नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस पहिला

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
28 Jul 2010 - 9:00 pm

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन
दि ५ जून २०१०
प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.

दि. ५जून २०१०, शनिवारी सकाळी दहा वाजता जुन्या टाऊन हॉलच्या एका मोठ्या हॉलमधे अधिवेशनाची सुरवात झाली. त्याआधी नऊ वाजल्यापासून बाहेर ज्यांनी आपली नावे नोंदवली होती त्याचे व नविन लोकांचे नावनोंदणीचे काम करायला गर्दी जमा झाली होती. पण कुठेच धक्काबुक्की नव्हती. शांतपणे लोक क्यूला उभे होते. असो.

जोसेफ श्रोटर यांनी अधिवेशनाची सुरवात झाल्याचे जाहीर केले. मात्र स्टेजवर नेहमी प्रमाणे टेबलखुर्च्यांची मांडामांड नव्हती की समईच्या दीपप्रज्वलनाची सोय. मात्र मी आणलेल्या अगस्त्य व भृगु महर्षींचे फोटो आवर्जून ठेवले गेले होते.
पॉवेलने अगोदर सांगून ठेवले होते. त्याच्या भाषेत, "आय दोंत लाईक आरेंजमेत ऑफ स्तुपीद कम्युनिस्ट. नोथिंग ऑन स्टेज." त्याप्रमाणे स्टेजवर मांडामांड होणार नाही. साधेपणाने प्रत्येकाने उभे राहून बोलायचे आहे. माईक हातात घरून.
आम्हाला पुढील रांगेत बसायची सोय होती. चीफ नाडी ग्रंथ वाचक शिवषणमुगम, दुसरे नाडी वाचक पलनी त्यानंतर भाषांतरकार रवी, स्वतः पॉवेल, नाडी ग्रंथ प्रेमी मेरीया, तिची वृद्ध आई धेनका व अन्य काही पहिल्या रांगेत होते. स्टेजच्या एका बाजूला माईक व व्हीडिओ शूटिंगच्या टीममधे काम करणारे जॉन, मीशा, येरी तत्परतेने उभे होते. आम्हा भारतातून आलेल्या निमंत्रितांचा सत्कार रुबाबदार पुष्पगुछ्यांनी झाला.
जोसेफ श्रोटर प्रागमधील एक मान्यवर सायकिक अनॅलेलिस करणारे एक्सपर्ट म्हणून गणले जातात. त्यांनी प्रथम सत्रात सिक्स्थ सेंन्स व नाडी ग्रंथ यावर आपले भाषण केले. त्यांच्या भाषणाचा गोषवारा त्यांचा मुलगा रोडिक मला दबक्या आवाजात सांगत होता. त्यांचे संपुर्ण (पॉवर पॉईटवरून केलेले) भाषण वेगळे येथे वाचायला मिळेल. त्यांच्या भाषणाला टाळ्याचा कडकडाट होऊन उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. नंतर माझी वेळ आली. मी आधीच्या श्रोटरांच्या भाषणातील धागा पकडून नाडी ग्रंथांतील कथन हे मानवी बुद्धीच्या पलिकडील वैश्विक ज्ञानाच्या साठ्यातून मिळवलेले असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी महर्षींचीच कथने त्याला पुरक आहेत असा खुलासा केला. त्याआधी मी थोडक्यात या अधिवेशनाचा माझ्या दृष्टीने उद्देश व महत्व कथन करणारे निवेदन व स्वागत भाषण केले. माझ्या भाषणाचा अनुवाद रोडिक तत्परतेने करत होता. वेळोवेळी ऐकू येणाऱ्या टाळ्यांमुळे माझे म्हणणे श्रोत्यांपर्यंत पोचत असल्याचे जाणवत होते.
मी नजरेने केलेल्या मोजणी प्रमाणे सर्व खुर्च्या भरलेल्या दिसत होत्या. त्यानुसार सुरवातीला १२० श्रोते होते नंतर वाढून १४० जमले असावेत. माझ्या नंतर मेरीयाने तिचा नाडी ग्रंथांचा भारतातील अनुभव थोडक्यात कथन केला. मग जेवायला सर्व पांगले. भोजन आपापले सोईने करायचे होते. त्यामुळे भारतात हटकून दिसणारी भोजन भाऊंची लगबग इथे नव्हती.
आम्हाला जवळच्या एका रेस्तोरॉंमधे नेले गेले. नेहमी प्रमाणे बीरची ऑर्डर झाली. “पटा पटा आटपा” असा खाक्या नव्हता. तरीही आम्ही तासाभरात हॉलवर वेळेवर परतून पुढील कार्यक्रमात सामील झालो. नंबर माझ्याच होता. यावेळी मला आलेल्या विविध अनुभवांचे कथन करायला सांगण्यात आले होते. योगी रामसुरत कुमारांचा व पॉन्डेचरीतील अरविंदाश्रमाचा भाग सांगताना वेळ संपली. कारण मला रोडिकच्या झेकमधील रुपांतरासाठी वेळ द्यायला लागत होता. असो.
त्या नंतर शिवषण्मुगना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या खड्या आवाजात तमिळ गायनाने अनेक महर्षींची आळवणी करणारे गायन केले. त्यावर श्रोत्यांच्या आनंदाच्या टाळ्या आल्या. त्यांनी व पलनीने शिवस्तुतीही म्हटली. पुन्हा मला बोलायला आमंत्रित केले गेले. यावेळी मी नाडी ग्रंथांतील विविध कांडांची रचना व त्यातील मजेशीर माहिती दिली.
त्यानंतरच्या सत्रात मानवीशरीरातील सात आंतरअंगांची कल्पना मी सांगितली व चौथ्याशरीरातील विविध शक्ती प्राप्त महर्षींनी संपुर्ण मानवाला देश, धर्म, जाती वा भाषा आदिंची बंधने झुगारून केलेली ही अनन्य साधारण मानवतेची सेवा आहे असे ठासून सांगितले. असा अधिवेशनाचा पहिला दिवस संपन्न झाला.

बायकांचा सुळसुळाट!!

अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता! काही विविध तंग पोषाखातील तरुणी, काही उच्च विचारांच्या गर्भश्रीमंत वाटल्या, तर काही पन्नाशी नंतरच्या! काहींशी बोलताना भारताबद्दल खुप माहिती असलेल्या तर काहींना योगा, प्राणायाम, मंत्र, आस्त्रालोगी(जी), एनर्गी(र्जी) लेवल वर अभ्यास केल्याची जाण असलेल्या विदुशी होत्या. उरलेले पुरुष मारुन मुटकून आल्यासारखे चेहरे करून बसलेले वाटत होते. काही पुरुषांनी मात्र खुप प्रश्न विचारून आपली जागरूकता दर्शवली.

दुसऱ्या दिवसाचे कथन आणि प्राग कॉलिंग लेखमालिका क्रमशः

देशांतरज्योतिषप्रकटनअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2010 - 9:36 pm | प्रकाश घाटपांडे

मजा आली ना अधिवेशनाला ? श्रोटर यांचे प्रेझेंटेशन वाचायला आवडेल.

वेताळ's picture

28 Jul 2010 - 9:39 pm | वेताळ

भारतात कधी आणि कुठे वार्षिक नाडी अधिवेशन भरते?माहिती मिळेल का?अधिवेशनाला उपस्थित राहण्यास किती फी आकारता?

पुष्करिणी's picture

28 Jul 2010 - 11:04 pm | पुष्करिणी

चांगला वृत्तांत, श्रोटर आणि आपल्याही भाषणाची लिंक देता येइल का ?

पुष्करिणी व प्रकाशजी
Mysterious inner spaceभाषणाची लिंक
Mysterious inner space Ing.Josef Schrötter

Note- This Power point address was delivered in Czech language. This English version was handed over to us on our request. It was partially modified and Naadi palm leaf libraries element was brought in it in the end.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2010 - 11:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमची (आणि पर्यायाने नाडीची) आठवण आली खरी!! तुम्ही युरोपात भेटाल अशी आशा होती, पण ते होणं दोन्ही नाड्यांमधे नव्हतं!

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jul 2010 - 8:54 am | प्रकाश घाटपांडे

पण ते होणं दोन्ही नाड्यांमधे नव्हतं!

जरी भेटला असता तरी तुम्ही काय म्हन्ले असते," हॅ ह्ये तर आमनधपक्यानी झालं"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2010 - 7:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>जोसेफ श्रोटर प्रागमधील एक मान्यवर सायकिक अनॅलेलिस करणारे एक्सपर्ट म्हणून गणले जातात.
श्रोटर यांनी काय विश्लेषण केले त्याची माहिती दिली तर नाडी अनुभवाइतकीच तेही वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

नंदू's picture

29 Jul 2010 - 9:51 am | नंदू

वाह वाह ....चला युरोपियन लोक सुद्धा नाडी वापरूलागले तर....:)

अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता! उरलेले पुरुष मारुन मुटकून आल्यासारखे चेहरे करून बसलेले वाटत होते.

सध्या याचा अर्थ कसा लावावा याचा विचार करतोय.

मिपा वरची ज्ञानी मंडळी लवकरच यावर भाष्य करतील या अपेक्षेत.

नंदू

बद्दु's picture

29 Jul 2010 - 10:42 am | बद्दु

परदेशातिल थोर (?) व्यक्तिनी सहभाग दिल्यामुळे आता भारतात या विषयाविरुद्ध बोलणे म्हणजे "पाप", " महापाप" ठरणार आहे. आमच्या थोर परम्परेला अनुसरुन आम्ही विदेशातुन आलेला माल डोळे ( आणि बद्धी) झाकुन स्विकारतो तेव्हा आता नाडि-परम्परेला चान्गले दिवस येण्याची शक्यता आहे.

युरोपियन अप्रुव्हल मिळाल्याबद्दल अभिनन्दन.

वेताळ's picture

29 Jul 2010 - 11:22 am | वेताळ

प्रायोगिक तत्वावर किती लोकाच्या(स्त्रियांच्या) नाडीपट्टी वाचन केले गेले व किती बरोबर आले ह्या संदर्भात माहिती कुठे मिळेल? तसेच भोजन काय काय होते ते देखिल पुढील भागात सांगा.

सुहास..'s picture

29 Jul 2010 - 11:26 am | सुहास..

हा हा हा ..काही नाही ...घाईघाईत चुकुन आधी साडी अधिवेशन वाचले ..म्हटल तुळशीबागेवर लेख आहे की काय ?

बाकी नंदुसारखेच म्हणतो ..

चला युरोपियन लोक सुद्धा नाडी वापरूलागले तर >>

मितभाषी's picture

29 Jul 2010 - 11:47 am | मितभाषी

पहाडी फोटो आवडला.
.
.

भावश्या

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jul 2010 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

शशिकांत ओक ह्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

खुपच छान वृत्तांत लिहिला आहेत. फोटोंनी अजुन मजा आली. जे 'बाहेरच्यांना' कळते पण 'घरातल्यांना' वळत नाही हे बघुन खेद वाटला.

महेश हतोळकर's picture

29 Jul 2010 - 12:00 pm | महेश हतोळकर

जे 'बाहेरच्यांना' कळते पण 'घरातल्यांना' वळत नाही हे बघुन खेद वाटला.
पिकतं तिथं विकत नाही हेच खरं!

Nile's picture

29 Jul 2010 - 12:16 pm | Nile

श्री श्री नाडी चा असा अपमान केलेला पाहुन पराचा निषेध करतो.

मुळात घरच्यांना नाडीचे महत्त्व कळणार नाही असे नाडीच्या नाडीत लिहले असताना असा उद्धट प्रश्न परा विचारतोच कसा? (पर्‍याच्या नाडीत हे आहे काय?)

बाकी ओकसाहेब, तुमच्या नाडीत तुमचा हा परदेशगमनाचा योग कीती बरोब्बर लिहला होता त्याबद्दल लिहाना राव.

अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता!

भारतातल्या असो वा परदेशातल्या, बायका जात्याच श्रद्धाळु यात दुमत नाही!

-अनाडी.

अवलिया's picture

29 Jul 2010 - 12:33 pm | अवलिया

सहमत आहे.

ओक साहेब अभिनंदन... :)

शशिकांत ओक's picture

8 Aug 2010 - 1:44 pm | शशिकांत ओक

धन्यवाद.

मितभाषी's picture

29 Jul 2010 - 12:34 pm | मितभाषी

भारतातल्या असो वा परदेशातल्या, बायका जात्याच श्रद्धाळु यात दुमत नाही!

असहमत.
त्यांना बहुधा 'श्रध्दे'पेक्षा "नाडी'चे महत्व कळाले म्हणुन ह्ह्ह्ही गर्दी. ;)

तुमच्या नाडीत फॉल्ट असल्याने तुम्हाला आमचे वाक्य कळले नाही म्हणून तुमच्याबद्दल सहानुभुती. ;-)

आणि हो, तिरके प्रतिसाद देत चला, आम्हाला कसे कळणार प्रतिसाद आम्हालाच दिला की नाही ते? (इतरकडचे वायफळ प्रतिसाद आम्ही वाचत नाही ;-) )

महेश हतोळकर's picture

29 Jul 2010 - 2:01 pm | महेश हतोळकर

(इतरकडचे वायफळ प्रतिसाद आम्ही वाचत नाही ;-) )

फक्त देतो ;)

शशिकांत काका तुमच्या चिकाटीचे खूप आश्चर्य वाटते.
नाडी वगैरे बाकी असो. तुमच्या कडून ही गोष्ट मात्र घेण्यासारखी आहे
हॅट्स ऑफ्फ टु युवर चिकाटी....

मित्र हो,
नाडी ग्रंथांच्या संदर्भात पुण्याबाहेर जावे लागल्याने व नेटची सोय उपलब्ध न झाल्याने मिपाला भेट देता आली नाही. दोन्ही दिवसांच्या वार्तांकनावरील मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.