भक्ति शक्ति- निगडि येथील हे शिल्प.
अर्थात हे पुर्ण शिल्प नाही.
ह्याची कल्पना छान आहे. शिवाजी महाराजांच्या मागे मावळे आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मागे वारकरी आहेत.
आणि त्यांची भेट अस शिल्प आहे.
हे पुर्ण शिल्प मला एकत्रीत कॅमेर्यात बंदिस्त नाही करता आल. त्याला कसलेला आणि अनुभवी छायाचित्रकार हवा :)
ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 12:13 am | अभिज्ञ
प्रत्यक्ष पाहिले आहे.परंतु लांबुनच.
इथे मात्र फारच सुंदर दिसतेय.एक संग्रहणीय छायाचित्र.
अबब.
10 Apr 2008 - 12:13 am | भडकमकर मास्तर
झकासराव, मस्त जमलाय फोटो....
फोटोतलं आपल्याला व्याकरण कळत नाही तरी फोटो नक्कीच आवडला...
ते शिल्प खरंच सुंदर आहे....
.... जाता येता दिसते पण निवांतपणे पहायला नेहमीच जमत नाही......
असो...छान फोटो...
15 Apr 2008 - 2:05 pm | धमाल मुलगा
फोटोचं व्याकरण नाही कळलं तरी फोटो मस्त आलाय एव्हढं सांगू शकतो.
खरंय. निवांतपणे नाहीच कधी पाहिलं. पण ही हलक्या हिरव्या रंगाची छटा फोटोला एक वेगळाच लूक देऊन जाते.
उ...त्त....म !!!
10 Apr 2008 - 8:47 am | विसोबा खेचर
सुंदर फोटो रे झकासा!
ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.
असेच म्हणतो!
तात्या.
10 Apr 2008 - 9:33 am | मदनबाण
भक्ति-शक्ति चा हा संगम खरच खुप सुंदर आहे.....
(भजनी रंगलेला मराठमोळा मावळा)
मदनबाण
10 Apr 2008 - 9:18 pm | झकासराव
अबब, भडकमकर्,तात्या आणि मदणबाण :)
15 Apr 2008 - 1:39 pm | देवदत्त
आत्ताच लोकसत्ता मध्ये पाहिलेल्या बातमीनुसार ह्याचे शिल्पकार श्री. मदन गर्गे ह्यांचे अपघाती निधन झाले आहे.
वाईट बातमी. :(
15 Apr 2008 - 2:47 pm | विदेश
झकासराव, एकदम झकास! ओठातून आपसूक येते- जाणता राजा पंढरीचा !
15 Apr 2008 - 3:33 pm | ध्रुव
सुंदर शिल्पं
निगडीमध्ये कुठे आहे. पत्ता देउ शकाल का?
--
ध्रुव
15 Apr 2008 - 6:11 pm | भडकमकर मास्तर
मुम्बईकडून निगडीत प्रवेश होता होता मुख्य हमरस्त्यावरच जकातनाक्याजवळ उजवीकडे दिसतेच........
खरेतर भक्ती शक्ती शिल्प हीच एक मोठी खूण आहे... जरूर पहा...
15 Apr 2008 - 7:03 pm | ध्रुव
त्या भागात कधी हिंडलो नाहीये. सापडले नाही तर परत कधीतरी त्रास देणार :)
--
ध्रुव
15 Apr 2008 - 6:07 pm | शितल
तेथे कर माझे जुळ्ती
म्हणा हर हर महादेव,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
15 Apr 2008 - 8:03 pm | विकास
शिल्पाकृती खूप आवडली. किमान रस्त्यावरून जात असताना बघायला लक्षात ठेवली पाहीजे.
15 Apr 2008 - 8:08 pm | देवदत्त
प्रतिसाद द्यावयाचा राहिला होता.
मी ही बहुधा पाहिले आहे हे शिल्प. पण एवढ्या जवळून नाही.
खरोखरच छान आहे.