बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता आम्ही या भागात पुढे चालवतोय. उद्देश हा की, या खेळाची मला सर्वांना लुटता यावी..
तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
या आधीचे दुवे:
भाग ८ (यात आधीच्या भागांचे दुवे मिळतील! मंग.. आमची मकी हुश्शार है! तिने दिलेत सगळे दुवे ऑलरेडी! :D)
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक ५६: क्लिंटन
कानसेन क्रमांक ५७: प्रभो आणि मस्त कलन्दर
कानसेन क्रमांक ५८: मिसळपाव
कानसेन क्रमांक ५९: मेघवेडा
कानसेन क्रमांक ६०: मिसळपाव
कानसेन क्रमांक ६१: रेवती
कानसेन क्रमांक ६२: चतुरंग
*****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
आता पुढलं कोडं कानसेन क्रमांक ६३
एका अत्यंत गाजलेल्या लावणीचा हा अंतरा :
प्रतिक्रिया
9 Jul 2010 - 11:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
करंगळी मोडली.
व्हिडीओ शोधते
अदिती
9 Jul 2010 - 11:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मूळ प्रतिसाद संपादित केला तर पैला लंबर जाईल म्हणून इथेच उपप्रतिसाद देणार! ;-)
चित्रपटः पडछाया
संगीत, आवाजः आशा भोसले
गीतः गदिमा
वरिजनल व्हीडो आणि गानं मिलालं नाय, म्हूनशान हा पहा:
http://www.youtube.com/watch?v=Np9JzwUPJAc
सॉल्लिड क्यूट आहे ही पोरगी!
अदिती
9 Jul 2010 - 11:31 pm | मिसळपाव
गाणं आठवलं तुला?? :D
9 Jul 2010 - 11:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तेवढी एक चूक पोटात घ्या, "काका"! ;-)
अदिती
9 Jul 2010 - 11:38 pm | मिसळपाव
दिल्यावर तू हाणणारच आमच्या टाळक्यावर.
- व्यथित 'काका'!!
9 Jul 2010 - 11:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सॉरी, सॉरी! 'काका' होण्यापासून वाचवते तुम्हाला मिभोकाका!!
बाकी प्रतिसाद उडायला नकोत म्हणून ह्या गाण्याच्या ओळी!
अदिती
9 Jul 2010 - 11:48 pm | मिसळपाव
मी 'मिसळपाव' - मिसळभोक्ता नव्हे. असो. अवांतर थांबवतो.
10 Jul 2010 - 12:06 am | Nile
जाउ द्या हो काका, उगाच नाही आम्ही तिला जोजो काकु म्हणत. ;)
-Nile
10 Jul 2010 - 12:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे हो, अंमळ गंमतच झाली माझी!! असो ... माझ्यावर का होईना, तेवढंच हसायला कारण झालं ना!! :D :D :D
अदिती
9 Jul 2010 - 11:23 pm | रेवती
ऐन दुपारी, यमुना तिरी...
दुवा
रेवती
9 Jul 2010 - 11:25 pm | रेवती
ए, मूळ दुवा नै हं मिळाला!
जर अदितीला मिळाला तर तीच कानसेन!:)
रेवती
9 Jul 2010 - 11:30 pm | मस्त कलंदर
अरे व्वा.. चक्क चक्क अदिती? गुडगुडाट!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 11:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मंजे काय, आमी काय मानूस नाय, आमाला काय भावना नाय? आम्ही पण माणूस आहोत, आम्हालाही आपलं म्हणा!
(इन् कानसेन) अदिती
9 Jul 2010 - 11:32 pm | मेघवेडा
अदितीने जरी उत्तर आधी दिलेले असले तरी तिने दुवा दिलेला नाही. तीज ताकिद देण्यात येत आहे, की गाण्याच्या नावाचा रुमाल टाकून "व्हिडिओ शोधते" वगैरे सांगून पळणे चालणार नाही! :D
रेवतीतैंनी जरी उत्तर १ मिनीट उशीरा दिलं असलं तरी व्हिडिओसकट असल्याने त्यांना अग्रक्रम देण्यात येत आहे.
कानसेन क्र. ६३ : रेवती आणि अदिती.
पुढील कोडं : कानसेन क्र. ६४
एक नितांतसुंदर हिंदी गाण्याचा हा अंतरा. (परत एक फुल्टॉस. रेवतीतै ओळखणार लगेच. :) )
9 Jul 2010 - 11:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साफ निषेध! आमचं इंटरनेट स्लो म्हणून आम्ही रूमाल टाकला तर आम्ही नंतर काय!! एवढं करून ओरिजिनल व्हीडीओ दिलाच नाही, वर गाण्याची माहिती पण मीच दिली ... नॉय चॉल बे ...
नि षे ध!!
त्यातून अ हा र च्या आधी येत असल्याने मलाच अग्रक्रम मिळाला पाहिजे. ही साफ कंपूबाजी आहे .... X(
आणि या प्रतिसादातलं तुझं ग्याजेट गंडलं आहे, मला काहीही दिसत नाहीये! त्यामुळे डब्बल निषेध!!
अदिती
9 Jul 2010 - 11:34 pm | मराठे
'चंदन सा बदन'
दुवा
9 Jul 2010 - 11:38 pm | मराठे
सिनेमा : सरस्वतीचंद्र (१९६८)
गायकः मुकेश
9 Jul 2010 - 11:42 pm | मेघवेडा
बरोबर! कानसेन क्र. ६४ : मराठे.
अदिती, उगी उगी. ;)
आता कानसेन क्र. ६५ साठी खास रिक्वेस्टवरून, एका उडत्या चालीच्या गाण्याचा हा अंतरा.
9 Jul 2010 - 11:44 pm | प्रभो
चला जाता हूं
http://www.youtube.com/watch?v=l93ORO20yUM
9 Jul 2010 - 11:46 pm | प्रभो
किशोरदा, मेरे जीवन साथी चित्रपटामधील
9 Jul 2010 - 11:45 pm | मिसळपाव
kadoo.com वापरून बघशील का? बाकीच्याना पण हा problem येतोय.
9 Jul 2010 - 11:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा, अच्छा हा सगळा कंपूबाजीचा प्रकार दिसतो आहे ... आधीच ठरलेलं दिसतंय कोण जिंकणार ते! ;-)
(पळा आता, नाहीतर मेवे आणि मकी, दोघंहीजण मराठेंना जोडीला घेऊन बदडतील मला!!)
अदिती
9 Jul 2010 - 11:45 pm | मराठे
'चला जाता हूं किसिकी धून में।'
दुवा
सिनेमा: मेरे जीवन साथी
गायकः किशोर कुमार'
..हे जरा सोप्पं होतं
9 Jul 2010 - 11:47 pm | मराठे
च्यामारी, प्रतीसाद टंकून प्रकाशीत करण्याआधिच तीन उत्तरं आली!
लोकांचं टायपींग स्किल चांगलच आहे.
9 Jul 2010 - 11:45 pm | मस्त कलंदर
चला जाता हूँ किसी की धुन में
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 11:49 pm | मेघवेडा
मस्त! कानसेन क्र ६५ : प्रभो.
पुढलं.. कानसेन क्र. ६६ साठी : पुन्हा एकदा एक उडत्या चालीचं हिंदी गाणं. :)
@मिसळपाव : इस्निप्स ट्राय करतो. :)
9 Jul 2010 - 11:51 pm | मस्त कलंदर
आगे सिधी लगी दिलपे ऐसी कटरिया
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 11:53 pm | मराठे
दुवा
9 Jul 2010 - 11:54 pm | मस्त कलंदर
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 11:55 pm | स्पंदना
आई ग्ग!! जबरदस्त.हाफ टिकिट
काय खेळताहेत सारे...अगदी भांडुन, भांडुन!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 12:00 am | मेघवेडा
मघाच्याच रूलप्रमाणे (रेवती आणि अदिती) कानसेन क्र. ६६ : मराठे आणि मस्त कलन्दर.
आता मिसळपाव यांच्या स्पेशल रिक्वेस्टवरून आम्ही कडू.कॉम वर रजिस्टर केलेलं आहे. पुढलं.. कानसेन क्र. ६७ साठी .. हा थोड्या अलिकडच्या हिंदी गाण्याचा अंतरा :
10 Jul 2010 - 12:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ग्याजेट दिसत नाही. सबब धाग्यावर बहिष्कार टाकून (मी पळून) जाते आहे.
अदिती
10 Jul 2010 - 12:02 am | मराठे
'बन्नो रानी'
सिनेमा: १९४७ अर्थ
दुवा
10 Jul 2010 - 12:04 am | मराठे
कानसेन क्रः ६६ = मस्त कलन्दर..
मला गाणं माहित नव्हतं .. मी फक्त दुवा दिला.
10 Jul 2010 - 12:03 am | स्पंदना
मागची सगळी गाणी माझ्या नवर्यान ओळखली म्हणुन त्याला घेउन बसले तर गाण नविन!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 12:05 am | मराठे
सॉलिड अॅडिक्टिव आहे.
10 Jul 2010 - 12:13 am | मिसळपाव
'गड आला पण सिंह गेला' - आता गॅजेट चालतंय पण गाणं ईल्ला !!
10 Jul 2010 - 12:15 am | Nile
च्यायला 'आता' आमचं उलट झालंय. वरची तिन्ही गाणी येत होती. खालचं काय शिरना डोस्क्यात. :| ए मेव्या व्यनीने हिंट धाड रे लेका जरा.
-Nile
10 Jul 2010 - 12:13 am | मेघवेडा
ओके. कानसेन क्र. ६६ : फक्त मस्त कलन्दर
मस्त! कानसेन क्र. ६७ : मराठे.
@ अपर्णा अक्षय : आता हे खास तुमच्यासाठी आणि तुमच्या अहोंसाठी! :)
कानसेन क्र. ६८ साठी हा एक जुन्या हिंदी गाण्याचा अंतरा. आधीच क्लू देतो : किशोरदांचं गाणं आहे. आणि डीआयव्ही व कडू दोन्ही विजेट्स देत आहे. नंतर पिरपिर नको.. :P
10 Jul 2010 - 12:19 am | मिसळपाव
तुझ्या उत्साहाला __/\__
10 Jul 2010 - 12:19 am | स्पंदना
~X(
यात दुसर्याचे केस ओढणार स्मायली पण हव होत,
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 12:27 am | मेघवेडा
तुमचे अहो तुमचे केस ओढतायत का? :P
10 Jul 2010 - 12:26 am | मेघवेडा
ओके. हिंट.
एका जुन्या हिंदी चित्रपटाचं शीर्षक गीत आहे. कलाकार : शम्मी कपूर, लीना चंदावरकर, विनोद खन्ना आणि संध्या रॉय! :)
आता हाफ व्हॉली असावी! ;)
10 Jul 2010 - 12:42 am | Nile
इतक्या हिंटा एकदम देउ नको रे, गुगलेबल होउन जातं मग. :)
-Nile
10 Jul 2010 - 12:32 am | मस्त कलंदर
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
10 Jul 2010 - 12:34 am | Nile
तो पिस कुठे आहे पण?
:?
-Nile
10 Jul 2010 - 12:35 am | मेघवेडा
हाहाहा! ही मकी अंमळ गंडलीये. पोरी.. जा अभ्यास कर. तुझं धड ना इथे ना तिथे लक्ष असं झालंय. तू चित्रपट बरोबर ओळखलास पण आपला उपक्रम गाणं ओळखण्याबद्दल आहे माझ्यामते! गाणं चुकीचं आहे हे! लोल!
=)) =)) =))
10 Jul 2010 - 12:37 am | मराठे
सिनेमा: मन का मीत (source: imdb)
... हे पण चुकलं
10 Jul 2010 - 12:38 am | Nile
गुगल सर्च मध्ये शम्मी राहिला. ;)
-Nile
10 Jul 2010 - 12:35 am | प्रभो
जाने अंजाने यहां सभी है दिवाने
http://www.youtube.com/watch?v=uq0Q0mPoW7Y
10 Jul 2010 - 12:36 am | प्रभो
हेलनचे नॄत्य.
10 Jul 2010 - 12:37 am | Nile
ह्याततरी तो पीस कुठे आहे रे?
गुगलुन दोन्ही गाणे आधिच ऐकुलेला. ;)
-Nile
10 Jul 2010 - 12:37 am | मेघवेडा
हा हा हा.. हा प्रभ्या पण गंडला! अरे गाणं शोधा मित्रांनो गाणं.. नुस्ता चित्रपट शोधून काय फायदा?
=)) =)) =))
10 Jul 2010 - 12:40 am | प्रभो
जाने अंजाने लोग मिले मगर
http://www.youtube.com/watch?v=ANK7wXxF5aA
हे घ्या....
10 Jul 2010 - 12:41 am | Nile
इस बार मै फर्श्ट है! :|
-Nile
10 Jul 2010 - 12:41 am | प्रभो
हाहाहा..वोक्के..
10 Jul 2010 - 12:40 am | Nile
http://www.youtube.com/watch?v=K1h0UTD2Ick&feature=related
-Nile
10 Jul 2010 - 12:43 am | स्पंदना
नाही हो तो पीस नाही त्यात पण!!
मी आल्यावर अवघड गाण...
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 12:44 am | मेघवेडा
अथक परिश्रमांनंतर आमचे स्नेही श्री श्री प्रभो यांनी शेवट गाण हुडकून काढलंच त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री श्री नाईळ यांनी दिलेल्या व्हिडिओमध्ये नेमका तोच पीस नाहीये. =)) पण तरी त्यांनी योग्य व्हिडिओ पहिल्याच प्रयत्नात दिल्याबद्दल त्यांच्या नावाचाही विचार करण्यात येत आहे. तस्मात् कानसेन क्र. ६८ प्रभो आणि नाईल.
10 Jul 2010 - 12:48 am | Nile
तोच पिस मिळत नव्हता म्हणुन तर केव्हापासुन लटकलं होतं. पण किशोरच तेव्ह गाणं होत (अन इतर हिंटा मॅच होत्या. :)
-Nile