भाग १ - http://www.misalpav.com/node/15474
भाग २ - http://www.misalpav.com/node/15500
भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529
आजचा दिवस "पैठण" साठी राखून ठेवला होता...... सकाळी मस्त आराम केला... दुपारी २ वाजता MTDC चीच "तवेरा" न्यायला आली......
मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी....
बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो. एकनाथ महाराजांची जन्म आणि कर्म भूमी म्हणून हे गाव खूप प्रसिद्ध आहे.
एकनाथ महाराजांचा वाडा अजूनही तितक्याच सुस्थितीत आहे...
समोरच गोदावरी नदी वाहत होती(बहुदा.. पक्का माहित नाही.. जाणकारांनी प्रकाश टाकावा )..... तिच्याच काठावर थोडे विसावलो...आज नेमका मी कॅमेरा हॉटेल वर विसरलो होतो.... नशीब मोबिल होता....
तिथून मग "पैठण्यांच्या दुकानात" मजबूत shopping सुरु झाली...
जाता जाता जायकवाडी धरण बघायचं ठरलं... मला वाटलं असेल साधं एखादं धरण असतं तसं..
आत्तापर्यंत मी "बारवी आणि चिखलोली" हि दोनच धरण बघितलेली होती....
म्हणून इतका काही उत्साही नव्हतो...
हळू हळू सूर्यास्त होत होता...
जायकवाडी धरणावर चढलो.... आणि समोरचं दृश्य बघून तोंडाचा "ऑ" तसाच्या तसाच राहिला....... बास...... स्वर्ग स्वर्ग काय म्हणतात तो हाच.....
समोर पाण्याचा अफाट जलाशय......... समुद्राचा भास व्हावा एवढा...... त्यात "आकाश आणि पाणी" हि दोन तत्व अशी काही बेमालूम पणे मिसळून गेली होती कि बास.....
केवळ " अस्ताला जाणाऱ्या नारायणामुळे दोघांमधला फरक कळत होता....
सगळेच शांत झाले होते.. एवढी गर्दी असून सुद्धा...... त्या निसर्गाने सगळ्यांची जणू वाचाच हिरावून घेतली होती...
अवर्णनीय सोहळा होता .. साला नेमका आजच कॅमेरा कसा काय विसरलो ? जाम शिव्या घातल्या स्वताला....
तरी जमतील तेवढे फोटू काढले......
हळू हळू "नारायणराव' पाण्यात विलीन झाले आणि आम्ही सुद्धा जड पावलांनी माघारी फिरलो.....
कधी पैठण ला जाल.. तर सूर्यास्त जायकवाडी धरणावरच बघा.....
क्रमश:
प्रतिक्रिया
25 Nov 2010 - 11:30 am | यकु
वाड्याचे फोटो जबरा आलेत
समोरच गोदावरी नदी वाहत होती(बहुदा.. पक्का माहित नाही.
गोदावरीच ती!
एकनाथांनी तिच्याच वाळवंटात तहानलेल्या गाढवाला पाणी पाजले आणि ब्राह्मणांचा रोष ओढवून घेतला म्हणतात.
एकनाथांना गाढव आणि ब्राह्मण यांच्यात फरक वाटला नाही आणि... ( इति कुठेतरी पु.ल. )
बाकी कॅमेरा हॉटेल वर विसरून फोटोग्राफी केल्याबद्दल णिषेध!!
25 Nov 2010 - 11:36 am | विलासराव
मी जातोय पुढील महीन्यात.
धरणावर जायला परवानगी घ्यावी लागते का?
की खुले आहे सर्वांसाठी?
तिथली बाग तर खुप सुंदर आहे मग तुम्ही काहीच कसा उल्लेख केला नाही?
का स्वतंत्र भाग लिहिताय त्यावर?
मी १७-१८ वर्षांपुर्वी गेलो होतो तिथे.
25 Nov 2010 - 11:53 am | स्पा
बागेत जाईपर्यंत रात्र झाली होती....
तिथला "संगीत कारंज्यांचा शो " खूप प्रसिद्ध आहे....
पण आम्ही तो अगोदर शेगाव ला "आनंद सागर" ला बघितला असल्याने काही एवढे विशेष वाटले नाही.....
25 Nov 2010 - 12:22 pm | विलासराव
अगोदर शेगावला जाउनच पुढे औंरगाबादला जाणार आहोत.
25 Nov 2010 - 12:26 pm | स्पा
शेगाव ला गेलात तर लोणार जरूर बघा
25 Nov 2010 - 11:49 am | डॉ.श्रीराम दिवटे
पैठणला एकदातरी जावेच...
फोटो छान आलेत...
25 Nov 2010 - 11:56 am | निखिल देशपांडे
पैठणचा सुर्यास्त अप्रतिमच...
धरणावर जायला परवाणगी लागत नाही. पण आतुन धरण पाहाण्यासाठी परवानगी लागते.
25 Nov 2010 - 12:24 pm | विलासराव
धन्यवाद मालक.
25 Nov 2010 - 12:31 pm | कवितानागेश
चांगले आलेत फोटो.
तरीही, 'ओरिजिनल' पैठण्यांचा फोटो न टाकल्याबद्दल निषेध!
25 Nov 2010 - 12:37 pm | स्पा
तरीही, 'ओरिजिनल' पैठण्यांचा फोटो न टाकल्याबद्दल निषेध!
हॅ हॅ हॅ
आयुष्यात एवढ्या पैठण्या पहिल्यांदाच बघितल्या......
बायका साड्यांसाठी कश्या वेड्या होतात.. हे बघायला एकदा पैठण ला जरूर जा...
फक्त पाकीट सोयीस्कर रित्या हाटेल वर विसरा.....
25 Nov 2010 - 1:09 pm | लॉरी टांगटूंगकर
कन्चा मोबाइल हो हा??फोटु बेश्तच !!!
आवड्लय
25 Nov 2010 - 1:44 pm | स्पा
३.२ mp camera
25 Nov 2010 - 1:27 pm | मन१
फोटो मस्त आलेत...
पैठण बद्दल इतिहासाहात हाजारांच्यवर पानं खर्ची पडलित.
कशाकशाचा आढावाघेन्णार?
एकनाथांच्या कुळातील विष्णूदास, भानुदास बुवांचा की खुद्द एकनाथांचा?
त्याच्या गण\गौळण आणि भारुड इत्यादी लोककलांवर असलेल्या अधिकाराचा की त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या पुनर्बांधणीतल्या अफाट परिश्रमाचा?
त्यांच्या भागवताबद्दल वाचाव्/लिहावं की एकनाथ-जनार्दन स्वामी ह्यांच्यातील अवखळ पण खोल ,गुरु-शिष्य नात्याचा की वयातीत मैत्रीचा?
फारच पंचाइत आहे बुवा.
शिवाय पैठण करायचच असेल तर नुसतं पैठण करण्यापेक्षा जवळचीच दोन-तीन\ ठिकाणं केलित तर खरे मजा आहे.
अगदि अनवट असा,थोडासा धीर गंभीर पण अत्यंत प्रसन्न, शांत अगदि किलबिलाटही सुखद बनवणारा असा डोंगर.
त्याचं नाव शूल भंजन. इथं एकनाथ समाधी करायला जाय्चे( असं म्हणतात).
तिथं एक दत्त मंदिर आहे. एक जादुइ शिळा आहे. तिच्यावर नाणं/धातु आपटला की मस्त सप्त सूर येतात.( सगळं सप्तक येतं की नाही माहित नाही, पण आवाज कसा गोड, घंटा वाजवल्यासारखा येतो. ).
इथं उभं राहुनरोह्ज एकनाथ आपल्या गुरुचं दर्शन घेउन ध्यानाला बसायचे. जनार्दन स्वामी त्या वेळेस देवगिरीचे किल्लेदार होते. इथुन तो किल्ला सहज दिसतो..
आता मूळ पैठण बद्दल लिहिण्याचीश्क्षमता माझी नाही.तरीही काही briefings:
१. तिथं दोन ठिकाणं आहेत "नाथाची घरं" म्हणून. एक गावात, एक गावाबाहेर.
२.संत ज्ञानेश्वर उद्यान्,धरण जायक्वाडी, नदी गोदामाता
३.अति प्राचीन नगरी. त्याच्या जवळच "कायगाव टोक" हे ठिकाण. "टोक" ह्यासाठी म्हणतात की रामाअयणात मारिच राक्षसाचा वध केल्यावर त्याच्या धडाचं टोक्/शीर्/गर्दन उडुन इथे पडली आणि गंगेत मिळाली
४. केवळ महराष्त्र किंवा भारत नव्हे, तर जागतिक दृष्त्तीनं एक प्राचीन, तत्कालीन प्रगत आणि समृद्ध शहर.
निम्म्या भारतावर राज्य करणार्या , अरबे समुद्रमहार्साद महासागरपादाकक्रांत करणार्या शक कर्त्या शालिवाहनांची ४००हून अधिक वर्षेराज्स्धानी.
५. ह्याचे अवषेशव्गावाबाहेर "पालथी नगरी" भाग आहे, तिथं उत्खननात मिळताहेत.
६.बहुतांश आधुनिक भाअरतिय भाषांचं मिश्रण्,संगोपन इथच झालं. )कानडी, मराठी आणि तामिळ ह्यांच्यात कॉमन असलेली तेव्हाची "प्राकृत" इथच भरभराटीला आली. )
७.नाथाच्या घरी एक छोटासा हौद आहे. नाथ षष्टीला कित्येकदा टॅम्करच्या टॅकर भरुन त्यात पाणी ओतले तरी भरतनाअही, अशी काहितरी आख्यायिका आहे.
सध्या इतकच.अंबाजोइगै,खुल्दाबाद,वेरूळ बद्दल टंकेन लवकरच.
आपलाच,
मनोबा.
25 Nov 2010 - 2:21 pm | स्पा
सध्या इतकच.अंबाजोइगै,खुल्दाबाद,वेरूळ बद्दल टंकेन लवकरच.
मनोबा...... वाट बघतोय......
25 Nov 2010 - 1:33 pm | सूड
फोटो सही !! शेवटचा फोटो आवडला.
25 Nov 2010 - 4:23 pm | पियुशा
मस्त लिहिलय पन मल फोटू दिसत नाहिये मघाच् पसुन
25 Nov 2010 - 5:44 pm | मेघवेडा
कडक फोटू! अथांग सागरच वाटतोय तो शेवटल्या फोटूत!
25 Nov 2010 - 7:57 pm | चांगभलं
जबरी..... रे... स्पा......
खतरनाक फोटू.........
शेवटचा तर खास आवडला.....
शेवटून ३ रा पण अफाट आहे...
प्रत्यक्ष गेलो नाही तरी, फोटोमुळे तिथेच असल्यासारखं वाटतंय....
पु.ले.शु
25 Nov 2010 - 9:08 pm | गणेशा
वर्णन छान ..
फोटो मला दिसत नाहियेत ... म्हणुन थोडा मुड गेला ..
मनोबांनी ही खुप छान माहिती दिली आहे