तात्या.

ध्रुव महोदय, प्रतिसादाखातर धन्यवाद.

आपला वेळ फारच महत्वाचा आहे हे उघडच दिसून येते.
या विषयलेखनातील चुकीमुळे त्याचा बराच अपव्ययही झाला असावा असे दिसते.
त्याची जबाबदारी मात्र सर्वस्वी आपल्यावरच आहे.
आपण आपल्या आवडीच्या विषयांत लक्ष घातल्यास वेळेचा अपव्यय टाळू शकाल.

आपल्याला, मी वर लिहीलेल्या परिचयात्मक वाक्यांची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्यावरून,
ह्या विषयात आपल्याला रुचीही कमीच असावी असा समज होऊ शकतो.

तेव्हा आपण इकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती.

तरीही, आपल्या सूचनेची योग्य ती दखल घेतली आहे.

नरेंद्र गोळे's picture

23 Jun 2008 - 10:50 am | नरेंद्र गोळे

हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! >>

तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल?
मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल.

अर्थात, अधिक अपेक्षा करणार्‍या डॉ.बिरुटे सारख्यांना एवढे फटकळ उत्तर मिळण्याची खरोखरीच अपेक्षा नसणार.
ते काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे.

मूळ पी. डी. एफ. फाईल केवळ १ मेगाबाईटच्या आसपासच असल्याने आपण कुणा ब्रॉडबॅन्डधारक मित्रास डाऊनलोड करायला सांगून त्याचेकडून मागवून घेऊ शकता. मला आपला विरोपपत्ता कळवल्यास मीही आपल्याला पाठवू शकेन.

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 10:55 am | विसोबा खेचर

तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल?

हम्म! हा मुद्दा मला पटला.

मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल.

येस्स! मलाही फटकळच म्हणायचे होते. तो शब्द मला सुचला नाही आणि मी चुकून 'उर्मट' हा शब्द वापरला. क्षमस्व!

काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे.

देअर एन्डस द मॅटर! विषय मिटला...

धन्यवाद गोळेशेठ. पुलेशु... :)

तात्या.