आमची पहिली परदेशवारी....४

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
31 Jul 2010 - 6:25 pm

भाग-१ http://www.misalpav.com/node/13410
भाग-२ http://www.misalpav.com/node/13436
भाग-३ http://www.misalpav.com/node/13450
नमस्कार मंडळी ,

काल रात्री आमच्या घराजवळील एका पार्कमध्ये गेलो होतो सहज आपला शतपावली करावी म्हणून .साधारण आठ- साडेआठ च्या सुमारास. प्रशस्त अशी हि बाग. प्रवेश केल्यावर डाव्या हाताला लहान मुलांना खेळण्यासाठी खास विभाग होता . झोपाळे, घसरगुंडी आणखीही विविध प्रकारच्या सुविधा होत्या. त्या लहानग्यांचे तर्हेतर्हेचे रंगीबेरंगी कपडे ,त्यांचा तो गुलाबी असा वर्ण आणि त्यांची ती चाललेली मस्ती पाहून मला आपल्या लहानपणाची आठवण झाली. मला तर ती सगळी खेळण्यातली असल्यासारखीच वाटत होती. थोडेसे पुढे गेल्यावर एक फुटबाल मैदान,तिथे काही लहानमोठी मुले फुटबाल खेळण्यात दंग झालेली, उजवीकडे पार्कच्या मधोमध एक कारंजे त्यावर सोडलेल्या रंगीबेरंगी प्रकाशझोतामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोठमोठी झाडे हि बाग बरीच जुनी असल्याची साक्ष देत होते. जागोजागी बसण्यासाठी बाक होते आणि त्यावर आपल्याच विश्वात रममाण झालेले तरुण-तरुणी, काही म्हातारे लोक बसले होते. पायपीट करणारया लोकांसाठी पायवाटही होती. दुसर्या बाजूला एक छोटेशे स्टेज होते त्यावर काही मुलांचा नाचण्याचा सराव चाललेला होता समोर प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था होती. एका कोपऱ्यामध्ये जोरदार संगीताचा आवाज येत होता. आपोआपच पाय तिकडे वळले. तो एक प्रशस्त असा बार होता मध्यभागी टेबल मांडलेले , एका बाजूला त्याचं किचन आणि दुसर्या बाजूस मोठमोठे स्पीकर्स वाजत होते. एक मनुष्य गात होता आणि एका बाजूस बरेचसे लोक नाच करत होते.आणि त्यामध्ये १०-१२ जोडपी हि म्हातारी होती.मला थोडीशी गम्मत वाटली. आम्ही तेथेच हिरवळीवर बसलो आणि त्या मैफिलीचा आस्वाद घेतला. मुले मोठी झाल्यावर दुसरीकडे राहतात आणि हे वयोवृद्ध लोक असे आपल्याच मस्तीत जगतात. साठ आणि सत्तरीच्या पुढील हि माणसे न संकोचता एकमेकांच्या मिठीत संथपणे नाचण्यात मग्न होती. मला तर त्यांचा हेवा वाटला.कुणालाही गाणे गायचे असल्यास परवानगी होती.एडीने माझ्याकडे नाचण्याचा हट्ट धरला, मला नाचता येत नाही हे माहित असूनही. तिच्या आग्रहाखातर मी तयार झालो. इथे मात्र ते लोक आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते, कुणी माझ्या नाचण्याला हसतही होते.यापूर्वी कधीही न केलेली माझी नाचण्याची हौस अशा रीतीने पूर्ण झाली.

आज सकाळीच एडीची मैत्रीण पावला (ANA PAULA) घरी हजर झाली. खरतर ती मला पाहायला आली होती. एडीच्या सर्व मैत्रिणींप्रमाणे पावलाचाही मी ब्राझीलला येईल यावर विश्वास नव्हता. तिने एडीला तसे बोलून दाखवलेही होते तरीही एडीची जवळची मैत्रीण असल्याने ती घरी आली होती. एडीने माझी ओळख करून दिली. पावलाने एडीला विचारायचे एडीने मला सांगायचे, माझे उत्त्तर परत एडीने पावलाला भाषांतर करून सांगायचे. अशा खेळातच एडीने तिला लंचसाठी आग्रह केला. एडी किचनमध्ये आणि मी हिच्याबरोबर काय बोलणार.पण एडीने हा प्रश्न लीलया सोडवला.तिने आम्हाला बियर सर्व्ह केली आणि ती किचनमध्ये निघून गेली (एडी घेत नाही). मी रोज पिणारा माणूस पण थोडासा नर्व्हस झालो. तिनेच चियर्स केले आणि आमची पार्टी सुरु झाली.ब्राझीलची बियर आणि भारतीय चकना आणि तेही एका परदेशी मुलीबरोबर. मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटला. मधेच एडीने LAPTOP आणून दिला आणि माझा प्रोब्लेम सुटला. मी तिला माझे भारतातील भटकंतीचे फोटो दाखवले. तिनेही खुणेनेच त्यावर प्रतिक्रिया दिल्या.एडीने पावलाला इंडिअन पदार्थ खायला दिले.काजू ,बदाम तर ठीक पण फरसाण खाल्यावर तर तिची एकदम हवाच निघून गेली. तिच्या डोळ्यात पाणीच आले .साधारण तिखट असलेले ते फरसाण आपल्याकडे लहान मुले हसत खातात ते तिला खूपच तिखट लागले.तिला नॉर्मल व्ह्यायला १० मिनिटे गेली. एडीने तर कधीच त्याला हातही लावला नाही. असे हे ब्रज़िलिअन लोक तिखट जवळजवळ खातच नाहीत म्हणाले तरी चालेल.नंतर आम्ही यथासांग पेटपूजा केली. पावला गेली आणि आम्ही आवरून बाहेर पडलो ते बीचवर जाण्यासाठी.

मी, एडी आणि जुनिअर ( एडीच्या मैत्रिणीचा मुलगा हा माझा चांगला मित्र झाला ). कारण तो माझ्याशी बोलू शकत होता. नाही- नाही, त्याला इंग्लिश फारसे येत नव्हते पण तो पीसीवर गुगल वर पोर्तुगीज-इंग्लिश वापरून माझ्याशी गप्पा मारायचा. १२ वर्षाचा मुलगा खूपच सालस आणि शांत स्वभावाचा आहे.पुढे बर्याच वेळेस आम्ही त्याला आमच्याबरोबर नेत असू .आम्ही तिघे भर दुपारी एका बीचवर गेलो. बीचचे नाव होते प्राया दो कान्ता .एका बाजूला उंचउंच इमारती ,आणि समोर पसरलेला निळा समुद्र असा हा सुंदर बीच. जास्त लिहित बसत नाही. खाली फोटोच देतो. अनीत चारच्या सुमारास परत एका दुसर्या बीचवर गेलो त्याचे नाव इला दे बोई.आतापर्यंत मीही बर्मुडा वापरायला सरावलो होतो आणि बरीच भटकंती बर्मुडा घालूनच केली.

क्रमश:

हे फोटो:-
1
2
3

5






प्रवासदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

31 Jul 2010 - 6:33 pm | इंटरनेटस्नेही

छान!

तुमची आणि त्या मुलाची चांगलीच गट्टी जमलेली दिसते.
प्राया दो कान्ता
हा हा हा!
मजेशीर नाव!

वरुन चौथा फोटो पाहून अक्कलकोटचे कुठले तरी एक बाबा आहेत त्यांची आठवण झाली :)
भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण तुमच्याच पाठीशी काय आहे?? ;)

मस्त होतेय लिखाणं.
औरभी आंदो.

मी-सौरभ's picture

2 Aug 2010 - 12:56 am | मी-सौरभ

मस्त जमतयं....

लिखाण आणि अनुभव मस्त आहे दोन्ही. वाचायला मजा येतेय.
एकच सांगावेसे वाटते...उघडेबंब आणि त्यात पोट सुटलेले असे फोटो बघायला बरोबर वाटत नाही. फोटो टाकताना थोडंस तारतम्य बाळगून टाकले तर बरं.
ही खरोखर वैयक्तिक चिखलफेक नाही ..एक मित्रत्वाचा सल्ला समजा. (शरीर बेढब करण्यास बियरचा अतिरेक कारणीभूत आहे.)

विलासराव's picture

2 Aug 2010 - 1:15 pm | विलासराव

एक मित्रत्वाचा सल्ला समजा
सल्ला पटला. सबब परत अशी चुक होनार नाही.स्व संपादनाचे अधिकार नाहि आहेत. तरि सम्पादक मंडळाने ते फोटो काढुन टाकावेत ही विनंती.
धन्यवाद!!!!!!!!

संजय क्षीरसागर's picture

6 Sep 2013 - 7:56 am | संजय क्षीरसागर

या लेखमालेतल्या बर्‍याच लेखांवर फोटो दिसत नाहीत. संबंधितांनी लक्ष घालावे अशी विनंती.

बाय द वे, विलासराव, रंगानं दिलेल्या लिंकमुळे इथे आलो. लै भारी साहस केलंय!

सुहासदवन's picture

6 Sep 2013 - 9:25 am | सुहासदवन

मला एकही फोटो दिसत नाही काय करावे लागेल!

राघवेंद्र's picture

6 Sep 2013 - 7:15 pm | राघवेंद्र

मलापण एकही फोटो दिसत नाही काय करावे लागेल ???

संजय क्षीरसागर's picture

7 Sep 2013 - 9:36 am | संजय क्षीरसागर

बघता येईल का?