मधूमेहाविरुद्ध लढा
अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले.
मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं.
त्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे. (अन्यथा मी कविता केली असती. पण अदिती ताई कविता केवळ विडंबन तयार करण्यासाठी वाचतात व त्यांनी डायबेटीस ची कविता वाचली नसती. असो. इथे चेष्टा मस्करी फार झाली हं.) असो.
तर माझी सही म्हणजे एक मोठा निळं वर्तूळ आहे. त्याखाली इंगजीत Unite for Diabetes असे अन मराठीत 'डायबेटीस विरूद्ध लढा' असे लिहीले आहे.
माझ्या घरात वडिलांना डायबेटीस आहे. तो अनूवंशीक नाही. पण त्यांच्या उपचाराच्या दरम्यान मी डायबेटीस बाबत जागरूक झालो. नंतर माध्यमांतून असेही समजले की काही वर्षांत भारत हा डायबेटीस असणार्यांचा देश होवू शकतो.
तो कसा अन का होतो, त्याबाबतची काळजी कशी घ्यायची वैगेरे चर्चा नंतर होईलच पण सहीमध्ये असले वर्तूळ हे 'जागतिक डायबेटिस शिखर संघटना ' (International Diabetes Federation (IDF)) यांचा लोगो आहे. डायबेटीस विरूद्ध जागरूकता आणण्यासाठी, संघटनेच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी अन मधूमेहा विरूद्ध लढा देण्यासाठी संकेत म्हणून हा लोगो वापरला जातो. हा लोगो कुणीही वरील कारणांसाठी वापरू शकतो.
डायबेटीस होवो न होवो, कमीतकमी दोन लोकांनी हे काय आहे म्हणून विचारावे अन मी सांगावे या साठी हा लोगो मी सहीत वापरत आहे. आपल्यातले बरेचसे बैठे काम करतात. कमीतकमी त्यांनी जागरूक व्हावे हा हेतू.
बाकी अदितीबाईंच्या सांगण्यावरून माझ्या सहीतले 'डायबेटीस विरुद्ध लढा' चे मी 'मधूमेहाविरुद्ध लढा' असे केले आहे.
'मधूमेहाविरुद्ध लढा'
प्रतिक्रिया
25 May 2010 - 11:21 am | श्रावण मोडक
इंग्रजीचा मी काही तज्ज्ञ नाही (तसा मराठीचाही नाहीच). पण इथे एक प्रश्न आहे.
या लोगोमध्ये 'युनाईट फॉर डायबेटीस' असे लिहिले आहे. फॉर हा शब्द बरोबर आहे का? तेथे अगेन्स्ट असे हवे आहे का? कारण तुम्ही अनुवादातही 'डायबेटीस विरुद्ध लढा' असे केले आहे. अर्थात, फॉर या शब्दानुसार एखादी अर्थच्छटा असेल तर तीही स्पष्ट करा.
बादवे, तुम्ही एक माहिती देऊ शकाल का? रक्तशर्करेचे प्रमाण अनशीपोटी ६० ते १०० आणि भरल्यापोटी १६० पेक्षा (या दोन्ही आकड्यांमध्ये थोडी इकडेतिकडे तफावत असू शकेल, मी यातलाही तज्ज्ञ नाही) कमी असे मान्य केले जाते. हे आकडे कधी, कोणत्या, कोठल्या, कसल्या, कोणावरच्या चाचणीतून निर्धारित झाले आहेत हे कुठे समजू शकेल? तुम्ही सांगू शकाल का? प्रश्न दुसरा - माणसाच्या शरीरातील या साऱ्या प्रक्रियांवर माणूस ज्या पर्यावरणात असतो त्याचाही परिणाम होतो का? होत असल्यास कसा आणि त्याचे काही असे आकडे निर्धारित आहेत का?
25 May 2010 - 11:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्रामोंच्या प्रतिसादाशी सहमतच! आणि मधुमेहाविरुद्ध "लढा" किंवा मधुमेहाविरूद्ध "एकत्र या" म्हणजे नक्की काय? ज्या त्या व्यक्तीने आपापल्या तब्येतीची काळजी घेणंच महत्त्वाचं नाही का?
पण "ही स्वाक्षरी बदला" असं सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी अंगापेक्षा बोंगा मोठा दिसत होता, शिवाय स्क्रोल करण्याचे कष्ट नाहक घ्यावे लागतात.
अदिती
25 May 2010 - 12:58 pm | शैलेन्द्र
"आणि मधुमेहाविरुद्ध "लढा" किंवा मधुमेहाविरूद्ध "एकत्र या" म्हणजे नक्की काय? ज्या त्या व्यक्तीने आपापल्या तब्येतीची काळजी घेणंच महत्त्वाचं नाही का?"
मधुमेह हा रोग नसुन एक अवस्था आहे जी इतर रोगांना जन्म देते. या अवस्थेतही शक्य तितके नीरोगी राहण्यासाठी समाजातील समदुखी: व इतर लोकांचा हातभार व प्रोत्साहन मीळाल्यास बराच फरक पडतो. जसे व्यायामातील नियमीतता, खाण्यापिण्याच्या ठरावीक सवयी या गोष्टी एकाने करणे कंटाळवाणे वाटते व त्या व्यक्तीस कधीकधी अपराधी वाटु लागते. पण जर ग्रुप करुन अशी जिवनशैली स्विकारली तर उरलेले आयुष्य बर्यापैकी आणंदात जाते.
25 May 2010 - 3:12 pm | चिरोटा
मधुमेह होवू नये म्हणून खाण्याच्या सवयी काय असाव्यात ह्यावरही चर्चा व्हावी.मधुमेह झाल्यावर साखर प्रमाणापेक्षा कमी खावी एवढेच माहित आहे्. हल्ली तिशीतच काहीना मधुमेह झाल्याचे दिसून येते.
P = NP
25 May 2010 - 11:25 pm | शिल्पा ब
माझ्या आईला मधुमेह आहे...डॉक्टरांनी तिला रोज कमीतकमी एक तास भरभर चालायला सांगितले आहे...कदाचित त्यामुळे साखरेमुळे येणारी उर्जा वापरली जात असेल किंवा वजन कमी झाल्याने मधुमेह treat करणे सोपे असेल...माहिती नाही...तसेच गोड पदार्थ, गोड फळं खायची नाहीत...आणि औषध वेळेवर घ्यायची...बाकी तुम्ही आयुर्वेदिक चूर्ण वगैरे घेऊ शकता..पुरवणी म्हणून.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
26 May 2010 - 12:03 am | शैलेन्द्र
आपल्या आईला टाइप २ डायबेटीस आहे, यात शरिरातील पेशी इन्सुलीनचा वापर करु शकत नाही व त्यामुळे शर्करा शोषुन घेवु शकत नाहीत, याने रक्तशर्करेचे प्रमाण वाढते. चालल्यामुळे, ति शर्करा वापरली जावुन नियंत्रणात राहते.(भरभर चालण्यापेक्षाही सावकाश पण आधीक काळ चालणे, सतत हलते राहणे आधीक फायद्याचे) मधुमेह हा स्वता: रोग असण्यापेक्षाही ति एक अवस्था आहे जी इतर गुंतागुंत तयार करते. खास करुन कीडनी व रक्त्तवाहीण्या या अवस्थेत प्रभावित होतात.
"बाकी तुम्ही आयुर्वेदिक चूर्ण वगैरे घेऊ शकता..पुरवणी म्हणून."
बर्याचदा ते निरुपयोगी असतात.
25 May 2010 - 11:43 pm | पक्या
मधुमेह साधासुधा आजार नाहिये. पथ्ये बरिच पाळावी लागतात. योग्य आहार आणि योग्य व्यायाम हे मधुमेहींसाठी बंधनकारक आहे.
काहींना ठराविक वेळापत्रकाप्रमाणे इन्शुलिन पण घ्यावे लागते आणि ते बरेचदा स्वतःच्या हाताने टोचून घ्यावे लागते. (रोजच घ्यायचे असेल तर रोज कुठे डॉक्टर् कडे पळणार? )
मधुमेहामुळे स्मरणशक्तीवर परिणाम झालेली व्यक्ती पाहिली आहे.
मधुमेहि व्यक्तींना त्यांचे वेळापत्रक पाळणे काही वेळेस अडचणीचे होते..नैराश्य , कंटाळा, दुर्लक्ष , आजारावरील खर्च वगैरेमुळे..अशा वेळेस आधारगट (सपोर्ट ग्रूप) असल्यास उत्तम. तो समदु:खी व्यक्तींचा असू शकेल अथवा त्यांची काळजी घेणार्यांचा असू शकेल. त्यांना मानसि़क आधाराचीही गरज असतेच.
>> ज्या त्या व्यक्तीने आपापल्या तब्येतीची काळजी घेणंच महत्त्वाचं नाही का?
हे बरोबर असले तरी प्रत्यक्षात त्यासाठी किती मनोबल लागते हे एखादा रोग/ आजार झालेल्या व्यक्तीला विचारून पहावे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
25 May 2010 - 11:46 pm | शिल्पा ब
दोन प्रकारचे मधुमेह असतात...type १ आणि type २ ......http://en.wikipedia.org/wiki/Type_2_diabetes
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 May 2010 - 11:40 pm | मदनबाण
डायबेटीस होवो न होवो, कमीतकमी दोन लोकांनी हे काय आहे म्हणून विचारावे अन मी सांगावे या साठी हा लोगो मी सहीत वापरत आहे.
अगदी योग्य करत आहात दफोराव...
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
26 May 2010 - 12:05 am | सुधीर काळे
"Unite for Diabetes" हे "Unite for (fighting against) Diabetes" चे संक्षिप्तीकरण असावे!
जरा अस्सल विषयाकडे वळल्यास बरे होईल.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
26 May 2010 - 1:43 am | विकास
मधूमेहाचे प्रमाण हे जगभर वाढत आहे. त्याला भारत पण अपवाद नाही. मुख्य कारण अर्थातच आहार आणि व्यायाम हे व्यवस्थित नसणे हे असते. आजच इथे रेडीओवर जाता जाता ऐकले, त्याप्रमाणे कृत्रिम पॅन्क्रीआ (मराठी?) आता प्रायोगिक तत्वावर वापरल्या जात आहेत. रॉयटरच्या बातमीचा हा दुवा.
साखरेचे प्रमाण कमी करणे हे यावर अत्यावश्यक असते. तसेच व्यायाम पण आवश्यक असतो. बर्याचदा या संदर्भात नीटसे शिक्षण हे मधुमेहपिडीताला आणि एकंदरीतच जनतेत दिले जात नाही. त्याचे पण विपरीत परीणाम होऊ शकतात. उ.दा. बर्याचदा मधूमेह असलेल्यांना रक्तातील साखर नियंत्रणाखाली ठेवायला म्हणून दरोज गोळी घ्यावी लागते. मात्र ती घेतल्यानंतरचा आहार कसा असावा हे जर सांगितले नाही तर गंभीर प्रकार घडतात. एका माहीतीतील व्यक्तीचे हे पाहीले आहे ज्यात गोळ्या नेमाने घेतल्या गेल्या पण त्याच बरोबर साखर पण कमी खाल्ली गेली. (साखर म्हणजे केवळ साखरच नाही तर, भात, फळे आदीतील पण). परीणामी शरीरावर गंभीर परीणाम होऊन अंत जवळ आला...
आहार आणि व्यायामाप्रमाणेच मानसीक जडणघडणीचा अर्थात आयुष्यात किती दडपणे आहेत आणि ती कशी घेतली जातात याचा देखील शरीरावर परीणाम होत असतो. मधूमेहासंदर्भात नाही पण इतर साध्या रोगांसंदर्भात एक वाक्य कायम ऐकले आहे: "रोग (जंतू) हे कायमच आजूबाजूस असतात. मात्र ते अशावेळेसच तुम्हाला संसर्ग करू शकतात, जेंव्हा तुम्ही दुबळे असता - विशेष करून मनाने". मधूमेहाने माणसाला खाल्लेले पाहीले आहे आणि असेही मधूमेही पाहीले आहेत जे मधूमेहाला पुरून उरलेत - अर्थात स्वतःची शारीरीक आणि मानसीक काळजी घेऊन. थोडक्यात आरोग्यावर होत असलेला मनाचा हातभार हा पूर्णपणे स्वतःवर अवलंबून असतो असे वाटते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
26 May 2010 - 2:06 am | पाषाणभेद
>>> बर्याचदा या संदर्भात नीटसे शिक्षण हे मधुमेहपिडीताला आणि एकंदरीतच जनतेत दिले जात नाही.
अगदी अचूक निरीक्षण. काही गोळ्या जेवणाआधी २० मी. घेवयाच्या असतात. काही जास्त वेळ. आघूनिक गोळ्या लगेच आधी घेतल्या तरी चालतात. औषधांच्या बाबतीत ताळतंत्र सोडणारे बरेच रोगी पाहीलेत. बरेच जण केवळ आयुर्वेदिक उपचार करतात. काही जण जडीबुटी घेतात. त्याने खरोखर काही उपाय होतो का याची चिकित्सा करणे नितांत गरजेचे आहे. (दुर्दैवाने आपण भारतीय लोकं असल्या चिकित्सा, प्रयोग कमी करतो अन परदेशी संशोधनाची कॉपी पेस्ट जास्त करतो.)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
26 May 2010 - 2:47 am | स्वाती२
चांगला विषय. डायबेटिसच्या बाबतीत व्यायाम आणि आहार दोन्ही महत्वाचे. बरेचदा आपल्याकडे साखर कमी खा, भात कमी खा वगैरे सांगितले जाते पण बर्याच पदार्थांमधे अतिरिक्त साखर असते ती टाळावी हे सांगितले जात नाही. साधे केचप्, बार्बेक्यू सॉस असे वरवर निरुपद्रवी पदार्थांमधे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते. ही अतिरिक्त साखर त्रासदायक ठरते. तसेच आहारात लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ वापरल्यास मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
26 May 2010 - 2:59 am | विकास
केवळ मुबलक आहे म्हणून कॉर्न सिरपचा वापर वाढवला आहे. किमान अमेरिकेत... ज्या पॅकेज पदार्थात कॉर्न सिरप असेल ते शक्यतो कोणिही खायचे टाळावे. तेच सॉफ्ट ड्रिंक्स अर्थात कोकच्या संदर्भात आणि वाईन तसेच कॉकटेल्स च्या संदर्भात. त्यातील शेवटचा भाग (मद्य) हा व्यसन नसल्यास कायम कोणी घेत नाही असे गृहीत धरून चालेल असे म्हणता येईल. पण कोक वगैरेचा वापर मात्र नक्कीच टाळावा.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
26 May 2010 - 4:36 am | सुचेल तसं
मधुमेहाबाबत अनेक प्रश्न आहेत. हा आजार अनुवंशिक आहे का? आई/वडील/आजी/आजोबांना असेल तर पुढच्या पिढीत येण्याची दाट शक्यता आहे असं ऐकलं आहे.
मला जर गोड पदार्थ खूप आवडत असतील तर मधुमेह कधीतरी गाठेलच का? गोड अजिबात न आवडणार्या लोकांना मधुमेह होऊ शकतो का? माझ्या पहाण्यात तरी अशा लोकांना मधुमेहानी अद्याप गाठलेलं नाही.
बरेच मधुमेही जांभळाचा रस, कडुनिंबाची पानं खाऊन मधुमेह आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करतात. त्याचा खरोखर फायदा होतो का? कोलेस्टरॉलचं प्रमाण जसं तपासता येतं तसं मधुमेह अद्याप न झालेल्यांबाबतीत तपासायचं काही परिमाण आहे का? मधुमेहींना तर साखरेच्या पातळीवरून सद्यस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
मधुमेही व्यक्तींना जर जखम झाली तर ते फार धोकादायक असतं असं ऐकलं आहे. यात कितपत तथ्य आहे?
कृपया जाणकारांनी माहिती द्यावी. धन्यवाद!!
26 May 2010 - 9:25 am | शैलेन्द्र
"मला जर गोड पदार्थ खूप आवडत असतील तर मधुमेह कधीतरी गाठेलच का? गोड अजिबात न आवडणार्या लोकांना मधुमेह होऊ शकतो का? माझ्या पहाण्यात तरी अशा लोकांना मधुमेहानी अद्याप गाठलेलं नाही."
मधुमेह होण्याच व गोड खाण्याचा संबंध नाही, पण अती गोड जास्त प्रमाणात खावुन येणार्या लठ्ठ्पणाचा नक्किच आहे.
"बरेच मधुमेही जांभळाचा रस, कडुनिंबाची पानं खाऊन मधुमेह आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करतात. त्याचा खरोखर फायदा होतो का? कोलेस्टरॉलचं प्रमाण जसं तपासता येतं तसं मधुमेह अद्याप न झालेल्यांबाबतीत तपासायचं काही परिमाण आहे का? मधुमेहींना तर साखरेच्या पातळीवरून सद्यस्थितीचा अंदाज येऊ शकतो."
मधुमेह साखरेच्या प्रमाणावरुन तपासतात. अनुवांशीकता, अतिरिक्त वजन, बैठी जीवन्शैली हे धोक्याचे ईशारे आहेत. पण हे सगळ नसेल तरी मधुमेह होणारच नाही अस काही नाही. वसीम अक्रमसारख्या अतिशय फीट खेळाडुला मधुमेह आहे. जांभुळ व कडुलींबाबाबत अजुन संशोधन झालेले नसावे. गंमत म्हणजे मधुमेहात ऊपयोगी म्हणुन काही लोक जांभळाचे सिरप घेतात, ज्यात प्रचंड साखर असते.
"मधुमेही व्यक्तींना जर जखम झाली तर ते फार धोकादायक असतं असं ऐकलं आहे. यात कितपत तथ्य आहे? "
भरपुर तथ्य आहे. मधुमेहात "न्युरोपाथी"(मराठी? चेतार्हास?) चालु होते. म्हणजे चेतापेशी हळुहळु काम करेणाशा होतात. तसेच धमणीकाठीण्य येते. याचा एकत्र परीणाम म्हणुन जखम भरायला बराच वेळ लागतो. तसेच रक्तशर्करेच्या जास्त प्रमाणामुळे श्वेतपेशी नीट काम करु शकत नाहीत, परीणामी जखमेत संसर्ग होतो. मधुमेही व्यक्तीनी आपल्या चेहर्यापेक्षाही आपल्या पायाची जास्त काळजी घ्यावी. पायाला पडलेल्या बारीक भेगा, व्रण याकडे दुर्लक्ष करु नये.
26 May 2010 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> मधुमेह होण्याच व गोड खाण्याचा संबंध नाही, पण अती गोड जास्त प्रमाणात खावुन येणार्या लठ्ठ्पणाचा नक्किच आहे. <<
निश्चितच! पण दुसर्या बाजूने विचारही करता येईल. माझी एक मैत्रिण, आई-वडील या दोन्ही बाजूंनी अनुवांशिक मधुमेह आहे, म्हणून आत्तापासूनच साखर कमी खाते, व्यायामही करत रहाते. तिचं म्हणणं, "मधुमेह टाळता येईस्तोवर टाळायचा. पण एकदा हा विकार जडला की नंतर साखर कमी करायचा त्रास नको व्हायला. मी आत्तापासूनच साखर, भात इ.इ. साधी शर्करा असणारे पदार्थ कमी खायची जिभेला सवय लावून ठेवते."
मधुमेही व्यक्तींना वेदनेची जाणीव कमी होते. सामान्यतः वेदनेच्या वरदानामुळे पायाला काही टोचलं, चप्पलही लागली तरीही लगेच त्रास होतो, जो टोकाचा मधुमेह असताना होत नाही. त्यामुळे या जखमांकडे दुर्लक्ष होऊन जखमांचं रूपांतर गँगरीनमधेही होऊ शकतं. आणि अशा वेळेस पाय (किंवा हात) कापावा लागतो. (माझ्या माहितीत हे सगळं सहन केलेली काही लोकं आहेत.) हे सुद्धा वेळेत झालं नाही तर मृत्यु अटळ असतो.
>> ... काही लोक जांभळाचे सिरप घेतात, ज्यात प्रचंड साखर असते.<<
मला माहित नाही पण शैलेंद्र, कदाचित तुम्हाला माहित असेल. जांभळात साधी शर्करा असते का क्लिष्ट शर्करा. भात, साखर यांमधे साधी शर्करा असते जी खाऊन लगेच ऊर्जा मिळते. गहू, मका इत्यादींमधे क्लिष्ट शर्करा जास्त असते, पण तरीही त्यातून कमी का होईना ऊर्जा मिळतेच. ओट्स, बाजरी वगैरे "हलक्या" प्रतीची धान्य खाल्ली तर या क्लिष्ट शर्करेचं साध्या शर्करेत रूपांतर करण्यातच शरीरातली ऊर्जा वापरली जाते, त्यामुळे या धान्यांमधून खूप कमी ऊर्जा मिळते.
जांभळाच्या बाबतीत असं काही आहे का?
शर्करा हा शब्द फ्रुक्टोज, ग्लुकोज, लॅक्टोज अशा साखरेच्या वेगवेगळ्या रूपांसाठी वापरला आहे; साखर म्हणजे आपली नेहेमीची खाण्यातली साखर.
अदिती
26 May 2010 - 10:13 am | शैलेन्द्र
मला जांभळात असलेल्या शर्करेबद्दल काही म्हणायचे नाही, तीत फ्रुक्टोज जास्त असते, पण तो रस टीकवण्यासाठी त्यात भरपुर साखर(उसाची) टाकुन त्याचे सीरप बनवले जाते, ते हाणीकारक आहे
26 May 2010 - 9:30 pm | धनंजय
जगाभरात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, त्यापेक्षासुद्धा भारतात प्रमाण अधिकच वाढत आहे.
मधुमेहाबद्दल जाणीव असणे, तो न-व्हावा अशा प्रकारचे आरोग्यपूर्ण जीवन जगणे, तो झाल्यास लवकर समजावे याबाबत जागरूक असणे, उपचारांबाबत काळजी घेणे, हे सर्व महत्त्वाचे आहे.
लेख आणि माहितीबद्दल धन्यवाद.
27 May 2010 - 12:25 am | मिसळभोक्ता
बीन देअर, डन द्याट....
रोजच्या साखरेच्या प्रमाणापेक्शा दर तीन महिन्यांनी तपासायचा एसी गुणोत्तर (रेशो) महत्त्वाचा. तो सहाच्या आत ठेवा.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)