हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;)
राम राम मंडळी,
नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली! ;)
तर ते असो...!
मंडळी, आता वास्तविक पाहता 'वैराग्य', 'आध्यात्म', 'आत्म्याचे अमरत्व', 'आत्मज्ञान', 'आत्मानंद' यासारखे शब्ददेखील आम्हाला फारसे कळत नाहीत, शिवाय या शब्दांनी चढणारी आध्यात्मिक नशा ही इतर कुठल्याही नशेपेक्षा भयंकर आहे, तेव्हा त्या वाटेला कधीही जाऊ नकोस अशी शिकवण आम्हाला आमचे गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांजकडून मिळाली आहे!
तर ते असो...
झालं असं, की मध्यंतरी आमचे दोन शिष्य धमाल मुलगा आणि मदनबाण हे आत्मानंदाच्या शोधात भटकत भटकत आम्हाला भेटण्याकरता ठाण्याला आले होते. वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही, तसेच गुरू या नात्याने काही विद्या त्यांना दान करावी असेही आमच्यापाशी काही नाही, तरीही ते आम्हाला गुरू मानतात हा त्यांचा मोठेपणा! ;)
तर त्या छानश्या संध्याकाळी आम्हा गुरुशिष्यांची ठाण्याच्या एका मालवणी हाटेलात भेट झाली. धमाल मुलगा आणि मदनबाण या आमच्या प्रिय शिष्यांना आम्ही काही मोलाचे मार्गदर्शन केले. आमचा प्रियशिष्य धमाल मुलगा आम्हाला म्हणाला,
"गुरुवर्य संत तात्याबा, बर्याच दिवसांपासून आपल्या तोंडून सिंगल माल्ट आणि सिंगल माल्ट परिवाराची ख्याती ऐकतो आहे, तेव्हा आज मला सिंगलमाल्टबद्दल काही अनुग्रह करून मार्गदर्शन करा आणि सिंगलमल्टची दीक्षा द्या!" ;)
आम्ही अर्थातच तथास्तु म्हटलं आणि धमालमुलाला सिंगलमाल्ट बद्दल योग्य ते मार्गदर्शन केलं! सिंगलमाल्टच्या तीर्थाचा पहिला घोट घशात जाताच मुळातच आत्मानंदी असलेला धमालमुलगा थोडं अधिक आत्मसंतुष्ट होत आम्हाला म्हणाला,
"वा गुरुवर्य! यापुढे जेव्हा कधी आम्ही सुराप्राश्नन करू तेव्हा सिंगलमाल्टच पिऊ! सिंगलमाल्टमुळे आमचा सैरभैर आत्मा आता स्थिर झाला आहे आणि आम्ही आत्मानंदी झालो आहोत!"
हे ऐकून गुरू म्हणून आम्हालाही खूप समाधान वाटले आणि आम्हालाही नव्यानेच आत्म्याचा शोध लागल्याचे जाणवले! ;)
आमचे दुसरे प्रितशिष्य मदनबाण गेले काही दिवस विजूभाऊंकरता निरनिराळ्या कैर्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होते. त्यांनाही आम्ही दोन घोट सिंगलमाल्ट पाजून त्यांचाही आत्मा तृप्त केला. सिंगलमाल्टमुळे झालेल्या आत्मानंदाच्या भरातच मदनबाण आम्हाला म्हणाला,
"बाकी तुम्ही काही म्हणा गुरुवर्य संत तात्याबा, आंब्यांच्या जोडीचे, कैर्यांच्या जोडीचे फोटो घ्यायची आणि पाहायची मजाच वेगळी, त्यांचा आस्वादच वेगळा!"
असं म्हणून मदनबाणने आम्हाला डोळा मारला तेव्हा सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो! ;)
तर अशी ही आम्हा गुरुशिष्यांची आत्मानंदी भेट आम्हाला खूप सुखावून गेली, आत्मानंद देऊन गेली!
आता आम्हा काही गुरुशिष्यपरंपरेतल्या मंडळींचे फोटू पाहा! मंडळी, यातल्या प्रत्येकाच्या चेहेर्यावर आपल्याला आत्मानंद दिसेल! अहो आत्म्याचा शोध लागलेलीच ही सगळी मंडळी आहेत! ;)
१) सर्वप्रथम जगत् गुरू भाईकाकाजी देशपांडे!
२) काकाजी देशपांडेंचे शिष्य आणि मराठी आंतरजालावर संतपदाला पोहोचलेले एक आत्मानंदी, संत तात्याबा महाराज! 'हा संतरुपातला गोसावडा संतबिंत कुणी नसून एक नंबरचा बाईलवेडा आहे!' असं त्यांचे काही हितचिंतक म्हणत असतात. म्हणोत बापडे! अजून त्यांना आत्म्याचा शोध लागला नाही असं आपण म्हणू! :)
आता परवाच्या ठाण्याच्या हाटेलातले काही फोटू. संत तात्याबा धमाल मुलाला आणि मदनबाणला आत्मज्ञान आणि आत्म्याचा शोध कसा लावायचा, हे शिकवत आहेत! ;)
१) आत्मज्ञानी संत तात्याबा महाराज. दुसरा पेग संपत आल्यामुळे चेहेर्यावर आत्मज्ञान जाणवू लागलं आहे! ;)
२) संत तात्याबा, धमाल मुलगा, मदनबाण - गुरुशिष्य आत्मरंगी रंगले आहेत! ;)
३) 'यापुढे प्राशन करीन तर सिंगलमल्टच प्राशन करीन!' अशी आत्मानंदी ग्वाही देत धमाल मुलगा गुरूच्या शेजारी बसला आहे! ;)
असो...
धन्यवाद,
श्रीसंत तात्याबा महाराज प्रतिष्ठान,
मराठी आंतरजाल.
प्रतिक्रिया
16 Apr 2008 - 3:01 pm | आनंदयात्री
:)))))
संत तात्याबांचा विजय असो !
सिंगल माल्ट परिवाराचा विजय असो !
आत्मानंदी गुरुशिष्यांचा विजय असो !
16 Apr 2008 - 3:15 pm | धमाल मुलगा
आश्रम !!!! जोरात आहे.
:-))))))))))))))))))))) जोरात फुटलो !
(च्यायला, इथं खरं तर खदाखदा हसणारं आणि ठाप्पकन कपाळावर हात मारुन घेणारं स्मायली टाकायला हवं)
ह्ये बाकी खरं हा !!!!
काय ब्रम्हानंदी टाळी लागली होती महाराजा...आहाहा...ह्या जगात सर्वत्र आनंदीआनंद पसरलेला आहे, एक उच्च कोटीची शांतता जीवाला आतून गोंजारते आहे...समोरच्या प्लेटीतला हलव्याचा खुसखुशीत तुकडा जिव्हानंदात भर घालतो आहे...
जय हो प्रभो !
हि: हा हा हाहाहाहहहहाहहा.....................मदन दा तू गेलास रे !!!!
हे तर १००००००००००% पटलं बॉ !
-(आत्मानंदी शिष्यानंद) ध मा लानंद.
16 Apr 2008 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते
मनुष्य जन्माला येऊन जीवाचे सर्वात प्रथम कर्तव्य काय असेल तर 'मोक्षप्राप्तिची' आस ठेवणे. म्हणूनच, आम्ही पण त्या मार्गावर सतत राहायचा प्रयत्न करतो. बर्याच दिवसांपासून 'सिंगलमाल्ट' ह्या मोक्षप्राप्तिप्रत नेणार्या पंथाबद्दल ऐकून आहोत. लवकरच दीक्षा घेऊ.
(तात्या, परवाच दुबई ड्युटी फ्री मधे तुमची मैत्रिण 'कु. ग्लेन्फिडिच' भेटलि होति. पण वेळेअभावी मनसोक्त बोलणे झाले नाही. आता पुढच्या वेळी नक्की.)
बिपिन.
16 Apr 2008 - 6:29 pm | छोटा डॉन
"मध्यंतरी आमचे दोन शिष्य धमाल मुलगा आणि मदनबाण हे आत्मानंदाच्या शोधात भटकत भटकत आम्हाला भेटण्याकरता ठाण्याला आले होते. वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही, तसेच गुरू या नात्याने काही विद्या त्यांना दान करावी असेही आमच्यापाशी काही नाही, तरीही ते आम्हाला गुरू मानतात हा त्यांचा मोठेपणा! ;)"
तात्याबा, आम्ही पण सध्या "गुरुविण कोण दाखवेल वाट ?" असे म्हणत गुरुच्या शोधात आहोत.
देताय काय आम्हाला "सिंगल माल्ट परिवाराची दिक्षा" ???
"काय ब्रम्हानंदी टाळी लागली होती महाराजा...आहाहा...ह्या जगात सर्वत्र आनंदीआनंद पसरलेला आहे, एक उच्च कोटीची शांतता जीवाला आतून गोंजारते आहे...समोरच्या प्लेटीतला हलव्याचा खुसखुशीत तुकडा जिव्हानंदात भर घालतो आहे..."
आहाहा, याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा विकांत धुंद जावा ....
शेवटी मी "हा ची पेग द्यावा तात्यादेवा, तुझा विसर न व्हावा !!!" असे म्हणून आख्यान संपवतो ....
तात्यांचा शिष्य छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Apr 2008 - 6:48 pm | वरदा
धन्य ते शिष्य आणि धन्य ते गुरु!!!!!!
16 Apr 2008 - 7:30 pm | विदेश
धन्य धन्य मार्गदर्शन हो सद्गुरू तात्याबांचे,
आणिक दीक्षाग्रहणहि धमु-मदनबाणाचे!
-ओसरीवर लोळत साष्टांग दंडवत
आपला,
फुल कंट्रीपान्डे
16 Apr 2008 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संत तात्याबाच्या आश्रमात दोन नवतरुणांनी जे ज्ञान संपादन केले, त्याच्यामुळे त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले जो आत्मानंद मिळाला त्याची प्रचिती गुरुच्या आणि शिष्यांच्या चेह-यावर स्पष्ट झळकत आहे.
धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य...........!!! :)
आपला,
अशाच एका आश्रमात भेट व्हावी, मार्गदर्शन व्हावे, यासाठी आसुसलेला.
प्रा .डॉ. नचिकेत
17 Apr 2008 - 10:20 am | धमाल मुलगा
आपला,
अशाच एका आश्रमात भेट व्हावी, मार्गदर्शन व्हावे, यासाठी आसुसलेला.
प्रा .डॉ. नचिकेत
ज ह ब ह र्ह्या !!!
सssर...यु टूsss????
- ज्युलियस ध मा ल.
16 Apr 2008 - 9:01 pm | आनंद
भाईकाकाजीं चा फोटो खटकतोय,
खाली जे चाललय आणि त्याचा काही संबध लागत नाही.
(अल्पमती आनंद)
17 Apr 2008 - 1:28 am | विसोबा खेचर
भाईकाकाजीं चा फोटो खटकतोय,
का बरं खटकतोय? सदर लेखनात गुरुशिष्य परंपरेचा उल्लेख आहे आणि भाईकाका आमचे गुरू आहेत म्हणून आम्ही त्यांचाही फोटू वर दिला आहे? आता यात आपल्याला खटकण्यासारखं काय आहे हे कळलं नाही!
मंडळी, आता वास्तविक पाहता 'वैराग्य', 'आध्यात्म', 'आत्म्याचे अमरत्व', 'आत्मज्ञान', 'आत्मानंद' यासारखे शब्ददेखील आम्हाला फारसे कळत नाहीत, शिवाय या शब्दांनी चढणारी आध्यात्मिक नशा ही इतर कुठल्याही नशेपेक्षा भयंकर आहे, तेव्हा त्या वाटेला कधीही जाऊ नकोस अशी शिकवण आम्हाला आमचे गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांजकडून मिळाली आहे!
हे आम्हाला भाईकाकांनीच शिकवलं आहे!
आता वास्तविक पाहता ठणठणपाळांनी नचिकेताची म्हणून जी काही कथा दिली आहे आणि बर्याच मंडळींनी मारे त्याला वा छान वगैरे म्हटलं आहे, तर या सर्व मंडळींचा आदर राखून मी एवढंच विचारू इच्छितो की असं काय हो त्या कथेत विशेष कथामूल्य आहे? जळ्ळं आत्म्याच्या अमरत्वाचं फुटकळ तत्वज्ञानच आहे ना? च्यामारी कुणी पाहिला आहे आत्मा? तुम्ही पाहिला आहे का हो आनंदराव? ;)
साला, आप मेला जग बुडाला एवढंच खरं! बाकी सगळ्या निव्वळ गप्पा आहेत असं आमचं मत आहे! छ्या, या नचिकेताच्या भुक्कड कथेपेक्षा आमचे द मा मिरासदार, शंकर पाटील, आणि तात्या माडगुळकर यापेक्षा कितीतरी अधिक पटीने निखळ करमणूक करणार्या परंतु सशक्त कथा लिहितात! खरं की नाही सांगा पाहू! ;)
बरं का आनंदराव, हा सगळा विचार करायला आम्हाला भाईकाकांनी शिकवलं म्हणून त्यांचा फोटू लावला आहे! अर्थात, आपल्याला तो फोटू अजूनही जर खटकत असेल तर अवश्य सांगा, आम्ही तो फोटू काढून टाकू! ;)
खाली जे चाललय आणि त्याचा काही संबध लागत नाही.
हा हा हा! असं कय मोठं चाल्लंय हो खाली? तुमचा तर असा सूर दिसतो आहे की खाली जे काही चाललं आहे ते काहीतरी भयंकर आहे! ;)
असो..!
आमच्या गुरुवर्यांचा फोटू खटकत असेल तर अवश्य सांगा अशी पुन्हा एकदा विनंती! आम्ही आपल्या इच्छेला मान देऊन तो फोटू येथून अगदी अवश्य उडवून लावू!
नाहीतरी, "आपण सहज म्हणून काहीतरी गंमत करतो आणि नेमका कुणीतरी लांब चेहेर्याचा समिक्षक किंवा नसता शंकेखोर भेटतोच!" असं पार्ल्याच्या एका भाषणात भाईकाका म्हणाले होतेच, त्याचा प्रत्यय आला! ;)
असो..
आपला,
(शून्य जिन्दादिली आणि अत्यल्प समज असलेला एक समिक्षक!) तात्या.
17 Apr 2008 - 5:44 pm | आनंद
हा हा हा! असं कय मोठं चाल्लंय हो खाली? तुमचा तर असा सूर दिसतो आहे की खाली जे काही चाललं आहे ते काहीतरी भयंकर आहे! ;)
नाही त्यात काही भयंकर नाही ते तर आम्ही ही करत असतो.
फोटु काढून टा़कण्याची ही काही आवशक्यता नाही.
आपली सहज म्हणून काहीतरी केलेली गंमत आम्हाला कळली नाही, सबब आम्ही अत्यंत अज्ञानी आहोत.
हे आम्ही अगदी मनापासुन लिहीत अहोत.
( स्वत: ला आम्ही म्हणायला लागल्या पासुन आपण कुणीतरी वेगळे अहोत असे वाटणारा मी --आनंद)
18 Apr 2008 - 10:21 am | मदनबाण
त्या छानश्या संध्याकाळी आम्हा गुरुशिष्यांची ठाण्याच्या एका मालवणी हाटेलात भेट झाली. धमाल मुलगा आणि मदनबाण या आमच्या प्रिय शिष्यांना आम्ही काही मोलाचे मार्गदर्शन केले.
हो ते गुढ आणि बहुमोल मार्गदर्शन खरेच अगदी अनमोल आहे.....
सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो!
संत तात्याबा महाराजांचा अनुग्रह झालेल्या प्रतेक शिष्याला हा आत्मानंद लगेच प्राप्त होतो हे मात्र खरे..... :):):):):)
(सिंगलमाल्टरुपी सोमरसाचा प्रथमच आनंद घेणारा)
मदनबाण