दिले नादान तुझे हुआ क्या है....
ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल.
आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ.
सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात. हा शब्द जर एखाद्या गज़लेमधे आला तर त्याचा या दृष्टीकोनातून अर्थ जरुर लावायचा प्रयत्न करायला हवा. अशा या सालिकला परमेश्वराचे ज्ञान म्हणजे “मरिफत” मिळवण्यासाठी योग्य शिकवण देणे हाच सुफींचा मुख्य हेतू आहे. या प्रत्येक टप्याला “मुक्कामात” म्हणतात. या प्रवासात आलेल्या अनुभवांना “अहवाल” तर जो मार्ग अनुसरला जातो त्याला “अतरिकन”. “फनाफिल हकीकत” म्हणजे शेवट – परमात्म्यात विलीन होणे. हे सात टप्पे कोणते ?
१ "उबदियात" म्हणजे सेवा. यात पश्चाताप होतो.
२ "इष्क" म्हणजे प्रेम. या टप्प्यात परमात्म्याची ओढ लागते.
३ "जोहद" म्हणजे त्याग किंवा निवृत्ति
४ "मरिफत" म्हणजे खरे ज्ञान. यात परमेश्वर सोडून बाकी सर्व भौतिक गोष्टींचा त्याग अभिप्रेत आहे. हे ज्ञान मिळवायचे दोन मार्ग आहेत. एक “इल्मी” म्हणजे ग्रंथ वाचून आणि दुसरा “हाली” म्हणजे ध्यान-धारणेतून.
५ "वजद" म्हणजे उन्मानावस्था. यात परमेश्वराचे ध्यान करत असता उन्माद अवस्था प्राप्त होते.
६ “हकीकत” मधे साधकाच्या आत्म्याला परमेश्वराला शरण जाण्याची महती पटते. याला म्हणतात “तवक्कुल” तोच एकमेव सत्य आहे हे उमजणे याला म्हणतात “तौहिद”
७ "वसल" म्हणजे मिलन. या टप्प्यावर साक्षात्कार होतो. यानंतर “फ़ना व बखा” म्हणजे स्वत:ला विसरुन जायचे व परमेश्वरात विलीन व्हायचे. हा श्रध्देचा उच्च बिंदू समजला जातो. याच्या नंतर परमेश्वर करेल ती पूर्व असेच समजले जाते.
मुस्लीम धर्ममार्तंडाच्या मते गायन हे निषिध्द आहे तसेच गुरुंच्या पायावर डोके ठेऊन वंदन करणे. पण सुफींनी परमेश्वराच्या स्तुती गायनाला परवानगी दिली आणि गुरुंना वंदन करायलाही परवानगी दिली. या गायनाला म्हणतात “समा” आणि वंदनाला “सिजदा”. त्या साठी त्यांनी एक युक्ती केली. सिजदा दोन प्रकारचा असतो हे सिध्द केले. एक सिजदा इबाद्ती आणि दुसरा ताज़िमी. पहीला हा परमेश्वरासाठी आणि दुसरा हा आदर व्यक्त करण्यासाठी.
कर्मठपणा हा मुळत: माणसाला आवडत नसल्यामुळे, मुसलमान राजांनी सुफी संप्रदायाला जो थोडाफार आश्रय दिला तो त्यांच्या स्वतःच्या मानसीक समाधानासाठी. सामान्य लोकांसाठी त्यांनी कर्मठ धर्माचीच कास धरलेली दिसते. असो. आता आपल्या गज़लकडे वळूया.
ग़ालीब हा सुफीसंप्रदायाचा होता त्या मुळे त्याच्या काव्यात गुढपणा पुरेपूर उतरला आहे. वरचा सामान्य अर्थ खरवडला की आत आपल्याला वरचे सात टप्पे दिसतात. बघा त्याच्या या आणि इतर काव्यात आपल्याला त्या दिसतात का ?
दिले नादान तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्दकी दवा क्या है..
( हे माझ्या मना तुला काय झाले आहे ?
तुझ्या या वेदनांचे औषध काय आहे ?)
हम है मुश्ताक और वो बेजार,
या ईलाही ये माज़रा क्या है....
(इकडे तुला भेटण्याची मला तीव्र इच्छा आणि तू नाखूष, माझ्यावर रागावलेला,
हे परमेश्वरा हा मामला आहे तरी काय ?)
मै भी मुहमे जुबां रखता हूं
काश पुछो की मुदआ क्या है
(माझी पण मते आहेत,
पण खरा मुद्दा काय आहे, हे कोणी विचारेल काय ?) याच्यात फार गहन अर्थ दडलेला आहे.
जब की तुझबीन नही कोई मौज़ूद,
फिर ये हंगामा-ए-खूदा क्या है.
(जर सगळे तुझ्यातच सामावलेले आहेत तर
तुझ्या अस्तीत्वाबद्दल हा वाद कसला ?)
ये परी चेहरा लोग कैसे है
गमज़ा-ओ-इश्व-ओ अदा क्या है
(हे परी सारखे सुंदर लोक असे कसे आहेत,
त्यांच्या या गमजा आणि अदात काय विशेष आहे ?)
शिकन-ए-ज़ुल्फ-ए अंबारी क्या है
निगाहे-चष्म-ए सुरमासा क्या है?
(हे कुरळे केस आम माणसात एवढे प्रिय का ?
या सुरमा घातलेल्या डोळ्यात एवढे काय आहे ?)
सब्ज-ओ-गुल कहांसे आये है
अब्र क्या चिज है हवा क्या है..
(ही हिरवळ कुठून आली
आणि हे ढग, ही हवा कोणी जन्माला घातली ?)
हमको उनसे वफ़ासे है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है ?
(आम्हाला त्यांच्या प्रामाणिकपणाकडून अपेक्षा आहेत,
पण त्यांना प्रामाणिकपणा म्हणजे काय हे माहीती असायला पाहिजे ना !)
भला कर तेरा भला होगा
और दर्वेश की सदा क्या है ?
(चांगले कर्म कर, तुझे चांगलेच होईल
माझ्या दर्वेशीचे अजून काय आशिर्वाद असणार ?)(दारोदार हिंडणारे ते दर्वेशी. यांना समाजात चांगला मान असायचा.)
जान तुमपर निसार करता हूं
मै नही जानता दुंआ क्या है
(मी तर तुझ्यावर माझे प्राण अर्पण करायला तयार आहे,
जरी मला तुझा आशिर्वाद काय हे माहीत नाहीत तरी ही)
माना की कुछ नही ग़ालीब
मुफ्त हात आये तो बुरा क्या है......
(मानलं की मी काही विशेष नाही,
पण मी माझे ज्ञान तुम्हाला फुकट वाटतोय तर त्यात वाईट काय आहे ?
तुमचा तोटा काय आहे ?)
दिले नादां तुझे हुआ क्या है.......
साध्या अर्थासाठी -
गुढ अर्थासाठी ऐका -
जयंत कुलकर्णी.
http://jayants-blog.blogspot.com/
प्रतिक्रिया
29 May 2010 - 7:42 pm | पांथस्थ
कुलकर्णी साहेब छान अर्थ दिला आहे गझल चा. विनय वाईकरांच्या "आइना-ए-गझल" मधे नुकताच या गझल चा भावार्थ वाचला होता. थोड्या फार फरकाने अर्थ तोच उतरला आहे.
आणि सुफी पंथाची माहिती पण थोडक्यात करुन दिली आहे. तुम्हाला अधिक माहिती असल्यास सविस्तर लेख नक्की टाका.
धन्यवाद!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 May 2010 - 7:46 pm | सुधीर काळे
झकास लेख! धन्यवाद, जयंत-जी!
पण प्रतिसादांचा अभाव पाहून 'जगाच्या पाठीवर'मधल्या या ओळी आठवल्या!
लबाड जोडिति इमले-माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या,
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार,
अजब तुझे सरकार, उद्धवा, अजब तुझे सरकार!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
29 May 2010 - 9:41 pm | जयंत कुलकर्णी
अलेकझांडर सोल्झेनित्सीन ने या बाबतीत त्याच्या कुठल्याशा कादंबरीत एक वाक्य टाकले आहे - तलवारीने गवत कापले तर त्या तलवारीचा काय दोष ? तो कापण्याराचा दोष. हे एकदा समजले की त्रास होत नाही. :-) शिवाय आपल्यासारखे रसीक आहेत हे ही नसे थोडके.
मी इथे परत लिहायला लागलो त्याचे श्रेय मी मदनबाण, निखील, नाईल, प्रो.बिरुटे व आपल्यासारख्यांनाच देतो.
धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
30 May 2010 - 12:11 am | Nile
गझलेचा अर्थ आणि इतर माहिती आवडली. कुलकर्णी साहेब, तुम्हाला पुन्हा इथे बघुन बरे वाटले. गालिब वाचायला, ऐकायला आवडत जरी असला तरी अज्ञान दिसु नये म्हणुन मी तरी त्यावर फारशी प्रतिक्रीया देत नाही, पण त्याबद्दल आवर्जुन वाचतो मात्र.
सद्ध्याच्या इंटरनेट जगात, 'हीट्स' ना फारच महत्त्व आलं आहे, किती लोक वाचताहेत, किती लोक प्रतिक्रीया देताहेत वगैरे. फ्रान्सीस बेकनच्या शब्दांत सांगायचे तर.
"PRAISE is the reflection of virtue; but it is as the glass or body, which giveth the reflection. If it be from the common people, it is commonly false and naught; and rather followeth vain persons, than virtuous.For the common people understand not many excellent virtues. The lowest virtues draw praise from them; the middle virtues work in them astonishment or admiration; but of the highest virtues, they have no sense of perceiving at all."
थोडक्यात, क्वांटीटी पेक्षा क्वालिटीलाच महत्त्व द्यावे असे मला वाटते. (इथे हे लिहल्यावर मला क्वांटीटीच्या विरोधाची काळजी करावी लागेल हा भाग वेगळा म्हणा ;) ) तुमचे लेखन आवडते हे पुन्हा एकदा मनापासुन सांगतो. (कोवुरांवरचे दोन लेख इथुन काढुन टाकलेत याबद्दल तर फार वाईट वाटले) लिहित रहा. :-)
-Nile
29 May 2010 - 7:49 pm | सुधीर काळे
डुप्लिकेशनमुळे काढला!
29 May 2010 - 7:48 pm | सुधीर काळे
'मुक्कामात' कीं 'मुकामात'? मुकाम म्हणजे एक टप्पा, एक विश्रांतीची जागा, नाहीं का?
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
29 May 2010 - 8:30 pm | पांथस्थ
माझ्या मते हे असे आहे...
जब की तुझ बीन नही कोई मौज़ूद,
फिर ये हंगामा, ऐ खूदा क्या है.
दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है ह्या इथे टंकन केलेली गझल योग्य वाटते...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 May 2010 - 9:54 pm | जयंत कुलकर्णी
जी मुळ गज़ल उर्दू मधे आहे त्यात "फिर ये हंगामा-ए-खूदा क्या है." असे आहे. आपण जे लिहीले आहे ते "फिर ये हंगामा, ऐ खूदा क्या है." असे आहे. यातला सुक्ष्म फरक समजवून घ्या. पहिल्यात तुम्हाला अर्थाचे स्वातंत्र्य आहे.
१ हा हंगामा परमेश्वरा कसला
२ हा तुझ्या बाबतीत हंगामा कसला ?
दुसर्यात फक्त एकाच अर्थाचे स्वातंत्र्य आहे -
१ हा हंगामा परमेश्वरा कसला !
जर सुफी संप्रदायाच्या काव्याचा अर्थाचा अभ्यास असेल तर साधारणतः दोन्ही अर्थाचे स्वातंत्र्य वाचकाला मिळाले पाहिजे.
अर्थात हे माझे मत !
आपण हे वाचलेत त्यासाठी धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
29 May 2010 - 10:05 pm | पांथस्थ
तुम्ही मुळातच घुसलात त्यामुळे आता शंकाच नाही :)
मलाहि ह्या सुक्ष्म फरकामुळेच हा प्रश्न विचारावासा वाटला.
बरोबर आहे.
खुलाश्याबद्दल धन्यवाद!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 May 2010 - 9:15 pm | संजय अभ्यंकर
फार सुंदर भावर्थ!
इतके दिवस मी ह्या गजलेचा अर्थ वेगळा लावत होतो.
मला समजलेल्या अर्था नुसार एक माणूस जो ह्या जगापासुन त्रासलेला आहे त्याचे हे स्वगत होते.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
29 May 2010 - 9:20 pm | रामदास
थोडा फार माहीती होता.
आज कळला माझ्या आवडत्या ओळी चा अर्थ
हमको उनसे वफ़ासे है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है ?
धन्यवाद.
29 May 2010 - 10:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर भावार्थ.......!
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
29 May 2010 - 11:16 pm | वाहीदा
कुलकर्णी सरांची माफी मागून मी हा भावार्थ देत आहे
दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है?
आख़िर इस दर्द की दवा क्या है?
[dil-e-naada : .naive heart]
Oh naive heart, what has happened to you?
What is the eventual relief of your pain?
Ghalib castigates his heart in the first verse. Oh naive heart, what is the matter with you? Why are you in such a bad shape? What is the cure of this pain? He implies that there is no cure of the pain of love or the pining heart.
हम हैं मुश्ताक और वो बेजार
या इलाही यह माजरा क्या है?
hum hai.n mushtaaq aur vo bezaar
yaa ilaahii ye maajaraa kyaa hai ?
[mushtaaq: eager,
bezaar: dissatisfied/disinterested]
I am eager, and she disinterested
Oh God! What is happening here?
Ghalib complains that while he is all eager, the beloved does not seem to care. He asks God as to why this is so? Why can’t the beloved at least listen to him?
मैं भी मूंह में ज़बान रखता हूँ
काश पूछो कि मुद्दा क्या है?
mai.n bhii muu.Nh me.n zabaan rakhataa huu.N
kaash puuchho ki muddaa kyaa hai ?
[muddaa: matter/issue]
Even I have a tongue in my mouth
Wish some one would seek my opinion too on the matter.
Ghalib feels the slight of his beloved. While she keeps asking others, she never asks him (of his condition). He says, even I have matters to express, wish she would ask me too! He believes his tale of love for her will completely overshadow what she has heard from others.
माझी सगळयात आवड्ती ओळ ..
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर यह हंगामा ए खुदा क्या है?
jab ki tujh bin nahii.n koii maujuud
phir ye ha।ngaamaa, ai Khudaa kyaa hai ?
When nothing is present here apart from you,
Why this commotion all around, O God?
ये परी चेहरा लोग कैसे हैं?
गम जा -ओ-इश्व-ओ-अदा क्या है?
*ye parii cheharaa log kaise hai.n ?
Gamazaa-o-ishvaa-o-adaa kyaa hai ?
[parii cheharaa: beautiful face]
[gamzaa-o-ishva-o-ada: side-glances, airs and coquetry]
How are these with beautiful visages?
What is all these side glances, airs and coquetry?
शिकन-ए-जुल्फ-ए-अम्बरी क्यों है?
निगाह-ए-चस्म-ए-सुरमा सा क्या है?
*shikan-e-zulf-e-ambarii kyo.n hai ?
nigah-e-chashm-e-surmaa saa kyaa hai ?
[shikan: wrinkle, zulf: hair/tresses, ambarii: fragrance]
[chashm-e-surma: antimony/surma blackened eyes।
Why do the/her curls of the tresses smell of fragrance?
What needs do the surma blackened eyes serve?
सबज़ा-ओ-गुल कहाँ से आये हैं?
अब्र क्या चीज़ है, हवा क्या है?
*sabazaa-o-gul kahaa.N se aaye hai.n
abr kyaa chiiz hai havaa kyaa hai
[sabz-o-gul: greenery and flowers]
[abr: clouds]
From where have the greenery and flowers come?
What makes the clouds and the air?
Another set of philosophical verse from Ghalib. We found these four verses marked with * as an elaboration of the same theme. The last three verses, exemplify the first ‘sher’ marked with *. As in the Sufi tradition which believes that nothing exists apart from ‘God’, Ghalib ask inquiringly, "If nothing exists apart from the Lord himself, why this commotion and hustle bustle?"Why this futile rigmarole of existance? Why the conundrum of life? What are all these beautiful women with their long hairs and coquetry? Where did we get all these flowers, greenery and clouds from? He implies that all these attract us so much that we forget about their Creator. While they are all the manifestation of the same Supreme Being, but he laments that their multiplicity confuses us and prevents us from understanding the Supreme Being.
The theme of his first sher of Diwan-e-Ghalib i.e. "naqsh fariyadi.." resonate in this sher too.
हमको उनसे वफ़ा कि है उम्मीद
जो नहीं जानते वफ़ा क्या है।
hamako unase vafaa kii hai ummiid
jo nahii.n jaanate vafaa kyaa hai.
[vafaa: faithfulness]
I am hoping for faith from her,
Who does not know what faithfulness is all about.
How foolish of me, Ghalib says to expect faithfulness from someone who does not understand faithfulness. In this verse Ghalib distinguishes between faithfulness in love and passion in love. When we are young, love for us is mostly passionate; it is only when love matures does care and faithfulness substitute passion.
हाँ भला कर तेरा भला होगा
और दरवेश कि सदा क्या है?
haa.N bhalaa kar teraa bhalaa hogaa
aur darvesh kii sadaa kyaa hai ?
[darvesh: mendicant; sadaa: voice]
Yes, you do good deeds for others and good things will happen to you,
What else is the call of the mendicant?
Ghalib says, "Do unto others as you want them to do to you." That is what the faqir always says. Nazm says that in this sher Ghalib acts cheeky. He asks his beloved to bestow favours on him. If she does so, God in turn will bestow favours on her.
जान तुमपर निसार करता हूँ
मैं नहीं जानता दुआ क्या है।
jaan tum par nisaar karataa huu.N
mai.n nahii.n jaanataa duaa kyaa hai
[nisar: sacrifice]
I offer my life to you
I don’t know anything else as a prayer.
Ghalib says that while others may wish his beloved well in their prayers, he offers his life to her. So he is more sincere than others who merely pray for her.
मैंने माना कि कुछ नहीं ग़ालिब
मुफ्त हाथ आये तो बुरा क्या है?
mai.n ne maanaa ki kuchh nahii.n 'Ghalib'
muft haath aaye to buraa kyaa hai ?
I realize that "Ghalib" is not much
But if you get him free, where is the problem?
Ghalib tells his beloved that he realizes that he is nothing to her, is useless, but why not accept him; for he comes free of cost. He is seeking nothing in return. He is ready to be her slave for free. (गालीब फ्री ?? 8> :-) )
तुम्ही हि अप्रतिम गजल इथे ऐकू शकता
http://www.youtube.com/watch?v=8w1beAkBvV0&feature=player_embedded
~ वाहीदा
29 May 2010 - 11:16 pm | पांथस्थ
हा अनुवाद तुमचा का इतर कोणाचा?
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
30 May 2010 - 3:48 am | सुधीर काळे
जय हो, वाहीदा. सुरेख प्रतिसाद. तुझा गझलियातचा अभ्यास उच्च प्रतीचा आहे असे वाटते.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
25 Jun 2010 - 12:21 pm | जयंत कुलकर्णी
खालील ब्लॉग आपला आहे का ?
असल्यास चांगला आहे.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
29 May 2010 - 11:58 pm | Pain
मी त्यापैकी १ !
30 May 2010 - 2:21 am | शिल्पा ब
खुपच छान...अजुन येउ द्या.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
30 May 2010 - 9:25 am | आवडाबाई
रविवारची ह्यापेक्षा चांगली काय सुरुवात होऊ शकते ??
audio links आवडल्या - मला स्वतःला दुसरं version आवडलं.
धन्यवाद !!
31 May 2010 - 3:56 pm | अविनाशकुलकर्णी
सुफी संप्रदाय हा देवभोळया हिंदुंना बाटवण्यासाथी निघालेला पंथ होता असे वाचल्याचे स्मरते....जाणकारांनी खुलासा करावा
1 Jun 2010 - 2:25 pm | वाहीदा
I wonder why some people are hell bound to make strong hateful statements which is based on prejudice against race, religion, ethnic background without any thought to understand
or study the reality bites :-(
~ वाहीदा
1 Jun 2010 - 3:02 pm | llपुण्याचे पेशवेll
अविनाशजी,
ते काहीसे खरे आहे. सर्वच सुफी संत तसे नव्हते. पण चांगले वाईट सगळीकडे असतं त्याप्रमाणे तुम्ही म्हणता त्याप्रकारच्याही काही घटना घडल्या आहेत हे मात्र आहे.
पुण्यातले बडा शेख सल्ला आणि छोटा शेख सल्ला हे दर्गे अशाच सुफी म्हणवणार्यांनी बाटवलेली नारायणेश्वर आणि पुण्येश्वर अशी मंदिरे होत. नामदेवांच्या काही रचनांमधे या मंदिरांचा उल्लेख आहे. ही मंदीरे तेव्हा अस्तित्वात होती आणि नंतरच्या काळात ती खालसा केली गेली. त्यातील काही कोरीव काम केलेले दगड मध्यंतरी पुण्यात मुठेच्या काठी मिळाले होते. असो. पण मूळ सूफी संप्रदाय चांगला असेल हे नक्की.
आम्हाला तर गालिबची 'जिक्र उस परिवशका' ही गझल फारच आवडते.
कुलकर्णीसाहेब, एकदा जिक्र उस परिवशका वर ही येऊदे काहीतरी. गूढार्थ जाणून घ्यायचा आहे त्यातलाही. मध्यंतरी काळेकाकांनी ती गझल समजायला मदत केली होती. पण त्यांनी देखील आत्तातरी फक्त शब्द व शब्दार्थ समजत आहेत असे सांगितले होते. ते भावार्थ त्यांच्या मित्रांना विचारून सांगणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही देखील तो समजावलात तर बरे होईल.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
1 Jun 2010 - 3:34 pm | जयंत कुलकर्णी
'जिक्र उस परिवशका' इथे टाकता का? आणि ऑडिओची लिंक टाकलीत तर बरं होईल आणि जरा वेळ द्या. घरातली "काळी आणी पांढरी" संपली आहे ती आणतो आणि मग लिहीतो.
:-)
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
1 Jun 2010 - 4:13 pm | llपुण्याचे पेशवेll
जिक्र (उल्लेख) उस परीवशका (परीसारखी सुंदर) और फिर बयाँ (निवेदन) अपना
बन गया रकीब (स्पर्धक, आपल्या पोरीवर लाईन मारणारा) आखिर था जो राजदा (मित्र) अपना
मय (दारू) वो क्यों बहुत पीते बज्मे-गैरमें (परक्यांच्या/स्पर्धकाच्या मैफिलीत) यारब (हे भगवान)
आज ही हुआ मंझूर उनको इम्तिहान (परिक्षा) अपना
मंझर (देखावा) इक बुलंदीपर (उंचीवर) और हम बना सकते
अर्शसे (छपार, सातवाँ आसमान) इधर होता काश कि मकां अपना
दे वो कदर झिल्लत (टोकाचा अपमान) हम हंसीमें टालेंगे
बारे (शेवटी) आश्ना (प्रियकर) निकला उनका पासबाँ (रक्षक) अपना
दर्द-ए-दिल लिख्खूँ कबतक? जाऊं उनको दिखला दूँ
उंगलियाँ फिगार (जखमी) अपनी खामाखूँ-चकां (वाहणारे तरुण रक्त) अपना
घिसते-घिसते मिट जाता आपने अबस बदल (छोटासा बदल)
नंगे सजदासे (लज्जेत प्रार्थनेला झुकलेला) मेरे संग-ए-आस्ताँ अपना (दगडी घर)
ता करे न गमाझी (खबर्या), कर लिया है दुष्मनको
दोस्तकी शिकायतमें हमने हम-जबाँ (मित्र, एकवाक्यता असलेला) अपना
हम कहाँके दाना (हुषार, न्यायी) थे किस हुनरमें यक्ता (अत्युत्तम) थे
बेसबब हुआ दुश्मन 'गालिब' आसमाँ अपना
यात लिहीलेले शब्दार्थ श्री काळेकाकांनी दिलेले आहेत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
1 Jun 2010 - 8:20 pm | वाहीदा
ये रश्क है की , वो होता है हमसुखन हमसे
वरना खौफ- ऐ -बदामोजी - ऐ - अदू क्या है? :?
तुम्हीं कहो के ये अंदाज़ -ऐ - गुफ्तगू क्या है? :/
-- गालिब
~ वाहीदा
2 Jun 2010 - 12:17 pm | जयंत कुलकर्णी
कसले शत्रू की ते आमच्या महिफ़ीलीत सामील होतात
हेच का ते धोकादायक, विघ्नसंतोषी शत्रू ?
तुम्हीच सांगा ही आमची खास कुजबुज कसली ?
(आमच्या या असल्या मित्रांशी ?)
गालीबची आहे ही ?पूर्ण मिळेल का ?
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
2 Jun 2010 - 1:43 pm | वाहीदा
तुम्हाला पुर्ण गजल देते लवकरच पण तुमचा भावार्थ मात्र थोडासा चुकला हां कुलकर्णी सर ,
खरे तर गालिब ला समजणे फार मुश्किल (कठिण) आहे पण मी माझ्या अब्बुजानच्या जुन्या वहीतून (ज्या सध्या पत्रावळ्या स्थितीत आहे ) त्यांनी अभ्यासलेले भावार्थ देत आहे.
त्याचा भावार्थ असा आहे .
ये रश्क है की , वो होता है हमसुखन हमसे
वरना खौफ- ऐ -बदामोजी - ऐ - अदू क्या है?
ye rashk hai ki vo hotaa hai hamasuKhan hamase
vaarnaa Khauf-e-badaamozii-e-adu kyaa hai
[rashk: jealousy; hamasuKhan: some who converses with you]
[Khauf: fear; baaamozii: mislead]
My envy is that he converses with you Otherwise what is the fear that he would mislead you (against me).
Ghalib says that he does not care if his enemy misleads you against him. He is envious that you are (habitually/constantly) conversing with him. :-)
The Ghalib's (as a Lover) insecurity comes out openly in the verse.
हर एक बात पे कहते हो तुम की तू क्या है
तुम्हीं कहो के ये अंदाज़ -ऐ - गुफ्तगू क्या है?
har ek baat pe kahate ho tum ki tuu kyaa hai
tumhii.n kaho ke ye a.ndaaz-e-guftaguu kyaa hai
[guftaguu: talk]
Ghalib protests saying that anything that he says, he is insulted by the constant refrain, "Who art thou?" The 'kya' here is not meant to ask a question but to express a taunt. The emphasis should be read on 'har ek' and 'tum' i.e. he is being taunted on everything that he says. In this verse Ghalib is not insulting to his beloved, but kind of tells her that if she disagrees with him, she could argue, but not shut him up. :-)
सर, माझ्या कडे सुफी संप्रदायावर अब्बुजान ची बरीच पुस्तके आहेत अन काही पर्शियन भाषेतही ( जी मला काहीही कळत नाही)
तुम्ही सांगितलेले काही काही भाग त्याच्याशी contradictory आहेत.
इस्लाम (अन सुफी संप्रदायात) वंदनाला महत्व आहे पण नमन फक्त परमेश्वरचेच होते .
वंदन म्हणजे सलाम अन नमन म्हणजे सिजदा
खुदा के साथ कोई शिर्क नहीं . म्हणजेच कुठलिही भागिदारी नाही. चांद -सितारे, तरन्नुम , मौसिकी , वालिद - वालदायन , महदी ( Mahdi is the greatest teacher, the Messiah ), उस्ताद यह सब खुदाने दि हुई नियामते हैं , खुदा नही. These are attributes of Almighty and Not Almighty itself. कारण हे त्यानेच निर्माण केलीली गोष्ट आहे तो स्वतः नाही .
पण तुमच्या लेखातिल काही काही भाग मात्र आवडले. :-)
तुमचे सगळेच लेख मी आवर्जून वाचते
~ वाहीदा
2 Jun 2010 - 2:02 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद ! मी हा असा अर्थ का काढला ते लिहीन . पण तुम्ही म्हणता ते सहज शक्य आहे ( माझ्या चुकण्याबद्दल).
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
1 Jun 2010 - 4:09 pm | चिंतातुर जंतू
वाचून खेद झाला. सूफी पंथाचा इतिहास पाहिल्यास हे कळेल, की त्याचा जन्म आणि प्रमुख विकासाची केंद्रे भारताबाहेर होती. कट्टर इस्लामला अमान्य असलेल्या अनेक गोष्टी सूफींना मान्य होत्या - उदा. संगीताचा नुसता वापरच नव्हे, तर त्यास इश्वरापर्यंत जाण्याचे एक साधन मानणे, चित्रकलेला कनिष्ठ दर्जा न देता उलट प्रेषित मुहंमदाची चित्रे काढणे, वगैरे. या कारणांमुळे अनेक कडव्या इस्लामी राजवटींत सूफींचा छळ झाला (व आजही होतो). इस्लामिक क्रांतीनंतरच्या इराणमध्ये सूफी पंथाच्या लोकांचा छळ होतो वा दुय्यम वागणूक दिली जाते. औरंगझेबाने सूफींचा छळ केला. आज पाकिस्तानच्या अमलाखाली असलेल्या काश्मीरमध्ये सूफींचा छळ होतो.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
25 Jun 2010 - 12:58 pm | बिपिन कार्यकर्ते
झ का स ! ! ! कुलकर्णीसाहेब, मस्त लेख... प्रतिसादही आवडले.
अवांतरः सूफी पंथाबद्दल वरती जंतुंनी लिहिले आहेच. मध्ययुगीन भारतात बरीच धर्मांतरे सूफींमुळे झाली हे खरे आहे पण सूफींचा उगम त्यासाठी झाला हे मात्र खरे नाही. पण सूफी उपासना पद्धती ही भक्तिमार्गाच्या बरीच जवळ जाणारी असल्याने तो पंथ इथे बहरला. लोकांनाही इस्लामचे हे रूप परिचित आणि म्हणूनच जवळचे वाटले. अरबस्तानातला कोरडा इस्लाम आजही उपखंडातील मुसलमानांना थोडा अपरिचितच वाटतो.
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 1:35 pm | विसोबा खेचर
कुलकर्णीसाहेब,
एवढंच म्हणतो - जियो..!
तात्या.