सव्यसाचि (भाग -३)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
17 Mar 2010 - 4:34 pm

भाग -१

भाग -२

K|nG786N :- हमारे दुनियामे आनेसे पहेले नाम / देश और धर्म दोनो छोडना पडता है ये बात १०० बार पहले अपने दिमाग मे टाईप करलो.. तो चलो मेरे चेले कल मिलेंगे और इसी बॅंक का सर्व्हर हॅक करके तुम्हारी पढाई-लिखाई चालु करेंगे

मी :- व्हॉट ????

मला तर रात्रभर झोपच लागली नाही. आता काय होईल ते होईल पण मागे हटायचे नाही असे ठरवुन दुपारी याहुला लॉग इन झालो. पण त्या दिवशी शफी साहेब आलेच नाही. माझी कोणी गंमत तर नसेल ना केली ? राहुन राहुन मला हाच प्रश्न सतावत होता. दुसर्‍या दिवशी कॉलेजला टांग मारुन आम्ही आमचा मुक्काम याहु रुम मध्येच हलवला. साधाराण दुपारी १ च्या सुमाराला शफी अवतरला.

"क्यु बे इंडियन कैसा है ? चल ये फाईल एक्सेप्ट कर और ठिकसे पढ इसको" आल्या आल्या साहेबांनी हुकुम केला.

साला फाईल एक्सेप्ट करावी का नको ? नक्की कसली फाईल असेल ? माझे विचारचक्र चालु झाले...

"अबे वर्ड फाईल हि है वो, दोस्त को दगा देने की रीत नही है हमारी."

झाले क्षणात माझ्याकडून एक्सेप्ट वर क्लिक केले गेले. डाउनलोड झाले ली फाईल मी उघडून वाचायला सुरुवात केली. साला हा शफी खरच भुत आहे की काय ?? मला चक्कर यायची फक्त बाकी होती....

फाईल मध्ये महाराष्ट्र माझा बॅंकेच्या सर्व्हरची इत्यंभुत माहिती नोंदवलेली होती. जणु बॅंकेची वेबसाईट ह्या शफीने बनवली असल्यागत सगळ्या नोंदी त्यात लिहिलेल्या होत्या. साला हे म्हणजे एकाने हरणाला पकडून ठेवल्यावर दुसर्‍याने त्याला बाण मारुन शिकार करण्यायेवढे सोपे काम होते आता.

पण धनुष्य बाण आणी नेम धरुन चालवायची पद्धत अजुन शिकायची बाकी होती ना !! पुन्हा आम्ही मसिहा शफी ह्यांच्या कृपेसाठी धाव घेतली. फाईल संपुर्ण वाचल्याचे सांगुन आता पुढील विद्या प्रदान करण्याची विनंती केली.

"साले तुम चोटीवाले झटसे सब सिख जाते हो ;) अच्छा डि-डॉस के बारे मे पता है ? कभी किया है ??" शफी साहेब.

" IRC सर्व्हर्स पे किया था. लास्ट टाईम ब्रॉड-वे और थायलंड के ६ सर्व्हर्स क्रॅश हो गये थे उसमे मैने व्हिक्टर का साथ दिया था. मेरे बॉट नेट से मैने थायलंड के २ सर्व्हर्स क्रॅश किये थे" माझी स्व-स्तुती.

"चुत्या है वो व्हिक्टर ! आजकल अंदर है क्रेडीट कार्ड हॅकींग के जुर्म मे" शफी कडून माझ्या ज्ञानात भर आणी बरोबरीने व्हिक्टर (आणी माझे) मुल्यमापन.

"ये सब नही पता. मैने कभी क्रेडीट कार्ड के लोचे नहि किये." मी.

"कभी करना भी मत ! साला खाया पिया कुछ नाही... अच्छा तेरा बॉट नेट चालु है ना अभी ? मेरे आय आर सी चॅनेल पे जरा फ्लड करके बता" शफी म्हणाला.

काही वेळातच मी त्याला मस्त फ्लड करुन दाखवला, त्याच बरोबरीने त्याला माझे बॉटस आणी प्रॉक्सीज देखील दाखवल्या.

"एकदम बढीया. साले तु हिरा है, बस तेरे को थोडा चमकाना मांगता है !"

आणी पुढे अनेक दिवस शफी साहेब आम्हाला चमकावत होते. बाय द वे त्या दिवशी महाराष्ट्र माझा बॅंकेच्या सर्व्हरची जी दारुण अवस्था झाली त्याबद्दल खरे तर सर्व परिक्षार्थींची माफी मागतो बर का. जरा जोरातच धक्का मारला गेला माझ्याकडून, पुर्ण ४२ तास झोपला बघा सर्व्हर.

असो...

हळुहळु शफीच्या तालमीत मी चांगलाच तयार झालो होतो. त्याचा माझ्यावर येवढा का जीव होता मला आजही माहित नाही, पण आज मी शफीच्या देखील चार पावले पुढे आहे ते त्याच्याचमुळे.

सर्व्हर्स आणी वेबसाईटसचे गळे दाबायला शिकल्यानंतर आता पुढला टप्पा होता फिशींगचा . ह्या विषयात मात्र मी अगदी घोड्यासारखा जोरदार धावलो हे स्वस्तुतीचे आरोप सहन करुनही मला सांगीतलेच पाहिजे. फिशींग शिकायला सुरुवात केल्यापासुन बरोब्बर पाचव्या दिवशी मी ई-बे चे फिशींग पेज बनवुन शफीच्या खात्यात १२०० डॉलर्स आणी ४ क्रेडीट-कार्डचे नंबर गोळा करुन दाखवले. फिशींगमध्ये मी मास्टर असलो तरी माझ्या दृष्टीने ती एक भुरटी चोरीच होती, ज्यात मला कधिच रस वाटला नाही. पण ह्या फिशींग मधल्या प्रभुत्वानेच माझ्यासाठी एकदिवस अलीबाबाच्या गुहेचे दार उघडले.

ज्या दिवसाची प्रत्येक छोटा मोठा हॅकर स्वप्न बघत असतो आणी ती फक्त स्वप्नच राहणार हे मान्य करत असतो तो दिवस माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात उजाडला.

ती शनिवारची रात्र मी कशी विसरणार ; साधारण रात्री ११ च्या सुमाराला मला याहु फोनवरुन कॉल आला. कॉलर अन-नोन होता पण आता त्याची सवय झाली असल्याने मी सहजपणे कॉल रिसीव्ह केला.

"पॅपीलॉन ??" पलिकडून विचारणा झाली.

"येस" मी सहजपणे उत्तर दिले.

"वेलकम टू एलीट क्लब...." पलिकडून उदगारले गेलेले हे चारच शब्द माझ्या हाता पायाला थरथर सुटण्यासाठी पुरेसे होते.....

(क्रमश:)

(कथा पुर्णतः काल्पनीक)

कथाजीवनमानतंत्रमौजमजाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

17 Mar 2010 - 5:16 pm | महेश हतोळकर

वेग आणि पकड जबरदस्त आहे. येऊदे. वाचतो आहे.

नील_गंधार's picture

17 Mar 2010 - 5:37 pm | नील_गंधार

तीनहि भाग वाचले.
कथासुत्र व कथेचा वेग फारच छान.
पुढचे भाग पटापट येउ द्यात.

नील.

रेवती's picture

17 Mar 2010 - 5:37 pm | रेवती

हा भाग मस्त! पुढे?

रेवती

अस्मी's picture

17 Mar 2010 - 5:45 pm | अस्मी

सही वेग...सॉल्लिड इन्टरेस्टिंग आहे
आणि हॅकिंग बद्दल अजून माहिती पण मिळाली... :)

पुढ्चे भाग लवकर येऊद्यात..

- मधुमती

कानडाऊ योगेशु's picture

17 Mar 2010 - 7:17 pm | कानडाऊ योगेशु

खतरनाक..
पुढे काय झाले हे वाचायला उत्सुक!
---------------------------------------------------
टार्झनं प्रथमं वंदे तात्यां तदनन्तरं |महादेवस्य दर्शनं पूर्व नंदीं दर्शनं यथा||

टारझन's picture

17 Mar 2010 - 7:33 pm | टारझन

रोमांचकारी लेखन .. पटपट येऊन दे भो पर्‍या ...

- भाडखाऊ टारेशु

अभिज्ञ's picture

17 Mar 2010 - 7:25 pm | अभिज्ञ

प-याशेठ,
छान लिहितो आहेस.
तीन्ही भाग लैच भारी.
कथेचा वेग मस्तच.

अभिनंदन

अभिज्ञ

प्राजु's picture

17 Mar 2010 - 7:47 pm | प्राजु

लवकर लिही बाबा..
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अनिल हटेला's picture

17 Mar 2010 - 11:01 pm | अनिल हटेला

तीनही भाग एकत्र वाचले....वेग ,मांडणी आणी पूर्ण कथासुत्र अगदी झक्कास...:)

पू भा प्र..... :?

बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

मदनबाण's picture

18 Mar 2010 - 7:37 am | मदनबाण

वाचतोय रे...

मदनबाण.....

स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!!

http://bit.ly/dlmzCy

पाषाणभेद's picture

18 Mar 2010 - 8:06 am | पाषाणभेद

मैंने भी वाच्या.
एक खटकले. कथेतही तो पाकड्याला तुझ्यावरचढ का दाखवलास रे?

कोणी आस्ट्रेलीयन, नॉर्वेजीयन, किंवा बंगाली, तमिळी, कानडी, गेला बाजार बिहारी देखील चालला असता.

पुढील आवृत्तीत बदल करावा ही ईच्छा.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

विशाल कुलकर्णी's picture

18 Mar 2010 - 11:07 am | विशाल कुलकर्णी

भन्नाट वेगाने चाललीय कथा..... येवु दे अजुन.....

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"