आमची पहिली परदेशवारी..........................१

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
28 Jul 2010 - 7:46 pm

नमस्कार
मंडळी ,
पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे जी काही मित्रमंडळी परदेशी आहेत,त्यांच्याबरोबर चर्चा करुन प्राथमिक माहीती घेतली...आणी विजासाठी अर्ज केला आणी विजा मिळाला.
जायची तयारी सुरू झाली. कुणी सांगीतले म्हनुण फरसाण,
काजु, मनुखे,बदाम्,विविध चॉकलेट्,लोणचे,पापड असे अनेक खाद्यप्रकार बरोबर घेतले.मैत्रिणिसाठी भारतिय ड्रेस घेतले,प्रवासी बॅगसुध्दा नविन घेतली कारण कधी अशी वेळच आली नव्ह्ती. असो.....
गावावरुन ४-५ मित्र आले जोरदार पार्टी झाली,प्रत्येकाने आपापल्या परिणे मोलाचे मार्गदर्शन केले जरी ते कधी परदेशी गेले नव्ह्ते.रात्रि १:५० चे विमान होते, निघण्यापुर्वी स्काईपे वरूण मैत्रिणीशी बोललो आणी खात्री करुन घेतली की कितीही आणीबाणी आली तरीही तीने माझ्या आगमनापुर्वी साओ पावलो विमानतळावर हजर रहावे.कारण मी माझा भ्रमणध्वनी नेणार नव्ह्तो म्हनुन.दोन टॅक्सी घेउन आम्ही ८ जण गिरगावातुन निघालो तेव्हा रात्रिचे १० वाजले होते.सोसायटीकडे एक नजर टाकली जसा मी कधीच परतणार नव्ह्तो.......आणि निघालो.मित्र मस्करी करत होते पण माझे तिकडे लक्ष नव्ह्तेच मुळी.मी जे काही करतोय ते बरोबर कि नुसताच वेडेपणा चाललाय असा विचार मनात डोकाउन गेला..आणी माझ मलाच ओशाळल्यासारखं
वाटले.अशा विचारातच विमानतळावर पोहोचलो.मित्रांशी गप्पा आटोपत्या घेउन विमानतळामधे प्रवेश केला
.सामान जमा करण्यासाठी रांगेत दाखल झालो.....ईतक्यात
एक अधिकारी माझ्याकडे आला ....तिकीट , पासपोर्ट तपासले आणी चौकशी करू लागला.
अधिकारी: कुठे चाललात?
मी: ब्राझिलला.
अधिकारी: कशासाठी?
मी: फिरण्यासाठी.
अधिकारी:३ महीने ?......इथे काही कामधंदा नाही का?
मी: आहे साहेब,माझं ऑफीसच कामकाज माझा भाऊ बघणार आहे.
ईतक्यात दुसरा अधिकारी तेथे आला ..दोघे काहीतरी बोलले .......परिणामी मला रांगेमधून बाजुला घेण्यात आले.माझे बॅगमधील सर्व सामानाची कसुन तपासणी केली गेली.आनी परत.......
अधिकारी: एवढे खाद्यपदार्थ का घेऊण जाताय? तिकडे काही मीळत नाही का?
मी: ३ महीने रहायच आहे आनि आपले पदार्थ तिकडे मीळत नाहीत साहेब......
अधिकारी:हुं....आनी ही व्हिस्की ?
मी: तिकडच्या मित्रांसाठी....(खरं तर माझ्यासाठीच. असावा आपला ब्रॅंड म्हनुन)
तब्बल दीड तासांनी मला सोड्ण्यात आले.एवढ्च सांगतो कि एखाद्या अतिरेक्यासारखी माझी चौकशी झाली.बॅग जमा करुन,तपासणी यंत्राची परीक्षा पास झालो.....जोराचा श्वास घेतला...जराशी बरं वाटले आनी आतिल दुकानामधे ऊगाचच
डोकावत हळुह्ळु पुढे निघालो.येथील श्रिमंती थाट बघुन मलातरी परदेशात आल्यासारखे वाटले. मी फक्त वस्तुंच्या किमति पाहुन समाधान मानले( काय करणार?)......अन जरा रमतगमतच गेटवर पोहोचलो..परत एकदा बॅग तपासणी झाली ...विमा नात जाउन बसलो.मित्राना फोन केला ,हकिकत सांगितली अनि मला पहिल्यांदाच गहिवरुन आले ........तसाच निरोप घेतला...
२ बाय २ सीटवर खिड्कीजवळ बसलो.थोड्या वेळाणे एक मध्यम वयाच्या बाई आल्या...अनि त्यांनी खिड्कीजवळच्या
जागेवर दावा केला. मी खात्रि करुन त्यांना जागा देउन बाजुच्या सिटवर बसलो. मनातच ट्रॅव्हल एजंटला शिव्यांची
लाखोली वाहिली कारण त्याने मला खिड्कीजवळची जागा बूक केल्याच सांगितले होते.असो मी स्वतः खात्रि न करताच बसलो आनी आमचा पोपट झाला.विमानाने टेक ऑफ घेतला....मी खिड्कीतुन खाली पाहिले...काळोख अन खाली
दिव्यांच्या प्रकाशात ऊजळलेली मुंबई.....केवळ अप्रतिम नजारा!!!!!! थोड्या वेळाने नाश्टा आला.. यथेच्च समाचार घेतला, नंतर काही वेळाणे ड्रिंक्स आले ,न लाजता ३-४ टिन बियर प्यायलो..अन दीली ताणुन.सकाळी ८ वाजता अ‍ॅमस्टरडॅमला उतरलो....फ्रेश झालो ..२:३० तास वेळ होता.
सुंदर विमानतळ अनि त्याहुन सुंदर तिथल्या मुली बघत गेट्वर आलो. पुढील विमान वेळेवर निघाले.आता माझी जागा खिड्कीजव़ळ होती.विमानाने टेक ऑफ घेतला....मी
खिड्कीतुन खाली बघितले .......बराच वेळ तो कापुस पींजल्यासारखा नजारा अन खाली नि़ळाशार समुद्र..कॅमेरा नसल्याची खंत वाटली. सवयीने परत ३-४ टिन बियर प्यायलो ,पोट्पुजा केली ...अन झोपी
गेलो..थोड्या वेळात जाग आली...बियरने आपली जात दाखवली......माझ्या शेजारी एक जर्मण माणुस अनि पलिकडे ब्रझिलियन बाई ...दोघांनी उठायच तेव्हा आमी १
नंबरला जाणार....एकदा दोनदा असं दर अर्ध्या तासाने ४-५ वेळा जाव लागले...१-२ वेळा हसुन मला जाऊ देणारे माझे शेजारी खाऊ की गिळू असे नजरेनेच सांगु लागले.आता मनाशिच ठरवले परत विमानात बियर प्यायची नाही.(फुकट आसली तरीही).
आताशा जरा बरे वाट्ले....विमान ३३००० फुटावरुन चालले होते...खिड्कीतुन खाली बघितले अजुनहि फक्त पाणीच दिसत होते.......दुरदुरपर्यंत जमीन दिसत नह्वती...
घड्याळात ३ वाजलेले......आत्तापर्यंत काहीसा बिनधास्त असलेला मी मनातुन घाबरलो....मनात अचानक विचाराच काहुर ऊठ्ले.......अन केव़ळ चॅट वरची ओळख असताना एका अनोळखी व्यकतीला भेटायला मी १७००० कि.मि.च्या प्रवासाला निघालो होतो....मला मी केलेल्या धाडसाची भीति वाटायला लागली...एकाही मित्राला माझ हे धाडस आवड्ल नव्हते......जवळजवळ सर्वांना खात्रिच होति की माझा पोपट
होणार........अचाऩक मला तिचा चेहरा आठवला .......माझा हरवलेला आत्मविश्वास परत आला....जरासा सावरलो ...जर ती भेटली तर तो माझ्यासाठी ए॓तिहसिक क्षण असणार होता.......मी मनातच त्या भेटीची ऊजळणी केली....अनि
शान्त चित्ताने एक झपकी मारली.....अनाऊन्समेंट झालि ..मला जाग आली.. काय बोलली ती बाई एक शब्दही समजला नाही..कुठ्ली भाशा आहे ते पण नाही समजल.६:३० वाजले होते ......१ तास बाकी होता.....फ्रेश झालो ......कॉफी घेतली .....कसलासा फॉर्म भरायला दिला अनो़ळखी भाशेत
.....पुन्हा शेजारी ऊपयोगी पडले.....जे जे त्यांनी सांगितले तसे डोके गहाण ठेवुन लिहिले. मला तर मी निरक्षर आहे असेच वाटले.......लॅडींगची सुचना झाली अनि विमान सुखरुप
उतरले......चालत चालत पुढे आलो.......ईथे एका सुंदर मुलीने हसुन स्वागत केले......दोन मधील एका रांगेकडे बोट दाखवले......एक रांग स्थानिक लोकांची अनि दुसरी आमची परप्रांतियांची
......पुढे आलो बॅग कुठे मीळतील हे विचारले ....समोरचा माणुस काय बोलला काहीच समजले नाही....जे माझ्या विमानातले प्रवासी होते त्यांच्या मागे चालु लागलो.एवढ्या गर्दीमधे मला बॅग सापडेल हे अशक्यच वाट्ले.१० मिनिटातच गुलाबि रंगाची रिबीण बांधलेली बॅग दिसली .......दोन्हि बॅग
घेतल्या .......लोकल फोनवर नंबर एडी चा मोबाईल नंबर फिरवला......फोनमधली बाई काय बोलत होती काहिच कळेणा.......रात्रिचे ९ वाजलेले.....१० वेळेला फोन लावला
असेल पण पलिकडुन ओळखीचा आवाज आला नाही...ए़का माणसाच्या हातात भारतिय पासपोर्ट पाहिला धावत जाऊण त्याला गाठ्ले.....त्याने टेलिफोन चे कार्ड घ्यायला सांगितले.मी त्याला मदतिची विनंति केली , त्याने कारण
सांगुन पोबारा केला....संपलं सगळं....शेवटी देवावर हवाला ठेवुण बाहेर जायचा निर्णय घेतला......कधी फारसा देवावर न विसंबणारा मी पण आठवतील तेवढ्या देवांची नावे घेत बाहेर आलो....समोर बरीच गर्दी दिसत होती .......जरा बाजुला होऊन शोधाव असा विचार आला ईतक्यात झपकन एक लाल टी शर्ट घातलेली आक्रुती आली .......मला काही कळायच्या आत त्या आक्रुतीने मला मीठी मारली अन मी भानावर येईपर्यंत तिने माझे चुंबनही घेतले होते.........होय ती एडीच
होती.....माझा २४ तास प्रवासाचा शिण नाहीसा झालेला.तिच्याकडे एकदा बघितले ...........आयुश्यात पहिल्यांदाच डोळ्यातुन आनंदाश्रु आले......बाहेर आलो चहा घेतला......हॉटेल शोधले ......११ वाजता रुममध्ये प्रवेश केला
......आंघोळ केली ........फ्रिजमधुन बीयर घेतली ...चकना बरोबर होताच......३-४ बीयर ओढ्ल्या....अन???? झोपी गेलो.....सकाळी उठुण साओ पावलो बघायचे होते.....
क्रमशः...........

.
.

.

प्रवासदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

चॅटवरच्या ओळखीवर ३ महिने फिरायला पार ब्रझील गाठलत :? बाबौ

पुढच्या वेळी जरा तुमच्या पावलांचा फोटु बी टाका. वंदन करीन म्हणतो.

+१
पावलात वहाणा असतील उत्तम. आपल्याकडे पावलाइतकेच वहाणांचे महत्व आहे!

(फक्त वहाणा नकोत! ते फार वेगळं असतंय!)

--असुर

विलासराव's picture

28 Jul 2010 - 11:25 pm | विलासराव

होय. हि कथा नाही . सत्यकथा आहे.

विलासराव's picture

29 Jul 2010 - 12:06 am | विलासराव

चॅटवरच्या ओळखीवर ३ महिने फिरायला पार ब्रझील गाठलत :? बाबौपुढच्या वेळी जरा तुमच्या पावलांचा फोटु बी टाका

लवकरच

छान रंगवून लिहीलाय प्रसंग. पुलेशु

विलासराव's picture

28 Jul 2010 - 11:28 pm | विलासराव

पहिलाच लेख.... आयुश्यातला........स्वानुभव लिहिलाय...जसाच्या तसा.....न रंगवता

मी-सौरभ's picture

28 Jul 2010 - 10:02 pm | मी-सौरभ

धन्य ते पोलिस......

विलासराव's picture

28 Jul 2010 - 11:30 pm | विलासराव

मला तर मी एखादा अतिरेकी आहे असेच वाट्ले तेंव्हा

पक्या's picture

28 Jul 2010 - 10:04 pm | पक्या

पहिला लेख असूनही चांगला जमलाय.

पहिला लेख असूनही चांगला जमलाय..............हात दुखताहेत लीहुन-लीहुन.............६-७ तास लागले......ईंग्रजी टाईप धड अन मराठीत लिहिलय.

पुष्करिणी's picture

28 Jul 2010 - 10:25 pm | पुष्करिणी

लेख चांगला जमलाय. पुलेशु.

हे जे काही तुम्ही वर लिहिलय ते खरंच खरं आहे का हो, म्हणजे ३ महिन्यांच्या आंतरजालीय ओळखीत तुम्ही एक्दम २ खंड ओलांडलेत. गणपा म्हणतात तसं माझाही तुमच्याप्रती आदर फारच वाढलाय..वंदनीय आहात. पुढील भागही टाका लवकर....
बाय द वे, तुमच्या मैत्रिणीची भारतभेट कधी?

अवांतरः माझा एक तेलगु मित्र आहे, तो गेले २-३ महिन्यांपासून असाच आंतर्जालीय ओळखीतून कोण्या एका रशियन मुलीच्या प्रेमात व्याकुळ आहे. त्याच्या आइवडिलांनी 'आमच्या घरात असली थेरं चालणार नाहीत' असं स्पष्ट शद्बात सांगितलय, रोज येउन रडतो. त्य दोघांनी एकमेकांना फोटोतही पाहिलेलं नाही. पण तो ती माझी 'सोलमेट' आहे असं सारखं म्हणतो. त्याला १ तासाभरापूर्वी मी तुमचा हा लेख (तुमच्या पूर्वपवानगीशिवाय, त्याबद्दल क्षमस्व) भाषांतर करून वाचून दाखवला...त्याला प्रचंड प्रेरणा मिळून त्यानं लगेच आइवडिलांना 'माझा-तुमचा संबंध संपला' असा फोन करून मॉस्को चं तिकीट बुक केलय ( तेही वन वे च )...आता तो गंडला या प्रकरणात तर तुमचा लेख्च जबाब्दार ( आणि वाचून दाखवणारी मी )

पक्या's picture

28 Jul 2010 - 10:33 pm | पक्या

>>'माझा-तुमचा संबंध संपला' असा फोन करून मॉस्को चं तिकीट बुक केलय ( तेही वन वे च )...आता तो गंडला या प्रकरणात तर तुमचा लेख्च जबाब्दार ( आणि वाचून दाखवणारी मी )

तुम्ही पण हे खरं खरं लिहीलयं का?
विसा असेल तर टिकीट बुक करण्यात अर्थ आहे. शिवाय विजीटर विसा असताना वन वे टिकीट असेल तर एअरपोर्ट वरून बाहेर पण जाऊ देणार नाहीत.

पुष्करिणी's picture

28 Jul 2010 - 10:46 pm | पुष्करिणी

त्याच्या कंपनीची १ ब्रँच आहे तिकडे, त्यामुळे व्हिसा आहे...
त्याला तसं कळवलं आत्ताच मी परतीच्या तिकीटाबद्दल, लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद.

कुठं सैबेरियाच्या तुरूंगात वगैरे टाकलं तर व्हायची की पंचाइत...

आणि हो, हे खरं आहे...आणि तोच तर प्रॉब्लेम आहे

मेलो मेलो अगे पुष्करणे काय केलस हे पोराला आई बाबा पसुन तोडलस???
कुठे फेडशील हे पाप ;)

(कृपया हलके घेणे.
आज हे मिपाकर हसवुन हसवुन ठार मारणारेत =)) ) :)

पुष्करिणी's picture

28 Jul 2010 - 10:50 pm | पुष्करिणी

तो हातीपायी धड परत आला तर आइवडिलांना शांत करता येइल...पण गंडला तर माझं काही खरं नाहीये....
पण मेन कल्प्रिट इज विलासराव.

इतक्या बिकट प्रसंगी हसताय काय गणपा :)

थापा मारायच्याच तर पचतील अशा तरी माराव्यात.
लगेच ति़कीट काय बुक केले? वन वे टिकीट काय? आणी एकमेकांचा फोटो ही पाहिलेला नाही. गुड गुड, व्हेरी गुड.

Nile's picture

29 Jul 2010 - 6:44 am | Nile

अपचन झाले असेल तर अंमळ इनो घ्या बरे वाटेल.

अपचन व्हायला आधी पोटात तर गेले पाहिजे ना? गळीच उतरत नाहीये तर अपचन तरी कसे होईल?

योगी९००'s picture

29 Jul 2010 - 3:00 pm | योगी९००

पक्या.. तुमच्याशी सहमत..

अपचन व्हायला आधी पोटात तर गेले पाहिजे ना? गळीच उतरत नाहीये तर अपचन तरी कसे होईल?


एकदम बरोबर..

पुष्करिणी हे १००% खरंच खरं.
म्हणजे ३ महिन्यांच्या आंतरजालीय ओळखीत तुम्ही एक्दम २ खंड ओलांडलेत
१ वर्शाची ओळख होती.......३ महिन्याचा विजा होता.....७० दिवस राहिलो तिकडे..
बाय द वे, तुमच्या मैत्रिणीची भारतभेट कधी?
पुढ्च्या वर्शी
आता तो गंडला या प्रकरणात तर तुमचा लेख्च जबाब्दार ( आणि वाचून दाखवणारी मी )
जबाब्दार!!!!!!! मी नक्कीच नाही

पुष्करिणी's picture

28 Jul 2010 - 11:50 pm | पुष्करिणी

ग्रेट...
अशी जबाबदारी झटकता येणार नाही तुम्हांला!!!
आणि जर माझ्या मित्त्राच्या गोष्टीचा तुमच्यासारखा सुखांत झाला तर क्रेडीटही मिळेल की तुम्हांला...

प्रभो's picture

28 Jul 2010 - 11:52 pm | प्रभो

ओ, हा पहिलाच लेख आहे त्यांचा...अंत बिंत काही केला नाहीये त्यांनी.. ;)

पुष्करिणी's picture

29 Jul 2010 - 12:02 am | पुष्करिणी

त्यांच्या स्टोरीचा ( फक्त लेख नाही, रिअल वन ) सुखांत्च होइल असं म्हणतेय हो.., आख्खे ७० दिवस राहून आलेत...

अरे लेका प्रभ्या तुला इतकेपण कळु नये???

तो मित्र म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसुन खुद्द पुष्करणी काकुच लेका.

कथानकात "पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत" वगैरे लिहतात तसे.

काकु टेंशन घेउ नका हो, पन १.२ बिलीयन लोक सोडुन तिकडे सायबेरीत काय कडमडायचं ?? असो असो, शुभेच्छाच हं. ;-) बाकी तिकडचे जंगल जगातील सर्वात मोठे की काय असे वाचले होते ब्वॉ, फोटु पाठवालच.

-इजिप्तशियन

मी-सौरभ's picture

29 Jul 2010 - 12:04 am | मी-सौरभ

देव तुमच्या मित्राच भलं करो.....

>>>त्य दोघांनी एकमेकांना फोटोतही पाहिलेलं नाही.

ती नक्की मुलगी आहे हे कशावरुन?????

पुष्करिणी's picture

29 Jul 2010 - 12:08 am | पुष्करिणी

ते महत्वाचं नाही, सोलमेट आहे असं वाटतं त्याला...मग हे प्रश्न विचारून काहीही फरक पडत नाही . असले सगळे फुटकळ प्रश्न मी विचारून झालेत आधीच..

मी-सौरभ's picture

29 Jul 2010 - 10:09 am | मी-सौरभ

मग काय चालु द्या.....

जसं काय तुम्ही बंद करा म्हणल्यावर थांबणारच आहे.

रेवती's picture

29 Jul 2010 - 7:07 am | रेवती

काय म्हणता पुष्करिणी ताई?
त्या मित्रानं आता सुखरूप परत यावं म्हणजे झालं.
तुम्ही ग्रेट!

लेखन-प्रामाणिकता आवडली ...आणी एका अतिप्रसंगाचीही आठवण झाली.

एक मित्राची अशीच ओळख झाली फोनवर .. हा कॉलसेंटरला..ती बि.एस.एन.एल.ची गिर्‍हाईक होती.ओळखीच प्रेमात रुपांतर झाल..ते काय सोलमेट वगैरै..शेवटी आम्ही (पक्षी: मी व माझा मित्र) तिला भेटायाला मुंबईला गेलो...ती भलतीच रुपवान निघाली.ह्या गरीबाला जरास टक्कल पडलय ..थोड्स पोटही वाढलय ...तासभर "गेट-वे" ला फिरुन झाल्यावर तिने चक्क पुढे संबध ठेवण्यास नकार दिला...तिच कारण होत अपेक्षाभंग ...म्हणे थोडाफार तरी दिसायला स्मार्ट असतास तर...

शिल्पा ब's picture

28 Jul 2010 - 10:43 pm | शिल्पा ब

च्यामारी!!!! भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं...असो, छान लिहिलंय.

छोटा डॉन's picture

28 Jul 2010 - 11:01 pm | छोटा डॉन

>>भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं...असो, छान लिहिलंय.
+१, असेच म्हणतो.
मनमोकळा लिहलेला प्रामाणिक लेख आवडला, असेच अजुन पुढचे अनुभव येऊद्यात ( म्हणजे आमच्यासमोर तुमच्या लिखाणाद्वारे येऊद्यात ) ;)

अवांतर :
पुष्करिणीच्या 'समोपदेशना'ची गंमत वाटली.
आमचीही एक जर्मन मैत्रिण आहे ( फक्त हे स्वातीताईला सांगु नकात ), बघु मुड आला तर पुष्करिणीचा सल्ला घ्यावा म्हणतो खरड / व्यनीतुन ;)
( पळा बाबा आता लोक हाणायच्या आत ... )

पुष्करिणी's picture

28 Jul 2010 - 11:37 pm | पुष्करिणी

मी त्याला धीर वगैरे द्यायला गेले होते, करेंगे या मरेंगे या स्टाइलनं एकदम 'दिलवाले दुल्लनिया ल्ये आयेंगे' असं हिंदीतल पहिलं-वहिलं वाक्यही उच्चारलं त्यानं. एका लेखाचा काय परिणाम होउ शकतो हे आज कळलं मला...
डॉनराव, नुसतं मैत्रिण वगैरे नाही चालत...सो-ल-मे-ट ( आणि हा/ही एकावेळी एकच असते :) ) आहे असं वाटतं का...?? :)

लोक आजकाल फारच सोलमेट सोलमेट करतात...काय असतं हे सोलमेट ? आम्ही तर फारसा काही विचार न करताच लग्न करून टाकलं...कसला सोल अन कशाचं मेट...

मी-सौरभ's picture

29 Jul 2010 - 12:01 am | मी-सौरभ

जिच्या सँडल च 'सोल' गालावर भेटल (met) तिला 'सोलमेट' म्हणत असतील का??

विलासराव's picture

28 Jul 2010 - 11:56 pm | विलासराव

>>भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं.
१ वर्श कॅमेरा टु कॅमेरा चॅट ओळख होती
मनमोकळा लिहलेला प्रामाणिक लेख आवडला, असेच अजुन पुढचे अनुभव येऊद्यात ( म्हणजे आमच्यासमोर तुमच्या लिखाणाद्वारे येऊद्यात ) ;)
जमेल तस लिहितोच .....बरेच अनुभव आहेत

आमचीही एक जर्मन मैत्रिण आहे ( फक्त हे स्वातीताईला सांगु नकात ), बघु मुड आला तर पुष्करिणीचा सल्ला घ्यावा म्हणतो खरड / व्यनीतुन ;)

डानराव तिने तुम्हाला पहिलेलं नाही म्हणता? मग चानस आहे तुम्हाला .

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jul 2010 - 12:39 pm | ब्रिटिश टिंग्या

हलकटाधीश नायल्याचा विजय असो! :)

च्यामारी!!!! भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं.
मला आता आश्चर्य वाट्तेय...जाऊन आल्यावर
बहाद्दर वगैरे काही नाही हो

शाहरुख's picture

28 Jul 2010 - 11:36 pm | शाहरुख

कडक ! लिव्हा अजून..

टिउ's picture

29 Jul 2010 - 12:02 am | टिउ

लिहाच! तुमचा लेख वाचुन मिसळपावचं रुप बदलल्याची खात्री झाली... :-)

बाकी तुमच्या हिमतीचं कौतुक वाटतं आणी अनुभव इथे मांडण्याच्या धाडसाचंही...तुम्ही बिनधास्त लिहा. इथे सगळे आपलेच आहेत. :-)

आम्हीही एकदा गेलो होतो एकदा असेच चॅटवरच्या मयतरणीला भेटायला हैदराबादला, तेही दोघेजण! :D घरी न सांगता. भव्य पोपट झाला होता. मग तिरूपती वगैरे फिरून आलो. म्हटलं चला द्येवीने कल्टी दिलीये तर द्येवाला शरण जाऊ! ;) घरी आईने दुर्गादेवीचा अवतार धारण केला असणार याची कल्पना असल्याने सेफसाईड म्हणून मुंडन वगैरे सुद्धा केलं. घरी पोचल्यावर, मला दारात बघितल्या बघितल्या मी शूज काढतो म्हणेपर्यंत आई पदर कमरेला खोचून हातात झाडू घेऊन 'रेडी' पोझिशनमध्ये उभी होती. पण माझ्या डोक्यावरचं साफ मैदान बघून आणि हातावर प्रसादाचा लाडू ठेवल्यावरच वातावरण निवळलं! ;)

बाकी पुष्करिणीकाकू, सध्या एक ग्रीक पोरगी आवल्डीये! सल्लामसलत करावी म्हणतो! ;)

राणीच्या देशातल्या 'त्या' पोरीचं काय रे???

अरे वेगवेगळ्या देशांतील भाषा शिकाव्यात, तिथली संस्कृती जाणून घ्यावी असा उदात्त हेतू आहे यामागे! ;) आज ग्रीस, उद्या फ्रान्स, परवा जर्मनी, मग इटली, हॉलंड, स्वित्झर्लंड वगैरे वगैरे! :D असं करता करता कधी 'सोलमेट' मिळून आम्ही 'चेकमेट' झालो तर तो बोनसच रे! ;)

म्हणजे थोडक्यात हे कार्कक्रम करून या क्रमाने दिवाळखोरीत निघालेल्या युरोपियन देशांना 'अर्थपुरवठा' करतोय तर तू..........

पर्यटन करून .. ;)

Nile's picture

29 Jul 2010 - 2:11 am | Nile

असं करता करता कधी 'सोलमेट' मिळून आम्ही 'चेकमेट' झालो तर तो बोनसच रे!

अरे रे, काय बिघडलेली पीढी आहे, सोलमेट काय चेकमेट काय?

सोल काय चेक काय, मेट करण्यास इतके हावरट आधी कुठेही पाहिले नाहीत हो.

मेघवेडा's picture

29 Jul 2010 - 2:14 am | मेघवेडा

आपला दृष्टीकोन पाहून आपण 'स्टेलमेट' होणार असे वाटते!

आम्ही अजुन मेट नाही सद्ध्या फक्त डेट. ;-)

राजेश घासकडवी's picture

30 Jul 2010 - 1:25 am | राजेश घासकडवी

मग का तक्रार करतो आहेस? ;)
अरे हे डोळामारू स्मायली चालू करा ना बाबांनो...

मेवे, हे कसले उद्योग चाललेत तुझे?
तुला 'कानसेन' खेळत ठेवला पाहिजे म्हणजे असं कुणाला भेटायला जायचा नाहीस.
आई पदर कमरेला खोचून हातात झाडू घेऊन 'रेडी' पोझिशनमध्ये उभी
अगदी डोळ्यासमोर चित्र आलं म्हणेनास का?;)

उद्योग कसले रेवतीतै, प्रभ्या म्हणतो त्याप्रमाणे बुडीत राष्ट्रांना अर्थपुरवठा! ;)

योगी९००'s picture

29 Jul 2010 - 3:05 pm | योगी९००

तिरुपतीला गेल्यावर केस कापून आला...

ग्रीक ला जाऊन आल्यावर काय कापणार..??

तिरुपतीला गेल्यावर केस कापून आला...

ग्रीक ला जाऊन आल्यावर काय कापणार..??

तरी बरं तो साउदीला नाही निघाला ;)
नायतर काही खरं नव्हतं

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jul 2010 - 10:22 am | llपुण्याचे पेशवेll

तरी बरं तो साउदीला नाही निघाला ;)
नायतर काही खरं नव्हतं

=)) =)) =))

नंदू's picture

29 Jul 2010 - 7:24 pm | नंदू

पुष्करिणीकाकूंशी कसली सल्लमसलत करताय, ओक साहेबांशी करा. हल्ली तिथे लोक नाडी बघायला लगलेत म्हणे. विशेषतः स्त्रिया.

पुष्करिणीकाकूंशी कसली सल्लमसलत करताय, ओक साहेबांशी करा. हल्ली तिथे लोक नाडी बघायला लगलेत म्हणे. विशेषतः स्त्रिया.

रेवती's picture

29 Jul 2010 - 7:11 am | रेवती

वि. रा. तुमचे लेखन अगदी प्रमाणिक!
लगे रहो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2010 - 7:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रामाणिक अनुभवकथन आवडले.......!

-दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन's picture

29 Jul 2010 - 7:30 am | नगरीनिरंजन

ब्राझीलमदी काय्काय जाहालं ते वाचायला उतावळा जाहालोय.. तुमी नस्लेले फोटुपन लावा की.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2010 - 10:50 am | llपुण्याचे पेशवेll

छान लेखन आवडले. पहिल्या परदेश प्रवासाची मजा काही औरच असते. तेही जर पहीला प्रवास विमानाने प्रथमच होत असेल तर अजून मजा. मुंबई विमानतळावर बॅगा प्लास्टीक रॅप करणार्‍यानी पहील्यांदा जाम चूना लावला होता मला. ६०० रु. :( सांगितलं की रॅपिंग कंपल्सरी असतं म्हणे. आणि पैसे किती तर एका बॅगेचे ३००. आणि आम्ही पण लई हुषार आता विमानतळावरून आत गेल्यावर कशाला लागताहेत भारतीय पैसे, जवळ फॉरेक्स आहेच म्हणून सगळे पैसे वडिलांच्या हवाली करून आलो होतो. फक्त ५०० रु होते जवळ. आणि हे पळत पळत बाहेर गेलो आणि ५००० रु वडिलांकडून घेऊन ठेवले. बरं वडील थांबले होते बाहेरच म्हणून. हुश्श. वाचलो.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jul 2010 - 12:37 pm | ब्रिटिश टिंग्या

हे पेशवे अंमळ येडेच आहेत!

पुणेरी लोकांना मुंबईचे लोक कसे बरोबर गंडवतात ना!

(महानगरी)

मलाही ऑफीसर पैश्यासाठी त्रास देत आहेत असेच वाट्ले.त्यानी मागीतले तर नाहीत...जाम वैतागलो होतो पण चेहरा निर्विकार ठेवला आणी सुट्लो.......

अर्धवट's picture

29 Jul 2010 - 7:59 pm | अर्धवट

पुप्या... हो रे.. कालच मुंबै विमानतळावर एका जोडप्याला तो कार्यकर्ता सांगत होता कंपल्सरी कंपल्सरी.. म्हणुन.. ती दोघं दिसायला येकदम देशी आणि साधीसुधी होती.. असं गंडवतात होय!! (मग तुला कसं गंडवलं राव.. तुला ल्येका आंधळा पण साधासुधा म्हणणार नाही..)

बरं झालं सांगितलस..आता पुढच्या वेळेला सांगेन मी कुणाला परत गंडवताना दिसले तर

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jul 2010 - 6:15 pm | ब्रिटिश टिंग्या

>>कालच मुंबै विमानतळावर एका जोडप्याला तो कार्यकर्ता सांगत होता

कार्यकर्ता ना? मग गंडवणारच तो!

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 7:56 am | आमोद शिंदे

विलासराव तुमची ही प्रेमकहाणी एखाद्या सिनेमाला लाजवील अशी आहे. वाचून थक्क झालो.

बायदवे,
>>सवयीने परत ३-४ टिन बियर प्यायलो ,पोट्पुजा केली ...अन झोपी
३-४ कॅन बियर प्यायला देणारी ही एयरलाईन कोणती?
की तिथेही एखादी हवाईसुंदरी पटवली होतीत? ;)

विलासराव's picture

7 Aug 2010 - 9:53 am | विलासराव

३-४ कॅन बियर प्यायला देणारी ही एयरलाईन कोणती?
दोन त्यांनि दिल्या. दोन स्वत: जाउन विनंति करुन घेतल्या.
३-४ कॅन बियर प्यायला देणारी ही एयरलाईन कोणती?
फ्रान्स एयरलाईन.
की तिथेही एखादी हवाईसुंदरी पटवली होतीत?
काहीतरीच काय, एडि ऐकेल ना !!!!!!!!

जुलाई २०१० ची ही लेखमाला आज १४ वर्षांनंतर वाचायला घेतली आहे. सुरुवातच इतकी उत्कठावर्धक आहे की आता सगळे भाग वाचल्याखेरीज चैन पडणार नाही.
त्याकाळचे बहुतांश प्रतिसादक आता का बरे मिपावर येत नाहीत ?

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2024 - 5:49 pm | चौथा कोनाडा

दीड दशक गेले .... फेसबुक आले, कायप्पा आले... कुर्रुम कुर्रुम व्हिडीओ / क्लिप्स / रील्स अशी उदंड नेत्रसुख हातातल्या खेळण्यात आले .. त्यामुळे आता लोक मिपावर रमत नाहीत .. आता चर्चा करायला आवडत नाही .. तिथं फक्त लाईक, बदाम दिले की झाले ! सगळे कसे झटपट ... सगळं अल्पायुषी .. आनंद, जल्लोष दीड दिवस, दु:ख एक दिवस, सनसनाटी .. अर्धा दिवस !

गेले ते मिपादिन गेले !

आलो आलो's picture

9 Jul 2024 - 11:26 am | आलो आलो

खूपच छान आणि उत्कंठावर्धक लेखमालेह धागा वर काढल्याबद्दल चित्रगुप्तजी आपले अनेक अनेक धन्यवाद .
लेखकांनी मात्र कमालच केलीये राव .... एव्हढा बिनधास्तपणा ? वाह रे पट्ठ्या !

पण भन्नाट आहे. लाल शर्ट घातलेली आकॄती चक्क चुंबन देते, ते ही भानावर यायच्या आत.
खरं आणि मनापासून लिहीलं असावं असं वाटतंय. विमानातले अनुभव डोळ्यासमोर उभे राहतात.
धन्यवाद चित्रगुप्त.
तीन महिने सुट्टी काढणार्‍यांना भारतात तरी वेड्यात काढतात. पण विलासराव नशीबवान आहेत असं वाटतंय.
मजा येतीय वाचायला. कुर्रुम कुर्रुम व्हिडीओ / क्लिप्स / रील्स अशी उदंड नेत्रसुखं बरोबर असूनही हा लेख वाचायला जास्त मजा येतीय.