नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा
प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.
दि ६ जून २०१०.
जास्त वेळ न दवडता अधिवेशनाचे पहिले सत्र माझ्या भाषणाने सुरू झाले. त्यात मी नाडी ग्रंथात सुचवलेले शांती दीक्षेचे उपाय करायची गरज व ज्यांनी ते केले त्यांच्या अनुभवांची कथने सादर केली.
त्यानंतर शिवषण्मुगमना पाचारण केले गेले. त्यांनी त्यांच्या बद्दल व नाडी वाचनाच्या अनुभवांबद्दल कथन केले. बालपणापासून त्यांनी कसे शिक्षण घेतले. कसून अभ्यास केल्यानंतर गेली २५ वर्षांत त्यांनी हजारोंच्या संखेने नाडी ग्रंथांचे वाचन कले आहे. त्यांनी सर्वात जास्त जपानहून येणाऱ्या दहा हजाराच्यावर लोकांची नाडी ग्रंथ कथने केल्याचे ऐकून श्रोते थक्क झाले. त्यांचा पलनी ह्या शिष्याने गेल्या १५वर्षात अनेक नाडी केंद्रातून काम करु नाव कमावल्याचे सांगितले. भाषांतरकार रवीने नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने करायची हातोटी कशी मिळवली ते कथन केले. आपली नाडी ग्रंथांची सेवा दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याचे विनम्रपणे सांगितले.
शिवाने नंतरच्या आपल्या कथनाची सुरवात ओमकाराने केली. आम्ही त्याला म्हणून साथ दिल्यावर उपस्थित सर्वांनी ओमकार म्हणून सभागृहात एक गूढ गंभीर नाद विलक्षण प्रभाव पसरला. शिवाने पॉवेलची मैत्रिण मारियांच्या “धेनका” नावाच्या मातेचा अगस्त्यमहर्षींनी आपल्या नाडीग्रंथांत मदरमेरीच्या अंशाचा जन्म असल्याचे कथन, त्यांच्या प्रेमळ नजरेचा “दिव्यदृष्टी” म्हणून महर्षींनी केलेला गौरव ऐकून उपस्थितांपैकी धेनकांच्या कृपादृष्टीची जाण व महत्व आधीच माहित असणाऱ्यांनी टाळ्यांचा गजर करून आपली संमती दर्शवली.
दुपारच्या भोजनाच्या विश्रामात व नंतर लोकांचा गराडा व प्रत्येकाला आमच्याशी बोलायची उत्सुकता जाणवत होती. मात्र योग्य रुपांतरकार नसल्याने जे त्यातल्या त्यात इंग्रजीत बोलत होते त्यांच्यापाशी गर्दी होत होती. मधल्या काळात लोकांनी आपल्या शंका एका बॉक्समधे लिहून पाठवाव्यात असे सुचवल्याप्रमाणे अनेक विचारणा आल्या होत्या. त्याला वेळ देऊन नव्या सत्राची सुरवात झाली. बहुतेकांचा सुर काहीच माहिती वा अनुभव नसल्याने आमच्या कथनातील थक्क करणाऱ्या गोष्टींच्याबद्दल आणखी जाणून घेण्याचा होता.
त्यानंतर शिवषण्मुगमनी नटराजाच्या मुर्तींच्या गौरवचिन्हांनी जोसेफ, मेरिया, धेनकांना “होली मदर” असे गौरवून सत्कार केला. मी शालीं पाठींवर घालून त्यांना गौरवले. पॉवेलला मी एक गणेशाची एबस्ट्रॅक्ट रुपातील सुंदर फ्रेम देऊन सन्मान गेला. नंतर पॉवलनी माईक हातात घेऊन आपले निवेदन केले. शेवटी मुख्य नाडी वाचक शिवानी अगस्त्य, वसिष्ठ, काकभुजंदर, शुक, कौशिक, भृगु आदि अनेक महर्षींच्या केलेल्या स्तुतीगायनाने पुन्हा सभागृह भारले गेले. त्यानंतर आमचे रीतसर आभार मानून अधिवेशनाची सांगता झाल्याचे जोसेफ श्रोटरनी जाहीर केले. असे हे पहिले आंतरराष्ट्रीय नाडी ग्रंथ अधिवेशन संपन्न झाले.
पाप्यांचा कहर !
विदेशात एकमेकांना भेटायच्या व अभिवादन करायच्या विशिष्ठ पद्धती आहेत. कधी हस्तांदोलन तर कधी एकमेकांजवळ अलगद येऊन गालाला हलकेच पुसट स्पर्ष गालाने वा ओठांनी करून भेटीचा आनंद व्यक्त करायची प्रथा आहे. आम्हाला याची सवय नसल्याने प्रत्येक जण मिठीत घेऊन दोन्ही गालांवर देणाऱ्या हलक्या चुंबनाची सवय करून घेता घेता आमची तारांबळ उडत होती. विशेषतः स्त्रियांच्याकडून मिळणाऱ्या तशा जोरदार प्रतिसादाला!
पलनी न राहवून म्हणाला, “ सामी, हमने अबतक अपने वाईफका भी इतनी बार लिया नही होगा इतना यहां एक दिन में हुवा!“
मी त्याला कौतुकाने मान डोलवून होकार भरला. नंतरच्या सहवासात नाडीवाचक अशा प्रतिसादाला समरसून उत्तर देऊ लागल्याने ते या प्रथेला रुळल्याचे जाणवले. असो.
त्यानंतर पुढील तीन आठवड्यात १००पेक्षा जास्त लोकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले. त्या प्रत्येकाची नाडी पट्टी मिळुन एक प्रकारे विक्रम झाला, असे खुदुद नाडी शास्त्रींचे मत होते. त्या प्रत्येकाला आपले नाव वअन्य माहिती कुठे व कशी पट्टीत लिहिलेली आहे ते त्यांना आवर्जून दाखवण्यात दोघे नाडी शास्त्री तत्पर होते. त्याचे सर्वांसाठी व्हीडीओ शूटिंग होत होते. काहींना अगदी पहिली नाडीपट्टी उघडल्यापासून रेकॉर्डिंग हवे होते तसे त्यांना वेगळे पैसे भरुन मिळवायची सोय होती. प्रत्येकाने इंग्रजीतून झेक भाषेसाठी भाषांतरकाराची आपापली सोय करायची होती.
शेवटच्या दिवसात या अधिवेशनाचा थोडक्यात अहवाल व फोटो रेजेनेरेस नावाच्या मासिकात छापुन आल्याचे कळले. फोटो खाली पहा. ते नीट करून लावायला कृपया मदत हवी आहे.
अनेक ठिकाणी आम्हाला झेक लोकांचे काही उच्चार व इंग्रजीतील कथन नीटसे समजत नसे. त्यामुळे या व पुढील कथनात थोडी सरमिसळ होण्याची शक्यता आहे.
प्राग कॉलिंग लेख मालिका पुढे चालू...
प्रतिक्रिया
29 Jul 2010 - 4:22 pm | अवलिया
त्यानंतर पुढील तीन आठवड्यात १००पेक्षा जास्त लोकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले. त्या प्रत्येकाची नाडी पट्टी मिळुन एक प्रकारे विक्रम झाला, असे खुदुद नाडी शास्त्रींचे मत होते
अरेच्या तिकडच्या लोकांच्या ब-या अनेकांच्या नाड्या मिळाल्या ! भारतात लोकांना तर लै वाट पहावी लागते. काही प्रिमियम चार्जेस वगैरे घेतले होते का नाड्या मिळाव्याच म्हणुन ;)
29 Jul 2010 - 4:32 pm | महेश हतोळकर
तुमच्या-आमच्या सारख्या महापातकी लोकांची नाडी नाहिच मिळणार.
http://www.misalpav.com/node/3607#comment-52312
29 Jul 2010 - 5:13 pm | बिपिन कार्यकर्ते
फोटोंची मदत केली आहे ओकसाहेब. पण तुमच्या लेखात अर्थाचा अनर्थ होईल असे एक दोन टायपो आहेत. ते नीट करा ब्वॉ... :D
29 Jul 2010 - 7:35 pm | योगी९००
नाडीचा अनुभव नाही..आणि घेण्याची इच्छा मुळीच नाही..
एवढेच म्हणेन..दुनिया झुकती है..झुकानेवाला चाहिये..
बाकी चालू द्या..प्रागचे आणखी फोटो येऊ देत..
काकभुजंदर हे एक नवीन नाव कळले..
त्यांचा पलनी ह्या शिष्याने गेल्या १५वर्षात अनेक नाडी केंद्रातून काम करु नाव कमावल्याचे सांगितले. भाषांतरकार रवीने नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने करायची हातोटी कशी मिळवली ते कथन केले.
थोडाफार IT क्षेत्रासारखे वाटले.. आम्ही पण म्हणतो की विविध कंपन्यांमध्ये काम करून नाव कमावले...
भाषांतर रवी = compiler
नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची = assembly or processor specific instructions
सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने = high level programming language
असा उगाच संबंध लावत बसलोय..
(पण IT क्षेत्रात wife पेक्षा जास्त चुं**ने ..बाहेर नाही मिळत..)
29 Jul 2010 - 7:49 pm | नंदू
त्या ३५व्या पानावर " अनाडी" असं शिर्षक का बरं दिलं असावं ?
जाता जाता: काकभुजंदर हा एक सुरस व चमत्कारिक आयडी म्हणून आवडला. ताबड्तोब बुक करायला हवा.
मंदू
30 Jul 2010 - 8:52 am | प्रकाश घाटपांडे
मला आदुगर वाटल कि तिथ बी त्येंच्या पापी अंनिस तल्या लोकांनी उच्छाद मांडला कि काय?
30 Jul 2010 - 9:01 am | llपुण्याचे पेशवेll
छान.
30 Jul 2010 - 9:58 am | ऋषिकेश
पाप्यांचा कहर आवडला... इतपत (कहर नसला तरी माफक) सोय पुण्याच्या नाडीकेंद्रात करून दिलीत तरी भक्तगण वाढतील अशी हमी देतो :P
30 Jul 2010 - 1:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही सोय आत्ताही होऊ शकेल. नाड्या वाचणारीपण माणसंच आहेत!!
काय रे ऋ, तू 'डेड टेररिस्ट'च्या व्हिडीओमधला '७२ व्हर्जिन्स'चा विनोद ऐकलेला नाहीस का? झालंच तर 'दोस्ताना'चा शेवट!!
अवांतरः मला पहिल्यांदा बेल्जममधे गेल्यावर इथे सगळेच पुरूष गे आहेत का काय असा संशय आला होता. सगळे ओळखीचे पुरूषसुद्धा एकमेकांना भेटल्यावर गालावर किस करत होते. इंग्लंडातले लोक तर भारतीय मुलं एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालतात याबद्दलही आश्चर्य व्यक्त करताना ऐकलं होतं.
31 Jul 2010 - 12:35 pm | कवितानागेश
“धेनका” माता यांच्या बद्दल अजून माहिती कळेल का?
8 Aug 2010 - 1:47 pm | शशिकांत ओक
हो नंतरच्या लेखात ती येईल.
प्रोत्साहनावद्दल
धन्यवाद
5 Aug 2010 - 8:47 pm | शशिकांत ओक
मित्र हो,
नाडी ग्रंथांच्या संदर्भात पुण्याबाहेर जावे लागल्याने व नेटची सोय उपलब्ध न झाल्याने मिपाला भेट देता आली नाही. दोन्ही दिवसांच्या वार्तांकनावरील मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बिपिनजीं, आपले विशेष धन्यवाद. आजच परतलोय. सवडीने टायपो कडे लक्ष देईन.