जर्मन आख्यान भाग ४ माझा सासरा ( वय मानण्यावर असते )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in जनातलं, मनातलं
17 Dec 2010 - 12:43 am

http://www.misalpav.com/node/15714 भाग १
http://www.misalpav.com/node/15729 भाग २

http://www.misalpav.com/node/15766 भाग ३
माझा सासरा अल्बर्ट मार्झ. हे एक अजब व्यक्तिमत्व आहे .मूळ पिंड हा खेळण्याचा .लहानपणापासून फुट बॉल ची प्रचंड आवड .त्यांच्या घरासमोर त्याच्या गावातील क्लब चे मैदान आहे . त्यामुळे रोज फुट बॉल पाहत बालपण गेले .दुसर्या महायुध्धाच्या धामधुमीत वडिलांचा चेहरा पाहणे नशिबात नव्हते .ह्यांचा जन्म त्यांच्याच घरात झाला .हॉस्पिटल मध्ये जखमी लोक प्रचंड संस्ख्येने येत होते त्यामुळे तेथे सामान्य नागरिकांना जागाच नसायची . .वडील रशियात निकराने झुंझत होते .मोठी बहिण व आजी आई अश्या ३ महिलावर्गात हे शेंडेफळ. त्यामुळे लाडावलेले .त्याकाळी तरुण वयात नोकरी धंद्याचे प्रथम पहा असा घराच्या मंडळीचा सल्ला डावलून साहेब फुट बॉल च्या मैदानात रमू लागले .(खेळामुळे व उमद्या व्यक्तिमत्वामुळे
पंचक्रोशीत लवकरच लोकप्रिय झाले .महिलावर्गात विशेष वयाच्या ३०व्य वर्षी आपल्याहून १० वर्षाने लहान तरुणीच्या प्रेमात पडले .त्याच आमच्या सासूबाई अनिता .ह्या सुध्धा मेरेथोन रनर. पण फुट बोलचा तिटकारा कारण हा खेळ इतर खेळांचा गळा घोटतोय अशी समजूत. .देवावर ह्या जोडप्याचा विश्वास नाही .जर्मनीत दरमहिन्याला चर्चला फी द्यावी लागते .जी करातून घेतली जाते .. येथे धर्मावर आधारित डिग्री व मास्टर करायची सुविधा आहे .त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आहे .
त्यामुळेच युरोपात वेतिकान मध्ये रोमन कथालिक विषयातील अनेक तज्ञ हे जर्मनीतून येतात .(सध्याचा पोप हा जर्मन आहे .) शाळेतून चर्च साठी स्वयंसेवक निवडले जातात .जे रविवारचा मास व इतर धार्मिक कार्यात भाग घेतात .पण सर्व सामान्य जर्मन जनता हि विज्ञान निष्ठ आहे .चर्च मध्ये जन्म /मृत्यू /लग्न ह्या तीन गोष्टीशिवाय अजिबात जात नाहीत .किती तरी लोक .चर्च नक्की ह्या करातून मिळणाऱ्या पैशाचे काय करते ?.ह्याबद्दल शंका व्यक्त करतात .दरमहिना चर्चला पैसा द्यावा लागू नये म्हणून एक शक्कल लढवली जाते. ती म्हणजे स्वताला धर्मातून बहिष्कृत करणे .म्हणजे कोणताही धर्म नाही. मग कर द्यायची वेळ येत नाही. .हा केवळ पैशाचा नाही तर त्यांच्या तत्वाचा भाग आहे .माझ्या सासर्याने स्वताला बहिष्कृत केले आहे .त्यांच्या घरात कुठल्याही देवतेचा फोटो नाही. (त्याच्या खोलीत जर्मनीच्या विश्व विजेत्या फुट बॉल संघाचा फोटी जरूर आहे .माझी बायको चौथी पर्यत मुलींच्या कान्वेंत मध्ये शिकली. तिथे आठवड्यातील काही तास बायबल वाचायला लावायचे .(त्यामुळे बायबल तोंड पाठ )पण वडिलंचे संस्कार अंगीकारत पुढे तिने शाळा बदलली .कारण चर्चे मध्ये आवाज गोड असल्याने रविवारी गाण्यासाठी तिला पाठवणार होते .पण त्याचवेळी भौतिकवाद व कर्मवाद जर्मनीत आपल्या कळसावर होता .त्यात तिची पिढी ओढल्या गेली .हॉलीवूड च्या देवी देवता ह्याच्या मनी वसु लागल्या .माझ्या मते प्रगत देशात भांडवलशाहीचे अपत्य असलेल्या भौतिकवादाला उत्तेजन देतांना जाणीवपूर्वक धर्माला व त्यातील नैतिक मूल्यांचे अवमूल्यन केल्या गेले .पण ह्या कुटुंबात .पण इतर धर्मीयांविषयी द्वेष अजिबात नाही आहे . .माझी बायको तिची आई बहीण हे सर्व कलेचे भोक्ते .आपले कोकार्क चे सूर्यमंदिर हे त्यांना जगातील शिल्प कलेचा भव्य अविष्कार वाटतो . ( मला जेव्हा ती सन टेंपल बद्दल भरभरून बोलत होती .तेव्हा हे नक्की कुठे ? असा प्रश्न माझ्या मनात आला होता .ओरिसा राज्याबद्दल फारसे माहित नाही .असो .)बाकी सासरा माझा एकदम दिलदार माणूस .खेळाडू हा व कलाकार हे मनस्वी असतात .पण त्याचे अस्तित्व हे त्यांच्या शरीरावर अवलंबून असते .म्हणजे कितीही दुर्दम्य इच्छा शक्ती असली तरी शरीर बळकट हवे . म्हणूनच हेल्थ इज वेल्थ असे म्हटले आहे .माझे सासरे ह्या बाबतीत भलतेच जागरूक आयुष्य लाथा मारण्यात गेले (फुट बॉल ला ) आपल्या क्लबचे सुपरस्टार मग कोच अगदीच रिटायर्ड व्ह्याच्या काही वर्ष आधी शिट्या फुंकणे व कार्ड दाखवणे ( दोन्ही संघांच्या पाठीराख्याचे शिव्या शाप कधी धमक्या तर कधी गाडीचे टायर चाकूने फाडून घेणे. ) असे प्रकार झाल्यावर मिशिलीन कंपनीतून ते नुकतेच निवृत्त झाले. सध्या आपल्या बर्याच मोठ्या मित्र परिवारासह फुट बॉल वर चर्चा मग ग्रुप बेटिंग व पार्ट्या हे त्यांचे विश्व ( बाकी बायको दोन मूली माझ्या सारखा जावई)ह्यांच्यासाठी देखील वेळ असतो .जर्मनीत फुटबॉल च्या ९ श्रेणी असतात . त्यात हे ३ र्या श्रेणीत खेळायचे तर .ह्या खेळाची अमाप माहिती .त्याचा उपयोग हे किमान माजी २० खेळाडू व काही स्वतः कधी खेळले नाही तरी खेळातील स्वयंघोषित तज्ञ ज्यांना खेळातील सर्व समजते असे महाभागतर हि लोक प्रत्येकी २ युरो आठवड्याच्या काढतात व लोकशाही पद्धतीने निर्णय घेऊन बेट लावतात .बहुतेक वेळा जिंकतात .मग ते पैशाची पार्टी. येथे जिंकण्याचे व हरण्याचे सर्वात महत्वाचे म्हणजे पैसे कमाविण्यात येथे कोणालाच विशेष रस नाही .फक्त ज्या खेळाशी आयुष्यभर बांधल्या गेलो त्याच्याशी ह्या ना त्या निमित्ताने बांधिलकी जपणे हाच प्रमुख हेतू असतो आपण म्हातारे झालो म्हणजे संपल सार अश्या कल्पनेचा भुंगा माझ्या सासर्याचे कुठेतरी मनोविश्व कुरतडायला लागला (असे माझे मनोविश्लेषण आहे .)तर काही दिवसानंतर अचानक (हे सासू बाईंकडून नंतर कळले. ) कि टीवी पाहत असताना पेराशुत ड्रायविंग पहिले. व अचानक माझ्या साठाव्या वर्षी मी विमानातून उडी घेणार असल्याचा संकल्प सोडला .. अर्थात एकदा निर्णय घेतला कि मागे हटायचे नाही .हा त्याचा खाक्या .ताबडतोब क्लब मध्ये नाव नोंदणी झाली ..त्यांचे वय हा त्यांचा अनुभव वा आजही फिट असलेले शरीर ह्या सर्व गोष्टींमुळे आड आले नाही . .त्यांच्या १० जणाच्या तुकडीत सर्वात वृध्द वयाने व मनाने सर्वात तरुण (बाकीचे मंदीच्या तडाख्यात नाही म्हणता पोळले होते .) अर्थात ह्या सर्व घडामोडी आमच्या सासूबाई खेरीज इतर कोणालाही माहित नव्हत्या .अखेरीस तो दिवस उजाडला सर्व प्रशिक्षित टीम क्लबच्या मैदानात पोहचली .तिथे सर्व कोर्स मधील महत्वाच्या गोष्टींची उजळणी झाली थोडा शाररिक व्यायाम अंग गरम व्हावे म्हणून करण्यात आला . .राष्ट्र गीत म्हणण्यात आले .नि मग कार ने प्रत्यक्ष विमान तळी प्रशिक्षित टीम पोहचली .सासूबाई प्रत्येक क्षणाच्य स्मृती हदयात नि केमेर्यात चित्रबद्ध करत होत्या .त्या मनाने खंभीर पण ह्या क्षणी तणाव हा एक अनिवार्य घटक होता त्या वातावरणात, . .बाकीच्या लोकांचे नातेवाईक सुध्धा तणाव व रोमांच ह्याच्या सीमेवर होते .विमान सर्वाना घेऊन वर गेले .खालती विमान कुठे जाणार. व मैदानाच्या कोणत्या भागावर आल्यावर हि मंडळी उड्या मारणार ह्याची परफेक्ट माहिती खालील मंडळीना होती .व त्यांची तिथे जायची व्यवस्था देखील केली होती . प्रत्यक्ष तो क्षण आला .एका पाठोपाठ उड्या सुरु झाल्या .आपल्या नवर्याचा नंबर सासूबाई ठाऊक होता .म्हणून त्रिशंकू अवस्थेतील नवर्याचे फोटो काढता आले .सासरा न्यूटन च्या नियमाला साद देत धरतीवर अवतीर्ण झाला . .हे सर्व वीर जेव्हा मैदानातून चालत येत होते तेव्हा top गन सिनेमातील टोम्याची तुकडी जशी चालत येते तसा त्यांचा डौल होता .मनात विजयी भाव होता .काही क्षण अवकाशात घालवले ह्या स्मृतीचा थरार हदयात कायमचा बंदिस्त होता .आयुष्यातील पुढे म्हातारपणी आजार येणार .कदाचित अजून काही प्रसंग येतील त्यांना तोंड देतांना हा प्रसंग त्यांना टोनिक सारखा उपयोगी पडणार .हे नक्कीच. आम्हाला जेव्हा हे फोनवरून कळले. आम्ही तीनताड उडालोच .मी लगेच फोटो पाहून मी पण असेच करणार असे जाहीर केले .माझ्या साठाव्या वर्षी ) त्याच्या मित्र मंडळीनी ह्या निम्मिताने त्यांचा वाढदिवसाची त्यांना भव्य मेजवानी दिली . वय हे मानण्यावर असते हेच खरे .

देशांतरअनुभव

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2010 - 1:04 am | निनाद मुक्काम प...

शाररिक व्यायाम

पोशाख घालतांना

छोटेखानी विमान विमानात बसण्या आधी प्रसन्न चर्या त्रिशंकू अवस्था उतरतांना ट्रेनर कडून अभिनंदन व अनुभव कथन ६० वर्षाचे युवक

आमोद शिंदे's picture

17 Dec 2010 - 3:23 am | आमोद शिंदे

अहो त्या स्वाक्षरीत आणि फोटो मधे काही सेपरेटर टाका की. कुणाला वाटेल तुमचे सासरे म्हणजेच राजदूत रिचर्ड हॉलब्रुक

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2010 - 5:24 am | निनाद मुक्काम प...

लय भारी
येथे अफगाण पाकिस्तानी निर्वासित (रेफ्युजी )भरपूर आहेत .खरच असे वाटले तर आमच्या नावाचा फतवा निघेल .
चूक सुधारतो .

वाटाड्या...'s picture

17 Dec 2010 - 1:24 am | वाटाड्या...

> .आपले कोकार्क चे सूर्यमंदिर - गदगद झालो वाचुन....
>संघाचा फोटी जरूर आहे - अंमळ डोळे लाल झाले...
>युरोपात वेतिकान / कान्वेंत - आता डोळे लाले लाल झाले...
>नैतिक मूल्यांचे अवमूल्यन केल्या गेले/आयुष्यभर बांधल्या गेलो/ - ह्या सगळ्या वाक्यांनी झराझर पाणी (डोळ्यातून) वाहु लागले आणि मला पुढचे काही केल्या 'दिसल्या णाही' आणि माझ्याकडुन आपोआप हा धाग्यावरुन पलायन "केल्या गेले"...;)

ह. घे. वे. सां. न ल.

- (टायपिष्ट) वाट्या...

आमोद शिंदे's picture

17 Dec 2010 - 3:34 am | आमोद शिंदे

अरेरे म्हणजे "पेराशुत ड्रायविंग" तुम्ही पाहिले नाहीत..
(ड्रायवर) शिंदे

लेखन आवडले.
मला नाही ब्वॉ असं काही जमणार.
आपल्या श्वशुरबुवांचे अभिनंदन!
ते खरच शूर आहेत.
आपल्या सासूबाई मनावत ताण असूनही फोटो काढत होत्या म्हणजे ग्रेटच असणार्.....
भारतात भाजी आणायला गेलेल्या नवर्‍याला १० मिनिटे जरी उशीर झाला तरी कासावीस होवून बीपी वर खाली होणार्‍या बायकाच जास्त.....;)

छान लिहिले आहे.
सासरे बुवांचे कौतुक आहे .

शिल्पा ब's picture

17 Dec 2010 - 2:16 am | शिल्पा ब

अरे!!! विमानात पहिलं पाऊल ठेवतानाच फोटो नाही? मी चार वेळा स्क्रोल करून पाहिलं पण नाहीये :(

आमोद शिंदे's picture

17 Dec 2010 - 3:11 am | आमोद शिंदे

जर्मन आख्यान भाग ५: माझी बायको.

असे हवे बुवा!!

जर्मन पत्नी कशी काय मिळवलीत? कुठे भेटलात? कसे प्रेमात पडलात? परक्या भाषेत संवाद कसा साधता? सगळे डिट्टेल सांगा..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2010 - 4:58 am | निनाद मुक्काम प...

जरूर

चांगभलं's picture

17 Dec 2010 - 6:37 am | चांगभलं

लोक हौसेने काय काय लिहितील. याला काही नेम नाही...............
सगळं अंगच अमळ पाणावल....
असो पुढील भाग असे असतील अशी अपेक्षा करतो
भाग ५ - माझी बायको (वर म्हटल्याप्रमाणे)
भाग ६ - माझा जर्मन कुत्रा
भाग ७ - माझी जर्मन कामवाली बाई
भाग ८ - माझा जर्मन बॉस

जर्मन जर्मन जर्मन जर्मन .....
आनंदी आनंद गडे जर्मन जर्मन चोहीकडे....
(निनाद भाऊ लोकांना कळलंय कि तुम्ही जर्मन ला स्थाईक आहात, आणि तिकडचीच बायको केलीयेत.. पुरे णा आता कवतुक )

नगरीनिरंजन's picture

17 Dec 2010 - 6:48 am | नगरीनिरंजन

लिहू द्या हो. भारत भारत, अमेरिका अमेरिका, काश्मीर काश्मीर किंवा चीन चीन वगैरेंपासून बदल म्हणून जर्मन जर्मन वाचू जरा. मीना प्रभूंसारखे प्रसिद्धीप्राप्त लोक 'माझं लंडन' वगैरे नावाची पुस्तकंच्या पुस्तकं लिहीतात तर निनादरावांनी मिपावर माझं जर्मनी चे चार-दोन लेख लिहीले तर आकाश कोसळणार नाही. :-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2010 - 7:00 am | निनाद मुक्काम प...

साने गुरुजी आणि मीना प्रभू हे दोघे साहित्यातील माझे गुरु आहेत .
निनाद आप्पाजी गटणे (मुक्कम पोस्ट जर्मनी )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Dec 2010 - 9:26 am | निनाद मुक्काम प...

सूचनेत थोडा बदल करतो
भाग ५ आमची ओमा म्हणजे आजी
असा असणार आहे .
राहिला प्रश्न माझी बायको
अहो सासरा व व त्याच्या सासूसाठी वेगळा भाग असतो मग सख्या बायकोसाठी
फक्त एकच भाग,.......
मी एक वेगळी आख्यान माला काढणार आहे .(आपली कृपादृष्टी राहील हि भाबडी आशा ठेवून आहे .)
(जर्मन सोबत इटालियन सुध्धा शिकणार आहे ..नवीन वर्षांचा संकल्प )
अवांतर
म्युनिक पासून रेल्वेने इटली २ तासावर आहे .(म्हणजे पुणा मंबई एवढे )

गोगोल's picture

20 Dec 2010 - 9:29 am | गोगोल

चालू ठेव. अजुन वाचायला नक्की आवडेल.

> म्युनिक पासून रेल्वेने इटली २ तासावर आहे .(म्हणजे पुणा मंबई एवढे )

हम्म्म्म तरीच हिट्लर आणि मुसोलिनी ची गट्टी जमली.

गोगोल's picture

20 Dec 2010 - 9:33 am | गोगोल

नवीन जर्मन पिढीला - जसे की तुझ्या बायकोला - पहीलं / दुसरं महायुद्ध ई बदद्ल काय वाटत ते जाणून घ्यायला आवडेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Dec 2010 - 9:51 am | निनाद मुक्काम प...

नक्की जरूर लिहीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

utkarsh shah's picture

18 Dec 2010 - 11:05 am | utkarsh shah

छान लेख आणि फोटो पण फारच सुरेख...........

चिंतामणी's picture

18 Dec 2010 - 10:56 pm | चिंतामणी

मस्त रे.

एव्हाना तुला इथल्या प्रतिक्रीयांची सवय व्हायला लागली असेलच.

असो. मी सरळ सरळ लिहीणारा माणूस आहे. तुला एक सुचना करायची आहे. एकदा टाइपल्यावर पुर्वदृश्य बटण दाबल्यावर पुन्हा एकदा वाच. आणि बारीक सारीक चुका दूर कर.

मजकुर चांगला आहे.

विलासराव's picture

19 Dec 2010 - 12:19 am | विलासराव

चाललीय तुमची जर्मन आख्यानमाला.
आवडतेय.

उल्हास's picture

20 Dec 2010 - 3:06 am | उल्हास

या वयातही हा कारनामा केला

तिथे उभे राहून उडी मारायला गट्स हवेत. येरागबाळ्याचे काम नव्हे.

त्यांनी या वयातही हे धाडस केलं. त्यांची जिगर पाहून टायटल सार्थ वाटले.

अभिनंदन..

एक वेगळाच अनुभव असणार...