आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
5 Jul 2010 - 9:52 am

कैफात काजव्यांची...

परवा संध्याकाळी गाडीतून घरी जाताना मुलाने म्हंटलं, "बाबा, ए सी बंद करा, जरा खिडक्या उघडून नॅचरल हवा घेऊयात, नाहीतरी हायवेतून एक्झिट घेतलंय, तेंव्हा स्पीड कमी म्हणजे वाराही कमीच आहे."

मी हो म्हणत काचा खाली केल्या. आठ वाजून गेले असल्याने आजूबाजूला गाड्या कमी असल्या तरी एकदम आवाजाची लेव्हल वाढली, आणि अचानक लक्षात आलं की आपण मेट्रो रेल च्या पूलाखालून चाललोय. स्टेशन जवळ येत असल्याने मेट्रोचा वेग कमी होत आलेला, आणि तिचा ठेक्यात असलेला चाकांचा आवाज ऐकून मन एकदम कित्येक वर्षं मागे गेलं:

*****************

अशीच पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकडून खोपोली घाटातून खंडाळ्याकडे निघालेली सह्याद्री एक्स्प्रेस, असंच अंधारून आलेलं, आणि असाच मंकी हिल कडे जाताना वेग कमी होत असतांनाचा चाकांचा लयबद्द आवाज.

मी आणि माझी पत्नी, उघड्या दारात पेपर खाली घालून बसलेले सोमवार-ते-शुक्रवार नेहेमीचे आम्ही दोघे प्रवासी, उजवीकडे बसलेल्या तिने माझा डावा हात आपल्या दोन्ही तळव्यांत धरलेला, आणि माझा उजवा हात मी protectively तिच्यापुढून दाराच्या खांबाला धरलेला. दरीत दूरवर साठलेल्या पाण्यात प्रतिबिंबीत झालेली खोपोलीच्या दिव्यांची दिवाळी...

दूरवर पहात आम्ही भविष्याच्या अस्थिरतेविषयी बोलत होतो, आणि अचानक ती म्हणाली, "ते बघ, कितीतरी काजवे चमकतायत!"

खरंच की, एकदम लक्षावधी इवल्याश्या दिव्यांची मनमोहक उघडझाप गाडीच्या बरोबरीने वाटचाल करीत होती! ते गाडीचं लयबद्द चालणं, ते काजवे, आणि सोबतीला सखी, ...सगळ्या काळज्या विसरून, मला आणि तिला एकदमच पाडगावकर आणि अरूण दात्यांचं गाणं आठवलं:

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन पालखी निघाली

broken image

*****

असं या ट्रॅक वरून त्या ट्रॅक वर घसरण्याची, seemingly unrelated गोष्टी जुळवण्याची, माझी सवय इथल्या माझ्या 'एअरपोर्ट' या कथेचं वाचन केलेल्या आणि गाण्यांविषयीच्या या लेखावरून काही वाचकांना माहिती असेल (अशा सवयीला काही जण 'सूतावरून स्वर्गाला जाण्याची सवय' म्हणतात, म्हणोत बापडे!) पण अशा associative memory चं अस्तित्व तुमच्यापैकीही बर्‍याच जणांना केंव्हा न केंव्हा नक्कीच जाणवलं असावं असं मला वाटतं.

तर अशा associative memory चा अनुभव घेऊन आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून (कधी कधी चुकून कानी पडलेल्या अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरूनही) पटवतो. आमच्याकडे तर लांबच्या सफरीला गाडीतून निघालो की असा खेळच चालतो कधीकधी, फक्त एक मुखड्याचा तुकडा सीडी वरून ऐकू द्यायचा, आणि मग शब्द सुरू व्हायच्या आत गाणं कोणतं आहे ते ओळखायचं.

तर म्हंटलं आपण इथे असाच खेळ खेळू या:

जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.

माझा असा अंदाज आहे की इतके पट्टीचे कानसेन इथे आहेत (तात्या, देव साहेब, टारझन, धनंजय, विंजिनेर, नंदन, मुक्तसुनीत, अदिती, सहज, प्राजू, वगैरे वगैरे, just to name a very very few) की त्यामुळे उत्तरं बहुतेक पहिल्या आठ (८) तासांत सहज यावीत. या वेळात ती नाहीच आली तर मी शक्यतो स्वतः असे दुवे देईन.

अर्थात्, अशी गाणी ओळखतांना त्यांमागील काही रोचक (आणि उघडपणे share करण्यासारख्या!) आठवणी सांगता आल्या तर दुधात साखर!

***********************
कानसेन क्रमांक १: सहज
कानसेन क्रमांक २: -----------
कानसेन क्रमांक ३: मराठी_माणूस
कानसेन क्रमांक ४:मिलिंद
कानसेन क्रमांक ५: मेघवेडा
कानसेन क्रमांक ६: हुप्प्या
कानसेन क्रमांक ७: पुन्हा एकदा: सहज
कानसेन क्रमांक ८: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक ९: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक १०: मिसळपाव
कानसेन क्रमांक ११: विसूनाना
कानसेन क्रमांक १२: क्रान्ति
कानसेन क्रमांक १३: प्रभो
कानसेन क्रमांक १४: शुचि
संयुक्त कानसेन क्रमांक १५: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १६: मिसळपाव

************************

चला तर, करू या सुरूवात, प्रथम या सोप्या सुरावटीने, [सवलतीसाठी एक ओळखीची खूण: मराठी गाणं आहे]

broken image

And your time starts, NOW!

मौजमजाचित्रपटप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

5 Jul 2010 - 10:21 am | सहज

सिनेमा घरकुल. संगीतकार अण्णासाहेब चितळकर

बाकी लेख आवडला हे.वे.सां.न्.ल पण खरच हे रिलेट करणे, आठवणे सोडून दिले आहे. हे आठवले ते असेच घट्ट बसल्याने असावे. अर्थात जर बरोबर ओळखले असल्यास. :-)

टारझन's picture

5 Jul 2010 - 10:23 am | टारझन

आधी फोटु पाहिला !! १००% खोपोली दिसत्ये म्हंटलं , लेख वाचला .. कनफर्म झालं... आणि टारझन हसला :)

छोटेखाणी लेखण मस्त !! बाकी गाण्यांच्या बाबतीत आम्ही मागासवर्गीय :)

- लँबॉर्गिनी

राजेश घासकडवी's picture

5 Jul 2010 - 10:26 am | राजेश घासकडवी
बहुगुणी's picture

5 Jul 2010 - 7:32 pm | बहुगुणी

सहज रावांनी काही मिनिटांतच फडशा पाडला या गाण्याचा!

ओळखलं बरोबर. पण नुसतं ओळखून भागणार नव्हतं, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही दुवे द्यायचे होते.

गाण्याचे शब्द आणि इतर माहिती इथे

आणि ऑडिओ इथे:

घासकडवींनीही नंतर गाणं ओळखलं. पहिल्या राऊंडचे कानसेन अर्थात्, "सहज"!


आता पुढचं कोडं, अत्यंत सोपं आव्हान, क्रमांक २
:

"

दुसर्‍या गाण्याच्या मुखड्याच्या वरील सुरावटीवरून उत्तर आलेलं अजून तरी दिसलं नाही म्हणून खाली उत्तर देतो आहे, हे प्रसिद्ध गाणं नक्कीच माहितीचं होतं!

ऑडिओ इथे:

आणि गाण्याची इतर माहिती:
लता - मुकेश, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन

गाण्याचे शब्द इथे

आता राऊंड ३, गाणं हिंदी आहे, आणि सुरावट अंतर्‍यातली आहे:

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Jul 2010 - 8:21 am | डॉ.प्रसाद दाढे

बहुगुणीसाहेब तुम्ही 'आजा रे अब मेरा' ह्या गाण्याचा ओरिजिनल
ट्रॅक न देता कुठला तरी रिमिक्स (बहुतेक रिव्हायवल) दिला आहेत,
हे बरोबर नाही. माझ्या मते तर तुम्ही दिलेल्या ट्रॅकमधील इन्ट्रो पीस
मूळ गाण्यात नाहीच! हे रिमिक्सवाले स्वतःला शंकर-जयकिशनपेक्षा
शहाणे समजतात काय? हा जरी वेगळाच विषय असला तरी निदान
माझ्यासारखा जुन्या गाण्यांचा चाहता ओरिजिनल गाण्याचाच पुरस्कार
करेल.

प्रदीप's picture

6 Jul 2010 - 9:02 am | प्रदीप

दाढेसाहेबांशी संपूर्ण सहमत, आणि रिमिक्सचा ट्रॅक वापरण्याबद्दल निषेध.

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 10:03 am | बहुगुणी

आणि तो ट्रॅक जिथून मी रेकॉर्ड केला तो 'रिव्हायवल' CD मधून घेतलेला होता हे माझ्याजवळाची 'रिव्हायवल' CD ऐकल्यावर (अर्थात् तुम्हा दोघांच्या प्रतिसादानंतर!) कळलं.

आता प्रदीप यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा ही अपेक्षा, त्यांच्या खजिन्याचं खूप कौतूक ऐकून आहे:-)

मराठी_माणूस's picture

5 Jul 2010 - 7:51 pm | मराठी_माणूस

आज पुरानी राहों से , कोइ मुझे आवाज न दे

चित्रपटः आदमी ,
रफि, शकील, नौशाद

बहुगुणी's picture

5 Jul 2010 - 8:16 pm | बहुगुणी

पण मंडळी, फक्त आपला नियम लक्षात ठेवा:

अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.

तर ही घ्या ध्वनिचित्रफीतः

आणि हे गाणं:

शब्द इथे आहेत.

आता पुढचं कोडं, क्रमांक ४:

गाणं खूप जुन्या मराठी चित्रपटातलं आहे; आणि मी मुखडा, अंतरा १ आणि अंतरा २ असे तीन तुकडे एका-पाठोपाठ दिलेले आहेत, ओळखा तरः

मिलिंद's picture

5 Jul 2010 - 9:11 pm | मिलिंद

चित्रपट - दाम करी काम
सुधिर फडके

http://www.in.com/music/daam-kari-kaam/songs-58467.html

विसोबा खेचर's picture

5 Jul 2010 - 9:37 pm | विसोबा खेचर

छान आहे प्रकल्प..शुभेच्छा..

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 12:07 am | बहुगुणी

बघता काय, सामील व्हा!:-)

येऊ द्यात तुमचाही सहभाग, आणि योग्य वाटेल तिथे रागदारी वगैरेही सांगत चला म्हणजे आणखी रंगत येईल! धन्यवाद!

शुचि's picture

5 Jul 2010 - 11:55 pm | शुचि

प्रकाटाआ

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 12:22 am | बहुगुणी

अगदी बरोबर! शाबास!
तर कानसेन ४: मिलिंद

या गाण्याचे शब्द इथे आहेत.

शरद तळवलकरांच्या या त्याकाळी अत्यंत गाजलेल्या आणि उत्तम सिनेमाच्या चांगल्या प्रिंटसाठी मी जंगजंग पछाडलंय! एकच व्हीसीडी कशीबशी मिळाली जी सुरूवातीलाच अडकून बंद पडली. चांगली कुठे मिळेल ते VCD/DVD कुठे मिळेल ते कुणाला माहित असेल तर मला कृपया कळवा, आभारी असेन.

आता पुढचं गाणं:

पुन्हा एकदा मराठी गाणं, एकेकाळी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ही लावणी:

मेघवेडा's picture

6 Jul 2010 - 1:22 am | मेघवेडा

काय राव फुल्टॉस दिलात अगदी.. फुल्टॉस सोडतो काय कुणी? एखादा म्हातारादेखील पार 'सातार्‍याला' मारेल षटकार! ;)

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 4:46 am | बहुगुणी

और गेंद जा पहूंची है.....सातारा!

(पण उत्साहाच्या भरात दुवे द्यायचा कंटाळा केलात, मेघवेडा!)

असो, कानसेन नं. ५: मेघवेडा

ऑडिओ: एक दुवा हा आहे, पण मला ते गाणं 'वरिजिनल' वाटलं नाही. त्यापेक्षा इथले सूर आधिक सच्चे वाटले:

आणि शब्द मिळतील इथे.

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 4:55 am | बहुगुणी

ऑन युअर मार्क, गेट सेट, गो!

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 6:51 am | बहुगुणी

कानसेन नं. ६: हुप्प्या

इंदरजितसिंग तुलसी लिखित चंचलने गायलेल्या या गाण्याचा ऑडिओ दुवा:


गीताचे शब्द इथे आहेत
.

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 6:55 am | बहुगुणी

सहज's picture

6 Jul 2010 - 7:28 am | सहज

संगीत शंकर जयकिशन ब्लॅक एन्ड व्हाईट फिल्म इतके आठवले. राजकपुरचा असेल असेही वाटले. म्हणुन डोके चालवले..

सिनेमा आह, जाने ना नजर

तू नळी दुवा

गीत

ऑडीओ शोधायला कशाला पाहीजे आता?

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 7:46 am | बहुगुणी

Just for the sake of completion (जर कोणाला गाणंच ऐकायचं असेल तर), हा गाण्याचा दुवा:

तर मंडळी, कानसेन ७, पुन्हा एकदा: सहज

आतापर्यंतची सगळीच गाणी पब्लिक झटपट ओळखताहेत (माझ्या ८ तासांच्या अपेक्षेपेक्षा!), let's keep going!

हे पुढचं गाणं थोडंसं अवघड आहे फक्त मुखड्यावरून ओळखायला, पण प्रयत्न करायला तर हरकत नसावी, नाहीच जमलं तर मी अंतरा देईन (मग लईच सोप्पं होऊन जाइल!), here we go:

मुक्तसुनीत's picture

6 Jul 2010 - 7:55 am | मुक्तसुनीत

गंध फुलांचा गेला सांगून ? चूभूदेघे

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 7:59 am | बहुगुणी

गाणं हिंदी आहे, शास्त्रीय फिल्मी संगीत..

सहज's picture

6 Jul 2010 - 8:03 am | सहज

तुम्हे याद करते करते?

अंतरा देऊ का? (मग झटक्यात ओळखणार मंडळी!)

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Jul 2010 - 8:29 am | डॉ.प्रसाद दाढे

का करूं सजनी आये ना बालम' पिक्चर स्वामी, गायक
येसूदास आणि संगीत राजेश रोशन. मूळ गाणे उस्ताद बडे गुलाम
अली खान साहेबांचे आहे.
http://www.youtube.com/watch?v=UTXrCogiO08

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 9:04 am | बहुगुणी

कानसेन क्रमांक ८: डॉ. प्रसाद दाढे!!

इतक्या छोट्याश्या तुकड्यावरून हे गाणं ओळखलंत म्हणजे आपण खरोखरंच वर म्हंटल्याप्रमाणे 'जुन्या गाण्यांचे चाहते' आहात!

ऑडिओ साठी मला हा खालील दुवा आधिक आवडला (यू ट्यूब वरील ध्वनीचित्रफितीतील आवाज तितकासा sharp राहिला नसावा म्हणून असेल कदाचित, अर्थात्, जुनं ते सोनं हेही खरंच)

"

शब्द इथे आहेत.

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 9:16 am | बहुगुणी

आणखी एक जुनं हिंदी गाणं:

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Jul 2010 - 9:21 am | डॉ.प्रसाद दाढे

नजर न लग जाये ओ माय लव्ह!' रफीने गायलेले अप्रतिम गाणे.
नाईट इन लंडन (लक्ष्मी प्यारे)
http://www.youtube.com/watch?v=q0ayPrrIj7g

[इतक्या फटाफट उत्तरं? दाढे साहेब काही झोपू देतायेत की नाही आज? #:S (माझा दिवस संपला हो इकडे!)]

ध्वनिफीत इथे आहे.

आणि शब्द इथे.

One last riddle coming up for the day...

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 9:55 am | बहुगुणी

हिंदी गाणं आहे:

मिसळपाव's picture

6 Jul 2010 - 3:54 pm | मिसळपाव

बॉबी मधलं. यू ट्युब दुवा - http://www.youtube.com/watch?v=IFHDZEBQqwc

माझ्यासारख्या लिंबू-टिंबूंसाठी मधेच एक सोप्पसं दिल्याबद्दल आभार :-)

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 5:18 pm | बहुगुणी

कानसेन १०: मिसळपाव, अभिनंदन!

पुढचं गाणं हिंदी आहे:

कर्ज सिनेमा. तू नळी दुवा

??

और एक बार ट्राय मारो!

विसुनाना's picture

6 Jul 2010 - 6:06 pm | विसुनाना

सागर
तूनळी
ऑडिओ
दोन्हीमध्ये हीच सुरावट आहे.
पण हा तुकडा ओ मारियाचा दिसतो...

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Jul 2010 - 7:19 pm | डॉ.प्रसाद दाढे

हे 'ओ मारियाच' आहे.. अन बहुतेक हा तुकडा उत्तमसिंगने
वाजविला आहे (ग्रेट व्हायोलिनिस्ट, अरेंजर आणि संगितकार-दिल
तो पागल है)
सिंगसाहेबांनी नौशाद, मदनमोहन, आर डी सारख्या दिग्गजांकडे
खूप काम केले आहे.. सुंदर सोलो पीस..

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Jul 2010 - 7:27 pm | डॉ.प्रसाद दाढे

वन मोअर.. विसूनानांनी जो व्हिडिओ 'सच मेरे यार हैं' चा दिलाय
त्यातला इन्ट्रोचा सोलो व्हायोलिनचा तो पीस तर १०० % उत्तमसिंगनेच वाजविलाय कारण त्यांनी ह्या पीसचा
जाहीर डेमो पुण्यात पंचममॅजिक शोमध्ये दाखविला होता..
आणि शेवटी तार तुटल्याचा आवाजही (तार न तोडता अर्थात)
काढून दाखविला होता..

यशोधरा's picture

6 Jul 2010 - 5:54 pm | यशोधरा

सुरेल धागा. :)

शानबा५१२'s picture

6 Jul 2010 - 6:03 pm | शानबा५१२

ह्या प्रतिसादचा ना धाग्याशी,ना इतर कशाशी,कोणाशी संबंध आहे.......................थोडासा धाग्याशी असावा..........
ही माझी रींगटोन आहे.मागे एकदा 'ह्या' कंस्पेट(?) ने काही 'बहादुरांची शंका' दुर करता करता फार त्रास दीला डोक्याला.....तेव्हा जेव्हा 'ते' आठवत तेव्हा 'हे' एकतो..........
:)
विषयांतर :

जरा खिडक्या उघडून नॅचरल हवा घेऊयात, नाहीतरी हायवेतून एक्झिट घेतलंय, तेंव्हा स्पीड कमी म्हणजे वाराही कमीच आहे."

जर वारा कमी आहे,तर खिडकी कशाला उघडायची?? कमी वारा हवा का?
नाही एकदा एक,एका नावजलेल्या कॉलेजचे नावाजलेले प्राध्यापक म्हणाले होते....."सुशांत,लर्न न्यु थिन्ग्स,आस्क डाउट्स,नो मॅटर वेदर ईट्स इन युअर सिलॅबस ऑर नॉट,कीप क्लीअरींग युअर डाउट्स,लेट इट बी अ स्टुपीड प्रश्न(अडचण समजुन घ्या)" :)
फार विद्वान माणुस्,तेवढाच मनाने चांगला........धन्य ते सर!
थॅन्क यु!!

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

गणपा's picture

6 Jul 2010 - 7:42 pm | गणपा

मस्त धागा आहे..
=D> =D> =D>

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 7:58 pm | बहुगुणी

'ओ मारिया'च आहे.

पुढचा प्रश्न थोड्या वेळाने टाकतो.

चतुरंग's picture

6 Jul 2010 - 8:00 pm | चतुरंग

इतका छान धागा आहे हे माहीतच नव्हते! :)

चतुरंग

हिंदी गाणं आहे:

संगीतकार आहेत राजेश रोशन

रेवती's picture

6 Jul 2010 - 10:40 pm | रेवती

अखियोंके झरोखोंसे...
हे गाणं आहे का?

रेवती

मिसळभोक्ता's picture

6 Jul 2010 - 10:48 pm | मिसळभोक्ता

आय फोन वर शझाम नावाची अ‍ॅप आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

बहुगुणी's picture

6 Jul 2010 - 10:51 pm | बहुगुणी

मला वाटतं 'आंखियोंके झरोखोंसे' चे संगीतकार रविंद्र जैन होते (चुभूद्याघ्या)..

पण एक (कदाचित) योगायोगाची गोष्ट असेल:

तो आणि हा चित्रपट एकाच वर्षी रिलीज झाला - १९७७....

मस्त कलंदर's picture

6 Jul 2010 - 11:43 pm | मस्त कलंदर

सकाळपासून हा धागा पाहिला नव्हता.. वरची कोडी आणि प्रतिसाद पाहून वाईट वाटले होते.. म्हट्ले, नवीन कोडे आले की उत्तर देईन... पण हे गाणंच मुळी ओळखत नाहीए... :(

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रान्ति's picture

7 Jul 2010 - 12:18 am | क्रान्ति

"यादों में वो, सपनों में हैं" असावं असं वाटत आहे.
">असल्यास हा दुवा.

क्रान्ति
अग्निसखा

बहुगुणी's picture

7 Jul 2010 - 12:48 am | बहुगुणी

स्वामीच!

तर मग कानसेन क्रमांक १२: क्रान्ति

ध्वनीचित्रफीतः

आणि ध्वनीफीत इथे तर

गाण्याचे शब्द इथे.

पुढचा प्रश्न थोड्याच वेळात.

बहुगुणी's picture

7 Jul 2010 - 1:05 am | बहुगुणी

हिंदी गाणं आहे, सोपं आहे अगदी.

पण यानंतरच्या प्रश्नासाठी मात्र तीन-एक तास थांबायला लागेल...

प्रभो's picture

7 Jul 2010 - 1:16 am | प्रभो

किशोरदा, सागर चित्रपटातील चेहरा हैं या चाँद खिला हैं, जुल्फ घनेरी शाम हैं क्या

http://www.youtube.com/watch?v=rxYRc5CfuGk

बहुगुणी's picture

7 Jul 2010 - 1:27 am | बहुगुणी

कानसेन क्रमांक १३: प्रभो

पण वर सांगितल्याप्रमाणे, मंडळी, time to take a break!

पुन्हा भेटुयात, तीन तासांनी... धन्यवाद!

बहुगुणी's picture

7 Jul 2010 - 6:06 am | बहुगुणी

शुचि's picture

7 Jul 2010 - 6:20 am | शुचि

ये शाम की तनहाईयां ऐसे मे तेरा गम :)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

वेल डन्!

Next one coming up soon...

मराठी चित्रपटीय भक्तिगीत:

मिसळपाव's picture

7 Jul 2010 - 6:34 am | मिसळपाव

.. भक्तिचाच ठेवा. 'आम्ही जातो आमुच्या गावा' मधलं.
http://www.youtube.com/watch?v=YOCJdV6JOfo

याची VCD/DVD मिळते का रे कुठे?

रेवती's picture

7 Jul 2010 - 6:32 am | रेवती

देहाची तिजोरी हे आम्ही जातो आमुच्या गावा चित्रपटातील भक्तीगीत आहे.
दुवा देते आहे.

रेवती

रेवती's picture

7 Jul 2010 - 6:34 am | रेवती

हा घ्या दुवा.

रेवती

पहिले संयुक्त विजेते! मिसळपाव आणि रेवती
[time-stamp वरून रेवतीताईंनी आधी गाणं ओळखलं असं दिसतंय पण दोघांनी एकाच वेळी दुवे दिलेले दिसताहेत, म्हणून संयुक्त विजेते!]

This is a lot of fun!

Let's keep going...

बहुगुणी's picture

7 Jul 2010 - 6:48 am | बहुगुणी

प्रकाटाआ

रेवती's picture

7 Jul 2010 - 6:49 am | रेवती

धन्यवाद हो बहुगुणी साहेब!
आता जरा दुसरा धागा सुरु करता का?
'सारखे सारखे तुमच्या धाग्यावर येउन कुणी कुठलं गाणं ओळखलं' किंवा 'नवीन कोणतं गाणं दिलय' हे बघणं सुरु असतं. दुसरा धागा सुरु केल्यास बरे होइल.

रेवती

बहुगुणी's picture

7 Jul 2010 - 7:02 am | बहुगुणी

धून कदाचित अवघड असेल म्हणून ती ओळखणं अगदी सोप्पं करणारी ही हिंटः

एरवी द्वयर्थक गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका विनोदी कलाकाराचं uncharacteristically सरळ अर्थाचं (मला तरी तसं वाटतं हो!) हे गाणं त्यावेळी लहान मुलांमध्ये बरंच लोकप्रिय झालं होतं...

मिसळपाव's picture

7 Jul 2010 - 7:10 am | मिसळपाव

ढोंग ...आय मीन, 'ढ्वाँग' करतोय. फीतीचा दुवा द्यायला जरा शोधाशोध करावी लागेल. ध्वनीफित मिळाली तरी खूप झालं. पण तो पर्रंत रेवती नंबर पटकावेल म्हणुन गाणं तरी सांगून टाकलं :-)

रेवती's picture

7 Jul 2010 - 7:16 am | रेवती

सिनेमा 'एकटाजीव सदाशीव' होता.
दुवा
http://www.dishant.com/jukebox.php?songid=66718
तुम्ही या गाण्यासाठी कानसेन आहात.:)

रेवती

कानसेन म्हणतो, पण दुवा प्रामाणिकपणे द्याल अशी आशा आहे;-)

आता यापुढील गाणी नव्या धाग्यावर, जरा धीर धरा!

मिसळपाव's picture

7 Jul 2010 - 7:39 am | मिसळपाव

... त्यामूळे खरी कानसेन रेवती. आज जवळ जवळ बारा-पंधरा वर्षानी हे गाण< परत ऐकायला मिळालं हे बक्षीस मला पुरेसं आहे!

अवांतर - च्यायला, ईतक्या कालावधी नंतर ऐकलेलं गाणं, दोन क्षणात आपला मेंदू retrieve करतो तरी कसा??????

हे घ्या गाणं!

बाय द वे, मी या अशा "दीर्घ कालावधीनंतर मेंदूने retrieve" करण्यालाच associative memory म्हणतो, that is the whole point of this exercise! I am glad you are enjoying it!

रेवती's picture

7 Jul 2010 - 7:47 am | रेवती

नाही हो! कानसेन तुम्हीच!
मला गाणं अगदी आठवल्यासारखं वाटत होतं पण तुमचा प्रतिसाद आल्यावर मी फक्त दुवा शोधून दिला.
रेवती

रेवतीताई म्हणजे "विहिरीतली परी" असं म्हणावं का;-)

असो: मंडळी, इथून पुढे या धाग्यावर कृपया इथे प्रतिसाद देऊ नका, दुसर्‍या भागाचा धागा इथे आहे, तिथे टाका. धन्यवाद!