मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम
बेवड्या या भक्तासाठी, रोज असे शाम* (संध्याकाळ)
एक एक प्याला हाती, भक्त जाई पीत
एक एक पेगा जोडी, अखेरीस चीत
रोजचेच काम
दास `रम'नामी रंगे, मुखा येई वास
एक एक धाबा धुंडे, होऊनिया लास
हाती ना छदाम
पिऊन रिक्त झाला पेला, सरे सर्व `जाम'
ठायि ठायि वाटेवरती, ट्रॅफीक ही जाम
जागीच आराम
हळु हळु उघडी डोळे, पाहि दिवा-खांब
नाकावरी नाही चष्मा, जोडे तिथे लांब
खांबातळी राम!
*(संध्याकाळ)
प्रतिक्रिया
11 Apr 2008 - 10:45 am | विसोबा खेचर
अहो का आमच्या भाईकाकांच्या आणि माणिकताईंनी म्हटलेल्या यमनमधल्या इतक्या सुंदर गाण्याची वाट लावताय?
तात्या.
11 Apr 2008 - 10:55 am | विजुभाऊ
तात्या विडंबनाचे हे असेच होते. मागे केसू ने "जेंव्हा तीची नी माझी चोरुन भेट झाली " च विडंबन "जेंव्हा तीचीन माझी धडकुन भेट झाली" असे विडंबन केले होते .विडंबन खासच होते .
कधीतरी त्या नन्तर ते गाणे रेडिओ वर लागले . ऐकताना त्या गाण्याचा मजा पार किरकिरा झाला हो. मूल गाणे सोडुन विडंबीत कविताच ओठी यायला लागली. एरवी ते गाणे ऐकले की येणारा रोमँटीक मूड पार ऑफ्फ आणि खल्लास झाला
गात्या गाण्याची विडंबने न करत्या कवितांची विडंबने करा अशी विनन्ती करुया का या सगळ्याना? अत्र्यानी सुद्धा फक्त कवितांची विडंबने केली आहेत. ती सुद्धा रविकिरण मंडळाच्या सभासद कवींच्या कवितांची.
11 Apr 2008 - 11:56 am | बेसनलाडू
उशीराने का होईना, मागे मी विडंबनासंबंधी मांडलेल्या काही मुद्द्यांचा विचार सगळ्याच (!) सदस्यांकडून होऊ लागला आहे, हे पाहून बरे वाटले ;) आपापली श्रद्धास्थाने, आवडीनिवडी, वैयक्तिक हेवेदावे नि 'आपला तो बाब्या' वृत्ती सोडून या मुद्द्यांचा सगळेच वस्तुनिष्ठ विचार करतील, अशी आशा करावयास हरकत नाही आता.
(वस्तुनिष्ठ)बेसनलाडू
11 Apr 2008 - 12:09 pm | विसोबा खेचर
मागे मी विडंबनासंबंधी मांडलेल्या काही मुद्द्यांचा विचार सगळ्याच (!) सदस्यांकडून होऊ लागला आहे, हे पाहून बरे वाटले ;)
मी दिलेल्या प्रतिसादासंदर्भात जर वरील वाक्य असेल तर मी असे निवेदन करू इच्छितो की विडंबनासंदर्भात आपण मांडलेला कुठलाच मुद्दा मी वाचलेला नाही त्यामुळे त्यावर विचार करण्याचा प्रश्नच येत नाही!
मी फक्त तळीरामांचे सदर विडंबन वाचून माझ्या मनात तात्काळ जे विचार आले तेच इथे प्रतिसादरुपाने मांडले आहेत...
धन्यवाद...
तात्या.
11 Apr 2008 - 12:18 pm | बेसनलाडू
सगळेच सदस्य म्हटले की रचनाकर्ते, प्रतिसादक व वाचक सगळेच समाविष्ट झाले. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही प्रतिसाद कृपया तुमच्या स्वतःच्याच रचना, प्रतिसाद इ. शी रेलेट करू नये. कसला विचार करायचा कसला नाही हे मी तुम्हाला सांगून फायदा नाही, त्याची गरज तर त्याहूनही नाही, हे मी जाणतो. त्यामुळे तुम्ही किंवा इतर कोणीही मी लिहिल्यापैकी कय वाचले काय नाही, चांगला/वाईट प्रतिसाद दिला, माझ्या मुद्द्यांवर, लेखनावर विचार केला की नाही वगैरे वगैरेचे 'एक्स्प्लिजिट विश्लेषण' करत नाही/करणार नाही. रचना व प्रतिसादांचे बारीक निरीक्षण व आंतरजालावरील आतावरच्या वावराचा अनुभव त्यासाठी पुरेसे आहेत. सबब मी येथे जे काही बरेवाईट लिहितो/लिहिले आहे/लिहीन त्यातले किती वाचायचे, किती नाही, कितीचा विचार करायचा अगर नाही वगैरे ठरवायला तुम्ही स्वतः आणि इतर सदस्यही समर्थ आहेत, हे मी चांगलेच ओळखतो.
(जागरूक)बेसनलाडू
11 Apr 2008 - 12:21 pm | विसोबा खेचर
कसला विचार करायचा कसला नाही हे मी तुम्हाला सांगून फायदा नाही, त्याची गरज तर त्याहूनही नाही, हे मी जाणतो.
धन्यवाद!
11 Apr 2008 - 12:12 pm | विजुभाऊ
मी फक्त तळीरामांचे सदर विडंबन वाचून माझ्या मनात तात्काळ जे विचार आले तेच इथे प्रतिसादरुपाने मांडले आहेत...
हेच म्हणतो