"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
5 Jan 2011 - 11:47 pm

आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली.

जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला. ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्‍मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ओमर बोलत होते. "" श्रीनगरमध्ये शासकीय कार्यक्रमात अधिकृतरित्या राष्ट्रध्वज लावण्यात येणार असताना स्वतंत्र कार्यक्रमाची गरजच काय?'' असा प्रश्‍न ओमर यांनी उपस्थित केला. ""काश्‍मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्‍मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले.

ओमर यांचे वडिल आणि केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी देखील भाजपला इशारा दिला आहे. काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थितीसाठी भाजपने आपल्याला जबाबदार धरू नये, निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी त्यांनी ठेवावी अशा शब्दात फारूक यांनी ओमर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ओमर यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगाल ते काश्‍मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने श्रीनगरच्या लाल चौकात प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

" जम्मू आणि काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून राष्ट्रध्वजाची यात्रा केवळ एकाच नाही तर अनेक राज्यांतून प्रवास करणार आहे. हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी नाही तर देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी ती आयोजित करण्यात आली आहे,'' असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नवी दिल्लीत सांगितले.

http://72.78.249.107/esakal/20110105/5309626091301734432.htm

(बातमी खालच्या प्रतिक्रीयासुध्दा वाचण्यासारख्या आहेत)

बातमी वाचुन मन विषण्ण झाले. मला हे वाचल्यावर समजले नाही की विरोध नक्की कशाला आहे. तिरंगा फडकवायला की भा.ज.प.ला?

हा अब्दुला पिता-पुत्रांचा पळपुटेपणा की दिल्लीश्वरांच्या (अर्थातच हाय कमांड) इशा-यावर बोलत आहेत?

बाकी हे वाचल्यावर पुन्हा एकदा सुधीर काळ्यांच्या "इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?" ची आठवण झाली.

धोरणसमाजराजकारणप्रकटनमतबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

त्याहि पेक्षा अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे केन्द्रिय गृहसचिवांनी (पिल्ले) काश्मीर मधील सैन्य २५ % कमी करण्याची घोषणा केली आहे आणि ते ही लष्कराला विश्वासात न घेता.
लष्कर प्रमुखांनी त्यावर जाहिर असहमती व्यक्त केली आहेच पण प्रश्न पडतो
१)इतका महत्वाचा निर्णय गृहसचिव कसा काय जाहिर करतात, संरक्षणमंत्री चचले का काय ?
२) ते ही हा निर्णय पत्रकार परिषदेत न जाहिर करता कार्यालयाच्या बाहेर उभे राहून ?

काश्मीर देउन टाकणे आता फक्त काळाचाच प्रश्न उरलेला आहे. बाकी देवुन टाकायची मानसिकता तयार झाली आहेच.

सद्दाम हुसैन's picture

26 Jan 2011 - 12:23 am | सद्दाम हुसैन

मुर्खपणा आहे हा सगळा ... सांगितलाय कोणी हा उपद्व्याप ?? भाजप काही धुतल्या तांदळाचे नाहित.
जातीपातीचं आणि प्रांतवादाच राज्कारन आहे हे.

http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg या दुव्यावरील पाकिस्तानी ध्वजाचे चित्र स्पष्ट आहे पण हा चित्रात दाखविलेला भाग पाकिस्तानमधील एकादा भाग नसून श्रीनगरमधील लाल चौकच आहे याची खात्री कुणी देऊ शकेल काय? ब्लॅक लेबल पुन्हा-पुन्हा द्यायची तयारी आहे पण इतक्यांदा अशी चूक करायची मात्र इच्छा नाहीं! तरी जाणकारांनी खुलासा करावा! मगच मी पुढचा प्रश्न विचारू इच्छितो!
हा लाल चौकच असल्यास १५ ऑगस्टला असो वा २६ जानेवारीला असो किंवा इदुल-फित्रला असो, त्याच लाल चौकात सरकारव्यतिरिक्त कुणीतरी पाकिस्तानचा झेंडा लावला होता. हे खरे असेल तर अशा देशद्रोह्यांविरुद्ध 'ज-का' सरकारने कांहीं कायदेशीर कारवाई केली होती कां? कीं 'महौल' बिघडू नये म्हणून आवंढा गिळून ते सरकार गप्प बसले?
आज तिरंगा लाल चौकात फडकविण्याच्या मनसुब्याचे काय झाले? भाजपाच्या लोकांना अटक झाली इतके वाचले, पण तिथेच ही कहाणी संपली कां? उद्या २७ जानेवारीला झेंडा फडकविण्याचा प्रयत्न कां करू नये?

Friends18.com Orkut MySpace Hi5 Scrap Images

तिरंग्या शी खेळणार्या सगळ्यांना १ च शिक्षा.......

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 7:05 am | नरेशकुमार

वरील प्रतिसाद डीलीट केला जावा.
नंतर मग हा पण डीलीट केला तरी चालेल.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2011 - 7:35 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

चिंतामणी's picture

27 Jan 2011 - 11:04 pm | चिंतामणी

असेच म्हणतो.

हा लाल चौक आहे कीं नाहीं?
असल्यास इथे कधी तरी कुणी तरी पाकिस्तानी ध्वज फडकवलेला दिसतोय् त्याबद्दल कुणी कांही बोलणार आहे काय?

अर्थात् कुणी पाकिस्तानी ध्वज फडकवल्याने काश्मीर हातचे गेले नाहीं हे माहीत झालेले आहे!

सुनील's picture

28 Jan 2011 - 12:08 am | सुनील

हा लाल चौक आहे कीं नाहीं?
सदर जागा ही लाल चौकच आहे किंवा कसे, याबद्दल निश्चित ठाऊक नाही. परंतु, फोटोत टायटनची जाहिरात दिसते आहे त्यावरून सदर भाग भारतातीलच असावा, असे वाटते.

असो, गुजरातेतील आणंद येथे पाकिस्तानी झेंडा सलग दोन महिने फडकत राहिला होता. तो झाडाआड असल्यामुळे दिसत नव्हता असे सांगण्यात येत होते. ह्या संदर्भात सहा जणांना अटक होऊन सुमारे दीड वर्षे लोटले आहे. त्याचे पुढे काय झाले कुणास ठाऊक आहे काय? अधिक माहिती येथे.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2011 - 8:08 am | नितिन थत्ते

हा हा हा.

मोदींच्या* गुजरातमध्ये तो बहुधा चौकात जाळण्यासाठी आणला असावा. पण तितक्यात द्वेष बाजूला ठेवून विकासाकडे लक्ष द्यायचे ठरवले गेल्यामुळे तो राहून गेला असेल.

*हल्ली गुजरात ऐवजी मोदींचा गुजरात असे म्हणायची पद्धत आहे.

२६ जानेवारीरोजी एक वर्ष झाले या घटनेला. याचे पुढे काय झाले हे सांगेल का कोणी??????

सुधीर काळे's picture

28 Jan 2011 - 2:18 pm | सुधीर काळे

सुनिल-जी,

हा प्रश्न मी तुम्हाला विचारल्यानंतर मला आणखी एक धागा कुणी दुसर्‍याने 'व्यनि'वर पाठविला. तो धागा पाहिल्यावर तो लाल चौकच आहे हे स्पष्ट झाले होते. पण ती चित्रफीत पहातांना मला गिलानीसाहेबांची आणखी एक 'लीला' दिसली. तीही माझ्या सहीत मी टाकली आहे. वेळ असल्यास जरूर उघडून पहावी. [या दोन्ही चित्रफिती मी सध्या 'सही' (signature) म्हणून वापरतो आहे.]

दुसरे म्हणजे काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावला हे जितके चूक आहे तितकेच आसाममध्ये किंवा गुजरातमध्ये फडकावणेही चूकच आहे. कुणी काश्मीरबद्दल लिहिले कीं लगेच अशी इतर ठिकाणची उदाहरणे देऊन त्याचे समर्थन करणे मला तरी कांहींसे विचित्र वाटते. माझ्या हातून असे झाले असेल तर ते माझेही चूकच आहे.

म्हणजे एका सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्षांनी केला तर त्या सरकारने "तुम्हीही भ्रष्ट होतात" असे म्हटल्याने 'फिट्टंफाट' होत नाहीं! नेते करतात ते तर चूक आहेच, पन आपण ती संवय लावून घेता कामा नये असे मला मनापासून वातते! पहा पटतेय् का!

गुजरातमध्ये त्या लोकांना पकडले तरी! इथे गिलानी तर शड्डूच मारत आहेत. अगदी दिल्लीतसुद्धा त्यांना अटक करायची कृती कां झाली नाहीं हे पहाणे माझ्या मते जास्त महत्वाचे. माझ्या सहीत गिलानींच्या एका भाषणाची चित्रफीत दिली आहे त्यातले "हम पाकिस्तानी हैं पाकिस्तान हमारा है" हे वाक्य अगदी स्पष्ट ऐकू येते! (त्या आधीचा कांहीं भाग नीट ऐकू आला नाहीं.)

आपल्याकडे न्यायसंस्था चांगली आहे पण तिथे 'सारे कसे हल्लू-हल्लू' चालते. म्हणूनच सिद्धू, सलमान आणि संजय शिक्षा झाल्यावरही अनेक वर्षें 'तारखा' पडत/पाडत जामीनावर हुंदडत असतात. लोकही विसरून जातात ही दुर्दैवाची गोष्ट!

हे वृत्त टाइम्समध्ये आल्याचे वाचनात नाहीं. असो.
आता DNA हे वृत्तपत्र वाचायला सुरुवात करायला हवी! करत आहे!!

चिंतामणी's picture

27 Jan 2011 - 11:10 pm | चिंतामणी

अपेक्षाभंगाचे दु;ख वाईट असते.
;)
(मी सुध्दा काला व्हिडीओ पोस्ट केला होता. पण कोणिही प्रतिक्रीया दिला नाही.) :(